Author: admin

  • फडणवीसांच्या कालखंडात माझे फोन टॅब झालेत- एकनाथ खडसे

    मंडळी गेल्या काही दिवसांपासून हिजाब प्रकरण असो, नवाब मलिकांच प्रकरण असो, किरीट सोमय्या प्रकरण असो की आता देवेंद्र फडणवीस यांना नोटीस देण्याबाबतच प्रकरण असो या सर्व प्रकरणांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
     
     
    देवेंद्र फडणवीस यांना नोटीस येऊन त्यांची त्याचाच निस्वासस्थानी चौकशी करण्यात आली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस यांना अटक झाल्यास संपूर्ण महाविकास आघाडी सरकार पेटून देण्याचा वादग्रस्त वक्तव्यसुद्धा एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने केलं होतं.
     
     
    या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना नोटीस आली आणि काय त्यांचा तळफळा सुरू झाला, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी फडणवीसांवर असलेल्या आक्रोशाचा उलगडा केला आहे. 
     
     
                 एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटलं की,
     
     
    ” एक नोटीस आली आणि आपली पिळवणूक होत असल्याचे फडणवीस म्हणत आहेत. मी भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरू झाली. असा ते दावा करत आहेत. तुम्ही नाथा भाऊंची पिळवणूक केली नाही का? मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो हे तुम्हाला माहिती पडताच तुम्ही माझी पिळवणूक सुरू केली. माझ्यामागे जमीन भूखंड प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बायकोबरोबर माझे संबंध जोडले. अंजली दमानिया यांना माझ्यावर आरोप करायला लावलं. हे उद्योग कुणी केले? तसेच देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडात माझें फोन टॅब झालेत.”
     
     
    असा हल्लाबोल एकनाथ खडसे यांनी देवेन्द्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मात्र यावर आता फडणवीस काय प्रतिक्रिया देतील. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • मुस्लिमांसाठी दरवाजे चारही बाजूने बंद केले जात आहे- अबू आजमी

    मंडळी कर्नाटक उच्चन्यायालयाच्या निकालाने हिजाब प्रकरणात पुन्हा एकदा ट्विस्ट आणला आहे. हिजाब घालणे ही आवश्यक धार्मिक प्रथा नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेलं हिजाब प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने म्हटले की, शालेय गणवेशावर विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाही.
     
     
    मात्र आता या निर्णयावरून देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी या प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया दिली असून मुस्लिम समाजासोबत अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना त्यांनी सांगितले की,
     
     
    ” कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आहे. पण हा निर्णय चुकीचा आहे. कोण काय घालणार आणि काय खाणार हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. शीख धर्मीयांसाठी पगडी आणि तलवार त्यांच्या समाजात अनिवार्य आहे आणि त्यांना कोणी थांबवू शकत नाही. शीख व्यक्तीला तुम्ही पगडी काढायला सांगाल का? तेव्हा तुम्ही का बोलत नाहीत. मुस्लिम समाजासोबत अन्याय होत आहे. कोर्टाने काहीही म्हटले तरी मुस्लिम समाजमध्ये हिजाब घालणे हा इस्लामचा भाग आहे. आपल्या पतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीसमोर चेहरा खुला ठेवून जाणे गुन्हा आहे. हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचे कसे मी मान्य करू? आम्ही हे लहानपणापासून वाचत आलो आहोत. या निर्णयामुळे मुस्लिमांचे दरवाजे चारही बाजूने बंद केले जात आहेत.”
     
     
     
    असे अबू आजमी यांनी सांगितले. कर्नाटकमध्ये गाजलेलं हिजाबच प्रकरण हे संपूर्ण देशभरात असंतोष पसरवणार होत. निवडणूका जवळ आलेल्या कारणाने राजकीय टोळ्यांनी हिंदू मुस्लिम वादाचे मुद्दे उखरून काढले होते.
     
     
     ऐन निवडणूकीच्या वेळेलाच हिजाब प्रकरण कस काय? 
     
     
                   निवडणुकीच्या वेळेला राजकीय टोळ्यांनी मुद्दाम उखरून काढलेला हिंदू मुस्लिम वाद निव्वळ मते लुटण्यासाठी निर्माण केल्या गेला होता. मात्र जशी निवडणूक संपली संपूर्ण हिजाब प्रकरण शांत झालेलं आपल्या सर्वांना पाहायला मिळाल. अशा राजकीय टोळ्यांच्या दंगल भडकावू मनसुब्यापासून सामान्य लोकांनी दूर राहणे गरजेचे आहे.
  • ‘द कश्मिरी फाईल्स’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा- आमदार नितेश राणे

    ‘द कश्मिरी फाईल्स’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा- आमदार नितेश राणे

    मंडळी सगळीकडे सद्धया चर्चेत असलेला अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘द कश्मीरी फाईल्स’ हा चित्रपट वादामध्ये अडकलाय. या चित्रपटामधून समाजमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता सृजन नागरिकांकडून वर्तवली जात आहे.
     
     
    या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्यप्रदेशमध्ये टॅक्स फ्री केलेले आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये कश्मीरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून उत्तर प्रदेशमधील नागरिक इंतेझार हुसैन यांनी याचिका दाखल केली आहे.
     
     
     
    चित्रपटाने हिंदू आणि मुस्लीम समाजामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते. यामुळे दोन्ही धर्मियांच्या भावना दुखावू शकतात आणि हिंसाचार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. मुख्य न्या. दिपंकर दत्ता आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने यावर तातडीने सुनावणी निश्चित केली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा काय निकाल लागतो यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. 
     
     
    काय म्हणाले नितेश राणे? 
     
     
              सध्या सगळीकडे वादामध्ये अडकलेल द कश्मीरी फाईल्स हा चित्रपट सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेला असताना भाजप आमदार नितेश यांनी पत्राद्वारे महाविकास आघाडी सरकारकडे हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली आहे.
     
     
    ते म्हणाले की,
     
     
    ” जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंच चित्रण करणाऱ्या ‘ द कश्मीरी फाईल्स हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त करावा.”
     
     
     
     
    अशी मागणी नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. ते म्हणाले की हा चित्रपट करमुक्त केल्यास मुस्लिम दहशतवाद्यांनी कशाप्रकारे हिंदूंवर अत्याचार केले. याच खर चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहायला मिळेल. नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे असल्याकारणाने त्यांनापण हा एकच दृष्टिकोन घेऊन या देशात दंगली घडवण्याचे डोहाळे लागले आहे. असे म्हणायला हरकत नाही.
  • विरोधीपक्षांकडे नेतृत्व नाही म्हणून भाजप यशस्वी- सामना

    विरोधीपक्षांकडे नेतृत्व नाही म्हणून भाजप यशस्वी- सामना

    मंडळी नुकत्याच पाच राज्यांतील पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पाचपैकी पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश प्राप्त झालं आहे. मात्र पंजाबमध्ये त्यांना अत्यंत मोठा आणि लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपच्या याच विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेन पुन्हा एकदा केंद्रातील सत्ताधारी पक्षावर निशाणा साधलाय.
     
     
     
    पाच राज्यांमधील निवडणुकीमधील भाजपाच्या विजयावर भाष्य करतांना शिवसेनेन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२४ चा संदर्भ देत केलेल्या भाषणापासून ते अगदी ओवेसीपर्यंत अनेक मुद्द्यांवरून भाजपवर टीका केली आहे. भाजपला विजय कशामुळे मिळाला यासंदर्भात शिवसेनेनं भाष्य करतांना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
     
     
     
     
    महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या गैरवागणुकीमुळे शिवसेनेन केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली आहे. 
     
     

    शिवसेनेच्या सामनामध्ये नेमकं काय? 

              भारतीय जनता पक्षाच्या चार राज्यांमध्ये झालेल्या यशानंतर शिवसेनेनं सामना या अग्रलेखातून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षात तगडे नेतृत्व नाही. त्याचा फायदा भाजपाला होत आहे. हे त्यांच्या विजयाचे सूत्र आहे. २०२४ पर्यंत असे एखादे सर्वसामान्य नेतृत्व लोकांनी तयार केले तर भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.
     
     
     
    पंजाबमधील मतदानावर प्रभाव पडावा व भाजपाला फायदा व्हावा यासाठी खून, बलात्कार, लूटमार अशा आरोपांनी बरबटलेल्या बाबा राम रहीम यास ‘निवडणूक’ मोसमाच्या मुहूर्तावर पॅरोलवर सोडण्यात आले. तरीही पंजाबात भाजपाला हाती काहीच लागले नाही.
     
     
     
    विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच ‘हिजाबचा’ राष्ट्रीय बनवलेला मुद्दाही संपवला गेला आहे. दाऊद, पाकिस्तान आणि दहशतवाद हे मुद्दे आता अर्थहीन ठरलेले असून २०२४ च्या निवडणुकीपूर्व हे सर्व मुद्दे जिवंत केले जातील.
     
     
     
    भारतीय जनता पक्ष हे निवडणुकीच्या वेळेला हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून मत घेण्याच्या हेतूने इथल्या सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांच्यासोबत गैरव्यवहार करत असतात. त्यामुळे भाजप नेत्यांनी कितीही ओरडू ओरडू सांगतीले की आम्ही विकासाच्या मुद्यांवर मत घेतली, तर अशा भाकडकथांना अर्थ नाही. अस शिवसेनेच्या सामना या अग्रलेखात लिहिलेलं आहे.
  • फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांची निवासस्थानी चौकशी

    फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांची निवासस्थानी चौकशी

              मंडळी गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलच राजकीय सुडनाट्य रंगलय. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून एकमेकांना कोठडीत डांबण्याचा प्रयत्न सद्ध्या राजकारणात सुरू आहे. नवाब मालिकांची अटक असो, अनिल देशमुखांची अटक असो. आता देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
     
     
     
    विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नोटीस पाठवली असून, राज्यभरात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून,महाविकास आघाडीसरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे.  शिवाय फडणवीसांना आलेल्या नोटीसवरून निषेधसुद्धा नोंदवला आहे.
     
     
     
    फडनवीसांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्ते आणि नेतेसुद्धा उपस्थित आहेत, तर दुपारी १२ वाजेपासून फडणवीसांची चौकशी सुरू आहे. फणविसांनी याआधी प्रसार माध्यमांशी बोलत असताना महाविकास आघाडीवर आरोप केला होता की, महाविकास आघाडी सरकार भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मुद्दाम खोटे आरोप करून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.
     
     
             भाजप नैराश्याने अस वागत आहे- आदित्य ठाकरे 
     
     
     
         मंडळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर होणाऱ्या कारवाईमुळे भाजप नेत्यांची व कार्यकर्त्यांची गडबड झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीसुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की,
     
     
     
    ” प्रत्येक गोष्टीच राजकीय भांडवल करायचं हे आता भाजपाने ठरवलं आहे, अस दिसतंय. असा त्रास देण्याचं, ईडी, सीबीआय, आयकर विभाग याचा पुरेपूर उपयोग ते करतात. इथे मात्र साधं पोलीस चौकशीलासुद्धा जायचं नाही आणि तिकडे मात्र कायदेशीर, बेकायदेशीर आरोप लावायचे.”
     
     
     
    अस छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितल. याव्यतिरिक्त शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हटलं की,
     
     
    ” मी कुठल्याही न्याय प्रक्रियेवर किंवा पोलीस प्रक्रियेवर फार काही बोलत नाही. भाजपाची आरोप करण्याची सवय आहे. आम्ही त्यावर उत्तर देत नाही आम्ही आमच काम करतो. भाजपासमोर नैराश्य असल्याने ते असे वागत आहेत.”
     
     
     
    अशाप्रकारची टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केली. मात्र या संपूर्ण प्रकरणावर भाजप काय प्रतिक्रिया देत यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • आता अनिल परब आणि यशवंत जाधव यांचा नंबर- किरीट सोमय्या

    आता अनिल परब आणि यशवंत जाधव यांचा नंबर- किरीट सोमय्या

                 मंडळी एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या चार राज्यांमध्ये झालेल्या निवडणूक यशाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेत्यांची धामधूम झाली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या अटकेचा वाद सुटत नाही आहे. किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एक प्रकरण पुढे आणलं आहे.
     
     
     
    “आता अनिल परबचा ही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा याची चौकशी होणार. भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ३० मार्च रोजी सुनावणी होणार.”
     
     
     
    अस म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांना सूचक इशारा दिला आहे.
     
     
    ते पुढे म्हणाले की,
     
     
     
    “आता पुढचा नंबर अनिल परबचा. याचबरोबर यशवंतराव जाधव संबंधात जी आयकर विभागाच्या पाहणीत खूप माहिती बाहेर आली. ४० ठेकेदारांची सखोल माहिती महापालिकेकडून आयकर विभागाने मागवली आहे. तीन अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत. त्याचा अभ्यास सुरू आहे आणि या तपासात ईडी आणि कंपनी मंत्रालयाने देखील रस दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात महत्वाचा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. 
     
     
    घोटाळेबाजांना उघड करणार- किरीट सोमय्या
     
     
           किरीट सोमय्या महाविकास आघाडीकडून बहुतेक त्यांच्यावर झालेल्या मारहाणीचा वचपा काढत आहे. असच त्यांच्या हालचालीवरून निरखून दिसत आहे. प्रसार माध्यममांशी बोलत असताना ते म्हणाले की,
     
     
    ” आता अनिल परब आणि यशवंत जाधव यांच्यामधल्या अटक होण्याच्या शर्यतीत कोण नंबर मारेल. हे बघण महत्वाचं. तसेच घोटाळेबाजांना उघड करणं हा जर गुन्हा असेल तर, तो गुन्हा एक हजारवेळा करण्यासाठी मी तयार आहे. किरीट सोमय्याने जर राजकीय बळाचा दुरुपयोग केला असेल, तर माझ्याविरुद्ध कारवाई करा, अस मी अगोदरच म्हणालेलो आहे.”
     
     
    अस किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. मात्र आता किरीट सोमय्यांच्या या आरोपांवर महाविकास आघाडी सरकार काय प्रतिक्रिया देईल. यावर सर्वांचं लक्ष लागूंन आहे.
  • भाजपच्या विजयानंतर महाराष्ट्रात राजकीय गदारोळ

    भाजपच्या विजयानंतर महाराष्ट्रात राजकीय गदारोळ

    मंडळी उत्तर प्रदेश, उत्तराखंड , गोवा आणि मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण व्यस्त झालंय. महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलीच वादावादी सुरू झालीय.
     
     
     त्याचबरोबर त्यांनी एकमेकांवर वक्तव्य करून राजकीय खेळ खेळायला सुरवात केली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली.
     
     
     
    त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारणात कोणत्या घडामोडी घडणार याकडे राज्याच लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाच्या चार राज्यांमध्ये झालेल्या विजयानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.
     
     
                 भाजपच्या विजयानंतर महाविकास आघाडी सरकार व महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षामध्ये राजकीय नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन बैठका करत आहेत. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गोवा विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
     
     
     
    महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना खोट्या खटल्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट देऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंशी चर्चा केली.
     
     
     
    ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका ह्या पुढे ढकलल्या कारणाने राजकीय गदारोळ माजला आहे.
     
     
    भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विधान केलं होतं की,
     
     
    ” ये तो सिर्फ झाकी है।”
     
     
     
    तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिउत्तर देतांना म्हटलं की,
     
     
     
    “महाराष्ट्रा भी तैयार है।”
     
     
     
     
    मात्र महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच काय चित्र असेल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • महानगरपालिकेवर भगवा झेंडाच कायम राहील- संजय राऊत

    महानगरपालिकेवर भगवा झेंडाच कायम राहील- संजय राऊत

    मंडळी पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. मात्र पंजाबमध्ये त्यांना आम आदमी पार्टीकडून मोठा पराभव पत्करावा लागला आहे. भाजपचा पंजाबमध्ये झालेल्या पराभवावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
     
     
     
    शिवसेनेला उत्तर प्रदेश आणि गोव्यात अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना चांगलच प्रतिउत्तर दिल आहे.
     
     
     
    “भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. उत्तर प्रदेश त्यांचच राज्य होत, पण अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. समाजवादी पक्ष ४२ वरून १२५ वर गेला असून जागा तिप्पट वाढल्या आहेत. भाजपच्या विजयात ओवेसी आणि मायावतीचं योगदान आहेत. हे मान्य कराव लागेल. त्यामुळे त्यांना भारतरत्न द्यावा लागेल.”
     
     
     
    अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली. 
     
     
                  संजय राऊत यांनी पुढे बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
     
     
    ते म्हणाले की,
     
     
     
    ” लोकशाहीत विजय पराभव होत असतो. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये भाजपचा विजय झाला यात आम्हाला दुःख होण्याच काही कारण नाही. तुमच्या आनंदात आम्हीदेखील सहभागी आहोत.”
     
     
    अस संजय राऊत यांनी म्हटलं. पुढे बोलताना संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या माहनगरपालिका निवडणुकीबद्दल केलेला विधानाला प्रतिउत्तर देत म्हटलं की,
     
     
    ” या पाच राज्यांच्या निवडणुकीचा आणि महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचा काहीही संबंध नाही. गेली ५० वर्षे आम्ही महानगरपालिका लढत असून पालिकेवर आमचाच भगवा झेंडा कायम राहील.”
     
     
    अस बोलत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर चांगलाच टोला लगावला आहे. मात्र आता संजय राऊत यांच्या या विधानावर भाजप काय प्रतिक्रिया देईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • राज्यपाल यांचा महापुरुषांची बदनामी करण्याचा कट- राज ठाकरे

    राज्यपाल यांचा महापुरुषांची बदनामी करण्याचा कट- राज ठाकरे

    मंडळी महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असता संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र आता राज ठाकरे यांनी या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
     
     
     
    त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडी आणि भाजपवर टीका करत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. विरोधक म्हणतात, सत्ताधारी आम्हाला संपवायला निघालेत. सत्ताधारी म्हणतात विरोधक आम्हाला संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील समस्या आणि लोकांच्या प्रश्नांबाबत कोणालाच काही पडलेले नाही.
     
     
     
    हे फक्त एकमेकांवर धाडी टाकण्यात रमलेले आहेत. लोकांना निवडणुका हव्या आहेत का, याचा जरा कानोसा घ्या, लोकांना निवडणूक नको आहे. महाविकास आघाडी सरकार व भारतीय जनता पक्ष जनतेला फसविण्याचा प्रयत्न करत आहेत. अस राज ठाकरे म्हणाले. 
     
     
                 पुढे बोलतांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोश्यारी यांच्यावरसुद्धा राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली. शिवाजी महाराज, रामदास स्वामी हे कोण माहिती नसतांना, अभ्यास नसतांना बोलायचं कशाला?
     
     
     
    शिवरायांनी केव्हा सांगितले नाही की रामदास माझे गुरू होते. मग काहीही बोलून भांडणे लावण्याचा उद्योग करायचा कशाला? महापुरुषांची बदनामी करून तरुणांची माथी भडकवायची बस एवढाच उद्योग सध्या राज्यात सुरू आहे. महापुरुषांना बदनाम करायचे आणि त्यांच्या नावावर मते मागायची, असा खेळ आहे.
     
     
     
    अस बोलून राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान करून तरुणांची माथी भडकवायच काम केलं. अस राज ठाकरे यांचा म्हणणं आहे. त्याचबरोबर कोश्यारी यांनी विद्येची नायिका सावित्रीआई फुले यांच्याबद्दलपण वादग्रस्त विधान केल होत. अशाप्रकारचे बेताल वक्तव्य करून कोश्यारी मूर्खपणाचा डोंगर ओलांडत आहे. अस म्हणायला हकरत नाही.
  • १२५ तासांची रेकॉर्डिंग कौतुकास्पद – शरद पवार

    १२५ तासांची रेकॉर्डिंग कौतुकास्पद – शरद पवार

     मंडळी गेल्या काही दिवसांपासून अधिवेशन महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेते भाजपच्या या मनसुब्याला पूर्ण होऊ देणार नाही. अशी ग्वाही देत आहे. 

    शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप यांच्यात मंगळवारी आरोपांची धुळवड रंगली. राज्य सरकारने भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. व्हिडिओच सादर केल्याने प्रतिउत्तर कसे द्यायचे यावर चर्चा सुरू झाली.

    गृहमंत्री वळसे पाटील मुख्यमंत्र्यांशी व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मगच उत्तर देणार आहेत. या व्हिडीओमध्ये शरद पवारांचाही उल्लेख असून त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी प्रतिउत्तर देतांना फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

    काय म्हणाले शरद पवार साहेब

     

                  रेकॉर्डिंग संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलत असतांना पवारांनी फडणवीसांच्या आरोपांना प्रतिउत्तर दिल आहे. ते म्हणाले की,

    ” माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं पण माझा काही संबंध नसल्याचं शरद पवारांनी यावेळी सांगितल. या प्रकरणाची राज्यसरकार सम्पूर्ण चौकशी करेल. त्याची सत्यता असत्यता तपासेल. त्यात माझही नाव घेतलेलं दिसत. माझं कधी यासंबंधात कुणाशी बोलणं व्हायचं काही कारण नाही. कधी काळी वर्ष सहा महिन्यानंतर देवेंद्र फडनवीसांच्या सहकाऱ्याबद्दल तक्रार आली होती. मी त्यांना कळवली. त्यांना सांगितलं यात सत्यता किती ते तुम्ही पाहा. तुमच्या सहकाऱ्याबाबतची ही तक्रार आहे.”

    अस ते म्हणाले. तपास यंत्रणांचा वापर करुनही महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्नाला त्यांना यश येत नसल्याने फडणवीस यांनी ही टोकाची भूमिका घेतली. अस शरद पवार यावेळी म्हणाले. सरकारी अधिकाऱ्यांची १२५ तास रेकॉर्डिंग होते ही कौतुकास्पद बाब आहे. अस शरद पवार प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगत होते. मात्र पवारांच्या या प्रतिक्रियेवर फडणवीस काय प्रतिक्रिया देतील. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.