Author: admin

  • महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरे च योगींना पत्र

    मंडळी गेली कित्येक वर्षे झाले राज ठाकरे हे राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय नेते आहे. मात्र त्यांना राजकीय क्षेत्रात फारस यश आलेल नसल्याकारणाने आता त्यांनी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या मनसुब्याने धार्मिक राजकारण करायला सुरुवात केली आहे.

    मुंबई आणि ठाणे येथे झालेल्या त्यांच्या सभेत त्यांनी सर्व मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याच आव्हान महाराष्ट्र सरकारला केलं होतं. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील सर्व मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वात जास्त आनंद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना झाला आहे.

    राज ठाकरेंना संभाजी ब्रिगेडच ओपन चॅलेंज

    राज ठाकरे यांनी योगी यांना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केल आहे. सोबतच त्यांनी या पत्रामध्ये महाराष्ट्र सरकारलासुद्धा टोला दिला आहे. योगी अदित्यनाथ यांना पाठवलेल्या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी लिहिलं आहे की, 

    ” योगीजी आपण उत्तर प्रदेशातील मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवल्याबद्दल आपले अभिनंदन करतो. हीच बुद्धी महाराष्ट्र सरकारलासुद्धा यावी अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. मात्र महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’.”

    अस पत्रामध्ये लिहत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. 

    राज ठाकरे अंगाने मोठा भोंगा – अमोल मिटकरी

    मंडळी नेहमी भारतीय जनता पक्षावर टीका करणारे राज ठाकरे अचानक भाजपचे गुणगान गाऊ लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेल आहे की ते आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षासोबत आपला धार्मिक अजेंडा घेऊन निवडणूका लढणार आहे.

    पाठोपाठ सभा घेणे आणि शेती, शिक्षण, रोजगार यांसारखे मुद्दे न उचलता धार्मिक मुद्दे उचलणे यावरून राज ठाकरे यांचा राजकीय मनसुबा जनतेच्या चांगलाच लक्षात आलेला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • शरद पवार एसटी कर्मचाऱ्यांचे २ हजार कोटी गिळंकृत करण्याच्या बेतात पडळकरांचा खुलासा

    मंडळी महाराष्ट्रातील राजकरणामधले मातम्बर मानले जाणारे शरद पवार यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांबद्दल निर्दयी वृत्ती दाखवण्याचा आरोप सध्या भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. जवळपास १२० एसटी कर्मचारी मृत्युमुखी पडले असतानासुद्धा शरद पवार यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कसल्याही प्रकारची मदत केलेली नाही.

    नुकत्याच घोषित झालेल्या एसटी बँकेच्या निवडणूकीत जो थकबाकीदार आहे त्याला मतदान करता येणार नाही असा आदेश महाविकास आघाडी सरकारन काढला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोचरी टीका करत त्यांना चांगलच धारेवर धरलं आहे.

    शरद पवारांना आम आदमी पक्षाच पत्र

    प्रसार माध्यमांशी बोलत असतांना पडळकर म्हणाले की,

    ” गेल्या ६ महिन्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या हक्काची लढाई लढत होता आणि आता त्याचाच फायदा घेऊन शकुनी काकांनी २ हजार कोटींची बँक आणि त्यांची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे. एसटी बँकेची निवडणूक घोषित केलेली आहे आणि जो थकबाकीदार आहे त्याला या निवडणुकीत मतदान करता येणार नाही असा फतवा काढल्या गेला आहे. साहजिकच जो कर्मचारी गेल्या ६ महिन्यांपासून बिनपगारी रस्त्यावर उतरला तोच थकबाकीदार आहे म्हणजे त्याला मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. १९९५ ला शरद पवारांनी स्वतःच्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रुपये वसूल केले.”

    अस पडळकर यांनी म्हटलं आहे. 

    एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानाला शरद पवार जबाबदार – गोपीचंद पडळकर

    पवारांनी वाढदिवसाच्या नावाखाली १०० कोटी गिळंकृत केले – पडळकर 

    शरद पवार यांना भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रसार माध्यमांद्वारे चांगलच सुनावलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना पुढे ते म्हणाले की,

    ” पवारांनी वाढदिवसाच्या नावाखाली मनसोक्त रक्कम गोळा करून वेगवेगळ्या मार्गाने जवळपास १०० कोटी रुपये गिळंकृत केले आहे. आपल्या आसपासच्या बगलबच्च्यांना २०-२० लाखांच्या गाड्या खरेदी करून दिल्या. ज्यावेळी महाराष्ट्रातला एसटी कर्मचारी स्वतःच्या कुटुंबासोबत उघड्यावरती लढाई लढत होता त्यावेळी शरद पवार यांनी आपल्या सिल्व्हर ओकवरून जेवण तर सोडा पण पाणीसुद्धा पाठवून दिल नाही. यांच्यामध्ये जर थोडी जरी माणुसकी असती तर यांनी मृत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली असती.”

    अस बोलत पडळकर यांनी शरद पवार यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. मात्र आता यावर पवार काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क देण्यात याव – ऍड. नईम शेख

    मंडळी एकीकडे हनुमान चालीस्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चिघळलेलं असतांना औरंगाबाद येथील वकील नईम शेख यांनी महाराष्ट्र सरकारला ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क खुल करण्यात याव अशी मागणी केली आहे.

    सद्ध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील राजकारण हे सध्या जातीय द्वेष समाजामध्ये निर्माण करणार सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नईम शेख यांची शिवाजी पार्कवर नमाज पठणासाठी मागणी एक समतावादी निर्णय महाराष्ट्र सरकारकडून होण्याची अपेक्षा आहे.

    ब्राम्हण महासंघाच्या महिलांना डोक्यावर घेऊन गेलो असतो – रुपाली पाटील

    या पार्श्वभूमीवर नईम शेख यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलेलं आहे. मुंबई परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आहेत. त्यांना नमाज अदा करायला दुसरी मोठी जागा नाही त्यामुळे शिवाजी पार्क देण्यात याव अशी त्यांची मागणी आहे.

    नईम शेख यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं की,

    ” मी महाराष्ट्र शासनाकडे शिवाजी पार्कवर नमाज पठणाकरिता परवानगी मागितलेली आहे. दिनांक २२/४/२०२२ ला मी शासनाला त्यानंतर महानगरपालिकेला पत्र दिलेल आहे. मुंबईमध्ये जागेची कमी असल्याकारणाने रस्त्यावर नमाज पढावी लागते त्यामुळे आम्ही शासनाकडे कायदेशीर परवानगी मागितलेली आहे. शासनाने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा आणि आम्हाला दरवर्षी शिवाजी पार्कवर नमाज पठणासाठी परवानगी द्यावी अशी मी विनंती करतो.”

    अस नईम शेख यांनी म्हटलं आहे. 

    ३ मेपर्यंत मस्जिदींवरचे भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू – दिलीप दातीर

    सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये चालू असलेला धार्मिक वाद पाहता महाराष्ट्र शासन मुस्लिम बांधवांना शिवाजी पार्कवर नमाज पठणासाठी परवानगी देणार का? हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir 

  • Nitesh Rane नितेश राणे यांचा शिवसेनेविषयी असणारा द्वेष

    मंडळी एकीकडे महाराष्ट्रतल्या राजकारणाचा फुल फोकस राज ठाकरेंवरून राणा दाम्पत्याकडे वळला असतांना नितेश राणे यांनी खळबळजनक खुलासा करून शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना अडचणीत आणलं आहे.

    नितेश राणे यांचा शिवसेनेविषयी असणारा द्वेष आता चांगलाच उफाळून निघाला आहे. नितेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सगळीकडे चांगलाच व्हायरलसुद्धा होत आहे.

    माझ्यावरील हल्ल्यामध्ये पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुंडांना साथ – किरीट सोमय्या

    सत्तार एका व्यक्तीला हनुमानावरून शिव्या देत असल्याच या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हनुमानाविषयी असे उदगार काढणाऱ्या अब्दुल सत्तार यांना ताबडतोब अटक करण्यात यावी अस आव्हान नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केलं आहे.

    प्रसार माध्यमांशी बोलत असतांना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हटलं की,

    ” अब्दुल सत्तार जे हे उदगार काढत आहे यावर मुख्यमंत्री कुठली कारवाई करणार? सत्तार यांना अटक करून स्वतःमध्ये असलेली मर्दानगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दाखवणार का? ज्या पद्धतीने ते शिवीगाळ करत आहे त्याच पद्धतीने जर सत्तारांच्या धर्मावर केला, तर त्याला परवडणार का?”

    असे प्रश्न नितेश राणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापुढे उपस्थित केले आहे. 

    राज ठाकरे ही भाजपची C टीम – अब्दुल सत्तार

    नितेश राणे यांना महाविकास आघाडी सरकारने अटक करून ३ दिवस तुरुंगामध्ये ठेवलं होतं. या कारणाने त्यांचा शिवसेनेविषयी असणारा राग आता चांगलाच उफाळून येतोय. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अब्दुल सत्तार आणि नितेश राणे या दोघांपैकी कुणाची बाजू घेतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • नवनीत राणा navneet rana यांचा दाऊद गँगशी संबंध

    मंडळी राणा दाम्पत्य सध्या महाराष्ट्रातील राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

    नवनीत राणा आता स्वतः दलीत असल्याकारणाने इथलं प्रशासन त्यांना दुय्यम वागणूक देत आहे असा कांगावा करत आहे. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये राणा दाम्पत्याला पोलीस प्रशासनाकडून दिली जाणारी शाही वागणूक बघून राणा दाम्पत्याची महाराष्ट्रातील जनतेसमोर आता चांगलीच पोलखोल झाली आहे.

    नवनीत राणा यांचं ब्लड प्रेशर वाढलं, भायखळा रुग्णालयात दाखल

    सध्या न्यायालयीन कोठडीची हवा खात असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी एक वाढ झाली आहे. नवनीत राणा यांचे दाऊद गँगशी संबंध असल्याचा संशय मुंबई पोलीस प्रशासनाला आला आहे.

    नवनीत राणा यांनी दाऊद गँगमधील युसूफ लकडावाला यांच्याकडून ८० लाखांच कर्ज घेतल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येत्या काळामध्ये याप्रकरणासंबंधी लकडावाला आणि नवनीत राणा यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

    राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत

    राणा दाम्पत्याला दलीत समाजातून असल्यामुळे दुय्यम वागणूक दिली जात आहे – फडणवीस 

    राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर नवनीत राणा यांनी आरोप केला होता की मी मागासवर्गीय असल्याकारणाने मला दुय्यम वागणूक पोलीस प्रशासनाकडून दिली जात आहे. यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा हा मुद्दा उचलून धरत नवनीत राणा यांच्या आरोपाला हवा देण्याचं काम केलं आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितल की,

    ” नवनीत राणा या दलीत समाजातून असल्याकारणाने त्यांना राज्य सरकारकडून दुय्यम वागणूक दिली जात आहे.”

    अस फडणवीस म्हणाले. मात्र आता हा नवनीत राणा आणि शिवसेनेमध्ये पेटलेला वाद कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये

    एंबुलंस चा तो ह्रदयाला छेद देणारा आवाज घरापासून धावत निघाला…

    छातीत धडधड वाढली असतांना आईने मात्र हात पकडून धरला होता…

    ” जाऊ नको जवळ कोरोना आहे…!! “

    म्हणून आईने घराच्या उंबरठ्यावर च रोखलं पण डोळ्यासमोर लहानपणापासून मोठ्या होत  गेलेल्या पोराला आज एंबुलंस मध्ये जातांना पाहून डोळे भरून तीचेही आले होते… पण तेव्हाच्या परिस्थिती ने रोखलं होतं..

    नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य

    गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एडमिट करून तिथेही ऑक्सिजन चा तुटवडा म्हटल्यावर जिल्ह्यात रात्री उशिरा नेण्याची ताकीद डॉक्टरांनी दिली..

    त्यात सोबत जायला तयार कोणीही नाही..

    तेव्हा आयुष्यभर ची साथ देणारी बायको रात्री दोन वाजता एकटी त्या एंबुलंस मध्ये निघाली.. तोंडावर ऑक्सिजन लागलेला नवरा पाहून डोळ्यावर पदर लावून तेवढा नवर्याचा हात पकडून एवढ्या रात्री जिल्ह्यातील दावाखान्यात जाऊन सर्व कागदपत्रे पुर्ण करून नवर्याला एंबुलंस मधून उतरवून दावखान्याच्या मेन गेटपर्यंत गेली आणि डोळे भरून तीने नवर्याला पाहीलं…. बस्स तीथुन सकाळी पाच वाजता ती घरी आली..

    महाविकास आघाडीने कोरोना काळात केलेले एक काम दाखवा- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

    तेव्हा पर्यंत सर्व एरीया मध्ये खबर पहोचली ,  रात्री घाबरलेली आई सुद्धा मन पक्क करून वहिनींना भेटायला गेली… तेवढे धीर सोडून दुसरे काहीही नव्हते द्यायला कुणाकडे  ..

    दुपारी थोडे फार बरे वाटलं म्हणून नवर्याचा फोन आला.. , जेवण पहोचलं नव्हते दुपार पर्यंत.. दावखान्यात पेशंटच्या वाढणाऱ्या गर्दी, प्रत्येक क्षणाला एक मयतीचा फुटणारा टाहो सर्व काही वेदनादायक होतं.

    रात्र झाली… वहीनी च्या डोळ्यासमोर झोप नव्हती सकाळी लवकर उठून तीने गणरायाच्या मुर्ती ला हातात घेतलं भरल्या डोळ्यांनी अक्षद लावून, दुर्वा ठेवून गणरायाच्या मुर्तीला नवर्याच्या लवकर परतीचा  नवस मागुन ती पाण्यात टाकणारच की एक फोन आला आणि सर्व संपलं..

    रात्री ऑक्सिजन अभावी  तीच्या जिवनाचा ह्रदय श्वास थांबला…

    छाती आदळून रडणारी ती , हातातील बांगड्या जमीनीवर आपटून रडणारी ती आजही डोळ्यासमोर येते…

    सकाळी दहा ला दावखान्यात नवर्याची  डेथबॉडी घेऊन स्मशानभूमीत गेल्यावर चिता पेटण्याची रांगेत तीचा रात्री अकरा ला नंबर लागला आणि एक ला अस्थि कलश घेऊन ती परतली..

    सर्व काही डोळ्यासमोर होत असतांना सूद्धा सर्व हतबल झाले होते..

    आज ती भांडी घासायला बाहेर जाते , मुलांचं.शिक्षण करायचय  , सरकार चे अनुदान कागदावर च राहलं..

    आणि आज एक वर्ष उलटून जेव्हा आजच्या परिस्थिती च दर्शन होतं

    तेव्हा न पेटलेल्या चिता आज नेत्यांच्या भक्तीची यज्ञकुंड मांडून बसलीत , कुणाला थोडी सूद्धा आम्ही कुठल्या परिस्थिती ला समोर गेलो याची पर्वा राहली नाही..

    चलणारे घाणेरडे राजकारण, आणि त्याला कार्यकुत्र्यांचे मिळणारे समर्थन बघून फक्त एवढेच वाटतं…

    पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये…….

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • माझ्यावरील हल्ल्यामध्ये पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुंडांना साथ – किरीट सोमय्या

    मंडळी महाराष्ट्रामध्ये एकीकडे राज ठाकरेंच्या भोंग्याच् राजकारण सुरू आहे, एकीकडे राणा दाम्पत्याच हनुमान चालीसा पठणाच राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या kirit somaiya आणि शिवसेनेमध्ये चांगलाच राजकीय खेळ रंगला आहे.

    काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या kirit somaiya  यांच्यावर मुंबईमधील खार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला होता. मात्र किरीट सोमय्या kirit somaiya यांनी या हल्ल्याचा मास्टर माईंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहे असा आरोप केला आहे.

    आता अनिल परब आणि यशवंत जाधव यांचा नंबर- किरीट सोमय्या

    हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी दिल्लीमध्ये केंद्रीयगृहसचिवांची भेट घेतली.  किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं की,

    ” ठाकरे सरकार पोलिसांच्या मदतीनं गुंडांकडून हल्ला करण्याच काम करत आहे. दिल्लीमधून महाराष्ट्रामध्ये स्पेशल टीम पाठवण्यात यावी. कारण सम्पूर्ण हल्ल्याचे फुटेज पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी गायब केले आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे पदाचा गैरवापर करत आहे. पोलिसांच्या उपस्थित माझ्यावर हल्ला करण्यात आला. माझ्यावर कमांडोचासुद्धा हल्ला पोलीसांच्या समर्थनाने केल्या गेला.”

    असा आरोप किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र सरकार व पोलीस प्रशासनावर केला आहे. 

    आमचं सरकार पडणारही नाही आणि मी झुकणारही नाही- संजय राऊत

    महाराष्ट्रात नाही तर यूपीमध्ये राष्ट्रपती राजवट लावा – संजय राऊत 

    मंडळी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचीवांची भेट घेत त्यांना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची विनंती केली. याच प्रतिउत्तर देतांना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला चांगलच धारेवर धरल आहे. ते म्हणाले की,

    ” एखाद्या व्यक्तीच थोडं रक्त निघालं तर तुम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी करता. राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर आधी उत्तर प्रदेशमध्ये लावा. कारण उत्तर प्रदेशमध्ये गेल्या ३ महिन्यांमध्ये १७ बलात्कार झाले आहेत.”

    असा टोला संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    FB : PoliticalWazir.com

  • नवनीत राणा यांचं ब्लड प्रेशर वाढलं, भायखळा रुग्णालयात दाखल

    मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट आणला आहे तो म्हणजे राणा दाम्पत्याने. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केल्याशिवाय परत जाणार नाही असं आव्हान शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना देऊन आणि मुंबईमध्ये येऊन राणा दाम्पत्याने सर्वात मोठी चूक केली अस संपूर्ण महाराष्ट्राला सध्या वाटत आहे.

    राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर हजारो शिवसैनिकांनी त्यांच्या घराला वेढा घातला. याचकरणाने राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाण्यास अपयशी ठरलं. मात्र पोलीस प्रशासनानेच राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

    मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य

    न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आमदार रवी राणा यांनी स्वतःचा आणि नवनीत राणा यांचा जामीन अर्ज कोर्टात सादर केल्यानंतर कोर्टाने एवढ्या लवकर निर्णय देण्यास नकार दिला.

    दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांची प्रकृती मंदावली आहे. काल त्यांच चेक अप करण्यात आलं तेव्हा त्यांचं ब्लड प्रेशर हे वाढलेलं आहे असं लक्षात येताच त्यांना भायखळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

    शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणली

    प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्यास दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येईल असे आदेश भायखळा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिले आहे. 

    राणा दाम्पत्यांनी स्टंटबाजीसाठी हे सर्व केलं- छगन भुजबळ

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ आज नाशिकमधील येवला तालुक्क्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी प्रसार माध्यमांद्वारे राणा दाम्पत्यांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की,

    ” राण दाम्पत्यांनी हे सर्व स्टंटबाजीसाठी केलं. त्यांना संपुर्ण देशभर प्रसिद्धी पाहिजे होती. यामागे त्यांचा हाच मनसुबा असावा.”

    असे जेष्ठ छगन भुजबळ यांनी सांगितलं. मात्र यावर आता राणा दाम्पत्य काय प्रतिउत्तर देणार यावर सर्वांच लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : https://www.facebook.com/PoliticalWazir

  • नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य

    या साठी मोर्चे काढा, आम्ही शांत बसणार नाही वगैरे वगैरे..

    मागील वर्षी आम्ही एक ऑक्सिजन अभावी जीव जातांना माणसं बघितली…त्या वेळी आमचे माननीय लोक राजकीय सभा घेण्यात व्यस्त होते.. आजही अनेक आव्हाने उभे करून देशातील स्थानिक स्थिती काय आहे न बघता अस्थिरता कशी उभी करावी या कडे नेत्यांची लक्ष जास्त…

    हे करा , ते करा , आम्ही असे करु , तलवार हाती घेऊ वगैरे म्हणणार्या नेत्यांची मुले कधीच जमीनीवर लढायला नसतात. पण कार्यकुत्रे म्हणजे नेत्यांना बाप आणि पक्षाला धर्म मानुन अगदी लाठी वगैरे घेऊन नेहमी तयारच , आजही भारतात जर कोविड ची चौथी लाट आली तर आपण किती तयार आहो आम्हाला माहिती नाही ?

    चिथावणीखोर भाषण करून लोकांचे प्रश्न मिटणार आहेत काय? अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

    सद्यस्थितीत ग्रोथ रेट किती घसरला आम्हाला  घेणेदेणे नाही , तीन लाख लोकांच्या नौकर्या फक्त मागील महिन्यात गेल्या कुणाला फरक पडत नाही , महागाई किती वाढली ते बघणार नाही,शेतकरी आत्महत्या , शैक्षणिक दर्जा, त्या बद्दल आम्ही सरकारला कधीच जाब सुद्धा विचारणार नाही..

    आणि राजकीय धंदा करणार्या लोकांना त्याशी काही घेणे देणे सुद्धा नाही कारण मरणारा हा त्यांच्या घरचा नसतो मरतो तो सामान्य व्यक्ती.

    शिवसेना स बोलले की मराठी अस्मिता , बिजेपी ला बोलले की राष्ट्रधर्म , राष्ट्रवादी कांग्रेस ला बोलले की पुरोगामीत्व …. नेमके पक्ष या सर्व गोष्टी चे ठेकेदार कधी झाले ? हा बिजेपी चा , हा कांग्रेस चा , हा राष्ट्रवादी चा म्हणण्यापेक्षा..

    युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणणार- बाळासाहेब थोरात

    मी माझ्या बापाचा बोलणं महत्त्वाचे असतं..

    तुम्ही प्रश्न केला की लगेच पाकिस्तान जाओ म्हणणारी केंद्र सरकार , राज्यात विज पासून शेतकरी पर्यंत असंख्य प्रश्न असताना रोज नवीन भानगड करणारी राज्य सरकार..

    शेवटी सर्व एकाच माळेचे मणी..

    “जोपर्यंत रोजगारावर सरकारचे नियंत्रण राहील,माध्यम,शाळा आणि जनमत बनवन्याची सर्व साधने सरकारच्या हाताखाली असतील,जोपर्यंत सर्व कुशल आणि प्रशिक्षीत लोकांवर सरकारचे नियंत्रण असेल;

    निवडणुकांवर प्रभाव टाकन्यासाठी अमर्याद पैसा असेल,जोपर्यंत सत्ताधारी पक्षच कायदे बनविल;

    जोपर्यंत कायद्यांचे अभ्यासक सर्वाधिक पैसे देणाऱ्यांच्यामागे उभे राहतील तोपर्यंत देशात फक्त नावापुरती समानता असेल.”

               ——————-   सरदार भगतसिंग.

    अक्षय चंदेल

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    FB : https://www.facebook.com/PoliticalWazir

  • राणा दाम्पत्याची अखेर माघार

    मंडळी राणा दाम्पत्य काल मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याच्या भूमिकेवरून गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल होत. त्याचक्षणी हजारो शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला अडवण्यासाठी त्यांच्या घराभोवती वेढा घातला आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

    राणा दाम्पत्यावर शिवसैनिक इतके चिडलेले होते, की राणा दाम्पत्याचे हातपाय तोडून त्यांना परत पाठवू अस पण त्यांनी बजावलं होत. त्यासाठी शिवसैनिकांनी रुग्णवाहिकासुद्धा राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी आणली होती. मात्र राणा दाम्पत्याने हे संपूर्ण वातावरण चिघळवून शेवटी माघार घेतल्याचं जाहीर करताच संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांची टीका होत आहे.

    शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणली

    या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा राणा दाम्पत्याला दिलासा देत म्हटलं होतं, की त्यांना सुरक्षित घरी परत पाठवण्याची जबाबदारी ही राज्यसरकारची आहे. मात्र नागपूर दौऱ्यावर असलेले शिवसेना प्रवक्ते यांनी राणा दाम्पत्याचे चांगलेच कान टोचले. प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की,

    ” राणा दाम्पत्यांनी लायकीमध्ये रहावं. त्यांच्या अशा कामगिरीमुळे शिवसैनिकांचा उद्रेक उडेल. कुणाच्यातरी पाठबळाने तुम्ही जर मुंबईत येऊन मातोश्रीवर घुसत असला, तर शिवसैनिक काय स्वस्त बसतील? तुम्ही जर लक्ष्मण रेषा उलांडाल तर शिवसैनिकसुद्धा तुमच्या घरापर्यंत घुसतील.”

    अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली होती. 

    राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत

    प्रधानमंत्र्यचा मुंबई दौरा पाहता माघार घेतली – रवी राणा 

    राणा दाम्पत्यानी मुंबईत घातलेला हनुमान चाळीसाचा गोंधळ हा एक स्टंट होता. हे जनतेला चांगलच कळलं आहे. मात्र रवी राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितल की,

    “उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब मुंबई दौऱ्यावर असल्याकारणाने आम्ही इथे माघार घेत आहोत.”

    यावरून सर्व जनतेच्या लक्षात आलं आहे की राणा दाम्पत्याने केलेला हा एक प्रकारचा स्टंट होता.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

     नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा . 
    FB : https://www.facebook.com/PoliticalWazir