Tag: raj thackeray

  • तीन ऋतू असतात तसे राज ठाकरे आहेत – गुलाबराव पाटील

    तीन ऋतू असतात तसे राज ठाकरे आहेत – गुलाबराव पाटील

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सुरू असलेला घमासान हा सामान्य माणसाला न कळण्यासारखा आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर ईडी चौकशीचे हल्ले करत असताना आता महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी तिसरा पाय काढला आहे.

    सतत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपवर टीका करणारे राज ठाकरे यांनी अचानक भाजपच्या बाजूने मुसंडी घेत आपली मराठी अस्मिता निलामी काढलेली आहे. गुडीपाडव्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबई येथे घेतलेल्या सभेदरम्यान महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं काम केलं.

    भारतीय जनता पक्षावर नेहमी टीका करणारे राज ठाकरे एकही शब्द भाजप विरोधात न बोलल्यामुळे आता भाजप मनसे युतीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईमधल्या किंवा महाराष्ट्रभरातल्या समस्यांना हात न घालता मुस्लिमांचे भोंगे बंद करण्यासाठी मंदिरात हनुमान चालीसा लावू अशा प्रकारचं धार्मिक तेढ निर्माण करणार भाषण करायचं काम केलं आहे.

    या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

    काय म्हणाले गुलाबराव पाटील ? 

    मंडळी राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त मुंबई येथे घेतलेल्या सभेतील भाषणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. राज ठाकरे यांच पाऊल भाजपकडे युतीसाठी वळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते गुलबराव पाटील यांनी राज ठाकरेंची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

    ते म्हणाले की,

    “उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू असतात. तसेच राज ठाकरे यांचे तीन ऋतू आहेत, कोणत्याच ऋतूला यांना काहीही मिळत नाही.”

    अस ते म्हणाले. मात्र गुलाबराव पाटील यांच्या या विधानावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • राज ठाकरेंचं इंजिन कुठे जात आहे हेपण त्यांना माहिती नाही- छगन भुजबळ

    राज ठाकरेंचं इंजिन कुठे जात आहे हेपण त्यांना माहिती नाही- छगन भुजबळ

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सुरू असलेला घमासान हा सामान्य माणसाला न कळण्यासारखा आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर ईडी चौकशीचे हल्ले करत असताना आता महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी तिसरा पाय काढला आहे.

    सतत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपवर टीका करणारे राज ठाकरे यांनी अचानक भाजपच्या बाजूने मुसंडी घेत आपली मराठी अस्मिता निलामी काढलेली आहे. गुडीपाडव्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबई येथे घेतलेल्या सभेदरम्यान महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं काम केलं.

    भारतीय जनता पक्षावर नेहमी टीका करणारे राज ठाकरे एकही शब्द भाजप विरोधात न बोलल्यामुळे आता भाजप मनसे युतीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईमधल्या किंवा महाराष्ट्रभरातल्या समस्यांना हात न घालता मुस्लिमांचे भोंगे बंद करण्यासाठी मंदिरात हनुमान चालीसा लावू अशा प्रकारचं धार्मिक तेढ निर्माण करणार भाषण करायचं काम केलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

    काय म्हणाले भुजबळ? 

    मंडळी राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त मुंबई येथे घेतलेल्या सभेतील भाषणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. राज ठाकरे यांच पाऊल भाजपकडे युतीसाठी वळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंची चांगलीच कानउघाडणी केली आहे. ते म्हणाले की,

    ” राज ठाकरे यांच इंजिन कुठल्या दिशेने जात आहे याचं भानसुद्धा त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नाही राहल आहे.”

    अस ते म्हणाले. मात्र भुजबळांच्या या विधानावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • राज्यपाल यांचा महापुरुषांची बदनामी करण्याचा कट- राज ठाकरे

    राज्यपाल यांचा महापुरुषांची बदनामी करण्याचा कट- राज ठाकरे

    मंडळी महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असता संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र आता राज ठाकरे यांनी या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
     
     
     
    त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडी आणि भाजपवर टीका करत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. विरोधक म्हणतात, सत्ताधारी आम्हाला संपवायला निघालेत. सत्ताधारी म्हणतात विरोधक आम्हाला संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील समस्या आणि लोकांच्या प्रश्नांबाबत कोणालाच काही पडलेले नाही.
     
     
     
    हे फक्त एकमेकांवर धाडी टाकण्यात रमलेले आहेत. लोकांना निवडणुका हव्या आहेत का, याचा जरा कानोसा घ्या, लोकांना निवडणूक नको आहे. महाविकास आघाडी सरकार व भारतीय जनता पक्ष जनतेला फसविण्याचा प्रयत्न करत आहेत. अस राज ठाकरे म्हणाले. 
     
     
                 पुढे बोलतांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोश्यारी यांच्यावरसुद्धा राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली. शिवाजी महाराज, रामदास स्वामी हे कोण माहिती नसतांना, अभ्यास नसतांना बोलायचं कशाला?
     
     
     
    शिवरायांनी केव्हा सांगितले नाही की रामदास माझे गुरू होते. मग काहीही बोलून भांडणे लावण्याचा उद्योग करायचा कशाला? महापुरुषांची बदनामी करून तरुणांची माथी भडकवायची बस एवढाच उद्योग सध्या राज्यात सुरू आहे. महापुरुषांना बदनाम करायचे आणि त्यांच्या नावावर मते मागायची, असा खेळ आहे.
     
     
     
    अस बोलून राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान करून तरुणांची माथी भडकवायच काम केलं. अस राज ठाकरे यांचा म्हणणं आहे. त्याचबरोबर कोश्यारी यांनी विद्येची नायिका सावित्रीआई फुले यांच्याबद्दलपण वादग्रस्त विधान केल होत. अशाप्रकारचे बेताल वक्तव्य करून कोश्यारी मूर्खपणाचा डोंगर ओलांडत आहे. अस म्हणायला हकरत नाही.