जो मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला?- नारायण राणे

नारायण राणे उध्दव ठाकरे

मंडळी एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा चालू आहे तर दुसरीकडे भाजपा नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात चांगलाच राजकीय रणसंग्राम चालू आहे.

 

महाराष्ट्रात चालू असलेली सामजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही आणि यावर उध्दव ठाकरे सरकारच लक्ष नाही. अशी ठाम भूमिका भाजपा नेते यांनी मांडली आहे. नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

 

शरद पवार एसटी कर्मचाऱ्यांचे २ हजार कोटी गिळंकृत करण्याच्या बेतात पडळकरांचा खुलासा

 

ते म्हणाले की,

 

” राज्यातल्या लोकांना कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून रक्षण मिळावं. किती हत्या झाल्या, महिलांवर बलात्कार करून किती हत्या करण्यात आल्यात. दिशा सालीयानच उदाहरण आहे. सुशांत आणि दिशा सालीयान केसमध्ये मंत्रीसुद्धा आहेत. पूजा चव्हाण आणखी एक उदाहरण आहे. आज हत्या, दरोडे किती वाढत आहेत. त्याशिवाय विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच काम चालू आहे. राणा दाम्पत्य देशद्रोही आहे असा यांनी शोध लावला. नवाब मलिक दाऊदशी संबंध असून देशद्रोही नाही. १०० कोटी महिन्याला द्यायचे असे सांगणारे देशद्रोही नाही. तीर्थ यात्रेला गेले होते म्हणून त्यांना अटक केली असावी. म्हणून महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जो व्यक्ती मंत्रालयात कधी बसत नाही तो मुख्यमंत्री कसा?”

 

अशी खोचक टीका करत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना चांगलच धारेवर धरल. 

 

फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांची निवासस्थानी चौकशी

 

 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे – नारायण राणे 

 

 

नारायण राणे प्रसार माध्यमांशी बोलतांना पुढे म्हणाले की,

 

” उध्दव ठाकरे यांच कोरोना काळात शून्य काम आहे. मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा त्यांचं काम शून्य आहे. आज महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण गरजेचं आहे आणि प्रत्येक नागरिकाने याच स्वागत करावं.”

 

अस नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मात्र आता नारायण राणे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *