मंडळी आपण आतापर्यंत कित्येक मतदारसंघामध्ये प्रस्थापित लोकांचं राजकारण पाहल असेल. मात्र एखाद्या गावामध्ये सर्वसाधारण कुटुंबातील तरुण मिळून पॅनल तयार करणे व गावातील लोकांची मन जिंकून ग्रामपंचायतवर स्वतःच पॅनल निवडून आणणे. अशी एखादी गोष्ट घडावी हे कल्पनेच्या पलीकडेच आहे.
पण हे शक्य करून दाखवलं आहे अकोला जिल्ह्यातील आपोती गावामधील अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय वैभव तराळे आणि त्याच्या पॅनलने. वैभव तराळे हा तरुण गोदावरी येथील अभियांत्रिकी विद्यालयात शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असून कोरोना प्रादुर्भावामुळे घरूनच ऑनलाइन वर्ग करीत होतास.
त्यामुळे त्याचा आपल्या आपोती गावातील लोकांशी संपर्क चांगल्या प्रमाणात वाढला. वैभव हा सकाळच्या इनचा जिल्हाध्यक्षसुद्धा आहे. आपल्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसतांना वैभवने केलेले हे कार्य खरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
वैभवचे वडील एसटी महामंडळामध्ये नोकरी करतात तर आई हे गृहिणी आहे. वैभवने केलेला हा विक्रम तरुण वर्गातील प्रत्येक मनाला प्रेरणा आणि हिम्मत देणारा आहे.
रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड
पॅनलमध्ये वैभव तराळेच्या बहिणीचासुद्धा विजय
स्वतःच अभियांत्रिकीच शिक्षण घेत असताना ग्रामपंचायतवर आपलं पॅनलतर वैभवने निवडून आणलंच. मात्र आपल्यासोबत अभियांत्रिकीच शिक्षण पूर्ण झालेल्या आपल्या बहिणीलासुद्धा विजय मिळवून देण्याच काम वैभवच्या कार्यकर्तृत्वाने साकार झालं आहे. वैभव तराळेच्या पॅनलमधील सातपैकी पाच सदस्यांनी विजय मिळवून आपोती ग्रामपंचायतवर आपला शिक्कामोर्तब केला आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये
- सार्वकालिक आंबेडकर
- महाराष्ट्रामध्ये फक्त सूडाच राजकारण, जनता गेली वाऱ्यावर
- नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir