Category: महानगरपालिका विशेष

  • महापालिकेत समाविष्ट होऊनही विकासाची प्रतीक्षा; रावेत-किवळे-मामुर्डीत समस्यांचा डोंगर!

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १९९७ मधील सीमावाढीमध्ये मामुर्डी, किवळे आणि रावेत या गावांचा समावेश झाला. गेल्या दोन दशकांत या भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून, अनेक ‘स्मार्ट’ गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. मात्र, विकासाचा हा वेग केवळ सोसायट्यांपुरता मर्यादित राहिला असून, आजही हा प्रभाग मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र आहे.

    १. पॉलिटिकल वझीरच्या मते मतदारांचे गणित:-

    एकूण मतदार: ७५,१०५

    मतदार विभागणी: ३९,२२४ पुरुष आणि ३५,८७५ महिला मतदार.

    प्रभागाचे आरक्षण: १६-अ (अनुसूचित जाती), १६-ब (ओबीसी महिला), १६-क (महिला) आणि १६-ड (खुला).

    २. प्रभागामधील समाविष्ट भाग:-

    या प्रभागात मामुर्डी, किवळे, रावेत, रावेत प्राधिकरण, गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, वाल्हेरकरवाडी या भागांचा समावेश होतो.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: “कामं कागदावर, प्रश्न जमिनीवर!

    पॉलिटिकल वझीरच्या माहितीनुसार, येथील रहिवासी खालील समस्यांनी त्रस्त आहेत:

    पाणी समस्या: रावेत जलशुद्धीकरण केंद्र याच भागात असूनही किवळे आणि मामुर्डी परिसरात पाणी कमी दाबाने येते. काही सोसायट्यांना आजही टँकरवर लाखो रुपये खर्च करावे लागतात.

    वाहतूक आणि रस्ते: मुकाई चौक ते भोंडवे चौक दरम्यान बीआरटी आणि मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीचे नियोजन कोलमडले आहे. अंतर्गत रस्ते अरुंद असून रावेत-किवळे जोडणारा रेल्वे उड्डाणपूल अद्याप रखडलेला आहे.

    आरोग्य आणि शिक्षण: प्रभागात महापालिकेचे स्वतःचे सुसज्ज रुग्णालय नाही. माध्यमिक शाळा आणि स्वतंत्र महाविद्यालय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

    सुरक्षा: वाढती लोकसंख्या पाहता येथे स्वतंत्र पोलीस चौकी आणि अग्निशमन केंद्राची नितांत गरज आहे.’

    ४. विकासाचे रिपोर्ट कार्ड:-

    मार्गी लागलेली कामे

    • प्राधिकरण सेक्टर २९ आणि ३२ मध्ये नवीन उद्याने व जॉगिंग ट्रॅक.
    • बीआरटी मार्ग आणि मुकाई चौकात हायमास्ट दिव्यांची सोय.
    • काही भागांत भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम पूर्ण.

    रखडलेली कामे:-

    • मुकाई चौक ते किवळे रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण.
    • इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प आणि सांडपाणी व्यवस्थापन.
    • मामुर्डी आणि किवळे भागातील अंतर्गत रस्ते व ड्रेनेज व्यवस्था
    • गुरुद्वारा चौक जुन्या रेल्वे बोगद्यात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही.

    ५. विश्लेषण प्रभाग १६:-

    बळ: सुशिक्षित नोकरदार वर्ग आणि वेगाने वाढणारा उच्चभ्रू रहिवासी परिसर.

    उणिवा: पाणी टंचाई आणि आरक्षित जागा ताब्यात नसल्याने रखडलेले सार्वजनिक प्रकल्प.

    संधी: नवीन शाळा, रुग्णालय आणि रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न जो सोडवेल, त्याला मतदारांचा मोठा कौल मिळेल.

    धोका: मुकाई चौकातील सततची वाहतूक कोंडी आणि नदीपात्रातील वाढती दुर्गंधी.

    पॉलिटिकल वझीरच्या सूचना:-

    प्रभाग १६ च्या निवडणुकीत यावेळी पाणी आणि वाहतूक कोंडी हे सर्वात मोठे मुद्दे असतील. जो उमेदवार ‘प्राधिकरणाच्या आरक्षित जागा’ विकसित करून दाखवेल आणि ‘मामुर्डी-किवळे’ या दुर्लक्षित भागाला मुख्य प्रवाहाशी जोडेल, तोच या प्रभागाचा खरा लोकप्रतिनिधी ठरेल.

  • प्राधिकरणात समस्यांचा विळखा; उच्चभ्रू नागरिक नागरी असुविधांमुळे वैतागले!

    पिंपरी-चिंचवडमधील सर्वात सुबक आणि सुनियोजित मानला जाणारा ‘प्राधिकरण’ परिसर प्रभाग १५ मध्ये येतो. मात्र, सद्यस्थितीत इथली चकचकीत प्रतिमा केवळ नावापुरतीच उरली आहे का? असा प्रश्न येथील उच्चभ्रू नागरिकांना पडला आहे. ‘पॉलिटिकल वझीर’च्या ग्राऊंड रिपोर्टनुसार, अतिक्रमणे आणि रखडलेल्या प्रकल्पांमुळे हा प्रभाग सध्या राजकीयदृष्ट्या चांगलाच तापला आहे.

    १. ‘प्राधिकरणा’ची ओळख आणि सद्यस्थिती:-

    १९७२ मध्ये स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (PCNTDA) हा मुख्य भाग आहे. येथे प्रामुख्याने गंगासागर, सिंधूनगर आणि आकुर्डी रेल्वे स्थानक परिसराचा समावेश होतो. मात्र, गेल्या काही काळापासून अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वाढती अतिक्रमणे यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे.

    २. ज्वलंत नागरी समस्या:-

    उच्चभ्रू भाग असूनही नागरिकांना खालील मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे:

    अतिक्रमणे आणि पार्किंग: पदपथांवर झालेली अतिक्रमणे आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना होणारी बेशिस्त पार्किंग यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे

    पाणी आणि स्वच्छता: आकुर्डी गावठाण परिसरात पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने आणि अनियियमितपणे होत आहे. तसेच घंटागाड्या वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी गृहिणी करत आहेत.

    उद्यानांची दुरवस्था: सुप्रसिद्ध ‘दुर्गा देवी उद्याना’ची देखभाल नीट होत नाही, तेथे मद्यपींचा वावर वाढला असून दुर्गंधी पसरली आहे.

    ३. प्रभाग १५ चे विश्लेषण:-

    बलस्थाने :- सुसंस्कृत मतदार: सुशिक्षित आणि जागरूक मतदारांमुळे विकासाच्या मुद्द्यावर येथे मतदान होते.

    नियोजित पायाभूत सुविधा: ग. दि. माडगुळकर नाट्यगृहासारखी दर्जेदार कामे मार्गी लागली आहेत.

    उणिवा:- रखरखीत रस्ते: अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण अनेक ठिकाणी रखडलेले आहे.

    अपुरी सुरक्षा: उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक नसल्याने असामाजिक तत्वांचा वावर वाढला आहे.

    संधी:- हरित नियोजन: जर हरित सेतू सारखे प्रकल्प यशस्वी झाले, तर प्रभागाचा दर्जा उंचावेल.

    सार्वजनिक स्वच्छतागृहे: आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात सुसज्ज स्वच्छतागृहे उभारल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

    धोके:- आरोग्याचा प्रश्न: सार्वजनिक स्वच्छतेच्या अभावामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका कायम आहे.

    पावसाळी पाण्याचा निचरा: सीमा हाऊसिंग सोसायटीसारख्या भागात पावसाळी पाण्याचा निचरा होत नसल्याने घरात पाणी शिरते.

    ४. प्रभागातील समीकरणे आणि लोकसंख्या:-

    या प्रभागात आकुर्डी गावठाण, गंगानगर, वाहतूकनगरी, सेक्टर २४ ते २८, सिंधूनगर, परमार पार्क,स्वप्नपूर्ती सोसायटी, आणि रेल्वे स्टेशन परिसर यांचा समावेश होतो.

    एकूण मतदारसंख्या: ४७,८९८

    पुरुष मतदार: २४,८१६ | स्त्री मतदार: २३,०७९

    आरक्षण: अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण (खुला)

    ५. स्थानिक नागरिकांचा संताप:-

    • उद्यानांची अवस्था दयनीय आहे, प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष नाही.
    • पाणीपुरवठा अनियमित आहे आणि पावसाळ्यात घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान होते.
    • रस्त्यांवर वाहने उभी केल्याने चालणे कठीण झाले आहे, पदपथ मोकळे व्हायला हवेत.

    निष्कर्ष:

    प्रभाग १५ मधील नागरिक आता केवळ नियोजित शहर या नावावर समाधानी नाहीत. जो उमेदवार अतिक्रमण मुक्ती आणि नियमित पाणीपुरवठा याचे आश्वासन देऊन प्रत्यक्ष कृती करेल, तोच या प्रभागाचा खरा मंत्री होईल.

  • प्रभाग १४ मध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई आणि पावसाळ्यात पूरस्थिती; आकुर्डीकरांचा वनवास संपणार कधी?

    पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग १४ हा आकुर्डी, दत्तवाडी आणि विठ्ठलवाडी यांसारख्या महत्त्वाच्या भागांना सामावून घेणारा प्रभाग आहे. एकेकाळी शांत आणि निवांत असलेला हा परिसर आता नागरी समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. ‘पॉलिटिकल वझीर’च्या ग्राऊंड रिपोर्टमधून येथील वास्तव समोर आले आहे.

    १. पाणी – सर्वात मोठी डोकेदुखी :-

    प्रभागातील नागरिकांचे जीवन दोन ऋतूंमध्ये दोन वेगवेगळ्या समस्यांनी बेजार झाले आहे:

    उन्हाळ्यात घसा कोरडा: दत्तवाडी आणि विठ्ठलवाडी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत जटिल आहे. पाणीपुरवठा अनियमित असून तो अत्यंत कमी दाबाने होतो.

    पावसाळ्यात घरांत पाणी: पावसाळ्यात येणाऱ्या ओढ्यातील अतिरिक्त पाण्यामुळे विठ्ठलवाडी आणि दत्तवाडी परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते, ज्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होते.

    २. रखडलेले प्रकल्प आणि उणिवा:-

    प्रशासकीय राजवटीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प रेंगाळले आहेत:

    पालखी तळ सुशोभीकरण: विठ्ठलवाडी येथील पालखी तळाचे सुशोभीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, तिथे आजही गढूळ पाण्याची समस्या आहे.

    जीर्ण जलवाहिन्या: परिसरातील जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत, त्या बदलण्याचे काम प्रलंबित आहे.

    जिजामाता सभागृह: मोहन नगर येथील जिजामाता सभागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, त्याच्या नूतनीकरणाची गरज आहे.

    ३. प्रभाग १४ विश्लेषण:-

    बलस्थाने:- ऐतिहासिक महत्त्व: जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम याच प्रभागात (आकुर्डी) असतो.

    पायाभूत सुविधा: चिंचवड रेल्वे स्थानक आणि एमआयडीसी क्षेत्राशी जवळीक असलेला हा भाग मोक्याचा आहे.

    उणिवा:- स्वच्छतेचा अभाव: सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आणि कचऱ्याचे साम्राज्य ही मोठी समस्या आहे.

    अनियमित वीजपुरवठा: पाणीपुरवठा सुरू झाला की वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत.

    संधी:- नव्या चेहऱ्यांना संधी: प्रस्थापित नेत्यांविरुद्ध असलेल्या नाराजीमुळे नागरी प्रश्नांवर काम करणाऱ्या नवीन उमेदवारांना संधी मिळू शकते.

    सांस्कृतिक विकास: जिजामाता सभागृह आणि क्रीडांगणांचा विकास केल्यास तरुणांना मोठे व्यासपीठ मिळेल.

    धोके:- वाहतूक कोंडी: अरुंद रस्ते आणि वाढत्या अतिक्रमणामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची मोठी समस्या आहे.

    आरोग्याचा धोका: ओढ्याचे पाणी वस्त्यांमध्ये शिरल्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका वाढला आहे.

    ४. प्रभागातील समीकरणे आणि लोकसंख्या

    या प्रभागामध्ये चिंचवड रेल्वे स्थानक परिसर, महावीर पार्क, मोहन नगर, रामनगर, काळभोर नगर, शुभ श्री सोसायटी,जय गणेश विजन, विवेक नगर,बजाज ऑटो ,तुळजाई वस्ती विठ्ठलवाडी आणि दत्तवाडी यांसारख्या प्रमुख वस्त्यांचा समावेश होतो.

    एकूण मतदारसंख्या: ५७,९७८.

    पुरुष मतदार: ३०,९०९ | स्त्री मतदार: २७,०६७.

    आरक्षण: अ- मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण खुला.

    ५. जनतेचा आवाज :-

    • वैशाली कदम (गृहिणी): वीज आणि पाणी या मूलभूत गरजांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
    • यश शेजवळ: तरुणांसाठी व्यायामशाळा आणि खुल्या जागेत स्वच्छता असणे आवश्यक आहे.
    • शुभम कोकरे: जिजामाता सभागृहाचे काम अल्प दरात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून द्यावे.

    निष्कर्ष:

    प्रभाग १४ मधील मतदार यावेळी केवळ आश्वासनांवर भुलणार नाहीत. जो उमेदवार ‘पाणी आणि पावसाळी पाण्याचा निचरा’ या दोन प्रमुख समस्यांवर ठोस तोडगा काढेल, तोच यावेळेस विजयाचा वझीर ठरेल

  • निगडी गावठाणात विकासाचा वेग, पण झोपडपट्टी पुनर्वसन आणि आरोग्याची आव्हाने गंभीर!

    पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार मानले जाणारे निगडी गावठाण आणि यमुनानगर परिसर प्रभाग १३ मध्ये येतात. या प्रभागात एका बाजूला विकासाची चकचकीत चक्रे फिरताना दिसत असली, तर दुसरीकडे झोपडपट्टीवासीय आणि मनपा कॉलनीतील नागरिक मूलभूत हक्कांसाठी आजही लढा देत आहेत.

    १. प्रभागातील प्रलंबित प्रश्न:-

    झगमगाटाच्या आड दडलेल्या काही गंभीर समस्या मतदारांमध्ये संताप निर्माण करत आहेत:

    पाणी आणि आरोग्याचा प्रश्न: यमुनानगर येथील ‘मीनाताई ठाकरे जलतरण तलाव’ दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आणि दूषित पाण्याचे प्रमाणही वाढले आहे.

    मनपा कॉलनीची दुरवस्था: सेक्टर २२ मधील पीसीएमसी कॉलनीतील ९ इमारतींची अवस्था अत्यंत धोकादायक आणि जीर्ण झाली आहे. येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून धूळ खात पडला आहे.

    २. विकासाची बलस्थाने:-

    काही कामांनी या प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत केली आहे:

    पायाभूत सुविधा: निगडी प्राधिकरणाकडे जाणारा भुयारी मार्ग, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल आणि अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण ही कामे मार्गी लागली आहेत.

    सुशोभीकरण: यमुनगरमधील ‘सद्गुरु दत्त उद्यान’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचा प्रवेशद्वार कमान ही कामे पूर्ण झाली आहेत.

    ३. प्रभाग १३ विश्लेषण:-

    संधी:- पुनर्वसन प्रकल्प: जर एसआरए किंवा मनपाने सेक्टर २२ मधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला, तर तो निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरेल.

    आरोग्य सुविधा: यमुनानगर रुग्णालयाचे विस्तारीकरण झाल्यास गरीब रुग्णांना मोठा आधार मिळेल.

    धोके:- वाहतूक कोंडी: अंकुश चौक आणि टिळक चौकातील रोजची वाहतूक कोंडी व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेत आहे.

    स्वच्छतेचा अभाव: परिसरात वाढलेले अतिक्रमण आणि कचऱ्याची दुर्गंधी यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

    ४. प्रभागातील समीकरणे आणि लोकसंख्या:-

    या प्रभागामध्ये निगडी गावठाण, सेक्टर २२, ओटा स्कीम, यमुनानगर, सािनाथनगर आणि श्रीकृष्ण मंदिर परिसर यांचा समावेश होतो.

    एकूण मतदारसंख्या: ४८,५३२.

    पुरुष मतदार: २५,२६० | स्त्री मतदार: २३,२६४.

    आरक्षण: अ- अनुसूचित जाती, ब- मागास प्रवर्ग महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण.

    ५. जनतेचा कौल :-

    • झोपडपट्टीचे विस्तारीकरण होत आहे, पण कचरा आणि दुर्गंधीचा त्रास कमी झालेला नाही.
    • दिवसातून दोन वेळा वीज पुरवठा खंडित होणे आणि पाणी गळती हे आमचे रोजचे प्रश्न आहेत.
    • जलतरण तलाव तातडीने सुरू व्हायला हवा, कारण मुलांना खेळण्यासाठी जागा नाही.

    निष्कर्ष:-

    प्रभाग १३ मधील मतदार यावेळी केवळ रस्त्यांच्या कामावर खुश होणार नाहीत. ज्या उमेदवाराकडे ‘झोपडपट्टी पुनर्वसन’ आणि ‘आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण’ यासाठी ठोस आराखडा असेल, तोच यावेळेस विजयाचा ‘वझीर’ ठरेल.

  • प्रभाग १२: तळवडे-रुपिनगरकरांवर ‘रेड झोन’ची टांगती तलवार; मूलभूत सुविधांसाठी अजून किती काळ लढा?

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग १२ हा औद्योगिक पट्ट्यातील एक अतिशय संवेदनशील प्रभाग आहे. देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या सीमेवर असल्याने येथील मोठा परिसर ‘रेड झोन’ अंतर्गत येतो. यामुळे घरांचे बांधकाम असो वा मोठ्या प्रकल्पांची मंजुरी, येथे प्रत्येक गोष्ट तांत्रिक अडचणींत अडकलेली दिसते.

    १. पॉलिटिकल वझीरच्या मते:- मतदारांचे गणित

    एकूण मतदार: ४४,६८५.

    मतदार विभागणी: पुरुष मतदार (२४,६४७) आणि महिला मतदार (१९,९८२).

    सामाजिक समीकरण: येथे कष्टकरी कामगार आणि मध्यमवर्गीय मतदारांची संख्या मोठी आहे.

    आरक्षण: हा प्रभाग चार जागांसाठी आरक्षित आहे: ‘१२-अ (ओबीसी)’, ‘१२-ब (महिला)’, ‘१२-क (महिला)’ आणि ‘१२-ड (सर्वसाधारण खुला)’.

    २. ‘बॅटल ग्राऊंड’ मधील प्रमुख वस्त्या:-

    या प्रभागाची व्याप्ती मोठी असून यात खालील भागांचा समावेश होतो:

    तळवडे, ज्योतिबानगर, गणेश नगर, रुपिनगर, सहयोग नगर आणि त्रिवेणीनगर.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: प्रश्नांचे ‘धगधगते’ वास्तव

    प्रभागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय:

    रेड झोनचा अडथळा: रेड झोनच्या निर्बंधांमुळे नवीन बांधकामांना परवानगी मिळत नाही आणि जुन्या घरांच्या दुरुस्तीसाठीही अडचण येत आहे.

    वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण: तळवडे-त्रिवेणीनगर रस्त्यावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते, त्यातच रुपिनगर मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत.

    पाणी आणि ड्रेनेज: रुपिनगर आणि त्रिवेणीनगर भागात कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. जुनी भूमिगत सांडपाणी वाहिनी बदलण्याची नितांत गरज आहे.

    आरोग्य आणि शिक्षणाची कमतरता: या भागात एकही मोठे उद्यान किंवा मुलांसाठी खेळाचे मैदान नाही. तसेच अभ्यासिकेसारख्या शैक्षणिक सुविधांचाही अभाव आहे.

    ४. विकासाचा आढावा: प्रभाग १२

    मार्गी लागलेली कामे :-

    • तळवडे गायरान जागेत बायोडायव्हर्सिटी पार्कच्या कामाला सुरुवात.
    • ज्योतिबानगर आणि सोनवणे वस्तीतील रस्ते रुंदीकरण व डांबरीकरण.
    • काही भागांत भूमिगत विद्युत केबल टाकण्याचे काम पूर्ण.

    रखडलेली कामे:-

    • तळवडे आणि रुपिनगर भागातील अंतर्गत रस्त्यांचे प्रलंबित डिकीकरण.
    • एमआयडीसी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था.
    • परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी आणि सुसज्ज रुग्णालय.

    ५. विश्लेषण: प्रभाग १२

    (बळ):- औद्योगिक परिसरामुळे येथे रोजगाराच्या संधी आणि मोठी लोकसंख्या आहे.

    (उणिवा):- रेड झोनमुळे विकासकामांवर येणारी मर्यादा ही सर्वात मोठी कमकुवत बाजू आहे.

    (संधी):- रेड झोन हद्द कमी करण्यासाठी पाठपुरावा केल्यास कोणत्याही नेत्याला ऐतिहासिक कौल मिळू शकतो.

    (धोका):- पाणी टंचाई आणि ड्रेनेजच्या समस्यांमुळे पसरणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण करत आहेत.

    पॉलिटिकल वझीरच्या सूचना:

    प्रभाग १२ मध्ये विजय मिळवण्यासाठी केवळ रस्ते बांधणे पुरेसे नाही. जो उमेदवार ‘रेड झोन’मधून सुटका मिळवण्यासाठी दिल्ली आणि मुंबई दरबारी वजन वापरेल आणि ‘अतिक्रमणमुक्त रुपिनगर’ चे मॉडेल मांडेल, त्यालाच तळवडेकर पसंती देतील

  • प्रभाग ११ मध्ये अनधिकृत पार्किंगचा विळखा आणि रखडलेले प्रकल्प; रहिवाशांचा वनवास कधी संपणार?

    पिंपरी-चिंचवडच्या नेवाळे वस्ती-कुदळवाडी परिसरातील प्रभाग ११ सध्या प्रशासकीय अनास्थेचा नमुना बनला आहे. शहराचा मुख्य कणा मानला जाणारा ‘स्पाइन रस्ता’ असो वा घरकुल परिसरातील गरिबांचे प्रश्न, येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत.

    १. स्पाइन रस्त्याची दुरवस्था: अनधिकृत पार्किंगचा फास

    या प्रभागाची मुख्य ओळख असलेला स्पाइन रस्ता सध्या अनधिकृत वाहन पार्किंगचा अड्डा बनला आहे. यामुळे:

    • मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
    • पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही.
    • ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी विरंगुळा केंद्रांचा अभाव असल्याने त्यांना रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

    २. रखडलेली कामे: आश्वासनांची पूर्तता कधी?

    प्रशासनाने अनेक प्रकल्प सुरू केले खरे, पण ते पूर्णत्वास नेण्यात अपयश आले आहे:

    टाऊन हॉल: घरकुल संकुलात टाऊन हॉल बांधण्याचे काम अर्धवट अवस्थेत रखडले आहे.

    क्रीडांगणे: खेळाडूंसाठी दोन क्रीडांगणे तयार करण्याचे नियोजन होते, मात्र त्यांचे योग्य प्रकारे काम झालेले नाही.

    जॉगिंग ट्रॅक: जॉगिंग ट्रॅकचे कामही अपूर्ण असल्याने आरोग्याबाबत जागरूक असलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

    ३. प्रभाग ११ पॉलिटिकल वझीरचे विश्लेषण:-

    बलस्थाने:- औद्योगिक महत्त्व: कुदळवाडी आणि नेवाळे वस्ती हा भाग शहराच्या आर्थिक चक्राला गती देणारा आहे.

    मार्गी लागलेली कामे: घरकुल संकुलातील दवाखाना आणि पाण्याची सुविधा जमवून दिली गेली आहे.

    उणिवा :-विद्युत देयकांचा प्रश्न: पत्राशेडमधील घरांना निवासी दराने वीज बिले येत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत.

    नियोजन शून्य नागरी सुविधा: लोकसंख्येचा प्रचंड ताण असतानाही आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांची वानवा आहे.

    उणिवा :-विद्युत देयकांचा प्रश्न: पत्राशेडमधील घरांना निवासी दराने वीज बिले येत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत.

    नियोजन शून्य नागरी सुविधा: लोकसंख्येचा प्रचंड ताण असतानाही आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांची वानवा आहे.

    संधी :-आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण: घरकुलमधील आरोग्य केंद्र २४ तास सुरू केल्यास गरिबांना मोठा दिलासा मिळेल.

    पाणी आणि स्वच्छतेचा अभाव: अनेक भागात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

    ४. प्रभागातील समीकरणे आणि प्रमुख वस्त्या

    या प्रभागात नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर,कोयनानगर, अजंठानगर, महात्मा फुलेनगर, पुर्णानगर, घरकुल, दुर्गनगर आणि शिवतेजनगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश होतो.

    एकूण मतदारसंख्या: ६६,४२७.

    पुरुष मतदार: ३५,८३४ | स्त्री मतदार: ३०,५८८

    आरक्षण: अ- अनुसूचित जाती, ब- ओबीसी (महिला), क- सर्वसाधारण (महिला), ड- सर्वसाधारण (खुला).

    ५. स्थानिक जनतेचा संताप (जनता काय म्हणते?)

    • आरोग्य केंद्र २४ तास सुरू ठेवावे आणि खाजगी दवाखान्यांसारख्या सुविधा तिथे मिळाव्यात.
    • पत्राशेडमधील गरिबांना विजेचे अवाढव्य बिल येत आहे, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
    • पुनर्वसन झालेल्या भागात आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणाची कोणतीही सोय नाही.
    • शिक्षण आणि आरोग्य या सुविधा हाताशी असायला हव्यात, मात्र इथे प्रशासन कमी पडत आहे.

    निष्कर्ष:

    प्रभाग ११ मधील आगामी निवडणूक ही रहिवाशांच्या सन्मानाची लढाई आहे. जो लोकप्रतिनिधी अनधिकृत पार्किंगचा विळखा सोडून स्पाइन रस्ता मोकळा करेल आणि घरकुलमधील रखडलेले प्रकल्प पूर्ण करेल, तोच खरा नेता ठरेल.

  • प्रभाग ९: नेहरूनगरमध्ये विकासाची गती; पण गांधीनगरच्या पुनर्वसनाचे काय? स्टेडियमच्या दुरवस्थेमुळे खेळाडूंत नाराजी\

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग ९ हा शहराचा एक महत्त्वाचा चेहरा आहे. १९८२ मध्ये स्थापनेनंतर महापालिकेत समाविष्ट झालेला हा प्रभाग आज उच्चभ्रू सोसायट्या आणि कष्टकरी वस्त्यांचा संगम झाला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक मोठे प्रकल्प मार्गी लागूनही काही जुने प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत.

    १. पोलिटिकल वझीरच्या मते मतदारांचे समीकरण:-

    एकूण मतदार: ५८,६७८

    स्त्री-पुरुष प्रमाण: पुरुष मतदार (३०,२८६) आणि महिला मतदार (२८,३८९)

    आरक्षण: हा प्रभाग ४ जागांसाठी आरक्षित आहे: ‘९ अ-अनुसूचित जाती’, ‘९ ब-ओबीसी महिला’, ‘९ क-सर्वसाधारण महिला’ आणि ‘९ ड-सर्वसाधारण (खुला)’

    २. या प्रभागातील प्रमुख वस्त्या:-

    या प्रभागात खालील महत्त्वाच्या परिसरांचा समावेश होतो:

    नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, विठ्ठलनगर, अजमेरा कॉलनी, महिंद्रा अंतिया, स्वप्नगरी, उद्यमनगर, टेल्को कॉलनी, खराळवाडी आणि गांधीनगर आणि पंतप्रधान आवास योजना वसाहती.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: कामं झाली, पण हे प्रश्न कधी सुटणार?

    प्रभागात काही विकासकामे वेगाने झाली असली, तरी काही ठिकाणी प्रशासनाचा ‘विसर’ पडल्याचे दिसते:

    स्टेडियमची दुरवस्था: अण्णासाहेब मगर स्टेडियमचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला असून, मैदानातील भिंतींची पडझड झाली आहे. यामुळे स्थानिक खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे.

    भटक्या कुत्र्यांचा हैदोस: नेहरूनगर आणि खराळवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. नागरिकांना चावा घेण्याचे प्रकार वाढल्याने लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    रखडलेली भाजी मंडई: मासुळकर कॉलनीतील भाजी मंडई गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असून ती धूळ खात पडली आहे.

    ४. विकासाचा ‘रिपोर्ट कार्ड’

    झालेली कामे:-

    • मासुळकर कॉलनीतील रस्ता ‘अर्बन स्ट्रीट’ पद्धतीने विकसित.
    • हेडगेवार क्रीडा संकुलात उच्च दर्जाचा स्केटिंग ग्राऊंड.
    • पंडित जवाहरलाल नेहरू शाळेचे नूतनीकरण पूर्ण.

    रखडलेली कामे:-

    • अण्णासाहेब मगर स्टेडियमचा पुनर्विकास आणि संरक्षक भिंत.
    • नेहरूनगर ते पिंपरी मुख्य रस्त्याचे रुंदीकरण आणि पुनर्वसन.
    • मासुळकर कॉलनीतील रुग्णालय जोडणाऱ्या रस्त्याचे अर्धवट काम.

    ५. विश्लेषण: प्रभाग ९

    बळ:- विकसित क्रीडा संकुले, नवीन शाळा आणि टोलेजंग सोसायट्यांचे जाळे

    उणिवा:- ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे खराळवाडी आणि गांधीनगर भागात पसरणारी दुर्गंधी

    धोका:- स्टेडियमच्या रखडलेल्या कामामुळे खेळाडू आणि तरुण मतदारांमध्ये असलेला सत्ताधाऱ्यांविरुद्धचा संताप

    पोलिटिकल वझीरच्या सूचना :-

    प्रभाग ९ मध्ये विजय मिळवण्यासाठी केवळ सुशिक्षित मध्यमवर्गीयांना सांभाळून चालणार नाही. जो उमेदवार गांधीनगर पुनर्वसनाचा तिढा सोडवण्याची ताकद दाखवेल आणि अण्णासाहेब मगर स्टेडियम पुन्हा खेळाडूंसाठी खुले करेल, तोच या प्रभागाचा खरा ‘वझीर’ ठरेल.

  • प्रभाग ९: नेहरूनगरमध्ये विकासाची गती; पण गांधीनगरच्या पुनर्वसनाचे काय? स्टेडियमच्या दुरवस्थेमुळे खेळाडूंत नाराजी\

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग ९ हा शहराचा एक महत्त्वाचा चेहरा आहे. १९८२ मध्ये स्थापनेनंतर महापालिकेत समाविष्ट झालेला हा प्रभाग आज उच्चभ्रू सोसायट्या आणि कष्टकरी वस्त्यांचा संगम झाला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक मोठे प्रकल्प मार्गी लागूनही काही जुने प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत.

    १. पोलिटिकल वझीरच्या मते मतदारांचे समीकरण:-

    एकूण मतदार: ५८,६७८

    स्त्री-पुरुष प्रमाण: पुरुष मतदार (३०,२८६) आणि महिला मतदार (२८,३८९)

    आरक्षण: हा प्रभाग ४ जागांसाठी आरक्षित आहे: ‘९ अ-अनुसूचित जाती’, ‘९ ब-ओबीसी महिला’, ‘९ क-सर्वसाधारण महिला’ आणि ‘९ ड-सर्वसाधारण (खुला)’

    २. या प्रभागातील प्रमुख वस्त्या:-

    या प्रभागात खालील महत्त्वाच्या परिसरांचा समावेश होतो:

    नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, विठ्ठलनगर, अजमेरा कॉलनी, महिंद्रा अंतिया, स्वप्नगरी, उद्यमनगर, टेल्को कॉलनी, खराळवाडी आणि गांधीनगर आणि पंतप्रधान आवास योजना वसाहती.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: कामं झाली, पण हे प्रश्न कधी सुटणार?

    प्रभागात काही विकासकामे वेगाने झाली असली, तरी काही ठिकाणी प्रशासनाचा ‘विसर’ पडल्याचे दिसते:

    स्टेडियमची दुरवस्था: अण्णासाहेब मगर स्टेडियमचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला असून, मैदानातील भिंतींची पडझड झाली आहे. यामुळे स्थानिक खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे.

    भटक्या कुत्र्यांचा हैदोस: नेहरूनगर आणि खराळवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. नागरिकांना चावा घेण्याचे प्रकार वाढल्याने लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    रखडलेली भाजी मंडई: मासुळकर कॉलनीतील भाजी मंडई गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असून ती धूळ खात पडली आहे.

    ४. विकासाचा ‘रिपोर्ट कार्ड’

    झालेली कामे:-

    • मासुळकर कॉलनीतील रस्ता ‘अर्बन स्ट्रीट’ पद्धतीने विकसित.
    • हेडगेवार क्रीडा संकुलात उच्च दर्जाचा स्केटिंग ग्राऊंड.
    • पंडित जवाहरलाल नेहरू शाळेचे नूतनीकरण पूर्ण.

    रखडलेली कामे:-

    • अण्णासाहेब मगर स्टेडियमचा पुनर्विकास आणि संरक्षक भिंत.
    • नेहरूनगर ते पिंपरी मुख्य रस्त्याचे रुंदीकरण आणि पुनर्वसन.
    • मासुळकर कॉलनीतील रुग्णालय जोडणाऱ्या रस्त्याचे अर्धवट काम.

    ५. विश्लेषण: प्रभाग ९

    बळ:- विकसित क्रीडा संकुले, नवीन शाळा आणि टोलेजंग सोसायट्यांचे जाळे

    उणिवा:- ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे खराळवाडी आणि गांधीनगर भागात पसरणारी दुर्गंधी

    धोका:- स्टेडियमच्या रखडलेल्या कामामुळे खेळाडू आणि तरुण मतदारांमध्ये असलेला सत्ताधाऱ्यांविरुद्धचा संताप

    पोलिटिकल वझीरच्या सूचना :-

    प्रभाग ९ मध्ये विजय मिळवण्यासाठी केवळ सुशिक्षित मध्यमवर्गीयांना सांभाळून चालणार नाही. जो उमेदवार गांधीनगर पुनर्वसनाचा तिढा सोडवण्याची ताकद दाखवेल आणि अण्णासाहेब मगर स्टेडियम पुन्हा खेळाडूंसाठी खुले करेल, तोच या प्रभागाचा खरा ‘वझीर’ ठरेल.

  • प्रभाग ८: इंद्रायणीनगरचा ‘ग्लोबल’ लूक, पण लोकल समस्यांचे काय? विकासाचा बॅकलॉग कधी भरणार?

    पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग ८ म्हणजे विविध संस्कृतींचा संगम असलेला भाग. येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले नोकरदार आणि व्यावसायिक राहतात. चकाचक रस्ते आणि उद्याने एका बाजूला असली, तरी दुसरीकडे ‘आरोग्य’ आणि ‘शिक्षण’ यांसारख्या मूलभूत गरजांसाठी येथील नागरिकांना आजही वणवण करावी लागत आहे.

    १. पॉलिटिकल वझीरच्या मते:-

    एकूण मतदार: ५०,३२३.
    
    मतदार विभागणी: पुरुष (२७,०९२) आणि महिला (२३,२३०).

    मिश्र वस्ती: सुशिक्षित नोकरदार वर्ग आणि स्थानिक व्यावसायिक यांचा मोठा प्रभाव असल्याने येथील निवडणूक नेहमीच अटीतटीची होते.

    आरक्षण: ८-अ (SCअनुसूचित जाती), ८-ब (OBC महिला), ८-क (महिला राखीव) आणि ८-ड (सर्वसाधारण खुला).

    २. बॅटल ग्राऊंड मधील प्रमुख भाग:-

    या प्रभागात प्रामुख्याने इंद्रायणीनगर सेक्टर क्र. १, २, ४, ५, ६, ९, ११ आणि १२ तसेच महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डाच्या वसाहतींचा समावेश होतो.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: प्रश्नांचा पंचनामा:-

    नागरिकांशी संवाद साधल्यावर काही गंभीर प्रश्न समोर आले आहेत:

    आरोग्य सेवेचा अभाव: प्रभागाची लोकसंख्या मोठी असूनही येथे महापालिकेचे एकही मोठे हॉस्पिटल नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

    भाजीमंडईचा गोंधळ: सेक्टर २ मधील भाजीमंडईत ओटे असूनही विक्रेते रस्त्यावर बसतात, ज्यामुळे रहिवाशांना चालणे कठीण झाले आहे.

    सुरक्षेचा प्रश्न: भोसरी पोलीस स्टेशनच्या इमारतीचे काम आणि नवीन पोलीस चौकीची गरज अद्याप पूर्ण झालेली नाही.

    शिक्षणाकडे दुर्लक्ष: सेक्टर १ मधील मुख्य माध्यमिक शाळा आणि जलतरण तलाव काम वर्षानुवर्षे रखडलेले आहे.

    ४. विकासाची ‘एक बाजू’ आणि प्रलंबित कामे:-

    मार्गी लागलेली कामे:-

    • स्वामी विवेकानंद उद्यान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान विकसित झाले.
    • आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्केटिंग ट्रॅक तयार झाला
    • ओपन जिम आणि काही रस्त्यांचे पेव्हिंग ब्लॉकचे काम पूर्ण.

    रखडलेली कामे:-

    • सेक्टर २ मधील पोस्ट ऑफिसचे काम अद्याप पूर्ण नाही.
    • सेक्टर ६, ९, ११ मध्ये अद्याप वीजपुरवठा भूमिगत झालेला नाही.
    • ‘पीएमआरडीए’ आणि ‘मनपा’ च्या जागेच्या वादात अनेक विकासकामे अडकली आहेत.

    ५. विश्लेषण: प्रभाग ८ (इंद्रायणीनगर)

    (बळ):- सुशिक्षित नागरिक आणि सांस्कृतिक विविधता.

    (उणीवा):- महापालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या आरोग्य सुविधांची वानवा.

    (संधी):- रखडलेल्या शाळा आणि मंडईचे प्रश्न सोडवल्यास मतदारांचा मोठा पाठिंबा मिळू शकतो.

    (धोका):- गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि अपुऱ्या सोयीसुविधांमुळे तरुणांमध्ये असलेली अस्वस्थता.

    पॉलिटिकल वझीरच्या सूचना:-

    इंद्रायणीनगरचा मतदार ‘ब्रँडेड’ विकासकामांपेक्षा ‘मूलभूत सोयी’ देणाऱ्या नेत्याला महत्त्व देतो. जो उमेदवार हॉस्पिटल आणि रखडलेल्या शाळा सुरू करण्याची हमी देईल, तोच या सांस्कृतिक नगरीचा खरा ‘लोकप्रतिनिधी’ ठरेल.

  • भोसरी गावठाण आणि लांडेवाडीत कामांचा झगमगाट, पण मूलभूत समस्या मात्र ‘जैसे थे’!

    पिंपरी-चिंचवडच्या स्थापनेपासून शहराच्या केंद्रस्थानी असलेले भोसरी गावठाण आणि लांडेवाडी परिसर प्रभाग ७ मध्ये येतात. येथे मोठमोठे प्रकल्प उभे राहिले असले, तरी सामान्य नागरिकांचे जगणे मात्र अजूनही मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकले आहे.

    १. प्रभागाचा लेखाजोखा: बलस्थाने:

    या प्रभागात गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले आहेत:

    क्रीडा आणि आरोग्य: मारुतीराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र, सुसज्ज महानगरपालिका शाळा, जलतरण तलाव आणि अत्याधुनिक इमारत यांसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

    विकासकामे: इंद्रायणीनगर आणि सँडविक कॉलनी परिसरात सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते आणि सुशोभीकरण झाले आहे.

    शैक्षणिक सुविधा: अभ्यासिका केंद्राची निर्मिती करून विद्यार्थ्यांसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

    २. उणिवा आणि प्रलंबित प्रश्न:-

    झगमगाटाच्या आड काही अशा समस्या आहेत ज्या नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहेत:

    सांडपाणी आणि पाणी टंचाई: भोसरी गावठाणातील सांडपाणी वाहिन्या लहान असल्याने वारंवार चोकअप होतात. लांडेवाडी आणि विकास नगरमध्ये आजही पाणी पुरवठ्याची मोठी समस्या आहे.

    रखडलेले प्रकल्प: अत्याधुनिक मत्स्यालयाचे काम निधीअभावी दुसऱ्या टप्प्यात अडकले आहे, तर बहुउद्देशीय स्टेडियमचे कामही अत्यंत संथगतीने सुरू आहे.

    वाहतूक कोंडी: भोसरी-लांडेवाडी रस्त्यावर वाढत्या सदनिकांमुळे रहदारी वाढली असून रोजची वाहतूक कोंडी ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे.

    ३. प्रभाग ७: विश्लेषण:-

    संधी:- नवा लोकप्रतिनिधी: गेल्या ३ वर्षांपासून नगरसेवक नसल्याने प्रशासकीय राजवटीत कामे रेंगाळली आहेत. हक्काचा नगरसेवक मिळाल्यास विकास पुन्हा वेग घेऊ शकतो.

    नवीन नियोजित प्रकल्प: टपाल कार्यालयाचे स्थलांतर आणि नवीन पाणी टाकी बांधल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल

    धोके:- पावसाळ्यातील बिकट अवस्था: लांडेवाडीतील सखल भागात मुसळधार पाऊस पडल्यास पाणी साचते, ज्यामुळे रहिवाशांचे मोठे नुकसान होते.

    अपघात आणि अरुंद रस्ते: सिमेंट रस्ते झाले असले तरी काही ठिकाणी दगडी फरशीचा वापर अधिक झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

    ४. प्रभागातील समीकरणे आणि प्रमुख वस्त्या:-

    या प्रभागात शीतल बाग, सुविधा पार्क,आपटे कॉलनी, सँडविक कॉलनी,भोसरी गावठाण, खंडोबा माळ, गव्हाणे वस्ती, लांडेवाडी, शांतीनगर,जत्रा मैदान, आणि सुविधेचा पार्क यांसारख्या महत्त्वाच्या वस्त्यांचा समावेश होतो.

    एकूण मतदारसंख्या: ३९,८०४.
    
    पुरुष मतदार: २१,९३० | स्त्री मतदार: १७,८७४.

    ५. राजकीय आखाडा: प्रमुख आवाज

    प्रभागातील नागरिक आणि स्थानिक नेते सध्या आक्रमक आहेत:

    नितीन गायकवाड यांच्या मते, क्रीडा क्षेत्रातील कामे उत्तम झाली आहेत.

    फैयाजभाई सनदी यांनी हक्काच्या नगरसेवकाची गरज व्यक्त केली आहे, कारण प्रशासक काळात नागरी समस्यांना कोणी वाली उरलेला नाही.

    मल्हारी डफळ यांनी सिमेंट रस्त्यांवरील दगडी फरशीच्या वापरामुळे ज्येष्ठांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले आहे.

    निष्कर्ष:

    प्रभाग ७ मध्ये केवळ भव्य इमारती किंवा स्टेडियम उभारून चालणार नाही, तर पाणी आणि सांडपाण्यासारख्या गल्लीतल्या प्रश्नांवर ज्याची मांडणी मजबूत असेल, तोच यावेळेस विजयाचा वझीर ठरेल.