मंडळी राजकारण म्हटलं की वादावादी , एकमेकांची टिंगलटवाळी करणे, खिल्ली उडवणे, आरोप प्रत्यारोप करणे या सर्व गोष्टी आल्याच. जेव्हापासून महाविकास आघाडीच सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल. तेव्हापासून भारतीय जनता पक्ष कुठल्या ना कुठल्या मुद्य्यावरून सरकार पाडण्याच्या गोष्टी करत असतो.
मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्षाला चांगलंच प्रतिउत्तर दिल आहे. पुण्यातील टेकडी येथील वनउद्यानामधील विविध विकास कामांची पाहणी आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यानंतर त्यांनी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली आणि महाविकास आघाडीच सरकार पाडणार या वक्तव्यालाही उत्तर दिलं. वारंवार होत असलेल्या भाजपच्या या वक्तव्यावर त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले अजित पवार
मंडळी वारंवार होत असलेल्या भाजपच्या सरकार पाडण्याच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
ते म्हणाले की,
” शिवसेना आणि भाजपने तारतम्य ठेवले पाहिजे. हे आरोप आणि प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी थांबले पाहिजेत.आमच्याबद्दल बोलणारेपण काही वाचाळवीर आहेत. त्यांच्याबद्दल मी काही अवाक्षर बोललो का?”