भर सभेत खुर्च्या फेकल्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले?

भीम आर्मी

मंडळी राज ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये चांगलच चर्चेत असलेलं नाव आहे. मुंबई आणि ठाणे येथे सभेमध्ये राज ठाकरे यांनी घेतलेल्या भोंग्याच्या भूमिकेवरून संपूर्ण राजकीय क्षेत्र व्यस्त झालं आहे. राज ठाकरे यांची ठाणे येथील सभा झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता लागलेली होती की येणारी सभा कुठे व कधी होणार ?

 

अखेर राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद  येथे पार पडली. सभेआधी ही सभा होणार की नाही? सभेला पोलीस प्रशासन परवानगी देणार की नाही? अस सर्वांना वाटत होतं. काल औरंगाबाद येथे झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेमध्ये लाखो लोकांचा सैलाब उसळून पडला.

 

अजाण लावणारे ऐकत नसतील तर मनगटातली ताकद दाखवू – राज ठाकरे

 

सभा सुरू झाली आणि श्रोत्यांचा आवाज संपूर्ण मैदानात घोंघावत होता. अचानक काही लोकांनी सभेमध्ये गोंधळ घातला आणि राज ठाकरेंचा राग अनावर झाला. त्या  गोंधळ घालणाऱ्या लोकांना खोचक भाषेमध्ये धमकावतना त्यांनी म्हटलं की,

 

” ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे. इथे जर गोंधळ कराल, तर चौरंग करून घरी पाठवू लक्षात ठेवा.”

 

राज ठाकरेंच्या वक्तव्यांवरून संपूर्ण श्रोते मोठ्याने नारेबाजी करतांना दिसले. 

 

राज ठाकरेंची सभा उधळून लावू. भीम आर्मीच राज ठाकरेंना खुल चॅलेंज

 

 

गोंधळ घालणारी लोक कोण होती? 

 

 

 मंडळी राज ठाकरे यांची सभा होण्याआधी भीम आर्मीने राज ठाकरे यांना फटकारल होत की,

 

” जर भाषणामध्ये त्यांनी समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विधानांचा वापर केला, तर आम्ही सभा उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही.”

 

असा इशारा भीम आर्मीने दिला होता. काल सभेमध्ये झालेला गोंधळ भीम आर्मीचाच असावा अशी शक्यता सगळीकडून वर्तवल्या जात आहे. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा औरंगाबाद येथील सभेत जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेच वातावरण निर्माण झालं आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *