Category: ग्राऊंड रिपोर्ट

  • प्रभाग ६: हत्तीची चाल रोखण्यासाठी काँग्रेस-भाजपने कसली कंबर; जाणून घ्या ‘पॉलिटिकल वझीर’चा ग्राउंड रिपोर्ट

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक ६ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत अटीतटीचा आणि चुरशीचा मानला जातो. २०१७ च्या निवडणुकीत येथे बहुजन समाज पक्षाने (बसपा) आपली ‘हत्तीची चाल’ दाखवत चारही जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे यंदा या बालेकिल्ल्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी बसपा सज्ज आहे, तर काँग्रेस आणि भाजपने बसपाचा हा रथ रोखण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. एमआयएम आणि मुस्लिम लीगच्या प्रवेशामुळे ही लढत आता ‘मल्टी-कॉर्नर’ झाली आहे.

    १. नागरी समस्यांचा विळखा: विकासाच्या प्रतीक्षेत प्रभाग

    प्रभाग ६ मध्ये विकासाचे दावे अनेक असले तरी वास्तव मात्र भीषण आहे. ‘पॉलिटिकल वझीर’च्या ग्राऊंड सर्व्हेनुसार, नागरिक मूलभूत सुविधांसाठी आजही संघर्ष करत आहेत:

    चांभार नाल्याची समस्या: या भागातून वाहणाऱ्या चांभार नाल्याला सुरक्षा भिंत नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट लोकांच्या घरात शिरते. उघड्या नाल्यांमुळे परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते.

    ड्रेनेज आणि सांडपाणी: पंचशील नगरात गडर लाईन तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहते. ३० ते ४० वर्षे जुन्या सिव्हरेज लाईनमुळे नागरिक त्रस्त आहेत.

    रस्त्यांची दयनीय अवस्था: पांढराबोडी, यादव नगर आणि ताजनगर येथील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असून रहिवाशांना चिखलातून वाट काढावी लागते.
    मालकी हक्काचा प्रश्न: अनेक झोपडपट्टीधारकांना अद्याप त्यांच्या जागेचे मालकी हक्काचे पट्टे मिळालेले नाहीत.

    २. राजकीय समीकरणे: २०१७ चा बसपाचा करिष्मा

    २०१७ मध्ये या प्रभागात बसपाने चारही जागांवर विजय मिळवून आपला दबदबा निर्माण केला होता:

    २०१७ चे विजयी नगरसेवक: जितेंद्र घोडेस्वार, वंदना चांदेकर, वैशाली नारनवरे आणि मो. इब्राहिम तौफिक अहमद.

    यंदा बसपाने आपले वर्चस्व टिकवण्यासाठी जोर लावला आहे, तर एमआयएम आणि मुस्लिम लीगमुळे मतदारांची मते विभागली जाण्याची शक्यता आहे.

    ३. आखाडा महापालिकेचा: प्रमुख दावेदार

    या प्रभागात अनुसूचित जाती, मुस्लिम आणि ओबीसी मतदारांची संख्या मोठी असून, सर्वच पक्षांनी अनुभवी उमेदवारांना संधी दिली आहे

    प्रमुख इच्छुक उमेदवार:

    बहुजन समाज पक्ष (BSP): जितेंद्र घोडेस्वार, वंदना चांदेकर, वैशाली नारनवरे, मो. इब्राहिम तौफिक

    भारतीय जनता पक्ष (BJP): अनिता अविनाश धमगाये, दिनेश कुकडे, भोलानाथ सहारे, चंद्रकांत सदावर्ते, अमित पांडे, द्वारकाबाई गजभिये, रितेश पांडे, जागृती शाहू, कांचन वालदे, राजू बावरा.

    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: धरमपाल पाटील, इंद्रपाल वाघमारे, जाहेदा बेगम अंसारी, कुंदाताई खोब्रागडे, इरशाद शेख.

    मुस्लिम लीग: असलम खान, रवी वंजारी, नासिराबानो अंसारी, हमीला हशरफी

    ४. राजकीय वझीरचा कानमंत्र

    प्रभाग ६ मध्ये यावेळी ‘परिवर्तन’ आणि ‘विद्यमान नगरसेवकांचा कामाचा अहवाल’ यावर निवडणूक होईल. गेल्या वेळी बसपाने एकहाती सत्ता मिळवली असली तरी, यंदा काँग्रेस आणि भाजपने केलेली मोर्चेबांधणी बसपासाठी मोठे आव्हान ठरेल. धार्मिक स्थळांसमोर असलेली दारूची दुकाने आणि अपूर्ण सिमेंट रस्ते हे मुद्दे मतदानावर मोठा प्रभाव पाडू शकतात.

    निष्कर्ष:

    प्रभाग ६ ची लढत यंदा केवळ पक्षीय नाही, तर ती अस्तित्वाची लढाई आहे. चांभार नाल्याचा प्रश्न आणि सांडपाण्याच्या समस्येतून जो उमेदवार मुक्तता देईल, तोच या प्रभागाचा खरा ‘वझीर’ ठरेल!

  • प्रभाग ८ (मध्य नागपूर): मुस्लिम मतदारांचा जोर, कोण ठरणार शिरजोर?

    मध्य नागपूरचा प्रभाग ८ हा नागपूर महानगरपालिकेतील सर्वात हाय-प्रोफाईल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रभाग मानला जातो. २०१७ मध्ये काँग्रेसने येथे ‘चौकार’ लगावला असला तरी, २०२६ च्या निवडणुकीत समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.

    १. राजकीय पेच

    काँग्रेसचा बालेकिल्ला की मतांचे विभाजन? या प्रभागात ५० हजारांहून अधिक मुस्लिम मतदार असून तेच विजयाची किल्ली ठरतात. काँग्रेसने आपल्या जुन्या नगरसेवकांच्या बळावर वर्चस्व टिकवण्याचा दावा केला आहे, मात्र भाजपने यावेळी मुस्लिम महिला उमेदवाराला रिंगणात उतरवून ‘कमळ’ फुलवण्याची रणनीती आखली आहे. यात एमआयएम फॅक्टर अत्यंत प्रभावी ठरणार आहे, कारण एमआयएमने यावेळी ४ उमेदवार देण्याचे संकेत दिले असून त्यामुळे होणारे मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडू शकते.

    २. ग्राउंड रिअॅलिटी:

    ‘विकास’ की केवळ ‘घोषणा’?’पॉलिटिकल वझीर’च्या विश्लेषणानुसार, सिमेंट रस्त्यांच्या पलीकडे या प्रभागातील जनता मूलभूत सुविधांच्या अभावातून जात आहे.

    आरोग्य व स्वच्छता: मोमीनपुरा सारख्या गजबजलेल्या बाजारपेठेत महिलांसाठी सार्वजनिक शौचालय नाही. ड्रेनेज व्यवस्था निकृष्ट दर्जाची असून पावसाळ्यात डोबी नगर आणि बोरीयापुऱ्यात पाणी शिरते

    वाहतूक कोंडी: कडबी चौकातील पुलाचे काम अर्धवट असल्याने दररोजची वाहतूक कोंडी ही येथील नागरिकांची डोकेदुखी बनली आहे.

    प्रलंबित प्रश्न: मोमीनपुरा येथील मुस्लिम कब्रस्तानाचे रुंदीकरण आणि अतिक्रमण हे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.

    विश्लेषण: प्रभाग ८ (मध्य नागपूर)

    (शक्ती): काँग्रेस: ५० हजार मुस्लिम मतदारांची एकगठ्ठा मते आणि प्रस्थापित नगरसेवकांचे नेटवर्क

    (कमकुवतपणा): प्रशासकीय अपयश: कचरा व्यवस्थापन, निकृष्ट ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांची वानवा यामुळे मतदारांमध्ये नाराजी

    (संधी): भाजप व एमआयएम: मतांच्या विभाजनामुळे भाजपला ‘किंगमेकर’ होण्याची संधी; तर तरुणांच्या आकर्षणाने एमआयएमला मोठी झेप घेता येईल.

    (धोके): अँटी-इन्कम्बन्सी: जुन्या नगरसेवकांविरुद्धचा रोष आणि हलबा समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण हे मोठ्या पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे.

    ३. आखाड्यातील प्रमुख दावेदार

    काँग्रेस: आशा नेहरू उईके, अँसारी सय्यद बेगम निजामुद्दीन, जीशान मुमताज मो. इरफान, जुल्फेकार अहमद भुट्टो, वसीम खान, सिराज अहमद, मुख्तार अन्सारी, फरीन कौसर, अब्दुल नियाजी, शमीम अख्तर, फजलुल कुरेशी, सईदा अन्सारी, निसार मुमताज, धीरज धकाते, उषा खरबीकर हे प्रस्थापित रिंगणात आहेत.

    भाजप: श्रेयस विकास कुंभारे, कामिल अन्सारी, जयतुनबी अशफाक पटेल, राहुल खंगार, किशोर उमेरडकर, प्रभाकर निखारे, आसीफ गाजीयांची नावे चर्चेत आहेत.

    एमआयएम: जावेद अख्तर, डॉ. सीमा रशमीन आणि मोहम्मद साजिद ताकदीने उतरणार आहेत.

    ‘पॉलिटिकल वझीर’चा निष्कर्ष:

    प्रभाग ८ मध्ये केवळ पक्षाच्या नावावर मते मिळणार नाहीत. जो नेता ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली रखडलेले अंतर्गत रस्ते, ड्रेनेज आणि आरोग्याचे प्रश्न सोडवेल, त्यालाच इथला मतदार आपला ‘वझीर’ म्हणून स्वीकारेल.

  • पुनापुरात भाजपने कसली कंबर, काँग्रेस ‘चमत्कार’च्या प्रतीक्षेत; प्रभाग २५ मधील स्मार्ट सिटीचे स्वप्न अधुरेच?

    नागपूरच्या पूर्व भागातील प्रभाग २५ (पुनापूर परिसर) मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. २०१७ मध्ये भाजपने येथे तीन जागा जिंकून वर्चस्व राखले होते, तर एका जागेवर काँग्रेसने बाजी मारली होती. मात्र, यावेळी बदललेली प्रभाग रचना आणि ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातील रखडलेली कामे यामुळे येथील निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार आहे.

    १. राजकीय पेच: भाजपचा गड विरुद्ध काँग्रेसचे आव्हान

    भाजपची रणनीती: गेल्या निवडणुकीत भाजपने या प्रभागातील ४ पैकी ३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी सत्ता टिकवण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

    काँग्रेसची आशा: २०१७ मध्ये पुरुषोत्तम हजारे यांनी काँग्रेसला या प्रभागात यश मिळवून दिले होते. यावेळी ‘चमत्कार’ घडवण्यासाठी काँग्रेस पुन्हा सज्ज आहे.

    बंडखोरीचे सावट: भाजपकडून उमेदवारीसाठी मोठी रांग असल्याने बंडखोरी रोखणे हे नेत्यांसमोर मोठे आव्हान असेल.

    २. प्रभाग २५ मधील प्रमुख वस्त्या

    या प्रभागात प्रामुख्याने कामगार आणि मध्यमवर्गीय वस्त्यांचा समावेश आहे.

    पुनापूर, भवानी नगर, पारडी, नवीन नगर, भांडेवाडी गोंड मोहल्ला,मातंगपुरा, महाजनपुरा, धोपेटपुरा, बैलसाथ बौद्धपुरा, कोष्टीपुरा,डबलेवाडी, उडीया मोहल्ला, घटाटे कोठा, खाटीकपुरा, धनलक्ष्मी सोसायटी,तालपुरा, विनोबा भावे नगर, गंगाबाग, उपरे मोहल्ला, भुजाडे ले-आऊट,गिरिजा नगर, सराई मोहल्ला, जय अंबे नगर, ठवकरवाडी आणि हनुमान नगर

    ३. ग्राऊंड रियालिटी: ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली समस्यांचा बाजार

    स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून या भागाचा कायापालट होईल अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे.

    रखडलेला स्मार्ट सिटी प्रकल्प: पुनर्वसन आणि मोबदल्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, ज्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप आहे.

    पाणी टंचाई: उन्हाळ्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण होते, तर पाणी पुरवठा अनियमित आहे.

    नाग नदीचा धोका: नाग नदीला लागून असलेल्या वस्त्यांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरण्याची भीती कायम आहे, कारण संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण आहे.

    सिवेरेज आणि कचरा: सिवेरेज लाईनची समस्या गंभीर असून कचरा संकलन नियमित होत नाही, ज्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचतात.

    वाहतूक कोंडी: रस्त्यावरच बाजार भरत असल्याने आणि अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

    ४. २०१७ चे विजयी उमेदवार

    जयश्री रारोकर (भाजप), पुरुषोत्तम हजारे (काँग्रेस), वैशाली रोहनकर (भाजप),दीपक वाडीभस्मे (भाजप)

    ५.यावेळी इच्छुक उमेदवार

    (भाजप): माजी नगरसेवक दीपक वाडीभस्मे, वैशाली रोहनकर, जयश्री रारोकर, महेश्वरी बिसेन, राजेश्वर दिवटे.

    काँग्रेसकडून इच्छुक: माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, यशवंत ऊर्फ गुड्डू रहांगडाले, श्रीकांत कैकाडे, शीतल रारोकर, संध्या अतकरी, विनोद चकोले

    इतर: नुकतेच यशवंत रहांगडाले यांनी उद्धव सेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे.

    ‘पॉलिटिकल वझीर’चे मत:

    प्रभाग २५ मध्ये जो उमेदवार स्मार्ट सिटीच्या बाधितांना न्याय मिळवून देईल आणि नाग नदीच्या पुरापासून संरक्षण देण्याचे आश्वासन देईल, त्यालाच जनता साथ देईल. केवळ आश्वासनांच्या ‘स्मार्ट सिटी’वर आता मतदार विश्वास ठेवणार नाहीत.

  • ‘छत्तीसगडी’ व्होटबँक ज्याच्या पाठीशी, तोच प्रभाग २४ चा ‘वझीर’! भाजपच्या गडाला काँग्रेस सुरुंग लावणार का?

    नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणात प्रभाग २४ (मिनी छत्तीसगड) आपली एक वेगळी ओळख जपून आहे. या प्रभागात हिंदी भाषिक, विशेषतः छत्तीसगडी समाजाचा मोठा प्रभाव असल्याने, येथील विजयाचे गणित केवळ विकासावर नाही तर सामाजिक समीकरणांवर अवलंबून आहे.

    १. राजकीय आखाडा:

    आमदारांच्या प्रतिमेवर मदार: भाजप उमेदवारांची पूर्ण भिस्त पूर्व नागपूरच्या आमदारांच्या विकासकामांवर आहे. ‘शहराचा विकास, प्रभाग मात्र भकास’ असा काँग्रेसचा प्रचार भाजपला किती नडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

    पक्षांतर्गत फूट आणि गटबाजी: शिवसेनेत पडलेली फूट आणि काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी यामुळे मतांचे विभाजन कोणाच्या फायद्याचे ठरेल, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष आहे.

    छत्तीसगडी समाज निर्णायक:

    या प्रभागात सुमारे ७०% हिंदी भाषिक मतदार असून त्यात छत्तीसगडी, साहू, लोधी आणि सतनामी समाजाची मोठी संख्या आहे.

    २. प्रभाग २४ मधील प्रमुख वस्त्या

    या प्रभागात दाट लोकवस्तीच्या आणि संमिश्र वस्त्यांचा समावेश होतो:

    डिप्टी सिग्नल, मिनीमातानगर, सूर्यनगर, आदिवासी प्रकाशनगर,चिखली वस्ती, चिखली क्वार्टर, कळमणा मार्केट परिसर, भारतनगर
    ,नेताजीनगर, सुभाननगर, सोनबानगर, एच.बी. टाऊन, चंदननगर,जुनी पारडी, प्रजापतीनगर, नेहरूनगर, स्मॉल इंडस्ट्रियल एरिया, पाचा पावली झोपडपट्टी,जालारामनगर, जानकीनगर, प्रजापतीनगर परिसर, कुंभारपुरा, साखरेकरवाडी, गुजराती कॉलनी आणि साईनगर.

    ३ ग्राऊंड रियालिटी:

    चकाचक उड्डाणपूल, पण वस्त्यांमध्ये समस्यांचे जाळे वरवर पाहता पारडी उड्डाणपुलामुळे हा प्रभाग प्रगत वाटत असला तरी, अंतर्गत वस्त्यांमध्ये आजही अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.

    ड्रेनेज आणि सांडपाणी: डिप्टी सिग्नल आणि मिनीमातानगर भागात ड्रेनेज लाईनच्या समस्यांमुळे घाण पाणी रस्त्यावर येते.

    पावसाळी पाण्याचा निचरा: सूर्यनगर परिसरात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही, तर रघुश्रीनगरमध्ये पाणी घरात शिरते.

    वाहतूक कोंडी: रेल्वे पुलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो.

    प्रदूषण आणि अस्वच्छता: गेल्या १० वर्षांपासून प्रभागातील नागरिक अस्वच्छता आणि प्रदूषणामुळे त्रस्त आहेत.

    आरोग्य आणि सुविधा: मिनीमातानगर येथील ३० खाटांचा दवाखाना बंद पडला आहे, तर प्रभागात खेळासाठी मैदान किंवा उद्यानांची देखभालीची कमतरता आहे.

    ४.२०१७ चे विजयी उमेदवार

    अनिल गेंढरे (भाजप)
    सरिता कावरे(भाजप)
    चेतना टांक (भाजप)
    प्रदीप पोहाणे(भाजप)

    ५. यावेळी इच्छुक

    (भाजप): प्रदीप पोहाणे, चेतना टांक, सरिता कावरे, अनिल गेंढरे, अरुण हारोडे, अनिता वानखेडे, लोकेश बोलवंशी, राहुल उके, हरिश्चंद्र बोंडे, उर्मिला बोंडे, कमलेश शाहू, रामअवतार अग्रवाल आणि अजित कौसल.

    काँग्रेसकडून इच्छुक: स्वनीश पांडे, केवल शाहू, अनिल शाहू, रामू भुते, सविता देशलहरे, प्रीती वानखेडे, मनिषा शाहू, नीलम गिल्लोर, राहुल वंजारी आणि सई निर्मळकर.

    इतर: उद्धव सेनेकडून हरी बानाईत आणि शिंदे सेनेकडून जगतराम सिन्हा रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत.

    ‘पॉलिटिकल वझीर’चे मत:

    प्रभाग २४ मध्ये ‘पक्षा’पेक्षा ‘स्थानिक मुद्दे’ जास्त प्रभावी ठरतील. जो उमेदवार छत्तीसगडी समाजाचा विश्वास जिंकेल आणि ड्रेनेज-वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देईल, तोच विजयाचा दावेदार असेल. भाजपला आपली ताकद टिकवण्यासाठी गटबाजी रोखावी लागेल, तर काँग्रेसला एकजुटीने मैदानात उतरावे लागेल.

  • नागपूर मनपा निवडणूक: प्रभाग २३ मध्ये दिग्गज भिडणार; बोरकर, पेठे आणि गावडेंमध्ये ‘तिरंगी’ युद्धाचे संकेत!

    नागपूरच्या पूर्व भागातील प्रभाग २३ (हरिहर मंदिर परिसर) हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, यंदा बदललेल्या आरक्षणामुळे आणि दिग्गज नेत्यांच्या एन्ट्रीमुळे येथे ‘तिरंगी’ लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राजकीय वर्तुळात या प्रभागाची चर्चा आता “काटे की टक्कर” म्हणून होत आहे.

    १. राजकीय पेच आणि तगडी लढत

    या प्रभागात मुख्यत्वे तीन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

    नरेंद्र (बाल्या) बोरकर (भाजप): माजी सत्ताधारी पक्षनेते बाल्या बोरकर या प्रभागातून भाजपचे प्रमुख दावेदार आहेत.

    दुनेश्वर पेठे (राष्ट्रवादी – शरद पवार गट): २०१७ मध्ये भाजपच्या लाटेतही पेठे यांनी विजय मिळवला होता, त्यामुळे त्यांची या प्रभागात मोठी ताकद आहे.

    २. उमेदवारीसाठी ‘इच्छुकांची’ मोठी फौज

    दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू आहे:

    भाजपमधील इच्छुक: नरेंद्र बोरकर, चंदन गोस्वामी, महेंद्र राऊत, हितेश जोशी, बाल्या रारोकर, इंद्रजीत वासनिक, कांता रारोकर, मनीषा धावडे, भास्कर चापले, राजेंद्र वारजूरकर, नामदेव ठाकरे, बाळा लाकडे, मनोहर चिकटे, सारिका ताटे, संघपाल मेश्राम, संजय वानखेडे, विनायक दुर्गे, नीता शर्मा आणि सुनील सूर्यवंशी.

    काँग्रेसमधील इच्छुक: माजी महापौर नरेश गावंडे, अ‍ॅड. यशवंत मेश्राम, महेश वैरागडे, विच्छा शर्मा, राजू कुथे, केशव धावडे, भास्कर चापले, राजेंद्र वारजूरकर, राजेश छाबरानी, अविनाश मैनानी, आरती शर्मा, पल्लवी गावडे, संगीता वालदे, ओम क्षीरसागर आणि सुनीता खंडाईत.

    राष्ट्रवादी काँग्रेस (शप): दुनेश्वर पेठे, प्रशांत बनकर, मीना पेठे, अमित जेठे, सुग्रीव मस्के, पीयूष बारापात्रे, राकेश अग्रवाल आणि सुमित्रा खंडाते.

    ३. प्रभाग २३ मधील प्रमुख वस्त्या

    या प्रभागाचा विस्तार खालील प्रमुख वस्त्यांमध्ये आहे:

    हरिहर मंदिर, धान्य बाजार, स्मॉल फॅक्टरी एरिया, सुदर्शन नगर, वर्धमान नगर,देशपांडे ले-आऊट, पडोळे नगर, हिवरीनगर,शास्त्रीनगर,कुंभारटोली,व्यंकटेश नगर, के.डी. कॉलेज, सतनामी नगर, त्रिमूर्ती नगर, आदर्शनगर झोपडपट्टी,बाबुळबन, गरोबा मैदान, जगजीवन नगर, दत्त नगर, दानागंज, एचबीजी ले-आऊट आणि छापरूनगर.

    ४. ग्राऊंड रियालिटी: नागरिकांच्या मूलभूत समस्या

    राजकीय चढाओढ सुरू असली तरी, प्रभागातील नागरिक खालील समस्यांनी ग्रासलेले आहेत:

    पाणी टंचाई: प्रभागात अनेक ठिकाणी पाण्याचा अपुरा आणि अनियमित पुरवठा होतो.

    नाग नदीचे प्रदूषण: हिवरीनगर जवळील नाग नदीच्या प्रदूषणामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पुलाचे कठडेही मोडकळीस आले आहेत.

    मालकी हक्क: झोपडपट्टीवासीयांना सरसकट मालकी हक्काचे पट्टे अद्याप मिळालेले नाहीत.

    अतिक्रमण: मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

    सिवेरेज आणि कचरा: कचरा संकलन नियमित होत नाही आणि काही वस्त्यांत सिवेरेज लाईनची समस्या गंभीर आहे.

    ‘पॉलिटिकल वझीर’चा इशारा:

    प्रभाग २३ मध्ये यावेळी विजयाचा गुलाल तोच उधळेल जो केवळ राजकीय आकड्यांवर विसंबून न राहता ‘नाग नदीचे प्रदूषण’ आणि ‘पाणी पुरवठा’ यांसारख्या प्रश्नांवर ठोस तोडगा देईल. भाजपला आपला गड वाचवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी सांभाळावी लागेल.

  • ‘संघ मुख्यालया’च्या प्रभागात तिकीटासाठी चढाओढ; प्रभाग २२ मध्ये भाजपचा गड राखण्याचे आव्हान!

    नागपूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत प्रभाग २२ कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय याच प्रभागाच्या कक्षेत येत असल्याने, राजकीयदृष्ट्या हा प्रभाग अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेचा मानला जातो. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने येथे ‘चौकार’ मारून वर्चस्व गाजवले होते, परंतु २०२६ च्या निवडणुकीत भाजपसमोर आपला हा गड राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

    १. राजकीय पेच: तिकीटासाठी रस्सीखेच आणि बंडखोरीचे सावट

    यावेळी या प्रभागात राजकीय चुरस शिगेला पोहोचली आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या एवढी मोठी आहे की पक्षाला तिकीट वाटप करताना महिलांना तिकीट देत ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

    भाजपची डोकेदुखी: एका जागेसाठी अनेक माजी नगरसेवक आणि नवीन चेहरे इच्छुक आहेत. तिकीट नाकारल्यास बंडखोरी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

    काँग्रेसचे प्रतिआव्हान: भाजपमधील अंतर्गत नाराजीचा फायदा उठवण्यासाठी काँग्रेसनेही तगड्या उमेदवारांची फळी तयार केली असून, येथे भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

    बहुकोणीय लढत: शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

    २. प्रभाग २२ मधील प्रमुख वस्त्या:

    या प्रभागाची व्याप्ती मोठी असून यात व्यापारी पेठा आणि जुन्या वस्त्यांचा समावेश होतो:

    क्वेटा कॉलनी, म.न.पा. लकडगंज, विभागीय कार्यालय, पाटीदार भवन, आदर्शनगर, चिंतेश्वर मंदिर, बालाजी मंदिर चौक, जैन दवाखाना, दाजी दवाखाना, जुनी मंगळवारी, मट्टीपुरा, मंदिर, जैसाववाडी, नबाबपुरा नटराज सुदर्शन कॉलनी मिशनरी स्कूल, ज्ञानेश्वर सिनेमा, आयचीत मंदिर, लाकडीपूल, संघ बिल्डिंग, हत्तीनाला, भोसला वेद शाळा, जुना बगडगंज, गंगाबाई घाट, स्मॉल फैक्ट्री एरीया, बापूराव गल्ली, इतवारी हायस्कूल, कुंभारपुरा.

    ३. ग्राऊंड रियालिटी: हाय-प्रोफाईल प्रभागातील ‘लो-प्रोफाईल’ समस्या

    राजकीय वलय मोठे असले तरी, येथील रहिवासी आजही मूलभूत समस्यांनी त्रस्त आहेत:

    पार्किंगचा प्रश्न: हा व्यापारी भाग असल्याने अंतर्गत वस्त्यांमध्ये पार्किंगसाठी जागा नाही, ज्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये सतत वाद होतात.

    गुन्हेगारी आणि ड्रग्ज: गंगाबाई घाट परिसरात अमली पदार्थांची विक्री आणि गुन्हेगारीचे वाढते प्रमाण हा रहिवाशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

    अतिक्रमण आणि ट्रॅफिक: जागोजागी असलेले अतिक्रमण आणि विस्कळीत वाहतुकीमुळे प्रभागाचा श्वास कोंडला जात आहे.

    ४. २०१७ चे विजयी उमेदवार :

    राजेश घोडपागे (भाजप)
    वंदना यंगटवार (भाजप)
    श्रद्धा पाठक(भाजप)
    मनोज चापले(भाजप)

    ५. यावेळी इच्छुक उमेदवार:

    (भाजप): चेतना टांक, मनोज चापले, संजय चिंचोळे, सुबोध आचार्य, श्रीकांत आगलावे, श्रद्धा पाठक, वंदना यंगटवार, दशरथ मस्के, आशीष भुते, कविता इंगळे, अनिता काशीकर, राजीव घोडपागे, कल्पक भनारकर, कल्पना शर्मा, निकिता पराळे, नंदिनी भुते, वैशाली अनिल धावडे.

    काँग्रेसकडून इच्छुक: नाना झोडे, मंगेश पाठराबे, रिंकू जैन, रोशनी पराते, विनोद इंगोले, स्नेहल दहीकर, रोशनी पराते, कांता पराते, नीलेश मरसकोल्हे, कृष्णा येम्प्रेड्डीवार.

    शिंदेसेना: अर्चना मगरे, धीरज फंदी, सुभाष भिसीकर, नरेंद्र मगरे

    ‘पॉलिटिकल वझीर’चे मत:

    प्रभाग २२ मध्ये केवळ ‘संघ’ आणि ‘पक्षाच्या’ नावावर निवडणूक जिंकणे आता सोपे राहिलेले नाही. मतदारांमध्ये अस्वच्छता आणि पार्किंगच्या प्रश्नावरून तीव्र नाराजी आहे. जो उमेदवार ‘सुरक्षित, स्वच्छ आणि ट्रॅफिकमुक्त इतवारी-धंतोली’ हे ठोस व्हिजन मांडेल, त्यालाच इथला सुशिक्षित आणि व्यापारी वर्ग मत देईल.

  • नागपूर महानगरपालिका २०२५: प्रभाग ७ मध्ये बसपाच्या हत्तीची चाल रोखण्यासाठी काँग्रेसची तटबंदी!

    राजकीय विश्लेषण: ‘पॉलिटिकल वझीर’ विशेष रिपोर्ट

    नागपूरच्या उत्तर भागातील प्रभाग ७ हा ‘निळ्या चळवळीचा’ केंद्रबिंदू मानला जातो. २०१७ च्या निवडणुकीत येथे बहुजन समाज पक्षाने (बसपा) मुसंडी मारत ४ पैकी ३ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले होते. मात्र, आगामी २०२५ च्या निवडणुकीत आपली गमावलेली सत्ता परत मिळवण्यासाठी काँग्रेसने मजबूत मोर्चेबांधणी केली असून, भाजपनेही कमळ फुलवण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

    सामाजिक व राजकीय समीकरणे

    मतदार संरचना: या प्रभागात ६० टक्के लोकसंख्या अनुसूचित जातीची (SC) असून, ४० टक्के ओबीसी आणि ४ टक्के मुस्लिम व हलबा समाजाचे मतदार आहेत.

    राजकीय कल: येथील मतदार लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेसला साथ देतात, परंतु महानगरपालिकेत बसपाला झुकते माप देण्याचा इतिहास आहे. मतविभाजन रोखणे हे यावेळी काँग्रेसपुढील सर्वात मोठे आव्हान असेल.

    प्रमुख वस्त्या: लष्करीबाग, बुद्धनगर, बेलिशॉप रेल्वे क्वॉर्टर, बाळाभाऊपेठ, नवानकाशा, न्यू इंदोरा, मायानगर, विद्यानगर, लघुवेतन कॉलनी, चॉक्स कॉलनी, गुरुनानकपुरा, आसीनगर, काश्मिरी गल्ली, स्वीपर कॉलनी, किदवई ग्राऊंड, अशोकनगर, पाचपावली हाउसिंग बोर्ड कॉलनी, कुन्हाडकर पेठ, गणोबा वाडी, कुंभारपुरा, खदान, पाचपावली पोलिस स्टेशन, बापूकुटीनगर, लष्करीबाग, इंदिरा ज्योतीनगर, मोतीबाग, भीमरत्ननगर, भोसलेवाडी, आंबेडकर कॉलनी, मायानगर, लाल गोदाम यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांचा यात समावेश आहे.

    प्रभाग ७: धोरणात्मक विश्लेषण

    प्रभागातील ग्राऊंड रिॲलिटी आणि राजकीय स्थितीचे विश्लेषण:

    १. बळ
    बसपाचा बालेकिल्ला: मागील विजयामुळे बसपाचे येथे केडर बेस नेटवर्क अत्यंत मजबूत आहे.

    काँग्रेसचा अनुभवी चेहरा: २००२ पासून सातत्याने निवडून येणारे संदीप सहारे यांचा दांडगा जनसंपर्क काँग्रेसची जमेची बाजू आहे.

    भाजपचे वाढते संघटन: भाजपने विकासकामांच्या बळावर प्रभागात आपले संघटन वाढवले असून यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावरून वर येण्याची शक्यता आहे.

    २. उणिवा
    नागरी समस्यांकडे दुर्लक्ष: चांभार नाल्याची दुरवस्था आणि त्यातून येणारी दुर्गंधी हा स्थानिक नागरिकांसाठी मोठा मनस्ताप ठरत आहे.

    सुविधांचा अभाव: मनपाच्या पाचपावली दवाखान्यात सोयीसुविधांचा अभाव असून, उद्याने आणि स्मारकांची दुरवस्था झाली आहे.

    पायाभूत प्रश्न: मैदानांची भिंत तुटलेली असणे आणि अनेक रस्त्यांचे डांबरीकरण प्रलंबित असणे या प्रशासकीय उणिवा आहेत.

    ३. संधी
    संविधान बचाव आंदोलन: काँग्रेसने राबवलेल्या ‘संविधान बचाव’ आंदोलनामुळे आंबेडकरी मतदारांमध्ये काँग्रेसबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे.

    नवीन चेहरे: प्रस्थापित नगरसेवकांविरुद्धची नाराजी पाहता नवीन इच्छुकांना आपली छाप पाडण्याची संधी आहे.

    ४. धोके
    संविधान बचाव आंदोलन: काँग्रेसने राबवलेल्या ‘संविधान बचाव’ आंदोलनामुळे आंबेडकरी मतदारांमध्ये काँग्रेसबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे.

    नवीन चेहरे: प्रस्थापित नगरसेवकांविरुद्धची नाराजी पाहता नवीन इच्छुकांना आपली छाप पाडण्याची संधी आहे.

    राजकीय आखाडा: इच्छुक उमेदवार

    काँग्रेस: संदीप सहारे, कल्पना द्रोणकर, प्रा. जयंत जांभूळकर, अभिषेक शंभरकर शेख आसिफ, चेतन तरारे

    भाजप: राखी मानवटकर, संजय तरारे, रवींद्र डोंगरे, जगदीश बामनेट ओमप्रकाश इंगळे, धनंजय कांबळे

    बसपा: विरंका भिवगडे, मंगला लांजेवार, मोहम्मद जमाल, सुबोध साखरे संजय जैस्वाल

    निष्कर्ष

    प्रभाग ७ मध्ये यावेळी ‘निळा’ की ‘तिरंगा’ असा मुख्य संघर्ष असला, तरी ‘केसरी’ रंग आपली व्याप्ती वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. चांभार नाल्याचे प्रदूषण आणि स्मारकांचे संवर्धन हे मुद्दे मतदारांच्या निर्णयावर मोठा प्रभाव पाडतील.

  • प्रभाग १८: दटकेचा वारसदार कोण आणि शेळके राखणार का महालचा किल्ला?

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग १८ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत ‘हेवीवेट’ प्रभाग आहे. नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान आमदार प्रवीण दटके यांचा हा बालेकिल्ला असून, यंदा या बालेकिल्ल्यात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

    १. ‘राजकीय वझीर’चे विश्लेषण:

    ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमीमहाल आणि आसपासचा परिसर हा संघाच्या मुख्यालयाजवळील भाग असल्याने येथे भाजपची मुळे खोलवर रुजलेली आहेत. मात्र, गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बंटी शेळके यांनी येथे मुसंडी मारून भाजपच्या गडाला खिंडार पाडले होते.

    २०१७ चे चित्र: प्रवीण दटके (भाजप), सुमेधा देशपांडे (भाजप), नेहा वाघमारे (भाजप) आणि बंटी शेळके (काँग्रेस) हे निवडून आले होते.

    २. प्रभागातील प्रमुख वस्त्या:-

    हा प्रभाग ऐतिहासिक वास्तू आणि दाट लोकवस्तीने व्यापलेला आहे

    प्रमुख वस्त्या: चिटणीसपुरा, शिवाजीनगर, रतन कॉलनी, जुनी शुक्रवारी, एमएसईबी कार्यालय, किल्ला, नाईक रोड, सी.पी. अॅण्ड बेरार महाविद्यालय परिसर, गरुड खांब, कोतवाली पोलिस स्टेशन, दक्षिणामूर्ती चौक, भोसले वाडा, भूताया दरवाजा,कल्याणेश्वर मंदिर, नगर भवन, सिंगाडा मार्केट, कर्नलबाग, रामाजीची वाडी, काशीबाई देऊळ, राहातेकर वाडी, गाडीखाना, जोहरीपुरा, कोठी रोड, सिरसपेठ, मिट्टीपुरा.

    ३. ग्राऊंड रिअॅलिटी:

    गर्दी आणि नियोजनाचा अभावमध्य नागपुरातील या प्रभागात नागरी समस्यांची गुंतागुंत मोठी आहे.

    अतिक्रमण आणि पार्किंग: हा भाग मुख्य बाजारपेठ असल्याने फूटपाथवर व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, ज्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण होते. पार्किंगसाठी जागा नसल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.

    गटार लाईन आणि दुर्गंधी: जुन्या वस्त्यांमधील ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होतात, ज्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येते.तलावाचे दुर्लक्ष: शुक्रवारी (गांधीसागर) तलावाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यात गवत वाढले असून सौंदर्यीकरणाची कामे रखडली आहेत.

    ४. इच्छुकांची फौज

    भाजप: बंडू राऊत, रश्मी फडणवीस, कुमार बांते, सचिन नाईक, मुकुंद बापट, नरेश वाघमारे, सोमू देशपांडे, श्रीकांत आगलावे, धीरज चव्हाण, विनोद गावंडे, श्वेता भोसले, काकी गुजर, करुणा गावंडे, भारती अरमरकर

    काँग्रेस: आकाश गुजर, संतोष गोटाफोडे, प्रकाश बांते, दिनेश बानाबाकोडे, अशोक निखाडे, अतुल ढोबळे, राजू महाजन, अभिजित ठाकरे, अभय रणदिवे, जयश्री गायधने, शाईन अली, आप्पा मोहिते, नयन तरवटकर

    अपक्ष: सचिन बढिये

    मुस्लिम मतदारांची भूमिका: या प्रभागात सुमारे ८ हजार मुस्लिम मतदार असून, त्यांची मते कोणाकडे झुकतात यावर विजयाचे गणित अवलंबून असेल. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी या मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

    ५. ‘पोल्टीकल वझीर’चा स्ट्रॅटेजिक व्ह्यू:

    प्रभाग १८ मध्ये विजय मिळवण्यासाठी ‘महालचे मानपान’ आणि ‘लोकांशी थेट संवाद’ हे दोनच मंत्र चालतील. भाजपला आपला गड वाचवण्यासाठी प्रवीण दटकें सारखा तोडीचा चेहरा द्यावा लागेल, तर काँग्रेसला बंटी शेळकेंच्या आक्रमक प्रतिमेचा फायदा करून घ्यावा लागेल.

    निष्कर्ष:

    हा प्रभाग नागपूरच्या जुन्या संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. जो उमेदवार येथील ‘ट्रॅफिक’ आणि ‘अतिक्रमणा’च्या प्रश्नावर ठोस उपाय देईल, त्यालाच महालची जनता लोक प्रतिनिधी म्हणून स्वीकारेल.

  • नागपूर मनपा निवडणूक २०२६: प्रभाग १० – पक्षांतर आणि वर्चस्वाची लढाई

    प्रभाग १० मध्ये यावेळी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. २०१७ मध्ये काँग्रेसने या प्रभागावर निर्विवाद वर्चस्व गाजवले होते, मात्र त्यानंतर झालेले पक्षांतर आणि नेत्यांच्या घरवापसीमुळे इथली समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

    १. प्रभागाचा लेखाजोखा:

    एकूण मतदार: सुमारे ६०,०००.मतदार

    स्वरूप: कुणबी, हिंदी भाषिक, मुस्लिम, अनुसूचित जाती, आदिवासी आणि पोलीस वसाहतीतील मतदारांची मोठी संख्या या प्रभागात निर्णायक ठरते.

    २०१७ चा निकाल: गार्गी प्रशांत चोपडा, नितीश ग्वालबंसी, साक्षी राऊत आणि रश्मी धुर्वे (सर्व काँग्रेस) विजयी झाले होते.

    २. प्रमुख वस्त्या आणि ग्राऊंड रिअॅलिटी

    या प्रभागातील प्रमुख वस्त्यांमध्ये नागरी समस्यांचा डोंगर उभा आहे.

    प्रमुख वस्त्या: बोरगाव, दिनशॉ फॅक्टरी कुतुबशहानगर, शीलानगर, पोलिस लाइन टाकळी, समाधाननगर, आदर्श कॉलनी, पेन्शननगर, अवस्थीनगर, सादिकाबाद, मानकापूर मेन्टल हॉस्पिटल, दर्जी मोहल्ला, बैरामजी टाऊन, राजनगर, गॉड मोहल्ला, एनएडीटी कॅम्पस, आंबेडकरनगर, म्हाडा कॉलनी, आकारनगर, मानकापूर पॉवर स्टेशन.

    ज्वलंत प्रश्न: पोलीस लाईन तलावाचे रखडलेले सौंदर्यीकरण, पोलीस लाईन टाकळीमधील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा, आणि गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या नाल्याला संरक्षण भिंतीचा अभाव.सुरक्षेचा प्रश्न: गोकुळधाम सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे अरुंद स्वरूप आणि ठिकठिकाणी वाढलेली अतिक्रमणे यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

    ३. इच्छुकांची फौज आणि तगडी स्पर्धा :

    यावेळी भाजप आणि काँग्रेसमध्ये ‘काट्याची टक्कर’ पाहायला मिळणार आहे.

    काँग्रेसकडून: विद्यमान नगरसेविका साक्षी राऊत, रश्मी धुर्वे यांच्यासह प्रमोद ठाकूर, पंकज शुक्ला, आणि तोसिफ खान इच्छुक आहेत.

    भाजपकडून: माजी नगरसेवक रमेश चोपडे, त्यांच्या पत्नी वैशाली चोपडे, आणि शीला मोहोड यांची नावे चर्चेत आहेत.
    तसेच युवा मोर्च्याचे कमलेश पांडे आणि बंटी दीक्षित सक्रिय आहेत.

    पक्षांतराचा फटका: माजी नगरसेवक प्रशांत चोपडा यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊन पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे, तर नितीश ग्वालबंसी यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू गिरीश ग्वालबंसी आता भाजपमध्ये आहेत.

    ४. राजकीय वझीरचे विश्लेषण पक्षस्थिती :

    काँग्रेस: विधानसभा निवडणुकीत या प्रभागातून काँग्रेसला ४,५०० हून अधिक मतांची आघाडी मिळाली होती, जी त्यांची मोठी ताकद आहे.

    भाजप: माजी नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरवून आणि पक्षांतराचा फायदा घेत जागा काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

    बसपा/अपक्ष: बसपाचे पत्ते अद्याप उघड झालेले नाहीत, मात्र अरुण डवरे यांच्यासारखे अपक्ष उमेदवार मतांचे गणित बिघडू शकतात.

    पॉलिटिकल वझीर सल्ला:

    प्रभाग १० मध्ये ‘पोलीस लाईन तलाव’ आणि ‘नाल्याची भिंत’ हे दोन मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहतील. जो उमेदवार या मूलभूत सुविधांच्या पूर्ततेचे ठोस आश्वासन देईल, त्याला वस्त्यांमधील मतदारांचा पाठिंबा मिळणे सोपे जाईल.

  • प्रभाग १७: ४० टक्के मतांवर काँग्रेस, बसपा आणि वंचितचा डोळा; भाजपची भिस्त मतविभाजनावर!

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग १७ हा दक्षिण, दक्षिण-पश्चिम आणि मध्य नागपूर या तीन विधानसभा क्षेत्रांच्या सीमेवर येतो. या प्रभागातील ३५ ते ४० टक्के मतदार हे अनुसूचित जातीचे (SC) असल्याने, येथे जातीय समीकरणे आणि मतविभाजन निकालात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

    १. ‘राजकीय वझीर’चे विश्लेषण:

    २०१७ च्या निवडणुकीत येथे भाजपचे तीन उमेदवार निवडून आले होते, तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला होता.

    काँग्रेसची रणनीती: काँग्रेस आणि बसपा यांच्या मतांची बेरीज झाली असती, तर २०१७ मध्येच भाजपला येथे मोठा फटका बसला असता. यावेळी मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेसला विशेष रणनीती आखावी लागेल.

    भाजपची आशा: भाजपची भिस्त प्रामुख्याने विरोधी मतांच्या विभाजनावर आहे. जर बसपा, वंचित आणि अपक्ष उमेदवारांनी मोठी मते घेतली, तर भाजपचा विजय सुकर होऊ शकतो.

    २. प्रभागातील प्रमुख वस्त्या:

    या प्रभागात मध्यमवर्गीय वस्त्यांपासून ते मोठ्या झोपडपट्टी परिसरांचा समावेश होतो

    प्रमुख वस्त्या: गांधीसागर तलाव, गणेशपेठ, महात्मा फुले मार्केट परिसर, शनिवारी, गुजरवाडी, पटेल टिंबर मार्केट, बारा सिंगल, जाटतरोडी, आनंदम सिटी, मेडिकल कॉलेज परिसर, सेंट्रल रेल्वे कॉलनी, इंदिरानगर, टी.बी. वार्ड, राजाबाक्षा, वंजारीनगर, तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल परिसर, रामबाग, इमामवाडा, उंटखाना, चंद्रमणीनगर, श्रमजिवीनगर, विश्वकर्मानगर, एम्प्रेस मील कॉलनी, अजनी.

    ३. ग्राऊंड रिअॅलिटी:

    नागरी समस्यांचा डोंगर ‘मेडिकल’ची ओळख असलेल्या या प्रभागात नागरी सुविधांची मोठी वानवा आहे:

    आरोग्य आणि स्वच्छता: नाल्यांची अस्वच्छता आणि पावसात नाल्यांचे पाणी वस्त्यांमध्ये शिरणे ही येथील जुनी समस्या आहे. कचरा संकलन नियमित होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

    गुन्हेगारी: या भागात अंमली पदार्थांची विक्री आणि अवैध दारूचे गुत्ते वाढल्याने स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.

    पायाभूत सुविधा: झोपडपट्टी भागात मालकी हक्काचे पट्टे वाटप अद्याप प्रलंबित आहे. तसेच उद्यानांमध्ये असामाजिक तत्वांचा वावर वाढला आहे.

    ४. २०१७ चे विजयी नगरसेवक:

    विजय चुटेले (भाजप)
    लता काडगाये (भाजप)
    हर्षला साबळे (काँग्रेस)
    प्रमोद चिखले (भाजप)

    २०२६ साठी इच्छुक उमेदवार:

    काँग्रेस: मनोज साबळे, हर्षला साबळे, गुड्डू तिवारी, प्रशांत ढाकणे, सुजाता कोंबाडे, अश्विन धनविजय रिमा चव्हाण, वंदना चहांदे, माया घोरपडे, श्रुती वाघमारे, किरण सचिन रामटेके गावंडे, सुहास नानवटकर, अशोक यावले, शिवा अरखेल, प्रफुल्ल भजे, मच्छींद्र सावळे, हेमंत चौधरी.

    भाजप: विजय चुटेले, प्रमोद चिखले, दिलीप सुरकार, लता काटमये, सुनील काटमये,संदीप माने, वत्सला मेश्राम, सूरज बांते, आशिष डांगोरे, जयपाल गहेरवार.

    बसपा: अमित सिंग, सुरेंद्र डोंगरे, मनिष शंकरकर, पंकज नाखले, पियुष कांबळे, निलेश पाटील, रश्मी कांबळे

    वंचित: राजू लोखंडे, शुभम डोंगरे, धम्मा धाबर्डे.

    अपक्ष: अनिकेत कुत्तरमारे, यशवंत चव्हाण

    ५. ‘पॉलिटिकल वझीर’चा स्ट्रॅटेजिक व्ह्यू:

    प्रभाग १७ मध्ये ‘झोपडपट्टी विकास’ आणि ‘मालकी हक्काचे पट्टे’ हे दोन मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहतील. काँग्रेसने जर दलित मतांचे विभाजन रोखले, तर त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपकडे असलेले केडर बेस नेटवर्क आणि विरोधकांमधील अनेक इच्छुक उमेदवार भाजपच्या पथ्यावर पडू शकतात.

    निष्कर्ष:

    प्रभाग १७ मध्ये जो उमेदवार ‘सुरक्षा आणि स्वच्छता’ या दोन मुद्द्यांवर महिला मतदारांना आकर्षित करेल, तोच विजयी ठरेल.