Category: देश

  • नाम बडे और दर्शन खोटे – द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम आणि नितीन गडकरी

    नाम बडे और दर्शन खोटे – द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम आणि नितीन गडकरी

    सध्या संपूर्ण भारतात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आणि निवडणूक म्हणजे अनेक राजकीय व्यक्तींचे भवितव्य घडवणारी तर अनेक दिग्गज व्यक्तींचे भविष्य बिघडवणारी वेळ, आणि भारतीय मतदातांनी त्याचा अनुभव वेळोवेळी इतिहासामध्ये धडा दिला आहे. निवडणुकीमध्ये विरोधात बोलणे, भ्रष्टाचारावर बोलणे हे काही नवीन नाही. पण या सर्वांना 70 वर्षात अपवाद ठरले ते माननीय केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी.

    पण खरंच अपवाद ठरले का ?
    कारण स्वच्छ नेते, काम आणि भ्रष्टाचार विरुद्ध सरकार. या ओळखीने सत्तेवर आलेल्या मोदी सरकारमध्ये सर्वात मोठा कोणत्या घोटाळ्याचे आरोप झाले तर तो म्हणजे द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम.

    नक्की काय आहे हा द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम ?
    माननीय नितीनजी गडकरी यांच्या मंत्रालयाच्याच अंतर्गत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.

    नक्की काय होता CAG सरकारी संस्थेने केलेला आरोप. ?

    CAG म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर ऑफ इंडिया.
    भारतीय संविधानाने कलम 148 अंतर्गत शक्ती दिलेली सर्वात मोठी आणि महत्त्वाची सरकारी संस्था म्हणजे CAG.
    आपल्या संसदेद्वारे तसेच राज्य सरकारद्वारे मंजूर झालेले प्रकल्प निधी. त्या प्रकल्प निधी मधील ठरलेल्या रकमेचा किती वापर झाला ? जास्त झाला अथवा कमी झाला ? कुठे झाला तसेच तो निधी कुठे कुठे वापरलात? ह्यासर्व गोष्टींवर निगराणी ठेवण्याचे काम ही संस्था करते.

    नक्की काय होता मग द्वारका राष्ट्रीय महामार्ग घोटाळा?

    सोप्या भाषेत…. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री यांच्या महत्त्वकांशी प्रकल्पांपैकी एक असणारा प्रकल्प. भारत सरकारने देशांतर्गत रस्ते जोडणीसाठी एक राष्ट्रीय उपक्रम मंजूर केला. त्याचं नाव “भारतमाला”. त्या उपक्रमाला सी सी इ ए (CCEA) म्हणजेच कॅबिनेट कमिटी इकॉनोमिक अफेअर ने मंजुरी दिली. ज्या सीसीईएचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.

    या उपक्रमांतर्गत देशातील दुसऱ्या क्रमांकाचे जवळजवळ 50 हजार किलोमीटरचे रस्ते निर्मिती होणार आहे.

    यातील पहिला टप्पा हा 24800 km चा आहे. आणि हे रस्ते बांधणी 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण सध्या स्थितीत तसे झालेले नाही. आणि भारतमाला उपक्रमा अंतर्गत येतो. पहिला टप्प्यातील दिल्ली येथील शिवमुर्ती महिपालपूर पासून सुरू होणार ते हरियाणातील गुरगाव पर्यंत असणारा महामार्ग ज्याचे नाव द्वारका राष्ट्रीय राजमार्ग.

    खरंतर दिल्ली आणि गुरगाव मधील रस्ते जाम कमी करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेला हा रस्ता आहे. या रस्त्याचे अंतर 29 km आहे यातील 19 Km हे हरियाणामध्ये तर उरलेले 10 Km दिल्लीमध्ये आहे.

    कॅगने ओढलेले ताशेरे हे हरियाणा अंतर्गत येणाऱ्या 19 किलोमीटरच्या अंतराचे आहे.

    या महामार्गाच्या निर्मितीसाठी दर 1 किलोमीटरसाठी 18 करोड रुपये खर्च येणे अपेक्षित असताना प्रत्येकी 1 किलोमीटरसाठी 250 करोड रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजेच जवळजवळ 14 पट जास्त दर प्रति किलोमीटरसाठी खर्च झाला आहे. खरंतर हरियाणा सरकारने आपल्या बाजूने आधीच शेतकऱ्यांकडून जमिनीचे अधिग्रहण करून घेतले होते.

    त्यातही न समजणारी बाजू म्हणजे 70 ते 75 मीटर लेनसाठी लागणारी जमीन गरजेचे असताना, 90 मीटर जमीन का अधिग्रहण करण्यात आली? यावरही न थांबता हरियाणा सरकारने ती जमीन (एन एच ए आय) NHAI (नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया) ला 15 मीटर जमीन मोफत दिली. 90 मीटर अंतरावर 14 लेन मध्ये होऊ शकणारा रस्ता हा मात्र 8 लेन मध्येच उभा करण्यात आला.

    ज्या महामार्गाची मंजुरी 4 लेनसाठी होती. तीच NHAI ( एन एच ए आई )ने 14 लेन साठी मंजूर करून घेतले, आणि म्हणूनच की काय 14 लेनमध्ये होणारा महामार्ग असल्याने प्रत्येकी किलोमीटरसाठी 250 करोड रुपये एवढा अमाप खर्च झाला असे कारण सांगण्यात येत आहे. पण येथे मूळ प्रश्न मग निर्माण होतो जर तुम्ही मंजूर 14 लेन साठी केला तर 8 लेनचा महामार्गच का निर्माण केला असावा ?

    प्रत्येक गोष्टीत प्रश्न उपस्थित होत असताना रस्ते वाहतूक मंत्रालयातून कागदी उत्तर न येणे, 14 पट जास्त एका किलोमीटरसाठी करोडो रुपयांमध्ये खर्च येणे,
    आणि ते सुद्धा मोठे नाव असणाऱ्या वाहतूक मंत्र्यांना न समजणे, (त्यांच्या हातूनच मंजुरी झालेली आहे) हे अनपेक्षितच आहे. असे नाही का वाटत?

    एवढेच नाहीतर कॅगने दिल्ली ते मुंबई होत असलेल्या महामार्ग सुद्धा पुढील 25 वर्ष वापरण्यायोग्य असणार नाही. असे अहवालात म्हटले आहे.

  • राजकिय साक्षरता

    आमदार ,खासदार आणि मंत्री हे समाजाचं नेतृत्व करतात पण जर आपला प्रतिनिधिच हा राजकीय निरक्षर असला तर कसा गोंधळ उडतो हे बघायला मिळत.

    नेमकच विधानसभेत राम सातपुते यांनी शरद पवारांचा केलेला एकरी उल्लेख हा फक्त राम सातपुते यांनाच नव्हे तर संपूर्ण सत्ताधारी लोकांनासुद्धा महागात पडल्याच दिसून येत.

    सध्याचा काळात तर बऱ्याच नेत्यामध्ये राजकीय साक्षरता हि पाहायला मिळतच नाही . पूर्वीच्या काळातही राजनीतिक वातावरण यापेक्षाहि गंभीर असायचा पण नेत्यांमधे एकमेकाप्रती आदर हा दिसून यायचा .

    लोकशाहीतील हुकूमशाह !

    जर दोन प्रतिनिधिचे आप-आपसात जमत नाही याचा अर्थ असा नव्हे की ते एकमेकांच्या विरोधातच असायला हवे प्रश्न जेव्हा जनतेचा असतो तेव्हा नेता पक्ष विसरून एकत्र येतो त्यातच त्या नेत्यांची राजकिय साक्षरता दिसून येते.

    पण हल्लीच्या काळात राजकारण्यांनी त्यांची मर्यादा ओलांडल्या आहेत ,तर राजकीय प्रतिनिधि प्रसार माध्यमासमोर वंगाळ आणि शिवीच्या भाषेत बोलतो हे कितपत योग्य आहे ?

    एक प्रतिनिधी हा नारायण राणेंची भर सभेत नक्कल करतो त्याला प्रत्युत्तर देताना नारायण राणेंचे सुपुत्र पत्रकारितेचा आधार घेत प्रसार माध्यमासमोर अभद्र भाष्य करतात .

    एक सुजाण नागरिक या नात्याने पाहता महाराष्ट्राच्या बदलात शरद पवार यांचं फार मोठं योगदान आहे हे सांगायची वेगळ काही गरज नसावी परंतु जर याच व्यक्तीच्या नावाने विधानसभेत विरोधी पक्षनेत्याकडुन  एकेरी उल्लेख होणं हे योग्य नव्हे.

    शिवसैनिक कधी फुटतो का ?

    महाराष्ट्राच्या राजनीतिक काळात खूप नेत्यांनी त्यांचं योगदान दिलेले आहे त्यात प्रामुख्याने स्व.बाळासाहेब ठाकरे ,शरद पवार आणि गोपीनाथ मुंढे यांचं नाव अग्रेसर आहेत .

    एकीकडे असले गलिच्छ  राजकारण होतय तर दुसरीकडे 

    सत्यजित तांबे सारखे एकनिष्ठ आणि तत्ववादि लोक कमी पाहायला मिळतात ज्याच्या कुटुंबाने काँग्रेस साठी २-३ पिढ्या दिल्या त्याच माणसाला काही नेत्यांच्या उपस्थितीत पक्षामधुन बेदखल केलं जातं हे कितपत योग्य आहे ?

    एकीकडे बंड पुकारुन जो तो पदासाठी नुसती पळापळ करतोय तर मुख्यमंत्री पद आणि पक्ष सुद्धा गमव्लेल्या उद्धव ठाकरेसोबत संजय राऊत हे ठाम उभे आहेत हि खरोखर प्रशंसनीय बाब आहे…..

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • लोकशाहीतील हुकूमशाह !

    ५६ इंचीची छाती सांगणारे,भारताला भ्रष्टाचारमुक्त करणार होते आणि भारताला महासत्ता बनवून आर्थिक दृष्ट्या अजून मजबूत करून रुपया वधारनार होता….

    नेमकं बोलले काय आणि होत काय ?

    धर्माच्या नावावर सहानुभूती तयार करून निवडणूकीपर्यंत त्यांना वातानुकूलीत वातावरणात निवडणूका जिंकायच्या .

    सध्याच्या भारताची स्थिती अशी आहे कि देवेंद्र फडणवीस यांच्या मते नोकऱ्या आहेत पण भारतीय युवकांमध्ये कौशल्य  नसल्याचा ते दावा करतात नेमक यांच्या पक्षाचं धोरण काय ?

    शिवसैनिक कधी फुटतो का ?

    हा प्रश्न आता जनतेला पडत असावा भारताला विकासाकडे नेण्याच्या गप्पा करणारे भारताला विकायला सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत हेच का भाजपच विकास घडवणार सूत्र ?

    एकीकडे भारताला मेक इन इंडिया म्हणत उद्योग उभारायला सांगायच आणि सामान्य नागरिक हा कसा आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होईल अशी अपेक्षा दाखवून दरवेळी आर्थिक संकल्पात याच सामान्य नागरिक सोपवन्यात यश कस येईल यावर जोर द्यायचा.

    बहुचर्चित उद्योगपती अदानी यांचं एवढं काही गैरव्यवहार बाहेर येत असताना कधीकाळी अदानींसारख्या लोकांना भारत सरकारचा नेहमी पाठिंबा दर्शवनारे पंतप्रधानपदि विराजमान असलेले नरेंद्र मोदी काही बोलत का नसावे ?

    लाल सलाम !

    तेच दुसऱ्या बाजूला त्यांच्या अर्थमंत्री कसलाही खुलासा न करता फक्त जनतेला समधानकारक असं वक्त्व्य करत भारताची कसल्याच प्रकारे आर्थिक हानी झालेली नाही असं स्पष्ट करतात या पक्षाची सगळी भूमिका पाहता असं नाही का वाटत पाणी इथेच कुठंतरी मुरतंय असं ?

    सामान्य नागरिकाच हित जपत स्वस्त साधन उप्लब्धिच भाषण देणारे कदचित विसरले असावं का कि इथं महागाई हि काँग्रेस काळापेक्षाहि  वाढली ते ?

    आणि जर खरंच हा पक्ष जर भ्रष्टाचारमुक्त आहे तर कोविड काळात संपूर्ण जनतेने दान केलेल्या PM CARE FUND च्या नावाखाली गोळा केलेल्या करोडों अब्जो रुपयांचा हिशेब का मिळत नसावा ?

    आणि जर हा निधी सरकारी नसून खासगी आहे तर याची जाहिरात या पक्षाचे लोक सरकारी यंत्रणांमार्फत का करत असावेत ?

    जगाला विकासचे स्वप्न दाखवणं आणि दुसरीकडे निर्भीड भाषण देत निडर पत्रकारिता आपल्या देशात असावी असं आव्हान करत पत्रकारितेचिच दमछाक करण कितपत योग्य आहे ?

    BBC माहितीपट बंद करून हा पक्ष त्यांची काही प्रकरणें लपवू इच्छितो का ?

    आणि जर हे पत्रकारि क्षेत्रांचा गैरवापर करत नाहीत तर का मग जगाला एकतेचा संदेश देणारी भारत जोडो यात्रा सुरु असताना पण त्यांना कव्हरेज देण्यात येत नव्हतं ?

    का सारखे-सारखे भारत जोडो यात्रेत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले ?

    हुकूमशाही चालवू पाहनारा हा पक्ष किती दिवस टिकेल हे पाहणंसुध्दा मजेशीर राहणार हे मात्र नक्की पण या पक्षाचा सत्ता-उतार होइपर्यंत भारत देश हा नुकसानाच्या बाबतीत ४-५ वर्षे मागे जाऊ नाही म्हणजे झालं !

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • सत्तेतला भस्मासुर ओळखणे गरजेचे – बेधुंदकार गोविंद पोलाड ( प्रवक्ता संभाजी ब्रिगेड नागपूर महानगर)

    मंडळी या लेखाच शीर्षक वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे लांब केस वाढवलेला, डोक्यावर शिंग असलेला, कपाळावर मोठा टिळा लावलेला आणि जोरजोरात हसून धोका दर्शवणारा एक भयानक चेहरा उभा राहला असेल.

    ज्याला आपण एकंदरीत राक्षस म्हणतो. ज्याने भगवान शंकराची घोर तपश्चर्या करून त्यांना वरदान मागितल होत, की मी ज्या वस्तू किंवा प्राण्यावर हात ठेवेल ती भस्म व्हायला हवी आणि मग त्या राक्षसाच नाव भस्मासुर अस पडल.

    पण आश्चर्य अस की,हे वरदान प्राप्त करण्यासाठी ज्या महादेवाची त्याने तपश्चर्या केली होती, त्याच महादेवाला भस्म करण्याचा प्रयत्न या भस्मासुराने केला होता अस आपण विविध दैविक मालिकांमध्ये बघत असतो. 

    बाळासाहेब ठाकरेंनी सोनू निगम ला मारण्यासाठी का पाठवले होते शिवसैनिक? निलेश राणेंनी केला होता आरोप.

    मंडळी सांगायच तात्पर्य अस, की भस्मासुर नावाचा हा राक्षस दैवी काळामध्ये जरी मारल्या गेला असला तरी तो दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या आमच्या आजूबाजूला आजही रुप-वेश बदलून वावरत असतो.

    हे भस्मासुर कित्येक काळ जनता नावाच्या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी घोर तपश्चर्या करत असतात आणि मग हा ईश्वर त्यांच्यावर मतदानाच्या दिवशी प्रसन्न होऊन त्याला वरदान देतो.

    मग तपश्चर्या करणाऱ्या त्या व्यक्तीतला भस्मासुर जागा होतो आणि सतत पाच वर्षे तो इथल्या ईश्वर नावाच्या जनतेला दगा देऊन भस्म करत असतो.

    प्रबोधनकारांचे कुळ की पुरंदरेचे गोत्र? – गंगाधर बनबरे ( संभाजी ब्रिगेड)

    कधी तो शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरवतो, कधी विद्यार्थ्यांच्या ऐन वेळेवर परीक्षा रद्द करतो , कधी तो ऐन रात्री नोटबंदी करून देशातील जनतेला तासन्तास बँकेच्या रांगेमध्ये उभं करून १४३ लोकांचे जीव घेतो,

    कधी ऐन वेळी लॉकडाऊन जाहीर करून परराज्यातील लोकांना हजारो मैल पायदळ चालण्यास भाग पाडतो तर कधी शेतकऱ्यांवर बळजबरीने कानून-कायदे लादून त्यांच्यावर हल्ले करून दिल्लीमध्ये रस्त्यावर स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन करायला लावतो

    आणि मग त्यांना ‘आंदोलनजीवी’ , खलिस्तानी, पाकिस्तानी म्हणायला लागतो तेव्हा मला इथल्या सरकार मध्ये, इथल्या गप्प बसून पगार घेत असलेल्या नेत्यांमध्ये भस्मासुर दिसून येतो. 

    मंडळी आपण प्रत्येकाने आपापल्या आजूबाजूला फिरणारे भस्मासुर लक्षात घेणे गरजेचे आहे. तो नेत्यांमध्ये किंवा सरकारमध्येच आहे असेही नाही.

    स्त्रियांना प्रेमाच्या नावाखाली प्रभावित करून तिच्या इच्छेविरुद्ध तीच शारीरिक शोषण करणाऱ्यांमध्ये किंवा बलात्कार करणाऱ्यांमध्ये भस्मासुर आजही जिवंत आहे.

    तुमच्याशी गोडगोड बोलून स्वतःच काम झाल्यानंतर पाठ फिरवणाऱ्याध्ये भस्मासुर जिवंत आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या आजूबाजूचे भस्मासुर ओळखा आणि स्वतःला भस्म होण्यापासून वाचवा.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • कारगिल युद्धाचा थरारक इतिहास

    मंडळी भारतीय देशातील जनता हे शेतीच्या बांधावरील किसान आणि देशाच्या सीमेवरील जवान या दोन लोकांमुळे सुरक्षित आहे. देशावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं तरी किसान आणि जवान सर्वात आधी त्या संकटाला सामोरे जात असतात.

    आजपर्यंत या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय देशाच्या सिमवेर अनेक युद्ध झालेत. मात्र १९९९ साली झालेलं कारगिल युद्ध आठवलं की शहीद आणि जखमी झालेल्या भारतीय जवानांना आठवून काळीज आजही ठप्प होत.

    आज आपण याच कारगिल युद्धाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी झालं असं की, कारगिल युद्ध हे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झालं होतं. सण १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर दोनही देशांमध्ये निरंतर संघर्ष सुरू झालेला होता.

    गोधरा हत्याकांड आणि गुजरात दंगल- एक न उलगडलेलं कोडं…

    अनुचाचण्यांमुळे सीमेवर तणावही वाढला होता. हा तणाव थांबवण्यासाठी दोनही देशांनी समजदारी घेतली आणि लाहोर येथे १९९९ साली फेब्रुवारीमध्ये घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. या घोषणापत्रामध्ये दोन्ही देश काश्मीरच्या मुद्द्यावर शांततापूर्ण निर्णय घेतील असा करार करण्यात आला होता.

    मात्र पाकिस्तानने भारतासोबत दगाबाजी केली. आणि पाकिस्तानी सैनिकांनी भारतामध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेज मुश्रफ यांनी पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री नवाज शरीक यांना न सांगता युध्दाची आखणी केली होती.

    पाकिस्तानने विशेष ऑपरेशन हातामध्ये घेऊन आर्मी जवान आणि अर्ध सैनिक दलासोबत भारतामध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली. 

    सोनिया, उध्दव आणि पांडवांची पाच गाव – ज्ञानेश वाकुडकर

    पाकिस्तानने घुसखोरी करायला सुरुवात केल्याचे लक्षात येताच भारताने दोन लाख सैनिक सीमेवर पाठवले. आणि अखेर लदाखच्या कारगिलमध्ये तब्बल ५९ दिवस हे युद्ध चाललं.

    ज्यामध्ये भारताचे एकूण ५५० जवान शहीद झाले आणि जवळपास एक हजार जवान जखमी झाले होते. जवळपास दोन महिने चाललेल्या या युद्धामध्ये भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय मिळवला.

    आणि पाकिस्तानला सडो की पडो करून लावलं. या लढाईत शहीद होणाऱ्या सर्व वीर क्रांतिकारकांना सलाम.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • गोधरा हत्याकांड आणि गुजरात दंगल- एक न उलगडलेलं कोडं…

    मंडळी भारतीय देशामध्ये आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मा-धर्मांमध्ये दंगे भडकवण्याचं काम राजकीय नेते करत असतात. पण गोधरा हत्याकांड आणि त्यानंतर घडलेली गुजरातमधील हिंदू-मुस्लिम दंगल आठवली तर आजही अंगावर शहारे येतात.

    या प्रकरणाबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी झालं असं की, १९९२ ला अयोध्येमध्ये घडून आलेला बाबरी मस्जिद आणि राम मंदिराचा वाद हा २००२ मध्येसुध्दा संपलेला नव्हता. हे साल होत २००२.

    जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री लालू यादव होते. अयोध्येतील बाबरी मस्जिदीच प्रकरण घडून जवळपास १० वर्ष झाली होती. पण तरीही अयोध्येमध्ये विश्व हिंदू परिषदेने एक आंदोलन केलं होतं.

    सोनिया, उध्दव आणि पांडवांची पाच गाव – ज्ञानेश वाकुडकर

    जे आंदोलन संपल्यानंतर दिनांक २६ फेब्रुवारी २००२ ला विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अयोध्या ते गोधराच्या ट्रेनमध्ये परतीच्या प्रवासाला निघाले होते.

    त्यानंतर सकाळी जवळपास ३ वाजताच्या सुमारास गोधरा अगोदर येणाऱ्या एका स्टेशनमधला एक चहावाला ट्रेनच्या बोगीमध्ये चहा विकण्याकरीता चढतो. त्याच्यामध्ये आणि विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये वाद होतो.

    चहावाला बोगीच्या बाहेर पडतो आणि आपल्या मित्र मंडळींना गोधरा स्टेशनवर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांशी जाब विचारण्याकरिता तयार राहण्यास सांगतो. गोधरा स्टेशन येताच हा वाद टोकाला जातो.

    आणि ज्या बोगीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत म्हणजेच एच फाईव्ह व एच सिक्स बोगीवर दगडफेक करण्यात येते व त्यानंतर बोगीला आग लावण्यात येते. या प्रकरणात जवळपास ५९ लोकांचा मृत्यू होतो. मात्र या प्रकरणावर नेमलेल्या कमिटींचे वेगवेगळे रिपोर्ट येतात.

    राष्ट्रगीतामधल्या ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याचा वाद आणि राष्ट्रगीताचा इतिहास

    ज्यामधील एका रिपोर्टमध्ये म्हटल्या जात की हा वाद चहावाला आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. दुसऱ्या रिपोर्टमध्ये म्हटल्या जात की, शॉर्ट सर्क्युट झाल्यामुळे ट्रेनच्या बोगीला आग लागली आणि लोकांचा मृत्यू झाला. तिसऱ्या रिपोर्टमध्ये म्हटल्या जात की, हे प्रिप्लॅन केलेलं प्रकरण होत.

    अचानक घडलेली गुजरात दंगल

    मंडळी हे प्रकरण हळूहळू संपूर्ण देशात पसरल्या जात. आणि सोशल मीडियावर याला हिंदू-मुस्लिम वादाच नाव दिल्या जात. आश्चर्याची गोष्ट अशी की मृत असलेल्या ५९ लोकांचे प्रेत हे त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द न करता अहमदाबादला एका ट्रकमध्ये खुल्याने नेण्यात येतात.

    जेणेकरून हिंदू-मुस्लिम वाद वाढावा आणि दंगल पेटावी. गुजरात जवळपास सलग तीन दिवस हिंदू-मुस्लिम दंगलीमध्ये पेटत राहत. एकूण बाराशे लोकांचा मृत्यू होतो. १५०० दंगलखोरांवर गुन्हे दाखल होतात. मात्र जसजसे दिवस आणि वर्षे उलटत जातात.

    एकूण १५०० पैकी फक्त ३१ लोकांना शिक्षा सुनावली जाते व इतर आरोपींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन देण्यात येतो.२०११साली ३१ पैकी ११ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात येते व उर्वरीत २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते.

    मात्र २०१७ ला परत कोर्टाकडून फाशीची शिक्षा झालेल्या ११ आरोपींना फाशी रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. म्हणजेच मंडळी गोधरा हत्याकांड आणि गुजरातमधील हिंदू-मुस्लिम दंगल यामध्ये नक्कीच मोठ्या राजकीय नेत्यांच्या हात आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राष्ट्रगीतामधल्या ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याचा वाद आणि राष्ट्रगीताचा इतिहास

    मंडळी आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू आणि कुठल्याही क्षणी भारतीय देशाच राष्ट्रगीत कानावर पडलं तर आपोआपच अंगावर शहारे येऊ लागतात. कारण राष्ट्रगीत हे आपल्या देशाचा गौरव आहे. मात्र या राष्ट्रगीताचा इतिहास नेमका काय आहे?

    आणि यामधल्या ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याला भारतीयांकडूनच का विरोध झाला होता? याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी भारतीय देशाचं राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी १९११ साली लिहिलं आहे. मात्र त्याअगोदर बकीमचंद्र चॅटर्जी यांनी १९७५ साली लिहिलेलं ‘वंदे मातरम’ हे आपल्या देशाचं राष्ट्रगीत होत.

    रवींद्रनाथ टागोर यांच्यावर त्यावेळी असा आरोप झाला होता की त्यांनी ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत ब्रिटिश राजे जॉर्ज पंचम यांच्यासाठी लिहिलं होतं. यावरून रवींद्रनाथ टागोर यांची मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

    तर मंडळी झालं असं की, २६ डिसेंबर १९११ला कलकत्ता येथे काँग्रेसच्या एका अधिवेशनामध्ये ब्रिटिश राजे जॉर्ज पंचम यांचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी या गीताचा वापर करण्यात आला होता.

    आणि यामध्ये ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्यानुसार जॉर्ज पंचम यांना टागोर यांनी भारताचा भाग्य विधाता संबोधल्याचा आरोप लोकांनी केला होता. या प्रकरणावर अनेक लोकांनी टागोर यांची टीका केली. मात्र त्यांनी यावर काही एक उत्तर न देता त्यांनी शांतता ठेवली होती.

    अखेर १९३७ मध्ये टागोर यांनी स्पष्ट केलं होतं की, या गीतामध्ये मी भाग्य विधाता हे ईश्वराला संबोधलं आहे. त्यानंतर टागोर यांचा १९४१ साली मृत्यू झाला.

    ‘जन गण मन’ राष्ट्रगीत म्हणून मान्यता

             

    सण १९७५ मध्ये बकीमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताला मोहम्मद अली जिना यांच्या मुस्लिम लीग पार्टीचा विरोध होता. मात्र भारतीय देशाच्या स्वातंत्र्यानंतर ना मोहम्मद जिना भारतात होते ना त्यांची मुस्लिम लीग पार्टी.

    अखेर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली २४ जानेवारी १९५० रोजी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘जन गण मन’ या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्यात आली.

  • राजमुद्रेवरील सिंह रागीट का?अनावरण हिंदू धर्म पध्दतीने का? प्रधानमंत्र्यांवर नेटकऱ्यांची टीका…

    मंडळी ११ जुलैला भारतीय देशाच्या नव्या राजमुद्रेच अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र मोदींनी केलेल्या अनावरणावर आणि नव्याने तयार केलेल्या राजमुद्रेवर सुरू झालेल्या विवादाला आता चांगलच उधाण आलं आहे.

    संसदेच्या नव्या इमारतीवर बसवलेल्या राजमुद्रेवरील सिंहांचा देखावा बदलून तो रागीट करण्यात आल्याचा दावा अनेक राजकीय नेत्यांनी व राजकीय समीक्षकांनी केला आहे. सारणातच्या अशोक स्तंभावर असलेल्या राज्यमुद्रेवरील सिंह हे रागीट आणि अतिशय उग्र दिसतात.

    अशाप्रकारची टीका अनेक राजकीय नेत्यांनी केली आहे. यावर तेलंगणा राष्ट्रसमितीचे नेते वाय. सतीश रेड्डी यांनी मोदी सरकारवर टीका करत म्हटलं आहे की,

    ” अशोकाचे सिंह आता सुळे दाखवतांना दिसत आहेत? मोदी सरकारने ही नवीन भर घातलेली दिसतेय.”

    असा प्रश्न रेड्डी यांनी मोदी सरकारला केला आहे.
    त्यांनंतर नरेंद्र मोदी यांनी या राजमुद्रेचे अनावरण हिंदू धर्म पद्धतीने पूजा अर्चा करून केले आहे. या देशामध्ये हिंदूधर्मव्यतीरीक्त इतर धर्मसुद्धा राहतात.

    भारतीय संविधानाच्या प्रास्तविकामध्ये धर्मनिरपेक्ष या तत्वयुक्त शब्दाचा प्रयोग असतांना देशाच्या प्रधानमंत्र्याने अशा प्रकारचं असंविधानिक कृत्य करणे कितपत योग्य आहे? अशाप्रकारचा प्रश्नसुद्धा समाज माध्यमांवर नेटकऱ्यांकडून केल्या जात आहे.

    अनावरण प्रधानमंतत्र्यांनीच का केलं?

    मंडळी ११ जुलैला भारतीय संसदेच्या इमारतीच्या राजमुद्रेच अनावरण हे प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते करण्यात आल्याने एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

    ” राजमुद्रेच अनावरण हे लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते न होता प्रधानमंत्र्यांच्या हस्ते का करण्यात आलं?”

    असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर अनेक विवाद निर्माण झाले आहे.

  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    स्त्रि अबला नसून जगाने दखल घ्यावी असा राज्यकारभार चालवून स्त्रि सक्षमीकरणासाठी एक उत्तम उदाहरण आणि सर्व वाईट रुढी परंपरांना जातिप्रथांना विरोध करणाऱ्या, सर्वधर्मसमभाव माननाऱ्या, मानवतावादी, समाजहितैषी,  व्यापक दूरदृष्टिकोन असणाऱ्या तत्त्वज्ञानी बहुजनहितकारिणी प्रजाहितदक्ष आदर्श महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – मनोज गावनेर

    अहिल्यामाई स्त्रि सक्षमीकरणाच्या सर्वात मोठ्या प्रतिक आहेत कारण त्यांनी सत्ता हाती घेऊन सर्वसमावेशक पणे राज्यकारभार चालवला. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज घडविले आणि या राजांनी आपल्या स्वराज्यात स्त्रि सक्षमीकरणाचा पाया घातला.

    पुढे मल्हारराव होळकर या मराठा सुभेदारांनी अहिल्यामाईंना आपली सुन म्हणून पराक्रमी खंडेरावांशी विवाह लावून दिला. मल्हाररावांनी आपल्या निरिक्षक नजरेने अहिल्याबाई होळकर यांच्या मधील गुण पारखले होते.

    खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांनी अहिल्यामाईंना सति न जाऊ देता प्रशासनात सामिल केले आणि मल्हाररावांच्या मृत्यूनंतर स्वतः अहिल्यामाईंनी संपूर्ण राज्यकारभार आपल्या हाती घेऊन शिवबांनी स्थापिलेल्या स्वराज्य रक्षणाच्या कार्यात मोलाचा हातभार लावला.

    त्या स्वतः विधवा असुन त्याकाळी राज्यकारभार चालविला आणि वाईट रुढी परंपरांना न जुमानता स्त्रियांसाठी न्याय्य भुमिका घेतली. पण आजही कुठे कुठे पुरूषी मानसिकतेमुळे स्त्रियांना गुलामासारखी वागणूक दिली जाते आणि स्त्रियांनी फक्त घरापुरते मर्यादित समजल्या जाते किंवा फक्त त्यांनी सांगितले तेवढे करावे, प्रश्न विचारू नये असे संकुचित जगणे करतात.

    पण स्त्रियांमध्ये नवनिर्मिती करणे, मुलांवर संस्कार करणे इत्यादी क्षमता असते आणि मनात आणले तर एकटीच खंबीरपणे घरदारही चालवू शकते तेवढेच नाहि, तर उत्तम शासनकर्ती सुद्धा होऊ शकते.

    सत्तापिपासु औरंगजेब

    अहिल्यामाईंनी अनेक तलाव, विहिरी, पाणपोई, घाट, पांथशाळा, आश्रयशाळा, अन्नछत्रे बांधली, तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा बांधून अनेक समाजोपयोगी कामे केली आणि वास्तुशिल्प व कलाकुसरीचा उत्तम नमुना म्हणून मंदिर, दर्गा ई. बांधून ते सर्व जातिंसाठी खुले केले आणि त्यामाध्यमातून कारागिरांच्या, कलाकारांच्या कार्याला वाव मिळवून दिला त्याचबरोबर गोरगरिब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले.

    त्यांनी काव्य, संगित, कला, उद्योग ई. कारागिरांना, कलाकारांना, मूर्तिकारांना आश्रय देऊन त्यांना सन्मान व वेतन देऊन ते जपण्याचे, वाढवण्याचे काम केले.

    अहिल्यामाईंनी राजकारणातील बारकावे व तत्त्व व्यावहारिक निती नियम व सूत्रे आपल्या राज्याची राजकीय, सामाजिक, भौगोलिक स्थिती, रणांगणावरील आखाडे व अडचणी आणि बारकावे आधीच समजून घेतले होते.

    त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व प्रजेची चोर, दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत, अशा लुटारू लोकांना गायी, म्हशी आणि जमीनी दिल्या व त्यांचे मत परिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला.

    भिल्लांना भिलकवाडी कर घेण्याची परवानगी दिली. अहिल्यामाई सामाजिक वास्तव नाकारत नसे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जात असे.

    त्यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्वपरिचित होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता आणि न्यायदानात विलंब करणे म्हणजे न्याय नाकारणे हे तत्त्व त्यांना माहित होते.

    अहिल्यामाईंनी स्वतःच्या कवायतीत ५ हजार स्त्रियांची तुकडी उभी केली होती. ज्यावेळी राघोबा पेशवाने आक्रमण केले होते त्यावेळी ही तुकडी लढण्यासाठी सज्ज केली होती.

    तेव्हा राघोबा पेशवाला काय करावे कळेना कारण हरलो तर स्त्रियांकडून हरू आणि जिंकलो तरि स्त्रियांकडून जिंकण्यात कसला पराक्रम असे पेशवाला वाटले म्हणून त्याने माघार घेत तह केला. येथे अहिल्यामाईंच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे दर्शन जाणवते.

    आणि बाबरी पाडल्या गेली…

    पण सद्या देशातील प्रस्थापित जातिय तेढ निर्माण करण्यासाठी हिंदू – मुस्लिम, मराठा – धनगर, आदिवासी – धनगर, मराठा – OBC अशा प्रकारची भांडणे लावण्यासाठी कारस्थाने रचत असतात आणि यासाठी आपल्यातीलच बहुजनांमधील काहींचा हस्तक म्हणून वापर करत असतात आपण त्यांना वेळीच ओळखून सर्वसमावेशक वैचारिक भुमिका घेतली पाहिजे.

    कारण आपल्या देशात देशाचे संविधान जाळल्या जाते तरि जाळणाऱ्यांना काहीच होत नाही पण एखादा धर्मग्रंथ जाळला असता तर रक्तपात केल्या गेला असता. संविधानावर विश्वास ठेवणारे हिंसेचे समर्थन कधीच करत नाही म्हणून लोकशाहीमध्ये हिंसा हि कुठल्याही गोष्टिसाठी होत असेल तरि ती घातकच असते.

    म्हणून अशावेळी आपण आपल्या महामानवांच्या विचारांचा जागर करणे गरजेचे आहे. त्यांना समजून घेऊन त्यांनी सांगितलेला मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारणे अतिशय गरजेचे, महत्त्वाचे असते. अहिल्यामाईंनी केवळ एका जातिपुरते राज्यकारभार चालविला नाही किंवा एका जातिपुरते कार्य केले नाही.

    अहिल्यामाईंनी आपल्या मुलीचा विवाह गुणी, शुर, पराक्रमी यशवंतराव फणसे या तरुणाशी लावून दिला होता. त्यांच्या राज्यात जातिप्रथेला थारा नव्हती कारण त्या शिवबांच्या स्वराज्याचे सुराज्य करण्याच्या हेतुने राज्यकारभार सांभाळत होत्या. म्हणून त्यांना केवळ एका जातिच्या चौकटित बंदिस्त करणे हा त्यांचा सर्वात मोठा अपमानच ठरेल. 

    सावित्रीबाई फुले यांनी अहिल्याबाई होळकर यांचे नाव देऊन वृद्धाश्रमाला अहिल्याश्रम नाव दिले, शाहु महाराजांनी पहिला दवाखाना अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ काढला. आपल्या बहुजनांच्या महामानवांचा इतिहास पाठ्यपुस्तकात सामिल करणे गरजेचे आहे.

    सद्या कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रतिनिधित्व मिळणे महत्त्वाचे असते म्हणून प्रशासनात सामिल होणे तर महत्त्वाचे असतेच पण आरक्षणाला फोल ठरवून विनापरिक्षा काही भांडवलदारी पिलावळांना क्लास वन सारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केल्या जाते, आपल्या हक्काच्या जागा इतरांना दिल्या जाते हे एकप्रकारे आपले शोषणच असते म्हणून या गोष्टिला प्रखर विरोध करावा लागतो.

    परिवर्तनासाठी प्रशासनासोबतच स्वार्थरहित पणे राजकारणात सक्रिय होऊन बहुजनांनी प्रतिनिधित्व करणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. स्वार्थ त्यागासाठी आपल्या महामानवांचे उच्च उदात्त खरे विचार समजून घेऊन आत्मसात करणेही सर्वात महत्त्वाचे आहेच.

    अहिल्यामाईंनी आपल्या शासनव्यवस्थेत टपाल सेवा, पाणी व्यवस्थापणाची आताही अनुकरणीय असे जलव्यवस्थापन, गावातील तंटा गावातच मिटावे यासाठी तशी व्यवस्था गावागावात करणे, आता कौशल्य भारताची हवेत होणारे काम आहे पण अहिल्यामाईंनी त्यावेळी कौशल्य निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली होती.

    आताच्या अनेक शासकिय प्रकल्पामध्ये अनेक भांडवलदारांचे हितसंबंध गुंतलेले आहे पण त्यावेळी अहिल्यामाईंनी फक्त गोरगरिबांना रोजगारासाठी, कारागिर, कलाकार यांच्या उत्कर्षासाठी आणि सामान्यजनांच्या उपयोगासाठी कामे केली.

    अहिल्यामाईंच्या जीवनात अनेक दुःखद प्रसंग आले. त्यांचा पति, सासरा, मुलगा, जावाई, मुलगी, नातू असे एक एक मृत्यूमुखी पडत गेले पण तरिही त्यांनी संयम ढळू न देता धैर्य बाळगून आलेल्या संकटाला खंबीरपणे तोंड दिले आणि आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत गेल्या.

    अहिल्यामाईंच्या कार्यकर्तृत्वापासून व विचारांपासून संयम सुद्धा बाळगुया आणि स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत कोरोनारूपी आलेल्या संकटाला खंबिरपणे तोंड देऊया. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.. शत् शत् नमन् .. जय मल्हार..

    ✍🏻 – मनोज गावनेर

       मंगरूळ चवाळा (अमरावती)

       9730408891

    (सदर लेखातील तथ्यांव्यतिरिक्त मांडलेले विचार माझ्या अल्प अनुभवातून मांडले आहे तरि त्यात काही चुकीचे असल्यास किंवा काही त्रुटी जाणवल्यास लक्षात आणुन द्यावी ही नम्र विनंती)

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड

    महाराष्ट्रतल्या संपूर्ण मतदारसंघातील माझ्या शेतकरी कष्टकरी कामगार बापाच्या मुलांना विनंती आहे. आपल्या समाजातील विकास हा शेती शिक्षण रोजगार या तीन मूलभूत घटकांवर आधारलेला आहे.

    पण गेल्या कित्येक वर्षांपासून इथल्या राजकीय पक्षांनी नागरिकांना रस्ते शोषखड्डे, बसस्टॉप, मंदिर- मस्जिद बांधण्याचा विकास दाखवून मूर्ख बनवलं आहे. एखाद्या रुग्णाला अचानक कुठला आजार आढळला तर जवळपास कुठले मुबलक हॉस्पिटल नसल्याने सरळ मोठ्या शहरात न्यावे लागते.

    पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये

    यामध्ये कित्येक रुग्णांनी अर्ध्या रस्त्यातच जीव सोडल्याचा घटना आपण बघितल्या आहे. शिक्षण घेण्यासाठी शेतकरी मायबापाला आपली मुलं डिग्रीच्या शिक्षणासाठी बाहेर पाठवावी लागतात आणि भरमसाठ पैसा खर्च करावा लागतो.

    शिक्षण पूर्ण झालं की रोजगार नाही. मग पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये आपलं कुटुंब सोडून इथली मूल जातात. नाहीच तर मनाला शांती मिळायसाठी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा बहाना आहेच.

    नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य

    याहीव्यतिरिक्त आसपासच्या शहरात कम्प्युटर ऑपरेटरची 6 हजार पगाराची जॉब आहेच. शाळा आणि कॉलेजमध्ये प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करणारी मुलं 6 हजाराची जॉब करतात हे न पटण्यासारखे आहे.

    कुठल्याही पक्षाला किंवा संघटनेला विरोध नाही. तुम्ही कुठल्याही पक्षाचे कट्टर असाल, कार्यकर्ते असाल. मात्र जाती- धर्माच्या नावावर किंवा साहेबांनी रस्ते बांधून विकास केला अशा भ्रमात राहू नका.

    भगतसिंगाने ब्रिटिश प्रशासनाविरोधात जसा इंकलाब केला होता. तोच इंकलाब इथल्या प्रत्येक तरुणाकडून झाला तर भविष्य प्रकाशमय आहे. अन्यथा गुलामी स्वीकारावी लागेल. 

            जय हिंद इंकलाब🇮🇳

    – बेधुंदकार गोविंद पोलाड
         सामान्य नागरिक

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir