Tag: Bhagat Singh

  • क्रांतीगाथा भाग ४

    ब्रिटीशांनी घाव फक्त शरीरावरच घातले नव्हते…

    इथल्या कष्टकर्यांना , मजदूरांना त्यांच्या हक्काची मजदुरी ही मिळणे कठीण केले होते ,  शिक्षणाची सोय सुद्धा गरिबांच्या आटोक्यात नव्हतीच , भारतीयांचा राजकीय प्रवेश सुद्धा ब्रिटिशांना अमान्यच होता…

    गरिबीची झड , हिंदू मुस्लिम मतभेद उभे करून सत्तेची मलाई ब्रिटिश चाखत होते , डोळे झाकून अत्याचार करणार्या ब्रिटिशांना भारतीयांच्या किंकाळ्या ही ऐकू येईना आणि मग ठरलं या ब्रिटिशांना आवाज ऐकवायचा इंकलाब चा नारा ऐकवायचा….

    क्रांतीगाथा भाग ३

    पण नेमके कसे तर केंद्रीय असेंबली मध्ये बॉम्ब फेकुन धमाका करायचा पण फक्त आवाज येईल असा….त्यामुळे कुणाला दुखापत होऊ नये याची तस्तदी घेऊन…

    आझादांनी योजना आखली….

    बॉम्ब फेकून लगेच तिथून निघायचं आपल्या क्रांतिकारकांची धरपकड होऊ नये पण भगतसिंगांच्या मनात काही वेगळे होते…

    ” आझादजी अपने छोटे भाई की एक बात मानोगे….!! स्फोट करतेही हम चाहते है की हम गिरफ्तार हो ताकी दुनियाको भी पता चले की हम सरफिरे नही सरफरोशी है ….जो अपने वतन के लिये मर भी सकते है….!! “

    भगत….!! पर ….आझाद अळखडले…

    यहा गुरु गोविंदसिंह ने अपने बेटे वारे है तो हम क्या ?? भगतसिंग शब्दात बलिदानाच्या गाथेचा शब्द उमटला…

    दुसरीकडे राजगुरू भगतसिंगांना ओरडून म्हणत होते…

    ” मै भी आऊंगा….!! मुझे भी वतन के लिये मरना है…!! “

    राजगुरू रात्रभर रडत होते फक्त आपला जीव देशावर वाहता यावा म्हणून…

    पण अगोदरच योजना आखली गेली होती बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंगांनी केंद्रीय असेंबली मध्ये प्रवेश केला…

    #क्रांतीगाथा भाग २

    आणि धडाड धुम्म करत बॉम्ब चा आवाज झाला पण त्या ही पेक्षा एक आवाज अधिक बुलंद होता…

    ” इंकलाब जिंदाबाद , ब्रिटिश हुकुमत मुर्दाबाद !! भारत माता की जय….!! “

    भगतसिंग आणि बटुकेश्वर यांना अटक करण्यात आली…

    आणि आझादांच्या तोंडुन सर्व क्रांतिकारकांपुढे शब्द उमटले…

    ” मेरे भगत की शादी तय हो गयी दोस्तो…. पर शायद मै वो देख नही पाउंगा…. इंकलाब जिंदाबाद… !! “

    आणि हे सत्य सुद्धा होते !! या सर्व क्रांतिकारकांनी आपली प्रेयसी फक्त आझादी मानली होती…

    स्वतंत्रता…..पुर्ण स्वतंत्रता…

    आझादांच्या नैतृत्वाखाली आझादीचा लढा सुरू होता आणि जेलमध्ये एक लढा लढण्यासाठी भगतसिंग तयार होते…

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जालियनवाला बाग

    हिंदुस्थानात उतरलेल्या परकीय ब्रिटिशांनी भारताच्या भुमी, संस्कृती, इतिहास, वर्तमान ते भविष्यवरही घाला घातला होता…

    १८५७ चे स्वतंत्रसमर  अनेक किंकाळ्यांच्या आवाजाखाली दाबून ब्रिटीशांच्या हरामखोरीचे कारनामे थांबत नव्हते…

    आपल्याच देशात आपलेच भारतीय गुलाम झाले होते आपल्या मातृभूमीला  गुलामीच्या बंदीवासातुन मुक्त करण्यासाठी भारताच्या भूमीत अनेक क्रांतिकारक जन्माला येत होते पण आता ती उपज थांबावी म्हणून ब्रिटिशांनी एक काळा कायदा प्रेरित केला नाव होते रौलट कायदा ( मार्च १९१९)….

    ठाकरे परिवारातील तेजस ठाकरे ची तुलना व्हीव्हीयन रिचर्ड्ससोबत का केली जाते?

    या रौलट कायदा विरोधात उठणारी प्रत्येक आवाज दाबण्यासाठी ब्रिटिशांनी सर्व दंड भेद वापरले  , विरोधात चलणार्या सत्याग्रही लोकांना कैदेत घातले ,

    ज्याचा निषेध करण्यासाठी लोक जमली त्यावर भडीमार गोळ्या झाडून रक्ताचा सडा  पाडला आणि अमृतसर मध्ये कडक संचारबंदी लागली…

    पर हिंदुस्थानीओ के बुलंद इरादो को कोई रोख सके ऐसी कोई दिवार कहा…?

    आणि मग एक सभा ठरली …एक एक करत कानावर खबर पडत गेल्या तारीख होती १३ एप्रिल १९१९   दिवस बैसाखी चा..

    सुवर्णमंदिरात दर्शन घेऊन लहान मुले, स्त्रिया ,म्हातारी माणसे, तरुण अनेक अनेक आपल्या सणाला साजरी करण्यासाठी जालियनवाला बाग ला जमली होती…

    देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

               ” जो बोले सो निहाल …. सतश्री अकाल !!” 

    ढोलाच्या तालावर सर्वांच्या जुबानीवर वतन चे तराने होते , ” ऐ वतन तेनु की की मे दे पावा …तु मागे मेनु जान तो युही तैनु दे जावा….!!”

    भारत माता की जय !!

    पण या निष्पाप लोकांना अंदाज सुद्धा नव्हता की पुढे काय होणार होते….

    कळकळ करत अचानक बागचे गेट बंद झाले आणि गोरा ब्रिटीश अधिकारी जनरल डायर सर्वांपुढे सैनिकांना एका रांगेत एक्टिव करून शांत नजरेने आनंद साजरा करणार्यां लोकांना बघत राहिला…

    आणि अचानक त्याच्या कानावर आवाज पडला…  ” वंदे मातरम..!! भारत माता की जय….” 

    आणि डायरचे डोळे विस्फारले , Bloody Indian’s काळे शब्द बाहेर पडले  ” फायर….. !!! 

    आणि धडधड करत गोळ्या चलायला लागल्या देशभक्तांची ह्रदय चिरत , भारत मातेचे जयकार थांबवत , रक्ताचे थारोळे उडवत सुमारे ३९७ लोकांना मारत ,१९२ लोकांना जखमी करत , लहान लहान मुलांचे घास घेत या गोळ्या चालत होत्या

    एक, नव्हे दोन नव्हे तब्बल १६५० गोळ्या झाडल्या गेल्या , १२०  लोकांनी जीव वाचवण्यासाठी विहीरीत उड्या घातल्या तीही संपली , ४२ लहान मुले मारली आणि रक्ताने लालबुंद माती करत डायर बाहेर पडला…

    गिधाडांच्या आवाजाने आकाश भरले…

    प्रेत उचलून सुद्धा मातीचा लाल रंगात रंग बदलला …

    रात्री पालटून सर्व शांत झालेल्या त्या बागेत एक लहान मुलगा एकाला स्वतंत्रदेवतेला बसलेला दिसला …आपल्या लहानग्या हाताने तीथली माती पिशवीत भरत होता मग त्याला सहज विचारले…

    ” किसलिये ले जा रहे हो ये मिट्टी…!!”

    ” हमारे लोगो के खुन से.रंगी है ये मिट्टी हमे ये बलिदान याद दिलायेगी…!!”

    नाम क्या है बेटा आपका !!

    चेहऱ्यावर मासुमीयत पण डोळ्यात क्रांतीची छटा उमटलेल्या त्या निरागस ओठातून नवीन अध्याय चे.नाव बाहेर पडले…

    ”  जी मै सरदार भगतसिंग…..!!!”

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    #जिगरे ❤️

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी

    मंडळी भारतीय देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. पण या स्वातंत्र्यासाठी कित्येक हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. ज्यामध्ये २३ मार्च १९३१ साली शहीद भंगतसिंग यांना झालेली फाशी आठवली तर आजही प्रत्येक भारतीयांच्या भावना गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही.

    पण भगतसिंग यांच्या फाशीचा वाद हा बऱ्याच भारतीय जनतेच्या मनात गैरसमज निर्माण करून गेला. ज्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधीबद्दल काही लोक आजही प्रश्न उभे करतात.

    एकनाथ शिंदेंच्या पाया पडण्यावरून मला ट्रोल करणारी लावारस कारटी – अमोल मिटकरी

    मग गांधीजी खरच भतसिंगांना फाशी होण्यापासून वाचवू शकले असते का? याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी झालं असं की, भगतसिंगांना फाशीच्या शिक्षेची सुनावणी झाल्यानंतर त्यांना वाटत होतं की,

    “आपल्याला फाशी दिल्यास आपल्या तत्वज्ञाला उजाळा मिळेल आणि लोकांचा जास्त पाठिंबा मिळेल. मला फाशी झाली तर जनतेच्या मनात क्रांतीचा भडका उडेल आणि या देशाला लवकर स्वातंत्र्य मिळेल.”

    अस भगतसिंग यांना वाटत होत. दुसरीकडे ब्रिटिश सरकारमध्ये गांधीजींनी सहभाग मिळवण्यासाठी त्यांच्याशी करार केला होता.

    आणि बाबासाहेबांच्या त्या अग्रलेखाने ब्रिटिशांचे धाबे दणाणले

    ज्यामुळे लोकांना वाटत होतं की गांधीजी भगतसिंगांना फाशी होण्यापासून वाचवू शकेल. त्यानंतर गांधीजींनी ब्रिटिश व्हॉईसरॉयला भगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेबाबत पत्र लिहिलं. 

    गांधींजींच भगतसिंगांबद्दल व्हॉईसरॉयला पत्र

    मंडळी भागतसिंगांच्या फाशीबद्दल गांधीजींनी व्हॉईसरॉयला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की,

    ” मी हे पत्र आपणास शांतता आणि संरक्षणाच्या भूमिकेतून लिहितो आहे. भगतसिंग यांची शिक्षा कमी करता येणार नसल्याचं तुम्ही मनमोकळेपणाने मला सांगितलं. मात्र जर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली तर देशातील शांततेला धोका आहे. राजगुरू, भगतसिंग, सुखदेव या तिघांचे प्राण वाचले तर आम्ही हिंसक कारवाया थांबवू आणि आम्ही ज्या हत्या यापुढे करणार होतो त्याही थांबवण्यात येतील असं आश्वासन क्रांतिकारकांच्या संघटनेने आपणास दिलेलं आहे. राजकीय हत्या यापूर्वीही झाल्या आहेत. हे तीन जीव वाचले तर येणाऱ्या हत्या होणं थांबतील. माझ्या मताचा तुम्ही नेहमीच आदर करता आणि माझं मत नेहमीच शांततेच्या बाजूने असत. त्यामुळे फाशीची अंमलबजावणी करून आपण  माझी स्थिती अडचणीची करू नये अशी आपणास विनंती आहे.”

    अस गांधीजी यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. मंडळी उगाच काहीपण तर्क वितर्क लावून लोक काहीपण बरळत असतात. गांधीजींनी भगतसिंग यांना वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणूनच आज जनतेला कळाले नाही.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir