मंडळी राजकारण म्हटलं की निवडणुका येतात आणि निवडणुका जातात. उमेदवार उभे राहतात. काही जिंकतात तर काहींचा पराभव होतो. आणी या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावत असते ती म्हणजे सर्वसमान्य जनता.
मात्र ही जनता अशाच लोकांना लक्षात ठेवून मतदान करत असते जो उमेदवार त्यांच्यासाठी नेहमी हजर असतो. त्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचवून त्याचा योग्य तो पाठपुरावा करून त्या प्रश्नांना सोडवण्याचं काम करत असतो.
होय मंडळी. आपल्याला माहिती असेल की सध्या विधानपरिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीने चांगलाच जोर धरला आहे.
ज्यामध्ये अमरावती पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून धीरज लिंगाडे आणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तसेच अमरावती पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. रंजित पाटील व वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. अनिल अंमलकार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मात्र सर्वात महत्वाची बाब अशी की वंचितच्या डॉ. अनिल अंमलकरांचा विजय मतदान होण्यापूर्वीच निश्चित मानला जात आहे.
सामुहीक विवाह परिचय संमेलनाचे आयोजन करून गोरगरीबांना मदत करणारे डॉ. अमलकार
मंडळी बऱ्याचदा एखाद्या कुटुंबाला आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह करायचा असला की भरघोस पैशांची गरज असते. मात्र हलाकीच्या परिस्थितीपोटी काही कुटुंबांचं हे स्वप्न अपूर्ण राहून जात.
पण ही बाब बुलढाणा जिल्ह्यातील डॉ. अनिल अमलकार यांना सतत छळत होती. यावर उपाय म्हणून त्यांनी आपल्या स्वखर्चातून गोरगरीब युवक युवतींसाठी सामूहिक परिचय विवाह सोहळ्याचे आयोजन करून हजारो कुटुंबांना खूप मोठा दिलासा दिला.
ज्यामुळे डॉ. अनिल अंमलकार तरुणांच्या गळ्यातले ताईत झाले. परिणामी येत्या ३० जानेवारी २०२३ ला होणाऱ्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पदवीधरांना आपल्या समाजिक आर्थिक आणी शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी डॉ. अनिल अमलकार हा एकमेव परिचय वाटू लागले आहे.
सध्या डॉ. अमलकरांच्या प्रचाराने चांगलाच जोर धरला असून अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशीम या सर्व जिल्ह्यातील पदवीधरांची गर्दी त्यांच्या प्रचारामध्ये सामील होत आहे.
ज्याचा मोठ्या प्रमाणात फटका भाजप आणी काँग्रेसला बसला असून अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. अनिल अमलकारांचा विजय निश्चित मानल्या जात आहे.
©copyright politicalwazir.in