Author: admin

  • किरीट सोमय्या यांना १७२ कम्पन्यांनी पैसे दिले – संजय राऊत

    मंडळी एकीकडे महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सगळीकडे चर्चा चालू आहे, तर दुसरीकडे राणा दाम्पत्य आणि शिवसेनेमध्ये जोरदार राजकीय लढाई सुरू आहे. असाच काही वाद आता नेहमीप्रमाणे भाजपा नेते आणि संजय राऊत यांच्यामध्ये पुन्हा पेटलेला आहे.

    किरीट सोमय्या यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती आणि त्यांनतर त्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्याच कामसुद्धा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते. प्रतिउत्तरात भारतीय जनता पक्षानेसुद्धा संजय राऊत यांच्यावर ईडीची चौकशी केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून आणली होती.

    माझ्यावरील हल्ल्यामध्ये पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुंडांना साथ – किरीट सोमय्या

    ही भाजप नेते किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात चालू असलेली राजकीय लढाई संपण्याच नाव घेत नाही आहे. संजय राऊत यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलत असताना किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका करत म्हटलं की,

    ” किरीट सोमय्या हे खंडणीखोर आहे. त्यांनी युवक प्रतिष्ठानच्या नावावर कोट्यावधी रुपये जवळपास १७२ कंपन्यांकडुन घेतले आहेत आणि या प्रतिष्ठानमध्ये बाहेरचे लोक कुणीच नसून त्यांच्या कुटुंबातील लोक सामील आहे.”

    अस संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले. 

    माझ्या मालमत्ता जप्तीची बातमी मी टीव्हीवर बघितली- संजय राऊत

    किरीट सोमय्यांची सगळी प्रकरण बाहेर काढू – संजय राऊत

    भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका करताना संजय राऊत पुढे म्हणाले की,

    ” ते महाशय पोलीस स्टेशनमध्ये आमची तक्रार करायला गेले होते. मात्र आम्ही त्यांची सगळी प्रकरण बाहेर काढू.”

    अस संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • भाजप खासदाराच राज ठाकरेंविरोधात अयोध्येत रॅली काढून शक्ती प्रदर्शन

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येला जाण्यासाठी निघणार असून आतापासूनच त्यांच्या आगमनाची उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत अजाण आणि हनुमान चाळीसाचा मुद्दा उचलून धरला आहे.

    ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर राज ठाकरेंच्याच नावाची चर्चा सुरू आहे. नेहमी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपली भूमिका मांडणारे राज ठाकरे अचानक भाजपची बाजू घ्यायला लागल्याने भाजप आणि मनसे अशी युती भविष्यात होणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.

    राज ठाकरेंना उत्तर भारतीयांची माफी मागीतल्याशीवाय अयोध्येत पाय टाकू देणार नाही – भाजप खासदार

    मात्र राज ठाकरे यांनी कितीही भाजपचे गुणगान गायले तरी उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मगितल्याशिवाय अयोध्येत पाय टाकू देणार नाही अशी धमकी दिली आहे.

    ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हणाले की,

    ” महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच राज्य आहे. ज्यांच्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक राहत होते. मात्र त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राज ठाकरे सारखा एक माणूस २००७ पासून उत्तर भारतीय लोकांना, बिहारी लोकांना, सिनेमातील लोकांना शिव्या देत आहे. आता अचानक त्यांचं हृदयपरिवर्तन जरी झालं असल, तरीही त्यांना आधी उत्तर भारतीय लोकांची माफी मागावी लागेल तरच मी त्यांना अयोध्येत पाय टाकू देणार. मला त्यांच्या अजाण आणि हनुमान चालीसा या मुद्द्यांविषयी काही घेणदेणं नाही. त्यांना अयोध्येत यायचं असेल तर उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी बस एवढंच माझं म्हणणं आहे.”

    अस भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. ब्रजभूषण सिंह यांनी आज अयोध्येमध्ये राज ठाकरेंविरोधात रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं आहे.

    अजाण लावणारे ऐकत नसतील तर मनगटातली ताकद दाखवू – राज ठाकरे

    ५० हजार लोकांची राज ठाकरेंविरोधात पार पडणार बैठक

    ही रॅली संपल्यानंतर अयोध्येमधील नंदिनी नगरमध्ये जवळपास ५० हजार लोकांची राज ठाकरे यांना विमानतळावर रोखण्यासाठी नियोजन बैठक पार पडणार असून यामध्ये साधू महात्मेसुद्धा उपस्थित असणार आहे.  

    भाजप खासदार ब्रजभूषण सिंह आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पेटलेला वाद आता कुठपर्यंत जातो यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • संदीप देशपांडे बद्दल माहिती द्या आणि ५० हजार घेऊन जा – भीम आर्मी

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नुकत्याच पार पडलेल्या सभांमधून वादग्रस्त वक्तव्ये करून संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष स्वतःकडे ओढवून घेतलं होतं. औरंगाबाद येथील सभेसाठी पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १६ नियमांचे पालन करण्यास सांगितले होते.

     

    मात्र या सभेमध्ये आयोजकांनी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलीस प्रशासनाचे सर्व नियम न पाळल्यामूळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

     

    राज ठाकरे यांना देशातून तडीपार करा – भीम आर्मी

     

    या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांना पोलीस अटक करायला गेल्यानंतर त्यांनी महिला पोलिसांना धक्का देऊन जबरदस्तीने पड काढला. या गडबडीमध्ये एक महिला पोलीस जखमी झाल्या होत्या.

     

    ‘या’ कारणामुळेच भडकली कोरेगाव-भीमा दंगल!

     

    या पार्श्वभूमीवर भीम आर्मीने देशपांडे यांना प्रसार माध्यमांशी बोलत असताना चांगलच धारेवर धरलं आहे. भीम आर्मीने म्हटलं आहे की,

    ” संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं की, आम्ही राज साहेबांसाठी अंगावर केसेस घेऊ. मात्र जेव्हा पोलीस अटक करायला आले, तेव्हा आपण एका महिला पोलीसला धक्का देऊन पड काढला. संदीप देशपांडे बहूतेक गुजरातमध्ये लपले असतील. कृपया पोलिसांनी त्यांना फरार घोषित करावं. जो कुणी संदीप देशपांडे यांच्याबद्दल माहिती देईल त्याला भीम आर्मीकडून ५० हजार रुपयांच बक्षीस देण्यात येईल.”

    अस आव्हान भीम आर्मीने केल आहे.

     

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

     

     

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा 

    Facebook : PoliticalWazir

  • परब आणि राऊतांसारखे माझे मुंबईत १० फ्लॅट नाहीत – रवी राणा

    मंडळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसोबत पंगा घेणे रवी राणा यांना चांगलच महागात पडलं आहे. राज ठाकरेपासून सुरू झालेला हनुमान चालीस्याचा वाद राणा दाम्पत्यापर्यंत पोहचला. राणा दाम्पत्याने हनुमान चालीस्याच वाचन मातोश्रीवर करू अस चॅलेंज शिवसेनेला दिल्यानंतर हा वाद चांगलाच उफाळून आला.

    राणा दाम्पत्य मुंबईत दाखल होताच पोलीस प्रशासनाने यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही अटक केली होती. न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्या गेली.

    उध्दव ठाकरेंची तक्रार दिल्लीला जाऊन करणार- नवनीत राणा

    मात्र आता जामीन झाल्यानंतरसुद्धा राणा दाम्पत्याची मुख्यमंत्र्यांच्या मनमानीतून सुटका होणे कठीण दिसत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खारमधील रवी राणा यांच्या फ्लॅटच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर रवी राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे.

    प्रसार माध्यमांशी बोलत असताना रवी राणा म्हणाले की,

    ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या फ्लॅटसाठी नोटीस पाठवली. कारण त्यांना इतर काम राहली नसणार आणि तसेही संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासारखे माझे मुंबईत १० फ्लॅट नाही. त्यांनी खुशाल चौकशी करावी.”

    असा निशाणा रवी राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर साधला आहे. 

    सौरव गांगुली करणार भाजपमध्ये प्रवेश

    मुख्यमंत्र्यांना दुसरं काम राहलेल नाही – रवी राणा 

    प्रसार माध्यमांशी बोलत असतांना रवी राणा पुढे म्हणाले की,

    ” मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लोकांची मालमत्ता जप्त करण्याव्यतिरिक्त दुसरे कुठलेही काम उरले नाही. म्हणून ते या प्रकारचे वर्तन करत असणार.”

    असा टोला रवी राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर लगावला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • उध्दव ठाकरेंची तक्रार दिल्लीला जाऊन करणार- नवनीत राणा

    मंडळी राज ठाकरेपासून सुरू झालेला हनुमान चालीस्याचा वाद राणा दाम्पत्यापर्यंत पोहचला. राणा दाम्पत्याने हनुमान चालीस्याच वाचन मातोश्रीवर करू अस चॅलेंज शिवसेनेला दिल्यानंतर हा वाद चांगलाच उफाळून आला.

    राणा दाम्पत्य मुंबईत दाखल होताच पोलीस प्रशासनाने यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही अटक केली होती. न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्या गेली.

    नवनीत राणा navneet rana यांचा दाऊद गँगशी संबंध

    मात्र आता जामीन मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हटलं की,

    ” मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अतिशय वाईट वर्तवणूक आमच्याशी केली आहे. त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला. तुरुंगात गेल्यानंतर कुठलाही लोकप्रतिनिधी हा गुन्हेगार असतो. हे ठीक आहे. मात्र आम्हाला गुन्हेगारांपेक्षाही वाईट वागणूक त्या ठिकाणी दिल्या गेली. मी दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची तक्रार करणार आहे. जे आमचे गृहमंत्री व प्रधानमंत्री महिलांचा सन्मान करतात. त्यांच्याकडे मी उध्दव ठाकरे यांची तक्रार करणार आहे.”

    अस नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं. 

    नवनीत राणा यांचं ब्लड प्रेशर वाढलं, भायखळा रुग्णालयात दाखल

    न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही सन्मान करतो – नवनीत राणा 

    प्रसार माध्यमांशी बोलत असताना नवनीत राणा पुढे म्हणाल्या की,

    ” जे लोक आम्हाला म्हणतात की आम्ही कोर्टाचा अपमान केला, तर आम्ही एक भारतीय नागरिक कोर्टाचा सन्मानच केला आहे आणि करत राहणार.”

    अस नवनीत राणा यांनी यावेळी म्हटलं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • ‘या’ कारणामुळेच भडकली कोरेगाव-भीमा दंगल!

    १ जानेवारी २०१८ कोरेगाव भीमा येथे पेटलेली भयाण जातीय दंगल…

    हातामध्ये लाठ्या घेऊन धावणारं वर्दळ , जखमी झालेल्या अवस्थेत माणसं , पोलीस, संरक्षण दलाला शांततेसाठी करावया लागणारी कसरत सर्व भयावह होते..

    त्या नंतर राज्यभरात या दंगल बद्दल जातीय दृष्टीने ,वेगवेगळ्या पैलुने बघायला सुरुवात झाली..

    ” कोरेगाव दंगल हा एल्गार परिषदेचा दुष्परिणाम असून सीबीआयची पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे त्यात निष्पन्न झाले होते, असे याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन दोषारोप पत्रांमध्ये नमूद आहे. “

    रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड

    आणि त्या नंतर वेगवेगळ्या राजकीय पक्ष, नेते आणि त्यांचे वेगवेगळे आरोप, प्रत्यारोपण ला सुरुवात झाली आणि अश्यातच राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे  अध्यक्ष शरद पवार यांचं स्टेटमेंट आलं..

    ” संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमामध्ये वेगळ वातावरण तयार केलं !! ” 

    शरद पवार यांची राजकीय उंची देशभरात सर्वांना माहीत आहेच म्हणून त्यांनी दिलेले स्टेटमेंट सुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरले…

    अॅड.प्रकाश आंबेडकर यांंनी सूद्धा यास समर्थन दर्शवत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले..

    मिलिंद एकबोटे यांना अटक सुद्धा करण्यात आली.

    पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये

    याच दंगलीत श्री शिवछत्रपतींचे चित्र असलेले कपडे घातल्या मुळे राहुल फटांगळे या युवकाची घेराव घालून जीवघेणा हमला करण्यात आला ज्याची यामध्ये मृत्यू झाली या मध्ये तिघांना अटक सुद्धा करण्यात आली पण त्यांची नावे मात्र पोलिसांनी पुढे केली नाही !! 

    एकंदरीत २०१८ ते २०२२ पर्यंत आजतोवर या दंगली बद्दल कोर्टात निर्णय सुरू आहे…

    पण या एवढ्या कालावधी नंतर  संभाजी भिडे यांच्या विरोधात एकही पुरावा न मिळाल्या मुळे त्यांचे आरोपपत्र रद्द झाले…

    आणि अश्यातच शरद पवार यांनी आपल्या जुन्या वक्तव्यावरून सरळ पलटी मारली..

    मला भिमा कोरेगाव दंगल बद्दल पुर्णतः माहिती नाही आणि मी संभाजी भिडे  आणि एकबोटे परस्पर ओळखत नाही..

    तर विषय असा आहे की, जेव्हा पवार साहेबांना या बद्दल काही माहिती नव्हती, कल्पना नव्हती तर मग सरळ आरोप कुठल्या बेसीस वर केले होते ?

    जेव्हा तिथे स्थानिक पातळीवर काय झाले याची कल्पना त्यांना नव्हती तर मग एखाद्या व्यक्ती वर सरळ आरोप का केल्या गेले ? 

    आपण एका मोठ्या पक्षाचे सर्वेसर्वा आहे !! आपल्या स्टेटमेंट ने काय पसरु शकते याची जाणीव सुद्धा या एवढ्या मोठ्या माणसाला नसावी का ? त्या नंतर राज्यात जे काही झाले याला जिम्मेदार कोण होते?

    आणि राहुल फटांगळे च्या हत्या चे आरोपी पुढे का आणल्या गेले नाही, आणि त्यांचे पुढे काय झाले या बद्दल कोणी काही का बोलले नाही ??

    कसे आहे न , की दंगलीत मरणारा हा राजकारणी नसतो , असतो तो सामान्य म्हणून राजकारण्यांनी काहीही वावगं बोलुन सामान्य माणसाच्या जीवनाचे हाल करु नये एवढेच…

    ✍🏻 अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • सौरव गांगुली करणार भाजपमध्ये प्रवेश

    मंडळी एकीकडे महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि भोंगा प्रकरण सुरू असताना महाराष्ट्राबाहेर भाजपच आकर्षण भारतीय क्रिकेटपटूंना लागलं आहे. भारतीय क्रिकेटपटूंना राजकीय क्षेत्राच आकर्षण असणं आणि त्यांचं राजकीय क्षेत्रात कार्यरत असणं ही काही नवीन गोष्ट नाही.

    नवजोतसिंग सिद्धू यांनी भाजपा आणि काँग्रेसकडून केलेलं राजकारण जनतेला चांगलच माहिती आहे, तर दुसरीकडे गौतम गंभीर व मनोज तिवारी या भारतीय क्रिकेटपटूंनी भाजपमध्ये घेतलेला प्रवेशसुदधा इथल्या जनतेला माहिती आहे.

    उध्दव ठाकरेंनी योगींकडे ट्युशन क्लास लावावा- आशिष शेलार

    मात्र भारतीय क्रिकेट क्षेत्रातील एक गाजलेलं नाव ज्याने सर्वांना चकित करून सोडलंय. तो म्हणजे क्रिकेट क्षेत्रात दादा म्हणून ओळखला जाणारा सौरव गांगुली. सौरव गांगुली सध्या BCCI चा अध्यक्ष आहे. 

    त्याचे भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत आधीपासूनच दिल्या जात होते. मात्र या गोष्टीला आता शिक्कामोर्तब करण्याचं काम केलंय ते भारतीय देशाचे केंद्रीय गृहमंत्री व भाजपा नेते अमित शहा यांनी.

    राज ठाकरेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे- धनंजय मुंडे

    अमित शहा हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर असतांना दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या कलकत्ता येथील निवासस्थानी भेट दिली. या भेटीमुळे सौरव गांगुलीच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चांनी आता चांगलाच जोर धरला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राज ठाकरेंना उत्तर भारतीयांची माफी मागीतल्याशीवाय अयोध्येत पाय टाकू देणार नाही – भाजप खासदार

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येला जाण्यासाठी निघणार असून आतापासूनच त्यांच्या आगमनाची उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत अजाण आणि हनुमान चाळीसाचा मुद्दा उचलून धरला आहे.

    ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर राज ठाकरेंच्याच नावाची चर्चा सुरू आहे. नेहमी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपली भूमिका मांडणारे राज ठाकरे अचानक भाजपची बाजू घ्यायला लागल्याने भाजप आणि मनसे अशी युती भविष्यात होणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.

    राज ठाकरेंच्या सभेवर गृहखात कारवाई करणार

    मात्र राज ठाकरे यांनी कितीही भाजपचे गुणगान गायले तरी उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मगितल्याशिवाय अयोध्येत पाय टाकू देणार नाही अशी धमकी दिली आहे.

    ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हणाले की,

    ” महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच राज्य आहे. ज्यांच्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक राहत होते. मात्र त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राज ठाकरे सारखा एक माणूस २००७ पासून उत्तर भारतीय लोकांना, बिहारी लोकांना, सिनेमातील लोकांना शिव्या देत आहे. आता अचानक त्यांचं हृदयपरिवर्तन जरी झालं असल, तरीही त्यांना आधी उत्तर भारतीय लोकांची माफी मागावी लागेल तरच मी त्यांना अयोध्येत पाय टाकू देणार. मला त्यांच्या अजाण आणि हनुमान चालीसा या मुद्द्यांविषयी काही घेणदेणं नाही. त्यांना अयोध्येत यायचं असेल तर उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी बस एवढंच माझं म्हणणं आहे.”

    अस भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. 

    अजाण लावली नाही म्हणून खुश झालो अस समजू नका- राज ठाकरे

    राज ठाकरेंचा विरोध माझा व्यक्तिगत निर्णय – ब्रजभूषण सिंह 

    भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना पुढे म्हटलं की,

    “भविष्यात भाजप आणि मनसे युती होईल असं जरी वातावरण दिसत असलं तरी, राज ठाकरेंना विरोध करणं हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे.”

    अस त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता ५ जूनला राज ठाकरे अयोध्येला पोहचण्याआधी उत्तर भारतीय लोकांची माफी मागणार का? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राज ठाकरेंच्या सभेवर गृहखात कारवाई करणार

    मंडळी राज ठाकरे नावाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये चांगल्याच ताकदीने चालू आहे. १ मे ला राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजातील कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केला.

    या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं गृहखात आता ऍक्शन मोडमध्ये आलं आहे. राज ठाकरे यांची सभा चालू असताना मुस्लिम बांधवांचे अजाण पठण भोंग्यावर सुरू झाले आणि ते राज ठाकरे यांच्या कानावर आले, तेव्हा राज ठाकरे यांनी कायदा व सुव्यवस्था भंग करणारे विधान करून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

    अजाण लावली नाही म्हणून खुश झालो अस समजू नका- राज ठाकरे

    आज थोड्याच वेळामध्ये गृहमंत्री आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्यामध्ये राज ठाकरे यांच्या सभेच्या अनुषंगाने बैठक होणार आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास करून कारवाई होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास कायदे तज्ञांकडून केला जात आहे.

    महाराष्ट्र सरकारने कायदे तज्ञांना राज ठाकरे यांच्या भाषणावर त्यांचे ओपिनियन मागितले आहे आणि त्याबद्दलचा अहवालसुद्धा सादर करण्याचे आदेश दिल्या गेले आहे. राज ठाकरे यांच्यावर आयपीसी २९४ आणि आयपीसी २९५ कलमनुसार कारवाई होऊ शकते का? याचासुद्धा अहवाल गृहखात्याने मागितला आहे. 

    रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड

    नेमकं काय बोलले होते राज ठाकरे ? 

    सभा सुरू झाली आणि श्रोत्यांचा आवाज संपूर्ण मैदानात घोंघावत होता. अचानक काही लोकांनी सभेमध्ये गोंधळ घातला आणि राज ठाकरेंचा राग अनावर झाला. त्या  गोंधळ घालणाऱ्या लोकांना खोचक भाषेमध्ये धमकावतना त्यांनी म्हटलं की,

    ” ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे. इथे जर गोंधळ कराल, तर चौरंग करून घरी पाठवू लक्षात ठेवा.”

    राज ठाकरे यांच्या अशाप्रकारच्या वक्तव्यावरून त्यायांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • अजाण लावली नाही म्हणून खुश झालो अस समजू नका- राज ठाकरे

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे झालेली रेकॉर्डब्रेक सभा आणि सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांवर सद्धया महाराष्ट्रामध्ये चांगलाच वाद सुरू आहे. पोलीस प्रशासनाने राज ठाकरेंच्या सभेला १६ नियमांची अंमलबजावणी करायला सांगितले होते.

    मात्र राज ठाकरे यांनी सभेमध्ये पुन्हा समाजात जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून  कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यांना अध्यापही अटक झालेली नाही.

    तिरुपतीला मर्जीनुसार गेलो – वसंत मोरे

    राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मस्जिदींवरील भोंगे उतवण्यासाठी ४ तारखेचा दिवस दिला होता. अन्यथा महाराष्ट्रामध्ये काहीही घडू शकत असे सांगितले होते. राज ठाकरेंच्या याच वक्तव्याची दखल घेत राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांना कामाला लावले आहे.

    काही ठिकाणी अजाण हे विना भोंग्याचे पठण करण्यात आले. यावर राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की,

    ” आज काही ठिकाणी भोंग्यावर अजाण लावली नाही म्हणून आम्ही शांत बसलो अस समजू नका. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन राज्य सरकारने करावं. अन्यथा आम्ही दुप्पट आवाजात भोंग्यावर हनुमान चालीसा लावल्याशिवाय राहणार नाही.”

    अस राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हटलं आहे. 

    अजाण लावणारे ऐकत नसतील तर मनगटातली ताकद दाखवू – राज ठाकरे

    अन्यथा आम्ही आक्रमक होऊ- राज ठाकरे

    मंडळी राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हटलं की,

    ” प्रत्येक मस्जिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजे. अन्यथा आम्ही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही.”

    अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी राज्य सरकारपुढे मांडली आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir