Category: महानगरपालिका विशेष

  • प्रभाग १६: ‘व्हाईट कॉलर’ मतदारसंघात नव्यांना मिळेल का संधी? संदीप जोशींच्या वारसदाराचा शोध सुरू!

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग १६ हा शहरातील अत्यंत विकसित आणि सुशिक्षित मतदारांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने येथे ‘क्लीन स्वीप’ दिला होता, मात्र यावेळी भाजपचा हा बालेकिल्ला राखण्यासाठी आणि काँग्रेसला सक्षम उमेदवार देण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

    १. ‘राजकीय वझीर’चा चष्मा:

    संदीप जोशींचा उत्तराधिकारी कोण? या प्रभागाचे प्रतिनिधित्व नागपूरचे माजी महापौर आणि माजी आमदार संदीप जोशी यांनी केले होते. त्यांच्यासारखाच जनसामान्यांशी संपर्क असलेला आणि प्रशासकीय पकड असलेला चेहरा शोधण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. संदीप जोशी यांनी गेल्या ८ वर्षांत येथे अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या, ज्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

    २. प्रभागातील प्रमुख वस्त्या आणि विस्तार:-

    हा प्रभाग नागपुरातील मोठ्या प्रभागांपैकी एक असून, त्याचा विस्तार धंतोलीपासून ते जयप्रकाश नगरपर्यंत आहे.

    प्रमुख वस्त्या: बजाज नगर, पूर्व लक्ष्मीनगर म.न.पा. लक्ष्मीनगर विभागीय कार्यालय, वसंतनगर, राहाटे कॉलनी, दीक्षाभूमी परिसर, माताकचेरी, रामदासपेठ गुरुद्वाराजवळील भाग, आय.सी.ए.आर. परिसर, सरस्वती नगर, तकिया, काँग्रेस नगर, अजनी रेल्वे स्टेशन, डॉक्टर कॉलनी वैनगंगानगर, मध्यवर्ती कारागृह परिसर, गौरक्षण, धंतोलीचा काही भाग, चुनाभट्टी, पूर्व समर्थ नगर, पश्चिम समर्थ नगर, हिंदुस्थान कॉलनी, प्रशांत नगर, गजानन नगर, जुनी अजनी वस्ती, छत्रपती नगर, पंचदीप नगर, मेहर कॉलनी, उज्ज्वल नगर, कर्वेनगर, सोमलवाडा वस्ती, राहुल नगर, मुळीक कॉम्प्लेक्स, नीरी वसाहत, सुरेन्द्र नगर, धनगर मोहल्ला, देवनगर, सावरकर नगर, विवेकानंदनगर, नरकुंडकर ले- आऊट, एल. आय. सी. कॉलनी, देवनगर झोपडपट्टी

    मतदार: येथे सुमारे ७१,९८७ मतदार असून, सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मतदारांची संख्या मोठी आहे.

    ३. ग्राऊंड रिअॅलिटी:

    चकचकीतपणाच्या मागे लपलेल्या समस्याउच्चभ्रू प्रभाग असूनही येथील नागरिकांना काही गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे:

    वाहतुकीची कोंडी: मुख्य मार्गांवर हॉटेल्सची संख्या वाढल्याने आणि पार्किंगच्या नियोजित अभावामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अजनी रेल्वे पुलावर नियमित कोंडी पाहायला मिळते.

    अपार्टमेंट्सचे सिमेंट जंगल: प्रभागात मोठ्या प्रमाणात जुन्या इमारती पाडून नवीन अपार्टमेंट्स उभे राहत आहेत, ज्यामुळे ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्यावर ताण येत आहे.

    कचरा आणि दुर्गंधी: चुनाभट्टी आणि धंतोली परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचलेले असतात.सुरक्षेचा प्रश्न: रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारी दुकाने आणि हॉटेल्समुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

    ४. इच्छुकांची यादी:-

    भाजप: लखन येरवार, नीरज दोंतुलवार, शिवानी दाणी, वनिता दांडेकर, गजानन निशितकर, मुन्ना यादव, करण यादव

    काँग्रेस: अरविंद गणवीर, भक्ती पन्नासे, अजय पन्नासे, रवी खडसे, अभिषेक धवड, किशोर मेंघरे, संजना देशमुख

    ५. २०१७ चा निकाल (माजी नगरसेवक):

    लखन येरवार (भाजप)
    वनिता दांडेकर (भाजप)
    तारा यादव (भाजप)
    संदीप जोशी (भाजप)

    राजकीय वझीरचा स्ट्रॅटेजिक व्ह्यू:

    प्रभाग १६ मध्ये केवळ ‘पक्षाचे चिन्ह’ चालणार नाही. येथील मतदार हा सुशिक्षित असल्याने तो उमेदवाराचे शिक्षण, पार्श्वभूमी आणि कामाचा अनुभव पाहून मतदान करतो. भाजपने जर नवीन चेहरा दिला, तर त्याला संदीप जोशींचा वारसा पुढे नेणारा ठसा उमटवावा लागेल. तर दुसरीकडे, काँग्रेसला जर येथे विजय मिळवायचा असेल, तर त्यांना बूथ स्तरावर आपले संघटन अधिक बळकट करावे लागेल.

    निष्कर्ष:

    ‘व्हाईट कॉलर’ मतदारांच्या या प्रभागात जो उमेदवार ‘पार्किंग आणि सुरक्षितता’ या विषयांवर स्पष्ट भूमिका घेईल, त्याचे पारडे जड राहील.

  • प्रभाग १२: ग्वालबंसींची प्रतिष्ठा पणाला की नव्या चेहऱ्यांची क्रांती?

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग १२ हा शहरातील संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या ‘हाय-प्रोफाईल’ प्रभाग मानला जातो. २०१७ च्या निवडणुकीत येथे भाजप आणि काँग्रेसमध्ये ‘काट्याची टक्कर’ पाहायला मिळाली होती, जिथे दोन्ही पक्षांनी समसमान (२-२) जागा जिंकल्या होत्या.

    १. प्रभागाचे भौगोलिक आणि सामाजिक वास्तव:

    या प्रभागाची व्याप्ती मोठी असून यात मध्यमवर्गीय वस्त्यांपासून ते दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश होतो.

    प्रमुख वस्त्या: दाभा, टेकडीवाडी, प्रेस ले-आऊट, गमगानगर, जगदीश नगर, मकर धोकडा, सुरेंद्रगड, जागृती कॉलनी, फ्रेण्ड्स कॉलनी, आकार नगर, आयबीएम रोड, मानवसेवा नगर, गजानन नगर, वीरचक्र कॉलनी, सरोज नगर, गांधी नगर, अशोकदीप कॉलनी, गवळीपुरा साईनगर, वेलकम सोसायटी, गौतम नगर, गणेश नगर, भीमसेन नगर, अंबर कॉलनी, इन्कम टॅक्स कॉलनी, जय संतोषी माता ले-आऊट, गव्हर्नमेंट प्रेस कॉलनी, वृंदावन कॉलनी, गोंड मोहल्ला, मंजिदाना कॉलनी, वास्तुशिल्प नगर या वस्त्यांचा यात समावेश आहे.

    मतदारांचा कल: येथे सुशिक्षित नोकरदार वर्ग आणि श्रमिक वर्ग यांचे संमिश्र प्रमाण आहे. त्यामुळे उमेदवाराला ‘विकासाचा अजेंडा’ आणि ‘वैयक्तिक संपर्क’ या दोन्ही पातळीवर लढावे लागणार आहे.

    २. राजकीय संघर्ष आणि इच्छुकांची मांदियाळी

    या प्रभागात ग्वालबंसी विरुद्ध बरडे आणि वानखेडे विरुद्ध इवनाते असे संघर्ष पुन्हा पाहायला मिळू शकतात.

    काँग्रेसची फळी: हरीश ग्वालबंसी, दीपक वानखेडे, स्नेहा दीपक वानखेडे, दर्शनी धवड, सुकेशिनी देशभ्रतार, मंदा मंडपे रंगारी, रोशनी आत्राम, अभिजित झा, युगल विदावत, रिजवान रुमवी, विश्वनाथ देशमुख, आकाश कावळे यांचीही नावे चर्चेत आहेत.

    भाजपची रणनीती: मायाताई इवनाते, विक्रम ग्वालबंसी, अरुणा ग्वालबंसी, साधना बरडे, नरेश बरडे, राखी शिंगारे, ज्ञानेश्वर साव, प्रशांत कुंभरे, विनोद बघेल यांनीही आपली दावेदारी भक्कम केली आहे.

    नव्या चेहऱ्यांची संधी: नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी जोर धरत असल्याने, दोन्ही पक्षांतर्गत उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी ओढाताण होणार आहे.

    ३. प्रभागातील मुख्य समस्या: जनतेचा कौल काय?

    प्रशासकीय राजवटीत या प्रभागात अनेक मूलभूत समस्या प्रलंबित राहिल्या आहेत.

    पाणीटंचाई: सुरेंद्रगड आणि कोलबा स्वामी कॉलनी भागात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होते.

    स्वच्छता आणि आरोग्य: आरबीआय कॉलनी आणि जागृती कॉलनीतील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचलेले असतात, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

    पायाभूत सुविधा: टेकडीवाडी ते वैभव नगर दरम्यानच्या रस्त्यांची दुर्दशा झाली असून जागृती कॉलनीतील ‘ग्रीन जिम’ची दुरवस्था झाली आहे.

    ४. विश्लेषण: प्रभाग १२

    (जमेच्या बाजू) – दोन्ही पक्षांकडे प्रबळ माजी नगरसेवक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे जाळे आहे.

    (कमकुवत दुवे)- अंतर्गत गटबाजी आणि उमेदवारीसाठी होणारी स्पर्धा पक्षाला कमकुवत करू शकते.

    (संधी) -सुशिक्षित मतदारांना आकर्षित करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा वापर प्रभावी ठरू शकतो.

    धोके – अपक्ष उमेदवार (उदा. ज्ञानेश्वर साव, दीपक वानखेडेंची भूमिका) निर्णायक मतांचे विभाजन करू शकतात.

    ५. ‘पॉलिटिकल वझीर’चा स्ट्रॅटेजिक व्ह्यू

    प्रभाग १२ मध्ये विजय मिळवण्यासाठी केवळ राजकीय वारसा असून चालणार नाही. मतदारांमध्ये प्रशासनाबद्दल असलेल्या रोषाचा वापर करून जो उमेदवार ‘पाणी आणि रस्ते’ यांवर ठोस कृती आराखडा सादर करेल, तोच बाजी मारेल. ‘मतदान केंद्रावर पकड’ हीच या निवडणुकीची गुरुकिल्ली असेल.

  • प्रभाग ४: ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न अधुरे; मतदार करणार का विकासाचे ऑडिट? जाणून घ्या ‘पॉलिटिकल वझीर’चा ग्राउंड रिपोर्ट

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक ४ हा ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचा मुख्य भाग असूनही आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. २०१७ च्या निवडणुकीत या प्रभागावर भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व राहिले असले तरी, यंदा मात्र स्मार्ट सिटीतील त्रुटी आणि प्रलंबित समस्यांमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत असली तरी बसपा आणि दोन्ही शिवसेनेचे आव्हान दुर्लक्षित करून चालणार नाही.

    १. दोन विधानसभा मतदारसंघांत विभागलेला प्रभाग

    प्रभाग ४ चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा भौगोलिक विस्तार. या प्रभागाचा काही भाग ‘नासुप्र’च्या (NIT) अखत्यारीत येतो, तर राजकीयदृष्ट्या हा प्रभाग उत्तर आणि पूर्व नागपूर अशा दोन विधानसभा मतदारसंघांत विभागला गेला आहे. यामुळे येथील राजकीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनली आहे.

    २. प्रभागातील मुख्य समस्या: स्वप्न स्मार्ट, वास्तव खडतर

    ‘पॉलिटिकल वझीर’च्या ग्राऊंड सर्व्हेनुसार, नागरिकांमध्ये खालील मुद्द्यांवरून मोठी नाराजी आहे:

    अधुरा स्मार्ट सिटी प्रकल्प: स्मार्ट सिटीचे काम रखडल्याने नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यांसाठी जमिनी देऊनही अनेक बाधितांना अद्याप मोबदला मिळालेला नाही.

    पाणी आणि आरोग्याचा प्रश्न: वांजरा परिसरात आजही टँकरने पाणीपुरवठा होतो. नळाद्वारे पाणी देण्याची घोषणा केवळ कागदावरच राहिली आहे.

    अधुरा स्मार्ट सिटी प्रकल्प: स्मार्ट सिटीचे काम रखडल्याने नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यांसाठी जमिनी देऊनही अनेक बाधितांना अद्याप मोबदला मिळालेला नाही.

    पाणी आणि आरोग्याचा प्रश्न: वांजरा परिसरात आजही टँकरने पाणीपुरवठा होतो. नळाद्वारे पाणी देण्याची घोषणा केवळ कागदावरच राहिली आहे.

    नाल्यांची समस्या: कळमना मार्केट आणि लक्ष्मीनगर भागातील नाल्यांना संरक्षण भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी वस्त्यांमध्ये शिरते.

    ३. आखाडा महापालिकेचा: प्रमुख दावेदार

    या प्रभागात छत्तीसगडी समाज आणि कामगार वर्गाची संख्या मोठी आहे. २०१७ मध्ये भाजपने या प्रभागातील चारही जागा जिंकल्या होत्या.

    प्रमुख इच्छुक उमेदवार:

    भारतीय जनता पक्ष : माजी नगरसेवक निरंजना पाटील, शेषराव गोतमारे, मनीषा अतकरे आणि राजकुमार साहू पुन्हा मैदानात आहेत. सोबतच वसंत पटले, अरुण हारोडे, मोहन ठाकरे, रामदास साहू, सुबोध मानवटकर, प्रवीण बावनकुळे आणि सचिन खोब्रागडे यांची नावे चर्चेत आहेत.

    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: कुमारेश अवचट, सत्यशीला काळे, अंजली सामतकर, अनिल पांडे, कल्पना गोस्वामी, विपुल महल्ले, बाबूलाल शाहू, पप्पू यादव आणि चारुलता भट हे पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

    इतर पक्ष: शिंदे सेनेकडून बंडू तलवेकर, विवेक वर्मा, अनिल शाहू, आशा माहुरी यांची नावे चर्चेत आहेत. बसपा आणि उद्धव सेनेचे उमेदवारही येथे मोठी भूमिका बजावू शकतात.

    ४. राजकीय वझीरचा कानमंत्र

    प्रभाग ४ मध्ये यावेळी ‘विकास’ हाच केंद्रबिंदू असेल. गेल्या वेळी भाजपने काँग्रेसच्या तुलनेत दुप्पट मते घेतली होती. मात्र, यावेळी स्मार्ट सिटी प्रकल्पातील विस्थापित नागरिक आणि कळमना मार्केटमधील व्यापारी कोणाच्या बाजूने उभे राहतात, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल.

    निष्कर्ष:

    प्रभाग ४ ची जनता आता केवळ ‘स्मार्ट सिटी’च्या नावावर भुलणार नाही. रखडलेले रस्ते, पिण्याचे पाणी आणि नाल्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या खऱ्या ‘वझीर’लाच या निवडणुकीत मतदारांचा कौल मिळेल.

  • प्रभाग १३: फुके-ठाकरे घराण्यांच्या प्रतिष्ठेचा ‘महामुकाबला’ आणि राजकीय वझीरचा कौल!

    नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणात प्रभाग १३ हा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या प्रभागात केवळ दोन उमेदवार नाही, तर नागपूरमधील दोन दिग्गज राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हा प्रभाग यावेळी कोणा एका पक्षाचा बालेकिल्ला उरणार नाही, तर तो रणनीतीचा खेळ ठरेल.

    १. ‘हाय-व्होल्टेज’ राजकीय लढाई

    या प्रभागाचे मुख्य आकर्षण म्हणजे दोन आमदारांच्या कुटुंबीयांमध्ये होणारी संभाव्य टक्कर

    फुके घराणे: भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या पत्नी, माजी नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांची या प्रभागावर मोठी पकड आहे. त्यांनी गेल्या वेळी विक्रमी मतांनी विजय मिळवला होता.

    ठाकरे घराणे: काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या सक्रियतेमुळे ही लढत ऐतिहासिक होणार आहे.

    नवे वारे: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार प्रकाश गजभिये यांचे पुत्र प्रजासत्ताक गजभिये देखील मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याने येथे तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.

    २. प्रभागातील प्रमुख वस्त्या:

    प्रभाग १३ मध्ये भौगोलिक विविधता मोठी आहे, ज्यामुळे प्रचार करताना उमेदवारांची दमछाक होणार आहे.

    महत्त्वाचे भाग: भिवसनखोरी, वायू सेना परिसर, हजारी पहाड वस्ती, मलबार कॉलोनी, नवीन फुटाळा, एलआयटी परिसर, हिंदुस्थान कॉलोनी, रामनगर,पांढराबोडी, संजयनगर, हिलटॉप, अंबाद्वारी, वर्मा ले-आऊट, गांधीनगर, कॉर्पोरेशन कॉलनी, डागा ले-आऊट, अंबाझरी ले-आऊट, अभ्यंकरनगर, माधवनगर, व्हीएनआयटी परिसर, कमलानगर, महादेवनगर, काचीमेट, अंबाझरी उद्यान, अंबाझरी तलाव, फुटाळा तलाव, बॉटनिकल गार्डन

    ३. ग्राऊंड रिअॅलिटी:

    जनतेचे प्रश्न आणि संतापविकासाच्या दाव्यांच्या पलीकडे या प्रभागात नागरिक अनेक मूलभूत समस्यांशी झुंजत आहेत.

    पाणी आणि स्वच्छता: उंचावरील भागात पाणीपुरवठा अपुरा आहे. पांढराबोडी आणि संजय नगर भागात कचऱ्याचे ढीग साचलेले असून चेंबर्सची झाकणे फुटलेली आहेत.

    आरोग्य आणि शिक्षण: पांढराबोडी परिसरात प्राथमिक आरोग्य सुविधेचा अभाव आहे, तर स्थानिक शाळांच्या दुरुस्तीची गरज आहे.

    मालकी हक्क: अनेक वस्तूंमधील रहिवाशांना अद्याप मालकी हक्काचे पट्टे मिळालेले नाहीत, जो निवडणुकीत निर्णायक मुद्दा ठरू शकतो.

    ४. इच्छुकांची यादी: पक्षसंभाव्य चेहरे

    काँग्रेस: संजय सरायकर, केतन ठाकरे, उमेश पिंपळे, अमर बागडे, विलास भालेकर, मुन्ना ढोणे, पद्मा उईके, अजय हट्टेवार, खेमचंद पटले, राजू वासनिक, श्याम सोनेकर, शत्रुघ्न महतो, राजेश उघाडे

    भाजप: डॉ. परिणिता फुके, वर्षा ठाकरे, अश्विनी जिचकार, किसन गावंडे, रुतिका मसराम, घनश्याम चौधरी, बिपीन गिरडे, मायाताई इवनाते, विनोद कन्हेरे, योगेश पाचपोर, दत्ता खोडे

    राष्ट्रवादी (शप): प्रजासत्ताक प्रकाश गजभिये, रश्मी जामदार

    ५. राजकीय वझीरचे विश्लेषण:

    प्रभाग १३ चे राजकारण ‘आमदारांचे नेटवर्क विरुद्ध स्थानिक समस्या’ असे फिरणार आहे.

    संधी: डॉ. परिणिता फुके यांनी जर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, तर भाजपला नवा आणि तितकाच प्रभावी चेहरा शोधावा लागेल.

    धोका: काँग्रेसमध्ये संजय सरायकर आणि केतन ठाकरे यांच्यातील अंतर्गत समन्वय निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतो.

    निर्णायक फॅक्टर: फुटाळा तलाव आणि बॉटनिकल गार्डन परिसरातील ‘पर्यटन विकास’ विरुद्ध ‘बस्त्यांमधील दुरवस्था’ हा विरोधाभास प्रचारात महत्त्वाचा ठरेल.

    निष्कर्ष:

    प्रभाग १३ हा यावेळी नागपूरचा ‘नंबर १’ चा हॉट-सीट ठरणार आहे. इथे केवळ घोषणा चालणार नाहीत, तर ज्याचा ‘इलेक्शन मॅनेजमेंट’ वर हातखंडा असेल, तोच वझीर ठरेल

  • प्रभाग १० मधील रखडलेले प्रकल्प आणि नागरी समस्यांचा विळखा; विकासाची प्रतीक्षा संपणार कधी?

    पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक पट्ट्याला लागून असलेला प्रभाग १० सध्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे चर्चेत आहे. येथील ऐतिहासिक ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय’ असो वा झोपडपट्टी भागातील प्रश्न, प्रशासकीय राजवटीत सर्वच आघाड्यांवर नागरिकांना संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.

    १. रखडलेला ऐतिहासिक वारसा: बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय

    या प्रभागाची मुख्य ओळख असलेले शहरातील एकमेव निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय गेल्या अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे.

    खर्चाचा डोंगर: अंदाजे ३० कोटींहून अधिक रक्कम खर्च होऊनही नूतनीकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे.

    पर्यटनाला खीळ: हे केंद्र बंद असल्याने शहराच्या पर्यटनाचे आणि मुलांच्या मनोरंजनाचे मोठे नुकसान होत आहे.

    २. प्रभागातील ज्वलंत समस्या:-

    प्रशासकीय दुर्लक्षामुळे येथील नागरिक खालील समस्यांनी ग्रासले आहेत:

    पाणी टंचाई आणि स्वच्छता: झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. तसेच सार्वजनिक शौचालये, कचरा आणि पथदिवे यांसारख्या प्राथमिक सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय आहे.

    विद्युत तारांचे जाळे: घरांवरून गेलेल्या उघड्या विद्युत तारांमुळे झोपडपट्टी परिसरात अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

    अतिक्रमण: मुख्य रस्ते आणि पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

    असुरक्षितता: पथदिव्यांच्या कमतरतेमुळे आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांमुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते, ज्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

    ३. प्रभाग १० विश्लेषण:-

    बलस्थाने:- नागरी सुविधा: पाच वर्षांत शाहूसृष्टी, बर्ड व्हॅली कारंजा आणि दिव्यांग लोकांसाठी भवन ही कामे मार्गी लागली आहेत.

    लोकसंख्या: मोठ्या प्रमाणावर श्रमजीवी लोकसंख्या असल्याने हा प्रभाग कोणत्याही पक्षासाठी निर्णायक ठरू शकतो.

    उणिवा:- नियोजन शून्य विकास: उद्यानांमध्ये अपुऱ्या सुविधा असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

    धोके:- नागरिकांचा संताप: झोपडपट्टी भागातील रहिवाशांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास प्रस्थापितांना या निवडणुकीत फटका बसू शकतो.

    ४. प्रभागातील समीकरणे आणि प्रमुख वस्त्या:-

    या प्रभागात संत ज्ञानेश्वरनगर, मोरवाडी, लालटोपीनगर, अमृतेश्वर कॉलनी, इंदिरानगर, आंबेडकरनगर, एचडीएफसी कॉलनी, दत्तनगर, विद्यानगर, शाहूनगर,वृंदावन आणि संभाजीनगर यांसारख्या महत्त्वाच्या वस्त्यांचा समावेश होतो.

    ५. स्थानिक जनतेचा आवाज:-

    प्रभागातील नागरिक सध्या प्रशासनावर नाराज आहेत:

    उमेश शिंदे यांच्या मते, प्रशासनाकडून फक्त टाळाटाळ केली जात असून रखडलेली कामे त्वरित पूर्ण होणे गरजेचे आहे.

    लता भिवरकर आणि विनायक गंगावणे यांनी झोपडपट्टी भागातील उघड्या विद्युत तारा आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

    विजय यादव यांनी लहान मुलांसाठी असलेल्या अंगणवाड्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे.

    निष्कर्ष:

    प्रभाग १० मधील आगामी निवडणूक ही केवळ पक्षांची नसून ती विकासाच्या हक्काची लढाई आहे, जो उमेदवार बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचा प्रश्न मार्गी लावेल आणि झोपडपट्टीतील रहिवाशांना सन्मानाचे जगणे देईल, तोच या प्रभागाचा मंत्री ठरेल.

  • प्रभाग २१: पिंपरीचा ‘सेंट्रल’ भाग; पण विकासाच्या गंगेपासून अलिप्तच! समस्यांचा पडलाय विळखा

    पिंपरी-चिंचवड शहराचा मध्यवर्ती आणि व्यापाराचे मुख्य केंद्र असलेला प्रभाग २१ आज अनेक गंभीर समस्यांना तोंड देत आहे. पिंपरी गाव आणि कॅम्प परिसरातील नागरीकरण वेगाने झाले असले, तरी अनेक मोठे प्रकल्प दशकांपासून रखडलेले आहेत.

    १. पॉलिटिकल वझीरच्या मते : मतदारांची आकडेवारी

    एकूण मतदार: ५४,९९०.

    मतदार विभागणी: २८,०७१ पुरुष आणि २६,९१६ महिला मतदार.

    प्रभागाचे आरक्षण: २१-अ (अनुसूचित जाती महिला), २१-ब (इतर मागासवर्गीय), २१-क (महिला) आणि २१-ड (खुला गट).

    २.या प्रभागातील प्रमुख भाग:-

    या प्रभागात प्रामुख्याने पिंपरी गाव, मिलिंदनगर, जिजामाता रुग्णालय परिसर आणि वैभव नगर या भागांचा समावेश होतो.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: “समस्यांनी ठोकले ठाण!

    पॉलिटिकल वझीरच्या रिपोर्टनुसार, या प्रभागात खालील प्रमुख समस्या आ वासून उभ्या आहेत:

    डेअरी फार्म पुलाचा ‘वनवास’: पिंपरीला मुख्य महामार्गाशी जोडणाऱ्या डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या दीड वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. ७० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा असला तरी नागरिकांना अद्याप प्रतीक्षाच आहे.

    डीपी रस्ते रखडले: पिंपरी गावातील पॉवर हाऊस ते तपोवन मंदिर दरम्यानचा १२ मीटर रुंद नियोजित रस्ता आजही कागदावरच आहे.

    पूर आणि अस्वच्छता: पावसाळ्यात पवना नदीचे पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये शिरते, ज्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान होते. सांडपाणी वाहिनी (ड्रेनेज) आणि कचरा व्यवस्थापन कोलमडल्याने दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

    मोकाट जनावरांचा हैदोस: पिंपरी गावात रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा होतो आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

    ४. विकासाचा आढावा: प्रभाग २१

    मार्गी लागलेली कामे :-

    • पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नवीन रस्त्याचे काँक्रीटीकरण.
    • पवना नदीवर नवीन पुलाची निर्मिती आणि नवीन जलकुंभाचे काम.
    • मिलिंदनगर येथील सांडपाणी विलगीकरण केंद्राचे काम सुरू.

    रखडलेली कामे:-

    • डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे उर्वरित काम.
    • अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण आणि ड्रेनेज लाईनचे नूतनीकरण.
    • पिंपरी गावातील पार्किंग स्टेशन आणि स्मशानभूमीची जागा हस्तांतरण.

    ५. विश्लेषण प्रभाग २१:-

    बळ:- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने व्यापाराची मोठी संधी.

    उणिवा:- मोकाट जनावरांचा प्रश्न, अपुरा पाणीपुरवठा आणि रखडलेले डीपी रस्ते.

    संधी:- डेअरी फार्म पूल पूर्ण झाल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटेल आणि मतदारांचा विश्वास संपादन करता येईल.

    धोका:- पावसाळ्यात नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने होणारी जीवित व वित्तहानी.

    पॉलिटिकल वझीरच्या सूचना:-

    प्रभाग २१ मध्ये विजय मिळवण्यासाठी केवळ जुन्या कामांचे मार्केटिंग करून चालणार नाही. जो उमेदवार डेअरी फार्म पूल तातडीने खुला करण्याची आणि नदीकाठच्या सुरक्षेसाठी भिंत बांधण्याची हमी देईल, पिंपरीची जनता त्यालाच कौल देईल.

  • नागपूर महानगरपालिका २०२५: प्रभाग २ मध्ये काँग्रेसच्या गडात ‘बसपा’ आणि ‘भाजप’ सुरुंग लावणार?

    १ राजकीय विश्लेषण: ‘पॉलिटिकल वझीर’ विशेष रिपोर्ट

    उत्तर नागपुर प्रभाग २ हा ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष (बसपा) यांच्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू राहिला आहे. २०१७ च्या निवडणुकीत या प्रभागावर काँग्रेसने पूर्णतः वर्चस्व राखत चारही जागा जिंकल्या होत्या. मात्र, बदललेली राजकीय समीकरणे आणि प्रलंबित नागरी समस्यांमुळे आगामी निवडणुकीत येथे त्रिशंकू लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

    सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी

    मतदार समीकरण: हा प्रभाग प्रामुख्याने अनुसूचित जाती (SC) बहुल असून एकूण लोकसंख्येच्या ५५ टक्के मतदार या वर्गातील आहेत.

    राजकीय वारसा: एकेकाळी हा प्रभाग बसपाचा बालेकिल्ला मानला जात होता, परंतु २०१७ मध्ये मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला.

    प्रमुख वस्त्या: नारी गाव, सुगतनगर, कबीरनगर, कल्पनानगर, मयुरनगर, पिवळी नदी वस्ती, भदन्त आनंद कौसल्यायननगर, उपल्लवाडी, बाबा दीपसिंगनगर, रमाईनगर, पावर ग्रीड, डब्ल्यू.सी.एल. रेस्क्यू स्टेशन, नालंदानगर, संन्यालनगर, बँक कॉलनी, कपिलनगर, कामगारनगर, शेंडेनगर, आवळेनगर, प्रभात कॉलनी, ग्रामीण पोलिस मुख्यालय, ठवरे कॉलनी, न्यू ठवरे कॉलनी, मिसाळ ले-आऊट, श्रावस्तीनगर, रिपब्लिकननगर, अंगुलीमालनगर, सहयोगनगर, तेग बहादूरनगर, मोठा इंदोरा, नागसेननगर, समतानगर, एम.आय.जी. कॉलनी आणि एच. आय.जी कॉलनी, तेग बहादूर नगर, आहुजा नगर, लाल गोडाऊन, कस्तुरबा नगर, अमरज्योती नगर, वडपाखड, टेकानाका काही भाग

    प्रभाग २: धोरणात्मक विश्लेषण

    या प्रभागातील सद्यस्थितीचे विश्लेषण केले असता खालील वास्तव समोर येते

    १. बळ काँग्रेसची भक्कम पकड: विद्यमान चारही नगरसेवक काँग्रेसचे असल्याने त्यांचे स्थानिक पातळीवर मजबूत जाळे आहे.
    अल्पसंख्याक व बहुजन युती: अनुसूचित जाती आणि मुस्लिम मतदारांची सांगड घालण्यात काँग्रेसला आतापर्यंत यश मिळाले आहे.

    २. उणिवा
    पाणी टंचाई: उप्पलवाडी आणि न्यू म्हाडा कॉलनीसारख्या वस्त्या आजही टँकरवर अवलंबून आहेत; अनेक भागांत ११ वर्षांपासून नळ जोडणी नाही.

    गडरलाईनचा अभाव: जुन्या वस्त्यांमध्ये गडरलाईनची मोठी समस्या असून, ताज कंपनी परिसरात डुकरांचा मुक्त वावर आणि अस्वच्छता आहे.

    रस्त्यांची दुरवस्था: नवीन ले-आऊटमध्ये रस्ते आणि अंतर्गत पायाभूत सुविधांचा मोठा अभाव दिसून येतो.

    ३. संधी
    बसपाचे पुनरुज्जीवन: २०१७ मधील पराभवानंतर बसपा पुन्हा एकदा सक्रिय झाली असून, काँग्रेसच्या पारंपरिक मतांमध्ये फूट पाडण्याची संधी त्यांच्याकडे आहे.

    भाजपची आक्रमक खेळी: काँग्रेस आणि बसपाच्या भांडणात ‘हिंदुत्व’ आणि ‘विकासाच्या’ मुद्द्यावर भाजप आपली मते वाढवू शकते.

    ४. धोके
    बंडखोरी: काँग्रेसमधील इच्छुकांची मोठी फौज असल्याने उमेदवारी न मिळाल्यास अंतर्गत बंडखोरीचा धोका मोठा आहे.

    मतविभाजन: वंचित बहुजन आघाडी आणि इतर आंबेडकरी विचारांच्या संघटनांमुळे मतांचे विभाजन झाल्यास त्याचा थेट फटका काँग्रेसला बसू शकतो.

    राजकीय आखाडा: प्रमुख दावेदार

    काँग्रेस: दिनेश यादव, नेहा निकोसे, भावना लोणारे, साहेबराव शिरसाट, तुषार नंदागवळी, पूर्वा कांबळे, गौतमी नारनवरे, आतीश पाली

    भाजप: विभा ठवरे, दिलीप गौर, लता येरखेडे, गोलू यादव.

    बसपा: गौतम पाटील, मंगेश ठाकरे.

    निष्कर्ष

    प्रभाग २ मध्ये काँग्रेससमोर आपले वर्चस्व टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. केवळ घोषणांवर न थांबता ज्या पक्षाकडे पाणी आणि गडरलाईनसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस कृती आराखडा असेल, त्यालाच सुजाण मतदार पसंती देतील.


  • प्रभाग १ नारा परिसर नागपूर प्रस्थापितांची प्रतिष्ठा की परिवर्तनाची लाट? जाणून घ्या ‘पॉलिटिकल वझीर’चा ग्राउंड रिपोर्ट

    नागपूर महानगरपालिकेचा ‘श्रीगणेशा’ ज्या प्रभागातून होतो, तो म्हणजे प्रभाग क्रमांक १ (नारा-उत्तर नागपूर). या प्रभागात होणारी निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून, ती इथल्या अस्मितेची आणि प्रलंबित प्रश्नांची लढाई ठरणार आहे. २०१७ मध्ये येथे एकाच पक्षाचे निर्विवाद वर्चस्व असले तरी, आता परिस्थिती बदलली आहे.

    १. ‘आंबेडकर पार्क’ – निवडणुकीचा टर्निंग पॉईंट

    नारा परिसरातील १३० एकर जमिनीवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय उद्यान’ उभारण्यासाठी गेल्या सव्वा वर्षांपासून जनआंदोलन सुरू आहे. हे आंदोलन यावेळच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणारे सर्वात मोठे अस्त्र ठरू शकते. जो पक्ष किंवा उमेदवार या स्मारकासाठी ठोस कृती आराखडा देईल, त्याला मतदारांची पसंती मिळण्याची चिन्हे आहेत.

    २. प्रभागातील प्रलंबित समस्या

    केवळ सिमेंट रस्ते म्हणजे विकास नव्हे, हे प्रभाग १ मधील नागरिक उघडपणे बोलत आहेत. ‘पॉलिटिकल वझीर’च्या विश्लेषणानुसार खालील समस्या कळीच्या ठरणार आहेत:

    अनधिकृत ले-आऊट: सीमावर्ती भागातील अनेक वस्त्या विकासापासून अजूनही दूर आहेत.

    पावसाळी पाण्याचा निचरा: मानकापूर अंडरपास आणि हुडको कॉलनीमध्ये पावसाळ्यात पाणी साचून लोकांचे प्रचंड हाल होतात.

    आरोग्याचा धोका: कोराडी वीज केंद्रातून येणाऱ्या राखेच्या धुरीमुळे इथला नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहे.

    गटार आणि रस्ते: नारा गावातील अरुंद रस्ते आणि अंतर्गत ड्रेनेज लाईनचा प्रश्न आजही कायम आहे.

    ३. आखाडा महापालिकेचा: कोण आहेत प्रमुख दावेदार?

    प्रमुख इच्छुक उमेदवार:

    सत्ताधारी गट (भाजप): वीरेंद्र कुकरेजा, सुषमा चौधरी, महेंद्रप्रसाद धनविजय आणि प्रमिला मंथरानी हे जुने खेळाडू मैदानात आहेतच, सोबतच अविनाश धमगाये, विशाल साखरे, सुधीर जांभुळकर, जितेंद्र ठाकूर, सुनीता महल्ले, रमेश वानखेडे आणि नुकत्याच पक्षात आलेल्या माधुरी सोनटक्के यांचीही नावे चर्चेत आहेत.

    विरोधी गट (काँग्रेस व इतर): काँग्रेसकडून माजी नगरसेवक सुरेश जग्यासी हे आक्रमकपणे मैदानात आहेत. त्यासोबतच रोहित यादव, महेंद्र बोरकर, बेबी गौरीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) वेदप्रकाश आर्य यांची नावे आघाडीवर आहेत.

    बहुजन समाज पक्ष (बसपा): बसपाकडून कविता लांडगे आणि राजेंद्र दरवाडे, जयेश गेडाम, राजेश नंदेश्वर, विवेक सांगोळे यांची नावे चर्चेत असून, ते येथील मतांचे गणित बिघडवू शकतात.

    ४. राजकीय वझीरचा कानमंत्र

    प्रभाग १ मध्ये यावेळी ‘अँटी-इन्कम्बन्सी’ (प्रस्थापितांविरुद्ध लाट) आणि ‘आरक्षण सोडत’ या दोन गोष्टींचा मोठा प्रभाव असेल. ज्यांचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत, त्यांना आता ‘ईश्वर चिठ्ठी’प्रमाणे नशिबाची साथ आणि नवीन रणनीतीची गरज पडणार आहे.

    निष्कर्ष:

    प्रभाग १ मधील निवडणूक ही केवळ आकड्यांची खेळी नाही, तर ती विश्वासाची लढाई आहे. मतदार आता फक्त पक्षाकडे न बघता, आपल्या घरासमोरच्या चिखलातून मुक्ती देणाऱ्या ‘वझीर’ला मतदान करतील.

  • प्रभाग ३: भाजपच्या वर्चस्वाला काँग्रेस लावणार का सुरुंग? जाणून घ्या ‘पॉलिटिकल वझीर’चा ग्राउंड रिपोर्ट

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक ३ हा सध्या राजकीय संघर्षाचे मुख्य केंद्र बनला आहे. अनधिकृत ले-आउट, झोपडपट्ट्या आणि औद्योगिक वसाहतींच्या समस्यांनी वेढलेला हा प्रभाग यंदा कोणाचे नशीब उघडणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. २०१७ मध्ये येथे भाजपचे निर्विवाद वर्चस्व असले तरी, २०२५ च्या निवडणुकीत मात्र ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे.

    १. पिवळी नदी आणि प्रदूषण: प्रचाराचे मुख्य मुद्दे

    या प्रभागातील मतदारांचा कल ठरवण्यासाठी खालील दोन समस्या निर्णायक ठरतील:

    पिवळी नदीचे संकट: पिवळी नदीला सुरक्षा भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात वस्त्यांमध्ये पाणी शिरते, ज्यामुळे नागरिकांचे दरवर्षी मोठे नुकसान होते.

    वीटभट्ट्यांचे प्रदूषण: प्रभागातील वीटभट्ट्यांमुळे होणारे वायू प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे, ज्यावर अद्याप ठोस उपाय झालेला नाही.

    २. प्रभागातील प्रलंबित समस्या

    ‘पॉलिटिकल वझीर’च्या ग्राऊंड सर्व्हेनुसार, विकासाचे दावे आणि वास्तव यात मोठी तफावत आहे:

    गडर लाईनचा अभाव: संपूर्ण प्रभागात नवीन गडर लाईन टाकण्याची नितांत गरज आहे; सध्याच्या ड्रेनेज व्यवस्थेवर मोठा ताण आहे.

    रस्त्यांची दयनीय अवस्था: औद्योगिक परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असून रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

    अतिक्रमण: गडर लाईनवर झालेली अतिक्रमणे ही नागरी सुविधा पुरवण्यातील सर्वात मोठा अडथळा ठरत आहेत.

    ३. आखाडा महापालिकेचा: कोण आहेत प्रमुख दावेदार?

    या प्रभागात ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती आणि मुस्लिम समाजाची लोकसंख्या निर्णायक आहे. त्यामुळेच प्रत्येक पक्षाने जातीय समीकरणे जुळवून उमेदवार देण्यावर भर दिला आहे.

    प्रमुख इच्छुक उमेदवार:

    भारतीय जनता पक्ष (BJP): विद्यमान नगरसेवक गोपीचंद कुमरे, भाग्यश्री कानतोडे आणि खान नसीम बानो यांच्यासह विजय पारवे, किरण पनपिया, वहिदा खानम इखार हुसेन, संजय भगत, नितीन वाघमारे, रोशन उईके, पवन कोये, भारती आमगे, पूजा टेकाडे, संगीता उमाटे, कल्याणी लांजेवार, माधुरी अंबाडरे, ममता मंगर आणि सुनीता किरपाने यांची नावे चर्चेत आहेत.

    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: माजी नगरसेवक परसराम मानवटकर यांच्या नेतृत्वाखाली विजया हेडाऊ, सुनीता ढोले, शाहिजा अंसारी, संजय पेंदाम, गंगा नेताम, नसरीन तबस्सुम मंजूर खान आणि इकराम खान हे रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत.

    बहुजन समाज पक्ष (बसपा): पंकज वासनिक, अनिल आगराम, शेख रेश्मा अंजुम आणि मोहम्मद फरजाना बानो रफिक हे बसपाची हक्काची मते खेचण्यासाठी सज्ज आहेत.

    एमआयएम (MIM): भाग्यश्री वानखेडे, संदीप मेश्राम, तसलीम शेख आणि नझिमा खान यांच्यामुळे या प्रभागात तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

    शिंदे सेना: सुरेखा तलवेकर यांचीही नावे चर्चेत आहेत.

    ४. राजकीय वझीरचा कानमंत्र

    प्रभाग ३ मध्ये २०१७ साली काँग्रेसचे उमेदवार केवळ ५७ मतांनी निवडून आले होते. याचा अर्थ असा की, यंदा प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. भाजपला आपले वर्चस्व टिकवण्यासाठी ‘अँटी-इन्कम्बन्सी’ला तोंड द्यावे लागेल, तर काँग्रेसला एमआयएम आणि बसपाच्या संभाव्य ‘व्होट स्प्लिटिंग’ (मते फुटणे) पासून सावध राहावे लागेल.

    निष्कर्ष:

    प्रभाग ३ ची जनता आता केवळ घोषणांवर विसंबून राहणार नाही. जो उमेदवार ‘पिवळी नदी’ आणि ‘गडर लाईन’ सारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ठोस आश्वासन आणि कृती आराखडा देईल, तोच या निवडणुकीचा खरा ‘वझीर’ ठरेल!