Tag: kolhapur

  • कोल्हापूरमध्ये मर्द लोकांची कमी नाही.. टेस्ट ट्यूब बेबी कशाला? नितीन गडकरींचं वक्तव्य…

    कोल्हापूरमध्ये मर्द लोकांची कमी नाही.. टेस्ट ट्यूब बेबी कशाला?

    नितीन गडकरींचं वक्तव्य..

    लोकसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर कोल्हापूरमधे (४ मे) एका सभेत IVF सेंटरवर बोलताना नितीन गडकरींनी “तुमच्या कोल्हापूरमध्ये मर्द लोकांची कमी नाही. टेस्ट ट्यूब बेबी प्लांट कशाला पाहिजे!” असे वक्तव्य केले आहे. या वरुन ते विरोधकांच्या घेरावात सापडले आहेत.

    लग्नानंतर मुल होत नसेल, तर टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञानाच्या आधारे मुल जन्माला घालून, त्याचे नैसर्गीकरित्या पोषण केले जाते. परंतु नितीन गडकरींनी लोकांच्या वैयक्तीक विषयाला राजकीय रुप देवुन लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.

    टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय?
    टेस्टट्यूब – बेबी म्हणजेच आय.व्ही.एफ. तंत्रज्ञान आहे. हे एक ऍडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे. टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया समजून घेण्यापूर्वी नैसर्गिक गर्भधारणा कशी होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक गर्भधारण प्रक्रियेमध्ये ओव्हरीज मधून एग्ज रिलीज होतात आणि फेलोपियन ट्यूबकडे पाठविले जातात. येथे स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचे फर्टिलायझेशन होते आणि गर्भधारणा होते. जेव्हा नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकत नाही. तेव्हा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेचा वापर केला जातो.

    या प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू योग्य वेळी कलेक्ट केले जातात, आणि ऍडवान्सड लॅब मधील इन्क्युबेटर्स मध्ये फर्टीलाइज केले जातात. यावेळी तयार केलेला भ्रूण/एम्ब्रियो स्त्री च्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो. या प्रक्रियेत बाळाचा पुढील विकास आणि वाढ अगदी नैसर्गिक रीतीने होते. या संपूर्ण प्रक्रियेतून जन्मलेल्या बाळाला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात.

    टेस्ट ट्यूब बेबी ऍडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक बाळांना जन्म देण्यात आले आहे. आणि त्यात गैर काही नाहि. परंतु नितीन गडकरींनी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मर्दानगी वर बोट करत मुलं होत नाही. अशा लोकांचा अपमान केला आहे. असे विरोधकांचे मत आहे.

    टेस्ट ट्यूब बेबी प्लांटची मागणी केल्या नंतर लोकांच्या मर्दांगी वर बोलत लोकांचे लक्ष विचलीत करुन टेस्ट ट्यूब बेबी प्लांटच्या मागणीकडे नितीन गडकरी यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

  • कोल्हापुरात कोण बाजी मारेल ?

    महाराष्ट्रातील अमरावती आणि बारामती लोकसभेच्या जागांप्रमाणेच यावेळी कोल्हापूरच्या जागेवरही चुरशीची लढत आहे. काँग्रेस पक्षाने शिवाजी महाराजांचे १२वे वंशज शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचे ते संयुक्त उमेदवार आहेत, तर दुसरीकडे गेल्या वेळी विजयी झालेले संजय मंडलिक यांची महायुतीने पुनरावृत्ती केली आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे संजय मंडलिक हे उमेदवार आहेत. मंडलिक शिवाजी महाराजांचे 12वे वंशज शाहू महाराजांना पराभूत करू शकतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मार्च महिन्यात शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली. तेव्हा ते म्हणाले होते की,

    “देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे.”

    त्यांचे हे वक्तव्य भाजपच्या नेतृत्वाखालील असलेल्या केंद्र सरकारवर हल्ला असल्याचे मानले जात होते. महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचा त्यांनी समाचार घेतला आणि म्हटले की,

    “आम्हाला हि राजकीय अस्थिरता कायम ठेवायची नाही”.

    कोल्हापुरात प्रचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन करताना शाहू महाराजांनी भाजपवर हल्लाबोल केला. शाहू महाराजांनी पक्षांतरविरोधी कायदा मजबूत करण्याचे श्रेय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दिले होते. राजीव गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात ते आणले होते, असे ते म्हणाले होते.

    विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 12वे वंशज हे 1999 नंतर कोल्हापूर लोकसभा जागेसाठी काँग्रेसचे पहिले उमेदवार आहेत. त्यांची थेट लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याशी आहे. मंडलिक हे कोल्हापुरातील शाहू महाराजांना थेट लक्ष्य करत नसून, ते कामाच्या नावावर मते मागत आहेत.

    “आपला लढा छत्रपती शाहू महाराजांविरुद्ध नसून कोल्हापूरच्या जनतेच्या स्वाभिमानासाठी आहे”,

    असे नुकतेच ते म्हणाले होते.

    “मी भावनेच्या जोरावर मत मागत नाही, तर माझ्या मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर मत मागत असल्याचे” ते म्हणाले होते.

    तेव्हा ते म्हणाले होते की, “राजा राजर्षी शाहू हे केवळ त्यांच्या घराण्याशी संबंधित राहून महाराजांचे खरे वारस होत नाहीत. हे निश्चितच एक व्यंग म्हणून पाहिले गेले. शरद पवार त्यांचा व्यंग म्हणुन वापर करत आहेत. शाहू छत्रपतींचा विजय निश्चित करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते त्यांचे पणजोबा, कोल्हापूरचे माजी राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा पुढे रेटत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांचे वर्णन सामाजिक न्याय चळवळीचे मशाल वाहक असे केले होते.”

    दुसरीकडे शिवसेनेचे मंडलिक हे त्यांचे वडील आणि कोल्हापूरचे चार वेळा खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा वारसा दुसऱ्या लोकसभेसाठी दाखवत आहेत. त्यांच्या एका भाषणात मंडलिक यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि त्यांचे वडील शाहू महाराजांचे वैचारिक उत्तराधिकारी असल्याचा दावा केला.

    महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली, तेव्हा काँग्रेसच्या कोल्हापूर विभागाचे प्रमुख सतेज पाटील म्हणाले की

    “उमेदवाराची घोषणा आश्चर्यकारक असेल”.

    राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काढण्यात आलेल्या मेळाव्यात शाहू छत्रपतींनी शरद पवारांसोबत स्टेज शेअर केल्यावर लोकांना याची जाणीव झाली. छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे कोल्हापूरच्या राजघराण्यातील पहिले सदस्य नाहीत. 1976 मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या सून विजयमाला यांनी शेतकरी आणि कामगार पक्षाच्या उमेदवार म्हणून हातकणंगले (तत्कालीन इचलकरंजी) लोकसभेची जागा लढवली आणि जिंकली.

    त्यांनी काँग्रेसचे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एस. पी. पी थोरात यांचा पराभव केला. ज्यांची निवड दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली होती. 2004 मध्ये शाहू छत्रपतींच्या दोन मुलांपैकी एक मालोजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा जिंकली.

    पाच वर्षांनंतर 2009 मध्ये शाहू छत्रपतींचे दुसरे पुत्र संभाजीराजे यांचा कोल्हापुरात सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून पराभव झाला. आता मंडलिक यांचा मुलगा संभाजीराजे यांच्या वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे.

  • कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत ट्विस्ट आणण्यासाठीचंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडीवर टोलेबाजी

    कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत ट्विस्ट आणण्यासाठी
    चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडीवर टोलेबाजी

    मंडळी सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत चिघळत चाललं आहे. केंद्र सरकार आणि राज्यसरकार म्हणजे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार अस राजकीय युद्ध सद्धया महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

    कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची डबल ढोलकी असते, अस ते म्हणाले. त्यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांवर बोलताना कोल्हापूर निवडणूकीच्या अनुषंगाने खोचक टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली.

    ते म्हणाले,

    “तुम्ही कोल्हापूर शहरात आला तर विकास निधी वाढेल. त्याचा गावांच्या विकासासाठी फायदा होईल. अस आम्ही गेल्या पाच वर्षात इथल्या गावांना सांगितलं परंतु या गावांनी ऐकलं नाही.”

    अस ते म्हणाले. 

    चंद्रकांत पाटील यांनी पुढे बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ते म्हणाले की,

    ” जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची नेहमी डबल ढोलकी असते. जिल्हा परिषदेची निवडणूक आली शहरात येणार नाही म्हणून सांगतात आणि पालिकेची निवडणूक आली की हद्दवाढीची मागणी करतात.”

    अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मात्र आता यावर महाविकास आघाडीमधील नेते काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.