Tag: education

  • राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणात मनुस्मृतीचा समावेश होणार का?

    राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणात मनुस्मृतीचा समावेश होणार का?

    केंद्रसरकारने 2024 पासुन नवीन शैक्षणिक धोरण लागू केले. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याबाबत चर्चा चालू आहे. अशातच नवीन शैक्षणीक धोरणात भगवत गीता आणि मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यात येणार आहे अशी चर्चा होत आहे.

    राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणात तिसरी पासून ते बारावी पर्यंत भगवत गीता आणि मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश करण्यात यावा असा राज्य सरकारने प्रस्ताव मांडला आहे.

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातल्या एससीईआरटी ने राज्याचा नवीन शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. आणि ज्यांना या अभ्यासक्रमामध्ये काही सुधारणा सुचवायच्या आहेत किंवा काही आक्षेप असेल तर असे आक्षेप आणि सूचना त्यांनी मागवल्या आहेत.

    मुलांना आपल्या देशातील परंपरांची ओळख करून देणे आणि त्याबद्दल त्यांच्या मनात अभिमान निर्माण करणे हा या आराखड्या मागचा उद्देश आहे असे सांगितले जात आहे. परंतु या आराखड्याला मोठ्या प्रमाणात विरोधकाकडून विरोध केला जात आहे आणि या वरून महाराष्ट्रातील राजकीय स्थिती तापण्याचा अंदाज दर्शवला जात आहे.

    नवीन शिक्षण धोरणात भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनुचे श्लोक आणि भगवत गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा असे सुचविण्यात आले आहे. तिसरी ते पाचवी पर्यंत ०१ ते २५ मनुचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी २६ ते ५० मनुचे श्लोक आणि नववी ते बारावी साठी भगवत गीतेतील बारावा अध्याय याचे पाठांतर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे.

    मनुस्मृतीला वारंवार विरोध होत आला आहे. प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी “आजही मनूला आदर्श आणि पूज्य मांडणारे मन आहेत ही अतिशय निषेधार्थ बाब आहे” असे मत मांडले होते. याच मनुस्मृतीला विरोध करत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते आणि आज आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या काळात मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे कितपत योग्य आहे असे सामान्य लोकांचे मत आहे.

    मनुस्मृतीचा वापर हा आम्हाला मान्य नाही असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर सरकार ची मानसिकता काय आहे हे कळतीय अशी टीका शरद पवार यांनी या नवीन शैक्षणिक आराखड्यावरून केली आहे. सध्या या नवीन शैक्षणिक आराखड्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटण्याच्या मार्गावर आहे.

    जितेंद्र आव्हाड यांच्या मते मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात समावेश म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेचा अपमान करण्यासारखं आहे असे म्हटले आहे. मनुस्मृतीमुळे महिले वर अन्याय होईल असे ते म्हणाले. त्यांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्मान करत आहे असे सांगितले आहे.

    एससीईआरटी ने जाहिर केलेला अभ्यासक्रम एक आराखडा आहे आणि त्यात बदल करता येईल. लोकांकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातील आणि ज्या सुधारणा सुचवल्या जातील त्याच्या आधारे नवीन अभ्यासक्रम बनवण्यात येईल असे एससीईआरटी ने सांगितले आहे.

    एससीईआरटी च्या या अभ्यासक्रम आराखड्यात बदल होईल का आणि मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे का तुमचं मत काय?

  • शैक्षणिक वस्तू वर १८ ℅ जीएसटी लावणारा ये नया भारत है !!

    मान्य आहे की कोवीड मध्ये आर्थिक स्थिती मध्ये जागतिक उलाढाल झाली.

    भारतीय अर्थव्यवस्था त्या पासून दूर गेली नव्हती तरीही आमच्या देशात आम्ही ऑक्सिजन विना शेवट स्विकारुन सुद्धा राष्ट्र प्रथम म्हणून जागतिक स्तरावर देशाचे नावलौकिक करणारे मा. प्रधानमंत्रीच्या प्रत्येक निर्णय स्विकार केला.

    नंतर उत्तर प्रदेश असू द्या, मध्य प्रदेश असू द्या किंवा सध्या महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी सरकार सुध्दा स्थापन झाले…

    जेव्हा पवारांना प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी जबरदस्तीने मुख्यमंत्री करण्यात आलं…

    पण अच्छे दिन आने वाले है ही भावनिक साद घालून जी सत्ता प्राप्त झाली त्या देशातील शिक्षण क्षेत्रात १८ %  GST ?? पेन्सिल चे नोक करणारे शॉर्पनर पासून मुलांच्या पुस्तक वर जिएसटी?

    ज्या देशात आजही गरिबी अभावी शिक्षण अपुर्ण राहते तिथे शैक्षणिक साहित्य वर वाढीव जिएसटी लावून नेमके कोणते मास्टरस्ट्रोक मारले आहे मोदीजींनी ?

    १ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास

    खायच्या वस्तू वर सुद्धा जिएसटी वाढीव केले, गहू तांदूळ सारख्या अन्नधान्य वरही जिएसटी वाढवला….

    बरं जगणं तर जगणं…..स्मशानभूमीत कंत्राटी वर १८% जिएसटी??

    जेव्हा देशात आर्थिक स्थिती योग्य नव्हते तेव्हा नवीन सांसद चे बजेट नेमके उभे कशासाठी झाले ??

    समर्थक आहे मोदीजींचे पण शिक्षण विकत घेण्यासाठी मेळघाट सारख्या असंख्य गरिबांच्या शिक्षणाची पर्वा असु नये एवढा अंधसमर्थक नाही…..

    Inflation हा आर्थिक परिस्थिती वर सुनिश्चित होतो म्हणून जागतिक नोबेल नामासाठी लोकांच्या परिस्थिती चे deflation करायचे नसते….

    अक्षय चंदेल….

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड

    महाराष्ट्रतल्या संपूर्ण मतदारसंघातील माझ्या शेतकरी कष्टकरी कामगार बापाच्या मुलांना विनंती आहे. आपल्या समाजातील विकास हा शेती शिक्षण रोजगार या तीन मूलभूत घटकांवर आधारलेला आहे.

    पण गेल्या कित्येक वर्षांपासून इथल्या राजकीय पक्षांनी नागरिकांना रस्ते शोषखड्डे, बसस्टॉप, मंदिर- मस्जिद बांधण्याचा विकास दाखवून मूर्ख बनवलं आहे. एखाद्या रुग्णाला अचानक कुठला आजार आढळला तर जवळपास कुठले मुबलक हॉस्पिटल नसल्याने सरळ मोठ्या शहरात न्यावे लागते.

    पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये

    यामध्ये कित्येक रुग्णांनी अर्ध्या रस्त्यातच जीव सोडल्याचा घटना आपण बघितल्या आहे. शिक्षण घेण्यासाठी शेतकरी मायबापाला आपली मुलं डिग्रीच्या शिक्षणासाठी बाहेर पाठवावी लागतात आणि भरमसाठ पैसा खर्च करावा लागतो.

    शिक्षण पूर्ण झालं की रोजगार नाही. मग पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये आपलं कुटुंब सोडून इथली मूल जातात. नाहीच तर मनाला शांती मिळायसाठी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा बहाना आहेच.

    नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य

    याहीव्यतिरिक्त आसपासच्या शहरात कम्प्युटर ऑपरेटरची 6 हजार पगाराची जॉब आहेच. शाळा आणि कॉलेजमध्ये प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करणारी मुलं 6 हजाराची जॉब करतात हे न पटण्यासारखे आहे.

    कुठल्याही पक्षाला किंवा संघटनेला विरोध नाही. तुम्ही कुठल्याही पक्षाचे कट्टर असाल, कार्यकर्ते असाल. मात्र जाती- धर्माच्या नावावर किंवा साहेबांनी रस्ते बांधून विकास केला अशा भ्रमात राहू नका.

    भगतसिंगाने ब्रिटिश प्रशासनाविरोधात जसा इंकलाब केला होता. तोच इंकलाब इथल्या प्रत्येक तरुणाकडून झाला तर भविष्य प्रकाशमय आहे. अन्यथा गुलामी स्वीकारावी लागेल. 

            जय हिंद इंकलाब🇮🇳

    – बेधुंदकार गोविंद पोलाड
         सामान्य नागरिक

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य

    या साठी मोर्चे काढा, आम्ही शांत बसणार नाही वगैरे वगैरे..

    मागील वर्षी आम्ही एक ऑक्सिजन अभावी जीव जातांना माणसं बघितली…त्या वेळी आमचे माननीय लोक राजकीय सभा घेण्यात व्यस्त होते.. आजही अनेक आव्हाने उभे करून देशातील स्थानिक स्थिती काय आहे न बघता अस्थिरता कशी उभी करावी या कडे नेत्यांची लक्ष जास्त…

    हे करा , ते करा , आम्ही असे करु , तलवार हाती घेऊ वगैरे म्हणणार्या नेत्यांची मुले कधीच जमीनीवर लढायला नसतात. पण कार्यकुत्रे म्हणजे नेत्यांना बाप आणि पक्षाला धर्म मानुन अगदी लाठी वगैरे घेऊन नेहमी तयारच , आजही भारतात जर कोविड ची चौथी लाट आली तर आपण किती तयार आहो आम्हाला माहिती नाही ?

    चिथावणीखोर भाषण करून लोकांचे प्रश्न मिटणार आहेत काय? अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

    सद्यस्थितीत ग्रोथ रेट किती घसरला आम्हाला  घेणेदेणे नाही , तीन लाख लोकांच्या नौकर्या फक्त मागील महिन्यात गेल्या कुणाला फरक पडत नाही , महागाई किती वाढली ते बघणार नाही,शेतकरी आत्महत्या , शैक्षणिक दर्जा, त्या बद्दल आम्ही सरकारला कधीच जाब सुद्धा विचारणार नाही..

    आणि राजकीय धंदा करणार्या लोकांना त्याशी काही घेणे देणे सुद्धा नाही कारण मरणारा हा त्यांच्या घरचा नसतो मरतो तो सामान्य व्यक्ती.

    शिवसेना स बोलले की मराठी अस्मिता , बिजेपी ला बोलले की राष्ट्रधर्म , राष्ट्रवादी कांग्रेस ला बोलले की पुरोगामीत्व …. नेमके पक्ष या सर्व गोष्टी चे ठेकेदार कधी झाले ? हा बिजेपी चा , हा कांग्रेस चा , हा राष्ट्रवादी चा म्हणण्यापेक्षा..

    युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणणार- बाळासाहेब थोरात

    मी माझ्या बापाचा बोलणं महत्त्वाचे असतं..

    तुम्ही प्रश्न केला की लगेच पाकिस्तान जाओ म्हणणारी केंद्र सरकार , राज्यात विज पासून शेतकरी पर्यंत असंख्य प्रश्न असताना रोज नवीन भानगड करणारी राज्य सरकार..

    शेवटी सर्व एकाच माळेचे मणी..

    “जोपर्यंत रोजगारावर सरकारचे नियंत्रण राहील,माध्यम,शाळा आणि जनमत बनवन्याची सर्व साधने सरकारच्या हाताखाली असतील,जोपर्यंत सर्व कुशल आणि प्रशिक्षीत लोकांवर सरकारचे नियंत्रण असेल;

    निवडणुकांवर प्रभाव टाकन्यासाठी अमर्याद पैसा असेल,जोपर्यंत सत्ताधारी पक्षच कायदे बनविल;

    जोपर्यंत कायद्यांचे अभ्यासक सर्वाधिक पैसे देणाऱ्यांच्यामागे उभे राहतील तोपर्यंत देशात फक्त नावापुरती समानता असेल.”

               ——————-   सरदार भगतसिंग.

    अक्षय चंदेल

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    FB : https://www.facebook.com/PoliticalWazir

  • प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम

    प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम

    रयत शिक्षण संस्थेचे,

    संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील

    जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म

    शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ

    अध्यापन कार्य

    १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर

    १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य

    शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

    शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२

    शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५

    शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८

    शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८

    सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१

    रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून

    रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून

    दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

    राजकीय कार्य

    १९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

    १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस

    १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य

    १९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस

    १९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य

    १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )

    १९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार

    महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

    मिळालेले सन्मान / पुरस्कार

    भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४

    स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९

    राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००

    विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१

    शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी

    शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

    भूषविलेली पदे

    रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य

    समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष

    अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष

    जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक

    म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष

    दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष

    महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

    प्रसिद्ध झालेले लेखन

    समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)

    शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२

    कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२

    शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३

    वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६

    महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७

    शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०

    शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२

    महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )

    नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )

    रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य

    चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.