Category: महानगरपालिका विशेष

  • प्रभाग ३४: काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळाची एन्ट्री; पांडव-लोंढे जोडीसमोर सुभेदार निवडीचा पेच!

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग ३४ हा दक्षिण नागपुरातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रभाग आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने या प्रभागावर आपली मजबूत पकड निर्माण केली असली, तरी यंदा काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांनी आणि बदललेल्या समीकरणांनी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

    १. पोल्टीकल वझीरचा चष्मा: नेत्यांचे अस्तित्व पणाला!

    भाजपची तटबंदी: भाजपने या प्रभागात इच्छुकांची संख्या वाढवून आपली संघटनात्मक ताकद वाढवली आहे. मात्र, सुभेदार (उमेदवार) निवडताना पक्षाची मोठी ओढाताण होणार, हे स्पष्ट आहे.

    काँग्रेसची रणनीती: काँग्रेसचे खंबीर नेते गिरीश पांडव आणि अतुल लोंढे यांनी दक्षिण नागपुरात स्वतःचे स्वतंत्र वलय निर्माण केले आहे. भाजपच्या बंडखोरांवर काँग्रेसचा डोळा असून, योग्य वेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची तयारी पक्षाने केली आहे.

    समाज समीकरण: हा प्रभाग प्रामुख्याने ओबीसी बहुल असून, येथे अनुसूचित जाती (१३ हजार) आणि अनुसूचित जमाती (६ हजार) मतदारांची संख्या निर्णायक आहे.

    २. ‘बॅटल ग्राऊंड’ मधील प्रमुख वस्त्या

    मानेवाडा, विणकर कॉलनी, गजानननगर, ओंकारनगर, श्रीहरीनगर, शाहूनगर, जानकीनगर, जयभोलेनगर, बाबाभोलेनागर , शिवशक्तीनगर,महाकालीनगर, विज्ञाननगर, आकाश नगर, जयहिंद नगर, रामटेकनगर आणि राहटेनगर टोली.

    ३. निवडणुकीच्या आखाड्यातील इच्छुक :-

    या प्रभागात दोन्ही बाजूंनी इच्छुकांची लांबलचक यादी आहे:

    भाजप: मंगला खेकरे, नागेश मानकर, माधुरी ठाकरे, राजेंद्र सोनकुसरे, संजय ठाकरे, मनोज जाचक, विनोद कडू, सुनील मानेकर, प्रवीण ठाकरे, शशांक खेकरे, कपिल ढोबळे, आणि बंडू शिरसाठ.

    काँग्रेस: कल्पना जोगे, प्रवीण सांदेकर, भोला कुचनकर, रामभाऊ कावडकर, शंकर थुल, विनोद नामदेवते, रामू गाडगे, आणि अलका इंगोले.

    ४. जनतेचा आवाज: विकासाच्या गप्पा, पण समस्यांचा डोंगर

    सिमेंट रोड आणि झगमगाटाच्या घोषणा असल्या तरी जमिनीवर नागरिक त्रस्त आहेत:

    चुकीचे सिमेंट रोड: सिमेंट रोडमुळे रस्त्याची उंची वाढली आणि घरे खाली गेली, परिणामी पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरते.

    स्वच्छतेचा फज्जा: प्रभागात नियमित स्वच्छता होत नाही आणि ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

    सुविधांचा अभाव: शाहूनगर भागात लहान मुलांसाठी गार्डन नाही, तर टोली परिसरात मनपा शाळा आणि वाचनालयाची दुरवस्था झाली आहे.

    अतिक्रमणाचा विळखा: मानेवाडा चौक आणि ओेंकारनगर ते बेसा रोडवर अतिक्रमणामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते.

    ५. प्रभाग ३४ विश्लेषण:

    (बळ):-भाजपची संघटनात्मक बांधणी आणि दक्षिण नागपुरातील वर्चस्व.

    (उणिवा):- सिमेंट रोडच्या चुकीच्या नियोजनामुळे मतदारांमध्ये असलेला तीव्र संताप.

    (संधी):- काँग्रेससाठी पांडव-लोंढे या जोडगोळीच्या नेतृत्वात पुन्हा मुसंडी मारण्याची संधी.

    (धोका):- भाजपमधील इच्छुकांची मोठी संख्या बंडखोरीला आमंत्रण देऊ शकते, ज्याचा फायदा विरोधकांना होईल.

    राजकीय वझीरचा ‘मास्टरस्ट्रोक’ :-

    प्रभाग ३४ मध्ये यावेळी येथील जनता केवळ आश्वासनांवर भुलणार नाही. जो उमेदवार ‘पावसाळ्यातील पाणी’ आणि ‘अतिक्रमणाची समस्या’ सोडवण्यावर ठोस कृती आराखडा मांडेल, मानेवाड्याची जनता त्यालाच आपला नेता म्हणून निवडेल.

  • प्रभाग ३३: बसपाच्या तटबंदीला काँग्रेस खिंडार पाडणार की भाजपचा मास्टर प्लॅन

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग ३३ हा यंदा दक्षिण नागपुरातील सर्वात मोठा राजकीय ‘सस्पेन्स’ ठरणार आहे. २०१७ मध्ये येथे बसपाने (BSP) दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन सर्वांना धक्का दिला होता, मात्र यावेळी काँग्रेसने अनुसूचित जातींच्या मतांवर डोळा ठेवून बसपाची ही तटबंदी भेदण्यासाठी कंबर कसली आहे.

    १. राजकीय वझीरचा चष्मा: त्रिकोणी संघर्षाचा धुरळा!

    भाजपसमोर बालेकिल्ला राखण्याचे आव्हान: २०१७ मध्ये भाजपने येथे ३ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. यंदा भाजपचे लक्ष अनुसूचित जातींच्या मतदारांना आपल्याकडे वळवून व्होट बँक टिकवण्यावर आहे.

    काँग्रेसची रणनीती: काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी यादी असून, अनुसूचित जाती आणि जमातीच्या मतांचे समीकरण जुळवून भाजपला शह देण्याची तयारी सुरू आहे.

    बसपाचा ‘सायलंट’ प्रभाव: बसपाच्या तटबंदीमुळे गेल्या वेळी काँग्रेसला मोठा फटका बसला होता. यावेळी आंबेडकरी जनता कोणाच्या पाठीशी उभी राहते, यावरच या प्रभागाचा ‘वझीर’ ठरेल.

    २. ‘बॅटल ग्राऊंड’ मधील प्रमुख वस्त्या

    या प्रभागात प्रामुख्याने कष्टकरी आणि मध्यमवर्गीय वस्त्यांचा समावेश होतो:

    प्रमुख वस्त्या: कौशल्यायननगर, कुकडे ले- आऊट, न्यू बाबुळखेडा, पार्वतीनगर, रावसाहेब ठवरे हायस्कूल, न्यू कैलासनगर, रिपब्लिकन कॉलनी, प्रगतीनगर, नालंदानगर, कुंजीलाल पेठ, वसंतनगर, रामेश्वरी, हावरापेठ, काशीनगर, द्वारकापुरी,भगवाननगर, बॅनर्जी ले-आऊट, बालाजीनगर (विस्तार), महात्मा फुलेनगर, उल्हासनगर, नाईकनगर, मित्रनगर, चंद्रनगर, बँक कॉलनी, श्रमजीवीनगर, जयभीमनगर, आंबेडकरनगर, रूपनगर, न्यू ज्ञानेश्वरनगर, जुना बाबुळखेडा, श्यामनगर, शुभनगर

    ३. निवडणुकीच्या आखाड्यातील ‘योद्धे’:-

    या प्रभागात इच्छुकांची भाऊगर्दी असून, दोन्ही पक्षांनी आपापली फौज तयार ठेवली आहे:

    काँग्रेस: या प्रभागामध्ये काँग्रेसकडून मनोज गावंडे, वासुदेवराव ढोके, संकेत डोंगरे, मच्छिंद्र साळवे, दिनेश तराळे, शीला तराळे, शिवा अरखेल, मामा राऊत, शत्रुघ्न चंदेल, रेखा बरगट, रेखा काटोले, सुनील पाटील, संजय गभने, देवीदास देशमुख, राहुल थुल, बापू कुंभारे, सुशांत लोखंडे यांच्या नावाची चर्चा आहे

    भाजप: विशाखा बांते, भारती बुंदे, वंदना भगत, रमेश शिंगारे, शरद बांते, विकास बुंदे, गोलू बोरकर, सचिन कारटकर, अजय हिवरकर, आकाश भेदे, अमर धरमारे, सचिन जाधव, सचिन देशभ्रतार, संदीप कांबळे, संतोष तायडे, विलास हजारे, विजय पाटील, पीयूष पाटील आदींच्या नावाची चर्चा आहे.

    बसपा: उत्तम शेवडे, रंजना ढोरे, चंद्रशेखर कांबळे, आणि अजय डांगे

    ४. ग्राऊंड रिपोर्ट: जनतेचा संताप आणि प्रलंबित प्रश्न

    निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांनी मूलभूत सुविधांवरून लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे

    पाणीपुरवठ्याचा प्रश्न: प्रभागात आजही अपुऱ्या पाणीपुरवठ्याची मोठी समस्या असून नागरिक त्रस्त आहेत.

    जुन्या गडर लाईनचा विळखा: भीमनगर आणि परिसरातील जुन्या गडर लाईन वारंवार चोक होत असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

    अधुरे स्मारकाचे काम: परिसरातील डॉ. आंबेडकरांचे स्मारक अद्याप अर्धवट स्थितीत असून ते पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.

    रस्त्यांची दुरवस्था: सिमेंट रोडच्या चुकीच्या नियोजनामुळे रस्त्यांची उंची वाढली आहे, ज्यामुळे पावसाळ्यात घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

    ५. विश्लेषण: प्रभाग ३३

    बळ:– भाजपचे संघटन आणि अनुसूचित जातीच्या प्रभागात राबवलेले उपक्रम.

    उणिवा:– अंतर्गत राजकारण आणि वाढत्या बंडखोरीमुळे भाजपला बसणारा संभाव्य फटका

    संधी:- काँग्रेससाठी बसपाच्या कमकुवत झालेल्या प्रभावात मुसंडी मारण्याची मोठी संधी

    धोका:- बीआरएसपी, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया यांसारख्या पक्षांमुळे होणारे मतविभाजन

    राजकीय वझीरचा ‘मास्टरस्ट्रोक’:

    प्रभाग ३३ मध्ये जो उमेदवार ‘डॉ. आंबेडकरांचे स्मारक’ पूर्ण करण्याचे आणि ‘पाणी-गडर’ यांसारखे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन देईल, त्यालाच वस्तीतील जनता आपला नेता मानले. येथे केवळ लाट नाही, तर वैयक्तिक जनसंपर्कच विजय मिळवून देईल.

  • प्रभाग ३२: बजरंग नगरमध्ये इच्छुकांची मांदियाळी; नेत्यांच्या पक्षांतरामुळे भाजप-काँग्रेसमध्ये तणाव!

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग ३२ हा सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. २०१७ मध्ये भाजपने येथे एकतर्फी यश मिळवले होते, मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले राजू नागुलवार आणि काँग्रेसमधील नवे चेहरे यांच्यामुळे येथील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

    १. ‘राजकीय वझीर’चा चष्मा: दावेदार वाढले, पक्षाची डोकेदुखी वाढली

    भाजपचा पेच: राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आलेले राजू नागुलवार आता कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, यामुळे भाजपच्या जुन्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

    काँग्रेसची रणनीती: काँग्रेसने यावेळी जुन्या चुका सुधारण्याचे ठरवले असून, पक्षाचे सचिव आणि माजी नगरसेविका नयना झाडे यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. विलास करांगळे देखील काँग्रेसकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

    २०१७ चे चित्र:

    गेल्या निवडणुकीत भाजपने येथे चारही जागा जिंकल्या होत्या (अभय गोटेकर, कल्पना कुंभलकर, रुपाली ठाकूर आणि दीपक चौधरी)

    २. निवडणुकीच्या आखाड्यातील ‘इच्छुक वझीर’:-

    या प्रभागातून रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची मोठी फौज तयार आहे:

    भाजप: माजी नगरसेवक दीपक चौधरी, अभय गोटेकर, रूपाली ठाकूर व कल्पना कुंभलकर यांच्यासह राजू नागुलवार, बंडू सिरसाट, वैशाली काळे, वैशाली मेनकुदळे, कुणाल पडोळे, विलास बांगरे

    काँग्रेस: विलास करांगळे, नयना झाडे, नितीन देशमुख, संध्या ठाकरे, सरिता लक्षणे, विमल वाघमारे, सरिता राणेकर, निमीषा शिर्के, मंगेश शातलवार, विश्वेश्वर अहिरकर, राजू बेलखेडे, भाऊराव कोकणे, रेखा थूल, पूजा देशमुख, अक्षय हेटे, धनश्री बावने.

    राष्ट्रवादी (शरद पवार गट): अशोक काटले, जया काटले, मीना कुंटे आणि विलास ठाकरे.

    ३. ग्राऊंड रिअॅलिटी: विकासाच्या नावाखाली समस्यांचे डोंगर

    प्रभागातील नागरिक अनेक मूलभूत प्रश्नांनी त्रस्त आहेत:

    सिमेंट रोडचा फटका: सिमेंट रोड बनवताना रस्त्याची उंची वाढल्यामुळे पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरते. अयोध्या नगर आणि जुन्या सुभेदार परिसरात ही समस्या गंभीर आहे.

    गडर लाईनचा पेच: जुन्या गडर लाईनमुळे सांडपाणी वारंवार तुंबते, ज्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

    उद्यानांची दुरवस्था: प्रभागात उद्यानांचा अभाव आहे आणि जे काही बगीचे आहेत, त्यांची देखभाल होत नसल्याने तिथे गवत आणि कचरा वाढला आहे.

    पाणी समस्या: २४ तास पाणी योजनेची घोषणा होऊनही रहिवाशांना आजही दिवसातून केवळ १ तास पाणी मिळते.

    ४. प्रभाग ३२ विश्लेषण

    बळ:- भाजपचा बालेकिल्ला आणि सुशिक्षित मतदारांचा मोठा भरणा.

    कमकुवत दुवे:- सिमेंट रोडच्या चुकीच्या नियोजनामुळे रहिवाशांमध्ये असलेला तीव्र संताप.

    संधी:- काँग्रेसच्या महिला नेतृत्वामुळे (नयना झाडे) महिला मतदारांना आकर्षित करण्याची संधी.

    धोके :- भाजपमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांमुळे (नागुलवार) जुन्या कार्यकर्त्यांची होणारी बंडखोरी.

    ५. पोल्टीकल वझीरचा ‘मास्टरस्ट्रोक’:-

    प्रभाग ३२ मध्ये यावेळी ‘जुन्या विरुद्ध नव्या’ असा संघर्ष पाहायला मिळेल. जो उमेदवार ‘सिमेंट रोडमुळे होणारे जलमय नागपूर’ आणि ‘उद्यानांचे रखडलेले प्रश्न’ सोडवण्याचे ठोस आश्वासन देईल, त्यालाच बजरंग नगरची जनता कौल देईल. कुणबी आणि तेली समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण येथे निर्णायक ठरेल.

  • प्रभाग ३०: बिडीपेठेत भाजपचा गड की काँग्रेसचे ‘कमबॅक’? सक्करदरा तलावाचा प्रश्न ठरणार निर्णायक!

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग ३० हा दक्षिण- मतदारसंघ नागपुरातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रभाग आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने येथे ३-१ असे यश मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. मात्र, गेल्या काही वर्षांतील राजकीय उलथापालथ आणि स्थानिक प्रश्नांवरून मतदारांमध्ये असलेली नाराजी यामुळे यंदा येथील लढत ऐतिहासिक होणार आहे.

    १. राजकीय पार्श्वभूमी आणि ‘घरवापसी’चे वारे

    भाजपचे वर्चस्व: २०१७ मध्ये भाजपने या प्रभागावर आपली मजबूत पकड निर्माण केली होती. नागेश सहारे, रिता मुळे आणि स्नेहल बिहारे यांसारख्या नेत्यांनी भाजपचा विजय सुकर केला होता.

    काँग्रेसचे आव्हान: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय महाकाळकर यांनी २०१७ मध्ये येथे विजय मिळवून पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले होते.

    ट्विस्ट: दीपक कापसे यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने (घरवापसी) या प्रभागातील काँग्रेसची ताकद वाढली असून भाजपसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.

    २. प्रभागातील प्रमुख वस्त्या:-

    या प्रभागाची रचना प्रामुख्याने जुन्या वस्त्या आणि मध्यमवर्गीय वसाहतींमध्ये झालेली आहे:

    प्रमुख वस्त्या: बिडीपेठ, न्यू सुभेदार ले आऊट,दत्तात्रय नगर, आशीर्वाद नगर, ताजाबाद दरबार, सिंधीबन, ठाकूर प्लॉटस, सरताज कॉलोनी, संतोषी माता नगर, सोळंकी वाडी, अग्निशमन कार्यालय, निराला ले- आऊट, गौसीयाँ ले-आऊट, शामबाग, सक्करदरा तलाव, भांडे प्लॉटचा काही भाग, छोटा ताजबाग.

    ३. ग्राऊंड रिअॅलिटी:

    सक्करदरा तलावाचा रखडलेला कायापालट या प्रभागातील मतदारांसाठी सर्वात मोठा मुद्दा ‘सक्करदरा तलाव’ हाच आहे:

    सौंदर्यीकरणाचा प्रश्न
    : सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही, काम कासवगतीने सुरू असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. तलावातील गाळ आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

    सीवरेज आणि पाणी: जुन्या वस्त्यांमध्ये सीवरेज लाईन अनेक ठिकाणी खराब झाली असून पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर येण्याच्या तक्रारी आहेत.

    कचरा व्यवस्थापन: उपनगरातील कचरा संकलन अनियमित असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळतात.

    ४. विश्लेषण: प्रभाग ३०

    बळ :- भाजपचे केडर बेस संघटन आणि सक्करदरा परिसरात असलेली पारंपरिक व्होट बँक

    कमकुवत दुवे:- सक्करदरा तलावाचे रखडलेले काम आणि प्रशासकीय दिरंगाईबद्दल मतदारांमधील नाराजी.

    संधी:- दीपक कापसे यांच्या घरवापसीमुळे काँग्रेसला दलित आणि ओबीसी मतांचे ध्रुवीकरण करण्याची संधी.

    ५. पोल्टीकल वझीरचा स्ट्रॅटेजिक व्ह्यू:-

    प्रभाग ३० मध्ये यावेळी केवळ ‘पक्षाचे नाव’ चालणार नाही. येथील मतदार हा वैयक्तिक संबंधांना महत्त्व देणारा आहे. जो उमेदवार ‘सक्करदरा तलावाचा कायापालट’ आणि ‘बिडीपेठ परिसरातील आरोग्य सुविधा’ यांवर ठोस कृती आराखडा सादर करेल, तोच विजयी ठरेल.

    टीप: १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी बिडीपेठेचा कल कोणाकडे असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

  • प्रभाग ३१: बालेकिल्ल्यात ‘बंडखोरी’ की ‘बदल’? सतीश होले आणि रवींद्र भोयर यांची प्रतिष्ठा पणाला!

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग ३१ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत स्फोटक प्रभाग ठरला आहे. या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील नगरसेवकांनी वेळोवेळी केलेले पक्षांतर आणि बदललेली राजकीय निष्ठा. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेला हा भाग आता काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू बनला आहे.

    १. ‘पोल्टीकल वझीर’चा चष्मा: पक्षांतराचा प्रभाव

    दोन दिग्गज चेहरे: भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले सतीश होले आणि रवींद्र भोयर या दोन मातब्बर नेत्यांच्या प्रभावामुळे हा प्रभाग काँग्रेससाठी आशेचा किरण ठरला आहे.

    भाजपची रणनीती: आपले माजी शिलेदार समोर उभे ठाकल्याने भाजप आता येथे नव्या आणि निष्ठावान चेहऱ्यांच्या शोधात आहे.

    २०१७ चे चित्र:

    २०१७ मध्ये या प्रभागातून सतीश होले, रवींद्र भोयर, उषा पॅलट आणि शीतल कामडे (सर्व भाजप) निवडून आले होते.

    २. निवडणुकीच्या आखाड्यातील ‘इच्छुक यादी:-

    या प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी असून, खालील नावे चर्चेत आहेत:

    काँग्रेस: माजी उपमहापौर सतीश होले, माजी नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, प्रशांत धवड, सुजाता कोंबाडे, योगेश तिवारी, वंदना मेश्राम, नीता ठाकरे यांच्यासह इतरांची नावे चर्चेत आहेत
    भाजप: माजी नगरसेविका शीतल कामडी, उषा पॅलट, राम कोरके, प्रकाश ठाकरे, राजू बोराटे, वशिष्ठ ओझा, रमेश कोलारकर, देवेंद्र दस्तुरे, कृष्णा येरावार, मंगला मस्के यांच्यासह इच्छुकांची यादी मोठी आहे. 

    इतर: वंचित बहुजन आघाडी आणि बसपा देखील या प्रभागात दलित आणि मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत.

    ३. ग्राऊंड रिअॅलिटी

    प्रलंबित प्रश्न आणि लोकांच्या तक्रारी प्रशासकीय राजवटीत या प्रभागातील काही मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत:

    जलतरण तलावाचा प्रश्न: कामगार कल्याण मंडळाचा जलतरण तलाव गेल्या ८ वर्षांपासून बंद आहे. हा येथील तरुणांसाठी आणि खेळाडूंसाठी मोठा चिंतेचा विषय आहे.

    ड्रेनेज समस्या: जुन्या रेशीमबाग आणि हनुमान नगर परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार चोक होण्याच्या तक्रारी आहेत.
    अस्वच्छता: अंतर्गत रस्त्यांवरील कचरा संकलन अनियमित असल्यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते.

    ४. विश्लेषण: प्रभाग ३१

    बळ :- सतीश होले आणि रवींद्र भोयर यांचा दांडगा वैयक्तिक जनसंपर्क

    कमकुवत दुवे :- भाजप नेत्यांच्या पक्षांतरामुळे मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेला गोंधळ.

    धोके :- महायुती किंवा महाविकास आघाडीत जागा वाटपावरून होणारी संभाव्य बंडखोरी.

    ५. पोल्टीकल वझीरचा ‘मास्टरस्ट्रोक’

    प्रभाग ३१ मध्ये विजय मिळवण्यासाठी ‘कामगार कल्याण मंडळाचा तलाव’ पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन आणि ‘वस्ती पातळीवरील नागरी सुविधा’ सुधारण्याचे वचन महत्त्वाचे ठरेल. येथील मतदार हा वैचारिक पेक्षाही ‘कामाला’ महत्त्व देणारा आहे, त्यामुळे जो उमेदवार जमिनीवर सक्रिय असेल, तोच वझीर ठरेल.

  • प्रभाग २९: भाजपचे प्राबल्य की शिंदेसेनेची धडपड ? पोहरा नदीचा पूर कोणाला वाहून नेणार?

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग २९ हा दक्षिण नागपूर आणि कामठी विधानसभा क्षेत्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा प्रभाग आहे. २०१७ मध्ये येथे भाजपचे चारही उमेदवार निवडून आले होते, परंतु यंदा शिंदेसेनेने कंबर कसल्याने आणि काँग्रेसने जोर लावल्याने येथील राजकीय मैदानात मोठी चुरस निर्माण झाली आहे.

    १. राजकीय पार्श्वभूमी आणि वर्चस्वाची लढाई

    भाजपचा बालेकिल्ला: २०१७ च्या निवडणुकीत भाजपने येथे ‘क्लीन स्वीप’ दिला होता. माजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव असलेल्या या प्रभागात भाजप आपली सत्ता टिकवण्यासाठी सज्ज आहे.

    शिंदेसेनेचे आव्हान: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या प्रभागात जनसंपर्क वाढवला असून, भाजप नेत्यांच्या भरवशावर न राहता स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे.

    काँग्रेसची मोर्चेबांधणी: ग्रामीण भागातील नेत्यांचा प्रभाव असलेल्या या प्रभागात काँग्रेसनेही पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचे संकेत दिले आहेत.

    २. प्रभागातील प्रमुख वस्त्या:-

    या प्रभागाची लोकसंख्या सुमारे ६३ हजारांच्या आसपास असून, यात खालील भागांचा समावेश होतो:

    प्रमुख वस्त्या: म्हाळगीनगर, महात्मा गांधी नगर, गजानननगर, बेसा पॉवर स्टेशन, प्रोसेस सर्वेश्वर सोसायटी, सन्मार्गनगर, संतोषी मातानगर, मनपा कॉलनी, न्यू प्रेरणा नगर, सर्वोदय नगर, सुदर्शन नगर, हुडकेश्वर आणि नरसाळा.

    ३. ग्राऊंड रिअॅलिटी:

    ‘पोहरा नदी’ आणि ‘हुडकेश्वर पुलाचा’ पेच प्रभागातील नागरिक अनेक वर्षांपासून मूलभूत समस्यांनी त्रस्त आहेत:

    पोहरा नदीचा फटका: दरवर्षी पावसाळ्यात पोहरा नदी दुथडी भरून वाहते. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होते. नदीला संरक्षण भिंत नसल्यामुळे रहिवाशांना मनपाच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते.

    हुडकेश्वर पूल: हुडकेश्वर पुलाचे काम मागील १२ वर्षांपासून अर्धवट पडलेले आहे. टेकऑफ सिटीच्या पुलाचे बांधकामही रखडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते.

    आरोग्य आणि स्वच्छता: प्रभागातील अनेक उद्यानांची दुरवस्था झाली असून तेथे असामाजिक तत्वांचा वावर वाढला आहे. नियमित सफाई होत नसल्याने डासांचा प्रकोप वाढला असून आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

    ४. इच्छुकांची यादी आणि आरक्षण:-

    या प्रभागात ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे. यंदाच्या आरक्षणानुसार येथे पुरुषांच्या अपेक्षांवर ‘पाणी’ फिरण्याची शक्यता आहे, कारण महिला आरक्षणाचे समीकरण निकाल बदलू शकते.

    भाजप: माजी नगरसेविका स्वाती आखतकर, महामंत्री अजय बोढारे, डी. डी. सोनटक्के, प्रीती राजदेरकर, डॉ. प्रीती मानमोडे, डॉ. पूजा धांडे, मेघा झाडे, आशिष मोहिते, योगेश मडावी, विद्या मडावी, लीला हातीबेड, कमल हातीबेड, बंटी पेसाडेली या इच्छुकांची नावे चर्चेत आहेत.

    काँग्रेस: प्रवीण गवरे, चक्रधर भोयर, विनोद मिसाळ, वर्षा गुजर, भारती कामडी, प्राजक्ता वैद्य यांच्या नावांची चर्चा आहे

    शिंदेसेना: विशाल कोरके, नीलिमा शास्त्री, उज्ज्वला उमरे, किशोर रंढई

    ५. २०१७ चे नगरसेवक

    १. स्वाती आखतकर (भाजप)
    २. विद्या मडावी (भाजप)
    ३. भगवान मेंढे (भाजप)
    ४. लीला हाथीबेड (भाजप)

    पोल्टीकल वझीरचा स्ट्रॅटेजिक व्ह्यू :-

    प्रभाग २९ मध्ये जो उमेदवार ‘हुडकेश्वर रोडचे सिमेंटिकरण’ आणि ‘पोहरा नदीला संरक्षण भिंत’ या दोन मुद्द्यांवर ठोस कृती करेल, त्यालाच जनता निवडून देईल. ग्रामीण भागातील मतदारांचा कल कोणाकडे झुकतो, यावर महापालिकेची सत्ता अवलंबून असेल.

  • प्रभाग २८: बालेकिल्ला राखण्यासाठी भाजप सज्ज, तर शिवसेना ‘किल्ला’ भेदणार का?

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग २८ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपच्या लाटेतही शिवसेनेने या प्रभागात आपले दोन नगरसेवक निवडून आणून सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.

    १. ‘राजकीय वझीर’चा चष्मा: शिवसेनेचा संघर्ष आणि भाजपची रणनीती\

    शिवसेनेची पकड: ज्येष्ठ नगरसेवक किशोर कुमेरिया यांना या प्रभागाचे 'अंगद' म्हटले जाते. २००२ पासून ते स्वबळावर आणि शिवसेनेचे अस्तित्व टिकवून आहेत.
    भाजपची मोर्चेबांधणी: २०१७ मध्ये भाजपने येथे दोन जागा जिंकल्या होत्या (पिंटू झालके आणि रेखा साकोरे). विधानसभेत भाजपला या प्रभागातून ११ हजारांचे लीड मिळाले होते, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

    काँग्रेसची स्थिती: २०१७ मध्ये काँग्रेसला येथे एकही जागा मिळाली नव्हती, मात्र आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने यावेळी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.

    २. प्रभागातील प्रमुख वस्त्या:-

    या प्रभागाची व्याप्ती मोठी असून यात खालील प्रमुख भागांचा समावेश होतो:

    प्रमुख वस्त्या: रमना मारोती, हरपूरनगर, सुत गिरणी कामगारनगर, ईश्वरनगर, पवनसूतनगर, धन्वंतरीनगर, चिटणीसनगर, दिवाण लेआऊट, दिघोरी, बेलदारनगर, तुकडोजीनगर, गाडगेनगर, डायमंडनगर, भाग्यश्रीनगर, पंडित नगर, न्यू सहकारनगर, प्रगती कॉलनी, सर्वश्रीनगर, कीर्तीनगर.

    ३. ग्राऊंड रिअॅलिटी

    रखडलेली कामे आणि जनतेचा रोष प्रभागात नागरी सुविधांची मोठी ओरड आहे:

    रस्त्यांची दुरवस्था:  रमना मारोती रोड, साकोरे कॉम्प्लेक्स ते रिंग रोड या रस्त्यांची कामे अर्धवट असून नागरिक धुळीने व खड्ड्यांनी त्रस्त आहेत. ज्योती प्राथमिक शाळा ते हसनबाग रोडचे काम रखडल्याने कसरत करावी लागते.

    पाणी आणि ड्रेनेज: वेस्ट वॉटर लाईनवरील सिमेंटचे झाकण तुटलेले असून पावसाळ्यात घरात पाणी शिरण्याच्या तक्रारी आहेत. तसेच न्यू डायमंड नगरमध्ये पाण्याचा प्रेशर कमी आहे.

    अस्वच्छता: सफाई कामगार नियमित येत नाहीत आणि उद्यानांमधील ‘ग्रीन जिम’ साहित्याची मोडतोड झाली आहे.

    ४. इच्छुकांची मोठी फौज :-

    भाजप: भाजपकडून माजी नगरसेवक पिंटू झलके, माजी नगरसेवक भारतभूषण गायधने, माजी नगरसेविका रेखा साकोरे, माजी नगरसेविका नीता ठाकरे, भास्कर वाडेकर, विजय आसोले, अमर टिचकुले, मंगेश कुचेवार, गजेंद्र मोहाडीकर, बाळा विटाळकर, अतुल बोंडे, गोपाल ठवकर, लीलाधर लुचे, प्रदीप ठाकरे, डॉ. राजेश गादेवार, सचिन सावरबांधे, चंद्रकांत जंजाळ, परिक्षित उपाध्ये, रवी भुसारी, किरण दातीर, कीर्ती शेंडे, अंजली मोहोड, दीपाली अवचट, वैशाली पिसे, भारती पिंजरकर,लक्ष्मी मोहाडीकर, चंदा धोटे, अर्चना भेंडारकर, छाया बोंदरे, सुरेखा खवास, नंदा येवले, उर्मिला कापगते, करुणा वानखेडे, पुष्पा ढोरे इच्छुक आहेत. शिंदे सेनेकडून माजी नगरसेवक किशोर कुमेरिया, माजी नगरसेविका मंगला गवरे पुन्हा मशाल पेटविण्याच्या तयारीत आहेत.

    काँग्रेस: वीणा कुकडे, परमेश्वर राऊत, राहुल अभंग, विलास गावंडे, डॉ. प्रकाश ढगे, प्रवीण गवरे, विवेक सोरते, वीणा कुकडे, नयना झाडे, वंदना सोनटक्के यांची नावे चर्चेत आहेत.

    शिवसेना (उद्धव गट): किशोर कुमेरिया, मंगला गवरे.

    ५. राजकीय वझीरचा स्ट्रॅटेजिक व्ह्यू:-

    कुणबी-तेली समीकरण:- या प्रभागात कुणबी आणि तेली समाजाचे मोठे प्राबल्य आहे, जे निवडणुकीचे निकाल फिरवू शकतात.

    बंडखोरीचे आव्हान:- भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तिकीट कापल्या गेल्यास बंडखोरी रोखणे हे मोठे आव्हान असेल.

    लोधी समाज:- लोधी समाजाची ताकद सातत्याने शिवसेनेचे किशोर कुमेरिया यांच्या पाठीशी राहिली आहे.

    निष्कर्ष:

    प्रभाग २८ मध्ये जो उमेदवार ‘रस्ते आणि पाणी’ या मूलभूत प्रश्नांवर लोकांचा विश्वास जिंकेल, तोच विजयी ठरेल. शिवसेनेचा गड वाचणार की भाजप ‘क्लीन स्वीप’ देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

  • प्रभाग २७: नेहरूनगरात ‘पक्षांतराचा’ नवा पेच; वनवे विरुद्ध गिऱ्हे संघर्षात कोण मारणार बाजी?

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग २७ हा यावेळी शहराच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. २०१७ मध्ये येथे भाजपचे वर्चस्व होते, मात्र काँग्रेसचे दिग्गज नेते तानाजी वनवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केल्याने या प्रभागातील लढत आता ‘चौरंगी’ होण्याचे संकेत मिळत आहेत.

    १. ‘राजकीय वझीर’चा चष्मा: बदललेली समीकरणे

    पक्षांतराचा फटका: काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आता राष्ट्रवादीत गेल्याने काँग्रेसची पारंपरिक मते विभागली जाण्याची शक्यता आहे.

    भाजपचा बालेकिल्ला: २०१७ मध्ये भाजपचे ३ नगरसेवक निवडून आले होते, तर काँग्रेसचा फक्त १ नगरसेवक (तानाजी वनवे) विजयी झाला होता.

    शिवसेनेची भूमिका: उद्धव ठाकरे गटाची ताकद या प्रभागात निर्णायक ठरू शकते, कारण गेल्या वेळी त्यांच्या उमेदवारांनी लक्षणीय मते घेतली होती.

    २. प्रभागातील लोकसंख्या:-

    एकूण लोकसंख्या: सुमारे ६६,८२८ (२०१७ च्या आकडेवारीनुसार, आता ही संख्या ७० हजारांच्या पुढे गेली आहे)
    
    प्रमुख वस्त्या: नेहरूनगर, ओमनगर, सुदामपुरी, गुरुदेव नगर, मिरे ले-आऊट, माकडे ले-आऊट, बापू नगर आनंद नगर, नंदनवन झोपडपट्टी, राजेन्द्र नगर, न्यू प्रशांत नगर, न्यू नंदनवन कॉलनी हसनबाग, सद्भावना नगर, वृंदावन नगर नंदनवन- एम. आय. जी व एल. आय.जी. कॉलनी आयुर्वेदिक कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज ले-आऊट
    
    सामाजिक समीकरण: या प्रभागात तेली, कुणबी, मुस्लिम आणि दलित समाजातील मतदारांची संख्या मोठी असून 'कुणबी' मते येथे निर्णायक ठरतात.

    ३. ग्राऊंड रिअॅलिटी: जनतेच्या तक्रारी आणि वास्तव:-

    प्रशासकीय राजवटीत या प्रभागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे

    पाणी समस्या: नागपूरला २४ तास पाणी देण्याची घोषणा झाली असली, तरी या प्रभागातील अनेक वस्त्यांत आजही दिवसातून केवळ १ तास पाणी येते.

    नाग नदीचा धोका: आनंद नगर परिसरात नाग नदीला संरक्षक भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरते.

    मैदानांची दुरावस्था: आयुर्वेदिक ले-आउट, नंदनवन आणि ओमनगर येथील मैदानांची कामे वर्षानुवर्षे अर्धवट आहेत.

    आरोग्य सेवा: आयुर्वेदिक ले-आउटमधील सरकारी दवाखान्याची दुरवस्था झाली असून, प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

    ४. इच्छुकांची यादी :-

    भाजप:- माजी नगरसेविका दिव्या धुरडे, वंदना भुरे, हरिश दिकोंडवार यांच्यासह प्रवीण गिऱ्हे, मंगेश साखरकर, राजेश समर्थ, अजय सराडकर, बल्लू बारे चेतना सातपुते, वैशाली हनवते, सुरेखा मदनकर, वैभव शेटे, सचिन वातखडे, आम्रपाली मेश्राम, रुपेश मेश्राम

    काँग्रेस:- नीता वंजारी, शेख नूरजहाँ परवीन मुजीब, शेख मुजीब, रवींद्रकुमार बावनकर, राकेश कनोजे, मिलिंद दुपारे, नीलेश खोरगडे, प्रशांत आचकर, वैशाली लांडगे, राहुल कांबळे

    राष्ट्रवादी (अजित पवार):- तानाजी वनवे, मालूताई वनवे, विलास माकडे, प्रसाद झोड

    ५. विश्लेषण: प्रभाग २७

    (जमेच्या बाजू):- भाजपचे बूथ लेव्हलवरील मजबूत संघटन

    (कमकुवत दुवे):- नाग नदीच्या प्रश्नामुळे आणि पाणी टंचाईमुळे सत्ताधाऱ्यांविरुद्ध रोष

    (संधी):- काँग्रेसच्या मतात होणाऱ्या विभाजनाचा भाजपला फायदा होण्याची संधी

    (धोके):- महायुती आणि महाविकास आघाडी न झाल्यास चौरंगी लढतीत अनपेक्षित निकाल लागण्याचा धोका.

    राजकीय वझीरचा ‘मास्टरस्ट्रोक’:-

    प्रभाग २७ मध्ये ‘तानाजी वनवे यांची वैयक्तिक ताकद’ विरुद्ध ‘भाजपचे चिन्ह’ अशी ही लढाई असेल. जर काँग्रेसने नवा आणि तगडा चेहरा दिला नाही, तर भाजपचा विजय सुकर होऊ शकतो. मात्र, नाग नदीलगतच्या वस्त्यांमधील संताप कोणाला घरी बसवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • वाठोड्यात भाजप पुन्हा ‘चौकार’ मारणार की काँग्रेसचे होणार ‘डम्पिंग’? प्रभाग २६ मध्ये कचऱ्याचा डोंगर की विकासाचा मुद्दा?

    नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणात प्रभाग २६ (वाठोडा) नेहमीच चर्चेत राहिला आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने येथे ‘विजयाचा चौकार’ मारला होता. मात्र, गेल्या आठ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, यावेळी डम्पिंग यार्डचा प्रश्न आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे भाजपसमोर आपले वर्चस्व टिकवण्याचे मोठे आव्हान आहे.

    १. राजकीय पेच: जुने चेहरे विरुद्ध नवे आव्हान:

    भाजपची ताकद: माजी नगरसेवक बंटी कुकडे आणि धर्मपाल मेश्राम हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. गेल्या वेळी त्यांना मिळालेली मोठी आघाडी ही त्यांची जमेची बाजू आहे.

    काँग्रेसचा नव्या चेहऱ्यांचा शोध: काँग्रेस यावेळी प्रभागात बदल घडवण्यासाठी नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहे. २०१७ मध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांनीही मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी, पक्ष कोणाला संधी देतो यावर बरेच काही अवलंबून आहे.

    २. प्रभाग २६ मधील प्रमुख वस्त्या:

    या प्रभागाचा विस्तार मोठा असून यात नागरी आणि झोपडपट्टी भागांचा समावेश होतो:

    वाठोडा वस्ती, वाठोडा ले-आऊट, श्रीकृष्ण नगर, विद्यानगर, न्यू पँथर नगर,शेषनगर, शक्ती माता नगर, दर्शन कॉलनी, अनमोल नगर, श्रावण नगर,हसनबाग, शिवणकर झोपडपट्टी, साईबाबानगर, पडोळे नगर, पवनशक्ती नगर,खरबी, स्वराज विहार, गंगा विहार, गोपाळकृष्ण नगर, महाधुर्ती लोककल्याण सोसायटी,इंदिरादेवी टाऊन, देवी नगर, संघर्ष नगर, कामाक्षी नगर, तुलसी नगर, अबुमियाँ नगर अंतुजी नगर

    ३. ग्राऊंड रियालिटी: ‘डम्पिंग’च्या दुर्गंधीत गुदमरलेला प्रभाग

    राजकीय चढाओढ एकीकडे असली तरी, नागरिकांच्या समस्या आजही सुटलेल्या नाहीत

    भांडेवाडी डम्पिंग यार्ड: डम्पिंग यार्डमुळे लगतच्या वस्त्यांमध्ये प्रदूषणाचा आणि दुर्गंधीचा प्रश्न गंभीर झाला आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

    पाणी आणि सिव्हरेज: शिवणकर नगर आणि पवनशक्ती नगर यांसारख्या अनधिकृत ले-आऊटमध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि सिव्हरेज लाईनचा मोठा अभाव आहे.

    पावसाळी पाण्याचा निचरा: शिवणकर नगर झोपडपट्टीतील नागरिकांना पावसाळ्यात घरात पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

    अपूर्ण विकासकामे: रिंग रोड पलीकडील अनेक वस्त्यांमध्ये आजही मूलभूत नागरी सुविधा पोहोचलेल्या नाहीत.

    ४. प्रमुख इच्छुक उमेदवारांची चढाओढ:

    भाजप: माजी नगरसेवक अॅड धर्मपाल मेश्राम, जितेंद्र (बंटी) कुकडे, मनिषा कोठे, समिता चकोले, सुरेश बारई, अशोक देशमुख, सचिन भगत, सुनील मानापुरे, सुनील आगरे, विनोद बागडे, गौरव जवादे, बबलू चिकटे, विक्रम खुराणा, डॉ. मनिषा राजगिरे, डॉ. माधुरी दांडेकर, कपिल वासनिक, चित्रा माकडे, भारती झाडे, सीमा ढोमणे, गजानन अंतुरकर, डॉली सारस्वत, इंद्रजीत वासनिक, कल्पना सार्व

    काँग्रेस: माजी नगरसेवक अॅड. यशवंत मेश्राम, राजू भेंडे, प्रवीण
    बेलेकर, राजकुमार गुप्ता, बबीता बांगळे, शुभम मोटघरे, रोशन लारोकर, मुकेश गजभीये, ज्योती उदापूरकर, विवेक जुनघरे, राजेश पौनिकर.

    ‘पॉलिटिकल वझीर’चे निष्कर्ष:

    प्रभाग २६ मध्ये यावेळी केवळ ‘पक्षाचे’ नाव चालणार नाही. जो उमेदवार भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या समस्येवर ठोस तोडगा देईल आणि अनधिकृत ले-आऊटमधील मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न मार्गी लावेल, त्यालाच जनता आपला कौल देईल.

  • नागपूर महानगरपालिका निवडणूक २०२५: प्रभाग ९ मध्ये सत्तेचे ‘शिखर’ कोण सर करणार?

    राजकीय विशेष विश्लेषण: ‘पॉलिटिकल वझीचा ग्राऊंड रिपोर्ट


    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग ९ हा शहराच्या राजकीय आणि प्रशासकीय नकाशावरील एक अत्यंत ‘व्हीआयपी’ आणि संवेदनशील प्रभाग मानला जातो. या प्रभागात एका बाजूला संविधान चौक, रिझर्व्ह बँक आणि विधानभवनासारखी सत्ताकेंद्रे आहेत, तर दुसऱ्या बाजूला गड्डीगोदाम आणि खलाशी लाईनसारख्या गजबजलेल्या वस्त्या आहेत. व येथील मतदार हा सुशिक्षित आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक आहे.

    १. प्रभागाची व्याप्ती

    इंदोरा, बेझनबाग, हरिजन कॉलनी, बेझनबाग मॉडेल टाऊन, मेकोसाबाग, लुंबिनीनगर, मुकुंदराव आंबेडकरनगर, मोतीबाग, पंजाबीलाइन, क्लार्क टाऊन, गड्डीगोदाम, गोल बाजार, गधेघाट, बैरामजी टाऊन, मंगळवारी बाजार, खलाशी लाईन, मोहननगर, रेल्वे हॉस्पिटल परिसर, नागपूर रेल्वेस्थानक परिसर, मॉरिस कॉलेज परिसर, कस्तुरचंद पार्क परिसर

    २. धोरणात्मक SWOT विश्लेषण

    प्रभाग ९ घटकसविस्तर विश्लेषणबळ : हा प्रभाग नागपूरचा प्रशासकीय केंद्रबिंदू असल्याने येथे रस्ते आणि वीज यांसारख्या पायाभूत सुविधा इतर प्रभागांच्या तुलनेत अधिक सुस्थितीत आहेत. संविधान चौकासारख्या ऐतिहासिक ठिकाणामुळे येथील मतदारांमध्ये राजकीय विचारधारेची पकड घट्ट आहे.

    उणिवा: गड्डीगोदाम आणि इंदोरा यांसारख्या जुन्या वस्त्यांमध्ये दाट लोकवस्तीमुळे ड्रेनेज आणि स्वच्छतेचे प्रश्न आजही कायम आहेत. रेल्वे स्थानक परिसरातील वाढते अतिक्रमण ही प्रशासकीय निष्क्रीयतेची मोठी उणीव आहे.

    संधी: सुशिक्षित मतदारांचा मोठा टक्का असल्याने येथे ‘विकासाच्या मॉडेल’वर भर देणाऱ्या नव्या दमाच्या उमेदवारांना मोठी संधी आहे. आंबेडकर नगर आणि लुम्बिनी नगरमधील प्रलंबित प्रश्न सोडवून आंबेडकरी मतदारांना आकर्षित करण्याची संधी विरोधकांकडे आहे.

    धोके: बहुजन समाज पक्ष (BSP) आणि वंचित बहुजन आघाडीमुळे होणारे मतविभाजन हे प्रस्थापित पक्षांसाठी (भाजप-काँग्रेस) मोठे संकट ठरू शकते. येथील मतदार अत्यंत चोखंदळ असल्याने लाटेपेक्षा स्थानिक संपर्काला महत्त्व देणे उमेदवारांसाठी जिकिरीचे ठरेल.

    ३. ग्राऊंड रिॲलिटी आणि मतदारांचा कल

    २०१७ च्या निवडणुकीत या प्रभागातून बहुजन समाज पक्षाने काँग्रेसला टक्कर देत वर्चस्व राखले होते. मात्र, २०२५ च्या बदलत्या समीकरणात येथील ‘दलित-ओबीसी’ युती आणि ‘सुशिक्षित मध्यमवर्गीय’ मतदारांची भूमिका निकालाला कलाटणी देणारी ठरेल.

    आरक्षण स्थिती: प्रभाग ९ मध्ये अ-अनुसूचित जाती
    ब) ओबीसी (महिला)
    क) सर्वसाधारण (महिला)
    (ड) – सर्वसाधारण असे आरक्षणाचे स्वरूप असल्याने नवीन इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

    प्रमुख मुद्दे: रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी, मंगळवारी बाजारची दुरवस्था, अतिक्रमण, आणि जुन्या वस्त्यांमधील जलवाहिन्यांचे नूतनीकरण हे प्रचाराचे मुख्य मुद्दे असतील.

    निष्कर्ष:

    प्रभाग ९ ची निवडणूक ही केवळ सत्तेची लढाई नसून ती नागपूरच्या ‘हृदयावर’ राज्य करण्याची लढाई आहे. जो उमेदवार संविधान चौकातील वैचारिक वारसा आणि गड्डीगोदाममधील जनसामान्यांच्या समस्यांची सांगड घालेल, तोच ‘वझीर’ ठरेल.