मंडळी सद्ध्या महाराष्ट्रातील राजकारणाची स्थिती हे धार्मिक वळण घेऊन भलत्याच मार्गावर चाललेली आहे. एकीकडे राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसा पठणाचा अट्टहास, तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भोंगे उतरवण्याचा मनसुबा.
या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील सर्व मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वात जास्त आनंद मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार यांना झाला आहे.
महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरे च योगींना पत्र
राज ठाकरे यांनी योगी यांना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केल आहे. सोबतच त्यांनी या पत्रामध्ये महाराष्ट्र सरकारलासुद्धा टोला दिला आहे.आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले की,
” योगी आदित्यनाथ हे दमदार नेतृत्व आहे. जो बोला ओ किया. जे जनतेला आवश्यक आहे त्यासाठी टाचखाऊ भूमिका घेतली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठलाही प्रश्न आल्यावर दिल्लीकडे बोट न दाखवता काम करणारा मुख्यमंत्री म्हणजे योगी आहे. करून दाखवणे याला म्हणतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करून दाखवल्याची भाषा करतात. त्यांनी आता योगींकडे ट्युशन क्लास लावायला हवा.”
अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क देण्यात याव – ऍड. नईम शेख
यापुढे त्यांनी म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पद हवं होतं. मात्र ते शिवसेनेकडे गेल्याकारणाने राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होत आहे. अस आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं. मात्र आता यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य
- अमोल मिटकरींना अजित पवारांची ताकीद
- एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानाला शरद पवार जबाबदार – गोपीचंद पडळकर
- देवाच नामस्मरण करत मातोश्रीवर येणार – नवनीत राणा
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir