ईव्हीएमचा वाद अन गोपीनाथ मुंडें चा अपघात की हत्या?

गोपीनाथ मुंडें

मंडळी भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते गोपीनाथ मुंडे यांचा २०१४ मध्ये मृत्यू झाला होता. मात्र मुंडे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूच गूढ आजवर सुटू शकलेलं नाही.

 

मुंडे यांचा नेमका अपघात झाला की त्यांची हत्या झाली यावर आजही बरेच लोक शंका व्यक्त करत असतात. मात्र काही गोष्टींचा जर निरखून आढावा घेतला तर गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघाती झाला नसून त्यांची हत्या झाल्याचा संशय आणखी बळकट होतो.

 

तर मंडळी झालं असं की, २०१४ साली नुकतंच भारतीय जनता पक्षाच् सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेलं होत. आणि या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय ग्रामविकास मंत्री पद देण्यात आलं होतं.

 

देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

 

गोपीनाथ मुंडे हे जरी केंद्रामध्ये मंत्री असले तरी त्यांच बऱ्यापैकी लक्ष महाराष्ट्रावर राहात होत. तारीख होती ३ जून २०१४. गोपीनाथ मुंडे हे सकाळी ६ वाजताच्या सुमारास दिल्लीवरून मुंबईला जायला विमानतळावर निघाले होते.

 

त्यांना विमानतळावर जाण्यासाठी शासकीय गाडीमध्ये जाणे सोयिस्कर वाटले. मात्र आपल्या ठिकाणांवरून ५ ते ६ किलोमीटरच्या अंतरावरच त्यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीने धडक मारली.

 

ज्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच डोकं पुढच्या सीटला जाऊन आदळल. मात्र या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला आणि पीएला काही एक दुखापत झाली नव्हती.

 

अचानक मुंडेंना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

 

आणि संपूर्ण देशामध्ये बातमी पसरली की आपले नेते गोपीनाथ मुंडे आता आपल्यात राहलेले नाही. 

 

इशरत जहाचा एन्काऊंटर आणि नरेंद्र मोदी कनेक्शन

 

ईव्हीएमवरून हत्येचा संशय…

 

मंडळी २०१४ साली लोकसभा निवडणूकीमध्ये झालेल्या ईव्हीएम हॅकिंग कल्पना गोपीनाथ मुंडें यांना होती. यावरून त्यांची हत्या करण्यात आली. अस विधान सायबर एक्स्पर्ट सय्यद सुजा याने केलं होतं.

 

ययाहीव्यतिरिक्त गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीसुद्धा

” गोपीनाथ मुंडे यांचा अपघात नसून हत्या आहे.”

असे सांगितले होते. मात्र आजपर्यंत या प्रकरणाच कोड उलगडलेलं नाही.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *