Category: राज्य

  • पोलीस निरीक्षकाकडून वारकरी संप्रदायाचा अपमान

    मंडळी आपला भारतीय देश हा विविध धर्माच्या संस्कृतीने नटलेला आहे. वारकरी संप्रदाय हा संत नामदेवांनी सुरू केला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून तोच वारकरी संप्रदाय या भारतीय देशामध्ये अजरामर केला.

    आज महाराष्ट्रामध्येच नाही, तर संपूर्ण भारतीय देशामध्ये वारकरी संप्रदाय पोहचलेला आहे. हजारो कीर्तनकार वारकरी किर्तनाच्या माध्यमातून समाजाला समतेचा उपदेश करताना आपण बघत असतो.

    ब्राम्हण महासंघाच्या महिलांना डोक्यावर घेऊन गेलो असतो – रुपाली पाटील

    मात्र काही लोक मनात द्वेष ठेवून विविध धर्मातील संस्कृतीला विरोध करत असतात. असाच काही प्रकार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये चालू असलेल्या एका कीर्तनात घडला. चाळीसगाव येथील हनुमान सिंग नगरामध्ये सप्तशृंगी मातेच्या वर्धापनदिनानिमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

    त्यात सातव्या दिवशी ह.भ.प. सोमनाथ महाराज जपे यांची कीर्तन सेवा होती. कीर्तन चालू असताना चाळीसगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील हे त्या ठिकाणी आले आणि कीर्तन चालू असताना वारकऱ्यांसोबत दमदाटी केली. असा आरोप चाळीसगाव येथील वारकरी संप्रदायाने केला आहे.

    वारकरी संप्रदायानुसार कीर्तनकार ज्या गादीवरून विवेचन करतात त्याला नारदाची गादी म्हटले जाते. मात्र पोलीस निरीक्षकाने त्या गादीवरच चक्क बूट नेल्याने वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. सोबत त्यांनी किर्तनकारासोबत वारकऱ्यांना मारहाण करण्याची धमकी दिल्याचासुद्धा आरोप चाळीसगाव येथील वारकरी संप्रदायाने केला आहे. 

    राज ठाकरे ही भाजपची C टीम – अब्दुल सत्तार

    या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी आपली बाजू मांडताना सांगितल की,

    ” कीर्तन चालू असताना सगळीकडे आवाज हा मोठ्याने येत होता. ज्यामुळे रहिवासी नागरिकांना त्रास होत होता. म्हणून आम्हाला कीर्तन थांबवावे लागले.”

    अस के. के. पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र आता या प्रकरणावर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय काय प्रतिक्रिया देईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना

    मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकरणात धार्मिक राजकारण खेळण्याचे राजकीय नेत्यांचे मनसुबे चालू आहेत. जनतेच्या प्रश्नांची पर्वा कुणालाच पडलेली नाही. मात्र कुठे हनुमान चालीसा वाजवायचा आणि कुठे अजाण यावर सध्याच राजकारण चालू आहे.

    राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मुंबई आणि ठाणेमध्ये घेतलेल्या सभेत हनुमान चालीसाच्या वादावरून धार्मीक मुद्दा उचलून धरला होता. राजकीय क्षेत्रात पुरेस यश आलं नाही तर राजकीय नेते धार्मिक राजकारणाची मदत घेतात. हे राज ठाकरेंच्या बाबतीत बघायला मिळाल.

    देवाच नामस्मरण करत मातोश्रीवर येणार – नवनीत राणा

    मात्र भारतीय जनता पक्षाची हरदम टीका करणारे राज ठाकरे अचानक भाजपच्या धार्मिक राजकारणाच्या बाजूने गेले याच सर्वांना आश्चर्य वाटलं आणि आता तेच राज ठाकरेंनी साकारलेली भूमिका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी साकारलेली आहे.

    राज ठाकरेंच्या हनुमान चालीसा भोंग्यावर लावण्याच्या मुद्द्याला शिवसेनेनं कडाडून विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याने राज ठाकरेंची बाजू घेत शिवसेनेला आव्हान केलं होत की, आम्ही मुंबईमध्ये मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचू आणि आज राणा दाम्पत्य तेच आव्हान पूर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झाल आहे.

    तीन ऋतू असतात तसे राज ठाकरे आहेत – गुलाबराव पाटील

    प्रतिउत्तरात शिवसेनेनेसुद्धा राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी बडनेरा रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती. मात्र शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून राणा दाम्पत्य गनिमी काव्याने नागपूर विमानतळावरून मुंबईत दाखल झाल आहे.

    यावर प्रसार माध्यमांशी बोलत असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याला ताकीद दिली आहे की,

    ” रवी राणा आधी एकटे येतो म्हणले होते. मात्र आता बायकोला घेऊन आले. पण ते जर मातोश्रीवर आले तर त्यांना पायाने परत पाठवणार नाही.”

    अस आव्हान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल.

    हनुमान चालीसा म्हणूनच परत जाणार – राणा दाम्पत्य

    मंडळी काही वेळापूर्वी राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झाल आहे. याआधी रवी राणा यांनी सांगितलं होतं की,

    ” मी मुंबईत येऊन मातोश्रीपुढे हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय परत जाणार नाही.”

    मात्र त्यांना रोखण्यासाठी शिवसेना कारकर्त्यांनी मुंबई रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • लालपरीची सुटका पण गाढवाला कुणी पाळलं – सामना

    मंडळी सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भोंग्याने धुमाकूळ घातला आहे , तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्तेनी एसटी कर्मचाऱ्यांच्या केलेल्या आर्थिक आणि मानसिक फसवणुकीने सगळीकडे राजकीय चर्चेच वातावरण निर्माण केलंय.

    गुणरत्न सदावर्ते आणि अजयकुमार गुजर यांनी निलंबित कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५४० रुपये आणि इतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३०० रुपये अशी १ लाख १० हजार रुपयांची रक्कम २५० डेपोमधून गोळा केली.

    अस एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं. पोलीस प्रशासनाने सदावर्ते यांच्या केलेल्या चौकशीमध्ये तशी कबुलीही त्यांनी पोलिसांना दिली. यानंतर सदावर्ते यांना अटक करून मुंबई आणि सातारा येथे पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं होतं.

    सदावर्ते यांच्यावर शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी त्यामागचे मुख्य आरोपी असल्याचा गुन्हा दाखल झाला होता. आज त्यांना कोल्हापूरमध्ये नेण्यात येणार असुन पुढील सुनावणी कोल्हापूर न्यायालयात होणार आहे.

    जवळपास ९४% एसटी कर्मचारी कामावर परतल्याने माहाविकास आघाडी सरकारला दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सामना या अग्रलेखात गुणरत्न सदावर्ते आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

    ” लालपरीची सुटका झाली पण गाढवाला कुणी पाळलं होत ही गोष्ट जनतेसमोर येणे गरजेचे आहे.”

    अस सामनामध्ये म्हटलं आहे.

    सदावर्तेसारख्या गुंडाला आधीच लगाम लावायला होता – सामना

    शिवसेनेच्या सामना या अग्रलेखामध्ये शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा मुख्य आरोपी गुणरत्न सदावर्ते याच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे. सामनामध्ये म्हटलं आहे की,

    “सदावर्तेच्या गुंडशाहीला ४ महिन्यांपूर्वीच लगाम लावला असता, तर संप चिघळला नसता. सदावर्तेनी कायद्याचा खेळ केला आणि त्यांचा खेळ कायद्यानेच संपला.”

    अस सामनामध्ये म्हटलं आहे. आज कोल्हापूर न्यायालयात सदावर्तेबद्दल काय निकाल लागेल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • राज ठाकरे यांना देशातून तडीपार करा – भीम आर्मी

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणात सद्धया सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाणेमध्ये घेतलेल्या सभेत केलेल्या धार्मिक वक्तव्यांवरून सम्पूर्ण महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये द्वेष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

    राज ठाकरे यांनी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी आता सर्वसाधारण कुटुंबातील युवकांची धर्माच्या नावाखाली माथी भडकवण्याला सुरवात केली आहे. अस मत समतावादी सामाजिक संघटनांनी वर्तवल आहे.

    त्यांनी आपल्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मस्जिदींसमोर भोंगा लावून त्यामध्ये हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्याकारणाने समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होणं साहजिकच आहे.

    अलीकडे मनसेचे नाशिकचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी नाशिकमध्ये मस्जिदींवरील भोंगे न उतरवल्यास प्रत्येक मस्जिदीपुढे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू अस विधान केल होत. मात्र महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याचा राज ठाकरेंचा हा मनसुबा हाणून पाडण्याच मत आता भीम आर्मी या संघटनेने व्यक्त केलं आहे.  

    भीम आर्मीचा राज ठाकरेंना दम

    गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात कार्यरत असलेले राज ठाकरे यांना फारस राजकीय यश प्राप्त न झाल्याकारणाने त्यांनी आता धार्मिक राजकारणाचा सहारा घेतलेला दिसतोय. या पार्श्वभूमीवर भीम आर्मीने राज ठाकरेंना चांगलाच दम दिला आहे.

    ” राज ठाकरे यांच्या भाषणावर रमजानपर्यंत प्रशासनाने बंदी आणावी. ते आपल्या भाषणांमधून महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याच्या हेतूने राजकारण करत आहेत. राज ठाकरेंना महाराष्ट्रातूनच नाही, तर सम्पूर्ण भारतीय देशातून तडीपार करण्यात याव.”

    अस रोखठोक मत भीम आर्मीने पोलीस महासंचालक आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहून व्यक्त केलं आहे. मात्र आता राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • ३ मेपर्यंत मस्जिदींवरचे भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू – दिलीप दातीर

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रात धार्मिक राजकारण करून संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं आहे. महाराष्ट्रातील मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने द्यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हनुमान चालीसा प्रत्येक मस्जिदीपुढे लावण्यात येईल.

    अस विधान केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.राज ठाकरेंच्या या विधानाने समाजामध्ये धार्मिक तेढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज ठाकरे यांना पुरेस राजकीय यश प्राप्त न झाल्यामुळे त्यांनी हा राजकारणातील धार्मिक फंडा वापरला असावा.

    या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशीकमध्ये सर्व धार्मिक स्थळी भोंगे लावण्याअगोदर पोलिसांची परवानगी घ्यावी असे आदेश दिले आहेत. अन्यथा चार महिन्यांचा कारावास आणि दंड आकारण्यात येणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितल. मात्र दीपक पांडे यांच्या आदेशांचा विरोध नाशिकचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दिलीप दातीर यांनी केला आहे. 

    दुप्पट आवाजात भोंगे वाजवू – दिलीप दातीर 

    मंडळी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाटील यांनी नाशिकमधील सर्व धार्मिक स्थळांवरचे भोंगे लावण्याअगोदर पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यायचे सांगितल्यानंतर नाशिकचे मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी दीपक पाटील यांच्या आदेशांचा कडाडून विरोध केला आहे.

    ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगत होते की,

    “जर ३ मेपर्यंत नाशिकमधील मस्जिदींवरचे भोंगे प्रशासनाने हटवले नाही, तर आम्ही प्रत्येक मस्जिदीसमोर दुप्पट आवाजात भोंग्यावर हनुमान चालीसा लावल्याशिवाय राहणार नाही. मा. राज साहेबांचा आदेश आम्हाला अंतिम आदेश आहे. आम्ही नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशांना मानत नाही. जर मुस्लिमांना भोंग्यावत अजाण लावायची परवानगी मिळत असेल ,तर आम्हाला हनुमान चालीसा लावायची का नाही ?”

    असा प्रश्न त्यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. मात्र दातीर यांच्या या वक्तव्यावर नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • १०९ एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

    मंडळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दगडफेक करून हल्ला केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाच महाराष्ट्र शासनामध्ये विलीनकरणं व्हावं यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे.

    या आंदोलनामध्ये जवळपास १२० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी महाराष्ट्र सरकारला जाग आलेली नाही. महाराष्ट्र सरकारचा हा नाकर्तेपणा एसटी कर्मचाऱ्यांच्या सहन करण्याच्या आवाक्याबाहेर गेल्या कारणाने कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली.

    या प्रकरणी न्यायालयाने १०९ कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी अन्य कर्मचाऱ्यांची धरपकडही केली आहे. आता मात्र एसटी महामंडळाने सम्पूर्ण कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी २२ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे.

    कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करू त्यांना कोठडीमध्ये डांबने हे कितपत योग्य आहे ? असा प्रश्न आता सम्पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. ज्याप्रमाणें केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे जीव गेले त्यापेक्षा ही परिस्थिती काही वेगळी नाही आहे. 

    परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं की,

    ” एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला गुन्हा हा गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. एसटी महामंडळाकडूनही एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.”

    अस त्यांनी सांगितलं. मात्र १२० कर्मचाऱ्यांचा जीव गेला यावर कोण कारवाई करणार ? हा सुद्धा प्रश्न अनिल परब यांना पडणे महत्वाचं आहे.

  • वेश्यांच्या पैशावर डल्ला मारणार सरकार – देवेंद्र फडणवीस

    मंडळी महाराष्ट्रामध्ये चालू असलेलं राजकारण हे दिवसेंदिवस चिघळत चाललेलं आहे. राजकारणाची परिभाषा गेल्या काही काळात महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुडाची होत चाललेली आहे. केंद्र सरकार हे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीची चौकशी लावत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लावत आहे.

    त्यामुळे जनतेच्या प्रश्नांच काय? हा सर्वात मोठा प्रश्न सामान्य नागरिकाला भुरळ घालणारा आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चालू असलेला वादवादीचा खेळ चांगलाच रंगत आहे , तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून तिसरा पाय काढला आहे.

    त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनता कुठेच दिसत नाही. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी प्रमाणे जनतेचे प्रश्न वगळून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. 

    काय म्हणाले फडणवीस ? 

    मंडळी राज ठाकरेंच्या भोंगा प्रकरणाच्या मुद्द्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारविरोधात घेतलेला मुद्दा महाराष्ट्रात गाजायची शक्यता आहे. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत म्हटलं आहे की,

    ” सरकारने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मिळणारा निधी हडप केला. वेश्यांच्या पैशांवर डल्ला मारणार सरकार.”

    या शब्दात फडणवीस यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे. पुढे बोलताना त्यांनी समृद्धी महामार्गाचा मुद्दा उचलत राज्यसरकारला आणखी एक टोला लावतांना म्हटलं की,

    ” समृद्धी महामार्गावरून कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव कोणी मिटवू शकत नाही.”

    अस प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले. फडणवीसांच्या या आरोपावर राज्य सरकार आता काय प्रतिउत्तर देईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • महाराष्ट्रामध्ये फक्त सूडाच राजकारण, जनता गेली वाऱ्यावर

    मंडळी १९५१ साली जेव्हा स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक झाली होती. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या निवडणूकीमध्ये पराभव झाला होता. नंतर त्यांना एका पत्रकाराने जेव्हा प्रश्न विचारला की, मिस्टर आंबेडकर आपला या नुकत्याच झालेल्या निवडणूकीमध्ये झालेला जो पराभव आहे, त्यावर आपलं काय म्हणणं आहे?

    पत्रकाराच्या या प्रश्नाच उत्तर देताना डॉ. आंबेडकर तेव्हा म्हणाले की,

    ” आज माझ्या भारतीय देशातील जनतेने या देशाच्या लोकशाहीची ताकद संपूर्ण देशाला दाखवून दिली आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे.”

    मात्र मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण आणि आताच्या राजकीय नेत्यांचं राजकारण पाहता फार मोठी तफावत दिसून येते. महाविकास आघाडी सरकार आणि विरोधीपक्ष सर्वे एकमेकांचे पाय ओढण्याच्या मागे लागलेले आहेत. सतत एकमेकांची टीका करणे, टिंगल टवाळी करणे, विचारपीठावर बोलत असतांना विरोधी पक्षाच्या नेत्यांची नक्कल करणे. या सर्व गोष्टी सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये चालू आहे. 

     

    एकीकडे महाविकास आघाडी सरकार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर ईडीची चौकशी पाठवतात. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल केंद्र सरकार महाराष्ट्रातील महाविकास  आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडीची चौकशी पाठवतात. नंतर हाच विषय सतत चर्चेत चालू असतो.

     

    महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रतिदिवस दोन शेतकरी आत्महत्या करतात. याकडे सरकारच लक्ष नाही. एसटी कामरच्याऱ्यांचं त्यांच्या हक्कासाठी गेली कित्येक महिने आंदोलन चालू आहे.  ज्यामध्ये अनेक एसटी कर्मच्याऱ्यांनी स्वतःचा जीव गमावला, तरी या सरकारला जाग आली नाही. विरोधी पक्षाने किरीट सोमय्याला फक्त महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची अवैध संपत्ती शोधण्यासाठी कामाला लावलं आहे.

     

    पण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांच्या प्रश्नांसाठी कधीच विरोधीपक्षाला बोलायचं नसत. जिकडे तिकडे फक्त ‘याला आडव त्याची जिरव’ नुसता हाच प्रकार चालू आहे. म्हणून आता जनतेने सतर्क होण्याची वेळ आली आहे. जनतेच्या जीवाची निलामी करणाऱ्या या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवून देणं हे जनतेच्या हातामध्ये आहे. म्हणून सावधान रहा.

  • १९९२ च्या दंगळीच्यावेळी मुंबईला वाचविणाऱ्या शिवसैनिकांना छळू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    मंडळी महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात गदारोळ चाललाय. एकीकडे सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी मोफत घर देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून संपूर्ण महाराष्ट्रातून सरकारची टीका होत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लादण्यात व्यस्त झालं आहे.
     
     
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. विरोधी पक्षीय नेत्यांच्या मालमत्तांवर छापे टाकणारी ‘ ईडी ‘ आहे की तुमचा घरगडी, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये केला.
     
     
    सक्तवसुली संचालनायलाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीवर मंगळवारी कारवाई केली. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बोलत होते. मुखमंत्र्यांनी वाटल्यास मला तुरुंगात टाका पण १९९२ च्या दंगलीच्या वेळी मुंबईला वाचविणाऱ्या शिवसैनिकांना त्रास देऊ नका, असे आवाहनही भाजपला दिले आहे. 
     
     
    मंडळी ईडीची छाप फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मालमत्तेवरच पडत असते का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण जनतेचे प्रश्न सोडून केंद्र सरकार हे भारतीय देशातील तमाम जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. या देशामध्ये अनेक प्रश्न केंद्र सरकारला सोडवण्यासाठी आहे. मात्र त्या सर्व बाबींवर त्यांचं केव्हाच लक्ष जात नाही.
     
     
    एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि एल.पी.जी. सिलेंडरचे भाव वाढवून केंद्र सरकार निवांत बसल आहे. तर दुसरीकडे अशा मुद्द्यांवर भारतातील जनतेच लक्ष जाऊ नये. यासाठी ते हिंदू मुस्लिम, ईडी लावणे या सर्व गोष्टी करत असत. म्हणून भारतीय देशातील प्रत्येक व्यक्तीन आता सतर्क रहायची वेळ आली आहे 
  • आमदार पळून जातील व सरकार पडेल या भितीनेच हा वर्षाव केला जात आहे- चंद्रकांत पाटील

    मंडळी जी जनता इथल्या आमदारांना विकासाच्या अपेक्षेपोटी निवडून देते, ज्या गरीब जनतेच्या भरवश्यावर हे नेते मंडळी आमदार झालीत त्या जनतेतील काही कुटुंबांना घरं नसतांना राज्यसरकारचा सर्वपक्षीय आमदार मंडळींना कायमस्वरूपी घर देण्याचा निर्णय अत्यंत निंदनीय आणि न समजणांरा आहे.
     
     
    मुंबईत आमदारांना कायम स्वरूपी घरे देण्यात येतील, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मुंबईत स्वस्तात घर मिळावे अशी सर्वपक्षीय आमदारांची मागणी होती. गेल्याच आठवड्यात आमदार निधीत एक कोटी रुपयांची वाढ करून तो पाच कोटी रुपये करण्यात आल्यावर,
     
     
    आमदारांना आता कायमस्वरूपी घरे देण्याची घोषणा झाल्याने आमदार मंडळी खुश झाली आहेत. मात्र या निर्णयाची सम्पूर्ण महाराष्ट्रभरातून टीका केली जात आहे. ठाकरे सरकारचा हा जाणीवपूर्वक केलेला निर्णय अत्यंत मूर्खपणाचा कळस गाठाणारा निर्णय आहे. 
     
     

    काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

     
     
    मंडळी एकीकडे केंद्रसरकार पेट्रोल डिझेलचे भाव वाढवून जनतेचा आर्थिक बळी घेत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातल ठाकरे सरकार जनतेच्या आशा अपेक्षांवर लात ठेवून स्वतःच पोट भरण्याच्या मागे लागलं आहे. या महाराष्ट्रातील असंख्य प्रमाणात जनता बेघर असतांनाही ठाकरे सरकारचा सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घर देण्याचा निर्णय अत्यंत निंदनीय आहे.
     
     
    यावर भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर चांगलीच टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना ते म्हणाले की,
     
     
    ” आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच हा वर्षाव केला जात आहे. दोन कोटींचा आमदार निधी कोरोना असतांनाही चार कोटी केला. ड्रायव्हरचे साहाय्यकाचे पगार वाढवले. त्यात आता घर दिली जाणार आहेत. कशासाठी घर पाहिजेत? माझं मुंबईत घर नाही. तरीही हे पैसे तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांना , शेतकऱ्यांना द्या. यासाठी मी आग्रही असेल.”
     
     
    अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. मात्र आता यावर महाविकास आघाडी सरकारमधील कुठला नेता प्रतिक्रिया देईल. यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.