विनायकराव पाटिल

विनायकराव पाटिल

मराठवाड्याच्या मातीत अनेक थोर संत, महात्मे, साहित्यिक, विचारवंत, कवी, राजकारणी जन्माला आले. यातील एका थोर विभूतीचा मराठवाड्याच्या मातीस परिसस्पर्श झाला आणि येथे शैक्षणिक क्रांती घडून आली.

 

खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या घराघरांत ज्ञानाचा दीप उजळला. या शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते आणि मराठवाड्याचे क्रांतिसिंह कै. विनायकराव पाटिल अण्णा हे त्यातले एक .

 

कै. विनायकराव पाटील यांचा जन्म वैजापूर तालुक्यातील लोणी या खेड्यात 1 सप्टेंबर 1926 रोजी झाला. त्यांचे वडील कै. पांडुरंगराव जाधव हे प्राथमिक शिक्षक होते. घरची आर्थिक स्थिती हलाखीची होती.

 

देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

 

विनायकराव लहानपणापासूनच रोखठोक व स्वाभिमानी बाण्याचे होते. ज्ञान संपादनासाठी त्यांनी जिवाचे रान केले. एलएलबीची पदवी मिळवून ते बॅरिस्टर झाले.

 

मात्र वकिली व्यवसायापेक्षा समाजसेवेचे व्रत घेऊन त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. खूप अनुभव घेतले, माणसे जोडली. अनेक कटू अनुभव पचवले; परंतु कडवट भावना मनात रुजू दिली नाही.

 

त्यांच्या विचारांवर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा मोठा पगडा होता. ते यशवंतरावांच्या पुरोगामी नेतृत्वाकडे आकर्षिले गेले. महाराष्ट्रात तरुण कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे केले.

 

मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागाचा कायापालट करावयाचा असेल तर शिक्षणासारखे प्रभावी दुसरे साधन नाही, हे त्यांनी ओळखले.

 

ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?

 

14 सप्टेंबर 1958 रोजी यशवंतरावांच्या प्रेरणेने त्यांनी आपले सहकारी दादासाहेब सावंत व इतर सच्च्या निष्ठावान सहका-यांना सोबत घेऊन ग्रामीण भागातील गोरगरिबांची, शेतक-यांची, शेतमजुरांची मुले शिकावीत, त्यांना रोजी-रोटी मिळावी, सन्मानाने जगता यावे यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.

 

1967 मध्ये वैजापूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली व प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला. त्यांच्यावर महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.

 

शिक्षण क्षेत्रावरील प्रेम व निष्ठा, तसेच सहकारी जीवनपद्धतीवर त्यांचा ठाम विश्वास होता. वैजापूरसारख्या दुष्काळी भागातील शेतक-यांचा विकास व्हावा म्हणून त्यांनी अनेक सिंचन प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली.

 

नांदूर-मधमेश्वर, मन्याड, शिवना टाकळी तसेच पालखेड डाव्या कालव्याचे पाणी शेतक-यांना मिळावे म्हणून मोलाचे प्रयत्न केले.

 

ध्येयवादाने प्रेरित होऊन त्यांनी सहकार क्षेत्रात साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध उत्पादक संस्था, सहकारी बँकांना बळकटी देऊन समाजोन्नतीसाठी दूरदृष्टी दाखविली. कोणतेही पद सेवेसाठी असते याची प्रचिती सर्वांना आणून दिली.

 

28 डिसेंबर 1968 ला वयाच्या अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी विनायकरावांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आदर्श आजच्या काळात निश्चितच दिशादर्शक आहे. अशा थोर क्रांतिसिंहास कोटी-कोटी प्रणाम!

 

आणि आज त्यांची जयंती आहे

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

सामनाची स्थापना शिवसेनेने नाही, तर या व्यक्तीने केली..सामना चा इतिहास

सोनिया, उध्दव आणि पांडवांची पाच गाव – ज्ञानेश वाकुडकर

शहीद चंद्रशेखर आझाद एक क्रांतिकारी झंझावात

ओबीसींनो सावधान! राजकीय आरक्षणाचा फायदा नाही

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *