मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकारण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये जरी तापलं असलं तरी मंगळवारी अधिवेशनादरम्यान घडलेल्या एका किस्स्याने लोकसभेतील संपूर्ण वातावरण तणावमुक्त करण्याचं काम केलं. मंडळी आपण बघतो की राजकारणामध्ये राजकीय मंडळी आक्रोशाने एकमेकांवर टीका टिप्पणी करतांना दिसतात.
एकमेकांची खिल्ली उडवताना दिसतात. मात्र काही वेळेस असे किस्से घडून येत असतात की, त्यामुळे त्यांना पण सामाजिक सळोख्याची थोडी जाणीव होत असते. असाच काही किस्सा मंगळवारी लोकसभेत घडला आणि सत्ताधारी व विरोधी बाकांवरच्या सदस्यांमध्ये एकच हास्य निर्माण झाले. हा संपूर्ण किस्सा घडवून आणला तो म्हणजे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी.
त्यांच्या एका टिपणीवर विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी हसून दाद दिली आणि थोडा काळ सभागृहातल वातावरणसुद्धा तणावमुक्त झालं. संसदीय अधिवेशनात मंगळवारी लोकसभेत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधील लोकल फेऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला.
तसेच, एसी लोकलऐवजी नॉनएसी लोकलच्या पर्यायाविषयीदेखील त्यांनी भूमिका मांडली. जवळपास १० मिनिटाच्या आपल्या भाषणाच्या अगदी सुरवातीलाच श्रीकांत शिंदे यांनी लगावलेला टोला सदस्यांमधला तणाव शांत करून गेला.
लोकसभेच्या तालिका अध्यक्ष यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला आणि त्यांना बोलण्याची संधी दिली. श्रीकांत शिंदे भाषणासाठी उभे राहल्यानंतर त्यांच्या मागे बसलेल्या खासदारांनी श्रीकांत शिंदे कॅमेऱ्यामध्ये दिसत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी यासंदर्भात म्हटलं की,
” अरे कॅमेरा दाखवा, कॅमेऱ्याला मी सापडत नाही आहे बहुतेक.”