Category: राजकीय व्यक्ती

  • अमरावती पदवीधर मतदार संघात डॉ . रणजित पाटील तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मैदानात

    या मतदारसंघात पदवीधर मतदार संघ म्हणून घोषीत झाला त्यात भारतीय जनता पक्षा कडून डॉ. रणजित पाटील  यांना उमेदवारी देण्यात आली .

    रणजीत पाटील  यांचा जन्म 20 जानेवारी 1964 रोजी झाला. हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि ते महाराष्ट्र युनिटचे राज्य सरचिटणीस होते. ते अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

    डिसेंबर 2014 मध्ये त्यांची गृह (शहरी), नागरी विकास, सामान्य प्रशासन, कायदा व न्यायव्यवस्था आणि संसदीय कामकाज या खात्यांसह महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

    नंतर त्याच महिन्यात त्यांना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी देण्यात आली. आणि वाशिम जिल्हा. त्यांनी एमएलसी म्हणून 2 टर्म पूर्ण केल्या आहेत आणि आता ते सलग तिसर्‍यांदा निवडणूक लढवत आहेत.

    पाटील यांचा जन्म सुलोचनादेवी पाटील आणि विठ्ठलराव पाटील यांच्या पोटी झाला, ते अकोल्यातील महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांच शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून एमबीबीएस आणि एमएस (ऑर्थो) केले.

    पाटील यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एमएस (ऑर्थो) पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. ते विठ्ठल रुग्णालयात अकोल्यातील अग्रगण्य ऑर्थोपेडिक सर्जन आहेत.

    आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही त्यांची ख्याती आहे. चार भावांमध्ये रणजित पाटील वयाने दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचे सर्व भाऊ चांगले पात्र आहेत.

    त्यांचे मोठे बंधू राजेंद्र पाटील हे अकोल्यातील एका नामांकित महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, त्यांचा धाकटा भाऊ रणधीर पाटील हे अकोल्यातील एक प्रतिष्ठित व्यापारी आहेत, त्यांचा धाकटा भाऊ नितीन पाटील हे जिल्ह्यातील सर्वात यशस्वी शेतकरी आहेत.

    रणजित पाटील हे दीर्घ काळापासून राजकारणात सक्रिय असल्याने त्यांनी आतापर्यंत खुप् राजकीय पद भुशविले आहेत .

    • उपाध्यक्ष, वैद्यकीय शाखा महाराष्ट्र भाजपा (2007-2012)
    • अध्यक्ष, वैद्यकीय शाखा अकोला भाजपा
    • प्रभारी, पश्चिम विदर्भ (वैद्यकीय शाखा)
    • सरचिटणीस, भाजपा, महाराष्ट्र (2012)
    • सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद

    अशा विविध राजकीय पद त्यांनी जबाबदारीने भुशविलेले आहेत.

  • आबासाहेब रघुनाथराव चव्हाण या सक्षम नेतृत्वापासून वंचित राहिलेला महाराष्ट्र

    आज आपल्या सर्वांनाच नक्कीच जाणून घेयला आवडेल अशा सक्षम नेतृत्वाबद्दल म्हणजेच आबासाहेब रघुनाथराव चव्हाण.

     

    यांचा जन्म 10 जून 1943 रोजी पानगाव या गावी झाला, आत्ताचा लातूर जिल्हा आणि रेणापूर तालुक्यातील हे गाव. परंतु अगोदर रेणापूर तालुक्यातील हे गाव अंबाजोगाई तालुक्याला जोडलेले होते.

     

    त्यांचा जन्म हा स्वातंत्र्य पूर्व काळात 1943 साली झालेला. तेव्हा त्यांचे वडिल रघुनाथराव चव्हाण यांच्या कडून समाजसेवेच बाळकडू मिळाल.

     

    विनायकराव पाटिल

     

    चव्हाण घराणं हे पूर्वी पासून पाटिल घराणं असल्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाशी थेट संबंध येऊ लागला रोज बैठकीत होणारा सामान्य जनतेच्या प्रश्नाचा न्याय निवडा पाहून समजून त्यांनी स्वतःला यामध्ये झोकून देऊन काम करायला सुरवात केली.

     

    आबासाहेब चव्हाण यांना जनतेच मिळणार प्रेम पाहून वडील रघुनाथ चव्हाण यांनी सक्रिय राजकारनात काम करण्याची मुभा दिली. तेथील जनतेत ते पूर्णपणे एकरूप झाले होते. माय माउली जनता त्यांना प्रेमाने मालक म्हणून संबोधित होती.

     

    त्यांची नाळ जमिनीशी जोडलेली होती आणि आजही आहे, एवढ्या मोठ्या पाटिल घराण्यातील आपण आहेत याचा त्यांनी कधीच गर्व केला नाही उलट स्वाभिमानाने लोकांसाठी काम करायला सुरवात केली.

     

    ‘सत्ता’ तंञ

     

    त्यांच्या राजकारनाची सुरवात हि गावच्या ग्रामपंचायती पासून झाली, सन. 1973 साली त्यांनी पहिली निवडणूक पानगाव ग्रामपंचायत लढवली, आणि त्यांचा पानगाव ग्रामविकास पॅनेल चे सर्वच उमेदवार विजयी झाले.

     

    आणि आबासाहेब चव्हाण वय वर्ष 30 असताना गावचे सरपंच झाले. तो त्यांच्या कपाळी लागलेला पहिला गुलाल. विजयानंतर कोणत्याही भ्रमात न जाता त्यांनी लोकांसाठी काम केली आणि जणमाणसात त्यांची प्रतिमा सर्वोत्तम नेता, प्रशासक अशी निर्माण झाली.

     

    त्यांनी सलग 1973 ते 1983 असे 10 वर्ष पानगावचे सरपंच पद सांभाळून, प्रशासन आणि जनतेत चांगलीच पकड निर्माण केली. त्यांनी केलेल्या कामामुळे ते घराघरात पोहचले.

     

    लोकांच मिळणार प्रेम आणि अंगी असणारी काम करण्याची क्षमता याच्या जोरावर त्यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्यांना जनतेच्या प्रेमामुळे यश देखील मिळाले.

     

    1983 साली देशाचे नेते, मा. खा. शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सामाजवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तत्कालीन बीड जिल्हा परिषद निवडणुकीत पानगाव गटातुण 1800 मतानी विजयी झाले.

     

    पुर्वी पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड जिल्हा परिषद सदस्यांमधुण केली जात अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती पदासाठी त्यावेळी आबासाहेब चव्हाण यांना 17 मते तर गोपीनाथराव मुंडे साहेब यांना 9 मते मिळाली, 8 मतांच्या चांगल्या फरकाने आबासाहेब चव्हाण सभापती पदी निवडुण आले मिळालेला विजय खूप मौल्यवान ठरला.

     

    त्यांची पंचायत समिती सभापती पदी निवड झाली, 5 वर्ष सभापती पद भूषवत असताना जनतेचा असणारा संपर्क तुटला नाही. तो अधिक प्रमाणात वाढ ला त्यांनी आणखी जोमाने जनतेत मिसळून लोकांची काम केली आपली लोकांशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही.

     

    पृ‌त्येक गावांमध्ये शाळा, पाणी पुरवठा योजना विहीर , वैयक्तिक विहीर शक्य तिथे आरोग्य केंद्र या योजना छोटे तलाव आशा अनेक योजना राबविल्या. 5 वर्ष्याच्या काळात त्यांच्या राजकीय ताकदीची चुनुक राज्याच्या नेतृत्वापर्यत गेली होती सर्वच पक्षांना त्यांची जणमाणसात असलेली ताकद समजली होती.

     

    खा. शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपला सामाजिक काँग्रेस पक्ष परत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये विलीन केला. त्या काळात आबासाहेब चव्हाण यांनी 10 वर्ष पानगाव ग्रामपंचायत सरपंच आणि 5 वर्ष पंचायत समिती सभापती पद भूषवल होत.

     

    आबासाहेब चव्हाण यांचा वाढता जणसंपर्क आणि मिळणाऱ्या जनतेच्या प्रेमामुळे खूप जनाच्या पोटात गोळा यायला लागला. पंचायत समिती सभापती निवडीत झालेला पराभव गोपीनाथराव मुंडे यांना खूपच जिव्हारी लागला होता.

     

    नंतर विरोधकांच्या राजकीय कुरघोडी वाढायला लागल्या होत्या. विरोधकांची राजकीय महत्वकांक्षा बळ घेत होती.

     

    नंतरच्या काळात अंबाजोगाई ला तोडून रेणापूर हा वेगळा तालुका करण्यात आला आणि त्याचा समावेश लातूर जिल्ह्यात करण्यात आला यामागे पण राजकारण होत हे आबासाहेब यांना समजून चुकलं होत पण त्यांनी धैर्याने काम करायला परत सुरवात केली

     

    त्यांचा पारंपरिक असणारा अंबाजोगाई, बीड मधील मोठा मतदार वर्ग तोडण्यात आला होता. तत्कालीन 1995 साली होऊ घातलेल्या लातूर बाजार समिती निवडणूकीत त्यांनी परत विजय मिळवला आणि 1995 ते 1999 असे सलग 4 वर्ष लातूर बाजार समिती च्या उपसभापती पदी विराजमान झाले,

     

    ती निवडणूक त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षा कडून लढवली होती. त्याच काळात त्यांची 1997 साली परभणी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली. 1997-2002 हा 5 वर्ष कालावधी त्यांनी परभणी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केल….

     

    आणि शेतीविषयक त्यांच धोरण हि पवार साहेबांसारखीच होती. पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले कुशल नेते म्हणून संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये त्यांचा नावलौकिक झाला होता.

     

    म्हणून 1999 ते 2002 या कालावधीसाठी त्यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे येथे राज्यपाला तर्फे नियुक्ती करण्यात आली.

     

    आबासाहेब रघुनाथराव चव्हाण यांचा वाढता राजकीय दबदबा काहींना सहन झाला नाही, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी आबासाहेब चव्हाण यांच्या विरोधात कुरघोडी करायला सुरवात केली.

     

    आणि या त्यांच्या स्वार्थी राजकारनामुळे महाराष्ट्र एका कुशल नेत्यांपासून वंचित राहिला. आबासाहेब चव्हाण यांनी द्वेषाच राजकारण कधीच केल नव्हतं.

     

    एक नक्कीच विश्वास वाटतो आज आबासाहेब चव्हाण सक्रिय राजकारणात असते तर नक्कीच ते आजच्या राज्याच्या मंत्री मंडळात आपल्याला उत्तम कृषी मंत्री म्हणून पाहायला मिळाले असते

     

    परंतु तेव्हा काहींनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेल्या नीच राजकारनामुळे महाराष्ट्र या नेत्यापासून वंचित राहिला तो कायमचाच……….

     

    सन 2000 नंतर राजकारणाचा घसरलेला स्तर, जातीय राजकारण ,निष्टा व तत्व यांना नसलेलं महत्व समाज हितासाठी केलेले राजकारण द्वेषासाठी पदासाठी केले जाऊ लागले…

     

    त्यामुळे स्वेच्छा निवृत्ती घेतली व आपल्या आवडत्या शेती व्यवसायाकडे वळले.

     

    पण मान मर्तब रूबाब आज ही जशाचा तसा

     

    ✍️- श्याम दत्तात्र्यय चव्हाण, लातूर

     

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबुक वर सुद्धा फॉलो करू शकता

    Facebook : political wazir

  • विनायकराव पाटिल

    मराठवाड्याच्या मातीत अनेक थोर संत, महात्मे, साहित्यिक, विचारवंत, कवी, राजकारणी जन्माला आले. यातील एका थोर विभूतीचा मराठवाड्याच्या मातीस परिसस्पर्श झाला आणि येथे शैक्षणिक क्रांती घडून आली.

    खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या घराघरांत ज्ञानाचा दीप उजळला. या शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते आणि मराठवाड्याचे क्रांतिसिंह कै. विनायकराव पाटील अण्णा हे त्यातले एक .

    कै. विनायकराव पाटील यांचा जन्म वैजापूर तालुक्यातील लोणी या खेड्यात 1 सप्टेंबर 1926 रोजी झाला. त्यांचे वडील कै. पांडुरंगराव जाधव हे प्राथमिक शिक्षक होते. घरची आर्थिक स्थिती हलाखीची होती.

    देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

    विनायकराव लहानपणापासूनच रोखठोक व स्वाभिमानी बाण्याचे होते. ज्ञान संपादनासाठी त्यांनी जिवाचे रान केले. एलएलबीची पदवी मिळवून ते बॅरिस्टर झाले.

    मात्र वकिली व्यवसायापेक्षा समाजसेवेचे व्रत घेऊन त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. खूप अनुभव घेतले, माणसे जोडली. अनेक कटू अनुभव पचवले; परंतु कडवट भावना मनात रुजू दिली नाही.

    त्यांच्या विचारांवर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा मोठा पगडा होता. ते यशवंतरावांच्या पुरोगामी नेतृत्वाकडे आकर्षिले गेले. महाराष्ट्रात तरुण कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे केले.

    मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागाचा कायापालट करावयाचा असेल तर शिक्षणासारखे प्रभावी दुसरे साधन नाही, हे त्यांनी ओळखले.

    ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?

    14 सप्टेंबर 1958 रोजी यशवंतरावांच्या प्रेरणेने त्यांनी आपले सहकारी दादासाहेब सावंत व इतर सच्च्या निष्ठावान सहका-यांना सोबत घेऊन ग्रामीण भागातील गोरगरिबांची, शेतक-यांची, शेतमजुरांची मुले शिकावीत, त्यांना रोजी-रोटी मिळावी, सन्मानाने जगता यावे यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.

    1967 मध्ये वैजापूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली व प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला. त्यांच्यावर महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.

    शिक्षण क्षेत्रावरील प्रेम व निष्ठा, तसेच सहकारी जीवनपद्धतीवर त्यांचा ठाम विश्वास होता. वैजापूरसारख्या दुष्काळी भागातील शेतक-यांचा विकास व्हावा म्हणून त्यांनी अनेक सिंचन प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली.

    नांदूर-मधमेश्वर, मन्याड, शिवना टाकळी तसेच पालखेड डाव्या कालव्याचे पाणी शेतक-यांना मिळावे म्हणून मोलाचे प्रयत्न केले.

    ध्येयवादाने प्रेरित होऊन त्यांनी सहकार क्षेत्रात साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध उत्पादक संस्था, सहकारी बँकांना बळकटी देऊन समाजोन्नतीसाठी दूरदृष्टी दाखविली. कोणतेही पद सेवेसाठी असते याची प्रचिती सर्वांना आणून दिली.

    28 डिसेंबर 1968 ला वयाच्या अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी विनायकरावांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आदर्श आजच्या काळात निश्चितच दिशादर्शक आहे. अशा थोर क्रांतिसिंहास कोटी-कोटी प्रणाम!

    आणि आज त्यांची जयंती आहे

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    सामनाची स्थापना शिवसेनेने नाही, तर या व्यक्तीने केली..सामना चा इतिहास

    सोनिया, उध्दव आणि पांडवांची पाच गाव – ज्ञानेश वाकुडकर

    शहीद चंद्रशेखर आझाद एक क्रांतिकारी झंझावात

    ओबीसींनो सावधान! राजकीय आरक्षणाचा फायदा नाही

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • ठाकरे परिवारातील तेजस ठाकरे ची तुलना व्हीव्हीयन रिचर्ड्ससोबत का केली जाते?

    मंडळी सद्ध्या महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीप्रमाणे ठाकरे कुटुंब चांगलच चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात केलेल्या बंडाने शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली.

    आणि शिवसेनेच्या अडचणींमध्ये वाढ झाली. मात्र अशामध्ये उध्दव ठाकरेंसोबत सामजिक चळवळीतील अनेक नेते जुडलेत. उध्दव ठाकरे यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे मेळावे घेण्यात चांगलेच व्यस्त झाले.

    मात्र शिवसेना पक्षाला अडचणीमधून सांभाळण्यासाठी आता उध्दव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव म्हणजेच तेजस ठाकरे राजकीय क्षेत्रात आपलं पाऊल टाकणार का? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

    ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?

    दिनांक ७ ऑगस्टला तेजस ठाकरे यांचा वाढदिवस असतो आणि याच दिवशी ते राजकीय क्षेत्रात सक्रिय होतील. अशी चर्चा सद्ध्या सगळीकडे सुरू आहे.

    तेजस ठाकरे याआधी कधीही कुठल्या राजकिय घडामोडीमध्ये दिसले नाही. मात्र २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मात्र आदित्य ठाकरेंच्या प्रचारासाठी ते सक्रिय होते. याव्यतिरिक्त त्यानंतर ते कुठल्याही राजकीय घडामोडीमध्ये आढळले नाही.

    एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी एका सभेमध्ये तेजस ठाकरे यांच कौतुक केलं होतं की,

    ” तेजस ठाकरेंच्या आणि माझ्या स्वःभावामध्ये खूप साम्य आहे.”

    तेव्हापासून ते राजकीय क्षेत्रात चांगलेच चर्चेत आले होते. राजकीय क्षेत्र वगळता ते आपल्या वैयक्तिक जीवनात वन्यप्राण्यांचा प्रजाती शोधून त्यांना वेगवेगळे नाव देण्यात व्यस्त असतात. 

    देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

    व्हीव्हीयन रिचर्ड्सशी तुलना…

    मंडळी आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटेल की वेस्ट इंडिजचे प्रख्यात क्रिकेटपटू सर व्हीव्हीयन रिचर्ड्स आणि तेजस ठाकरे यांची तुलना कशी काय होऊ शकते?

    तर मंडळी झालं असं की, मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांचा चेहरा वेस्टइंडिजचे क्रिकेटपटू व्हीव्हीयन रिचर्ड्स यांच्यासारखा दिसत असल्याचं सांगितलं होतं.

    याबद्दल त्यांनी शिवसेनेच्या ‘सामना’ या वृत्तपत्रात तेजस ठाकरे आणि व्हीव्हीयन रिचर्ड्स यांचा फोटो सोबत छापलेला होता.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक!

    ज्यांच्या वाट्याला फक्त दीड दिवसाची शाळा आली त्याच साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यक्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळविले. त्यांची साहित्य संपदा जगातील सुमारे 22 भाषांत अनुवादित झालेली आहे. 

    त्यांची चित्रा, सुलतान या कादंबऱ्या रशियामध्ये घरोघरी वाचल्या जातात, तर त्यांनी लिहिलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा रशियातील घराघरात गावागावात आणि शाळा-महाविद्यालयात गायला जातो.

    इतका तो प्रेरणादायी आणि लोकप्रिय आहे. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी 15 पोवाडे, एक नाटक, दहा लोकनाट्य, एक प्रवास वर्णन, तेवीस कथा आणि सुमारे 40 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. इतका प्रतिभासंपन्न आणि बहुविध साहित्यिक मराठी भाषेत दुसरा झाला नाही. 

    प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात,

    ‘अण्णा भाऊंच्या कादंबरीची तुलना करणारी भारतीय भाषात दुसरी कादंबरी नाही. अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीची तुलना रशियन कादंबरीकार दोस्तोएवस्की यांच्याशीच होऊ शकते.’

    यावरून स्पष्ट होते की अण्णाभाऊ साठे हे केवळ मराठी भाषा, महाराष्ट्र, भारत या चौकटीमध्ये मावणारे व्यक्तिमत्व नसून, ते जागतिक स्तरावरचे साहित्यिक ठरतात.

    अण्णाभाऊ साठे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. कष्टकरी, कामकरी, शेतकरी वर्गाच्या हक्क अधिकारासाठी ते लढले.

    मुंबईसह मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या वाणीने -लेखणीने शाहीर अमर शेख ,शाहीर गव्हाणकर यांच्यासोबत ढवळून काढला.

    स्वतंत्रसमरभुमी गाविलगड

    ‘माझी मैना गावावर राहिली. माझ्या जीवाची होतीया काहिली’ ही त्यांची छक्कड खूप गाजली. त्यांची ही छक्कड मराठी भाषेचे वैभव आहे. अत्यंत निस्वार्थ भावनेने त्यांनी सर्वसामान्य वंचित वर्गाच्या हक्कासाठी लढा दिला. 

    बालपणापासून त्यांच्या वाट्याला अत्यंत हलाखीचे जीवन आले. ओझी वाहिली, कोळसा वाचला, गिरणीत झाडू मारला. पोटासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत.

    संकटाला संधी समजून त्यांनी लढाऊ वृत्तीने त्यावरती मात केली. आण्णाभाऊ साठे संकटात खचून जाणारे नव्हते. तर संकटाच्या नरडीवर पाय देऊन यशाची शिखरे गाठणारे आण्णाभाऊ होते.

    गोरगरिबांचे दारिद्र्य नष्ट व्हावे, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. आण्णाभाऊ म्हणत,

    ‘दारिद्र हे फार क्रूर असते, आणि ते नग्न असते. ते नष्ट झाले पाहिजे.’

    यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांनी पंजाब दिल्लीचा दंगा, बंगालची हाक या कलाकृतीच्या माध्यमातून शांततेचे आवाहन केले.

    आण्णाभाऊ साठे म्हणत,

    ‘शांतता ही पवित्र बाब आहे. दंगल करून आपला प्रश्न सुटणार नाही, तर शांततेच्या मार्गानेच आपले प्रश्न सुटतील.’

    अशी त्यांची भूमिका होती. गरिबांना न्याय मिळावा, ही त्यांची प्रामाणिक भूमिका होती.

    आण्णाभाऊ साठे हे महान प्रतिभावंत साहित्यिक होते. परंतु साहित्याचा उपयोग त्यांनी समाजपरिवर्तनासाठी केला. एखादा प्रसंग उभा करण्यात त्यांचा हातखंडा होता. अचूक वर्णन करून एखादी व्यक्ती किंवा घटना याचे चित्रण करण्यात त्यांचा हातखंडा होता.

    प्राचीन काळामध्ये जनमानसाच्या मराठी भाषेला गाथासप्तशती, मध्ययुगीन काळात चक्रधरांचे लीळाचरित्र, संत नामदेवांची गाथा, संत तुकारामाचे अभंग, आधुनिक काळात महात्मा फुले यांचे साहित्य आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य कवेत घेत इंग्रजाळलेल्या काळात जनमाणसाची मराठी साहित्यात आणली.

    आजचे आधुनिक साहित्यिक म्हणजे आण्णाभाऊ साठे आहेत. त्यामुळेच त्यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन झाला पाहिजे. तो मराठी भाषेचा आणि आण्णाभाऊंचा ही सन्मान ठरेल.

    अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊ साठे असे आहे. आण्णाभाऊ साठे हे आधुनिक महाराष्ट्राचे तुकाराम आहेत. त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, दारिद्र्य, विषमता यावरती कडाडून हल्ला केला.

    आज देखील आपल्या समाजामध्ये पृथ्वीची निर्मिती ईश्वराने देवाने केलेले आहे. जगाचा नियंता ईश्वरच आहे. हे सर्व जग सजीव सृष्टी ईश्वर चालवतो आहे. अशी अंधश्रद्धा आहे.

    परंतु आण्णाभाऊ साठे म्हणतात,

    ‘पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर तरलेली नसून ती कष्टकरी, श्रमकरी ,शेतकरी वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे.श्रमकऱयांनी श्रम नाही केले तर धनदांडगे  फक्त नोटा खाणार नाहीत.’

    श्रमकऱ्यांचा कैवार घेऊन आण्णाभाऊ साठे अन्यायाविरुद्ध सातत्याने लढत राहिले. हे जग बदलायचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जावे लागेल. हे सांगताना अण्णाभाऊ साठे म्हणतात,

    ‘”हे जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव.’”

    अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ तर आईचे नाव वालुबाई होते. घरात प्रचंड गरिबी. दारिद्र्य हाच त्यांचा सखा नि सोबती होता.

    आण्णाभाऊंना वाटायचे आपण खुप शिकावे, म्हणून ते शाळेत गेले. गुरुजींनी त्यांना वर्गात बसू दिले नाही. एक दिवस ते वर्गाबाहेर बसूनच आत गुरुजी काय शिकवतात हे बाहेर बसून ऐकत होते.

    दुसऱ्या दिवशी धाडस करून ते वर्गात गेले. गुरुजींनी त्यांना दांडक्याने मारले. शिक्षण घेण्याच्या आशेने शाळेत गेलेल्या आण्णा भाऊंना मार खाऊनच घरी यावे लागले. ते फक्त दीड दिवस शिकले.

    पण पुढे जाऊन त्यांनी अक्षर ओळख करून घेतली आणि त्यांची प्रतिभेची गाडी सुसाट सुटली. गुणवत्ता आणि प्रतिभा ही कुणाची मक्तेदारी नाही. हे साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांनी जगाला दाखवून दिले.

    वयाच्या दहाव्या वर्षी अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या परिवाराला वाटेगाव वरून मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे वाटेगाव ते मुंबई असा चारशे किलोमीटरचा प्रवास आण्णा भाऊंनी त्यांच्या परिवारासह पायीच सुमारे दोन महिने केला.

    उदरनिर्वाहासाठी कोळसे वेचायचे, झाडू मारायचा, ओझे उचलायचे; असे करत करत त्यांनी मुंबई गाठली. ज्या आण्णाभाऊंना वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत,

    त्याच आण्णाभाऊ साठे यांना रशियन सरकारने विमानाने बोलावून रशियामध्ये त्यांचा मोठा आदर सन्मान केला. आण्णाभाऊ साठे म्हणजे रशियन जनतेच्या गळ्यातील ताईत होते. त्यांची साहित्य संपदा रशियन भाषेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

    अण्णाभाऊ साठे आपल्या शिष्टमंडळासह जेव्हा रशियामध्ये पोहोचले, तेव्हा तेथील शासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, “तुम्हाला काय पाहायला आवडेल. तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळातील डॉक्टर म्हणाले आम्हाला या ठिकाणची वैद्यकीय सेवा पाहायची आहे.

    लोकप्रतिनिधी म्हणाले या ठिकाणी शासन व्यवस्था कशी चालते ते पाहायचे आहे. वकील मंडळी म्हणाली या ठिकाणची न्यायव्यवस्था पाहायची आहे. संगीतक्षेत्रातील सहकारी म्हणाले या ठिकाणचे कला, नाट्य, संगीत पाहायचे आहे.

    आण्णाभाऊ साठे म्हणाले,

    “‘या ठिकाणचा मला फुटपाथ दाखवा आणि फुटपाथवर गोरगरीब कसे जगतात ते मला पाहयचे आहे”.

    रशियामध्ये जरी गेले, तरी उपेक्षित, वंचित, गरिबांची नाळ कधी तुटली नाही.

    आण्णाभाऊ साठे संवेदनशील मनाचे होते अण्णाभाऊ साठे रशियात जाण्यापूर्वीच त्यांची कीर्ती रशियात पोहोचली होती, ती त्यांच्या साहित्यामुळे.

    तेथे त्यांना छत्रपती शिवाजी राजांवर अभ्यास करणारे प्राध्यापक चेलिशेव भेटले. कॉम्रेड पी. ए. बारनिकोव भेटले. रशियन लोकांना मराठी भाषा शिकविणाऱ्या प्राध्यापिका ततियाना कातेनीना भेटल्या, बाकु याठिकाणी हमीद साहेब भेटले.

    हमीद साहेब आण्णा भाऊंना पाहिल्या पाहिल्या म्हणाले

    “शाहिरी अझीज.”

    रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी ताश्कंद, मास्को, स्टालिनग्राड, बाकू, अझरबैजान इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार झाला. 

    मास्को येथील सत्काराला उत्तर देताना आण्णाभाऊ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी राजांच्या मराठी मुलखातून मी या ठिकाणी आलो आहे. मास्कोमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी राजांचा जयजयकार करणारे अण्णाभाऊ साठे होते.

    ‘फकिरा कादंबरीतील फकिरा म्हणतो,

    “‘ही तलवार शिवाजीराजांनी माझ्या पूर्वजांना दिलेली तलवार आहे.”

    गणपतीला वंदन करणारा गण बदलून, छत्रपती शिवाजी राजांना वंदन करणारा गण आण्णा भाऊंनी आणला. ते म्हणतात, 

    “प्रथम मायभूच्या चरणा ।

    छत्रपती शिवबा चरणा  ।

    स्मरणी गातो कवणा ।”

    छत्रपती शिवाजीराजे वरती अण्णाभाऊंची नितांत श्रद्धा होती. सर्वसामान्य रयतेचा वाली छत्रपती शिवाजी महाराज हे आण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणास्थान होते.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कडून वारंवार होत आला आहे महाराष्ट्राचा अपमान

    आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेला शिक्षण मिळावे. उत्तम आरोग्य मिळावे. दारिद्र्यातून मुक्तता व्हावी. सर्वांगीण विकासासाठी शांतता असावी. ही साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांची मनोमन इच्छा होती.

    त्यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष केला. आण्णाभाऊ साठे हे जनमाणसाचे कैवारी होते. स्वतः दुःख भोगून इथल्या कष्टकरी श्रमकरी वंचितांना आनंद मिळावा. यासाठी संघर्ष करणारा महायोद्धा म्हणजे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे आहेत.

    दीड दिवस शाळां शिकणाऱ्या या महान साहित्यिकाने मराठी भाषेचा कैवार घेतला. जनमाणसांच्या मराठी भाषेला साहित्यात आणले. ज्या भाषेतील कलाकृती अनुवादित होते ती भाषा वृद्धिंगत होते.

    मराठी भाषेचा कैवार घेऊन मराठी भाषेला वृद्धिंगत करणाऱ्या या महामानवाची जयंती ‘मराठी भाषा दिन’ म्हणून जर साजरा झाला, तर निश्चितच मराठी भाषेचा आणि आण्णाभाऊंचा सन्मानच ठरेल.

    -डॉ. श्रीमंत कोकाटे

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • प्रबोधनकारांचे कुळ की पुरंदरेचे गोत्र? – गंगाधर बनबरे ( संभाजी ब्रिगेड)

     वि .का .राजवाडे यांनी भारत इतिहास

    संशोधन मंडळाच्या चौथ्या अहवालात कायस्थ समाजावर राजद्रोहाचा आरोप करून ,छत्रपती संभाजी राजांची हत्या कायस्थांमुळे घडून आली ,असा खोटा इतिहास लिहिला होता .

    कळस म्हणजे कायस्थांचे बीजकुळ हीन ठरवत त्यांना अनौरस ठरवणारे घाणेरडे आरोप केले होते. त्याला प्रबोधनकार ठाकरे यांनी 1918 साली “कोदंडाचा टणत्कार ” हे पुस्तक लिहून जबरदस्त प्रत्युत्तर दिले होते .

    शिवरायांच्या तलवारी प्रमाणे शब्द चालवुन प्रबोधनकारांनी राजवाड्यांच्या जातीय व खोट्या इतिहासाचे तुकडे तुकडे केले होते.

    “पिसाळलेले कुत्रे एकाला चावले की पुढे शेकडो जणांना डसल्याशिवाय राहत नाही .त्याची कवटी फोडून त्याला मोक्षच द्यावा लागतो .”

    हा प्रबोधनकारांचा ठाकरी बाणा होता. राजवाड्यांचे सर्व आरोप सत्य ऐतिहासिक पुराव्यांनी खोडून कायस्थ समाजावरील खोटा कलंक  दूर केला होता .तेंव्हापासून राजर्षी शाहू महाराज प्रबोधनकारांना “कोदंड” म्हणूनच हाक मारत असत. 

    आणि बाबासाहेबांच्या त्या अग्रलेखाने ब्रिटिशांचे धाबे दणाणले

    प्रबोधनकार हे शिव कुळाचे वारसदार होते .त्यांचे शब्द अनुबॉमपेक्षाही शक्तिशाली व खोट्या चा नायनाट करणारे होते व आहेत .

    माननीय राज ठाकरे यांना प्रबोधनकारांच्या कुळापेक्षा पुरंदरे यांचे गोत्र अधिक जवळचे वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे .टिळक -सावरकर -राजवाडे- गोडसे -पुरंदरे -भागवत यांचे गोत्र एक असू शकते .

    ठाकरे यांचे नाते कुळांशी आहे. गोत्रांशी नाही. राजकीय अभिनिवेषातून भोंग्यांची चढ-उतार करताना कुळालाच कलंक लावणे म्हणजे प्रबोधनकारांना खोटे ठरवणे आहे.

    सूर्य केवळ आमच्यामुळे चमकतो व दिसतो ,असं म्हणणारे करोडो जीवजंतू सृष्टीत आहेत .परंतु सूर्यामुळे जीवजंतू व सृष्टीचे अस्तित्व आहे ,हे त्रिवार सत्य आहे .

    असा महाप्रतापी सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! घुबडांनी सूर्य पाहिल्याची मर्दानगी सांगू नये .!! 

    पुरंदरे यांनी लिहिलेल्या बनावट इतिहासाची चिरफाड डॉक्टर आ.ह.साळुंखे सरांनी “पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर “ या ग्रंथात सप्रमाण केलेली आहे .

    हे पुस्तक वाचल्यावरही पुरंदरेनी शिवचरित्र घराघरात पोहोचवले असे  वाटत असेल तर त्यांच्या मेंदूला रेशीम बागेचा विषाणू चावला असे समजावे . 

    १ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास

    मराठा सेवा संघ .संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र व देशात समता ,बंधुता व न्यायाचे विचारकार्य १९९० पासुन करते.पुरुषोत्तम खेडेकरांनी कुणबी -मराठा ,बहुजनांना हा वारसा दिला.

    यामुळे जात -धर्मवादी भोंग्यांना  प्रबोधित समाज भिक घालत नाही.  राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड “बी “ग्रेड आहे की ” सी ” ग्रेड हे शोधण्यापेक्षा त्यांच्या मिमिक्रीला लोकांनी कोनता ग्रेड  दिला आहे , याचा शोध घ्यावा .

    ब्रिगेड समाजातली ए टू झेड विषमता संपावी यासाठी प्रयत्नरत आहे .तसेही माननीय राजसाहेब ; आपल्या प्रत्येक भाषणात आपण ब्रिगेडची आवर्जून आठवण काढताच या एकतर्फी प्रेमाबद्दल व आठवण काढल्याबद्दल  आभार व धन्यवाद.

    माणूस मेल्यावर आठवणी शिल्लक राहतात; ब्रिगेड तर विचार आहे तो संपणार नाही .सतत मालक बदलून, मालकांच्या इशाऱ्यावर भोंगे वाजवणारी ब्रिगेड नाही.

    शिवराय ,फुले ,शाहू ,आंबेडकर, प्रबोधनकार यांच्या विचारावर चालणारी प्रबोधन चळवळ आहे ब्रिगेड!! 

    माननीय राज साहेब वेडेवाकडे का होईना आपण ब्रिगेडचे नाव घेता. वाल्ल्या सुद्धा सुरुवातीला  मरा मराच म्हणत होता .परंतु शेवटी त्याला राम कळलाच .आपल्यालाही खरी ब्रिगेड निश्चितच कळेल .

    माननीय बाळासाहेब ठाकरे यांना ही चळवळ माहीत होती .त्यामुळे त्यांनी मराठा सेवा संघ व ब्रिगेडला कधीच विरोध केला नाही . मनोहर जोशींना सांगून सामाजिक प्रश्नांबाबत सहकार्य करायला लावले.

    अनेकदा त्यांच्या विरोधात ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली परंतु हा विरोध त्यांनी सकारात्मक घेतला .आर एस एस ला ते ओळखुन होते.

    आपली ही सध्याची  भोंग्यांची चढ-उतार करण्याची “ऑर्डर” संपली की वेळ काढावा व ब्रिगेड समजून घ्यावी .ही विनंती .शिव कुळाच्या वारसांनी पेशवाईचा अभिमान बाळगणे बरे नव्हे .

    प्रबोधनकारांना काय वाटेल?? आपसात नव्हे तर मानवतेच्या शत्रू विरोधात लढण्याची ही वेळ आहे. आमचे ,प्रबोधनकारांचे व सर्व बहुजनांचे कुळ म्हणजे शिव कुळ  !! 

    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक। तयाचा हरिक वाटे देवा।।

    जय जिजाऊ.

    @गंगाधर बनबरे, संभाजी ब्रिगेड.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • २००७ मध्ये मानवाला खाण्यायोग्य नसणाऱ्या गव्हाचा घोटाळा उघड करणाऱ्या सोमय्या चा इतिहास

    मंडळी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये बहुचर्चित असणारे नेते म्हणजे किरीट सोमय्या. त्यांच शिवसेनेतील संजय राऊत, उध्दव ठाकरेंशी चालणार युद्ध यामुळे ते अलीकडे चांगलेच चर्चेत आले होते.

    आज त्यांच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी किरीट सोमय्या यांचा जन्म १९५४ साली मुंबईतील मुलुंडमधल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

    लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आणि राजकारणाची आवड होती. १९७५ साली झालेल्या जयप्रकाश नारायण यांच्या एका आंदोलनात सहभाग घेऊन त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात केली.

    आणि त्या घटनेमुळे काँग्रेसमध्ये असतांना नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितली…

    त्यांनी आपलं शिक्षण चार्टर्ड अकाउंटंट होऊन पूर्ण केलं. नंतर त्यांनी २००५ साली मुंबई विद्यापीठातून फायनान्समध्ये डॉक्टरेटसुद्धा मिळवली. तरुण वयात आपल्या सामजिक चळवळी सुरू असतांनाच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

    सोमय्यांचा वाढता लोकप्रभाव पाहून भाजपाने त्यांना मुलुंडमधून १९९१ सालच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत ते निवडूनही आले.

    किरीट सोमय्या यांनी मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असतांना शवविच्छेदनाचा कायदा मंजू करून घेतला होता. किरीट सोमय्या यांची राजकीय कारकीर्द चांगलीच गाजत असतांना भाजपाने त्यांना १९९९ सालच्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईमध्ये पुन्हा उमेदवारी दिली.

    ओबीसींनो सावधान! राजकीय आरक्षणाचा फायदा नाही

    आणि ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. २०१४च्या लोकसभेतसुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला होता. 

    दुषित गव्हाचा घोटाळा उघड करणारे सोमय्या…

    मंडळी किरीट सोमय्या यांनी २००७ साली महाराष्ट्र सरकारचा गहू घोटाळा उघडकीस करून दिला होता. रेशनवर मिळणारा लाल गहू अत्यंत खालच्या दर्जाचा असल्याचा आरोप सोमय्या यांनी त्यावेळेस मानवाधिकार आयोगाकडे केला होता.

    सोमय्या हे घोटाळे उघडकीस आणून देणारे नेते म्हणून ओळखले जातात.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • शहीद चंद्रशेखर आझाद एक क्रांतिकारी झंझावात

    मंडळी भारतीय देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्ष व्हायला आली आहेत. मात्र हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून देण्यासाठी काही क्रांतिकारकांनी स्वतःच्या कुटुंबासहीत स्वतःला कुर्बान केलं आहे.

    आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका क्रांतिकारकाबद्दल ते म्हणजे शहीद चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ रोजी मध्य प्रदेशमधील भवरा नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये झाला.

    ते स्वतःचं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले नाही, तर आपल्या सोबतच्या अनेक लोकांना त्यांनी या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील करून घेतलं. त्यांना आपल्या बालपणापासून सामाजिक चळवळींची आवड होती.

    चंद्रशेखर आझाद यांचं मूळ नाव हे चंद्रशेखर तिवारी अस होत. मात्र एका चळवळीदरम्यानच्या घटनेने ते चंद्रशेखर तिवारीचे चंद्रशेखर आझाद झाले.

    तर मंडळी झालं असं की, सण १९२१ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी असहकार चळवळीची सुरवात केली. ज्यामध्ये चंद्रशेखर आझादसुद्धा सहभागी झाले होते. मात्र या चलवळीदरम्यान त्यांना अटक करण्यात आली.

    नंतर त्यांना जेव्हा न्यायालयात उभं करण्यात आलं, तेव्हा त्यांनी आपलं नाव चंद्रशेखर तिवारी न सांगता चंद्रशेखर आझाद अस सांगितल. त्या घटनेपासून त्यांना संपूर्ण जगभरात चंद्रशेखर आझाद या नावाने ओळखल्या जाऊ लागलं.

    काकोरी कट

    मंडळी भारतीय देशावर इंग्रजांचं राज्य असतानासुद्धा चंद्रशेखर आझाद हे निधड्या छातीने लढत होते. त्यांनी आपल्यासोबत १० क्रांतिकारकांना घेऊन इंग्रजांची काकोरी नावाची ट्रेन लुटली.

    ज्यामध्ये इंग्रजांनी गोळा केलेल्या खजीन्याचा साठा होता. मात्र या कटामध्ये सामील असलेल्या राम प्रसाद बिस्मिल्ला, अश्फाक उल्ला यासारख्या अनेक क्रांतिकारकांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली.

    अखेर झंझावात शांत झाला…

    मंडळी ब्रिटिश पोलिसांशी आझाद यांची अलाहाबादमधील एका पार्कमध्ये चकमक झाली. ब्रिटिशांनी संपूर्ण पार्कला वेढा घातला होता. आझाद यांनी काही ब्रिटिशांना ठारही केलं होतं.

    मात्र त्यांच्या बंदुकीमध्ये आता फक्त एक गोळी उरलेली होती. ब्रिटीशांच्या गोळीने मरण्यापेक्षा स्वतःच्या हाताने स्वतःला गोळी मारणं त्यांनी पसंत केलं. आणि ते या भारतीय देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत शहीद झाले.

  • पंजाबराव कदम ते भाऊसाहेब देशमुख भारतीय देशाचे पहिले कृषिमंत्री

    मंडळी भारतीय देशामध्ये अनेक राजकीय नेते होऊन गेलेत. मात्र महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात जन्माला येऊन संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झटणारे पंजाबराव देशमुख आजही प्रत्येक शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्यांच्या काळजामध्ये अजरामर आहेत.

    आज आपण त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड नावाच्या एका छोट्याशा गावी झाला.

    आणि त्या घटनेमुळे काँग्रेसमध्ये असतांना नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितली…

    त्यांचे मूळ नाव पंजाबराव कदम असे होते. मात्र ते वतनदारी घराण्यातून असल्याकारणाने त्यांना देशमुख या नावाने संबोधले जात होते. पंजाबराव देशमुख हे खेडेगावातून असल्याकारणाने त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव लहानपणापासूनच होती.

    त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. १९२६ साली त्यांनी सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘श्रद्धानंद छात्त्रालयाची’ स्थापना केली. १९२७ मध्ये भारतीय देशातील शेतकऱ्यांची स्थिती बळकट करण्यासाठी त्यांनी ‘शेतकरी संघाची’ स्थापना केली.

    प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा हे शासनाच्या कानापर्यंत पोहोचली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हक्कांना आवाज देण्यासाठी त्यांनी ‘ महाराष्ट्र केसरी’ या वृत्तपत्राची सुरवात केली. सार्वजनिक विहिरींमध्ये अस्पृश्य लोकांना प्रवेश नव्हता.

    म्हणून त्यांनी अस्पृश्यांसाठी सार्वजनिक विहिरी खुल्या केल्या. त्यानंतर त्यांनी रखडलेल्या शिक्षण क्षेत्राला क्रांती देण्यासाठी ‘शिवाजी शिक्षण संस्थेची’ स्थापना केली. आणि शिक्षण क्षेत्रातल्या चळवळीला सुरवात केली. 

    ओबीसींनो सावधान! राजकीय आरक्षणाचा फायदा नाही

    भारतीय देशाचे पहिले कृषिमंत्री 

    इ.स. १९५२ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते खासदारसुद्धा झाले. आणि १९५२,१९५७ , १९६२ ते सलग तीनवेळा खासदार होते. त्यानंतर १९६२ साली ते भारतीय देशाचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री झाले.

    कृषिमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना त्यांनी राबवल्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी ‘भारतकृषक समाजाची’ स्थापनासुद्धा केली होती.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आणि त्या घटनेमुळे काँग्रेसमध्ये असतांना नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितली…

    मंडळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शिवसेनेविरोधात बोलत असतांना कायम चर्चेमध्ये असतात. नारायण राणेंनी आधी शिवसेना नंतर काँग्रेस नंतर भाजप असे पक्ष बदलल्याने त्यांच्यावर नेटकऱ्यांकडून नेहमीच टीका होत असते.

    मात्र नारायण राणे यांचा त्यांच्या प्रत्येक पक्षातील प्रवास हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेलाच राहला आहे. राणे यांनी मुंबई येथे नोकरीसाठी स्थायिक झाल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला.

    ओबीसींनो सावधान! राजकीय आरक्षणाचा फायदा नाही

    १९९१ साली छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर भुजबळांच्या जागेवर त्यांची विरोधीपक्षनेता म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर भाजप शिवसेना युतीच सरकार आल्यानंतर त्यांना महसूलमंत्री करण्यात आलं.

    १९९९ साली शिवसेना मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यात आल्यानंतर राणेंना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. मात्र उध्दव ठाकरे राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर राणे आणि त्यांच्यामध्ये पटत नव्हतं.

    आणि त्या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला…

    २००४ साली महाबळेश्वर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या एका अधिवेशनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंना आपला उत्तराधिकारी घोषित केल्याने त्यांची नाराजी आणखी वाढली.

    आणि अखेर त्यांनी २००५ साली शिवसेना सोडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर राणेंना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा लागलेली होती.

    त्यांनी याबद्दल काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आपली इच्छा व्यक्त केली होती. २००९ साली काँग्रेसच्या सरकारमध्येही त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलं. 

    पक्षश्रेष्ठींना मागितली माफी

    नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आल्या कारणाने त्यांची काँग्रेसबद्दल नाराजी आणखीच वाढली होती. ज्या विलासराव देशमुखांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं. त्यांच्याच विरोधात राणेंनी वेगळा गट तयार केला.

    ही बाब पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आल्यानंतर राणेंना पक्षातून निलंबित करण्याच ठरलं. मात्र या सगळ्या प्रकाराबद्दल राणेंनी काँग्रेसमधील सर्व पक्षश्रेष्ठींची माफी मागितली होती.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir