मंडळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन जवळपास दहा वर्षे झाली तरी त्यांच्या नावाचा जल्लोष आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मुखामध्ये ऐकायला मिळतो.
त्यांचे अनेक किस्से आपल्याला माहिती असतील. मात्र असा एक किस्सा ज्याला ऐकून तुम्हीसुद्धा थोडे विचारात पडाल. तर मंडळी आपल्याला माहीतच असेल की गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण आणि बॉलिवूड यांच्यातील मैत्रीचे किस्से चालत आलेले आहेत.
मग त्यामध्ये दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे असो की सुनील दत्त आणि बाळासाहेब ठाकरे असो. मात्र काही वर्षांपूर्वी भाजपा नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि सोनू निगम यांच्या घराण्यातील संबंधांबद्दल खळबळजनक खुलासा केला होता.
शैक्षणिक वस्तू वर १८ ℅ जीएसटी लावणारा ये नया भारत है !!
ज्यामध्ये त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं होतं की,
” बाळासाहेब ठाकरे यांना सोनू निगमला ठार मारायचं होत. त्यांनी अनेकदा त्याला मारण्यासाठी शिवसैनिकसुद्धा पाठवले होते. ठाकरे आणि सोनू निगम या घराण्यांमध्ये काय संबंध आहेत? याबद्दल मला तोंड उघडायला लावू नका.”
असा खळबळजनक खुलासा निलेश राणे यांनी केला होता. मात्र निलेश राणेंच्या या आरोपांना उत्तर देताना शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राणेंना चांगलच धारेवर धरलं होत.
ते म्हणाले होते की,
” निलेश राणे यांना शिवसेना उत्तर देईल एवढे ते मोठे नाही आहेत. ते काहीही बरळत असतात.”
असा टोला विनायक राऊत यांनी निलेश राणेंवर लगावला होता.
नेमकं काय होत प्रकरण?
तर मंडळी झालं असं की, बाळासाहेब ठाकरे यांची सून म्हणजेच जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी नुकताच बॉलिवूड निर्माता क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
त्यांनी ‘हसीना मान जायेगी’ या सिनेमाचा निर्माता म्हणून काम केलं होतं. ज्या सिनेमाच्या सेटवर त्यांची ओळख प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्याशी झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली.
मात्र काही प्रसार माध्यमांनी सोनू निगम आणि स्मिता ठाकरे यांच्याबद्दल वेगळीच अफवा पसरवली. प्रसार माध्यमांशी बोलत असताना सोनू निगमने सांगितलं होतं की,
” स्मिता ठाकरे यांचा मी आदर करतो आणि आम्ही चांगले मित्र आहोत. त्या माझ्या कुटुंबाविषयी नेहमी विचारत असतात.”
याव्यतिरिक्त स्मिता ठाकरे यांनीसुद्धा म्हटलं होतं की,
” सोनू निगम हे एवढ्या कमी वयामध्ये उत्तम गायक आहेत आणि ते एक चांगले व्यक्तिमत्त्व आहे.”
अस स्मिता ठाकरे म्हणाल्या होत्या. मात्र प्रसार माध्यमांनी दोघांविषयी रंगवलेल्या चर्चेला काहीही अर्थ नाही असं त्यावेळी वरिष्ठ पत्रकारांनी सांगितलं होतं.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- आणि शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल्या जाऊ लागलं…
- जेव्हा पवारांना प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी जबरदस्तीने मुख्यमंत्री करण्यात आलं…
- आणि बाबासाहेबांच्या त्या अग्रलेखाने ब्रिटिशांचे धाबे दणाणले
- म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir