उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”

राज ठाकरे

मंडळी गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण हे सर्वसाधारण माणसाच्या डोक्यापलीकडच होत. अडीच वर्षांपासून चालू असलेलं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच महाविकास आघाडी सरकार अवघ्या काही क्षणातच कोलमडून पडलं.

 

विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत शिवसेनेतील जवळपास ४० आमदार घेऊन शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंविरोधात बंड केला.

 

एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।…

 

स्व. बाळासाहेब ठाकरे व आंनद दिघे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शिवसेना नेते एकनाथजी शिंदे हे गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेमध्ये आपली भूमिका एकनिष्ठतेने बजावत होते.

 

मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात अचानक पुकारलेला बंड हा शिवसेना पक्षामध्ये नक्कीच मोठी तफावत निर्माण करणारा होता.

 

४० आमदार सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांच्या जाण्याने उध्दव ठाकरेंना महाविकास आघाडी सरकार टिकवणे अशक्य होतं. त्यामुळे त्यांनी दिनांक ३० जून २०२२ आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. 

 

मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?

 

राज ठाकरेंचा उध्दव ठाकरेंना टोला…

 

मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी उध्दव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावत म्हटलं आहे की,

 

” एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशीबालाच स्वतःच कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो.”

 

अशाप्रकारच अप्रत्यक्ष विधान राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंवर केलं आहे. एएनआयच्या एका बातमीनुसार राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला बहुमत चाचणी वेळी पाठिंबा देण्याचे दर्शवले होते.

 

देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीकरीता पाठिंबा देऊन मदत करण्यासाठी राज ठाकरेंना फोन करून विनंती केली होती. यावर राज ठाकरेंनी ती विनंती स्विकारली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे राजू पाटील हे एकमेव आमदार आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *