Category: राजकारण

  • अंतिम निकाल आणि एक्झिट पोल; भविष्य आणि वास्तविकता.

    अंतिम निकाल आणि एक्झिट पोल; भविष्य आणि वास्तविकता.

    २०२४ च्या लोकसभा निवडणुका आज ०१ जुनला संध्याकाळी ०६ वाजता संपतील आणि संपुर्ण निवडणूकांचा अंदाज घेऊन लोकसभेत कोण बाजी मारेल या साठी यासाठी एक्झिट पोल प्रसारित करणाऱ्या मोठमोठ्या संस्थांमध्ये स्पर्धा सुरू होईल.

    परंतू एक्झिट पोल चा अंदाज योग्य असतो का? असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होतो त्या साठी मागील निवडणुकीचा अधार घेऊन एक्झिट पोल आणि वास्तविक निकाल याचा आढावा घेवूयात.

    एक्झिट पोल हा प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास करून मतदारसंघाची स्थिती, मतदानाचे प्रमाण, उमेदवरांची छबी आणि मागील निवडणूकीचा निकाल अशा विविध पैलू च्या आधारे प्रसारित केला जातो. एक्झिट पोल हा योग्य ठरेल असे नक्की सांगता येत नाही एक्झिट पोल म्हणजे निकाल पूर्व लावलेला एक अंदाज असतो.

    २०२४ च्या निवडणुकीचा एक्झिट पोल शेवटच्या टप्यातील मतदान संपल्या नंतर ३० मिनिटांनी म्हणजेच ०६:३० वाजल्या पासून प्रसारित केले जातील. परंतू सर्व ५४३ संसदीय जगांसाठीचे वास्तविक निकाल भारताच्या केंद्रीय निवडणुक आयोगाकडून ०४ जुन रोजी प्रसारित केले जातील.

    २०१४ मध्ये बहुतेक एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखाली NDA सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त केला होता परंतू विजयाचा अचूक अंदाज लावण्यात एक्झिट पोल अपयशी ठरले होते. २०१४ मध्ये विविध संस्था द्वारे प्रसारित केलेले एक्झिट पोल आणि वास्तविक निकाल यांच्या आकडे मधला फरक खालील प्रमाणे आहे.

    एक्झिट पोल प्रसारित करणाऱ्या काही संस्था आणि त्यांचे एक्झिट पोल.

    १) इंडिया टुडे- NDA-२७२ आणि UPA-११५

    २) न्यूज २४ – NDA-३४० आणि UPA-१०१

    ३) CNN- IBN – NDA-२८० आणि UPA-९७

    ४) टाईम्स नाऊ -NDA-२४९ आणि UPA-१४८

    ५) ए बी पी न्यूज -NDA-२७४ आणि UPA-९७

    ६) एन.डी टीव्ही -NDA-२७९ आणि UPA-१०३

    हि एक्झिट पोलची आकडेवारी होती वास्तविक निकाल मध्ये
    NDA- ३३६ जागा जिंकल्या होत्या
    UPA -६० जागा जिंकल्या होत्या

    एकट्या भाजपने या निवडणुकीत २८४ जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या

    एक्झिट पोल नुसार सरकार जरी भाजपच्या नेतृत्वखाली NAD चे सत्तेत आले असले तरी एक्झिट पोल आणि वास्तविक निकाल यामध्ये बराच फरक दिसुन येतो.

    २०१९ मध्ये सुध्दा एक्झिट पोल आणि वास्तविक निकाल या मध्ये बराच फरक दिसुन आलता.

    १) इंडिया टुडे – NDA-३३९-३६५ आणि UPA -७७-१०८

    २) न्यूज २४ – NDA-३५० आणि UPA-९५

    ३) न्यूज १८- NDA-३३६ आणि UPA-८२

    ४) टाईम्स नाऊ- NDA-३०६ आणि UPA-१३२

    ५) इंडिया टीव्ही- NDA-३०० आणि UPA-१२०

    ६) सुदर्शन न्यूज- NDA-३०५ आणि UPA-१२४

    हि २०१९च्या एक्झिट पोलची आकडेवारी होती वास्तविक निकाल मध्ये
    NDA-३५२ जागा जिंकल्या होत्या
    UPA -९१ जागा जिंकल्या हित्या

    एकट्या भाजपने या निवडणुकीत ३०३ जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या होत्या.

    परंतू २०२४ च्या निवडणूकीत देशातले राजकीय समीकरण पूर्ण बदलले आहेत. भाजप सरकारवर जनता नाराज आहे. वाढती बेरोजगारी, महागाई याचा भाजपला फटका बसेल असा अंदाज आहे.

    २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील INDIA यांच्यात थेट लढत झाली. सत्ताधारी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवू पाहत आहे. भाजपने एनडीएसाठी “400 पार” जागांचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. तर सविंधानाच्या रक्षणासाठी आणि महागाई साठी बचाव सामान्य जनतेच्या बाचावा साठी काँग्रेस च्या नेतृत्वाखाली INDIA निवडून लढवताना दिसत आहे.

    थोडक्यात मागील निकालांचा विचार केला आणि बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर एक्झिट पोल च्या आधारे सत्तेत कोण येईल याचा अंदाज येवू शकतो परंतू कोण किती जागा जिंकेल याचा अंदाज येणं कठीण आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान धारणा आणि चिंतना मागे त्यांचा राजकीय डाव आहे का?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान धारणा आणि चिंतना मागे त्यांचा राजकीय डाव आहे का?

    लोकसभा निवडणुकीचा ०१ जूनला सातवा टप्पा पार पडणार आहे आणि हा या लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असणार आहे. या टप्प्यात आठ राज्य आणि केंदरशासित प्रदेशांमधील एकूण ५७ लोकसभा मतदारसंघासाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तत्पूर्वी ३० मे ला या टप्प्यातील प्रचार थांबवण्यात आले असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

    गेल्या ०२ ते ०३ महिन्या पासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत होते. ३० मे ला शेवटच्या टप्यातल्या मतदारसंघांत आचारसंहिता लागू झाली आणि प्रचार थांबताच पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यान धारणा करणारं असलायच्या चर्चा रंगल्या.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल इथे ४८ तास ध्यान धारणा आणि चिंतन करणार आहेत. त्यांची ध्यान धारणा ०१ जूनला दुपारी ०३ वाजेपर्यंत चालणार असल्याचं बोललं जातं आहे. नरेंद्र मोदी ३० तारखेलाच कन्याकुमारीत पोहचले होते त्यानी स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियला भेट दिली.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ध्यान धारणेला विरोधक विरोध करत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आचार संहितेचे उलंगण करत असल्याचे आरोप केले जात आहेत. त्याच बरोबर विरोधी पक्षानी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे.

    आचार संहिता लागू झाल्या नंतर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रचार करण्यास बंदी असते परंतू नरेंद्र मोदी ध्यान धारणा करत असल्यामुळे चर्चेत आले आहेत आणि त्यांच्या या ध्यान धारणेमागे राजकीय खेळी आहे असे विरोधकांचे मत आहेत.

    २०१४आणि २०१९ मध्ये सुध्दा नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्या नंतर चर्चेत राहिले होते. २०१४ मध्ये त्यांनी प्रचार संपल्या नंतर प्रतापगड ला भेट दिली होती आणि २०१९ मध्ये प्रचार संपल्या नंतर मोदींनी केदारनाथला जाऊन ध्यान धारणा केली होती.

    परंतू या वेळी नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी हे ठिकाण ध्यान धारणेसाठी निवडले आहे. या मागे त्यांची राजकीय खेळी असल्याचं बोलले जात आहे. ०७ व्या टप्प्यातील मतदारसघांत पश्चिम बंगालमधील ०७ जागा साठी मतदान होत आहेत आणि स्वामी विवेकानंद यांची जन्म भूमी आणि कर्मभूमी म्हणून पश्चिम बंगाल ओळखले जाते. त्यामुळे मोदींनी स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यान धारणा करून पश्चिम बंगाल मधीले मतदान आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

    मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनी पश्चिम बंगाल मधून १८ जागा जिंकल्या होत्या या वेळेस ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार असा भाजपनी नारा दिला आहे. त्यामुळें पश्चिम बंगाल भाजप साठी खूप महत्त्व पूर्ण राज्य आहे.

    त्याच बरोबर कन्याकुमारी हे भारताचे दक्षिण टोक आहे दक्षिणेकडे भाजपला अत्ता पर्यंत हवे तसे यश मिळाले नाही म्हणुन दक्षिणेत भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी मोदींनी कन्याकुमारी हे ठिकाणं ध्यान धारणा करण्यासाठी निवडले असल्याचे सुद्धा काही लोक बोलत आहेत.

    नरेंद्र मोदी हे हिंदू मुस्लीम धर्मावर राजकारण करतात. स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्माचे समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. नरेंद्र मोदी यांनी हिंदु धर्मिय मतदरा सोबत धार्मिक राजकारण करून आपल्याकडे आकर्षित करण्याससाठी कन्याकुमारी हे ठिकाण ध्यान धारणा करण्यासाठी निवडले आहे असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. असे विविध मत जरी असले तरी यात किती तत्थे आहे यावर शंका आहे.

    तुम्हाला काय वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान धारणा आणि चिंतन करण्या मागे त्यांचा राजकीय डाव आहे का तुमचे मत कळवा.

  • जाणून घ्या. महाराष्ट्र विधान परिषदेचं स्वरुप नेमकं कसं आहे? विधान परिषद निवडणूक कशी होते?

    जाणून घ्या. महाराष्ट्र विधान परिषदेचं स्वरुप नेमकं कसं आहे? विधान परिषद निवडणूक कशी होते?

    भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. भारतानी संघराज्य शासन पद्धतीचा स्विकार केला आहे आणि केंद्रा प्रमाणेच राज्यात सुद्धा द्विगृही कायदेमंडळ स्थापन केले आहे. केंद्रात जशी संसद आहे तशी राज्यात राज्याचे विधीमंडळ असते. संसदेत राज्यसभा आणि लोकसभा असे दोन सभागृह आहेत तसेच राज्यात विधानसभा आणि विधान परिषद असे दोन सभागृह आहेत. अशा दोन सभागृह असलेल्या कायदेमंडळाला द्विगृही कायदे मंडळ म्हणतात.

    राज्याचे सरकार कसे काम करते हे समजून घेण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद समजून घेणे आवश्यक आहे. विधानसभेतील सदस्य प्रत्यक्ष लोकांद्वारे निवडून दिले जातात परंतू विधान परिषदचे सदस्य अप्रत्यक्ष निवडले जातात त्यामुळे विधानपरिषदची निवड प्रक्रिया आणि विधान परिषद म्हणजे काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

    विधान परिषद म्हणजे काय?

    भारतातील घटकराज्यांच्या कायदेमंडळातील वरिष्ठ सभगृहला विधान परिषद असे म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, आणि तेलंगणा या ०६ राज्यात सध्या द्विगृही कायदेमंडळ(विधान परिषद) अस्तित्त्वात आहे व तिथे विधानसभे सोबत विधान परिषदेत सुद्धा अस्तित्त्वात आहे. बाकी सर्व राज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे.

    महाराष्ट्र विधान परिषदेची रचना.

    केंद्रात ज्याप्रकारे राज्यसभा हे वरीष्ठ सभागृह असतं त्याप्रकारे राज्याच्या राजकारणात विधान परिषद हे वरीष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं. पण वरीष्ठ सभागृह मानलं जात असलं तरी विधान परिषदेकडे खूपच कमी अधिकार असतात. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171 (1) मध्ये विधान परिषदेबाबत तरतुदींची माहिती देण्यात आली आहे.

    विधान परिषदेचा कार्यकाळ विधानसभेप्रमाणे पाच वर्षाचा नसून विधान परिषदेतील ०६ वर्ष पूर्ण झालेले एकूण सदस्यसंख्येपैकी एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडून दिले जातात.

    राज्याच्या विधानसभेत एकूण २८८ सदस्य आहेत. तर विधान परिषदेतील सदस्य संख्या हि एकूण ७८ इतकी आहे. संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही राज्यांतील विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किमान ४० असावी तर कमाल संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश इतकी असू शकते असा नियम आहे. याचा अर्थ महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त ९६ पर्यंत वाढवता येऊ शकते.

    महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत एकूण ७८ सदस्य आहेत. त्यातील ३० सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात आणि २२ सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात. तसेच ०७ सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून तर ०७ सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निर्वाचित होत असतात.

    याव्यतिरिक्त राज्याचे राज्यपाल 12 सदस्यांची नामनियुक्त करतात. हे सदस्य वाडःमय, शास्त्र, कला, सहकारी चळवळ आणि समाजसेवा यामध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेले असतात आणि त्त्यांनाच विधानपरिषदेवर नामनिर्देशित केले जाते.

    विधान परिषद निवडणूक कशी होते?

    विधानसभेच्या निवडणुक प्रकिया प्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रकिया नसते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पसंतीक्रमाची पद्धत इथं वापरली जाते. निवडणुकीसाठी जेवढे मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो.

    विधान परिषदेच्या निवडणूकीत निवडून येण्यासाठी संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतो. निर्धारित कोट्या एवढे प्रथम क्रमांकांचे मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पहिल्या पसंतीचे मतं कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीचे मतं मोजले जाते. अंक जो कोटा पूर्ण करील तो उमेदवार विजयी ठरवला जातो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. त्यामुळे कोणाचेही मतदान वाया जात नाही.

    विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते.

  • राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणात मनुस्मृतीचा समावेश होणार का?

    राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणात मनुस्मृतीचा समावेश होणार का?

    केंद्रसरकारने 2024 पासुन नवीन शैक्षणिक धोरण लागू केले. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याबाबत चर्चा चालू आहे. अशातच नवीन शैक्षणीक धोरणात भगवत गीता आणि मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यात येणार आहे अशी चर्चा होत आहे.

    राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणात तिसरी पासून ते बारावी पर्यंत भगवत गीता आणि मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश करण्यात यावा असा राज्य सरकारने प्रस्ताव मांडला आहे.

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातल्या एससीईआरटी ने राज्याचा नवीन शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. आणि ज्यांना या अभ्यासक्रमामध्ये काही सुधारणा सुचवायच्या आहेत किंवा काही आक्षेप असेल तर असे आक्षेप आणि सूचना त्यांनी मागवल्या आहेत.

    मुलांना आपल्या देशातील परंपरांची ओळख करून देणे आणि त्याबद्दल त्यांच्या मनात अभिमान निर्माण करणे हा या आराखड्या मागचा उद्देश आहे असे सांगितले जात आहे. परंतु या आराखड्याला मोठ्या प्रमाणात विरोधकाकडून विरोध केला जात आहे आणि या वरून महाराष्ट्रातील राजकीय स्थिती तापण्याचा अंदाज दर्शवला जात आहे.

    नवीन शिक्षण धोरणात भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनुचे श्लोक आणि भगवत गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा असे सुचविण्यात आले आहे. तिसरी ते पाचवी पर्यंत ०१ ते २५ मनुचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी २६ ते ५० मनुचे श्लोक आणि नववी ते बारावी साठी भगवत गीतेतील बारावा अध्याय याचे पाठांतर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे.

    मनुस्मृतीला वारंवार विरोध होत आला आहे. प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी “आजही मनूला आदर्श आणि पूज्य मांडणारे मन आहेत ही अतिशय निषेधार्थ बाब आहे” असे मत मांडले होते. याच मनुस्मृतीला विरोध करत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते आणि आज आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या काळात मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे कितपत योग्य आहे असे सामान्य लोकांचे मत आहे.

    मनुस्मृतीचा वापर हा आम्हाला मान्य नाही असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर सरकार ची मानसिकता काय आहे हे कळतीय अशी टीका शरद पवार यांनी या नवीन शैक्षणिक आराखड्यावरून केली आहे. सध्या या नवीन शैक्षणिक आराखड्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटण्याच्या मार्गावर आहे.

    जितेंद्र आव्हाड यांच्या मते मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात समावेश म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेचा अपमान करण्यासारखं आहे असे म्हटले आहे. मनुस्मृतीमुळे महिले वर अन्याय होईल असे ते म्हणाले. त्यांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्मान करत आहे असे सांगितले आहे.

    एससीईआरटी ने जाहिर केलेला अभ्यासक्रम एक आराखडा आहे आणि त्यात बदल करता येईल. लोकांकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातील आणि ज्या सुधारणा सुचवल्या जातील त्याच्या आधारे नवीन अभ्यासक्रम बनवण्यात येईल असे एससीईआरटी ने सांगितले आहे.

    एससीईआरटी च्या या अभ्यासक्रम आराखड्यात बदल होईल का आणि मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे का तुमचं मत काय?

  • शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील ०४ जागे साठी निवडणूका होणार! उमेदवारी देताना पक्षांमध्ये एकमत नाही.

    शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील ०४ जागे साठी निवडणूका होणार! उमेदवारी देताना पक्षांमध्ये एकमत नाही.

    नुकत्याच महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणूका पार पडल्या आहेत त्यामुळे आत्ता सगळ्यांचे लक्ष ०४ जुन ला जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकला कडे आहे, अशातच केंद्रीय निवडणुक आयोगाने विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील ०४ जागे साठी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे.

    मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदासंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ या चार मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ ०७ जुलैला संपत आहे त्यामुळे त्या जागा भरून कडण्यासाठी निवडणूक आयोगानी या निवडणूका जाहिर केल्या आहेत.

    ३१ मे पासुन ०७ जुन पर्यंत या जागेसाठी अर्ज भरण्याची मुदत असल्यामुळे महविकास आघाडी आणि महायुती कडून जोरदार तायारी चालू झाली आहे. २६ जुनला या चारही मतदारसंघातील निवडणूका पार पडणार आहेत आणि ०१ जुलै ला निकाल जाहिर होणार आहे. त्याच बरोबर ०४ जुन ला लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि २६ जुनला विधानपरिषदेच्या निवडणूका यामुळें उमेदवारी जाहिर करताना पक्षांमध्ये मतभेद होतांना दिसत आहेत.

    मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाने अनिल परभ यांना उमेदवारी जाहिर केली आहे. परभ उद्धव ठाकरे यांचे जवळचे नेते म्हणून ओळखले जातात २०१२ मध्ये ते पहिल्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले २०१८ मध्ये ते पुन्हा आमदारा द्वारे निवडूण येऊन ते आमदार झाले. माहविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आणि अत्ता पुन्हा एकदा त्यांना या मतदारसंघातुन उमदेवरी देण्यात आली आहे.

    या उलट महायुती मध्ये मात्र उमेदवारी जाहिर करण्यात संभ्रम दिसतोय हि जागा शिवसेनेची पारंपारिक जागा असल्यामुळें शिवसेना शिंदे गटाकडून या जागेवर दीपक सावंत यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे परंतू या जागेवर भाजप दावा करत तरुण भारतचे किरण शेलार यांना उमेदवारी देण्याची इच्छा प्रकट केली आहे. परंतू दीपक सावंत हे २००४ पासुन २०१८ पर्यंत विधानपरिषदेत निवडूण आले आहेत २०१४ च्या फडणवीस सरकार मध्ये सावंत यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्यान मंत्री म्हणून काम केलं आहे त्यामुळे त्यांनाच उमेदवारी देण्यात येईल असे बोलले जात आहे.

    मुंबई शिक्षक मतदारसंघाचा विचार केला तर इथून शिक्षक भारती संघटनेचे कपिल पाटील आमदार आहेत परंतू या वेळेस ते निवडणूक लढवणार नाहीत २००६ पासून पाटील या जागे वर निवडून येत आहेत त्यांनी शिक्षकांच्या हिता साठी अनेक निर्णय घेतले आहेत. परंतू या वेळेस शिक्षक भारती संघटने कडून सुभाष मोरे निवडणूक लढवणार आहेत. सुभाष मोरे शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी या साठी मोरे यांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भक्कम समजली जात आहे.

    ठाकरे गटा कडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. न. अभियंकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी शिक्षकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आवाज उठवला आहे. याच बरोबर महायुती कडून या मतदारसंघासाठी अजून कोणाचे नाव पुढे आले नाही परंतू कोणाला उमेवारी द्यायची या वर चर्चा चालू असल्याचे समजते.

    याच बरोबर या चारही जागामध्ये महत्वाची मानली जाणारी जागा आहे कोकण पदवीधर मतदारसंघातली. कोकण मतदासंघातून भाजपचे निर्जन डावखर विध्येमान आमदार आहेत, २०१२ मध्ये ते राष्ट्रवादी कडून या मतदासंघात निवडू आले होते त्या नंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आणि २०२८ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून येवून कोकण पदवीधर मतदासंघाचे आमदार झाले. या वेळेस सुद्धा भाजप कडून डावखरच उमेदवार असतील असे बोलले जात होते, परंतू मनसेनी या मतदारसंघातून आपला उमेदवार जाहिर केला आहे.

    लोकसभा निवडणूकीत मनसेनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मनसेनी दिलेला उमेदवार महायुतीचा आहे की मनसे स्वातंत्र्य हि निवडणूक लढवणार आहे हे स्पष्ट झाले नाही.

    मनसेनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी लेखक, दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहिर केली आहे त्यामुळे मनसेच्या विरोधात महायुती आपला उमेदवार उभा करेल का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

    या उलट महविकस आघाडी मध्ये पण उमेदवारी जाहिर करताना तेड निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहेत काँग्रेस कडून या जागेसाठी नाना पटोले यांनी दावा केला होता, परंतू ठाकरे गटाकडून किशोर जैन यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होताना दिसत आहे परंतू ठाकरे गटांनी दोन मतदारसंघात आपले उमेदवार जाहिर केले आहेत त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस मागर घेणार नाही असे बोलले जात आहे.

    नाशिक शिक्षक मतदासंघांत ठाकरे गटाचे विद्येमान आमदार किशोर दराडे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यताता आहे. दराडे यांनी शिक्षकांसाठी सभागृहात नेहमीच आवाज उठवला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भक्कम आहे असे बोलले जात आहे. या उलट महायुती कडून अजून उमेदवारी जाहिर झाली नसुन ही जागा शिवसेना शिंदे गट लढविणार असल्याचे बोलले जात आहे.

    लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधानपरिषदच्या निवडणूका होतायत आणि पक्षा मध्ये उमेदवारी देण्याबाबत एकमत दिसतं नसल्या मुळे ह्या निवडणूका चांगल्याच रंगणार आहेत आणि फुटीचे राजकरण होण्याची सुद्धा शक्यता आहे या निवडणूकीत कोणता पक्ष कोणा सोबात राहील आणि कोण विरोधात जाईल हे पाहणे मजेशीर असणार आहे.

  • कल्याण मध्ये ठाकरे यांची सहानुभूतीची लाट काम करेल का?

    कल्याण मध्ये ठाकरे यांची सहानुभूतीची लाठ काम करेल का?

    ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बाल्ले किल्ला मानला जातो. ठाणे आणि ठाणे जिल्हा अंतर्गत येणाऱ्या कल्याण मतदासंघात एकनाथ शिंदे यांचा चांगलाच दबदबा आहे.

    या मतदारसंघात मागील दोन टर्म पासून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. त्यांनी या मतदारसंघात कामे केली आहेत आणि केंद्र सरकार कडून या मतदारसंघाला भरपूर निधी मिळवून दिला आहे, तरी सुद्धा या वेळेसचें राजकीय समीकरण जारा वेगळे आहे. त्यामुळे या मतदारसंघात लोकसभा निवडणूकीची लढत काट्याची झाली आहे.

    मागील दोन टर्म मध्ये निवडूण येताना श्रीकांत शिंदे हे अखंड शिवसेनेचे उमेवार म्हणून निवडूण येत होते.या वेळेस शिवसेनेत फूट पडल्यानी ते शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहेत. शिंदे गटावर सत्ते साठी फुटीचे राजकरण केले असे आरोप हिताना दिसत आहेत. आशातच कल्याण लोकसभा निवडणुकीत शिंदे गट विरुध ठाकरे गट असी लढत झाल्यामुळें इथले राजकरण चांगलेच तापले होते.

    कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली दरेकर कल्याण मतदारसंघासाठी प्रभावशाली उमेदवार नाही असे बोलले जात होते.

    परंतू शिवसेनेत फुट पडल्या नंतर ठाकरे आणि शिंदे यांच्या साठी प्रतिष्ठेची असणारी जागा आपल्या हातातून जावू नये या साठी दोन्ही पक्षा कडून या मतदारसंघात कसून ताकद लावण्यात आली.त्यामुळे एकतर्फी निवडणूक होईल बोलले जात असलेल्या या मतदारसंघात जोरदार टक्कर झाली.

    श्रीकांत शिंदे यांचं पारडं या मतदारसंघात जड असले तरी त्यांना या मतदारसंघात वैशाली दरेकर यांनी जोरदार टक्कर दिली आहे. श्रीकांत शिंदे यांना कल्याण मध्ये भाजप चा हवा तसा पाठिंबा मिळाला नाही त्यामुळें शिंदे यांची रणनीती थोडी डगमगली होती परंतू मनसेनी श्रीकांत शिंदे यांना कल्याण मध्ये पाठींबा दिला आणि कल्याणची जागा भक्कम कण्यासाठी मदत झाली असल्याचे दिसून येते.

    परंतू या मद्रसंघात मतदानाचा टक्का खालावला आहे या मतदारसंघात या वर्षी फक्त ४२ ते ४५ % पर्यंतच मतदान झालं आहे अशी माहिती समोर आली आहे.या कमी मतदानाचा फटका कोणाला बसलं या वर या मतदारसंघातचे निकाल अवलंबून राहणार आहे.

    या उलट ठाकरे गटांनी सुद्धा हि जागा जिंकण्या साठी भरपूर प्रयत्न केले आहेत. ठाकरे यांचे या मतदारसंघात असलेलं विशेष लक्ष आणि ठाकरे यांच्या बदल असलेली सहानुभूतीची लाठ वैशाली दरेकर यांना हि जागा मिळवण्या साठीचा मार्ग असल्याचं बोललं जातं आहे.

    कल्याणची निवडणूक जेवढी सोपी वाटत होती तेवढी सोपी झाली नाही या मतदारसंघात कमी मदनाचा फटका श्रीकांत शिंदे यांना बसला तर हि जागा ठाकरे गट जिंकेल किंवा कामाच्या आणि विकासाच्या आधारावर निवडणूक झाली तर श्रीकांत शिंदे परत निवडूण येतील,ठाकरे यांच्या बदल असलेली सहानुभूतीची लाठ आली तर हि जागा ठाकरे गट जिंकेल. असे विविध पैलू वर या मतदारसंघाचे भविष्य आधारलेले आहे.

    हि लोकसभा निवडणुक विकास कामाच्या आधारावर झाली आहे की सहानुभतीच्या आधारावर हे ४ जुनला कळेलच.या मतदासंघात पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेच येतील परंतू ते खूप कमी फरकानी निवडूण येतील असे जेष्ठ पत्रकारांचे मत आहे. आणि स्थानिक लोकांचे मत आहे. तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कळवा.

  • महायुतीत जाऊन अजित पवारांचा गेम फसला?

    महायुतीत जाऊन अजित पवारांचा गेम फसला… अजित पवारांची अस्तित्वाची लढाई. अजित पवारांनी लढवलेल्या या ४ जागे वर त्यांच्या उमेदवारांची स्थिती काय आहे?

    महाराष्ट्रातली यावेळेसची लोकसभा निवडणुक अस्तिस्वची होती. शिवसेनेचे दोन गट पडले आणि त्याच बरोबर राष्ट्रवादीचे सुद्धा दोन गट पडले होते. शरद पवारांनी ज्या पक्षाची स्थापना केली, तो पक्ष अत्ता अजित पवारांनी आपल्या ताब्यात घेतला होता आणि प्रथमच शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. शरद पवारांन सोबत बंडखोरी करत अजित पवारांनी महायुती सोबती हात मिळवणी केली होती. परंतू या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना ४ जागेवरच समाधान मानावे लागले.अजित पवारांनी लढवलेल्या या ४ जागे वर त्यांच्या उमेदवारांची स्थिती काय आहे याचा आढावा घेऊया.

    बारामतीची लोकसभा निवडणूक चांगलीच रंगली होती बारामतीत एकाच घरातल्या दोन उमेदवार अमाने सामने आल्या होत्या राष्ट्रवादी कडून सुनेत्रा पवार तर शरद पवार यांच्या कडून सुप्रिया सुळे मैदान उतरल्या होत्या. हि निवडणूक थेट शरद पवार विरुध अजित पवार आशी झली होती.या मतदारसंघात सुप्रिया सुळेंच पारड जड असल्याचं बोललं जात आहे. सुप्रिया सुळे यांच्या कडे लोकांचा भावनीक कल होता आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोक अजित पवारांवर नाराज होते त्या मुळे अजित पवार यांना या मतदारसंघात आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मोठा संघर्ष करावा लागला, हा मतदारसंघ अजित पवारांच्या दृष्टीने खूप महत्वाचा मतदारसंघ आहे त्या मुळे त्यांनी या मतदारसंघात पूर्ण ताकद लावली होती. तरी पण या मतदारसंघात सुप्रिया सुळेच बाजी मारतील असा अंदाज आहे.

    शिरुर मतदारसंघात सुद्धा अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचे उमेदवार अमने सामने होते. त्यामुळे या मतदारसंघात राजकरण चांगलेच तापलं होते. या मतदारसंघात अमोल कोल्हे हे विध्येमान खासदार आहेत आणि आत्ता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या कडून ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत त्यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून आढळराव पाटिल यांना उमेवारी देण्यात आली होती. मागच्या निवणुकीत सुद्धा अमोल कोल्हे आणि आढळराव यांच्यात लढत झाली होती तेंव्हा आढळराव यांना पराभवाचा सामना करावा लागला होता तर अमोल कोल्हे हे आपल्या अभिनयाने लोकांच्या घरा घरात पोहचले होते त्यामुळे ते निवडूण आले होते.

    या वेळेस सर्व राजकीय समीकरण बदले आहेत आणि आढळराव हि निवडणूक शिवसेनेकडून नाही तर अजित पवार गटाकडून लढत आहेत त्यामुळे ही निवडणुक चांगलीच रंगली आहे. आढळराव पाटील यांनी जनसंपर्क खूप तगडा ठेवला होता त्याचा फायदा त्यांना या निवडणूकीत झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी या मतदारसंघात विशेष लक्ष दिले होते. शरद पवारांनी या मतदारसंघात ५ साभा घेतल्या होत्या त्या मुळे अमोल कोल्हेच या वेळी सुद्धा बाजी मारतील असा अंदाज आहे.

    रागड मतदारसंघात राष्ट्रवादी चे खासादर सुनील तटकरे कार्यरत आहेत आणि पुन्हा एकदा ते अजित पवार गटा कडून लोकसभेसाठी मैदानात उतरले होते आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अनंत गीते या यांना उमेदवारी मिळाली होती.हे दोन्ही नेत्यांनी खासदार म्हणून काम केलं असलं तरी गीते यांचं लोकांसोबत जनसंवाद हवा तसा नाही त्या मुळे गीते ही निवणूक संपूर्ण पणे उध्दव ठाकरे यांच्या जिवावर लढवत आहेत आशी टीका केली जात होती .त्या उलट सुनील तटकरे हे आपल्या कामाच्या जोरावर निवडूण येतील असा अंदाज लावला आहे.

    धाराशिव मतदारसंघात चांगलीच राजकीय परिस्थिती रंगली होती. नरेंद्र मोदींनी या मतदारसंघात सभा घेऊन अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा प्रचार केला होता.या उलट शिसेना फुटली परंतू ओमराजे यांनी उद्धव ठाकरे यांचे साथ सोडली नाही त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना लोकांचा भावनीक आधार मिळेल असा अंदाज होता परंतू मोदी फॅक्टर आणि राष्ट्रवादीची ताकद याचे ओमराजेंना मोठे आव्हान होते.त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारेल हे सांगणे कठीण आहे.

    एकंदरीत अजित पवारांना ४ जगा मिळाल्या त्यात ही त्यांना निवडूण येण्यासाठी मोठे आव्हान आहेत. ४ मधून अजित पवार यांचे २ उमेदवार निवडून येथील असा अंदाज दर्शवला जात आहे. तुम्हाला काय वाटते तुमचे मत कळवा.

  • विदर्भातल्या पहिल्या टप्यातल्या पाच मतदारसंघात कोण मारणार बाजी..?

    विदर्भातल्या पहिल्या टप्यातल्या पाच मतदारसंघात कोण मारणार बाजी..?

    महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपल्या आहेत, ४ जुन ला निकाल लागणार आहे परंतू कोणत्या मतदारसघांत कोण बाजी मारेल याकडे सगळ्यांचे डोळे लागून आहेत. त्यामुळे एक एक मतदारसंघातली राजकीय परिस्थिती समजून घेऊन त्या मतदारसंघात कोणाच्या विजयाचे वारे वाहत आहेत याचा अंदाज घेवूयात.

    महाराष्ट्रातला विदर्भ लोकसभा निवडणुकीच्या काळात खुप चेर्चाचा विषय बनला होता,महावीकास आघाडी कडून लवकर उमेदवार जाहीर केले गेले नाही त्यामुळे महावीकास आघाडी कोणती राजकीय खेळी खेळेल या कडे सामान्य जनतेचे लक्ष होते.

    महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदात पार पडणार आहे असे निवडणुक आयोगाने जाहिर केले होते. आणि पहिल्याच टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात निवडणुका पार पडल्या यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली चिमूर या पाच मतदार संघाचा समावेश होता.

    पहील्या टप्यातले मतदान जरी शांततेत पार पडले असले तरी अर्ज भरण्या पासूनच या मतदारसंघाचे वातावरण तापले होते महायुती कडून उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली होती. आणि महाविकास आघाडीचे सुद्धा वरिष्ठ नेते या मतदारसंघात उमेदवारीचा अर्ज भरताना हजेरी लावत होते.

    रामटेक मतदारसंघात रश्मी बर्वे यांनी काँग्रेस कडून उमेदवारी अर्ज भरला होता.परंतू त्यांचा जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचा अर्ज अमान्य झाला (SC साठी राखीव असल्यमुळे) आणि त्याच्या जागी त्यांचे पती श्याम बर्वे काँग्रेस कडून मैदानात उतरले.

    आणि त्यांच्या विरोधात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या कडून राजू परवे यांना उमेदवारी दिली होती. एकनाथ शिंदे यांच्या गटातले राजू परवे हे लोकसभेसाठी मैदानात उतरलेले पहिल्या टप्प्यातले एकटेच उमेदवार असल्यामुळे एकनाथ शिंदे या मतदारसंघात प्रचारासाठी फिरत होते. परंतू या मतदार संघात शिवसेनेचं जास्त प्रभाव दिसून येत नाही मागील खासदर जरी शिवसेनेचा असला तरी ते भाजपच्या मदतीने निवडूण आले होते हे नाकारता येत नाही.

    या वेळेस या मतदारसंघातून भाजप आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत होता परंतू एकनाथ शिंदे यांच्या मागणी वरून राजू परवे यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात शिवसेनाची ताकद जास्त नसली तरी या मतदारसंघात नितीन गडकरी, देविंद्र फडणवीस यांचा चांगली दबदबा आहे त्यांची मदत राजू परवे यांना होईल असा अंदाज आहे काँग्रेस समोर अपक्ष उमेदवार किशोर गजभिये आणि वंचित उमेदवार शंकर चहांदे यांचे आव्हान आहे त्या मुळे रामटेक मध्ये महायुतीचा उमेदवार येईल असा अंदाज दर्शवला जातोय.

    नागपूर हा विदर्भातील प्रमुख मतदासंघांपैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. संघाचे मुख्यालय आणि दीक्षाभूमी असे दोन वैचारिक ठिकाण या मतदारसंघात आहेत.२०१४ पर्यंत इथे काँग्रेस सत्तेत होते म्हणून या मतदारसंघाला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे. परंतू २०१४ मध्ये नितीन गडकरी यांनी बाजी मारली आणि नागपूर भाजप कडे गेले २०१९ मध्ये नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांचा २ लाख मतानी पराभव केला होता अत्ता करत एकदा ते नागपूर मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या मैदनात उतरले आहेत.

    त्यांच्या विरोधात काँग्रेसनी विकास ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. नागपूर मतदार संघात आंबेडकर वैचारिक मतदारांची संख्या बरीच आहे आणि मराठा कुनभी मतदार सुद्धा भाजप वर नाराज आहेत याचा फायदा विकास ठाकरे यांना होणार आहे. परतू नागपूर मध्ये नितीन गडकरी यांची राजकीय ताकद खुप जास्त आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजपच बाजी मारेल असा अंदाज आहे.

    भंडारा गोंदिया हा मतदार संघ एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघातुन दोन मोठे नेते येतात त्यामूळे ही निवडणुक त्यांच्या प्रतिमेची आणि असतित्वाची आहे. या मतदारसंघात भाजप कडून सुनील मेंढे आणि काँग्रेस कडून प्रशांत पडोळ यांना जरी उमेदवारीचा मिळाली असली तरी यांच्या मागे काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी(अजित पवार गटा) चे प्रफुल्ल पटेल या दोन बड्या नेत्याचा पाठींबा आहे भंडारा मध्ये पटोले यांचा चांगला दबदबा आहे तर गोंदिया मध्ये प्रफुल्ल पटेल यांचा दबदबा आहे. त्यामूळे इथे कोण येईल याचा अंदाज येत नाहीय.

    चंद्रपूर ह्या मतदारसंघातील निवडणूक या वेळेस जरा गुंतागुंतीची झाली भाजपनी या मतदारसंघातुन सुधीर मुनगंटीवार यांना त्यांची इच्छा नसताना उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे इतर नेत्यात आणि कार्यकारत्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले हीते.

    त्यांच्या विरोधात काँग्रेस च्या प्रतिभा धानोरकर आहेत त्यानं सुद्धा उमेदवारी मिळवताना बराच संघर्ष करावा लागला होता. त्या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत बाळू धानोरकर यांच्या मुत्यू मुळे प्रतिभा धानोरकर यांच्या बाबतीत मतदारांची सहानुभूती असल्याचे बोलले जात आहे.

    आणि मागील निवणुकीत जातींच्या आधारे बाळू धानोरकर निवडूण आले होते या वेळेस सुद्धा जातीचा प्रतिभा धानोरकर यांना पाठिंबा भेटलं असे बोलले जात आहे.
    त्यांच्या विरोधात मुनगंटीवार विकासाच्या अधरवर मतदान मागत होते आणि आदिवासी मतदान मिळवण्या साठी त्यांना सहानुभूती पूर्वक आपल्या कडे वळवण्याचा प्रयत्न भाजप कडून केला गेला. त्यामुळे त्यांना त्याचा किती फायदा होईल या वर चंद्रपूरचं राजकरण ठरलं.

    गाचिरोली चिमूर पहील्या टप्प्यात सर्वात जास्त मतदान या मतदारसंघात झाले आहे.या अधिक मतदानाचा फायदा कोणाला होईल या वर या मतदारसंघाचें राजकरण ठरणार आहे.
    हा मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणुन ओळखला जातो.या मतदासंघातुन भाजप कडून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते सलग दोन वेळा या मतदारसंघातुन निवडूण आले आहेत, परंतु या वेळेस मतदार त्यांच्या वर नाराज आहेत असे चित्र दिसत आहे.

    १० वर्ष त्यांच्या कडे सत्ता असून सुद्धा त्यांनी काही काम केल नाही असे लोकांचे मत आहे. मागील दोन निवडणूकीत ते मोदी फॅक्टर मुळे निवडूण आले परंतू या वेळेस मोदी फॅक्टर काम करेल का हा प्रश्न आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस कडून नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांनी या वेळेस कट्टर टक्कर दिली आहे. त्यांनी पदयात्रा काढून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. मतदारांशी ते चागल्या प्रकारे जुडलेले नेते आहेत. त्यामूळे त्यांना त्यांचा फायदा होईल आणि या वेळेस गाचिरोली चिमूर मध्ये सत्ता पलट होईल असा अंदाज आहे.

    तुम्हाला काय वाटते,पाहिल्या टप्यात या पाच मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल तुमचे मत कळवा.