मंडळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांना जितेंद्र आव्हाड यांनी चक्क \’हिटलरचा बाप\’ अस म्हटलं आहे. रेल्वे भरती बोर्डाने म्हणजेच आरआरबिने नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंतर्गत नोकरभरतीसाठी सीबीटी-२ परीक्षांचे निकाल १४ आणि १५ जानेवारी २०२२ ला जाहीर केले. त्याच अनुषंगाने सीबीटी-२ म्हणजेच दुसऱ्या टप्प्याची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने उमेदवारांची यादी तयार करणं आवश्यक होतं.
जेणेकरून विद्यार्थ्यांची गडबड होणार नाही. मात्र आरआरबी एनटीपीसीचा निकाल देतांना घोटाळा करण्यात आला असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. रेल्वेपरीक्षा संदर्भात संपूर्ण विद्यार्थ्यांनी बिहारमध्ये आंदोलन चालू केल्यानंतर आंदोलनाची लाट विद्यार्थ्यांचा आक्रोश घेऊन उत्तर प्रदेशमध्ये येऊन ठेपली. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या आंदोलनाला हिंसक वळण आल्याची माहिती वर्तमानपत्रांनी दिली.
आंदोलन करत असतांना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डीच्या परीक्षेमध्ये घोटाळा करण्यात आला असा आरोप करत बिहार आणि उत्तर प्रदेशमधल्या प्रत्त्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थी आंदोलन आणि राज्यसरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत.
नेमक काय आहे आव्हाड आणि योगी आदित्यनाथ प्रकरण?
बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये चालू असलेल विद्यार्थ्यांच आंदोलन आता खूपच हिंसक आणि वादग्रस्त होतांना दिसून येतंय. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या या आक्रोशाला पाठिंबा देत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मा. जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक स्क्रीनशॉट शेअर करत देशात वाढत्या बेरोजगाराची संदर्भ जनतेला दिला आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांनी या ट्विट खाली योगी आदित्यनाथ यांना हिटलरचा बाप अस लिहत त्यांची खिल्ली उडवत आपला आक्रोश व्यक्त केलाय.
आव्हाडांनी ट्विट करतांना लिहिलं की, \” आरआरबी आणि एनटिपीसीच्या परीक्षेसाठी एकूण सीट होत्या ३७ हजार आणि अर्ज आले होते एकूण सव्वा करोड. हे भयाण वास्तव आहे देशातील बेरोजगारीच. बेरोजगारीचा हा स्फोट देशात अराजकता माजवू शकतो. वेळेवर सावध होऊन तरुणांच्या हातांना काम द्या. त्यांच्या आयुष्याशी खेळू नका\”. अस मा. कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून योगी आदित्यनाथ यांना आणि केंद्रसरकारला चांगलेच सुनावले.