Author: admin

  • युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणणार- बाळासाहेब थोरात

    युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणणार- बाळासाहेब थोरात

    मंडळी रशिया आणि युक्रेनमधला वाद आता युद्धापर्यंत येऊन ठेपलेला आहे. रशियाने युक्रेनवर चारही बाजूने हल्ले केले. त्यात ७४ लष्करी तळ उध्वस्त झाले असून ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाले आहे. रशियाने युक्रेनवर केलेला हा हल्ला अतिशय निंदनीय असल्याकारणाने आसपासच्या देशांनी युक्रेनला मदत करायचे ठरवले आहे.

         युक्रेनमधील नागरिकांची परिस्थिती पाहून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक व तसेच विद्यार्थी हे अडकून पडलेले आहेत. त्यांना परत मायदेशी आणण्याबाबत विविध उपाययोजना केल्या जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. याविषयी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे.

    काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

    मंडळी युक्रेन आणि रशियामध्ये चालू असलेला वाद हा युक्रेनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या जीवावर उठला आहे. मात्र बाळासाहेब थोरात यांनी युक्रेनमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा दिला आहे.

           बाळासाहेब थोरात म्हणाले की,

    ” अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकार परराष्ट्र मांत्रालय विभागाच्या संपर्कात आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनाही यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत. तसेच, अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनीसुद्धा माझ्याशी सम्पर्क साधला आहे. माझे कार्यालय हे निरंतरपणे परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहे. काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझी याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनीसुद्धा सर्व यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी फार मोठ्या संख्येत आहेत. महाराष्ट्राची संख्या मोठी आहे म्हणून राज्यसरकरने केंद्र सरकारसुद्धा विनंती केली आहे.”

     अस ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगत होते. युक्रेन आणि रशियामध्ये पेटलेल हे युद्ध जरी कुठल्याही थराला गेलं, तरी आपण सर्वे सर्वांच्या रक्षणासाठी प्रार्थना करूयात.

  • महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबावतंत्राचा वापर होतोय- नाना पटोले

    महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबावतंत्राचा वापर होतोय- नाना पटोले

                 मंडळी नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याने ते राजकिय रणधुमाळीत चांगलेच चर्चेत आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी काही कालावधीपासून कठोर भूमिका घेतलेली आहे.
     
              भाजप नेत्यांचा राजकरणातला भोंगळ कारभार पुढे आणेल आणि हा महाराष्ट्र भाजपमुक्त करेल. अस त्यांनी बरेचदा म्हटलं आहे. मोदी साहेबांची टीका केल्याकारणाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नाना पटोले यांचा पुतडा जागोजागी जाळून त्यांचा विरोध केला होता.
     
                 त्याकारणाने नाना पटोले जास्तच चर्चेत आले होते. मात्र आता नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर बोलत असतांना चांगलाच हल्लाबोल केला आहे. 

    काय म्हणाले नाना पटोले? 

                 नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधत चांगलाच कडाडून विरोध व्यक्त केला आहे.
     

    ” महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्राचा वापर होतोय, हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही भाजपची सर्व काळी कृत्ये जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. भाजपाला महाराष्ट्रातील जनता त्यांची जागा दाखवेल. आज त्यांचा वेळ आहे पण वेळ बदलेल ना, हे काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत.”

     
    अस म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नाना पटोले म्हणाले की
     

    “महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी अनेकदा प्रलोभन आणि दबावतंत्राचा वापर झाला. हा खऱ्या अर्थाने मोठा आक्षेप आहे. कोणाच्या इमारती किती आहेत? कोणी काय केलं? हे सगळे भाजपावाले दुधाने धुतलेले आहेत अस तर नाही.”

                  अशी धुवाधार टीका नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर केली. मात्र आता भाजपा नाना पटोले यांच्या आरोपांवर काय उत्तर देईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • संजय राऊतांना वाटत की त्यांचं भांडूपंच घर आणि मातोश्री म्हणजे महाराष्ट्र आहे- अतुल भातखळकर

    संजय राऊतांना वाटत की त्यांचं भांडूपंच घर आणि मातोश्री म्हणजे महाराष्ट्र आहे- अतुल भातखळकर

               मंडळी संजय राऊत यांनी दिनांक १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस, मोहित कंबोज, निल सोमय्या अशा अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका केली होती.
     
                  मात्र भाजप नेत्यांकडून राऊत यांच्या आरोपांचा कडाडून विरोध होत आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपच्या साडे तीन नेत्यांचा उल्लेख केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर निशाणा साधला होता.
     
              देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
     

    “गेल्या कित्येक कालावधीपासून सातत्याने पोलिसांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भारतीय जनता पार्टी संघर्षाला कधीच मागे हटलेली नाही. आम्ही नेहमी लढत राहू आणि विरोधात बोलत राहू.”

     
     
           अस ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगत होते. अशाच प्रकारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा विरोध केला आहे.
     

    भातखळकरांचा राऊतांवर हल्लाबोल

                 संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला. मात्र भारतीय जनता पक्षाने संजय राऊत यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. देवेंद्र फडणवीसानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रतिउत्तर दिल आहे.
     
             ते म्हणाले की,
     

    ” संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र आहे का? मुंबई महानगरपालिकेत सोडा, पण नगरपालिकेच्या निवडणूकीतही संजय राऊत कधी निवडून आलेले नाहीत. आमच्यासोबत युती केल्याशिवाय यांना कधी १०० जागा मिळाल्या नाहीत. संजय राऊतांना वाटत की, त्यांचं भांडूपंच घर आणि मातोश्री म्हणजे महाराष्ट्र आहे. गौरसमजात राहू नका. महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाहीत. राऊतांनी महानगरपालिकेची एक तरी निवडणूक लढवावी. आयुष्यभर तुम्ही राज्यसभेत गेला आहात. राऊत-उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाहीत.”

     
            अस भातखळकर म्हणाले. मात्र यावर शिवसेनेकडून किंचा संजय राऊत यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत आलेली नाही. आता हे तापलेल राजकीय वातावरण कुठल्या थरावर जात. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
  • शिवसेना नेत्यांवरील कारवाईचा विरोध करण्यासाठी संजय राऊत यांची पत्रकार परिषद – देवेंद्र फडणवीस

    शिवसेना नेत्यांवरील कारवाईचा विरोध करण्यासाठी संजय राऊत यांची पत्रकार परिषद – देवेंद्र फडणवीस



                 मंडळी सम्पूर्ण महाराष्ट्रभरातील जसजशा महानगरपालिका निवडणूका जवळ येत आहे. तसतस राजकीय वातावरण आणखी पेटत चाललं आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना कारागृहात टाकण्याची भाषा करत आहेत ,तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत भारतीय जनता पक्षामधील नेत्यांना कारागृहात डाम्बण्याची भाषा करत आहे.
     
            संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना  भारतीय जनता पक्षाच्या साडे तीन नेत्यांचा उल्लेख केल्यानंतर भारतीय जनता पक्षामधील नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.
     
              किरीट सोमय्या यांना शिवसैनिकाकडून झालेल्या मारहाणीचा भारतीय जनता पक्षाने जागोजागी कडाडून विरोध केला होता. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. 

    काय म्हणाले फडणवीस? 

                  संजय राऊत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या मुद्द्यावर बोलत असताना फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. गेली दोन वर्षे ही मंडळी सातत्याने अशाच प्रकारच्या धमक्या देत आहेत. भाजपा संघर्षात कधीही मागे हटलेली नाही.
     
              अस देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केलंय. तसेच भाजप संघर्षाला तयार असल्याचं म्हणत त्यांनी राऊत यांना आव्हान दिलंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले गेली दोन वर्षे अशा प्रकारच्या धमक्या ही मंडळी सातत्याने देत आहेत. भाजपा संघर्षाला कधीही मागे हटलेली नाही.
     
                   पोलिसांचा उपयोग करून आमच्या नेत्यांना प्रचंड त्रास देण्यात आलाय. त्याची अनेक उदाहरण समोर आहेत. सातत्याने पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. आजची पत्रकार परिषदे ही शिवसेना नेत्यांवरील कारवाईचा विरोध करण्यासाठी घेण्यात आलेली आहे.
     
                अस देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं. मात्र हे तापलेल राजकीय वातावरण आता कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • हिंदुत्वाची परिभाषा माहीत नसलेले लोक आम्हाला हिंदुत्व सांगत आहेत- योगी आदित्यनाथ

    हिंदुत्वाची परिभाषा माहीत नसलेले लोक आम्हाला हिंदुत्व सांगत आहेत- योगी आदित्यनाथ

                       मंडळी राजकीय क्षेत्र हे केव्हा भारतीय देशामध्ये धार्मिक वातावरणात परिवर्तित व्हायला लागलं याकडे कुठल्याही नेत्याने लक्ष दिलं नाही. मात्र ते आणखी धार्मिकरीत्या कशाप्रकारे रंगवता येईल यावरच राजकीय नेत्यांचा हल्ली भर दिसून आलेला आहे.
                     देशात सद्ध्या ५ राज्यांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचा प्रचार चालू आहे. त्यानंतर आता १४ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार असून त्यासोबतच इतर चार राज्यांमध्येसुद्धा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उत्तरप्रदेशमध्ये चालू असलेलं निवडणूकीच वातावरण चांगलाच तापलं आहे.
     
                     उत्तर प्रदेशमध्ये चालू असलेल्या निवडणूकीच्या प्रचारभाषणामध्ये उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर कडाडून टीका केली आहे. प्रचार भाषणात बोलत असतांना त्यांनी राहुल गांधीवर टीका करत काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला. 
    काय बोलले होते राहुल गांधी? 
             मंडळी उत्तरप्रदेशमध्ये चालू असलेल्या निवडणूकांच वातावरण राजकीय दृष्ट्या अधिकच तापलं होत. राहुल गांधींनी काही दिवसांअगोदर भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत हिंदू आणि हिंदुत्व यातील फरक भाषणामधून व्यक्त केला होता.
     
             मात्र राहुल गांधींच्या या भाषणानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांचा चांगलाच विरोध केला होता. संपूर्ण भारतीय देशातून भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी प्रतिउत्तर देऊन राहुल गांधी यांची टीका केली होती. राहुल गांधींचा हाच मुद्दा योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील निवडणूकांमध्ये उचलून धरला आहे.
     
               भारतीय जनता पक्षाच्या प्रचार भाषणात काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधींवर टीका करत योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की,
     

    ” काँग्रेस पक्षाने आम्हाला हिंदू आणि हिंदुत्व यातला फरक समजावून देण्याची गरज नाही.”

     
    अस ते म्हणाले. आता उत्तर प्रदेशातील निवडणूकांमध्ये या वक्तव्याचा किती प्रभाव पडतो, हे येणारी वेळच ठरवेल. मात्र राहुल गांधी व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष याविषयी कोणती भूमिका घेईल हे अध्यापही स्पष्ट झालेलं नाही.
  • आमचं सरकार पडणारही नाही आणि मी झुकणारही नाही- संजय राऊत

    आमचं सरकार पडणारही नाही आणि मी झुकणारही नाही- संजय राऊत

             मंडळी मोठ्या मुश्किलीने बसलेल महाविकास आघाडीच सरकार जरी आजपर्यंत टिकून आहे. मात्र हे महाविकास आघाडीच सरकार बरखास्त करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून नेहमीच करण्यात आला आहे.
     
                     भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर गंभीर १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्या असल्याचा आरोप केलेला आहे.
     
                  शिवाय संजय राऊत यांची  लवकरच तुरुंगात रवानगी होणार असल्याच सोमय्या यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडीविरोधात नेहमीच आक्रमक राहलेले आहे.
     
               हे महाविकास आघाडीच सरकार कशाप्रकारे बरखास्त करता येईल याकडे त्यांचा कल जास्त प्रमाणात दिसून येतो. मात्र भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

    काय म्हणाले संजय राऊत? 

             शिवसेनेच्या सैनिकांकडून किरीट सोमय्या यांना मारहाण झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारसोबत विविध कारणातून वाद घालतांना दिसत आहे. मात्र शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्षाला चांगलाच जवाब दिलेला आहे.
     
            संजय राऊत म्हणाले की,
     

    “गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर निंदनीय आरोप केले जात आहेत. अपप्रचार करणाऱ्यांमुळे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असून त्यांची बदनामीही होत आहे. या अट्टल खोटारड्यांना कठोर कारवाई सामोरे जावे लागेल.”

     
            अस संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितल आहे. आता किरीट सोमय्या आणि संजय राऊत या दोघांमध्ये चालू असलेला हा वाद कुठल्या वळणावर जाईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम

    प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम

    रयत शिक्षण संस्थेचे,

    संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील

    जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म

    शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ

    ध्यापन कार्य

    १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर

    १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य

    शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

    शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२

    शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५

    शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८

    शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८

    सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१

    रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून

    रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून

    दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

    राजकीय कार्य

    १९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

    १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस

    १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य

    १९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस

    १९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य

    १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )

    १९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार

    महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

    मिळालेले सन्मान / पुरस्कार

    भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४

    स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९

    राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००

    विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१

    शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी

    शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

    भूषविलेली पदे

    रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य

    समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष

    अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष

    जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक

    म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष

    दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष

    महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

    प्रसिद्ध झालेले लेखन

    समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)

    शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२

    कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२

    शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३

    वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६

    महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७

    शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०

    शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२

    महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )

    नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )

    रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य

    चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

  • नक्कलेवर लढणारे बेअक्कल

    नक्कलेवर लढणारे बेअक्कल

             मंडळी राजकारणामध्ये अनेक नेते एकमेकांची नक्कल करतांना आपण बघत असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मा. अमोल मिटकरी असो. असे अनेक नेते भाषणादरम्यान किंवा संवाद करत असताना एकमेकांची नक्कल करून एकमेकांची खिल्ली उडवताना आपल्याला दिसतात. मात्र दिनांक २२ डिसेंबर २०२१ ला विधानसभेत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केलेल्या नक्कलेवरून चांगलाच गदारोळ झाला. एकीकडे दिल्लीमध्ये विरोध पक्षाच्या खासदारांच्या निलंबनाची मागणी सुरू आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षातील आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली .
    विधानसभेमध्ये राज्यातील वीज कापणी संदर्भात चर्चा सुरू असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही विधानांचा संदर्भ देत म्हणाले की, \” मा. पंतप्रधान मोदी साहेबांनी म्हटलं होतं की परदेशात असलेला काळा पैसा देशात परत आणू. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये टाकू.\” परिणामी यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देतांना कमालच केली. ते म्हणाले की, \” मोदीसाहेब अस म्हणालेच नाहीत.\” यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हस्तक्षेप करतांना मा. पंतप्रधान मोदी साहेबांची नक्कल केली आणि म्हणाले की,\” २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी १०० वेळा म्हणाले आहेत की \’ काला धन लाने का की नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहा रखने का? यू ही रखने का\’ अस ते बोलले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली.
    मोदी साहेबांची नक्कल दिसली पण छत्रपती शिवरायांची विटंबना नाही दिसली फडणवीस साहेब?

                मंडळी छत्रपती शिवरायांच्या अस्मितेचा वापर भारतीय जनता पक्ष नेहमी राजकारणापुरताच करताना दिसतो. कारण त्यांना शिवरायांपेक्षा मोदीसाहेबांची अस्मिता  महत्वाची वाटते. हे काल विधानसभेत फडणवीसांच्या वर्तवणूकीवरून दिसून आलं. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवरायांच्या झालेल्या बदनामीवर देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. मात्र विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांनी मोदी साहेबांची नक्कल केली तर बेंबीच्या देठापासून ओरडून फडणवीस साहेब त्यांचा निषेध करत होते. आपल्या भाषणामधून फक्त शिवरायांच नाव घेणं हा त्यांचा राजकीय जुमला असतो हे लोकांच्या चांगलंच लक्षात आलं आहे.

  • सिरीयल किलर

    सिरीयल किलर

    हा कुणी माणूस नाही कुठलीही स्त्री नाही पण रोज एकाच वेळी लाखो लोकांचे जीव घेऊ शकतो आणि घेतोसुद्धा.रोज लाखो लोकांना तजवतो, मूर्ख बनवतो.आधी मानसिक अत्याचार करतो आणि मग मोठ्या शातीरीने तुमचा खून करतो. कुणाला कानोकान खबरही लागू देत नाही,
    याला कोणताही पोलीस अटक करू शकत नाही, कोणताही वकील ह्याच्याविरुद्ध मुकदमा चालवू शकत नाही,
    ह्याच्याकडे कुठल्याही प्रकारची दया नाही. हा लहान मुलांना मारतो , कुणाची बहीण , कुणाचा भाऊ , कुणाची माय, कुणाचा बाप ह्याला काही घेणं देणं नाही आणि खून करायची ह्याची वेगळीच तरकीब आहे. तुमच्याच घरी येतो ,तुमच्या टीव्हीमध्ये येतो, वर्तमानपत्रामध्येसुद्धा. पण तुम्ही याला ओळखू शकत नाही. अरे तुम्हीच काय ह्याला कुणीच ओळखू शकत नाही, हा रोज लाखो लोकांचे खून करतो आणि स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजलीही देतो. तुम्ही त्याला ओळखूनही त्याच्या अज्ञात आहात. हा अमर आहे. ह्याला तुम्ही जर मारल नाही तर हा कधीच मरणार नाही.
    हा.पण काही कालावधीन तो वेष बदलून दुसऱ्या माणसांच रूप घेतो आणि मग पुन्हा खून करतो तुमचा , तुमच्या स्वप्नांचा, तुमच्या कुटुंबाचा. विदर्भामध्ये आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीनं एसटीच्या पाससाठी बापाकडे पैसे नाही म्हणून जीव दिला ती आत्महत्या नव्हती,
    धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यान मंत्रालयात जाऊन विष घेऊन दिलेला जीव आत्महत्या नव्हती, नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर मधल्या शेतकऱ्याकडे मार्केटमधून घरी जाण्यासाठी पैसे नाही म्हणून दिलेला जीव आत्महत्या नव्हती, सोलापूर जिल्ह्यातील एका खेडेगावच्या मुलांन सांगितलं की \’माझ्या बापान गळफास घेऊ नये म्हणून मी रात्रभर बापाच्या बाजीचा ठाव्वा पकडून बसलो होतो \’ , ही मानसिक आत्महत्या नव्हती, उत्तर प्रदेशमध्ये सायकलच्या दोन दांड्याच्या मध्ये बायकोचा मृतदेह घेऊन जाताना हतबल झालेला माणूस, ज्या देशामध्ये तीन हजार कोटी रुपयांची मूर्ती आहे त्याच देशात बेड आणि ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून नवऱ्याला तोंडातून श्वास देणारी बायको, निवडणूकीच्या वेळेस जातीवादावरून होणारी समाजाची आत्महत्या, कर्जमाफीवरून होणारी शेतकऱ्यांची आत्महत्या ,अंधश्रद्धेविरोधात एल्गार पुकारणाऱ्या दाभोळकर ,पानसरे कलबुर्गीचा गेलेला जीव,
    उत्तर प्रदेशमधल्या नद्यांमध्ये वाहणारे तुमच्याच आप्तीकांच्या प्रेतांचे ढीग, दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा आंदोलनामध्ये जाणारे जीव ,जामिया जेएनयूसारख्या विद्यापीठांवर होणारे हल्ले , नोटबंदीच्या रांगेमध्ये गेलेले निर्दोष लोकांचे जीव, उद्या तुमचाही नंबर लागू शकतो कारण हा सिरीयल किलर दर पाच वर्षांनी वेष बदलतो तोही तुमच्याच हातून ,म्हणून

    सावधान राहा …

  • कर्नाटक वादावरून राजकीय पक्षांना अचानक कसा काय आला शिवरायांच्या अस्मितेचा पुडका?

    कर्नाटक वादावरून राजकीय पक्षांना अचानक कसा काय आला शिवरायांच्या अस्मितेचा पुडका?

    मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्र राज्यालाच नव्हे संपूर्ण देशाला आदर-सन्मान आहे. मात्र राजकीय नेते बहुधा शिवरायांच्या नावाचा वापर त्यांच्या सोयीनुसार करत असतात. शिवरायांची विटंबना झाल्यानंतर जिथे त्यांची बाजू कमी पडते तिथे ही लोक एकही विधान शिवरायांच्या समर्थानात करत नाही. काही काही बहाद्दर तर एवढे आहे, की चक्क आपल्या स्वार्थासाठी, आपली बदनामी वाच्यवण्यासाठी ज्या व्यक्तीने शिवरायांची विटंबना केली त्यालाच सोशल मीडियावरून समर्थन करत असतात. मंडळी शिवरायांची विटंबना करणं \’राजा शिवछत्रपती\’ या पुस्तकातून बाबासाहेब पुरंदरेपासून चालत आलंय. त्याची शिक्षा त्यांना चेहऱ्यावर काळ फासून घेऊन भोगावी लागली होती. मात्र त्यावेळी शिवसेनेचे नेते मा. उद्धवसाहेब ठाकरे, मनसे नेते राजसाहेब ठाकरे , राष्ट्रवादी नेते डॉ. अमोल कोल्हे , भाजप नेते देवेंद्र फडणवीस अशी खूप राजकीय मंडळी शिवरायांच्या विटंबना करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना समर्थन करत होती आणि करत सुद्धा आहे. अलीकडे गिरीश कुबेर नावाच्या व्यक्तीनेसुद्धा जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी राजेंची आणि शिवरायांची विटंबना \’द रेनेसन्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्रा\’ या पुस्तकामध्ये केली होती. त्यावर प्रतिउत्तर म्हणून दोन शिवप्रेमी मावळ्यांनी ९४ व्या तथाकथित अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या तोंडाला काळ फासल होत. मात्र गिरीश कुबेरांच्या या कृत्यावर राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते मा. शरद पवार साहेबांनी , मनसे नेते राज साहेब ठाकरेंनी, शिवसेना नेते मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी कोणीही विरोध किंवा निषेध दर्शवला नाही. उलट ट्विट करून सांगितल की साहित्य संमेलनामध्ये अतिथीच्या तोंडावर शाही फेकन निषेधार्थ आहे. भाजपाने गिरीश कुबेरांचा निषेध केला पण तो फक्त राजकीय स्वार्थासाठी. याच कारण अस की, याआधी शिवरायांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेला समर्थन देणारी भाजपच होती.

    कर्नाटकमध्ये शिवरायांची विटंबना झाल्यावर अचानक शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे,भाजपला अचानक पुडका कसा?

       मंडळी हेच या राजकीय नेत्यांच राजकारण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कर्नाटकमध्ये शिवरायांची बदनामी झाल्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे या सर्वांनी सोशल मीडियाचा माध्यमातून निषेध दर्शवला. निषेध दर्शवन वाईट नाही पण नुसत्या राजकीय स्वार्थासाठी शिवरायांच्या अस्मितेचा वापर करन वाईट आहे. कारण गिरीश कुबेर , बाबासाहेब पुरंदरे यांना शिवरांयांच्या बदनामीवर समर्थन करणारे हेच राजकीय पक्ष होते. म्हणून सम्पूर्ण जनतेने आता पूर्णतः विचार करून या राजकीय पक्षांच समर्थन करायला हवं.