Author: admin

  • आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात झाली…

    मंडळी भारतीय देश हा संपूर्ण जगभरामध्ये प्रबळ लोकशाही असलेला देश मानल्या जातो. ज्यामध्ये देशाचा कार्यभार हे प्रधानमंत्री चालवत असतात तर राज्याचा कार्यभार मुख्यमंत्री चालवत असतात.

    त्याचप्रकारे महाराष्ट्र राज्यालासुद्धा एकनाथ शिंदे यांना धरून आतापर्यंत एकूण २० मुख्यमंत्री झाले आहेत. महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते.

    ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कराड विधानसभेचे आमदार होते. त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ १ मे १९६० ते १ नोव्हेंबर १९६२ असा होता. त्यानंतर मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री झाले.

    जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबेंच्या हत्येनंतर आरोपी काय म्हणाला?

    ते साओली विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसकडून आमदार होते. त्यांचा कार्यकाळ २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ असा होता. त्यानंतर पी. के. सावंत हे महाराष्ट्राचे ९ दिवसांचे मुख्यमंत्री झाले.

    ते काँग्रेसकडून चिपळूण मतदार संघाचे आमदार होते. त्यानंतर वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा सर्वाधिक काळ मिळाला. ते महाराष्ट्राचे ११ वर्ष मुख्यमंत्री राहिले.

    ते पुसद मतदार संघाचे आमदार होते. ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ असा त्यांचा कार्यकाळ होता. त्यानंतर महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले.

    ते भोकर मतदार संघाचे आमदार होते. त्यांचा कार्यकाळ २१ फेब्रुवारी १९७५ ते १६ मे १९७७ असा होता. त्यानंतर वसंतदादा पाटील हे विधानपरिषद आमदार असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

    आणि त्या घटनेपासून राजकीय पक्षांना चिन्हे देण्यात आले

    ५ मार्च १९७७ ते १८ जुलै १९७८ असा त्यांचा कार्यकाळ होता. त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते बारामती मतदार संघातून आमदार होते. १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८० असा त्यांचा कार्यकाळ होता. 

    अनुक्रमे जवळपास २० मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले ज्यामध्ये अतिशय कमी दिवस म्हणून फडणविस हे मुख्यमंत्री होते. आनी सगळ्यात जास्त कार्यकाळ वसंतराव नाईक यांना चालवण्यात यश आलं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबेंच्या हत्येनंतर आरोपी काय म्हणाला?

    मंडळ राजकारण हे क्षेत्र अस आहे की, राजकीय नेत्यांचे चाहते जरी लाखो असले तरी त्यांच्या विरोधात पण काही लोक असतात. जे कधीही राजकीय नेत्यांसाठी धोका निर्माण करू शकतात.

    हो मंडळी काही दिवसांपूर्वी असच काही घडलं होत जपान या देशामध्ये. जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांची जापनच्या नारा शहरामध्ये भाषण करत असताना एका अज्ञाताने गोळ्या झाडून भर रस्त्यात हत्या केली.

    ज्यामुळे संपूर्ण जपान शहरात खळबळ उडाली आहे. जपानमध्ये येत्या काळात निवडणूक होत असल्याकारणाने आबे हे खूप दिवसांपासून तिथल्या प्रत्येक शहरामध्ये जाऊन भाषण करत होते.

    भर सभागृहात भाषण करणाऱ्या आमदाराला जेव्हा विलासराव देशमुखांनी सुनावलं…

    मात्र नारा शहरामध्ये भाषण करत असताना एक अज्ञात तिथे आला आणि त्याने आपल्या बंदुकीमधून दोन गोळ्या आबेंवर झाडल्या. ज्यामुळे आबेंच्या मानेमधून रक्त निघायला लागलं.

    आरोपीला त्याच ठिकाणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. आबेंना अवघ्या काही क्षणामध्ये नारा शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र पाच तास चाललेल्या उपचारानंतर आबे यांचा मृत्यू झाला.

    आबेंना रुग्णालयात दाखल करतेवेळी त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्यासोबत हजर होत्या. आबेंची हत्या करणाऱ्या आरोपीने पोलीस चौकशीदरम्यान सांगितलं की,

    “आबेंच्या नीतीपासून सहमत नसल्यामुळे मी त्यांची हत्या केली.”

    आबे हे सर्वाधिक कार्यकाळ पूर्ण करणारे जपानचे माजी प्रधानमंत्री होते. 

    आणि त्या घटनेपासून राजकीय पक्षांना चिन्हे देण्यात आले

    आबेंच्या हत्येवर मोदी काय म्हणाले? 

    मंडळी जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्या हत्येनंतर जपानमध्ये सगळीकडे शोककळा पसरली आहे. त्यावर भारतीय देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी म्हणाले की,

    “जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे हे माझे चांगले मित्र होते. त्यांची हत्या ही निंदनीय आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल संपूर्ण भारतीय देशामध्ये एक दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात येत आहे.”

    अस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • भर सभागृहात भाषण करणाऱ्या आमदाराला जेव्हा विलासराव देशमुखांनी सुनावलं…

    मंडळी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील इतिहासामध्ये असे काही राजकीय नेते होऊन गेले ज्यांच्या विशिष्ट बाबींमुळे ते आजही ओळ्खले जातात.

    यामध्ये सर्वात महत्वाचं नाव म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख. अस म्हणतात की, विलासराव देशमुख जेव्हा एखाद्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असले तेव्हा इतर राजकीय नेते त्यांच भाषण झाल्यावरच भाषण करत होते.

    आणि त्या घटनेपासून राजकीय पक्षांना चिन्हे देण्यात आले

    त्याच कारण अस की, सगळ्यांच बोलून झाल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांना ते आपल्या भाषणांमधून गोड चिमटे घ्यायचे. आपल्या भाषणशैलीमुळे विलासराव देशमुख हे सर्वांचे लोकप्रिय नेते होते. विशेषकरून आपल्या हजरजबाबीपणामुळे ते जास्तच लोकप्रिय होते.

    एकदा असाच काही किस्सा सभागृहात घडून आला होता. तेव्हा विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते तर स्व. गोपीनाथ मुंडे हे विरोधीपक्षनेते होते. मुंडे यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारवर खोचक टीका केली होती.

    तेव्हा उत्तराच्या भाषणामध्ये विलासराव देशमुख यांनी गोपीनाथ मुंडे यांना अप्रत्यक्षपणे चिमटा घेत म्हटलं होतं, की

    “मुंडे यांच भाषण हे नेहमी ऐकावसच वाटत. आणि मला अस वाटत की मी सरकारमध्ये असाच मुख्यमंत्री म्हणून असावं आणि त्यांनी विरोधीपक्षनेता म्हणून असच भाषण करत रहावं.”

    देशमुख यांच्या या हजरजबाबीपणावर शेवटी गोपीनाथ मुंडे यांनासुद्धा हसू आवरलं नव्हतं. 

    आणि अजित पवारांच्या त्या विधानावर संपूर्ण सभागृह हसून उठलं…

    जेव्हा देशमुखांनी आमदाराला सुनावलं…

    मंडळी सभागृहामध्ये एकदा ‘राज्याच शैक्षणिक धोरण’ या विषयावर बोलत असतांना मराठवाड्यातील एका आमदाराने आपलं भाषण एवढं लांबवल की सभागृहातील अधिकाऱ्यांनी सांगूनसुद्धा त्यांनी भाषण थांबवलं नव्हतं.

    त्यांनतर विलासराव देशमुख यांनी उत्तराच्या भाषणामध्ये त्या आमदाराला अप्रत्यक्ष टोला लगावत म्हटलं होतं की,

    ” राज्याच शैक्षणिक धोरण या विषयावर बोलत असतांना मा. आमदारांच्या भाषणामधून खरच जाणवलं की राज्याच शैक्षणिक धोरण अतीशय खालावल आहे.”

    विलासराव देशमुखांच्या आमदाराला दिलेल्या या अप्रत्यक्ष उत्तराने सर्व सभागृह अक्षरशः हसून उठलं होत.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी काय घडलं होत?

    मंडळी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ ला जेष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी केली. वयाच्या तरुण अवस्थेपासून आपला राजकीय प्रवास शरद पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये केला होता.

    मग अस काय घडलं की काँग्रेस पक्षाशी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना त्यांनी केली? तर मंडळी झालं असं की, राजकीय क्षेत्रात कुणीही गॉडफादर नसतांना स्वतःच्या कार्यकर्तुत्वार शरद पवार हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आमदार झाले होते.

    जेव्हा टीसीने पकडली होती आनंद दिघे यांची कॉलर…

    वर्ष होत १९६६-६७ दरम्यानच. पवार हे २६ वर्षाचे होते. त्यावेळी त्यांच्यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार होता.

    शरद पवार यांची इच्छा जरी निवडणूक लढवण्याची असली तरी त्यावेळच्या जेष्ठ अनुभवी नेत्यांच्या तुलनेत ते लहानच होते. एवढ्या लहान वयात त्यांना विधानसभेच तिकीट मिळेल अशी अपेक्षाही कुणी केली नव्हती.

    पण यशवंतराव चव्हाण यांच्या पवारांवर असलेल्या विश्वासामुळे त्यांना आमदारकी लढण्याच तिकीट देण्यात आलं आणि ते निवडूनसुद्धा आले. दिवसेंदिवस शरद पवार यांच राजकीय वजन काँग्रेस पक्षात वाढत चाललेलं होत.

    म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…

    ते वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा झाले होते. मात्र काँग्रेस पक्षात खरा वाद निर्माण झाला तो म्हणजे इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर. 

    सोनिया गांधींविरोधात पवारांचा बंड

    मंडळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचा काँग्रेस पक्षात मान वाढला होता. पण संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींच नाव पुढे येताच शरद पवार व त्यांच्यासोबत असलेल्या अनेक नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला.

    १९९९ मध्ये कोल्हापूरमध्ये शरद पवार हे एका कार्यक्रमासाठी गेले असता कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी संध्याकाळी आपल्या निष्ठावंत असलेल्या नेत्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि सण १९९९ मध्येच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • मर्यादेय विराजते…

    शककर्ते शिवराय या ग्रंथ वर.व्याख्यान झाले आणि शिवकथाकार विजयराव देशमुख यांना एका मित्राने त्यांच्या कडे आमंत्रण दिले.

    विजयराव या गोष्टी पासून पुर्णपणे दुर होते की ही मित्रभेट त्यांच्या आयुष्यातील एक वर्ष अज्ञात अश्या मार्गावर नेणार होते.

    मित्राकडे जाताच त्यांच्या पुढे एक लहान चित्र आले…

    दोन कैद्यांना उंटावर टाकले होते ज्यांना बघण्यासाठी अवघे लोक गोळा झाले होते…

    एक दगड घेऊन बंद्याना मारत होते.. , अंगावर भाले टोचल्या जात होते .

    विदारक चित्र बघताच विजयरावांनी मित्रापुढे प्रश्न उपस्थित केला…

    कोणाचे चित्र आहे हे ?

    आणि तसाच उत्तर सरसरून विज कोसळावी तसा विजयरावांच्या ज्ञानेंद्रियांवर कोसळला..

    शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आहे हे…

    हे उत्तर विजयरावांच्या ह्रदयात टोचले…

    हा तोच शंभु ज्याने नवव्या वर्षी मुघलांच्या मनसबाची दौलत आपल्या नावे केली होती, हा तोच शंभु ज्याने सौराष्ट्र सिमावर भगवा ध्वज फडकवला होता…

    शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज : एक श्रापीत राजहंस

    मग हा शंभु असा बंदीवासात कसा…

    या शंभु बद्दल गलिच्छ खूप ते ऐकले नेमका शंभु तसाच आहे ??

    आणि मग सुरू झाला एक वर्षाचा एकांतवास , पत्र, ग्रंथ मध्ये सुर्योदय व्हायचा आणि त्यातच सुर्यास्त..

    आणि मग एक ससंदर्भ ग्रंथ पुढे आला ज्याने वढू तुळापूर ला भव्य अशी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती चे समारोह केले…

    प्रत्येक शंभुद्वेष्टाच्या तोंडावर झापड सुद्धा या ग्रंथातून मारल्या गेली…

    जर विजयरावांनी सुद्धा असेच सह्याद्री ला ओरडू ओरडू विचारले असते कसा होता माझा राजा ?

    तर सह्याद्री ने सुद्धा उत्तर दिले असते..

    राजा डोक्यात घेतलं की डोक्यावर मी स्वतः नाचवेल तुला…

    छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शी आपल्या भावना जरी जुडल्या असल्या तरी वास्तव समोर ठेवून त्यांच्या चरित्र चे अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे..

    नाही तर भावनिक शिवभक्तीच्या नावाने राजे जयंती पुर्ती मर्यादित राहतील…

    शंभु बंध्यो बजरंग……!!

    आणि आमचा राजा जयंती पुरता नाही तर जिवंत असे पर्यंत आमचा मार्गदाता चरितार्थ आहे…

    आणि तरीही प्रश्न असेलच जर कसा होता माझा राजा 

    तर शिवभारतात उंबरखिंड प्रसंगी लिहिलय..

    अतिसुंदर , उंच मान , रूंद छाती , 

    धिप्पाड शरीर , महाबलवान , 

    पाठीवर दोन्ही बाजुस  बाणांचे दोन भाते जणु गरुडाचे पंख , 

    रत्नजडित अलंकार घातलेल्या  पांढर्याशुभ्र घोड्यावर , 

    गरूडावर श्री हरी विष्णू बसावे तसे आरूढ होऊन . अंगात अभेद्य कवच , मस्तकावर उत्कृष्ट शिरकाण , सोबत प्रचंड ढालीने शोभून उठणारा दुपट्टा परिधान करून…. श्री शिवशंकराहुन उग्र ,अग्नीदिव्य , वायुपेक्षा बलवान , इंद्राहुनद समर्थ , वरुणापेक्षा नीतिज ,  चंद्रापेक्षा आल्हाददायक , आणि मदनापेक्षा अजिंक्य , माथ्यावर शिवगंध जणू कैलासाचे रुद्र… असा होता आमचा राजा…

    मर्यादेय विराजते…

    ✍️अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जेव्हा टीसीने पकडली होती आनंद दिघे यांची कॉलर…

    मंडळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक नेते झाले ज्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कारकिर्दीच्या बळावर स्वतःच नाव इतिहासामध्ये अजरामर केलं. मात्र एक असा नेता ज्याने लोकांच्या मनात आणि त्यांच्या काळजामध्ये आजन्म घर करून ठेवलं.

    होय मंडळी. आपण बोलत आहोत बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले ठाण्याचे बाळ ठाकरे म्हणून ओळखले जाणारे धर्मवीर आनंद दिघें यांच्याबद्दल.

    म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…

    अस म्हणतात की, ९० च्या दशकामध्ये आनंद दिघे हे नाव ठाण्यातील प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसल होत. जन्माला येणार प्रत्येक मुल आनंद दिघेंसारख व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असायची.

    एक शिवसैनिक म्हणून काम करताना आंनद दिघे यांचा जनसामान्यांमध्ये प्रभाव एवढा वाढला होता की, त्यांना ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हटल्या जाऊ लागलं होतं. ठाण्यातील जनतेसाठी दिघे अहोरात्र झटत होते.

    मात्र संपूर्ण ठाण्यामध्ये दरारा असणाऱ्या आनंद दिघेंची कॉलर एका टीसीने पकडल्याचा किस्सा शिवसेनेच्या राज कल्याणकर यांनी सांगितली आहे. त्यांनी सांगितलं की,

    ” १९७६ साली देशात आणीबाणी पुकारण्यात आली. साबीर शेख यांच्यावर मिसा लावण्यात आला. पोलीस साबीर शेख यांना शोधत होते. काहीदिवस पोलिसांना हुलकावणी दिल्यानंतर साबीर भाई पोलिसांच्या हाती लागले. साबीर भाई यांना झालेली अटक आणि त्यांना कोठे नेणार हे सर्व गुप्त ठरवण्यात आले होते.”

    जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट

    पुढे बोलताना कल्याणकर सांगतात की,

    ” परंतु ती बातमी आम्हाला समजली. रात्री उशीराच्या गाडीने साबिरभाई यांना विसापूरच्या कारागृहात नेण्यात येणार आहे. आम्ही धावत पळत कल्याण रेल्वेस्टेशनवरून गाडी पकडली. कोणाकडेही तिकीट नव्हती. गाडीमध्ये एक उंचपुरा भैया टीसी आला आणि थेट आनंद दिघे यांना बघून त्यांची कॉलर धरली. मग गाडीतील शिवसैनिकांनी त्याला योग्य तो धडा शिकवला.”

    हा किस्सा राज कल्याणकर यांनी सांगितला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…

    मंडळी राजकीय क्षेत्राचा इतिहास जर आपण बघितला तर सर्व राजकीय नेत्यांमध्ये सगळ्यात मोठं नाव म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे. ८० ते ९० च्या दशकामध्ये महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे हे एक मसिहा म्हणूनच आले होते.

    अस म्हणायला हरकत नाही. त्यांच्याविरोधात विरोधीपक्षाचा नेतासुद्धा बोलायला विचारच करायचा. बाळासाहेब ठाकरेंचा चाहता वर्ग हा मुंबईतच नव्हे तर सम्पूर्ण भारतीय देशात प्रचंड प्रमाणात होता आणि आतासुद्धा आहे.

    जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट

    महाराष्ट्रात खासकरून त्यांच्या नावाचा दरारा होता. कुठलंही पद नसतांना राजकिय क्षेत्रात त्यांच विषेशकरून चांगलच वजन होत. मात्र हे सगळं लक्षात घेता बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री का बरं झाले नाही?

    २०१९ ला त्यांचेच सुपूत्र शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मग बाळासाहेब ठाकरे का बरं झाले नाही मुख्यमंत्री? हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला उपस्थित होत असेल.

    तर मंडळी झालं असं की, बाळासाहेब ठाकरे नेहमी आपल्या मुलाखतीमध्ये, समाज माध्यमांवर सांगायचे की मला कधीच कुठलं पद घ्यायचं नाही. सत्ता कुणाचीही असो सत्तेच रिमोट मात्र आपल्या हातात असायला हवं. अस त्यांचं म्हणणं होतं. १९९५ ला बाळासाहेबांच्या शिवसेनेच युतीच सरकार स्थापन झालं. तेव्हापण ते मुख्यमंत्री झाले नाहीत. 

    उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”

    मुख्यमंत्री न होण्यामागचं सर्वात मोठं कारण…

    मंडळी अस म्हणतात की, बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य मराठी माणसांच्या हक्कासाठी जो संघर्ष केला त्यादरम्यान त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते.

    त्यामुळे दाखल झालेले गुन्हे जर कोर्टात सिद्ध झाले तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. या कारणाने त्यांनी मुख्यमंत्री पद नाकारलं अस म्हटल्या जात. १९८७ मध्ये झालेल्या एका पोटनिवडणुकीत  बाळासाहेब ठाकरेंवर धर्माच्या नावावर जनतेला मतं मागितल्याचे आरोप झाले होते.

    या खटल्याचा निकाल १९९९ ला लावण्यात आला होता. ज्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ६ वर्ष मतदान न करण्याची सक्ती आणल्या गेली होती.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट

    मंडळी राजकारण म्हटलं की प्रत्येक कार्यकर्त्यापासून ते राजकीय नेत्याला अशी अपेक्षा असते की, राजकारण या क्षेत्रात आपण सर्वोत्कृष्ट पदावर असायला हवं. मात्र राजकीय नेत्यांचा हा अट्टहास कधी कधी पक्षासाठी धोकादायकसुद्धा ठरू शकतो.

     

    असच वर्षभरापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये झालेलं होत. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते नितिन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रंगलेल्या शीत युद्धाचा नागपूरमधील शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये चांगलाच गौप्यस्फोट झाला होता.

     

    आणि अजित पवारांच्या त्या विधानावर संपूर्ण सभागृह हसून उठलं…

     

    जेव्हा नागपूरमधील भारतीय जनता पक्षाचा  विषय येतो. तर गडकरी आणि फडणवीस असे दोन गट नागपूरमध्ये भाजपचे मानले जातात.

     

    पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीमध्ये तत्कालीन भाजप आमदार अनिल सोले जे गडकरींचे एकनिष्ठ मानले जातात आणि दुसरीकडे महापौर संदीप जोशी जे फडणवीसांचे एकनिष्ठ मानले जातात.

     

    या दोघांमध्ये पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची उमेदवारी कोणाला मिळणार? अशी झुंज लागली होती. पण खरं पाहिलं तर ही झुंज सोले आणि संदीप जोशी यांच्यात नसून ती गडकरी आणि फडणवीस यांच्यात होती. अस म्हटल्या जात.

     

    मात्र उमेदवारीची तिकीट अखेर फडणवीसांचे चाहते असलेल्या जोशी यांना मिळाल्यानंतर गडकरी आणि गडकरी गटामध्ये फडणवीसांबद्दल अधिकच नाराजी निर्माण झाली होती. परिणामी जोशी यांच्या प्रचाराला गडकरींनी एवढं मनावर घेतलं नाही.

     

    उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”

     

    अखेर ३० वर्षांपासूनचा भाजपचा गड ढासळला 

     

    शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये गडकरींच्या माणसाला तिकीट नाकारल्याने गडकरींनी ही निडवणूक एवढी मनावर घेतली नाही. आणि प्रत्येक निडवणुकीमध्ये ज्या प्रमाणे गडकरींच नाव घेऊन निवडणूका जिंकल्या जात होत्या.

     

    त्याप्रमाणे गडकरींच नाव प्रचारात वापरल्या गेलं नाही. परिणामी याच निवडणूकीत भाजपाला पराभव स्वीकारावा लागला. या घटनेने गडकरी-फडणवीस वादाचा सगळीकडे गौप्यस्फोट झाला होता.

     

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

     

     

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आणि अजित पवारांच्या त्या विधानावर संपूर्ण सभागृह हसून उठलं…

    मंडळी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात अचानक केलेला बंड आणि त्या बंडावरून सरकार कोलमडन अशाप्रकारच्या एकंदरीत अवघ्या थोड्याच कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थगित झालं आणि त्याजागेवर शिंदे-भाजप सरकार महाराष्ट्रात उभं झालेलं आहे.

    दोन दिवसीय विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये विजय झाला आणि ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष झाले आहे. त्यांना एकूण १६४ मते मिळाली.

    उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”

    मात्र विधानसभा सभागृहात बोलत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा देत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील बंडखोर नेत्यांवर धुवाधार फटकेबाजी केली.

    त्यांनी सर्वात पहिला निशाणा भारतीय जनता पक्षातील नेत्यांवर साधला. ते म्हणाले की,

    ” सभागृहामध्ये पहिल्या रांगेत बसलेले भाजपचे अर्ध्यापेक्षा जास्त पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच भाजपमध्ये गेले आहेत.”

    पुढे बोलताना अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेल्या राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. नार्वेकरांना उद्देशून अजित पवार म्हणाले की,

    ” नार्वेकर ज्या पक्षामध्ये असतात त्या पक्षातील नेतृत्वाशी ते मुद्दाम जवळीक साधतात आणि हळूच मग स्वार्थ जोपासतात. ज्याप्रमाणे आधी शिवसेनेत असतांना त्यांनी आदित्य ठाकरेंशी जवळीक साधली आणि स्वार्थ जोपासला.”

    अस टोला अजित पवार यांनी नार्वेकरांना लगावला. 

    एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।…

    अजित पवारांची शिंदेवर अप्रत्यक्ष टीका

    विधानसभा सभागृहात बोलत असतांना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टीका करत म्हटलं की,

    ” शिंदे साहेब तुम्ही जर माझ्याकडे येऊन कानात सांगितल असत की, उध्दव साहेबांचे अडीच वर्षे पूर्ण झाले, आता मला मुख्यमंत्री व्हायचं आहे तर, मी उध्दव साहेबांशी बोललो असतो.”

    असा टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंवर लगावला. अजित पवारांच्या या विधानाने संपूर्ण सभागृह हसून उठलं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir