Author: admin

  • १० मार्चला इंधन दरवाढीचा भडका उडेल- ओवेसी

    १० मार्चला इंधन दरवाढीचा भडका उडेल- ओवेसी

    मंडळी रशिया आणि युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्धाची चर्चा सद्ध्या सम्पूर्ण जगभरामध्ये सुरू आहे. मात्र याचा फायदा घेऊन भारतातील केंद्र सरकार भारतीय जनतेची लूट करण्याची शक्यता अनेक राजकीय नेत्यांनी दर्शवली आहे.
     
     
    पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर मागे १५ ते २२ रुपयांची वाढ होणार असल्याचे दिसत आहे. आज उत्तरप्रदेशात मतदानाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ही वाढ जाहीर होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीसुद्धा ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
     
     
    “निवडणुका संपणार, सरकारचे खरे रूप दिसणार, इतके दिवस निपचित पडून असलेले पेट्रोल डिझेलचे दर अचानक उसळी घेणार! उणाचा भडका झालाय, तसाच इंधन दरवाढीचाही होणार!”
     
     
    अस खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्यसरकारमध्ये राजकिय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. 
     
     

    काय म्हणाले ओवेसी? 

     
     
                   उत्तरप्रदेशात निवडणुका संपल्यानंतर इंधन दर वाढीचा भडका उडणार याची शक्यता दर्शवली जात आहे. यावर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीसुद्धा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ओवेसी यांनी इंधन दरवाढीबद्दल भाकीत केलं आहे.
     
     
    ” पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी गगनाला भिडत आहे. एक लक्षात ठेवा की ७ तारखेच्या रात्री किंवा १० तारखेला सकाळी तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसतील. हे भाव वाढतील आणि सांगतील की, युक्रेनमध्ये अस घडलंय, तसं घडलंय…काहीपण बोलतात. कारण तयार करतात की अस घडलं, तसं घडलं आणि भाजपाचे बिचारे भक्त म्हणतात की नाही नाही मोदीजीने योग्यच केलं. तुमच्या गाडीत पेट्रोल मोदी टाकतोय की, गरीब स्वतः पेट्रोल भरतोय.”
     
    अस ओवेसी प्रसार माध्यमांशी बोलत होते. मात्र ओवेसींच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आता काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • सापाला कसे ठेचायचे हे आम्हाला माहीत आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    सापाला कसे ठेचायचे हे आम्हाला माहीत आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    मंडळी दिनांक ३ मार्च २०२२ पासून अधिवेशनाला सुरवात झालेली असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राजकीय वातावरण चांगलाच तापलं होत. अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परीषद घेऊन महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर चांगलीच टीका केली होती.
     
     
    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. अधिवेशनाच्या सुरवातीला राज्यपाल यांच्या अभिभाषणादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याकारणाने राज्यपाल यांनी आपलं अभिभाषण अवघ्या दोन मिनिटांमध्ये आटोपत घेतलं.
     
     
    त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. 

    काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

     
               मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करतांना भाजप नेत्यांची चांगलीच कान उघाडणी केली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या व आमदारांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली.
     
     
    विधिमंडळ अधिवेशनाच्या आधी माहाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर व त्यांच्या निकटवर्तीयांवर सुरू झालेले छापे पाहता विरोधीपक्ष भाजप आक्रमक भूमिका घेणार हे स्पष्ट असल्याने सरकार त्यास कसे तोंड देणार हा प्रश्न महाविकास आघाडीच्या आमदारांना पडला आहे.
     
     
    देशात सध्या अत्यंत घृणास्पद वातावरण सुरू असून एक विकृती फोफावत असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.
     
     

    ठाकरे म्हणाले,

     
     
    ” आम्ही ३० वर्षे सापाच्या पिल्लाला दूध पाजले. तेच आता वळवळ करत आमच्यावरच फुत्कारत आहे. त्याला कसे ठेचायचे हे आम्हाला चांगले माहिती आहे”.
     
     
    अस उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भारतीय जनता पक्ष काय प्रतिक्रिया देतो यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • राज्यपालांचा अपमान ही लाज वाटण्यासारखी गोष्ट- आदित्य ठाकरे

    राज्यपालांचा अपमान ही लाज वाटण्यासारखी गोष्ट- आदित्य ठाकरे

                     मंडळी भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल औरंगाबाद येथील एका कार्यक्रमामध्ये केलेलं वादग्रस्त विधान हे महाराष्ट्रामध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरलं आहे. कोश्यारी यांनी भाषणादरम्यान म्हटलं की,
     
     
    ” जर रामदास नसते तर शिवरायांना कुणीही विचारलं नसत.”
     
     
    अस विधान केल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांना सम्पूर्ण महाराष्ट्राभरातून शिवप्रेमींकडून विरोध होत आहे. दुसरीकडे राज्याच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं असून या अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
     
     
    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांविषयी केलेल्या एका विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या भाषणाच्यावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे राज्यपालांना आपलं भाषण अवघ्या दोन मिनीटांमध्ये आटोपत घ्यावं लागलं. मात्र आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. 
     

    काय म्हणाले आदित्य ठाकरे?

     
     
                मंडळी शिवरायांच्या नावाचा वापर हा राजकीय लोकांनी नेहमीच राजकारण करण्यासाठी वा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल याचा निषेधच आहे.
     
     
    मात्र आदित्य ठाकरे यांनी कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. म्हणजे त्यांचं कोश्यारी यांच्या विधानाला समर्थन आहे. हे यावरून स्पष्ट होत.
     
     
    आदित्य ठाकरे म्हणाले की,
     
     
    ” ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे.राज्यपालांनी निघून जाणे, त्यांच्या भाषणावेळी निघून जाणे, हे सगळं अयोग्य आहे. आम्हाला या गोष्टीचा धक्का बसला आहे.”
     
     
     
    अस आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. मात्र महाविकास आघाडीच्या विरोधात आदित्य ठाकरे यांनी ही भूमिका घेतली आहे. आता पुढील चित्र काय असणार. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • वीज कनेक्शन कापण्याच काम राज्यसरकार करत आहे- देवेंद्र फडणवीस

    वीज कनेक्शन कापण्याच काम राज्यसरकार करत आहे- देवेंद्र फडणवीस

                  मंडळी विरोधी पक्षनेते आणि माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चांगलीच टीका केली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन फडणविसांनी राजशासणावर निशाणा साधला आहे. बऱ्याच काळानंतर मोठं अधिवेशन मिळालं असल्याचा उल्लेख यावेळी फडणवीसांनी केला.
     
     
    ” आम्हाला चर्चा करण्यात रस आहे. अनेक दिवसानंतर १७ ते १८ दिवस चालणार अधिवेशन आम्हाला मिळालं आहे. राज्याच्या जनतेचे प्रश्न तिथे मांडले गेले पाहिजेत. पण चर्चा झाली पाहिजे ही सरकारी पक्षाचीही जबाबदारी आहे. नाहीतर ओबीसींच्या मुद्द्यावर बोललं, तर १२ लोकांना निलंबित केलं.विद्यापीठाच विधेयक विरोधकांची मुस्कटबाजी करून काढण्यात आलं. लोकशाही पायदळी तुडवली.”
     
     
    अशी टीका फडणवीस यांनी राज्यशासणावर केली आहे. 
     
    सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे- फडणवीस
     
     
            मंडळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नेहमीच आपल्या विधानांमधून राज्यसरकारवर टीका करत असतात. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलत असतांना फडणवीस म्हणाले की,
     
     
    ” राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. विजेचे कनेक्शन कापण्याच काम सरकारने सुरू केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहलेली नाही.मागच्याच्या मागच्या अधिवेशनात त्यांनी पहिल्या दिवशी संगितल, वीज कनेक्शन कापण बंद, शेवटच्या दिवशी सांगितल सुरू. मागच्या अधिवेशनात ते म्हणाले, तेव्हा मी चुकीचं बोललो होतो, आता ठामपणे सांगतो की वीज कनेक्शन कापणार नाही. पण आत स्पर्धा लागल्यासारखे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापल्या जात आहे. गेली दोन वर्षे आस्मानी संकट आणि आता सुलतानी संकट शेतकऱ्याला झेलाव लागत आहे. यावर सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत.”
     
    अस ते पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले. मात्र यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काय प्रतिक्रिया येईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • सगळ्यांचे मुखवटे उतरवून जेलमध्ये पाठवणार- संजय राऊत

    सगळ्यांचे मुखवटे उतरवून जेलमध्ये पाठवणार- संजय राऊत

                 मंडळी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि संजय राऊत या दोघांमध्ये चांगलाच राजकीय वाद पेटला होता. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली होती.
     
     
    त्यानंतर संजय राऊत यांनीसुद्धा शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्यावर प्रतिहल्ला केला. त्यानंतर आज आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीन क्लीनचिट दिल्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या व भारतीय जनता पक्षावर चांगलीच टीका केली आहे.
     
     
    प्रसार माध्यमांशी बोलत असतांना संजय राऊत म्हणाले की,
     
     
    ” पीएमसी घोटाळा, खंडणी यांसारखी अनेक प्रकरण आजपर्यंत दाबून ठेवण्यात आली होती. आता बरेच लोक समोर येऊ लागले आहेत. हळूहळू सर्वांना समजेल. ते जर निर्दोष आहेत, तर बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करत आहेत? जेव्हापासून मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, हे बाप-बेटे दारोदार या कोर्टामधून त्या कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करत आहेत. त्याची गरज तुम्हाला का पडतेय? यातच सगळं स्पष्ट होतंय. मी जे साडे तीन म्हणालो,  ते तुम्ही मोजत रहा.”
     
     
    अस संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका करत म्हटलं आहे.
     
     
                 पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की,
     
     

    ” त्या साडेतीन लोकांची नाव जाहीर केली, तर ते अटकपूर्व जामिनासाठी जातात. जसजशी त्यांना अटक होईल, तसतस तुम्हाला समजेल. पण माझे शब्द लिहून ठेवा, हे बाप-बेटे आणि इतरही काही लोक, जे मोठंमोठ्या गप्पा करतात, त्या सर्वांचे मुखवटे उतरवून त्यांना मी तुरुंगात टाकणार आहे.”

     
     
     
    अस संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितल. संजय राऊत हे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सर्वात जास्त चर्चेत आलेलं नाव आहे. भारतीय जनता पक्षाशी त्यांची फारशी गटत नाही. मात्र आता केलेल्या विधानांनातर किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्ष संजय राऊत यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
     
  • मुख्यमंत्री उध्दव ठाकरेजी शरद पवरांसमोर झुकू नका- भाजप आमदार

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरेजी शरद पवरांसमोर झुकू नका- भाजप आमदार

                     मंडळी नवाब मलिकांना झालेल्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच चिघळत चाललं आहे. नवाब मालिकांच्या अटकेविरोधात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रामध्ये जागोजागी आंदोलने करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने मात्र नवाब मलिक यांनी दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप करत त्यांच्या कठोर शिक्षेसाठी आंदोलने केली.
     
     
    या संदर्भात आता भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच थेट निशाणा साधण्यात आला असून नवाब मलिकांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारकडून नवाब मलिकांना सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात येत आहे. 
     

    काय म्हणाले भाजप आमदार

     
                मंडळी नवाब मलिक यांच्या अटकेसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
     
    ते म्हणाले की,
     

    “केंद्रीय तपासयंत्रणांना दहशतवादविरोधातल्या लढाईमध्ये सहकार्य करावं. देव देश आणि धर्मसाठी हे बोलायचे नाही, आता करण्याची वेळ आली आहे. उद्धवजी, दाऊद आणि त्याच्या हस्तकांविरोधात तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या. शरद पवारांसमोर झुकू नका. नवाब मलिकांची हकालपट्टी करा.अन्य दोन पक्ष वाया गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे अशी भूमिका घेतील अशी आमची अपेक्षा आहे. दरम्यान राज्यसरकार या प्रकरणात बोटचेपी भूमिका का घेत आहे? आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी या प्रकरणाचा कसा संबंध आहे यासंदर्भातल्या चौकशीला राज्यसरकार थांबवू का पाहत आहे? हे मर्दांच सरकार आहे. अस म्हणणारे आता बोटचेपी भूमिका का घेत आहे हा आमचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे.”

     
     
    अस भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मात्र यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • अन्यथा राज्यपाल भवनाच भांडारकर करू- संभाजी ब्रिगेड

    अन्यथा राज्यपाल भवनाच भांडारकर करू- संभाजी ब्रिगेड

              मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची टीका होत आहे. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच प्रेरणादायी दैवत आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांची बदनामी करणं हे काही आता नवीन नाही आहे.
     
     
    याआधी बाबासाहेब पुरंदरे याने आपल्या ‘ राजा शिवछत्रपती ‘ या पुस्तकातून शिवरायांची बदनामी केली होती. मात्र त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याने बाबासाहेब पुरंदरेच्या तोंडाला काळ फासून शिवरायांच्या आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा सूड घेतला होता.
     
     
    यानंतर गिरीश कुबेर नावाच्या एका लेखकाने छत्रपती शिवरायांची व छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम आपल्या ‘द रेनेसन्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्रा’ या पुस्तकामध्ये केलं होतं. तेव्हा नाशिकमध्ये पार पडलेल्या ९४ व्या तथाकथित अखिल भारतीय साहित्य संमेलनात गिरीश कुबेराचं तोंड काळ करण्याचं कामसुद्धा संभाजी ब्रिगेडच्याच मावळ्यांनी केलं होतं.
     
     
    आता भगतसिंह कोश्यारी यांनी आपली हुश्यारी दाखवत मूर्खपना करतांना शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून त्यांचं कर्तृत्व कमी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. 
                औरंगाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी आपल्या भाषणादरम्यान बोलतांना म्हटलं की,
     

    ” जर रामदास स्वामी नसते तर शिवाजींना कुणी विचारलं नसत”

     
    अस त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रामदासाचा शिवरायांशी काहीही संबंध नसल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतरसुद्धा संविधानीक पदावर असणाऱ्या कोश्यारी यांनी अस बेताल वक्त्यव्य करणं त्यांच्या मूर्खपणाची प्रचिती देते.
     
     
    मात्र या देशामध्ये ही मुर्ख लोक अशाप्रकारचीच थोर पुरूषांबद्दल मूर्ख वक्तव्य वारंवार करत असतील, तर या महाराष्ट्रातील शिवप्रेमी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असाच काही इशारा संभाजी ब्रिगेडने आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला आहे.
     
     

    ‘भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सम्पूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा राज्यपाल भवनाचसुद्धा भांडारकर करण्यात येईल.”

     
     
    असा इशारा संभाजी ब्रिगेडने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला आहे.
  • उद्धव ठाकरेंवर भाजप आमदाराची वादग्रस्त टीका

    उद्धव ठाकरेंवर भाजप आमदाराची वादग्रस्त टीका

                  मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिकांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलय. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते आंदोलनं करून नवाब मालिकांचा विरोध करत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहेत.
     
     
    नवाब मलिक यांना बुधवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ ला सक्त वसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली.न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतरच राज्यभरामध्ये भाजपा नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी तर महाविकास आघाडीतील पक्ष या कारवाईविरोधात आंदोलने करत आहेत.
     
     
    राजीनाम्याबरोबरच नवाब मलिक यांच्याविरोधात दाऊदशी व्यवहार केल्याप्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजप नेत्यांकडून केली जात आहे. मात्र ही मागणी करतांना नागपूरच्या आमदाराची जीभ घसरलीय. भाजपा आमदारांनी मलिकांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत कडाडून टीका केली आहे. 
     

    भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

     
              नवाब मलिक अटकेप्रकरणात भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी उद्धव ठाकरेंवर वादग्रस्त टीका केली आहे. खोपडे यांनी लकडगंज पोलीस स्थानकामध्ये मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली.
     
     
    गुन्हा दाखल करून बाहेर आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत असतांना खोपडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात वादग्रस्त शब्दांचा वापर केला आहे.
     
     
    ते म्हणाले की,
     
     
     
    ” या दोन वर्षात खूप भ्रष्टाचार झालाय. महाविकास आघाडीचे अनेक मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. या राज्याच्या जनतेने इतका नालायक आणि बेशरम मुख्यमंत्री पाहिला नाही की जो मंत्री तुरुंगामध्ये असूनसुद्धा त्याचा राजीनामा घेत नाही.”
     
     
    अस खोपडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलंय. मात्र आमदार खोपडे यांच्या अशा वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • आपण भल आणि आपलं काम भल- अजितदादा पवार

    आपण भल आणि आपलं काम भल- अजितदादा पवार

      मंडळी राजकारण म्हटलं की वादावादी , एकमेकांची टिंगलटवाळी करणे, खिल्ली उडवणे, आरोप प्रत्यारोप करणे या सर्व गोष्टी आल्याच. जेव्हापासून महाविकास आघाडीच सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल. तेव्हापासून भारतीय जनता पक्ष कुठल्या ना कुठल्या मुद्य्यावरून सरकार पाडण्याच्या गोष्टी करत असतो.
     
    मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्षाला चांगलंच प्रतिउत्तर दिल आहे. पुण्यातील टेकडी येथील वनउद्यानामधील विविध विकास कामांची पाहणी आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
     
    यानंतर त्यांनी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली आणि महाविकास आघाडीच सरकार पाडणार या वक्तव्यालाही उत्तर दिलं. वारंवार होत असलेल्या भाजपच्या या वक्तव्यावर त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. 
     

    काय म्हणाले अजित पवार

     
             मंडळी वारंवार होत असलेल्या भाजपच्या सरकार पाडण्याच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
     
           ते म्हणाले की,
     
    ” शिवसेना आणि भाजपने तारतम्य ठेवले पाहिजे. हे आरोप आणि प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी थांबले पाहिजेत.आमच्याबद्दल बोलणारेपण काही वाचाळवीर आहेत. त्यांच्याबद्दल मी काही अवाक्षर बोललो का?”
     
    असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसच आपलं काम भल आणि आपण भल, अस माझं मत आहे. प्रत्येकाची कामाची पध्दत वेगळी आहे. पण दोन्ही बाजूने हे थांबलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही. ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे हे सगळं थांबवा.
     
    अस आव्हान त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना केलं. मंडळी एकमेकांची खिल्ली उडवणे, एकमेकांवर टीका करणे यामध्ये आपलं राजकारण करणाऱ्या नेत्यांनासुद्धा अजित पवार यांनी चांगलाच टोला लावला आहे. महाराष्ट्रामध्ये जनतेच्या कित्येक समस्या आहेत. यावर नेत्यांनी बोलायला हवं. प्रश्न उपस्थित करायला हवेत.
     
    त्यावर तोडगा काढायला हवा. आज महाराष्ट्रातील कितीतरी जनता अनेक सुविधांपासून वंचित आहे. त्यांना योग्य तो लाभ मिळाला नाही. अशा कित्येक मुद्द्यांवर चर्चा करायची सोडून जर तुम्ही एकमेकांची टिंगलटवाळी करत आहात, तर तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला फसवण्याचं काम करत आहात.
     
    असा याचा अर्थ होतो. मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या संतापजनक प्रतिक्रियेवर भारतीय जनता पक्ष काय प्रतिक्रिया देईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • विलीनीकरण अहवाल सादर करण्यास राज्यशासनाचा नकार

    विलीनीकरण अहवाल सादर करण्यास राज्यशासनाचा नकार

     मंडळी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चालू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप महाराष्ट्रामध्ये सर्वांच्याच चर्चेचा आणि राज्यसरकारच्या डोकेदुखीचा प्रश्न बनलेला आहे. एसटी महामंडळाच विलीनीकरण हे राज्यशासणामध्ये व्हावं यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी चालवलेल्या आंदोलनात जवळपास १०० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांचे बळी गेलेले आहेत.

        या प्रकरणामध्ये काही कर्मचारी कामावर परतले आहेत, तर काही कर्मचाऱ्यांनी राज्यशासनावीरोधात आपला बंड कायम ठेवलेला आहे. एसटी विलीनीकरणाबाबत उच्चस्तरीय समितीचा अहवाल जाहीर करता येणार नाही, अशी भूमिका राज्यसरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात मांडली आहे. अहवाल जाहीर करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक असल्याच राज्यसरकारने सांगितल आहे. आता हे प्रकरण चांगलंच चिघळताना दिसत आहे. 

        राज्यशासनाला दोन आठवड्यांची मुदत 

              मंडळी एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठी चालू असलेला हा सम्प चांगलाच चर्चेचा विषय ठरलेला आहे. मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारलेला आहे.

         हा संप मागे घ्यावा यासाठी अनेकदा राज्यसशासनाकडून आवाहन करण्यात आलेल आहे. तर हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, उच्चस्तरीय समितीचा जो अहवाल आहे तो आम्ही जाहीर करू शकणार नाही. कारण अहवाल जाहीर करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी गरजेची आहे.

      अस राज्यसरकारकडून सांगण्यात आलेल आहे.त्यामुळे एसटी कर्मचारी नेमकी आता काय भूमिका घेणार, अहवाल सकारात्मक की नकारात्मक? हे सगळं मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल उघड झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

         राज्यसरकारमधील मंत्रिमंडळाची बैठक घेण्याकरीता व अहवाल सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्यसरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ११ मार्चला होणार आहे. आता एसटी कर्मचारी, राज्यसरकार आणि उच्चन्यायालयामध्ये चिघळलेल हे वातावरण कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.