तिरुपतीला मर्जीनुसार गेलो – वसंत मोरे

वसंत मोरे

मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याबद्दल पाठ फिरवली आहे.

यामध्ये सर्वात पहिल येणार नाव म्हणजे पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे. राज ठाकरेंच्या आदेशानुसार मनसे सैनिकांनी पुण्यामध्ये हनुमान चालीसा पठणाच आंदोलन केल. तेव्हा ते अज्ञात स्थळी निघून गेले होते. या गोष्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना ट्रोल करण्यात आलं.

भर सभेत खुर्च्या फेकल्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मात्र दोन दिवसानंतर वसंत मोरे पुण्यात आल्यावर त्यांनी तिरूपतीला जाण्याबद्दल सर्व माहिती प्रसार माध्यमांना दिली. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना ते म्हणाले की,

” राज साहेबांच्या आदेशानुसार पुण्यामध्ये मनसे सैनिकांच आंदोलन झालं तेव्हा मी तिरुपतीला गेलो होतो. याबद्दल लोकांनी गैरसमज केला. शेवटी मीसुद्धा एक माणूस आहे. मलापण भावना आहेत. मला वाटलं मी तिरूपतीला जावं म्हणून मी गेलो. पुण्यामध्ये मनसे सैनिक आंदोलन करत असताना मी तिथे नव्हतो.पण सेनापती नसला तर लढाई जिंकल्या जात नाही असं होऊ शकत नाही.”

अस वसंत मोरे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं. 

राज ठाकरेंची हुकूमशाही चालणार नाही – अजित पवार

मी अजूनही पक्षाशी एकनिष्ठ आहे – वसंत मोरे

तिरूपतीवरून दोन दिवसाने परतल्यानंतर वसंत मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हटलं की,

 

” माझी पक्षाबद्दल कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. ठाणेच्या सभेला राज साहेबांच बोलावणं आल्यानंतर मी माझ्या घरचा कार्यक्रम रद्द करून सभेला उपस्थित होतो. मी अजूनही पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि राहणार.”

 

अशी ग्वाही वसंत मोरे यांनी दिली आहे.

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *