काय आहे वैभव शिंदे पाटील आणि बाबासाहेब पुरंदरे वाद?

मंडळी या अखंड महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हटलं जातं. एखाद्याच्या मुखातून चुकून जरी छत्रपती शिवरायांच्या नावाचा एकेरी उल्लेख निघाला तर इथल्या बहुजन समाजातल्या प्रत्येक माणसाचं काळीज पेटून उठत. कारण छत्रपती शिवरायांबद्दल आज सम्पूर्ण जगालासुद्धा सांगायची गरज नाही. इतकं कर्तृत्व त्यांनी इथल्या जनतेसाठी घडवून आणल आहे. मग ज्या व्यक्तीने शिवरायांचा इतिहास बदनाम करण्याचं काम केलं. \’आईसाहेब जिजाऊंचे आणि दादोजी कोंडदेवाचे गोत्र एकच होते.\’ अस विकृत लिखाण ज्या व्यक्तीने केलं. यावरून समजूतदार लोक समजू शकता की बाबासाहेब पुरंदरेला नेमके काय म्हणायचे होते आणि त्यांच्या डोक्यात किती विकृती भरली होती. एवढी घाण त्या व्यक्तीने आपल्या \’ राजा शिवछत्रपती\’ या शिवरायांचा इतिहास बदनाम करण्याऱ्या पुस्तकातून पसरवली . याच कारणावरून बाबासाहेब पुरंदरेला सांगलीमधल्या संभाजी ब्रिगेडच्या एका मावळ्याने चेहऱ्यावर काळी शाई फेकून काळ फासल होत आणि शिवरायांच्या प्रेरणेचा हा महाराष्ट्र आहे अशी जाणीव इथल्या लोकांना करून दिली. \’मी लिखाणातून शिवरांयाची, आईसाहेब जिजाऊंची बदनामी करून इथल्या शिवमावळ्यांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल मी माफी मागतो\’. असा माफीनामा देऊन जो व्यक्ती मान्य करतो की मी चुकीचा-बदनामीचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला, तरी त्या व्यक्तीचा मराठा समाज , बहुजन तरुण समर्थक कसा? महाराष्ट्र शासनाने बाबासाहेब पुरंदरेला महाराष्ट्र भूषण देऊन आणखी मोठं केलं. फक्त एखादा पुरस्कार दिल्याने कुणी व्यक्ती मोठी होत नाही. त्या व्यक्तीने आई जिजाऊंचे चरित्र बदनाम करण्याच काम केलं तर हा सर्व महाराष्ट्राचा अपमान आहे हे आपण विसरता कामा नये.

कोण आहे वैभव शिंदे पाटील?

मंडळी वैभव शिंदे पाटील नागपूरकरांसाठी निस्वार्थपणे झटणारा तरुण. छत्रपती शिवरायांचा विचार सोबत घेऊन समाजामध्ये समता निर्माण करण्याच काम करणारा तरुण. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक
दिन हा सुट्टीचा दिवस नाही त्या दिवशी तरी आपल्याला ५२ सेकंदाचा वेळ काढून या देशाच राष्ट्रगीत म्हणायला वेळ काढता यावा म्हणून \’एक वादळ भारताच\’ ही मोहीम उभारुन लोकांनी स्वातंत्र्यदिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तरी राष्ट्रगीत म्हणावं यासाठी या देशामधल्या ६ राज्यांमध्ये राष्ट्रगीताचा कार्यक्रम आयोजित करणारा हा रणमर्द मावळा. कोरोनाच्या कालावधीमध्ये नागपूर येथे तुकाराम मुंढे साहेब कोरोनाची परिस्थिती योग्यरीत्या हाताळत असतानासुद्धा जेव्हा त्यांची बदली करण्याचा निर्णय इथल्या शासनाने घेतला तेव्हा मुंढे साहेबांसाठी व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारा हा योद्धा. कोरोना पेशंटसाठी ऑक्सिजन, बेड उपलब्ध करून देणे असो की संपूर्ण नागपूरमधल्या रस्त्यांवरचे खड्डे दाखवणे असो वैभव शिंदे पाटील या तरुणाने महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारी लोकांना आणि त्यावर शांत राहणाऱ्या शासनाला घाम फोडण्याच काम केलं आहे. कारण ही बंडखोरी ही क्रांती आणि उत्क्रांती शिवरायांनी आम्हाला सांगितली आहे. मग त्याच शिवरायांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेच निधन झाल्यानंतर वैभव शिंदे पाटील यांनी फेसबुक वर पोस्ट करून त्यांना म्हातार संबोधल तर यात काय चुकीच आहे? तरी पण बाबासाहेब पुरंदरेंचे काही अंधभक्त वैभव शिंदे पाटील यांना मारहाण करण्यासाठी त्यांच्या ऑफिसवर जाऊन त्यांना हानी पोहचवण्याचा प्रयत्न करतांत. वैभव शिंदे पाटील यांना फोन करून मारहाण करण्याच्या धमक्या देतात.

मंडळी ज्या बाबासाहेब पुरंदरेनी शिवरायांची आणि मासाहेब जिजाऊंची बदनामी केली त्याचा विरोध करणे ही चुकीची गोष्ट नसेल तर वैभव शिंदे पाटील यांच्या पाठीशी आपण उभं राहणं गरजेचं आहे.

जय शिवराय…

2 thoughts on “काय आहे वैभव शिंदे पाटील आणि बाबासाहेब पुरंदरे वाद?”

  1. I support Vaibhav Shinde Patil, We have right to speech and it is funadamental right given by constitution to every citzen, no one denied it, But This shows that we dont have tendency to accept the loop holes of favour perso.
    We support Vaibhav Shinde Patil becz Society needs this type of person.

  2. अश्या विकृत इतिहास पसरविनार्याचा निषेध आणि विरोध झालाच पाहिजे…..
    नाही तर उद्या पुन्हा कुणी तरी अस करण्याचा प्रयत्न करेल…..
    We r with u shinde sir.. 💪💪💪
    देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड 💪💪💪
    लावा ताकद

Leave a Reply to Dilip Parkare Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *