Author: admin

  • उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”

    मंडळी गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण हे सर्वसाधारण माणसाच्या डोक्यापलीकडच होत. अडीच वर्षांपासून चालू असलेलं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच महाविकास आघाडी सरकार अवघ्या काही क्षणातच कोलमडून पडलं.

    विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत शिवसेनेतील जवळपास ४० आमदार घेऊन शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंविरोधात बंड केला.

    एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।…

    स्व. बाळासाहेब ठाकरे व आंनद दिघे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शिवसेना नेते एकनाथजी शिंदे हे गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेमध्ये आपली भूमिका एकनिष्ठतेने बजावत होते.

    मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात अचानक पुकारलेला बंड हा शिवसेना पक्षामध्ये नक्कीच मोठी तफावत निर्माण करणारा होता.

    ४० आमदार सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांच्या जाण्याने उध्दव ठाकरेंना महाविकास आघाडी सरकार टिकवणे अशक्य होतं. त्यामुळे त्यांनी दिनांक ३० जून २०२२ आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. 

    मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?

    राज ठाकरेंचा उध्दव ठाकरेंना टोला…

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी उध्दव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावत म्हटलं आहे की,

    ” एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशीबालाच स्वतःच कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो.”

    अशाप्रकारच अप्रत्यक्ष विधान राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंवर केलं आहे. एएनआयच्या एका बातमीनुसार राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला बहुमत चाचणी वेळी पाठिंबा देण्याचे दर्शवले होते.

    देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीकरीता पाठिंबा देऊन मदत करण्यासाठी राज ठाकरेंना फोन करून विनंती केली होती. यावर राज ठाकरेंनी ती विनंती स्विकारली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे राजू पाटील हे एकमेव आमदार आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज : एक श्रापीत राजहंस

    संभ कहैं सुनि दीन दयाल सो | 

    मेरी हँसी भ‌ए तेरी हँसी है | 

                                      ~ छत्रपती संभाजी महाराज [ सातसतक]

    या महाराष्ट्र च्या इतिहास चे संभाजी नावाचे एक असे पान आहे ज्याला लिहण्यासाठी शाई नव्हे तर रक्ताला पुढे यावं लागलं….!!

    पण आजपर्यंत च्या प्रवासात एका गोष्टी ची एवढी भयंकर चिड होती की संघर्षाच्या पायदंडावर अविरत लढलेल्या शंभुछत्रपतींबद्दल एवढ्या वर्षात न लोकांना जाणायचं होतं , न शंभु कळवुन घ्यायचा होता..

    नितीन बानूगडे च्या व्याख्यान अगोदर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे बदफैली आणि एका राष्ट्रपुरुषाच्या शब्दात बोललो तर मिनाक्षी आणि मदिराक्षी मध्ये गुंतलेला युवराज पलीकडे शंभुछत्रपती कुणाला माहितीच नव्हते…

    पण त्यांचा अंत मात्र सर्वांना माहिती होता , बदनामी चे घात आयुष्यभर घालून धर्मवीर या शब्दात मात्र गर्वाने संघटना ,नाव वाढवण्यासाठी लोक उभे राहिले…

    शंभु बंध्यो बजरंग……!!

    वा. सी बेंद्रेंनी शोधलेल्या शंभु वर तर खुद्द बाळशास्त्री हरदास सारख्या इतिहास अभ्यासकांनी एकांगी असल्याचे आरोप घातले , पुरंदरेंनी कवी कलश जवाबदार ठरवला आणि सरळ बोलुन दिले

    ” संभाजीराजांच्या ठायी शिवशाहीचा पोंच निर्माण झाला नव्हता…!! त्यांच्या वर्तनात अविवेकी उच्छुंखलपणाचं दिसून येते , या वेळी त्यांच्या हातुन काही आगळीक घडली असावी….!! “

    कानिटकर पासून अनेकांनी पुढे सर्जा शंभु वर पारंपरिक आरोप लावायला तडजोड केलीच नाही…

    तेवढ्यात कमल गोखले , विजयराव देशमुख ,जयसिंगराव पवार , केदार फाळके सारखे काही मंडळी शंभुछत्रपतींना खर्या अर्थाने पुढे आणण्यासाठी धडपडली …

    ज्या शंभुछत्रपतींना एवढे वर्षे बदनाम करून सुद्धा त्यांच्या बलिदानाला कोणी लपवु शकले नाही तो.शंभु नेमका आहे काय ??

    ज्याच्या नुसत्या नावाने शत्रूला कंप सुटतो , ज्याचा केवळ स्मरणाने शत्रूची रात्र आणि दिवस थरकापाने शहारली , ज्याच्या घोड्याच्या टापाखाली महाराष्ट्र उधळून उठल्याची नोंद खुद्द मनूची ने केली तो.शंभु म्हणजे राजकारण, समाजकारण, धर्मकारण या त्रिसूत्रात शोधताच येतो…

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    गृहकलह चे बळी पडले असतांना अणाजी पंताच्या गोठ्याने शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर लगेच शंभुछत्रपतींना कैदेत घालण्यासाठी घात टाकला असतांना वडिलांच्या दुख पचवून लगेच राजकारणात प्रवेश केला राजापूर ला माणसं पाठवून गड धान्यांनी परिपूर्ण केला , पन्हाळा वर बंदोबस्त वाढवला आणि गडातून एक पायही बाहेर न काढता सर्व स्वराज्य सुभेदारासह आपल्या बांजुंनी घेतले..

    महाराष्ट्र मधून बंगाल ची सुत्रे हलली , दक्षिणेकडे चिक्कदेवरायचे सामर्थ्य जाणुन गोवळकोंडा चा सुलतान आणि इक्केरीच्या नायकाला आपल्या बाजूला करून दक्षिणेकडे मराठ्यांच्या पराक्रमी मेरु उभा करून चिक्कदेवराय तहासाठी गुडघ्यावर बसवला…

    औरंगजेब भिडण्यासाठी आला असताना विजापूर घेण्यासाठी तो तयारी करत असतांना शंभुछत्रपतींनीच विजापूर च्या गडांवर हात टाकले…

    फोंडा पोर्तुगीज पुढे टिकाव धरु शकणार नाही कळताच तो पाडून मर्दनगड उभा केला…

    विजापूर आणि गोवळकोंडा च्या आदिलशाही आणि कुतुबशाही एकत्र घेऊन दक्षिणेची ढाल बनुन औरंगजेब ला भिडला..

    राजकारणाच्या पलिकडे गेलो तर

    ‘” आबासाहेबांचे संकल्पीत तेच आम्हांस करणे अगत्य !! “

    म्हणणारा शंभु सापडतो .

    पोर्तुगीजांनी पोली आणि सिडकोली गाव लुटून उध्वस्त केली तेव्हा तिथल्या गरीब रयतेला मायेप्रमाणे जपणारा शंभु , जंजिऱ्याच्या सिद्दी आणि मुघलांनी कुलाबा उध्वस्त केल्यावर तिथल्या रयतेला पुन्हा वसवणारा शंभु ,वडिलांनी केलेल्या निवाड्यांना पुढे त्याच न्यायाने पुढे जाऊन अर्जोजी , गिर्जोजींचे निवाडे करणारा शंभु !!

    या शंभुला धर्मवीर का म्हणावे ?

    कारण औरंगजेब ने धर्म बदलण्यासाठी अट घातल्याचा कुठलाही उल्लेख आढळत नाही..

    मग शंभुछत्रपती धर्मवीर नाही का? तर आहेच…

    फोंडा च्या शिलालेख वर

    ” आता हे हिंदुराष्ट्र जाहले !! “

    म्हणणारे शंभु , बुधभूषण मध्ये

    ” मृतो धर्मणे संयुक्तो दिर्घजीवी भविष्यती !! “

    म्हणणारा शंभु…

    रामसिंग ला ठणकावून

    ” आता त्या यवनाधमाला कैदेत टाकून आपल्या देवदेवतांच्या पुन्हा स्थापना करण्याचा !! “

    शब्द टाकणारा शंभु !! जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केलेल्या हिंदूंना पुन्हा धर्मात घेणारा शंभु धर्मवीर आहे पण फक्त नाही..

    मात्र हा शंभु इतिहास ने दुर्लक्षित केला, करत राहिला आणि त्यांच्या त्या भयावह अंतावर काही क्षणासाठी शंभु आठवल्या जाऊ लागला…

    पण शंभुछत्रपतींचं चरित्र एवढे परिपूर्ण आहे की आम्ही त्याला  मांडण्यासाठी आपण अपुर्ण ठरतो…छत्रपतींचा इतिहास म्हणजे फक्त त्यांचा शेवट नाही , शंभुछत्रपती म्हणजे फक्त धर्मवीर आणि मृत्युंजय नाही , शंभुछत्रपती म्हणजे स्वराज्यरक्षक , मालिक ए हिंद…तरीही श्रापीत राजहंस

    म्हणून अजूनही तो शंभु आम्हाला सातसतक मधून पुन्हा पुन्हा विचारतोच आहे…

    ” संभ कहै मेरी पति तुअ हात रहै !

             मेरे मन इहै तुम बिन लगावै तीर !!

    माझी पत तुमच्याच हातात आहे , माझ्या जिवनाची नौका तुजविण कोण पार नेणार ??

    तसे तर खूप काही लिहावयाचे होते…

    पण शंभुछत्रपतींनी आणि शिवछत्रपतींनी सर्वात महत्त्वाचे शिकवले ते मर्यादेय विराजते म्हणून थांबायचं……

    पण एक मात्र खरयं…

    शंभुछत्रपती एक अग्नी त्यांना जो हातात घेईल त्या प्रत्येकास अग्निपरीक्षा द्यावी लागते..

    आम्ही ती देण्यास सक्षम ठरलो नाही.. पण अनेक पुढे येउन देतील आणि मृत्यू पलीकडे शंभु उभे करतील ही आशाच…

    अवतार समिधा अर्पणम शंभु….

    अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।…

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारण हे सद्ध्या कुठलं वळण घेत आहे? याचा अंदाज राजकिय समीक्षकांशिवाय इतरांना येणे कठीणच म्हणावं लागेल.

    शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार आपल्या सोबत घेऊन उध्दव ठाकरेंविरोधात बंड केल आणि महाविकास आघाडी सरकार कोलमडून पडलं.

    ज्यामुळे उध्दव ठाकरे यांच मुख्यमंत्री पदही गेलं. त्यानंतर शिंदे गटाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन १६ अपक्ष आमदारांसोबत सरकार स्थापन करण्याच ठरवलं.

    रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे

    सर्वांना शेवटपर्यंत वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

    मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर ते सरळ प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत येतील यामुळे शहा आणि मोदींनी त्यांच्या मुख्यमंत्री न होण्यात महत्वाची भूमिका बजावली असावी असा अंदाज राजकीय समीक्षकांकडून वर्तवल्या जात आहे.

    मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?

    परिणामी एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र आता यामध्ये ट्विस्ट असा आहे की, शिंदेंना भाजपसोबत बहुमत सिद्ध करावं लागेलं.

    दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेशी बंड केलेल्या १६ आमदारांच्या निलंबनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्याची सुनावणी येत्या ११ जुलैला होणार आहे. 

    अमोल मिटकरींच्या ट्विटने नवा ट्विस्ट

    मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे फडणवीस सरकारबाबत केलेलं ट्विट सद्ध्या चांगलच व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरलं आहे.

    त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,

    “महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित ३० जून २०२२ ते ११ जुलै २०२२ असू शकते.”

    असा टोला मिटकरी यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे. शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांच्या निलंबनासंदर्भात येत्या ११ जुलैला न्यायालयीन सुनावणी होणार असून सर्वांचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे.

    त्यामुळे शिंदे सरकार राहणार की नाही याबद्दल अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. म्हणून मंडळी

    “पिक्चर अभि बाकी है।”…

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक होणाऱ्या फडणवीसांचा राजकीय जीवन प्रवास

    मंडळी काही राजकीय नेत्यांचा जीवन प्रवास जर आपण निरखून बघितला तर, खरच अस्वस्थ करणारा असतो. त्यांचा संघर्ष, त्यांची मेहनत हे त्यांच्या यशाचं विशेष कारण असत.

    हो मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका संयमी आणि कर्तव्यदक्ष असणाऱ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्याबद्दल. फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० ला नागपूरमध्ये एका ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला.

    मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?

    फडणवीस यांना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे वडिलांकडून मिळाले.

    “वडिलांना इंदिरा गांधींमुळे अटक झाली म्हणून मी गांधींच्या कुठल्याही शाळेत शिकणार नाही.”

    अस वयाच्या सहाव्या वर्षी सांगणाऱ्या फडणवीसांमध्ये बालपणापासूनच राजकीय गुण दिसू लागले होते. नंतर ते १९८६-१९८९ या कालावधीमध्ये ABVP चे सदस्य होते.

    फडणवीस १७ वर्षांचे असतांना त्यांचे वडील गेले. त्यामुळे त्यांच्या जीवनात संघर्ष आणखी वाढला होता. वयाच्या अवघ्या २२ वर्षी त्यांनी नागपूर महानगरपालिका निडवणुकीमध्ये विजय मिळवला आणि नगरसेवक झाले.

    रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे

    फडणवीसांच कार्यकर्तुत्व वाढत चाललं होतं. त्यानंतर २७ वर्षांचे असतांना त्यांना नागपूर महापौर पदाचा मान मिळाला. महापौर असतांना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कर्तव्यदक्ष स्वभावाने सर्वांची मने जिंकली होती.

    त्यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय जीवनात कधीच मागे वडून बघितले नाही. 

    वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री

    २००२ साली देवेंद्र फडणवीस यांना ‘राष्ट्र मंडळ संसदीय संघ’ यांच्या माध्यमातून ‘सर्वश्रेष्ठ संसदीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. २००६ मध्ये अमृता रानडे यांच्याशी फडणवीसांचा विवाह झाला.

    नागपूर मधून चारवेळा विधानसभा निवडणूक जिंकून आमदार पद भूषवल्याने देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम आणि प्रभावी नेते म्हणून भारतीय जनता पक्षात ओळखल्या जाऊ लागले. आणि वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी ते महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री झाले.

    शरद पवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सर्वात तरुण वयात मुख्यमंत्री होणारे नेते आहे. आता सद्ध्याच्या परिस्थितीमध्ये ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?

    मंडळी अस म्हणतात की

    “राजकारणामध्ये स्वतःच्या बापावर विश्वास करायचा नसतो मग परक्यांवर कसा करायचा?”

    गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण हे सर्वसाधारण माणसाच्या डोक्यापलीकडच होत. अडीच वर्षांपासून चालू असलेलं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच महाविकास आघाडी सरकार अवघ्या काही क्षणातच कोलमडून पडलं.

    रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे

    विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत शिवसेनेतील जवळपास ४० आमदार घेऊन शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंविरोधात बंड केला.

    शेवटपर्यंत सर्वांना वाटत होतं की, देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मात्र अचानक पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं.

    सगळं सुरळीत असतांना मग अचानक फडणवीस साहेब मुख्यमंत्री का झाले नाही? या मागे मोदी शहांनी फडणवीसांविरोधात आखलेल षड्यंत्र तर नसावं?

    असदुद्दीन ओवेसी म्हणाले उदयपूर हत्याकांड…

    मोदी-शहांतर्फे फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम

    मंडळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्याच पक्षातील उत्तम नेतृत्व असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रम कसा काय केला? हा सर्वात मोठा प्रश्न आपल्याला पडला असेल.

    तर मंडळी नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी या भारतीय जनता पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये आधीच २०२४च्या प्रधानमंत्री पदाची स्पर्धा लागलेली आहे.

    एकीकडे प्रधानमंत्री पदाच्या दावेदारीमध्ये योगी आदित्यनाथ यांची अचानक आणि अनपेक्षित झालेली एंट्री ही मोदी आणि शहांच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे. उत्तर प्रदेशच सरकार हातामधून जाऊ नये म्हणून योगींना मुख्यमंत्री करावं लागलं होतं.

    मात्र योगींची राजकीय नेतृत्वाची छाप प्रधानमंत्री पदाची दावेदारी ठोकून गेली. दुसरीकडे नितीन गडकरी हे सुद्धा प्रधानमंत्री पदाच्या दावेदारीमध्ये अग्रेसर होते. मात्र त्यांनासुद्धा हळूहळू मोदी-शहांनी स्पर्ध्येमधून बाद केलं आहे.

    अशामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते तर त्यांचं राजकीय वजन केंद्रात नक्कीच वाढलं असत. आणि प्रधानमंत्री पदाच्या चालू असलेल्या स्पर्ध्येत मोदी, शहा आणि योगीनंतर फडणवीसांच नाव येऊ नये म्हणून यावेळेला फडणवीसांना मुख्यमंत्री न होऊ देण्यात मोदी आणि शहांचा सिंहाचा वाटा होता अस म्हणणं वावग ठरणार नाही.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे

    मंडळी राजकीय क्षेत्रात काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडून प्रेरणा घेऊन नेतृत्व करण्यासाठी सक्षम होत असतात आणि आपल्या आदर्श नेत्यांचा वैचारिक वारसा निस्वार्थपणे पुढे नेत असतात.

    महाराष्ट्रातील राजकारणात असंच एक गाजलेलं नाव म्हणजे शिवसेना पक्षाचे आणि बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघें यांचे कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे. त्यांचं पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे. ते मूळ साताऱ्याचे.

    बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून

    सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे त्यांचं मूळ गाव. शिक्षण पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे हे ठाण्यात आले. परंतू घरची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आपले शिक्षण सोडावे लागले.

    ठाण्यात आल्यानंतर त्यांनी सुरवातीला एका मच्छी कम्पनीत सुपरवायझर म्हणून काम केलं. मात्र आपल्या नोकरीतूनसुद्धा ते आपल्या कुटुंबाला पुरेसे पैसे देऊ शकते नव्हते. म्हणून पुढे त्यांनी स्वतःचा रिक्षा घेऊन रिक्षा चालकाचा व्यवसाय सुरू केला.

    काही काळानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघें यांच्या प्रभावाने शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ते ठाण्यातील किसन नगरचे शाखा प्रमुख बनले.आनंद दिघेंना साथ देत त्यांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला.

    असदुद्दीन ओवेसी म्हणाले उदयपूर हत्याकांड…

    वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांनी शिवसेनेच्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. तुरुंगवासदेखील भोगला. कर्नाटक सीमेवरील बेळगाव येथील शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनात कानडी पोलिसांचा लाठीमारही त्यांनी झेलला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठीसुद्धा त्यांनी कारावास सहन केला. 

    एकनाथ शिंदे यांच्यामधले नेतृत्वकौशल्य बघून आनंद दिघे यांनी १९९७ सालच्या ठाणे येथील महानगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये त्यांना उमेदवारी दिले आणि ते नगरसेवक झाले. २००४ पासून ते ४ वेळा शिवसेनेकडून आमदार आहेत.

    आणि आता शिवसेनेचे ४० आमदार सोबत घेऊन त्यांनी स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन करून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • असदुद्दीन ओवेसी म्हणाले उदयपूर हत्याकांड…

    मंडळी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात अनेक ठिकाणांवरून नुपूर शर्मा यांचा विरोध करण्यात आला होता.

    मात्र राजस्थानमधील एका शिवणकाम करणाऱ्या तरुणाने नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्या तरुणाची काही माथेफीरुंकडून राजस्थान येथील उदयपूरमध्ये मंगळवार दिनांक २८ जून रोजी निर्घृण हत्या करण्यात आली.

    बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून

    या हत्येनंतर राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी आंदोलकांकडून निदर्शने केली जात असून संपूर्ण राज्यात अस्थीरतेच वातावरण पसरलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ही घटना अत्यंत निंदनीय असून सर्वांना शांतता राखण्याच आव्हान केले आहे.

    त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की,

    ” उदयपूरमध्ये जी निर्घृण हत्या झाली त्यामुळे मला धक्का बसला आहे. धर्माच्या नावावर सुरू असलेली क्रूरता खपवून घेतली जाणार नाही. दहशत पसरविणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे. आपल्या सर्वांना सोबत येऊन द्वेषाचा पराभव करायचा आहे. सर्वांनी शांतता आणि बंधुभाव राखावा असे माझे आव्हान आहे.”

    अस राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. उदयपूर येथील घटनेचा निषेध करत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की,

    ” उदयपूरमध्ये झालेल्या घटनेबद्दल मा. प्रधानमंत्री यांनी सर्वांना शांततेच आव्हान करावं आणि संबोधित करावं.”

    अशी विनंती गहलोत यांनी मोदी यांना केली आहे. 

    राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? ती कशी लागू होते?

    काय म्हणाले ओवेसी? 

    एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीसुद्धा या घटनेला विरोध करत म्हटलं की,

    ” अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या विकृतींचा आम्ही नेहमी विरोध करत आलो आहोत आणि करत राहणार. या लोकांचा इस्लाम धर्माशी काही एक संबंध नाही. आम्ही या घटनेचा निषेध करतो.”

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • त्याला चुना कसा लावतात हेसुद्धा माहीत नाही, वेळ आल्यावर मी त्याला चुना लावणार

    मंडळी गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गुवाहाटीला नेऊन उध्दव ठाकरेंविरोधात बंड केला होता. ज्यामध्ये शिवसेनेचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटीलसुद्धा सामील आहे.

    रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

    गुलाबराव पाटलांसारख्या निष्ठावान शिवसैनिकाने पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांच्यावर बोचरी टीका करत

    ” गुलाबराव पाटील यांना पान टपरीवरून मंत्री केलं”

    अस विधान केल होत. मात्र गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये आमदारांच्या चर्चेदरम्यान गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना चांगलच धारेवर धरलं आहे. संजय राऊत यांना सुनावत गुलाबराव पाटील म्हणाले की,

    ” जेवढा संघर्ष आम्ही शिवसेनेसाठी केला आहे, तेवढा संजय राऊत यांनी केला आहे का? १९९२ साली झालेल्या शिवसेनेच्या एका आंदोलनात मी आणि माझे ३ भाऊ माझ्या वडिलांसोबत कितीतरी दिवस कारागृहात होतो हे तरी त्यांना माहिती आहे काय? ४७ डिग्री तापमान असतांना जळगावमध्ये मेळावा घेऊन ज्याप्रमाणे आम्ही ३५ जोडप्यांचे विवाह केले तशी हिम्मत संजय राऊत करतील का? आंदोलन करत असताना किती तरी किलोमीटरचा पायदळ प्रवास मी केला आहे तेव्हा संजय राऊत कुठे होते? अर्ध्या रात्री कार्यकर्त्यांचे फोन येतात म्हणून जसे आम्ही तयार असतो तसे राऊत राहतात का? शिवसेना घडवण्यात ऐंशी टक्के वाटा जरी बाळासाहेब ठाकरेंचा असला तरी २० टक्के वाटा हा आमचा आहे. आमच्याविरोधात आमची प्रेतयात्रा काढून निदर्शने केली जात आहे. मात्र जनता आमच्या पाठीशी आहे.”

    अस म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना चांगलच सुनावलं आहे. 

    शिवसेना संपणार ??

    त्याला मी चुना लावणार- गुलाबराव पाटील

    गुवाहाटीतील हॉटेलमध्ये स्थित बंडखोर आमदारांशी चर्चा करत असताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका करताना म्हटलं की,

    ” संजय राऊत यांना पानाला चुना तरी लावता येतो का? मात्र काही वेळ आल्यानंतर संजय राऊत यांना मी चुना लावल्याशिवाय राहणार नाही”

    असा टोला गुलाबराव पाटीलांनी राऊतांवर लगावला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • शिवसेना संपणार ??

    असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सची (ADR) यांच्या नुसार…

    कांग्रेस मधे सुद्धा बंड झाले पाच वर्षे मध्ये आजपर्यंत 170 आमदारांनी पक्ष सोडला कारण कदाचित कांग्रेस चा उतरता काळच असावा. किंवा न बदलणारी राजकीय रणनीती .

    भारतीय जनता पक्ष मध्ये सुद्धा बंड झालेच आजपर्यंत 18 आमदारांनी पक्ष सोडला.

    बंड म्हणावे तर योगी सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा देणारे स्वामी प्रसाद मौर्य यांचे उदाहरण आहेच.

    बसपा आणि टिडीपी मध्ये सुध्दा बंड झालेत.

    ज्या मुलायमसिंह यादव समाजवादी पक्ष उभा केला त्यांच्या घरातच बंड झाला आणि खुद्द अपर्णा यादव भारतीय जनता पक्ष मध्ये गेल्या..

    ही बंडाचे राजकारण काही नवीन नाही आणि महाराष्ट्र मध्ये त्यातल्या त्यात शिवसेना साठी नाहीच नाही छगन भुजबळ सारखं जिवंत उदाहरण शिवसेना पुढे आहे..

    परंतु मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात झालेल्या बंडाने पक्षाला नव्याने गरुडझेप घेण्याची ताकद सुद्धा उभी केली हा आजपर्यंत चा शिवसेना चा इतिहास आहे.

    पण आताच्या क्षणाला जेव्हा पुन्हा राजकीय हालचाल होऊन बंड चे राजकारण तापते आणि शिवसेना मधून एक गट खुद्द वेगळा होतो तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री जेव्हा मी पद सोडावयास तयार आहे. मी पक्षप्रमुख म्हणून राजीनामा देतो असे उद्गार काडतात तेव्हा कुठे भुतकाळात जाऊन बघावं लागतं…

    लहानपणापासून शिवसेना म्हटली की डोळ्यापुढे फक्त वाघ यायचा ज्यात मानवी चेहर्याचा उगम होता.. हाता रुद्राक्ष घातलेला , ज्या पक्षाच्या एका आवाजाने पाकिस्तान ला सिमेपार क्रिकेट टीम रोखायला भाग पाडले अश्या शिवसेना ची ही सद्य वाताहत बघणं अशक्यच..

    पण शिवसेना मध्ये आता झालेल्या बंड ला संपवण्यासाठी तत्परता दाखवण्या एवजी  जणू तो बंड आणखी बंडखोर व्हावा अशीच वाक्य संजय राऊत नी आता पर्यंत दिली..

    जी लोक बंड करून बाहेर पडली त्यांना समजून घेण्यापेक्षा त्यांना कामाख्या देवी ला बळी अर्पण करण्याची भाषा सुरू झाली. 

    जेव्हा प्रतिशिवसेनेने दिली होती बाळासाहेब ठाकरे यांना धमकी…

    बंड शांत करणे हे  आपल्या सहकारी पक्ष कांग्रेस कडून तरी राऊतांना कळायला हवं !! सचिन पायलट चा बंड शांत करण्यापासून ते हार्दिक पटेल च्या बंड ला जेवढे कमी महत्त्व मिळेल तेवढे मिळवण्यासाठी शांत राहणं .

    आणि मग बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी सरळ मुळ मुद्दा पकडला #हिंदुत्व !!

    पण पुन्हा या मुद्द्यावर एकत्र येण्या एवजी संजय राऊत यांचा वेगळाच विषय सुरू झाला…😐

    शिवसेना जेव्हा तयार झाली तेव्हा तीची मुळ विचारधारा ही हिंदुत्व नव्हती तर मराठी माणूस होती… नंतर बदलत्या राजकारणाने शिवसेना ची ओळख हीच हिंदुत्व केली.

    पण भाजप सोबत युती तुटताच. ( भाजप सोबत सुद्धा युती काही हिंदुत्व साठी तुटलेली नाही आणि भाजप ने सुद्धा काही हिंदुत्व म्हणून खूप मोठे मन नव्हते केले… दोन्ही कडे खुर्ची हाच विषय होता..) शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली महाविकास आघाडी जीच्या मुळ बेस चा आणि शिवसेना च्या मुळ विचारधारा चा उत्तर दक्षिण होता आणि त्या नंतर कंगणा रणावत पासून ते आज शिंदे पर्यंत एक एक करत शिवसेना कशी अहिंदू आहे हे दाखवण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केला.

    कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता

    त्या पैकी किती मुद्दे धड होते आणि किती चिंध्या हेही महाराष्ट्र ने बघितलच..

    कोविड च्या वेळी दोन वर्षे राज्य सरकार मध्ये आणि केंद्र सरकार मध्ये जे सुरू होते तेव्हा पण सर्व बघतच होते…

    त्या नंतर सुरवात पासून सुरू असलेल्या हिंदुत्व या मुद्द्यावर आघाडी सरकारने पांघरूण टाकले हे खरेच आहे आता याचे कारण शरद पवार आहे की आघाडी मध्ये असलेले कांग्रेस हे आघाडी लाच माहिती..

    पण या सर्व मध्ये एक हवा आणखी उडते आहे ती म्हणजे शिवसेना संपणार का ?

    तर शिवसेना कधीच संपणार नाही गड्या !!

    भारतातील केडर संघटना, ज्याचं नाव दंगल रोखण्यासाठी एक वेळ पुरेसे होते ती संपणे अशक्य आहे  , विचारधारा कुठल्या पक्षाने आजवर बदलली नाही ?? काळानुसार अनेक पक्ष बदलत गेले बदलत आहे म्हणून ती संपली नाही ,, मग शिवसेना तर राजकारणाचा एक असा पक्ष आहे जो विचार म्हणून हिंदुस्थानात अधिक माहिती आहे…. मग ती संपणार कशी? आणि ती संपायला सुद्धा नको फक्त 

    पुन्हा त्याच तडाख्याने आता शिवसेनेच्या हिंदुत्व भगव्या वाघाने पुन्हा आपल्या ओळखीसह  ताकदीने झेप घ्यावी एवढीच मापक अपेक्षा..

    बाकी 

    मेरा हर गुन्हा मेरा विचार बनके लाखो लोगोके खुन मे दौडेगा जिसके हर  कतरे मे जिंदा रहेगा बाल केशव ठाकरे…🚩

    अक्षय चंदेल

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जेव्हा प्रतिशिवसेनेने दिली होती बाळासाहेब ठाकरे यांना धमकी…

    मंडळी शिवसेनेमध्ये सद्ध्याच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड हे शिवसेनेसाठी नवीन नाही. याआधी शिवसेनेतील अनेक नेत्यांनी बंड करून शिवसेनेला रामराम ठोकला आहे.

    यामध्ये सर्वात आधी १९९१ ला छगन भुजबळ यांनी शिवसेनेमध्ये बंड केला आणि शिवसेना सोडली. त्यांनतर नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी अनुक्रमे शिवसेना सोडली.

    रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

    मात्र जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेनेचा पदभार होता तेव्हा बंडू शिंगरे नावाच्या एका शिवसैनिकाने बंड करून शिवसेना सोडली आणि ‘प्रतिशीवसेना’ काढून थेट बाळासाहेब ठाकरे यांना आव्हान दिल होत.

    बंडू शिंगरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना

    “हिम्मत असेल तर लालबागमध्ये सभा घेऊन दाखवा”

    अस आव्हान केलं होतं. तेव्हा बाळासाहेब प्रचंड संतापले आणि लाल बागमध्ये सभा घेण्याच बंडू शिंगरेंच आव्हान स्वीकारलं होत. त्यांनी पुढील अवघ्या काही दिवसांमध्येच लालबागमध्ये सभा घेण्याच प्रयोजन केलं आणि शिंगरेंच आव्हान स्वीकारल व सभा घेतली.

    बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून

    अस  म्हणतात की तेव्हा प्रतिशीवसेना काढणाऱ्या बंडू शिंगरे यांची बाळासाहेब ठाकरे यांनी लालबागमध्ये सभा घेऊन चांगलीच नाचक्की केली होती.

    लालबागमध्ये आव्हान स्वीकारून सभा घेतल्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिम्मतीचा परिचय तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आणि त्यांच्या विरोधकांना चांगल्या रीतीने झाला होता. म्हणून बाळासाहेब ठाकरे हे रसायन भल्याभल्यांना समजलं नाही असं आताही या देशातील राजकीय समीक्षक म्हणतात.

    मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे आव्हानं स्विकारता येतील का? हा प्रश्न संपूर्ण जनतेला पडलेला आहे. मात्र उध्दव ठाकरेंच्या राजकीय नेतृत्वक्षमतेवरून लक्षात येत की, ते शिवसेना पुढे चालवायला सक्षम आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir