मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याने राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज ठाकरे यांनी मस्जिदींपुढे भोंग्यात हनुमान चालीसा लावण्याचा आदेश वसंत मोरे यांनी नाकारला.
या गोष्टीचा राग मनात धरुन राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून काढले आहे. मात्र यानंतर वसंत मोरे यांना इतर पक्षांमधून पक्ष प्रवेशाच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. मात्र त्यांनी अद्याप कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला नाही आहे.
वसंत मोरे यांनी आपलं मत व्यक्त करतांना म्हटलं की,
” माझ्या कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असण्याच्या आधी एका प्रभागाचा प्रतिनिधी आहे आणि माझ्या प्रभागमध्ये सर्व धर्मीय सर्व जातीचे लोक राहतात. मी एकमेव नगरसेवक असा आहे की ज्याच्या प्रभागामध्ये सर्व धर्मीय स्मशानभूमी आहे. त्यामुळे मला राज ठाकरे साहेबांचा हा निर्णय नाकारावा लागला.”
अस ते प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.
वसंत मोरेंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत आहे – रुपाली ठोंबरे
वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरेंना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.
त्या म्हणाल्या की,
” जेव्हा मी मनसे पक्ष सोडला होता तेव्हा वसंत मोरे यांनी म्हटलं होतं की मी राजकीय आत्महत्या केली आहे. मात्र आता वसंत मोरे यांनी राजकीय हत्या झाली की आत्महत्या ? हा प्रश्न त्यांना पडायला हवा. वसंत मोरे एक चांगले प्रतिनिधी आहे. त्यांच्या प्रभागामध्ये सर्व धर्मीय लोक राहतात. म्हणून त्यांना राज ठाकरेंचा आदेश नाकाराव लागला. त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत आहे.”
अस रुपाली ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितल.