निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरेल का…?३७० जागा जिंकण्यात भाजपला यश मिळेल का…?

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरेल का…? ३७० जागा जिंकण्यात भाजपला यश मिळेल का…?

सध्या भारतातभर लोकसभा निवणूका चालू आहेत. या निवडणूकीत कोणतीही लाठ दिसून येत नाहीय हि निवणूक पुर्ण पणे स्थानिक मुद्यावर लढली जात आसल्याचं चित्र दिसत आहे. २०१४ पासून भाजप सत्तेत आहे आणि तेव्हा पासून भाजपाचा प्रभाव भारतीय राजकारणात वाढला आहे. २०१४ मध्ये भाजपनी २८२ जागा जिंकुन सत्ता स्थापन केली होती.

त्यानंतर या जागा वाढुन भाजपनी २०२९ च्या निवडणूकीत ३०३ जागा जिंकल्या होत्या. अशातच एनडीटीवी सोबत बोलताना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी “या वेळेस सुध्दा भाजपचं सत्तेत येईल” असा अंदाज दर्शवला आहे.आणि या “लोकसभा निवडणूकीत भाजपला ३७० जगा मिळतील” असे विधान निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले आहे.

प्रशांत किशोर म्हणाले की,

ओडिशा आणि बंगालसारख्या पूर्वेकडील राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात. लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा कमबॅक करत असल्याचा दावा त्यांनी केला.

प्रशांत किशोर यांचा हा अंदाज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विधानानंतर आला आहे. केजरीवाल म्हणाले होते की.

‘नरेंद्र मोदी सरकार सत्तेतून बाहेर जात आहे आणि इंडिया आघाडी येत आहे. 4 जून रोजी दिल्लीत इंडिया आघाडी सरकार स्थापन होणार आहे.

२०१४ च्या निवडणूकीत प्रशांत किशोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप साठी काम करत होते. त्यांनी हि भविष्यवाणी केली आहे.

गेल्या तिन-चार महिन्यात “आपकी बार ४०० पार” या विषयावर चर्चा होताना दिसत आहे. याला भाजपची रणनीती किंवा विरोधकांचा कमकुवतपणा समजा,पण भाजपनी आपले ध्येय २७२ वरुन ३७० च्या वर हालवले आहे याचा फायदा भजपला होताना दिसत आहे.

आत्ता कोणीही म्हणत नाही की मोदी हरणार आहे, उलट लोक बोलतात ४०० नाही. परंतु ३७० जागा भाजप जिंकेल. हिच भाजपची रणनीती होती आणि त्याचा फायदा भाजपाला होत आहे असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर एनडीटीवी सोबत बोलताना सांगत होते. तुम्हाला काय वाटते या वर्षी सुध्दा भाजप सत्तेत येईल का आणि ३७० जागा जिंकण्यात भाजपला यश मिळेल का. तुमचे मत कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *