Category: बातमी

  • शिशिर शिंदे कडून, “गजानन कीर्तिकर यांची पक्षातुन हकालपट्टी करा”, अशी मागणी

    शिशिर शिंदे कडून “गजानन कीर्तिकर यांची पक्षातुन हकालपट्टी करा “अशी मागणी

    महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन गट पडून दोन पक्ष निर्माण झाले आणि २०२४ च्या लोकलभा निवडणूकीत प्रथमच हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लोकसभा निवडणूकीच्या मैदानात समोरा समोर आले आहेत. आशातच शिवसेना (शिंदे गट) चे गजानन कीर्तिकर यांनी आपल्याच पक्षा विरोधात वक्तव्य केले आसल्यामुळे शिवसेनेतले अंतर्गत वाद समोर येत आसल्याचे बोलले जात आहे.

    गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडुन लोकसभा निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. या वर बोलताना गजानन कीर्तिकर यांनी

    “अमोलला बोट धरून मी शिवसेनेत आणले, पण पक्षात जी संधी मिळायला हवी होती ती त्याला मिळाली नाही. आता अमोलला संधी मिळाली आहे. मात्र आज टर्निंग पॉईंटला मी त्याच्यासोबत नाही. आता अमोल ना नगरसेवक, ना आमदार तर डायरेक्ट खासदार होणार ! असे विधान करत पुढे त्यांनी कुटुंबीयांचा विरोध असतानाही मी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेलो, आणि एकटा पडलो.”

    असे वक्तव्य केले आसल्यानी गजानन कीर्तिकर यांच्या विरुध शिवसेनेत नाराजी व्यक्त केली जात आहे. शिशिर शिंदे यांनी तर गजानन कीर्तिकर यांची पक्षातुन हकालपट्टी करा असा पत्र एकनाथ शिंदे यांना लेहला अहे. आणि गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर जाऊन लोटांगण घालण्याची घाई झाली आहे.आशी टिका देखील केली आहे.

    यावर आपली बाजू मांडताना गजानन कीर्तिकर म्हणाले एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि आम्ही सगळे शिवसेनेचा विचार घेवून वेगळे पडलो. आमचा पक्ष कुठे तरी भरकटत होता म्हणून मी एकनाथ शिंदे सोबत आलो आणि शेवट पर्यंत एकनाथ शिंदे सोबत आहे. असे बोलून गजानन कीर्तिकरांनी शिवसेनेत निर्मान झालेल्या अंतर्गत वादाला आळा घातला आहे परंतू गजानन कीर्तिकर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षा मध्ये शामील होतील का आशी शंका निर्मान झाली आहे.

  • माझी चुक सुधारण्यासाठी पुढील तीन दिवस उपवास करुन प्रायश्चित करणार आहे. भगवान जगन्नाथ यांच्या बदल केलेल्या विधानावर संबित पात्रा यांचे स्पष्टीकरण.

    माझी चुक सुधारण्यासाठी पुढील तीन दिवस उपवास करुन प्रायश्चित करणार आहे.

    भगवान जगन्नाथ यांच्या बदल केलेल्या विधानावर संबित पात्रा यांचे स्पष्टीकरण.

    २० मे २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडीसा मधील पुरी इथे भाजप चे उमेदवार संबित पात्रा यांच्या प्रचारासाठी एक रोड-शो केला होता. या रोड शो नंतर पत्रकारासोबत बोलताना संबित पात्रा यांनी

    “भगवान श्री.जगन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त आहेत”

    असे विधान केले होते. या विधाना वरुन पात्रा विरोधकांच्या घेरावात सापडले होते.विरोधकांच्या टिके सोबतच पात्रा यांच्या विधानाला सामान्य लोकांनी सुध्दा विरोध दर्शवला होता आणि समाज माध्यमा वर लोक संबित पात्रा यांच्या वक्तव्या वर नाराजी व्यक्त करत होते.

    केवळ ओडिशाच नाही तर संपूर्ण देशातील लोक भगवान जगन्नाथाची पूजा करतात. करोडो लोकांची त्याच्यावर श्रद्धा आहे. भगवान जगन्नाथ यांना राजकारणात ओढू नका, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भाजपाला उद्देशून म्हटले होते. जगभरातील करोडो जगन्नाथ भक्त आणि उडिया लोकाच्या श्रद्धेला धक्का बसल्याचेही त्यांनी म्हटले होते. नवीन पटनायक यांच्या ‌ट्विटवर संबित पात्रा यांनीही स्पष्टीकरण दिले.

    “आपली सर्वजण बोलताना कधी ना कधी चुकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पुरीतील रोड शोला मिळालेल्या प्रचंड यशानंतर मी अनेक मीडिया चॅनेल्सना बाईट्स दिल्या त्यात सर्व ठिकाणी मी मोदीजी श्री जगन्नाथ महाप्रभूचे महान भक्त असल्याचा उल्लेख केला. मात्र चुकून मी एका ठिकाण याच्या उलट बोललो. तुम्हालाही हे माहीत आहे आणि समजले आहे, हे मला माहीत आहे. त्यामुळे कृपया याचा मुद्दा बनवू नये.”

    संबित पात्रानी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण देत संबित पात्रा यांनी पंतप्रधान हे भगवान जगन्नाथ यांचे कट्टर भक्त आहेत. आसे बोलताना चुकून भगवान श्री.जगन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त आहेत असे विधान माझ्या कडून बोलले गेले.या विधानामूळे मि स्वत: खुप दुखी झाले आहे.

    भगवान श्री.जगन्नाथ यांच्या बदलच्या चूकीच्या विधानाचा पश्चात्ताप करुन भगवान श्री.जगन्नाथ यांच्या चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागतो.आणि माझी चुक सुधारण्यासाठी पुढील तीन दिवस उपवास करुन प्रायश्चित करणार आहे. असे स्पष्टीकरण संबित पात्रा यांनी आपल्या समाज माध्यावर एक विडीओ पोस्ट करुन दिले आहे.

  • अरविंद केजरीवाल यांना तात्पुरता दिलासा; दारुविक्री धोरण (Liquor policy) घोटाळ्याची चौकशी चालूच

    अरविंद केजरीवाल यांना तात्पुरता दिलासा; दारुविक्री धोरण (Liquor policy) घोटाळ्याची चौकशी चालूच…

    अरविंद केजरीवाल यांना अटक का झाली आणि आरोप कोणते या बद्दल सविस्तर माहिती.

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामिन मिळाली आहे. त्याना दारुविक्री धोरण (Liquor policy) घोटाळ्याच्या प्रकरणी २१ मार्चला अटक करण्यात आले होते. लोकसभा निडणूकीसाठी केजरीवाल यांना जामीन मिळावी अशी विनंती आम आदमी पार्टी कडुन न्यायालयाला केली गेली होती. पण जामिन मिळत नव्हती. परंतू न्यायालयानी लोकसभा निवडणूक लक्षात घेवून १ जुन पर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामिन मंजूर केली आहे. आणि मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिकाही फेटाळून लावली आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल हेच राहणार असल्याचं आता स्पष्ट झाले आहे.

    अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर दारुविक्री घोटाळा नेमका काय आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालाय. दिल्ली सरकारने 17 नोव्हेंबर 2021 ला राजधाणीत दारुविक्रीबाबत नवीन धोरण लागू केलं. या नव्या धोरणानुसार राज्यात 32 झोन बनवण्यात आले, आणि प्रत्येक झोनमध्ये जास्तीत जास्त 27 दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली. या अनुषंगाने एकूण 849 दुकानं उघडणार होती. या नव्या धोरणानुसार दिल्लीतील सर्व दारुची दुकानं खासगी करण्यात आली होती. त्याआधी 60 टक्के दुकानं हे सरकारी होती तर 40 टक्के दारुची दुकाने प्रायव्हेट(खाजगी) होती. पण नव्या दारुविक्री धोरणामुळे 100 टक्के दुकानं ही प्रायव्हेट झाली. या नव्या धोरणामुळे सरकारला 3500 कोटी रुपयांचा फायदा झाला, असा दावा सरकारने केला.

    विशेष म्हणजे सरकारने दारुविक्रीच्या परावानासाठी लागणारी फी (शुल्क) देखील वाढवली. ज्या विक्रेत्याला एल-1 परवाना हवा त्याला आधी 25 लाख रुपये द्यावे लागायचे. पण नव्या धोरणानुसार ठेकेदाराला तब्बल 5 कोटी रुपये द्यावे लागले. तसेच इतर प्रकारच्या कॅटेगीरीच्या परवानासाठी देखील फी वाढवण्यात आली.

    त्याचा फटका छोट्या दुकानदारांना मोठा बसला. फी वाढल्यामुळे छोटे दारुविक्रेते तितके पैसे भरु शकले नाहीत. त्यामुळे त्याचा थेट फायदा मोठ्या गडगंज संपत्ती असणाऱ्या दारुविक्रेत्यांना झाला. मोठे दारुविक्रेत्यांनाच परवाना मिळू लागला . त्यामुळे या मोठ्या दारुविक्रेत्यांनी परवाना मिळावा यासाठी आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठी रक्कम लाच म्हणून दिली असा आरोप विरोधकांकडून केला जात होता.

    अशातच ED ने दारुविक्री धोरण घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांना अटक केले आहे. यामध्ये आपचे नेते, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे अद्यापही तुरुंगात आहेत. खासदार संजय सिंह यांच्यावरही कारवाई झालेली आहे. तसेच बीआरएसच्या नेत्या के.कविता यांनाही या प्रकरणात अटक झाली असून त्याही तुरुंगात आहेत.

    काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक झाली. सध्या ते अंतरिम जामीनावर बाहेर आहेत. मात्र, दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून यातील काही पैसे गोवा विधानसभेच्या निवडणुकीत वापरले असल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरू आहे. तर हे सर्व आरोप आम आदमी पक्षाच्यावतीने फेटाळून लावण्यात आलेले आहेत.

  • सरकार अल्पमतात असले तरी हरियाणा मध्ये पुढील सहा महिने भाजपाचं सत्तेत राहाणार..!

    लोकसभेच्या निवडणुका चांगल्याच रंगल्या आहेत. अशातच हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात आले आहे. अशा बातम्या पुढे येत आहेत.

    हरियाणात एक महिना आधिच भाजपा जेजेपी सरकार पाडुन भाजपने अपक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. मात्र महिनाभरातच भाजपा सरकार धोक्यात आले आहे. भाजपा सोबत असलेल्या तीन अपक्षांनी भाजपाचा पाठींबा काडुन घेतल्याने सरकार अल्पमतात आले, असे बोलले जात आहे.

    शेतकर्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी आणि इतर समस्यांमुळे पाठिंबा काढून घेतल्याचं या नेत्यांनी सांगीतले आहे. याचा फायदा घेत भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

    सोमवीर सांगवान, रणधीर गोलन, धरमपाल गोंदर यांनी रोहतक येथे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या उपस्थित पत्रकार परिषद घेवून पाठिंबा काढून घेतल्याची माहिती दिली. आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रसचे समर्थन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

    हरियाणात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. बहुमत मिळवण्यासाठी ४६ जागा असणे आवश्यक आहे.

    परंतु हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि INLD चे अभय चौटाला लोकसभा लढवत असल्याने आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभेच्या एकूण ९० सदस्य संख्या, ८८ झाली आहे आणि बहुमतासाठी ४५ सदस्याची गरज आहे.

    परंतु भाजपाकडे सद्या ४३ सदस्य आहेत. यात भाजपाचे ३८ हरियाणा लोकहित पार्टीचा १ आणि ४ अपक्षांचा पाठिंबा आहे. बहुमताचा आकडा ४५ आहे आणि भाजपा कडे ४३ सदस्य आसल्याने बहुमत नसल्याचे स्पष्ट होते.

    काँग्रसकडे विधानसभेत ३१ जागा आहेत. तीन अपक्ष आमदारांनी पाठींबा दिला आहे, असे काँग्रसकडे ३४ सदस्य आहेत. म्हणजे दोन्ही मोठ्या पक्षाकडे बहुमत नाही. म्हणुनच काँग्रसने राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.

    परंतु देशभरात लोकसभा निवडणुक चालु असल्याने विधानसभा सत्र बोलावले जावू शकत नाही. त्यामुळे ४ जुन नंतरच विधानसभा सत्र बोलावले जावू शकते.

    त्यामुळे ४ जुन पर्यंत भाजपला बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही. परंतु ४ जुन नंतर विरोधी पक्ष भाजपाला बहुमत सिद्ध करण्याची मागणी करु शकते. मात्र हरियाणात १३ मार्चला (२०२४) विश्वास दर्शक ठराव मांडण्यात आला होता.

    त्यामुळे पुन्हा ६ महिने विश्वास दर्शक ठराव मांडता येत नाही. म्हणजे भाजपा सरकारला धोका नसल्याचे दिसुन येत आहे. परंतु ६ महिन्या नंतर जेजेपी कोणत्या पक्षाचे समर्थन करेल यावर हरियाणात सत्तेचं गणित जुळेल.

  • बीड मध्ये कोण मारणार बाजी?

    बीड मध्ये कोण मारणार बाजी?

    बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे अशी लढत रंगली आहे.

    बीड मतदारसंघावर २००९ पासून भाजपचे वर्चस्व आहे. गोपीनाराव मुंडे यांच्या निधनानंतर डॉ. प्रीतम मुंडे यांनी राजकारणात पदार्पण केलं आणि प्रचंड बहुमतानी त्या निवडुन आल्या. २०१९ मध्ये त्यांनी बजरंग सोनवणे यांना पराभूत केले.

    या वेळेस प्रीतम मुंडे यांच्या जागेवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु दोनवेळा खासदार राहीलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी का टाळली? पंकजा मुंडेला उमेदवारी का मिळाली? याचे उत्तर देताना पंकजा मुंडेंची कोंडी होत आहे. याच बरोबर मागील १० वर्षात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी बीडचा हवा तसा विकास केलेला नाही. त्यामुळे मतदारांची भाजपावर नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

    परंतु महायुतीत परळीतून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, केजमधून भाजपाच्या नमिता मुंदडा, माजलगावमधुन प्रकाश सोळंके, गेवराईतून भाजापचे लक्ष्मण पवार व आष्टीतून बाळासाहेब आजबे यांच्यासह विधान परिषदेचे सुरेश धस असे एका मंत्र्यांसह सहा आमदार पंकजा मुंडेंसाठी मैदानात आहेत.

    ही पुर्ण सत्ता फौज जरी मैदानात असली तरी विधानसभेवेळी एकमेकांच्या विरोधात लढलेले आणि पुन्हा लढायचे असल्याने या नेत्यांत एकमत नाही. विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचा जिल्ह्याशी कमी झालेला संपर्क, बंद पडलेला बैद्यनाथ कारखाना, या मुद्द्याचा फायदा विरोधीपक्षाला होताना दिसतोय.

    बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरताना जयंत पाटील म्हणाले,

    ‘‘आमच्याकडे नेते जास्त नाहीत, पण जनता आमच्याकडे आहे. सलग पंधरा वर्षे भाजपची सत्ता असताना ते जिल्ह्याचा विकास करू शकले नाहीत. जिल्ह्यातील जनतेने दिलेल्या जबाबदाऱ्या भाजप पेलू शकला नाही.‘जीएसटी’ने शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य जनता हैराण झाली आहे. आतापर्यंत देशात काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी केलेल्या विकासाला शून्य ठरविण्याचे कटकारस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. भाजपच्या नेत्यांनी टीकाटिपणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बोलावे.” असे आव्हान त्यांनी दिले.

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या मागे केवळ या पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर एकमेव आमदार आहेत. तसेच इतर माजी आमदारांचा पाठींबा बजरंग सोनवणे यांना मिळत आहे. २०१९ मध्ये पराभवाला सामोरे जावं लागल होत. या वेळेस निवडुन यायचे असेल, तर खुप कसरत करावी लागणार आहे.

    एकवीस लाखांवर मतदार असलेल्या बीड जिल्ह्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्यामुळे अंतरवाली सराटी येथील आंदोलनाचे सर्वाधिक पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत. आंदोलनाचे २०० पेक्षा जास्त गुन्हे नोंद झाल्याने सकल मराठा समाज नाराज आहे.

    याचा फायदा नक्कीच बजरंग सोनवणे यांना होणार आहे. परंतु मराठा समाजातील काही दिग्गज नेत्यांचा पंकजा मुंडे यांना पाठींबा आहे. त्यामुळे बिडचे राजकारण कधी कसे पलटेल? हे सांगणे कठीण आहे.

    पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे या दोघांची लडत रंगली असताना ‘वंचित’ ने अशोक हिंगे यांना रिंगणात उतरवले आहे.

    बीड जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला, तर चिंताजनक परिस्थिती आहे. मागील २० वर्षात एकही औद्योगीक वसाहत स्थापन करण्यात आली नाही. उलट अनेक उद्योग बंद पडले आहेत आणि बंद पडत आहेत. नगर- बीड- परळी रेल्वेमार्गही पुर्ण झाले नाही, अनेक खेडे गावात रस्ते नाहीत, जिल्ह्यात झालेले महामार्ग अरुंद झाल्याने आपघाताचे प्रमाण वाढले आहेत.

    आत्ता लोकभा निवडणुकीत हे आश्वासनासाठी कळीचे मुद्दे बनले आहेत. अशा परिस्थितीत बीड मध्ये २००९ पासुन सत्ता गाजवणारे कमळ सत्तेत येईल की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी सत्तेत यईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

  • पंकजा मुंडेंची जातीच्या आधारे राजकीय खेळी!

    पंकजा मुंडेंची जातीच्या आधारे राजकीय खेळी!

    बीड लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येवुन ठेपली आहे. आणि अशातच या लोकसभा निवडणुकीने वेगळेच वळण घेतले आहे. आधी प्रितम मुंडेंची उमेदवारी रद्द करुन पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली, म्हणुन चर्चा होती. परंतु आत्ता या निवडणुकीत ओबीसी विरुध्द मराठा असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा बीड लोकसभा निवडणुक चर्चेचा विषय बनली आहे.

    मराठा समाज बजरंग सोनवणे यांना समर्थन देत आहे. परंतू पंकजा मुंडे सोबत रमेशराव आडसकर, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा असे मराठा नेते आहेत. परंतु हे नेते जरी असले तरी या मतदारसंघात मराठा समाजाची पंकजा मुंडे वरची नाराजी महायुती साठी चिंतेचा विषय बनत चालली आहे.

    मराठा समाजातील मतदार पंकजा मुंडेंना प्रचारा दरम्यान काळे झेंडे दाखवून विरोध करताना दिसत आहे. अशातच पंकजा मुंडे अपला उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करत,

    “सर्वच समाज माझ्या उमेदवारीचे स्वागत करत आहे. बंजारा समाजानी पांमडी देवुन, धनगर समाजानी घोंगडी देवुन हातात काठी देवुन, मराठा समाजाने भगवा लावुन आणि पगडी बांधुन माझे स्वागत केले आहे.

    परंतु त्यांनी पुढे बोलताना

    “सगळ्या समाजाचे लोक आलेत ना इथे” असे विचारत “धनगर समाजाचे लोक आलेत ना त्यांनी येळकोट… येळकोट…. जय मल्हार बोला, बंजारा समाजाचे लोक आलेत ना त्यांनी जय सेवालाल बोला, माळी समाजाचे लोक आलेत त्यांनी जय ज्योती बोला”, अशा घोषणा देवुन शेवटी “मराठा समाजाचे लोक आलेत ना?” अस विचारत “छत्रपती का आमचे नाहित का?” असा प्रश्न करत, जय जिजाऊ जय शिवराय आशा घोषणा दिल्या आणि “तुम्ही माझ्या साठी मत मागा आणि माझ्या झोळीत टाका”

    असे आव्हान पंकजा मुंडेंनी यांनी मतदारांना केले. त्यामुळे मराठा समाजाचे मत मिळवण्यासाठी पंकजा मुंडे जातीचा आधार घेत आहेत, अशी टिका विरोधक करत आहेत. त्यांच्या भाषणाने आणि घोषनेने मराठा समाजाची नाराजी दुर होइल का? आणि पंकजा मुंडे निवडुन यातील का? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

  • लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आणि राजकीय परिस्थिती.

    लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आणि राजकीय परिस्थिती.

    लोकसभा निवडणुक २०२४ चा दुसरा टप्पा नुकताच पार पडला. यामध्ये देशातील ८९ आणि महाराष्ट्रातील आठ मतदारसंघाचा समावेश होता. यात मराठवाड्यातील तीन आणि उर्वरीत ५ मतदारसंघ विदर्भातील होते. गेल्या १० ते १२ दिवसात येथे प्रचार खुप जोरात चालू होते. महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी येथे जाहिर सभा घेतल्या आणि एकमेकावर जोरदार टिकाही केल्या. या मतदारसंघातील राजकीय वातावरण एकदम तापले होते. या आठ मतदारसंघामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, परभणी, नांदेड या मतदारसंघीचा समावेश आहे.

    अमरावती लोकसभेसाठी भाजपाच्या नवनीत राना काँग्रसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर झाली होती. यांच्यात तिरंगी निवडणुक पार पडली. सोबतच रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर सुध्दा मैदानात होते. त्यामुळे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मत विभागणी झाली असल्याचे दिसुन येते. येथील दलीत आणि मुस्लीम मतदारांचे मत निर्णायक ठरणार आहेत.

    नवनित राणाला हनुमाण चालीसावर घेतलेली भुमीका बादक ठरणार की त्यांच्या फायद्याचे ठरणार हे पाहावे लागेल. बच्चु कडु महायुतीचा भाग आहेत परंतू त्यांनी दिनेश बुब यांना मैदानात उतरवले आहे त्यामुळे ही निवडणुक आव्हानात्मक झाली. मुख्यता नवनित राणांना याचा फटका बसनार आहे. येथुन काँग्रसचे बळवंत वानखेडे उमेदवार असले तरी यशोमती ठकुर यांचा वानखेडेंना पाठींबा आहे आणि त्याच्या राजकीय ताकदीचा वानखेडेंना फायदा होईल असा अंदाज आहे.

    बुलढाणा मतदारसंघातुन शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट अशी मुख्य लडत झाली आहे. शिंदे गटाकडुन प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाकडुन नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. हि लडत ठाकरे गटाच्या अस्थित्वाची आहे. या मतदारसंघात आदित्य ठाकरे आणि उदध्व ठाकरे यांनी सभा घेऊन मतदारांचा कल आपल्याकडे वळवला आहे. याच बरोबर येथे अपक्ष म्हणुन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि वंचीत बहुजन आघाडी कडुन वसंत मगर यांची भुमीका सुध्दा महत्वपुर्ण असणार आहे.

    यवतमाळ-वाशीम मतदारसंघातुन सुद्धा शिनसेना ठकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आशी मुख्य लडत होणार झाली आहे. शिवसेना शिंदे गटा कडुन राजश्री पाटील आणि शिनसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यात थेट लडत झाली आहे. विधेमान खासदार भावना गवळी यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली त्यामुळे मतदार नारज होते याचा फटका शिंदे गटाला बसेल असा अंदाज लावला जातोय.

    वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे रामदास तडस विरुध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अमर काळे यांच्यात लडत झाली आहे. तडस येथुन दोनवेळा खासदार राहिले आहेत. हा मतदारसंघ परंपरागत काँग्रसचा होता परंतू या वेळेस शरदचंद्र पवार गटाला इथे उमेदवारी देण्यात आली आहे. पुजा तडस यांनी केलेल्या अत्याचाराच्या अरोपामुळे रामदास तडस या स्पर्धेत मागे पडु शकतात. परंतु पंतप्रधानांनी इथे सभा घेतल्यांनी निकाल कोणाच्या बाजुने लागल हे सांगने कठीन आहे.

    अकोला मतदारसंघातुन भाजपाचे अनुप धोतरे, वंचीतचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील अशी तिरंगी निवडणुक झाली. इथे सद्या भाजपाचे संजय धोतरे खासदार असुन गेल्या चार टर्म पासुन ते सलग निवडुन येत आहेत. त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे भाजपानी त्यांच्या जागी त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. तर प्रकाश आंबेडकर काँग्रेसला पाठिंबा देनार होते परंतु काँग्रेसनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे याचा परिनाम दोघांच्याही मतदारावर होणार आहे परंतु एमआयएम प्रकाश आंबेडकरांच्या मदतीला आले आहे.

    नांदेड मतदारसंघामध्ये भाजपाचे विधेमान खासदार प्रतापराव पाटील चिकलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हान यांच्यात थेट निवडणुक होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासुन या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते परंतु हे मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून निसटले आहे, कारण काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हान भाजपात गेल्या मुळे काँग्रेसला फटका बसनार आहे आणि वंचीतचा पगडा पण इथे जड दिसत नाही.

    परभणी मध्ये ठाकरे गटाचे बंडु जाधव आणि विरुध रासपचे माहादेव जानकर अशी दुरंगी लडत झाली आहे. बंडु जाधव हे खासदारकीची हॅट्रिक मारण्यासाठी मैदानात उतरले होते. तर माहादेव जानकर हे अजित पवार यांच्या कोठ्यातून उमेदवारी मिळवत मैदानात उतरले होते. परंतु ते मुळचे सातारा जिल्ह्यातले असल्याने जनतेचा कल विरोधी पक्षाकडे असल्याचा अंदाज येतो.

    हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश आष्ठीकर आणि शिंदे गटाचे बाबुराव कदम कोळीकर अशी लडत झाली. विधेमान खासदार हेमंत पाटिल यांची उमेदवारी रद्द करुन शिंदे यांनी बाबुराव कदम यांना मैदानात उतरवले त्याचा फटका शिंदे गटाला बसु शकतो आणि ठाकरे गट इथे बाजी मारु शकतो.

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शेतकरी कल्याणाला प्राधान्य देणारा शपथनामा..

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शेतकरी कल्याणाला प्राधान्य देणारा शपथनामा…

    लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. या जाहीरनाम्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी हिताच्या घोषणा केल्या आहेत, घरगुती गॅस ५०० रुपयांपर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आणण्यासाठी विशेष अनुदान आणि जातिनिहाय जनगणना करण्यावर भर देणार असल्याचेही यात नमूद केले आहे. याबरोबर देशासह राज्यातील महिला, विद्यार्थी, आदिवासी, तरुण, पर्यावरण अशा विविध घटकांना रोजगार, सुरक्षितता आणि हक्क देण्यासाठी संबंधित प्रश्‍नांना या जाहीरनाम्यात स्थान देण्यात आले आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पक्षाचा शपथनामा (जाहीरनामा) गुरुवारी प्रकाशित करण्यात आला. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार वंदना चव्हाण, प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, युवक आघाडीचे मेहबूब शेख या वेळी उपस्थित होते. या जाहीरनामा ‘शपथनामा’ असे संबोधन्यात आले आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शपथनाम्याती महत्वपुर्ण घोषणा…

    1. शेतकऱ्यांसाठी आधारभूत व्यवस्था निर्माण करणार.
    2. दर पाच वर्षांनी जातिनिहाय जनगणना करणार.
    3. एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा वाढविण्यासाठी घटनेत दुरुस्तीची मागणी.
    4. आरोग्य, शिक्षण, सशस्त्र दल अशा विभागांतील ३० लाख रिक्त जागा भरणार.
    5. कांदा दरात स्थिरता आणण्यासाठी आयात-निर्यात धोरण आखणार.
    6. स्वतंत्र ‘जीएसटी’ परिषद स्थापना.
    7. स्वयंपाक घरातील गॅसच्या किंमती आम्ही कमी करत त्या 500 रुपयांपर्यंत निश्चित करू. त्यासाठी आवशक्यता लागल्यास केंद्र सरकारकडून त्याला सबसीडी देईल.
    8. शासकीय नोकरीत महिलांना 50 टक्के आरक्षण ठेवण्याचा आग्रह करू.
    9. अग्निवीर योजना आम्ही बंद करू.
    10. प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ.
    11. शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी असणार.

    अजित पवारांनी बहुतांश आमदारांना सोडून भगव्या पक्षाशी (भाजपा) हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. काका शरद पवार यांना मोठा धक्का बसला, अजित पवार यांनी अनेक आमदारांच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यामुळे पक्षात फूट पडली. त्यामुळे लेकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष किती जागा जिंकलं या कडे जनतेचे लक्ष आहे.

  • अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा वचननामा!

    अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा वचननामा!

    देशाचं राजकारण एका बाजूला आणि महाराष्ट्राचं राजकारण एका बाजूला आशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात अनेक घडामोडी घडल्या आणि राजकारणात टिकुन राहाण्यासाठी अस्तित्वाची लढाई चालू झाली.

    लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकुन आपल्या अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्राची लूट थांबवणे, रोजगारनिर्मिती आणि शेतकरी कर्जमाफी यावर या जाहीरनाम्यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ठाकरेनी या जाहीरनाम्याला ‘वचननामा’ असे नाव दिले आहे.

    ठाकरे म्हणाले की,

    “गुजरातमध्ये हलवण्यात आलेले आर्थिक शहर महाराष्ट्रात बांधले जाईल, ज्यामुळे राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील”.

    याच बरोबर ठाकरे यांच्या वचननाम्यात शेतकरी वर्ग, उद्योगधंदे, आरोग्य व्यवस्था,जीएसटी करप्रणाली यांसंबंधी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच ठाकरे यांनी अपला जाहीरनामा प्रसिध्द करताना भाजपा वर सडकून टिका सुद्दा केली.

    ठाकरेंच्या वचननाम्यातील महत्त्वाचे मुद्दे..

    • संविधानाचं रक्षण करणं, हे आमचं प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी आम्ही काम करणार.
    • गिफ्ट सिटी गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राची स्थापना स्थापन करणार.
    • महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात जाऊ नयेत, यासाठी इतर राज्यांपेक्षा चांगल्या उद्योगस्नेही योजना आणि सुविधा देणार.
    • राज्यात आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार.
    • बेरोजगारी, शेतकरी, महिला, उद्योग या मूलभूत मुद्द्यांवर आम्ही काम करणार.
    • शेतकऱ्यांना लागणारी खतं, बी-बियाणं जीएसटीमुक्त करणार.
    • शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.
    • आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून अधिक वाढविण्यासाठी आग्रही राहणार.
    • देशात हुकूमशाही आणि एकाधिकारशाही माजू नये म्हणून संघराज्य पद्धती अधिक बळकट करू.
    • सध्या सुरू असलेल्या कर वसुली प्रणालीत सुधारणा करणार.
    • शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, जंतूनाशक औषधे, खते, औजारे इत्यादींवरील जीएसटी मुक्त करणार.
    • शेती व शेतकरी हिताय पीकविमा योजनेचे पुनर्वलोकन आणि सुधारणा करणार.
    • किमान ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढील ५ वर्षे स्थिर ठेवणार.

    याच बरोबर

    “महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवले जात आहेत.आधी हिरे व्यापार पळवले, त्यानंतर क्रिकेटचा सामना, फिल्मफेअर कार्यक्रम अशा सर्वच गोष्टी पळवल्या जात आहेत. महाराष्ट्राचं वैभव लुटलं जात आहे. पण ही लूट आम्ही इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर थांबवणार”

    असल्याचा शब्द ठाकरेंनी या दिला आहे. आणि आशीर्वाद असू द्या असे जनतेला आवाहन देखील केले.

    हे ब्लॉग तुम्ही वाचले का ?

  • बंधुत्व असलेल्या देशात हिंदुत्वाच्या आधारे भाजपा ४०० पार जाईल का?

    बंधुत्व असलेल्या देशात हिंदुत्वाच्या आधारे भाजपा ४०० पार जाईल का?

    भारतात लोकशाही पध्दतीने निवडणुका होत असल्या तरी जाती व धर्मावर आधारीत राजकारण करणं भारतात नविन नाही. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी महिन्यात राम मंदिरा मध्ये भगवान रामाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आणि मंदीर सामान्य लोकांसाठी खुले करण्यात आले. कारण यामागे भाजपाचा येणार्या लोकसभा निवडणुकीत हिंदु मतदार आपल्या कडे खेचले जातील. हा प्रयत्न होता. परंतु राम मंदीर जरी भाजपचे २०२४ च्या निवडणुकीतील मुख्य मुद्दा असला तरी त्याचा प्रभाव जनतेमध्ये जास्त पडलेला दिसत नाही. “भाजपाची विचारसरणी ही हिंदुत्ववादी आहे.” असे बोलले जात असले तरी फक्त “हिंदुत्व” या मुद्यावर या निवडणुकीत निवडुन येणं कठीण आहे.

    अशातच पंतप्रधाण नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम विरोधी भाष्य केले आहे. “काँग्रस सत्तेत आल्यावर सर्वसामान्य लोकांची संपती मुस्लीम लोकांना वाटेल” अशी टिका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामुळे हिंदु-मुस्लिम हा मुद्दा खुप पेटला आहे. भाजपने नेहमीच निवडणुका जिंकण्यासाठी धर्माचा आधार घेतला आहे. परंतु हिंदुत्व हे मनात असले पाहिजे आणि देशात बंधुत्व असले पाहिजे. यामुळे भाजपाचे धर्मावर आधारीत असलेले राजकारण जास्त दिवस चालणार नाही. भारतात सत्तेत यायचं असेल तर त्या साठी देशाचा विकास हा एकमेव पर्याय आहे.

    भारत हे हिंदू राष्ट्र आहे. भारताला इंडिया ऐवजी हिंदुस्तान म्हणुन संबोधले पाहिजे. यावर राजकारण करण्यात आले. संविधानात बदल करण्यावर राजकारण करण्यात आलं. परंतु बेरोजगारी, महागाई अशा महत्त्वपुर्ण मुद्यांकडे भाजपाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. या देशात निवडुन येण्यासाठी धर्माचा आधार घेणं लोकशाहीसाठी घातक ठरु शकते. पक्ष हा कोणत्या धर्माचा नसला पाहिजे. पक्ष धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. धर्मावर राजकारण चालु असताना, भाजपने “४०० पार” ची जी घोषणा केली आहे, या विरोधात काँग्रसने “संविधान बचाव” ची घोषणा केली आहे. असे लोकसभा निवडणुकीचे राजकारण रंगले आहे. यात हिंदुत्ववादाच्या जोरावर भाजपा किती जागा जिंकेल आणि निकाल काय लागेल याकडे सर्वाचे लक्ष आहे.