Category: राजकीय व्यक्ती

  • पुण्याच्या चौरंगी निवडणुकीत कोणाचा विजयीरंग उडेल?

    पुण्याच्या चौरंगी निवडणुकीत कोणचा विजयीरंग उडेल?

    पुणे लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील एक महत्वपुर्ण मतदारसंघ आहे. पुण्यातील निवडणुक नेहमीच चर्चेचा विषय बनत असते. या वर्षी तर पुण्यातील ही निवडणुक लढत चौरंगी होणार आहे. या चौरंगी निवडणुकीत भाजप कडून मुरलीधर मोहळ, काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर, वंचीत कडून वसंत मोरे आणि एमआयएम कडून अनिस सुंडके हे चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. आधी पुण्यामध्ये तिहेरी निवडणुक लढली जाणार अशी चर्चा होती. परंतु एमआयएम कडून माझी नगरसेवक अनिस सुंडके हे २५ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    यामुळे मुस्लीम मतदारांची संख्या अनिस सुंडके यांच्या बाजूने मत देतील आणि दलित मतदारांचा कल वसंत मोरे यांच्या बाजूने असेल असा अंदाज लावला जात आहे. याचा फटका नक्कीच रवींद्र धंगेकरांना बसणार आहे. एमआयएमला पुण्याच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यामागे भाजपाचा हात आहे. अशी टिका काँग्रेस कडून केली जात आहे. वंचितने महाविकास आघाडीत सहभागी न होता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यातील दलित आणि मुस्लीम मतांची विभागणी होणार असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु गेल्या वर्षी भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासणे यांना पराभूत करुण विजय मिळवला होता. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेशी युती करून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु भाजपचा प्रचार करणारे डझनभर राज्यमंत्र्यांनाही भाजपच्याच बालेकिल्ल्यात मते मिळवण्यात अपयश आले होते.

    गेल्या वर्षीच्या कसबा पोटनिवडणुकीत जरी धंगेकर निवडुन आले असले तरी २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत भाजपानी सलग दोन वेळा विजय मिळवला होता. याचा मुरलीधर मोहोळांना नक्कीच फायदा होणार आहे. पुणे महापालिकेत नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौरपद या पदाची मुदत संपताच पक्ष संघटनेत सरचिटणीस अशी गेल्या ५-६ वर्षांत मुरलीधर मोहोळांनी राजकीय छाप पाडली आहे. महापौरपदी असताना मोहोळांनी केलेल्या कामामुळे जनता खुष आहे. पण या चौरंगी निवडणुकीत जिंकायचे असेल तर अजुन खुप मेहनत करावी लागणार आहे. पुण्यात मुस्लीम धर्मीयांची संख्या आणि दलितांची संख्या सुध्दा खुप जास्त आहे. या मतदारांचे मत निर्णायक ठरणार आहेत.

    चारही उमेदवार कंबर कसून निवडणुक मैदानात उतरले आहेत. “पुण्याच्या विकासा साठी एकदा संधी द्या” असा सुर सर्व उमेदवारांनी लावला आहे. परंतु अंतीम निर्णय जनतेचाच आहे. पुण्याच्या भविष्याची दोरी कोनाच्या हाती द्यायची, याचा योग्य निर्णय आता जनता घेईल.

  • “जन जन कि पुकार ठाकरे सरकार” नारा देत संपूर्ण महाराष्ट्रभरात सायकलने निष्ठा यात्रा काढणारा निहाल पांडे कोण आहे ?

    युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या माध्यमातून सामान्य, कष्टकरी, शेतकरी, अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेला सामाजिक चळवळीतील पुढाकार हा अनेकांच्या विश्वासाचा केंद्रबिंदू ठरला.

    वर्धा शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी केलेले लाक्षणिक स्वच्छता आंदोलन सलग २ महिने १९ प्रभागात राबवून शहर स्वच्छ व सुंदर केले. वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे मिळावे यासाठी धरणे आंदोलन, अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले पण निष्ठुर सरकार पुढे जेव्हा प्रयत्न अपयशी ठरले तेव्हा मात्र वर्धा ते नागपूर सचिवालय पर्यंत ८३ किलोमीटरचा पायदळ प्रवास करून “भुदेव यात्रा” काढत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

    केंद्र सरकारला जाग करण्यासाठी “महादेव यात्रेच्या” माध्यमातून सायकलने सेवाग्राम ते दिल्ली प्रवास करून वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून दिला व हक्काचा घरपट्टा मिळवून दिला.

    सामान्य जनतेच्या हितार्थ वेळोवेळी कर्तव्यतत्परतेने न्याय मिळवून देण्यासाठी युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष मा.श्री.निहालभाऊ पांडे यांचे नेतृत्व हे सामान्य जनतेच्या हितार्थ सदैव राबणारे युवा नेतृत्व आहे.

  • निष्ठावंत निहाल – गद्दारांच्या छाताडावर शिवसेनेची निष्ठा

    महाराष्ट्र म्हणजे अनेक स्वातंत्र्य योध्ये, क्रांतिकारी, जन चळवळींचे माहेरघर. भारताची वैचारिक घडी बसवणारे, विविध वैचारीक आघाड्यांना आपल्यात सामावून घेणारे, आध्यात्मिक परंपरा जोपासणारे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्राची ही परंपरा अनेक तरुण आपापल्या परीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात.
    आज आपण अश्याच एका तरुणाबद्दल जाणून घेणार आहोत. निहाल पांडे त्यांचं नाव.

    निहाल पांडे हे वर्धा येथील आहेत. महिलांच्या, युवकांच्या आणि वर्ध्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आणि त्या प्रश्नांवर उत्तर मिळेपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका घेणार हा तरुण वर्ध्यातील जनतेसाठी आशेचा किरण बनला आहे. वर्धा परिसरात युवकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, महिला बचतगटांच्या काही अडचणी असतील, घरकुल / बेघरांचे प्रश्न असतील, कोणाचे काही कार्यालयीन कामे असतील अश्या प्रत्येक ठिकाणी पुढाकार घेऊन सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न निहाल पांडे करत असतात.

    “युवा… परिवर्तन की आवाज” या त्यांच्या संस्थेमार्फत, विविध समाज उपयोगी कामं निहाल पांडे करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील सातगाव येथील बेघर नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी निहाल पांडे यांनी काढलेली पदयात्रा, सातगाव परिसरातील असंख्य कुटुंबांना आधार देणारी ठरली. नागपूर आणि वर्धा परिसरातील महिला बचतगटांना विविध सोई सुविधा वेळेवर पुरवाव्यात, यासाठी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मोर्चा काढून,घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न शेकडो महिलांनी केला होता. तेव्हा त्या मोर्चाचे नेतृत्व निहाल पांडे यांनी केले होते.

    हे सगळे असले तरी, निहाल पांडे यांच्यावर प्रामुख्याने शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पगडा असून ते माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यशैलीने प्रभावित आहे. निहाल पांडे संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाश झोतात तेव्हा आले, जेव्हा त्यांनी महाभारत यात्रा काढली. ही यात्रा नागपूरच्या रामटेक येथून मातोश्री मुंबई पर्यंतची होती. महाभारत यात्रेचे उद्दिष्ट म्हणजे लोकशाही मूल्यांच्या विरुद्ध होत असलेल्या राजकारणाचा निषेध आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर सामान्य जनतेचा पाठिंबा उध्दव ठाकरे यांना मिळवून देणे हे होते. या यात्रेत लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तसेच यात्रेची दाखल महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख प्रसार माध्यमांनी घेतली होती.

    पण सध्या चर्चा आहे ती निहाल पांडे यांच्या “निष्ठा यात्रेची”. ही यात्रा 23 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वर्धा येथून मार्गस्थ झाली आहे. युवकांच्या, महिलांच्या आणि सामान्य जनतेच्या गावागावांत भेटी घेऊन जनजागृती करत ही यात्रा 31 डिसेंबर रोजी मातोश्री मुंबई येथे पोहचणार आहे. ह्या यात्रेचा मुख्य हेतू बेरोजगारी, महागाई, आरोग्याच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, घरकुल योजनेचा बोजवारा अश्या अनेक प्रश्नांना वाचा फोडणे असा आहे. तसेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जाताय म्हणून महाराष्ट्र हवालदिल झालंय आणि सरकार दिल्लीवारी करण्यात व्यस्त आहे असे अनेक मुद्दे घेऊन सध्याचे शिंदे – फडणवीस – पवार सरकार जनतेवर कसे अन्याय करते आहे आणि त्या तुलनेत उध्दव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे चांगले होते, अशी जनजागृती करत महाभारत यात्रा निघाली आहे.

    तथापी विविध यात्रा, जनआक्रोश मोर्चे, आंदोलने यांच्या माध्यमातून निहाल पांडे सर्वसामान्य जनतेचा आवाज बनत आहेत. हा आवाज भविष्यात विधानसभेत गाजतो की नाही, हे येणारी वेळच सांगेल.

    आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

  • लाल सलाम !

    कॉम्रेड ऐकायला किती मस्त वाटतं ना पण याचा नेमका याचा अर्थ तर ते म्हणजे कॉ.गोविंद पानसरे . त्यांच पूर्ण जीवन हे सामाजिक चळवळीत गेले शालेय जीवनापासून सामाजिक कोणत्याही हक्कासाठी चळवळीकडे आकर्षित झालेले पानसरे .

    हे कोणत्याहि बाबतीत तडजोड न करता शोषितांच्या हक्कासंबंधी लढणारे एक ओळखले जातात सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुरोगामित्वाची दूसरी बाजू म्हणवले पानसरे हे व्यवसायाने वकील होते

    माजी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख – पोलिटिकल वजीर

    तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी  असंघटीत  क्षेत्रातील  लोकासाठी न्यायाचा लढा दिलेला आहे त्यांनी शेतमजूर आणि  घरकामगार आणि इतर लोकांच प्रतिनिधित्व करून कोल्हापुरातील टोलविरोधि आंदोलनात मुख्य सहभाग नोंदवून ते अग्रस्थानी उभे राहिले.

    चळवळीमार्फत न्याय देणारे पानसरे यांना साहित्यीक क्षेत्रात आवड  असल्या कारणाने लेखक म्हणून सुद्धा ओळखले जातात शांतता आणि धर्मनिरपेक्षताच्या धोरणाचा अवलंबन  करणारे

    पानसरे यांच्या अनेक लेखनापैकी  ‘शिवाजी कोण होता’ हे सुप्रसिध्द  लेखन  जबाबदार आणि इतिहासाशी इमान ठेवणारी महाराजांची प्रतिमा समाजापुढे उभी करते.

    २००३च्या महाबळेश्वर अधिवेशनात अस काय घडलं की ठाकरे घराण्यात फूट पडली?

    आपल्या  सखोल अभ्यासू वृत्तिने  समाजाला ओळख करून देणारे पानसरे हे अनेकदा  गौरविले सुद्धा गेलेले आहेत.

    पण  काही समाज विरोधी लोकांना  ही गोष्ट सहन होत नसावी दि.२० फेब्रुवारी २०१५ सोमवार रोजी पानसरे हे आपल्या पत्नीसोबत बाहेर सकाळी ९ वाजता फेरफटका मारायला गेले असता

    त्यांच्यावर अज्ञात २ व्यक्तींनी गोळीबार केला यात ते गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यूने असंघटीत लोकच नव्हे तर संपूर्ण महराष्ट्र हा गहिवरून गेला.

    दाभोळकर यांना गमावलेल्या महराष्ट्राने पुन्हा एकदा एक विचारधारा गमावली सतत लोकशाहीला मारक अश्या या दोन घटना घडल्या.

    लाल सलाम च्या घोषणा देत संपूर्ण महाराष्ट्राने या व्यक्तिमत्त्वाला अखेरचा निरोप दिला. पण भारतातील पानसरे यांच्या विचारधारेला स्वीकारून अनेक तरुण समाजापुढे पानसरे  यांचे विचार मांडतोय हि अभिमानाची बाब आहे.

    शारीरिक मृत्यू पत्करून विचारधारेच्या माध्यमातुन जगणं हे त्यांना जमलं अश्या या थोर व्यक्तिमत्त्वास पुण्यतिथीनिमित्त,

     विनम्र् अभिवादन !

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • माजी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख – पोलिटिकल वजीर

    महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी जी यांचा राजीनामा मंजूर झाला असून मा. रमेश बैस यांची नियुक्ती राज्यपाल पदी झालेली आहे.महाराष्ट्रा बरोबरच इतर ही काही राज्यातील राज्यपाल उपराज्यपाल बदलले आहेत.

    खर म्हणजे कधी नव्हे ते राज्यपाल हे पद गेल्या 4 वर्षात खुप चर्चेत आलं. त्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर बहुतांश वेळा राज्यपालांनी आपल्या अधिकारांची जाणीव महाविकास आघाडीला करून दिली,

    त्यावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सरकारला वेगळी वागणुक देत असल्याचा आरोप केला.वेगवेगळ्या प्रसंगातून तत्कालीन मुख्यमंत्री मा.उद्धव टाकरे ,उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांनी अनेकदा तशी नाराजी मीडियाला बोलून सुद्धा दाखवली.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कडून वारंवार होत आला आहे महाराष्ट्राचा अपमान

    मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर नवीन सरकार स्थापन करताना झालेली घाई,किंबहुना राज्यपालांनी दाखवलेली तत्परता अनेकांच्या भुवया उंचावून गेली.

    शिंदे-फडणवीस सरकार यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर महाविकास आघाडी चे शिल्पकार मा. शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यपालांनी शिंदे-फडणवीस यांना पेढा भरवल्याचे अधोरेखित केले,

    आजपर्यंतच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवात आपण एकदाही राज्यपालांनी कोणाला पेढा भरविला अस पाहिलं नसल्याचे नमुद केले आणि राज्यपालांच्या निःपक्षपाती वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि चटकन जनतेला देखील राज्यपालांची चूक लक्षात आली.

    राज्यपाल नियुक्त 12 आमदार:ततत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांद्वारे नियुक्त होणाऱ्या 12 आमदारांना नियुक्ती सरकार अल्पमतात येईपर्यंत न दिल्याने याही प्रकरणात राज्यपालांच्या निःपक्ष भूमिकेवर आघाडी सरकारने राज्यपाला समोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ,

    आजचे विरोधक आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी राज्यपाल कुणाच्या सांगण्यावरून नियुक्ती थांबवत आहे अशी टीका सुद्धा केली.आज राज्यपालांच्या राजीनाम्या नंतर सुध्दा हा प्रश्न प्रलंबीतच आहे असे म्हणता येईल

    आणि त्या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला…

    महापुरुषांचा अपमान:

    महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना इतरांबरोबर करणारे राज्यपाल नेहमी राजकारण्यांच्या निशाण्यावर असतात,पण छत्रपतींच्या बद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्या नंतर सामान्य नागरिकांचा व अनेक शिवप्रेमी संघटनांच्या रोषाला देखील राज्यपालांना सामोरे जावे लागले

    अनेक ठिकाणी आंदोलन,चक्काजाम करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजी राजे भोसले यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून तात्काळ राज्यपालांना हटवा या आशयाचे पत्र लिहुन आपल्या भावना व्यक्त केल्या,

    उदयनराजे यांना तर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झालेले सुद्धा आपण पाहिले.महाविकास आघाडी ने तर थेट मुंबई आझाद मैदान येथे ईतर मागण्या बरोबर राज्यपाल हटाव या मागणीसाठी विराट मोर्चाचे आयोजन केले अनेक संघटनांनी आणि शिवप्रेमी लोकांनी आपला सहभाग या मोर्चात नोंदवत ऐतिहासिक स्वरूप मोर्चाला प्राप्त करून दिले.

    महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा देखील अपमान राज्यपालकडून झाला

    महाविकास आघाडी मधील नवीन मंत्राच्या शपथविधी सोहळ्यात सगळे नियमानुसार करवुन घेणारे राज्यपाल शिंदे-फडनवीस सरकार च्या मंत्रांच्या शपथविधी सोहळ्यात free hand देतांना दिसले,याही प्रकरणात त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

    आपल्या 4 वर्ष्याच्या कार्यकाळात अनेक वाद राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ओढवून घेतले.पण सरकार कुठलेही असो त्यांना शिस्त लावण्याचे काम राज्यपालांनी करून दाखवले यात कुणालाही दुमत असण्याचं कारण नाही.

    आजपर्यंत च्या सर्व राजपालांपेक्षा वादळी कारकीर्द कोश्यारी साहेबांची राहिली अस म्हणायला वावग ठरणार नाही.मूळचे उत्तराखंड चे असणारे राज्यपाल यांना थंडगार वातावरणाची सवय असतांना देखील,त्यांच्या उपस्तिथीत महाराष्ट्राचे राजकीय तापमान त्यांनी वाढविले ऐवढ मात्र नक्की!

    असो,त्यांना येणाऱ्या काळात उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना,आणि नवीन राज्यपालांना मनस्वी शुभेच्छा….

    तुम्ही हे ब्लॉग पण वाचू शकता :

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता :
    Facebook : Political Wazir

  • युवक व युवतींसाठी आयटीआय महाविद्यालयाची स्थापना करणारे डॉ. अमलकार पदवीधरांसाठी पहिली पसंत

    मंडळी राजकारण म्हटलं की आपल्याला माहितीच असेल की काही राजकीय नेते आपल्या राजकीय इर्शेपोटी सर्वसामान्य तरुणांचे भवितव्य खराब करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही.

    मात्र काही राजकीय नेते असे आहेत की, जे नेहमी सर्वसामान्य जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असतात. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून युवक आणी युवतींच्या हक्कासाठी धावणार असचं एक नेतृत्व म्हणजे विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे अधिकृत उमेदवार असलेले प्रा. डॉ. अनिल अमलकार.

    जेव्हा वंचितच्या डॉ. अमलकारांनी पदवीधरांच्या रोजगारासाठी आंदोलनामध्ये घेतली होती टोकाची भूमिका…

    होय मंडळी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचंड विश्वासात असलेलं हे नेतृत्व आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वसामान्य पदवीधर तरुणांसाठी आणी जनतेसाठी झुंजत असलेल्या डॉ. अनिल अंमलकार यांच्या सामाजिक कार्याची दखलं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली.

    आणी अमरावती पदवीधर मतदार संघातील पदवीधर तरुणांची दयनीय अवस्था पाहता कुठेतरी परिवर्तन व्हावं या अनुषंगान वंचित बहुजन आघाडीच्यावतीने त्यांना विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरिता उमेदवार म्हणून नेमण्यात आले.

    आबासाहेब रघुनाथराव चव्हाण या सक्षम नेतृत्वापासून वंचित राहिलेला महाराष्ट्र

    तरुणांसाठी आयटीआय महाविद्यालयाची स्थापना

    मंडळी अमरावती पदवीधर मतदार संघातील तरुण हा आधुनिक तंत्रज्ञाच्या शिक्षणापसून वंचित राहता कामा नये. म्हणून स्वखर्चातून युवक आणी युवकांसाठी डॉ. अनिल अंमलकार यांनी अमरावती येथे आयटिआय महाविद्यालायची स्थापना केली.

    ज्यामध्यमातून अनेक विद्यार्थी या महाविद्यालयातून आधुनिक तंत्रज्ञांनांच शिक्षण घेऊन बाहेर पडू लागला. परिणामी योग्य ती शिक्षा लाभल्याने अनेक तरुणांना रोजगार पण मिळू लागला.

    डॉ. अनिल अमलकार यांचं तरुणांसाठी हे काम त्यांना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये एक्स फॅक्टर ठरू शकत. येत्या ३० जानेवारी २०२३ ला अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक असून सगळीकडे चर्चा रंगली आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अनिल अमलकार.

    गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या प्रचाराने जोर धरला आहे. वंचितच्या डॉ. अनिल अंमलकार यांचा विजय अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ निश्चित मानल्या जात आहे.

    तुम्ही हे ब्लॉग पण वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता

    facebook : Political Wazir

  • समाजातील गोरगरीब युवक युवतींचे सामूहिक विवाह परिचय संमेलन घेणारे डॉ. अमलकार पदवीधरांसाठी पहिली पसंत

    मंडळी राजकारण म्हटलं की निवडणुका येतात आणि  निवडणुका जातात. उमेदवार उभे राहतात. काही जिंकतात तर काहींचा पराभव होतो. आणी या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावत असते ती म्हणजे सर्वसमान्य जनता.

    मात्र ही जनता अशाच लोकांना लक्षात ठेवून मतदान करत असते जो उमेदवार त्यांच्यासाठी नेहमी हजर असतो. त्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचवून त्याचा योग्य तो पाठपुरावा करून त्या प्रश्नांना सोडवण्याचं काम करत असतो.

    होय मंडळी. आपल्याला माहिती असेल की सध्या विधानपरिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीने चांगलाच जोर धरला आहे.

    ज्यामध्ये अमरावती पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून धीरज लिंगाडे आणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तसेच अमरावती पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. रंजित पाटील व वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. अनिल अंमलकार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

    मात्र सर्वात महत्वाची बाब अशी की वंचितच्या डॉ. अनिल अंमलकरांचा विजय मतदान होण्यापूर्वीच निश्चित मानला जात आहे. 

    सामुहीक विवाह परिचय संमेलनाचे आयोजन करून गोरगरीबांना मदत करणारे डॉ. अमलकार 

    मंडळी बऱ्याचदा एखाद्या कुटुंबाला आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह करायचा असला की भरघोस पैशांची गरज असते. मात्र हलाकीच्या परिस्थितीपोटी काही कुटुंबांचं हे स्वप्न अपूर्ण राहून जात.

    पण ही बाब बुलढाणा जिल्ह्यातील डॉ. अनिल अमलकार यांना सतत छळत होती. यावर उपाय म्हणून त्यांनी आपल्या स्वखर्चातून गोरगरीब युवक युवतींसाठी सामूहिक परिचय विवाह सोहळ्याचे आयोजन करून हजारो कुटुंबांना खूप मोठा दिलासा दिला.

    ज्यामुळे डॉ. अनिल अंमलकार तरुणांच्या गळ्यातले ताईत झाले. परिणामी येत्या ३० जानेवारी २०२३ ला होणाऱ्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पदवीधरांना आपल्या समाजिक आर्थिक आणी शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी डॉ. अनिल अंमलकार हा एकमेव परिचय वाटू लागले आहे.

    सध्या डॉ. अमलकरांच्या प्रचाराने चांगलाच जोर धरला असून अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशीम या सर्व जिल्ह्यातील पदवीधरांची गर्दी त्यांच्या प्रचारामध्ये सामील होत आहे.

    ज्याचा मोठ्या प्रमाणात फटका भाजप आणी काँग्रेसला बसला असून अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. अनिल अमलकारांचा विजय निश्चित मानल्या जात आहे.

    ©copyright politicalwazir.in

  • निकालाआधीच वंचितच्या डॉ. अनिल अमलकारांचा विजय निश्चित का मानला जातोय ?

    मंडळी निवडणुक म्हटली की जय पराजय हा निवडणुकीच्या निकालानंतर ठरवल्या जात असतो. मात्र या वर्षी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये निकालाबाबत आश्चर्यचकीत करणारी बाब दिसून येत आहे.

     

    होय मंडळी. दिनांक ३० जानेवारी २०२३ ला सोमवार रोजी अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच मतदान होणार आहे. ज्यामध्ये एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून प्रत्येकाने आपल्या विजयाची दावेदारी स्थापित केली आहे.

     

    मात्र महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व विद्यमान आमदार डॉ. रंजित पाटील व वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. डॉ. अनिल अमलकार यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा सगळीकडे होत होती. पण यामध्ये ट्वीस्ट आणलाय तो वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. अनिल अमलकरांनी. 

     

    भाजप आणी काँग्रेससाठी वंचितचे प्रा. डॉ. अनिल अमलकार सर्वात मोठी डोकेदुखी 

     

    मंडळी विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. डॉ. अनिल अमलकार.

     

    त्याच कारण अस की, गेल्या १० वर्षांपासून अमरावती पदवीधर मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे डॉ. रंजित पाटील हे आमदार आहेत. मात्र अमरावती मतदार संघातील पदवीधरांच्या अनेक तक्रारी डॉ. रंजित पाटील यांच्याविरोधात आहे.

     

    त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजपचा पत्ता आधीच कट झालेला दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसला योग्य उमेदवार मिळत नव्हता. अखेर त्यांनी धीरज लिंगाडे यांना वेळेवर उमेदवारी दिली.

     

    यावरून स्पष्ट होते की काँग्रेसनेसुद्धा पदवीधर निवडणुकीची लढाई लढण्याआधीच रामराम ठोकला आहे. याशिवाय दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अनिल अमलकारांचा प्रचार आणी प्रसार चांगलाच जोर धरताना दिसून येत आहे.

     

    डॉ. अमलकारांचा जनसंपर्क आणि रस्त्यावर उतरून पदवीधरांसाठी काम करण्याची तळमळ हे वंचित बहुजन आघाडीसाठी ‘एक्स फॅक्टर’ ठरत आहे.

     

    सोशल मीडिया असो की अमरावती पदवीधर मतदार संघातील गाव गल्ली बोळातील जनतेमध्ये डॉ. अमलकारांच्या निश्चित असलेल्या विजयाच्या चर्चेला उधाण आलं आहे.

    ज्यामुळे अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निधवणुकीतून भाजप आणी काँग्रेसचा आधीच पत्ता कट झाल्याच स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

     

    ©copyright politicalwazir.in 

  • जेव्हा वंचितच्या डॉ. अमलकारांनी पदवीधरांच्या रोजगारासाठी आंदोलनामध्ये घेतली होती टोकाची भूमिका…

    मंडळी आजचा तरुण म्हटलं की पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे रोजगाराचा. काही रोजगार मिळून जातात तर काही रोजगार मिळवून घ्यावे लागतात.

    मात्र सरकारकडून पदवीधरांची रोजगाराच्या बाबतीत नेहमीच गळचेपीच होत आली आहे. काँग्रेस आणी भारतीय जनता पक्षाने फक्त आश्वासनांचा पूर पदवीधरांसमोर मांडला. मात्र कुणीही त्यांच्या रोजगाराची पुढे येऊन ठाम भूमिका घ्यायला तयार नव्हतं.

    अशा परिस्थितीमध्ये डॉ. अनिल अमलकार नावाचा एक व्यक्ती याचं पदवीधरांसाठी धावून आला. पदवीधरांच्या रोजगाराबाबत काय समस्या आहे हे डॉ. अमलकारांनी समजून घेतलं. आणि हजारो तरुण एकत्र करून त्यांनी पदवीधरांच्या रोजगारासाठी आवाज उठवला.

    सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या पदवीधर तरुणांच्या समस्या काय असतात ? त्यांना कशाप्रकारे आपल्या कौटुंबिक गरजा पूर्ण कराव्या लागतात?, त्यांच्या शिक्षणासाठी पालकांनी घेतलेले अथक परिश्रम या सर्व गोष्टींचा जाब त्यांनी आंदोलनादरम्यान पूढाकार घेऊन शासनाला विचारला होता. 

    अमरावती पदवीधर निवडणुकीत तरुणांमध्ये का लोकप्रिय आहे प्रा. डॉ. अनिल अमलकार ?

    मंडळी पावसाळा सुरु झाला की ज्याप्रमाणे बेडूक बाहेर पडतात. त्याचप्रमाणे निवडणूक लागली की काही राजकिय नेते आपल्या घराच्या बाहेर पडून जनतेसमोर येत असतात.

    अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या बाबतीतसुद्धा हेच झालं आहे. काँग्रेसचे धीरज लिंगाडे आणि भाजपाचे विद्यमान आमदार रंजित पाटील यांचा अमरावती पदवीधर मतदार संघातील पदवीधरांशी काडीचाही संबंध आला नाही.

    मात्र वंचित  बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल अमलकार हे गेल्या कित्येक वर्षांपासून अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यातील पदवीधरांच्या प्रश्नांसाठी नेहमी आवाज उठवत असल्याकारणाने तरुणांमध्ये त्यांची अधिक लोकप्रियता वाढलेली आहे.

    परिणामी येत्या ३० जानेवारी २०२३ ला सोमवार रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. अनिल अमलकरांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी असल्याची चर्चा सर्वीकडे सुरु आहे.

    ©copyright politicalwazir.in

  • अमरावती पदवीधर निवडणुकीत चर्चेच नाव ठरत असलेल्या वंचितच्या डॉ. अमलकरांचा संघर्षमय जिवनप्रवास

    मंडळी राजकीय क्षेत्रात काही राजकीय नेते आपल्या घराण्याच्या राजकीय वारस्यांपोटी मुखात सोन्याचा चमचा घेऊन येत असल्या कारणाने त्यांचं राजकीय पद हे निश्चितच असत. तर काही राजकीय नेते हे अगदी समाजाच्या तळागाळापासून संघर्ष करून आपलं नेतृत्व स्थापन करत असतात.

    सर्वसामान्य लोकांमधून आणि सामाजिक जान असलेल्या कुटुंबातून असच एक पुढे आलेलं आणि आपल्या अनोख्या नेतृत्वक्षमतेमुळे विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणी काँग्रेसच्या राजकीय नेत्यांच्या खुर्च्या हलवणारं नेतृत्व म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा.डॉ. अनिल अमलकार.

    मंडळी डॉ. अमलकारांचा जीवनप्रवास हा थक्क करणारा आहे. डॉ. अनिल अंमलकार यांचा जन्म १५ डिसेम्बर १९७० साली बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावी झाला. आईवडिलांपासूनच त्यांच्या कुटुंबामध्ये सर्वसामान्य लोकांना मदत करायची जणू परंपराच होती. जनतेची तळमळ जाणून घेणारा आपल्या पालकांचा हाच गुण डॉ. अमलकारांमध्ये आला असावा.

    डॉ. अमलकारांचा शैक्षणिक संघर्ष

    मंडळी लहानपणापासूनच डॉ. अमलकारांमध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि शालेय शिक्षणाची जिद्द होती. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. उच्च माध्यमिक शिक्षण हे नांदुरा येथील ज्युनियर कॉलजेमध्ये झाले.

    नंतर त्यांनी शेगाव येथील माऊली संत गजाजन महाराज अभियांत्रिकी कॉलेजमधून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यामध्ये विशेष बाब अशी की आपलं अभियांत्रिकीच शिक्षण चालू असताना डॉ. अंमलकारांनी विद्यार्थांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचं काम केलं.

    म्हणूनच आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या कारकिर्दीमधून इथल्या सर्वसामान्य लोकांना डॉ. अमलकारांमध्ये एक निर्भीड नेतृत्व दिसायला लागलं होत. आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बडनेरा येथील राम मेघे अभियांत्रिकी कॉलेजमधून एम. इ. पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पदवीसुद्धा मिळवली आहे. प्रा. डॉ. अमलकरांनी डॉक्टरेट पदवी मिळवल्यानंतर तब्बल २५ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात मुंबई, नागपूर आणि शेगाव येथील माऊली संत गजानन महाराज अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शैक्षणिक सेवा दिली आहे.

    शिक्षण क्षेत्रातील डॉ. अनिल अमलकरांचा संघर्ष पाहता अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदारांचा कल डॉ. अमलकारांकडे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

    ©copyright politicalwazir.in