Category: Uncategorized

  • Hello world!

    Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

  • निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरेल का…?३७० जागा जिंकण्यात भाजपला यश मिळेल का…?

    निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरेल का…? ३७० जागा जिंकण्यात भाजपला यश मिळेल का…?

    सध्या भारतातभर लोकसभा निवणूका चालू आहेत. या निवडणूकीत कोणतीही लाठ दिसून येत नाहीय हि निवणूक पुर्ण पणे स्थानिक मुद्यावर लढली जात आसल्याचं चित्र दिसत आहे. २०१४ पासून भाजप सत्तेत आहे आणि तेव्हा पासून भाजपाचा प्रभाव भारतीय राजकारणात वाढला आहे. २०१४ मध्ये भाजपनी २८२ जागा जिंकुन सत्ता स्थापन केली होती.

    त्यानंतर या जागा वाढुन भाजपनी २०२९ च्या निवडणूकीत ३०३ जागा जिंकल्या होत्या. अशातच एनडीटीवी सोबत बोलताना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी “या वेळेस सुध्दा भाजपचं सत्तेत येईल” असा अंदाज दर्शवला आहे.आणि या “लोकसभा निवडणूकीत भाजपला ३७० जगा मिळतील” असे विधान निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले आहे.

    प्रशांत किशोर म्हणाले की,

    ओडिशा आणि बंगालसारख्या पूर्वेकडील राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात. लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा कमबॅक करत असल्याचा दावा त्यांनी केला.

    प्रशांत किशोर यांचा हा अंदाज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विधानानंतर आला आहे. केजरीवाल म्हणाले होते की.

    ‘नरेंद्र मोदी सरकार सत्तेतून बाहेर जात आहे आणि इंडिया आघाडी येत आहे. 4 जून रोजी दिल्लीत इंडिया आघाडी सरकार स्थापन होणार आहे.

    २०१४ च्या निवडणूकीत प्रशांत किशोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप साठी काम करत होते. त्यांनी हि भविष्यवाणी केली आहे.

    गेल्या तिन-चार महिन्यात “आपकी बार ४०० पार” या विषयावर चर्चा होताना दिसत आहे. याला भाजपची रणनीती किंवा विरोधकांचा कमकुवतपणा समजा,पण भाजपनी आपले ध्येय २७२ वरुन ३७० च्या वर हालवले आहे याचा फायदा भजपला होताना दिसत आहे.

    आत्ता कोणीही म्हणत नाही की मोदी हरणार आहे, उलट लोक बोलतात ४०० नाही. परंतु ३७० जागा भाजप जिंकेल. हिच भाजपची रणनीती होती आणि त्याचा फायदा भाजपाला होत आहे असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर एनडीटीवी सोबत बोलताना सांगत होते. तुम्हाला काय वाटते या वर्षी सुध्दा भाजप सत्तेत येईल का आणि ३७० जागा जिंकण्यात भाजपला यश मिळेल का. तुमचे मत कळवा.

  • कोल्हापुरात कोण बाजी मारेल ?

    महाराष्ट्रातील अमरावती आणि बारामती लोकसभेच्या जागांप्रमाणेच यावेळी कोल्हापूरच्या जागेवरही चुरशीची लढत आहे. काँग्रेस पक्षाने शिवाजी महाराजांचे १२वे वंशज शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचे ते संयुक्त उमेदवार आहेत, तर दुसरीकडे गेल्या वेळी विजयी झालेले संजय मंडलिक यांची महायुतीने पुनरावृत्ती केली आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे संजय मंडलिक हे उमेदवार आहेत. मंडलिक शिवाजी महाराजांचे 12वे वंशज शाहू महाराजांना पराभूत करू शकतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मार्च महिन्यात शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली. तेव्हा ते म्हणाले होते की,

    “देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे.”

    त्यांचे हे वक्तव्य भाजपच्या नेतृत्वाखालील असलेल्या केंद्र सरकारवर हल्ला असल्याचे मानले जात होते. महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचा त्यांनी समाचार घेतला आणि म्हटले की,

    “आम्हाला हि राजकीय अस्थिरता कायम ठेवायची नाही”.

    कोल्हापुरात प्रचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन करताना शाहू महाराजांनी भाजपवर हल्लाबोल केला. शाहू महाराजांनी पक्षांतरविरोधी कायदा मजबूत करण्याचे श्रेय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दिले होते. राजीव गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात ते आणले होते, असे ते म्हणाले होते.

    विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 12वे वंशज हे 1999 नंतर कोल्हापूर लोकसभा जागेसाठी काँग्रेसचे पहिले उमेदवार आहेत. त्यांची थेट लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याशी आहे. मंडलिक हे कोल्हापुरातील शाहू महाराजांना थेट लक्ष्य करत नसून, ते कामाच्या नावावर मते मागत आहेत.

    “आपला लढा छत्रपती शाहू महाराजांविरुद्ध नसून कोल्हापूरच्या जनतेच्या स्वाभिमानासाठी आहे”,

    असे नुकतेच ते म्हणाले होते.

    “मी भावनेच्या जोरावर मत मागत नाही, तर माझ्या मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर मत मागत असल्याचे” ते म्हणाले होते.

    तेव्हा ते म्हणाले होते की, “राजा राजर्षी शाहू हे केवळ त्यांच्या घराण्याशी संबंधित राहून महाराजांचे खरे वारस होत नाहीत. हे निश्चितच एक व्यंग म्हणून पाहिले गेले. शरद पवार त्यांचा व्यंग म्हणुन वापर करत आहेत. शाहू छत्रपतींचा विजय निश्चित करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते त्यांचे पणजोबा, कोल्हापूरचे माजी राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा पुढे रेटत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांचे वर्णन सामाजिक न्याय चळवळीचे मशाल वाहक असे केले होते.”

    दुसरीकडे शिवसेनेचे मंडलिक हे त्यांचे वडील आणि कोल्हापूरचे चार वेळा खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा वारसा दुसऱ्या लोकसभेसाठी दाखवत आहेत. त्यांच्या एका भाषणात मंडलिक यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि त्यांचे वडील शाहू महाराजांचे वैचारिक उत्तराधिकारी असल्याचा दावा केला.

    महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली, तेव्हा काँग्रेसच्या कोल्हापूर विभागाचे प्रमुख सतेज पाटील म्हणाले की

    “उमेदवाराची घोषणा आश्चर्यकारक असेल”.

    राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काढण्यात आलेल्या मेळाव्यात शाहू छत्रपतींनी शरद पवारांसोबत स्टेज शेअर केल्यावर लोकांना याची जाणीव झाली. छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे कोल्हापूरच्या राजघराण्यातील पहिले सदस्य नाहीत. 1976 मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या सून विजयमाला यांनी शेतकरी आणि कामगार पक्षाच्या उमेदवार म्हणून हातकणंगले (तत्कालीन इचलकरंजी) लोकसभेची जागा लढवली आणि जिंकली.

    त्यांनी काँग्रेसचे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एस. पी. पी थोरात यांचा पराभव केला. ज्यांची निवड दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली होती. 2004 मध्ये शाहू छत्रपतींच्या दोन मुलांपैकी एक मालोजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा जिंकली.

    पाच वर्षांनंतर 2009 मध्ये शाहू छत्रपतींचे दुसरे पुत्र संभाजीराजे यांचा कोल्हापुरात सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून पराभव झाला. आता मंडलिक यांचा मुलगा संभाजीराजे यांच्या वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे.

  • पतीच्या आणि मुलांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती पदाच्या दावेदारीपर्यंत मझल मारणारी रणरागिणी

    मंडळी आयुष्य म्हणलं की संघर्ष हा अटळ आहे आणि प्रत्येकाच्या वाट्यालाच येत असतो. मात्र त्या संघर्षाचा प्रवास सुखकर समजून यशाला गाठणारी माणसं हे क्वचितच बघायला मिळतात.

    त्यापैकीच एक संघर्षशाली व्यक्तिमत्त्व असणारी राजकीय क्षेत्रात एका आदिवासी समाजातून येऊन राष्ट्रपती पदापर्यंत आपली दावेदारी मजबूत करणारी रणरागिणी म्हणजे द्रौपदी मुर्मू.

    RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा महाराष्ट्राचा मुस्लिम मुख्यमंत्री

    मंडळी द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशामधल्या मयुरभंज जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये झाला.  त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असे दोन अपत्ये झाली.

    मात्र अवघ्या काही कालावधीमध्येच त्यांचे पती व दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या मुलीला योग्य शिक्षण मिळाव यासाठी आणि कुटुंबामधला इतर खर्च करता यावा यासाठी सुरवातीला क्लर्क म्हणून नोकरी केली.

    काही काळ क्लर्क म्हणून नोकरी केल्यानंतर नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्राची वाट धरली आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष झाल्या.

    १ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास

    मुर्मू यांची लोकप्रियता वाढू लागली होती. आणि याच जनतेच्या प्रेमापोटी त्या १९९७ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचे मुर्मू यांच्या लोकप्रियतेकडे चांगलेच लक्ष होते.

    नंतर त्या २००० ते २००४ पर्यंत भाजप आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात राज्यमंत्री राहल्या. 

    राष्ट्रपती पदासाठी दावेदारी

    दिवसेंदिवस मुर्मू यांची लोकप्रियता वाढत होती. त्यांच्या कामामुळे त्यांना जनतेमध्ये आणि भाजपामध्ये एक उत्तम नेतृत्व म्हणून पसंत केल्या जाऊ लागलं. भारतीय देशातील  राजकारणात त्या राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशामधील पहिल्या महिला राज्यपाल होत्या.

    मुर्मू यांच्या नेतृत्वक्षमतेचा आलेख दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाच्या हिताचा ठरत असल्याकारणाने भाजपने त्यांना २०२२ सालच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी दावेदार म्हणून घोषित केले. आणि त्या इथल्या प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणास्थान झाल्या.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir