उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री पदाची हौस शिवसैनिकाच नुकसान करत आहे. – शिवसेना खासदार

        मंडळी दैनंदिन जीवनात आपण एक म्हण वापरत असतो तीन तिघाडा काम बिघाडा. तसच काही आता महाराष्ट्र सरकारच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्याबाबतीत होतांना दिसून येतंय. जेव्हापासून शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच सरकार महाराष्ट्रात बसलं, तेव्हापासून अनेक वाद आपसातच या तीनही पक्षामध्ये येतांना दिसून आले आहेत. महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षातील नेत्यांची भाषणात बोलत असतांना एकमेकांविरोधात बहुतेक वेळा जीभ घसरली आहे. कुठल्याही पक्षाला हमी नाही की सरकार कुठपर्यंत टिकेल. सरकार बसण्यावेळी फार मोठा राजकीय खेळ या महाराष्ट्रात आपण बघितला. कोणता आमदार कुठे जाईल याची कुणालाच हमी नव्हती. चक्क एका कमऱ्यामध्ये १६२ आमदार बंद करण्यात आले होते. आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर काही अवधीमध्येच मा. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अखेर बैठक बसली. सर्वे बोलून झाले. तीनही पक्षाने आपापसात आपापल्या नियम अटी मान्य केल्या. मंत्रीपदाचा वाटप झाला आणि शिवसेना- राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महायुती आघाडी सरकारच्या नविन पर्वाला सुरवात झाली. 

शिवसेना खासदाराच्या सहनशीलतेचा डोंगर कोसळला.

  सगळं सुरळीत चालू असताना छोट्या मोठया कारणावरून मतभेद निर्माण व्हायला सुरुवात झाली. ते म्हणतात ना की, कुटुंबामध्ये जेवढे जास्त लोक तेवढे जास्त भांडे वाजणार. तर मंडळी झालं असं की, एका सभेदरम्यान भाषण करत असताना जेष्ठ काँग्रेस नेते व महाविकास आघाडीतील मंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टोलेबाजी केली. ते म्हणाले की, \" काँग्रेसने पाठिंबा दिला नसता तर काय केले असते? काँग्रेस आहे म्हणून महाविकास आघाडी सरकार टिकून आहे.\" हे विधान हिंगोली लोकसभा मतदार संघातील शिवसेना खासदार मा. हेमंत पाटील यांच्या कानावर पडले. तेव्हा त्यांच्या मनात आधीच महाविकास आघाडीमध्ये होत असलेल्या शिवसैनिकाच्या नुकसानाची गोष्ट होतीच. मंत्री अशोक चव्हाण यांना प्रतिउत्तर देत खासदार हेमंत पाटील म्हणाले की, \" शिवसेनेचा मुख्यमंत्री नसता तर आपण कुठे असता? याचा थोडा तरी विचार आपण करायला हवा. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसैनिकांच फार मोठं नुकसान होतंय.\" अस ते म्हणाले. 
         महाविकास आघाडी सरकारमध्ये अशी वादवादी सतत होत राहिली तर सरकार कस टिकणार? हा सर्वात मोठा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेसमोर निर्माण झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *