Author: admin

  • राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? ती कशी लागू होते?

    मंडळी आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये अनेकदा राष्ट्पती राजवट लागली आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम ३५६ नुसार राष्ट्रपती राजवट ही लागू होत असते. राज्यघटनेमध्ये याला ‘घटनात्मक यंत्रणा कोलमडन’ अस नमूद केलं आहे.

    यालाच ‘राज्य आणीबाणी’ अससुद्धा म्हणतात. एखाद्या राज्यामधल सरकार अस्थिर झालं असेल. तर त्याविषयीचा अहवाल तयार करून त्या राज्याच्या राज्यपालांना राष्ट्रपतींकडे सुपूर्द करावा लागतो.

    उदय सामंत गेले की पाठवले

    संबंधित अहवालानुसार त्या राज्यातील सरकार खरच अस्थिर झालं आहे का? याविषयीची संपूर्ण खात्री झाल्यानंतरच त्या राज्याचा संपूर्ण कारभार राष्ट्रपती आपल्या हातामध्ये घेतात. आणि राज्यपालांच्या माध्यमातून त्या राज्याचा कारभार चालवल्या जातो.

    राष्ट्रपती राजवट एकदा लागू केली तर पुढील दोन महिन्यांपर्यंत राहते. या दोन महिन्यांमध्येसुद्धा त्या राज्यामध्ये सरकार स्थापन झालं नसेल आणि राष्ट्रपती राजवट पुढे ढकलायची असल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी घ्यावी लागते.

    कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता

    संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांपर्यंत पुढे चालवता येते. हीच प्रक्रिया दोनदा करता येते म्हणजेच एक वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट सबंधित राज्यामध्ये चालवता येते.

    याहीव्यतिरिक्त राष्ट्रपती राजवट पुढे लांबवायची असल्यास निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याकरिता योग्य वातावरण नसल्याचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द करावा लागतो. राष्ट्रपतींना संबंधित अहवालाची पुन्हा खात्री करून घ्यावी लागते.

    आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या मंजुरीने राष्ट्रपती राजवट ही चालू ठेवता येते. मात्र फक्त ३ वर्षापर्यंत याचा कालावधी असतो. त्यापेक्षा जास्त कुठल्याही राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ठेवता येत नाही. 

     राष्ट्रपती राजवट नेमकी कशासाठी ?

    मंडळी एखाद्या राज्यातील सरकार अस्थिर झालं असेल. तर सरकार स्थापन होईपर्यंत त्या राज्यातील जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्या जाते.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • उदय सामंत गेले की पाठवले

    मंडळी शिवसेनेमध्ये मोठं नाव असलेले आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात अचानक पुकारलेल्या बंडामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.

    एकनाथ शिंदेंसोबत जवळपास शिवसेनेचे ४० आमदार गुवाहाटीला गेलेले आहे. मात्र पाठोपाठ शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक व महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हेसुद्धा शिंदे गटात काल सामील झाले आहे.

    कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता

    उदय सामंत यांच्या शिंदे गटात सामील होण्याने जनतेचा राजकीय नेत्यांवरून विश्वास उडाल्याची भूमिका अनेक लोकांनी समाज माध्यमांवरून मांडली आहे. कारण एक ते दोन दिवसांपूर्वी शिवसेना भवनात पार पडलेल्या कार्यकारणी बैठकीला सामंत हजर होते आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते थेट गुवाहाटीचा रस्ता गाठून शिंदे गटात सामील झाले.

    यावर अनेक शिवसैनिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र उदय सामंत हे खरच स्वतावरून शिंदे गटात सामील झाले की उध्दव ठाकरेंच्या माध्यमातून पाठवल्या गेले. या संशयावरून उदभवलेल्या अनेक चर्चांना आता उधाण आलं आहे.

    असा लागू होतो पक्षांतर बंदी कायदा…

    नुकत्याच मुंबईमधील अनेक ठिकाणी पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यांमध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना नेत्यांवर बोचरी टीका केली.

    मात्र उदय सामंत यांच्यावर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून एकही टिकेच विधान निघाल नाही. यावरून सामंत यांना उध्दव ठाकरे यांनी शिंदेकडे स्वतावरून पाठवलं असण्याचा कल जनतेकडून वर्तवल्या जात आहे. 

    एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे किती आमदार हे स्वइच्छेने गेले आहे? किती आमदार हे दबावाखाली गेले आहे? आणि किती आमदार हे पाठवल्या गेले आहे? यावर सद्ध्या महाराष्ट्रातील जनतेला संशय आहे. येत्या काळामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होईल. यासाठी संपूर्ण लोकांची उत्कंठा वाढलेली आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून

    मंडळी आनंद दिघे हे नाव महाराष्ट्रातील राजकारणाशी निगडित असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला माहित नसेल अस होऊच शकत नाही. आंनद दिघेंना शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक आणि ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखल जात होतं.

    मात्र दिघेंसोबत मध्यंतरी घडलेली एक घटना अजूनही त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेलं कोडच आहे. आनंद दिघे यांना एका खुनाप्रकरणी अतिरेक्यांवर वापरल्या जाणाऱ्या ‘टाडा’ या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती.

    जेव्हा आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर घडलेल्या दंगलीत २ निर्दोष जीव गेले…

    या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठले होते. विधानसभेमध्येसुद्धा दिघेंच्या अटकेमुळे लोकप्रतिनिधींमध्ये असंतोषाच वातावरण पसरलं होत.

    तर मंडळी झालं असं की, १९८९ च्या मार्चमध्ये महानगरपालिका निवडणूका पार पडल्या होत्या. ज्यामध्ये शिवसेनेचे जवळपास ३० नगरसेवक निवडणून आले होते. काँग्रेसचेसुद्धा बरेच नगरसेवक निवडून आले होते. आता वेळ होती ती म्हणजे महापौर पदाच्या निवडणूकीची.

    दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?

    शिवसेनेने जनता दल पक्षाला सोबत घेऊन महापौर पदासाठी उमेदवार दिला होता. दुसरीकडे काँग्रेसने ‘स्थानिक आगरी सेना’ म्हणून त्यावेळेस एक संघटना होती. त्यांना सोबत घेऊन उमेदवार उभा केला होता. ही लढाई एकदम काट्याची होती.

    बाळासाहेब ठाकरे यांनी या निवडणुकीची जबाबदारी ठाण्याचे त्यावेळेसचे जिल्हाध्यक्ष आनंद दिघे यांच्यावर सोपवली होती. सोबतच माजी महापौर सतीश प्रधान यांच्यावर या महापौर पदाच्या निवडणूकीची जबाबदारी होती. १९८९ हा तो काळ होता जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा संपूर्ण महाराष्ट्रात दरारा होता.

    दुसरीकडे ठाण्यामध्ये आनंद दिघे यांचा. तरीसुद्धा सगळीकडे चर्चा होती की शिवसेनेचे काही मतं फुटणार आहेत. पण बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेब असतांना मतं फुटणार नाही यावर शिवसैनिकांचा प्रचंड विश्वास होता. मात्र झालं वेगळचं. शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार प्रकाश परांजपे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. 

    शिवसेनेच्या नगरसेवकाचा खून

    मंडळी शिवसेनेचा ठाण्यातील महापौर पदाच्या निवडणूकीमध्ये अवघ्या एका मताने झालेला पराभव हा बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि शिवसैनिकांच्या अत्यंत जिव्हारी लागला होता. शिवसेनेतील कुठलातरी नगरसेवक फुटला होता.

    आनंद दिघेंची दहशत झुगारून कोणीतरी क्रॉस मतदान केलं होतं. ही बाब बाळासाहेब ठाकरे यांना कळल्यानंतर ते प्रचंड संतापले. त्यांनी दिघे यांना बोलावलं.

    “आपली बाजू भक्कम असताना, आपले सर्व आकडे जुडत असतांना आपला पराभव कसा काय झाला?”

    या बाळासाहेबांच्या प्रश्नावर दिघे अनुत्तरीत होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना आनंद दिघे यांनी म्हटलं की,

    “साहेब गद्दारांना माफी नाही”.

    आनंद दिघे यांनी हे स्टेटमेंट समाज माध्यमांवरसुद्धा बोलून दाखवल होत. त्यामुळे त्यांचं हे विधान सगळीकडे चांगलच प्रचलित झालं. त्यानंतरच अवघ्या काही दिवसांमध्ये श्रीधर खोपकर नावाच्या एका शिवसेना नगरसेवकाची काही अज्ञात लोकांनी हत्या केली.

    आणि या खुनाचा आरोप आनंद दिघेंच्या स्टेटमेंटनुसार त्यांच्यावरच घेण्यात आला. ज्यामुळे त्यांना ‘टाडा’ या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. दिघेंच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठले होते. काही काळानंतर दिघेंना जामीन देण्यात आला होता. मात्र त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्यावर हा खटला चालूच होता. या घटनेपासून शिवसेनेमध्ये “गद्दारांना माफी नाही” हे स्टेटमेंट प्रचलित झालं होतं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता

    मंडळी काल रात्रीपर्यंत कार्यकर्ते ज्या नेत्याच्या नावाचे बॅनर आणि भोंगे लावत होते, अचानक सकाळी माहिती पडलं माननीय नेते महोदयांनी चक्क पक्षच बदलला आहे. तेव्हा त्या नेत्यासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता, वेळप्रसंगी आपल्या नेत्यासाठी गावगाड्यात वाद घालून पक्षाची भूमिका मांडणारा कार्यकर्ता आपल्या मित्र मंडळींना काय उत्तर देईल?

    किंवा ज्या नेत्यासाठी त्याने वाद घातले त्या नेत्यानेच पक्ष बदलल्यानंतर तो विरोधकांशी, समाजातील जनतेशी नजर तरी मिळवू शकेल का? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं अगोदर रात्रभऱ्यामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या राजकीय नेत्यांना विचारण्याची गरज आहे.

    जेव्हा आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर घडलेल्या दंगलीत २ निर्दोष जीव गेले…

    कार्यकर्त्यांची कौटुंबिक परिस्थिती नसतांनासुद्धा आपला नेता निवडून आल्यानंतर आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी काही तरी विकास करेल या उमेदीने नेत्यामागे आपली महत्वाची काम सोडून जात असतो. एखादा मोर्चा असला की संपूर्ण जबाबदारी कार्यकर्त्यांवर असते.

    मोर्चा, आंदोलने अशा चवळींमध्ये नेत्यांची मूल दिसत नाहीत. ते फक्त जेव्हा निवडणूका येईल तेव्हा उमेदवारी अर्ज भरायला आणि स्वतःचा प्रचार करायला दिसतात. मोर्चांमध्ये आपल्या नेत्यासाठी अंगावर केसेस घेणे, पोलिसांच्या लाठ्या खाणे अशा कित्येक संकटांना कार्यकर्ता तोंड देत असतो.

    दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?

    मात्र नेत्यांच्या मुलांवर कधीही केसेस लागत नाही. नेत्यांवर कधीही केसेस लागत नाही. कार्यकर्ता पक्षाचा झेंडा आणि दुपट्टा घेऊन गल्लोगल्ली प्रचारासाठी दिवसरात्र फिरतात. आपला नेता निवडून आला तर स्वतः निवडून आल्यासारख त्यांना वाटत. ते ही जाऊद्या जर कदाचित आपल्या नेत्याचा निवडणूकीमध्ये पराभव झाला तर सर्वात जास्त दुःख हे कार्यकर्त्याला होत. 

    साहेब नेत्यांनी पक्ष बदलल्यानंतर कार्यकर्त्यांच्या अंगात ऑफिस फोडायला लावणार भूत घुसत नाही, खरतर त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होतो की, आपण ज्याच्यासाठी एवढं सगळं केलं त्यानेच आपल्याशी विश्वास घात केला. कार्यकर्ता हा राजकिय नेत्यांसाठी खरा नेता असतो. म्हणून आपल्या स्वार्थापोटी पक्ष बदलून कार्यकर्त्यांची मनं दुखवू नका.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जेव्हा आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर घडलेल्या दंगलीत २ निर्दोष जीव गेले…

    मंडळी ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आणि प्रत्येक शिवसैनिकाच प्रेरणास्थान असणारे आनंद दिघे यांच्या मृत्यूवर अजूनही जनता संशयित आहे.

    आनंद दिघेंचा वाढता प्रभाव आणि चाहता वर्ग वाढत असताना अचानक त्यांचा वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी मृत्यू होणे ही बाब खरतर काही शिवसैनिकांना न पटण्यासारखी होती. आनंद दिघे यांचा मृत्यू २६ ऑगस्ट २००१ ला ठाण्यामधल्या सुनितादेवी सिंघाणिया रुग्णालयात झाला.

    दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?

    मात्र त्यांच्या मृत्यूनंतर जोरदार दंगल उसळली होती. हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. ठाण्यामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. कुणी म्हणत होत दिघेंची हत्या झाली तर कुणी म्हणत होत रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला.

    याच कारणावरून रागाच्या भरात दिघेंना ज्या रुग्णालयात ठेवल होत ते रुग्णालय शिवसैनिकांनी जाळून टाकलं. मात्र आनंद दिघेंच्या मृत्यूआधी घडलेल्या घटनेवरून त्यांचा मृत्यू होणं हे न समजण्यासारखं होत. रुग्णालयात दाखल होण्याआधी म्हणजेच २४ ऑगस्ट २००१ ला दिघेंचा एका कार अपघातात पाय फ्रॅक्चर झाला होता.

    आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात?

    ज्यामुळे त्यांना ठाण्यातील सुनीता देवी सिंघाणिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २६ ऑगस्ट २००१ ला त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि संध्याकाळच्या सुमारास दिघे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.

    त्यानंतर लगेच १० मिनिटांच्या अंतरात दुसरा झटका आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला अस त्यावेळी सांगण्यात आलं होतं. मात्र ठाण्यातील शिवसैनिकांचा दिघेंच्या अचानक झालेल्या मृत्यूवर विश्वास नव्हता.

    ज्यामुळे शिवसैनिकांना राग अनावर झाला आणि अवघ्या ३ तासात सिंघाणिया रुग्णालयाच रूपांतर एका खंडरमध्ये झालं. शिवसैनिकांनी २०० खाटांच संपूर्ण हॉस्पिटल जाळून टाकलं. हॉस्पिटलमधील नर्स आणि डॉक्टरांना आधी बाहेर काढण्यात आलं होतं. 

    दोन निर्दोष जीवांचा मृत्यू 

    आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर जाळण्यात आलेल्या हॉस्पिटलमधल्या नर्स आणि डॉक्टरांना जरी अगोदर बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र एका मासिकानुसार हॉस्पिटल जाळल्याने त्या ठिकाणची सगळी इलेक्ट्रिसिटी बंद पडली होती.

    ज्यामुळे सर्व व्हेंटिलेटर बंद पडले आणि व्हेंटिलेटरवर असणाऱ्या एका ६ महिन्याच्या व ६६ वर्ष वय असलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला होता.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?

    मंडळी आनंद दिघे हे नाव बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक म्हणून संपूर्ण जनतेला आजही ज्ञात आहे. मात्र आनंद दिघेंना जनता जेव्हापासून ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणायला लागली तेव्हापासून शिवसेनेत आंतरीक वाद उदयास आले होते.

    तर मंडळी झालं असं की, आनंद दिघे यांचा ठाणे येथे मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग होता. त्यामुळे त्यांना ठाणे येथील शिवसेना जिल्ह्याध्यक्षपद देण्यात आलं. ठाण्यातील जनतेसाठी दिघे अहोरात्र झटत होते.

    आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात?

    जनतेसाठी स्वतःला त्यांनी एवढं झोकून दिल होत की, त्यांनी विवाहसुदधा केला नाही. ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘आनंदआश्रमाची’ स्थापना केली होती. ज्यामध्ये जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचे ते काम करत होते.

    प्रत्येक काम ते ताबडतोब करायचे. ठाण्यातील अनेक लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. पाहता पाहता आनंद दिघे यांचा चाहता वर्ग एवढा वाढत गेला की त्यांची तुलना हे बाळासाहेब ठाकरेंशी होऊ लागली होती.

    रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

    या तुलनेमुळे तेव्हा शिवसेनेमध्ये अस्वस्थता होती अस तेव्हा म्हटल्या जात होतं. याबद्दल जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई असे म्हणतात की,

    ” दिवसेंदिवस आनंद दिघे यांचं प्रस्थ वाढत चाललं होतं. त्यांना वलय, प्रसिद्धी लाभत होती. त्यातून नाकापेक्षा मोती जड होतो की काय, अशी भावना मातोश्रीवर असल्याचं त्यावेळी ऐकण्यात येत होतं. कारण दिघेंमुळे शिवसेनेत एक स्वतंत्र संप्रदाय सुरू झाला होता. पण शिवसेनेत अस चालत नाही. हे राजा आणि बाकी प्रजा, अस धोरण आहे शिवसेनेत. यामुळे बाळासाहेब अस्वस्थ झाले होते. अशी चर्चा त्यावेळी ठाण्यात होती.”

    दिघेंविषयी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी असही म्हटल्याची चर्चा होती की ,

    ” आनंद दिघे यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका नाही. पण ज्याप्रमाणे ते काम करतात त्याविषयी प्रश्न आहे.”

    यावर आनंद दिघे यांनी म्हटलं होत की,

    ” बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीशिवाय मी कुठलंही काम करत नाही.” 

    दिघेंच्या अंतीमयात्रेत बाळासाहेब ठाकरेंची गैरहजेरी

    मंडळी दिघे यांचा ठाण्यातील सिंघाणिया रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने झालेला अचानक मृत्यू हा शिवसैनिकांच्या मनात संशय निर्माण करणारा होता. ज्यावरून हजारो शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी दिघेंच्या मृत्यूनंतर संपूर्ण रुग्णालय जाळून टाकलं होतं.

    याच कारणामुळे पोलीस प्रशासनाने बाळासाहेब ठाकरे यांना दिघेंच्या अंतिमयात्रेत सामील झाल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी ताकीद दिली होती. ज्यामुळे बाळासाहेब ठाकरे आंनद दिघेंच्या अंतिमयात्रेत गैरहजर होते.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • असा लागू होतो पक्षांतर बंदी कायदा…

    मंडळी भारतीय देशाच्या लोकशाहीमध्ये जनतेचा विश्वास मिळवून राजकीय नेते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत असतात. मात्र आर्थिक वा अन्य आमिशांपायी काही राजकीय नेते जनतेच्या भावनेचा विचार न करता सतत पक्षांतर करत असतात.

    पण मनात आलं म्हणून किंवा इतर कारणास्तव कुठल्याही नेत्याला सहजासहजी पक्षांतर करता येत नाही. किंवा त्यांनी पक्षांतर केल्यास कायदा सांगतो की,

    ” भारतीय राज्यघटनेनुसार लोकशाहीमध्ये विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कुठल्याही पक्षाच सदस्यत्व बंधनकारक नाही. पण एका पक्षाच्या तिकिटावर निवडून आलो आणि दुसऱ्या पक्षात स्थलांतर केलं हे कायद्याबाहेर गणल्या जात.”

    १९८५ साली जेव्हा राजीव गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच सरकार होत, तेव्हा त्यांनी हा पक्षांतर बंदी कायदा लागू करून घेतला होता. याची गरज एका प्रकरणावरून पडली.

    रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

    तर झालं असं की, १९६७ मध्ये हरियाणामधील गया लाल नावाच्या एका आमदाराने एका दिवसामध्ये चक्क तीनदा पक्ष बदलला. त्यानंतर १९७९ साली प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली असलेलं जनता पक्षाच सरकार हे ७६ खासदारांच्या बंडामुळे कोसळलं होत.

    म्हणजेच कुणाशी वाद-तंटा किंवा स्वतःच्या स्वार्थापोटी पक्षांतर राजकीय नेते करत होते. यावरूनच मग पक्षांतर बंदी कायद्याची मागणी करण्यात आली व तो कायदा लागू करण्यात आला. 

    जेव्हा बाळासाहेबांना पवारांनी मातोश्री सोडायला सांगितल…

    नेमकं काय सांगतो पक्षांतर बंदी कायदा? 

    एखाद्या लोकप्रतिनिधीने पक्षांतर केल्याच्या कारणावरून सभागृहातील इतर सदस्यांनी याचिका केली तर संबंधित लोकप्रतिनिधीच सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकार विधानसभा किंवा लोकसभेच्या अध्यक्षांना देण्यात आले आहेत.

    एखाद्या लोकप्रतिनिधीच सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश विधानसभा किंवा लोकसभेच्या अध्यक्षांनी दिला, तर हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाद मागता येते ज्यामुळे तो आदेश रद्द होऊ शकतो. मात्र हा कायदा पुढील परिस्थितीमध्ये लागू होऊ शकतो.

    ” एखाद्या आमदारान किंवा खासदारान स्वतावरून आपल्या पक्षाचा राजीनामा दिला, दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, निडवून आलेल्या आमदारान किंवा खासदारान पक्षाच्या वैचारिक धोरण मानलं नाही, पक्षाच्या विरोधात मतदान केलं किंवा पक्षाविरोधात भूमिका घेतली.”

    या सर्व कारणावरून लोकप्रतिनिधीच सदस्यत्व रद्द होऊ शकत. मात्र एखाद्या पक्षाचे दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांना एक नवा स्वतंत्र गट म्हणून मान्यता प्राप्त होते आणि त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात?

    मंडळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक नेते झाले ज्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कारकिर्दीच्या बळावर स्वतःच नाव इतिहासामध्ये अजरामर केलं. मात्र एक असा नेता ज्याने लोकांच्या मनात आणि त्यांच्या काळजामध्ये आजन्म घर केलं.

    म्हणूनच कदाचित त्या व्यक्तीला स्वतःच्या घरात रहायची गरज पडली नसावी. होय मंडळी. आपण बोलत आहोत बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले ठाण्याचे बाळ ठाकरे म्हणून ओळखले जाणारे धर्मवीर आनंद दिघें यांच्याबद्दल.

    रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

    अस म्हणतात की, ९० च्या दशकामध्ये आनंद दिघे हे नाव ठाण्यातील प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसल होत. जन्माला येणार प्रत्येक मुल आनंद दिघेंसारख व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असायची.

    एक शिवसैनिक म्हणून काम करताना आंनद दिघे यांचा जनसामान्यांमध्ये प्रभाव एवढा वाढला होता की, त्यांना ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हटल्या जाऊ लागलं होतं. ज्यामुळे बाळासाहेब ठाकरे अस्वस्थ झाल्याच्या चर्चाही तेव्हा गदारोळ करायला लागल्या होत्या.

    आनंद दिघे च्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेब ठाकरे झाले होते अस्वस्थ…

    ठाण्यातील जनतेसाठी दिघे अहोरात्र झटत होते. जनतेसाठी स्वतःला त्यांनी एवढं झोकून दिल होत की, त्यांनी विवाहसुदधा केला नाही. ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘आनंदआश्रमाची’ स्थापना केली होती. ज्यामध्ये जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचे ते काम करत होते. प्रत्येक काम ते ताबडतोब करायचे. ठाण्यातील अनेक लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला.

    शाखा आणि आश्रमच माझे घर- आनंद दिघे

    प्रसार माध्यमांच्या एका मुलाखतीमध्ये बोलत असतांना आंनद दिघे यांचे शिष्य आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की,

    ” दिघे साहेब कधीही स्वतःच्या घरामध्ये राहले नाही. ते नेहमी भाड्याच्या घरात राहत होते. शाखा आणि आनंद आश्रमच माझं घर आहे.”

    अस शिंदे यांनी सांगितलं होतं. यावरून समजून येत की, आनंद दिघे म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

    मंडळी राजकीय क्षेत्रात काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडून प्रेरणा घेऊन नेतृत्व करण्यासाठी सक्षम होत असतात आणि आपल्या आदर्श नेत्यांचा वैचारिक वारसा निस्वार्थपणे पुढे नेत असतात.

    महाराष्ट्रातील राजकारणात असंच एक गाजलेलं नाव म्हणजे शिवसेना पक्षाचे आणि बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघें यांचे कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे. त्यांचं पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे.

    आणि शरद पवार वयाच्या २६ व्या वर्षी आमदार झाले

    ते मूळ साताऱ्याचे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे त्यांचं मूळ गाव. शिक्षण पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे हे ठाण्यात आले. परंतू घरची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आपले शिक्षण सोडावे लागले.

    ठाण्यात आल्यानंतर त्यांनी सुरवातीला एका मच्छी कम्पनीत सुपरवायझर म्हणून काम केलं. मात्र आपल्या नोकरीतूनसुद्धा ते आपल्या कुटुंबाला पुरेसे पैसे देऊ शकते नव्हते. म्हणून पुढे त्यांनी स्वतःचा रिक्षा घेऊन रिक्षा चालकाचा व्यवसाय सुरू केला.

    आणि त्या घटनेनंतर दादा कोंडके शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक झाले…

    काही काळानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघें यांच्या प्रभावाने शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ते ठाण्यातील किसन नगरचे शाखा प्रमुख बनले.आनंद दिघेंना साथ देत त्यांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला.

    वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांनी शिवसेनेच्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. तुरुंगवासदेखील भोगला. कर्नाटक सीमेवरील बेळगाव येथील शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनात कानडी पोलिसांचा लाठीमारही त्यांनी झेलला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठीसुद्धा त्यांनी कारावास सहन केला. 

    एकनाथ शिंदे यांच्यामधले नेतृत्वकौशल्य बघून आनंद दिघे यांनी १९९७ सालच्या ठाणे येथील महानगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये त्यांना उमेदवारी दिले आणि ते नगरसेवक झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजकीय क्षेत्रात कधीही मागे वळून पाहिलं नाही. नंतर आमदार ते महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आणि शरद पवार वयाच्या २६ व्या वर्षी आमदार झाले

    मंडळी राजकीय क्षेत्रातील काही राजकीय नेत्यांचा जीवनपट जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा त्यांचा संघर्ष आणि जिद्द पाहून अक्षरशः अचंबित होत. राजकीय क्षेत्रात सध्याच्या स्थितीमध्ये स्वतःच्या नेतृत्वाने अनेक राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणार व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार.

    राजकीय क्षेत्रात कुणीही गॉडफादर नसतांना स्वतःच्या कार्यकर्तुत्वार शरद पवार हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आमदार झाले होते. वर्ष होत १९६६-६७ दरम्यानच. पवार हे २६ वर्षाचे होते.

    जेव्हा बाळासाहेबांना पवारांनी मातोश्री सोडायला सांगितल…

    त्यावेळी त्यांच्यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार होता. शरद पवार यांची इच्छा जरी निवडणूक लढवण्याची असली तरी त्यावेळच्या जेष्ठ अनुभवी नेत्यांच्या तुलनेत ते लहानच होते.

    एवढ्या लहान वयात त्यांना विधानसभेच तिकीट मिळेल अशी अपेक्षाही कुणी केली नव्हती. एक दिवस तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी पवारांना प्रश्न विचारला की,

    ” शरद तू बारामतीच्या तिकीटवरून निवडणूक का लढवत नाही?”

    त्यावेळी शरद पवार विनायकराव पाटील यांच्या प्रश्नाला जरी नकार देऊ शकले नाही, तरी पक्षातील जेष्ठ नेत्यांनी पवार यांचा कडाडून विरोध केला.

    “शरद पवार फक्त २६ वर्षांचे आहेत. त्यांना तिकीट देणे म्हणजे जागा हारणे होय. त्या जागेसाठी पक्षाकडे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे अनुभवी नेत्यांना आधी प्राधान्य द्यायला हवे. शरद पवार यांना तिकीट देणे म्हणजे लढण्याआधी जागा हारणे. असा त्याचा अर्थ होईल.”

    अस त्यावेळच्या नेत्यांच म्हणणं होतं. पवार यांच्या उमेदवारीच पत्र जवळ जवळ फेटाळण्याची तयारी झाली होती. पण यशवंतराव चव्हाण यांनी उपस्थित नेत्यांना एक प्रश्न विचारला.

    या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद

    “आम्ही महाराष्ट्रातून किती जागा मिळवण्याची अपेक्षा करतो?”

    प्रत्येक जणांनी उत्तर दिलं. १९० ते २००. त्यावर यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या उत्तराने संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. चव्हाण म्हणाले की,

    “आपल्याकडे विधानसभेच्या २७० जागा आहेत, तुम्ही उत्तर दिल्याप्रमाणे आपण १९० ते २०० जागा जिंकू. म्हणजे ७० ते ८० जागांवर आपला पराभव होईल. यामध्ये जर शरद पवार यांचा पराभव झाला तर अजून एक जागा आपल्याकडून गेली अस आपण समजू.”

    अस उत्तर चव्हाण यांनी उपस्थित नेत्यांना दिल आणि शरद पवार यांना तिकीट देण्यात आलं. 

    वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी शरद पवार यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक भरघोस मतांनी जिंकली आणि ते आमदार झाले.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir