Author: admin

  • संजय राऊत आणि उध्दव ठाकरेंना १०० कोटी द्यावे लागणारच – किरीट सोमय्या

    मंडळी सद्ध्या महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय नेत्यांकडून सुडाच आणि धार्मिक राजकारण होत आहे. जनतेच्या कुठल्याच प्रश्नाबद्दल एकही पक्ष बोलायला तयार नाही. एकमेकांवर ईडीची चौकशी लावणे, एकमेकांविरोधात केस करून कोर्टात जाणे.

    बस यावरच सध्याच राजकारण सुरू आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे किरीट सोमय्या आणि शिवसेनेच्या संजय राऊत आणि मुखमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात पेटलेला वाद. शिवसेना कार्यकर्त्यांनी जेव्हापासून किरीट सोमय्या यांना मारहाण केली तेव्हापासून हा वाद चांगलाच चिघळवून आला आहे.

    प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

    अलीकडे आधी महाविकास आघाडी सरकारन किरीट सोमय्या यांच्यावर ईडीची चौकशी पाठवली आणि नंतर भाजपची सत्ता असलेल्या केंद्र सरकारन संजय राऊत यांच्यावर ईडीची चौकशी पाठवली.

    किरीट सोमय्या यांना १७२ कम्पन्यांनी पैसे दिले – संजय राऊत

    संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर सतत टीका टिप्पणी केल्याने किरीट सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात कोर्टामध्ये मानहानीचा दावा टाकला आहे. येणाऱ्या २६ मेला सुप्रीम कोर्टामध्ये याचा निकाल लागणार आहे.

    या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की,

    ” संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांनी मला मोठ्या प्रमाणात त्रास दिला आहे. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. येणाऱ्या २६ मेला या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. माझ्याबाजूने निकाल लागला तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना मानहानीच्या दाव्यानुसार १०० कोटी रुपये भरावे लागतील.”

    अस किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं. 

    पुढे बोलतांना सोमय्या म्हणाले की,

    ” मानहानीच्या दाव्यानुसार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून वसूल केलेले १०० कोटी रुपये कुठल्याही धर्मशाखेला दान केले तरी चालेल. मात्र या दोघांवर सुप्रीम कोर्टाने मानहानीचा दावा सुप्रीम कोर्टाने मंजूर करावा.”

    अस किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

    महाराष्ट्राने नुकताच प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयीचा त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या विचारांचा पाडलेला मुडदा पहिला. राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांचे नाव घेत दिशाभूल करणारी वक्तव्ये केली. हे सर्व आपण पाहत आहोत. प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

    या विषयावर मी मागच्या आठवड्यात फेसबुक लाईव्ह करून त्यांचे पुस्तक दाखवून त्यातले उतारे वाचून दाखवले होते. बऱ्याच लोकांनी फोन करून त्यावर छोटेखानी लेख लिहिण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रबोधनकार ठाकरे नेमकं काय म्हणतात या विषयाचा थोडक्यात धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

    एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की शिवसेनेचा जन्म प्रबोधनकारांच्या तळपत्या लेखनातून झालेला आहे. बाळासाहेब सेनेचा ब्रँड झालेत मात्र संकल्पना प्रबोधनकारांच्या विचारातून जन्मली. नुकतीच प्रथमेश पाटलांच्या इंडी जर्नलने घेतलेल्या मुलाखतीमध्ये प्रसिद्ध पत्रकार व मुलाखतकार राजू परुळेकर यांनी प्रबोधनकार ठाकरेंनी उभा केलेला बहुजनवादी हिंदुत्ववाद बाळासाहेब ठाकरे यांनी कसा मोडला,

    त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे भाजपाच्या व संघाच्या हिंदुत्ववादाच्या मागे लागून बाळासाहेब ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंनी वाढवलेली बहुजनवादी हिंदू पिढी कशी नासवली यावर सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यामुळे जाणकारांनी ती मुलाखत मुळातून पहावी.

    राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी ?

    प्रबोधनकार ठाकरे आपल्या पुस्तकातून व आपल्या लेखनातून व्यक्त होताना अत्यंत टोकदार व धारदार लिहायचे. ते हिंदुत्ववादी होते का तर नक्कीच हिंदुत्ववादी होते पण त्यांचा हिंदुत्ववाद शेंडी-जानव्याचा –  ब्राह्मणांचा –  भटांचा – दगडाला देव मानणाऱ्याचा नव्हता तर हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा यांना आपल्या लेखणीने फाट्यावर मारत त्यांनी ईश्वराच्या व हिंदू मानवाच्या मध्ये असलेल्या दलाल भट ब्राह्मणांना दूर ठेवून समस्त हिंदू समाजाला शोषणविरहित  वातावरण देण्याचा होता.

    अजुन एक समजून घेतले पाहिजे की त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार मिशनरी स्वरूपाचा व्हावा असही लिखाण केलेले आहे मात्र त्याचे अधिकार त्यांनी भट ब्राह्मणांना देण्याचे नाकारले आहे. चला पाहूया प्रबोधनकार काय म्हणतात..

    सध्या मुस्लिम धर्माबाबत विविध प्रकारची वाद रोजच येत असतात, ‘हिंदू धर्माचे दिव्य’ या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे पान नंबर 6 वर म्हणतात,

    “आजचे हिंदुस्थानातील मुसलमान म्हणणारे आमचे देशबांधव हे पूर्वाश्रमीचे आमचे हिंदू बंधू होत. साष्टी प्रांतातल्या ख्रिस्ती बांधवांप्रमाणे हे आमचे सारे हिंदी मुसलमान पूर्वीचे अस्सल हिंदूच असल्यामुळे हिंदुस्तान आपला मायदेश आहे, हा अभिमान बाळगण्याचा त्यांना हिंदू इतका अधिकार आहे. हे अधिक विशद करून सांगणे नको.”

    पुढे अजून पान नंबर 43 वरती ते म्हणतात,

    “पूर्वी मुसलमानांनी हिंदूंचा छळ केला त्याचीच पुनरावृत्ती हिंदू पेशव्यांनी आपल्याच धर्म बांधवावर करून आपल्या नावाला अक्षय काळोखी लावून ठेवली. पेशवाई झाली हीच मोठी चूक झाली, असे जे मुमुक्षकर्ते पांगारकर व इतर निस्पृह इतिहासकार म्हणतात ते सर्व दृष्टींनी विचार केल्यास वाजवी नाही असे कोण म्हणेल ?”

    राज ठाकरेंनी टिळकांचा उदोउदो करतांना हा उतारा वाचला नसणार. वाचला असता तर ते टिळकांना घेऊन मिरले नसते.  टिळकांची हिंदू-मुस्लीम वाद लावण्यात काय भूमिका होती याचा परखड समाचार त्यांनी घेतलेला आहे.

    प्रबोधनकार ‘संस्कृतीचा संग्राम’ मध्ये म्हणतात,

    ” जात्याच अत्यंत महत्वकांक्षी व वरचढ प्रवृत्तीच्या टिळकांना स्वदेशी मुसलमानांच्या संस्कृती साधर्माचे भान राहिले नाही आणि गणपतीचे मेळे व शिवाजी उत्सव या दोन दुधारी पात्याच्या तलवारीच्या हातवाऱ्याने त्यांनी हिंदू-मुसलमानांच्या भावना अधिकच क्षुब्ध व छिन्नभिन्न केल्या…..महाराष्ट्रातील मुसलमान हे हिंदूर्यवन: असे असून, बाह्यांगावरील कपड्यांशिवाय त्यांच्यात व हिंदुत कसलाही भेद नाही. त्यांची राहणी,आचार -विचार, उदरभरणाचे व्यवहार, संसाराची सुखदुःखे सर्वस्वी हिंदूंप्रमाणेच एकजिनसी आहेत. कारण ते जात्या मूळचे हिंदूच. पूर्वजांवर झालेल्या धर्मांतराच्या बळजबरी मुळेच ते आमच्या रक्तमासाचे आप्त संबंधी असून सुद्धा आज निव्वळ नावाला आमच्यापासून पारखे झाल्यासारखे दिसतात इतकेच….. महाराष्ट्रात तर सर्रास शुद्ध हिंदू मुशीचा मुसलमानच आढळून येतो. संस्कृतीसाम्याचा फायदा घेऊन व्यापक मिशनरी धोरणाने येथल्या मुसलमानांना कै.टिळकांनी जर आपल्याकडे ओढण्याची खटपट केली असती तर आज निदान महाराष्ट्रात तरी हा प्रश्न पुष्कळच सुटला असता खास. ‘पण ज्यांचे सर्व राजकारण मुळी जातिभेदाच्या आणि स्वजातिवर्चस्वाच्या मसाल्यांचे तेथे मुसलमानांना पुसतो कोण ? ” 

    भट – भिक्षुकशाही- ब्राह्मणांबद्दल प्रबोधनकारांची मते तर प्रचंड जहाल होती. प्रबोधनकार देवळांचा धर्म व धर्माची देवळे मध्ये म्हणतात,

    ” आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या कावळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनियेतला माणूस, माणूस असून पशूपेक्षाही पशू बनला आहे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या हलाखीचे मूळ भटांच्या पोटात आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठात नव्हे….. मनुस्मृती पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टींवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत. या तीन गोष्टी नष्ट करा, जाळून खाक करा की भिक्षुकशाही रसातळाला गेलीच. प्रदर्शनासाठी तिचा वाळवून ठेवलेला नमुनाही हाती लागणार नाही….. देवाच्या मूर्ती साठी आणि देवळांच्या किर्तीसाठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासात कोण दाखवून देईल तर त्याला वर्षभर आमची माला फुकट देण्यात येईल. म्हणे ब्राह्मणानी धर्म जागविला ! ….. कोणाच्याही मनोभावाची पर्वा न करता कडवे सुधारक या नात्याने लोकशाहीची शपथ घेऊन आम्ही स्पष्ट म्हणतो की, हे देवळे नसून सैतान खाने आहेत.” 

    याच विषयी पुढे  ‘ खरा ब्राह्मण ‘ या पुस्तिकेत प्रबोधनकार ठाकरे यांची एक लावणी आहे त्यात ते म्हणतात,

    ब्रह्मदेवाचा बाप भट बनला जी !

    झाली धर्माची पातळ भाजी !!

    चार वर्णाच्या चार कोटी जाती !

    क्षत्र वैश्यांची केली चिकनमाती !

    शूद्र दुनियेचा बामन गाजी हो !!

     देव राहिला पल्याड  ! बामण राजा अल्याड !

     त्याचं लागलं लिगाड !  जो तो भीतो,

     भटा करतो जी जी !!

     झाली धर्माची पातळ भाजी !!!

    आमदार चरण वाघमारे यांची भाजपमधून हकालपट्टी

    शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या बाबतीत झालेल्या वादावर ‘ ग्रामण्याचा साद्यंत इतिहास’  या पुस्तकात प्रबोधनकार म्हणतात,

    ” स्वराज्याचा पाया शिवाजीसारख्या महापुरुषाच्या हातून ठाकठीक बसल्यावर हिंदू धर्माचा ही पाया पुनश्च ठाकठीक बसवून धर्म व राजकारण यांची अभेद्य जोडी एकत्र करण्याचा विचार निघाला आणि त्याचे पर्यावसन शिवाजी महाराजांना शास्त्रोक्त राज्याभिषेक करावा या बेतात झाले. हा राज्याभिषेकाचा प्रश्न त्या काळच्या परिस्थितीचा विचार करता इतका महत्त्वाचा व अत्यावश्यक होता की त्याला विरोध करण्याची नुसती कल्पना करणारी मस्तकं महाराजांनी जरी तात्काळ छाटून टाकले असते तरी अफजलखानाच्या वधा इतकेच महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य केले असते असा इतिहासकारांचा शेरा खात्रीने पडला असता. परंतु शेवटी त्या महत्त्वाच्या कार्यात भटच पडला ! (आडवा आला )…… ब्राह्मणांनी व पिंगळ्यासारख्या स्वामीनिष्ठ ब्राह्मण मुत्सद्द्यांनीसुद्धा राज्याभिषेकाची कल्पना समूळ हाणून पाडण्यासाठी कास मारली. परंतु महाराष्ट्राचे भाग्य म्हणून म्हणा किंवा त्याला  स्वतंत्र राज्यस्थापनेचा ऐतिहासिक सुखसोहळा याच जन्मी याची डोळा पहायचा होता म्हणून म्हणा तत्कालीन ब्राह्मणांच्या दुराभिमानाला चित करायला अखेर एक क्षत्रिय वीरच पुढे सरसावला.”

    प्रबोधनकार ठाकरेंच्या जहाल विचारांचे असे अनेक दाखले देता येतील. मला तर वाटते जे जे राजकीय लोक प्रबोधनकार ठाकरेंचे नाव घेत आहेत त्यांनी त्यांच्या पुस्तकांचे जाहीर वाचन ठेवावे.

    महाराष्ट्र शासनाने, त्यात योगायोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत त्यांनी प्रबोधनकारांची पुस्तके माफक किमतीत उपलब्ध करून द्यावीत. त्यात महत्त्वाचे म्हणजे देवळांचा धर्म व धर्माची देवळे व खरा ब्राम्हण ही पुस्तके मोफत वाटप करायची व्यवस्था लावावी.

    पण प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाने राजकारण करणाऱ्या, ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , ना हिंदू जननायकचा खोटा मुखवटा घालून फिरणाऱ्या राज ठाकरे यांच्यात हिम्मत आहे की प्रबोधनकारांचे साहित्य जाहीरपणे वाचून दाखवतील किंवा प्रसारित करतील. त्यामुळे लोकांनी आत्ता सजग असलं पाहिजे. तूर्तास इतकेच..

    जय जिजाऊ..

    संदर्भ – 

    १) प्रबोधनकार ठाकरे समग्र वांग्मय,खंड –  चौथा-  हिंदुत्व, प्रकाशक – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

    २) प्रबोधनकार ठाकरे समग्र वांग्मय,खंड – पाचवा, प्रकाशक – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

    ३) देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे,

    प्रकाशक –  लोकायत पुणे

    ४) खरा ब्राह्मण- संपादक, गंगाधर बनबरे

    ५) इंडी जर्नलच्या मुलाखतीची लिंक – https://youtu.be/Nr-ujrthKrk

    लेखक — पंकज मधुकर रणदिवे.

    वक्ता,लेखक,ब्लॉगर,प्रवक्ता

    वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र राज्य.

    9834993421,8600073161

    Mail id – [email protected]

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी ?

    मंडळी सद्ध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ माजलाय तो म्हणजे भोंगा आणि अजाणवरून. सगळीकडे धार्मिक राजकारणाच वातावरण निर्माण झालेल आहे. मात्र आता वेळ आली आहे ती म्हणजे राज्यसभेच्या निवडणूकीची.

    राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार? हा प्रश्न सध्या सम्पूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. यासंदर्भात राजकीय क्षेत्रात जरा शिवसेनेची गुंतागुंतच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी सर्वात आधी नाव पुढे येत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज संभाजी राजे भोसले यांच.

    लाल महालातील प्रकरणावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

    संभाजी राजे भोसले यांनी स्वतःच्या स्वतंत्र पक्षाची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र राज्यसभेची निवडणूक पाहता शिवसेनेपुढे सर्वात पहिला चेहरा आला तो म्हणजे संभाजी राजे भोसले यांचा.

    मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संभाजी राजे भोसलेंना शिवसेनेची दिलेली ऑफर त्यांनी नाकारली. अशी माहिती सूत्रांकडून येत आहे. संभाजी राजे भोसले स्वतंत्र फॉर्म भरतील असा अंदाज सद्ध्या सगळीकडून लावल्या जात आहे. 

    सत्तापिपासु औरंगजेब

    शिवसेना राज्यसभेसाठी दोन उमेदवार लढवणार- संजय राऊत

    प्रसार माध्यमांशी बोलत असताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितलं की,

    ” आम्ही संभाजी राजे भोसले यांच्याबद्दल सध्या काही मत व्यक्त करू शकत नाही. शिवसेनेला कुणाला सोबत घ्यायचं आहे. हे शिवसेना ठरवेल.”

    अस संजय राऊत यांनी यावेळी सांगितल. राज्यसभेच्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये संभाजीराजे भोसलेंवर संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • स्वतःच पॅनल आणि ग्रामपंचायतवर तरुणांचा विजय

    मंडळी आपण आतापर्यंत कित्येक मतदारसंघामध्ये प्रस्थापित लोकांचं राजकारण पाहल असेल. मात्र एखाद्या गावामध्ये सर्वसाधारण कुटुंबातील तरुण मिळून पॅनल तयार करणे व गावातील लोकांची मन जिंकून ग्रामपंचायतवर स्वतःच पॅनल निवडून आणणे. अशी एखादी गोष्ट घडावी हे कल्पनेच्या पलीकडेच आहे.

    पण हे शक्य करून दाखवलं आहे अकोला जिल्ह्यातील आपोती गावामधील अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय वैभव तराळे आणि त्याच्या पॅनलने. वैभव तराळे हा तरुण गोदावरी येथील अभियांत्रिकी विद्यालयात शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असून कोरोना प्रादुर्भावामुळे घरूनच ऑनलाइन वर्ग करीत होतास.

    सत्तापिपासु औरंगजेब

    त्यामुळे त्याचा आपल्या आपोती गावातील लोकांशी संपर्क चांगल्या प्रमाणात वाढला. वैभव हा सकाळच्या इनचा जिल्हाध्यक्षसुद्धा आहे. आपल्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसतांना वैभवने केलेले हे कार्य खरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

    वैभवचे वडील एसटी महामंडळामध्ये नोकरी करतात तर आई हे गृहिणी आहे. वैभवने केलेला हा विक्रम तरुण वर्गातील प्रत्येक मनाला प्रेरणा आणि हिम्मत देणारा आहे. 

    रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड

    पॅनलमध्ये वैभव तराळेच्या बहिणीचासुद्धा विजय 

    स्वतःच अभियांत्रिकीच शिक्षण घेत असताना ग्रामपंचायतवर आपलं पॅनलतर वैभवने निवडून आणलंच. मात्र आपल्यासोबत अभियांत्रिकीच शिक्षण पूर्ण झालेल्या आपल्या बहिणीलासुद्धा विजय मिळवून देण्याच काम वैभवच्या कार्यकर्तृत्वाने साकार झालं आहे. वैभव तराळेच्या पॅनलमधील सातपैकी पाच सदस्यांनी विजय मिळवून आपोती ग्रामपंचायतवर आपला शिक्कामोर्तब केला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • लाल महालातील प्रकरणावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

    मंडळी या महाराष्ट्रात अनेक संघटना पक्ष वेगवेगळ्या घडामोडींमुळे चर्चेत येत असतात. मात्र संभाजी ब्रिगेड हा पक्ष नेहमी त्यांच्या रुबाबदार व ब्रिगेडी स्टाईलमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.

    कधी शिवरायांच्या अपमानाची पुस्तक प्रकाशित करणार भांडारकर असो, पुरंदरेच तोंड काळ करणे असो, गिरीश कुबेरला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याबद्दल धडा शिकवणे असो की मग महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगली पेटवण्याच्या हेतूने भाषण करणारे राज ठाकरे यांना चॅलेंज देणे असो.

    राज ठाकरेंची पुण्यामध्ये २२ मे ला सभा, अयोध्या दौरा रद्द

    संभाजी ब्रिगेड अशा अनेक प्रकरणात नेहमी चर्चेत आली आहे. सध्या पुण्यातील लालमहालामध्ये झालेल्या वादग्रस्त कृत्याला संभाजी ब्रिगेडने जोरदार विरोध केला आहे.

    शिवरायांच्या इतिहासाची जाण करून देणाऱ्या लाल महालामध्ये वैष्णवी पाटील, केदार अवचरे आणि कुलदीप बापट नावाची एक तरुणी आणि दोन तरुणांनी एका तमाशाचा गाण्यावर विडिओ काढल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडने या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    आजपर्यंत कुणी जन्माला आला नाही जो राज ठाकरेंना अयोध्येला आणेल- ब्रुजभूषण सिंह

    शिवरायांच्या पराक्रमाची जाणीव करून देणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची कृत्य होत असेल तर आम्ही त्याला विरोध करू. अस आव्हान संभाजी ब्रिगेडने केलं आहे. 

    गुन्हे दाखल झाल्यानंतर तरूणांनी मागितली माफी

    लाल महालामध्ये काढलेल्या विडिओबाबत तक्रार झाल्यानंतर वैष्णवी पाटील, केदार अवचार आणि कुलदीप बापट या तरूणांनी संभाजी ब्रिगेड आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली आहे. या देशामधल्या कुठल्याच महापुरुषांच्या ऐतिहासिक ठिकाणी असल्याप्रकारचे कृत्य होणार नाही. याची खबरदारी प्रत्येकाने घेणं हे काळाची गरज आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राज ठाकरेंची पुण्यामध्ये २२ मे ला सभा, अयोध्या दौरा रद्द

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सद्धया राज ठाकरे यांच्या सभांनी धुमाकूळ घातला आहे. मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथील सभेनंतर आता पुण्यामध्ये २२ मेला राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

    आतापर्यंत झालेल्या मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेत चांगलाच वाद संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाला होता. ज्यामुळे राज ठाकरे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं.

    आजपर्यंत कुणी जन्माला आला नाही जो राज ठाकरेंना अयोध्येला आणेल- ब्रुजभूषण सिंह

    त्यांनी आपल्या भाषणांमधून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला अस महाराष्ट्रातील जनतेच म्हणणं आहे. औरंगाबाद येथील सभेमध्ये राज ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या १६ अटींच उल्लंघन केल्याने राज ठाकरे आणि इतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हासुदधा दाखल करण्यात आला होता.

    ज्यामध्ये मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी एका महिला पोलिसाला धक्का देऊन पळ काढला होता. मात्र आता होणारी सभा ही २२ मे ला पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच सभागृहात होणार असून जवळपास ५००० श्रोत्यांची संख्या या सभागृहात बसू शकेल अशाप्रकारच आयोजन करण्यात आलं आहे. 

    ब्रुजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंविरोधात “आण रे तो पीडित” ट्रेंड

    राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. यासाठी त्यांनी पुण्याच्या सभेचा कारण दिल आहे. मात्र राज ठाकरे यांनी हा दौरा पुण्याच्या सभेमुळे स्थगित केला की उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार ब्रुजभूषण सिंह यांच्याविरोधामुळे स्थगित केला. हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आजपर्यंत कुणी जन्माला आला नाही जो राज ठाकरेंना अयोध्येला आणेल- ब्रुजभूषण सिंह

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येला जाण्यासाठी निघणार असून आतापासूनच त्यांच्या आगमनाची उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत अजाण आणि हनुमान चाळीसाचा मुद्दा उचलून धरला आहे.

    ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर राज ठाकरेंच्याच नावाची चर्चा सुरू आहे. नेहमी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपली भूमिका मांडणारे राज ठाकरे अचानक भाजपची बाजू घ्यायला लागल्याने भाजप आणि मनसे अशी युती भविष्यात होणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.

    ब्रुजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंविरोधात “आण रे तो पीडित” ट्रेंड

    मात्र राज ठाकरे यांनी कितीही भाजपचे गुणगान गायले तरी उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मगितल्याशिवाय अयोध्येत पाय टाकू देणार नाही अशी धमकी दिली आहे.

    ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हणाले की,

    ” महाराष्ट्रातील लोकांशी आमच कुठल्याही प्रकारच वैर नाही. जर कुणी महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये आला आणि त्याला हॉटेलमध्ये जागा मिळाली नाही, तर आम्ही त्याला आमच्या घरी राहू देऊ. मात्र राज ठाकरेंना कधीच नाही आणि त्यांना अयोध्येत आणणारा आजपर्यंत कुणी जन्माला आला नाही.”

    अस म्हणत ब्रुजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना विरोध केला आहे. 

    जोपर्यंत राज ठाकरे मनसे कार्यालयात येत नाही तोपर्यंत मीसुद्धा तिथे जाणार नाही – वसंत मोरे

    एकीकडे यूपीच सरकार राज ठाकरेंचं स्वागत करीत आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचेच खासदार ब्रुजभूषण सिंह त्यांचा विरोध करत आहे. मात्र चिघळलेलं हे प्रकरण कुठल्या वळणावर जाईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राणा दाम्पत्य आणि संजय राऊत लडाखच्या थंड हवेत

    मंडळी आपल्या वक्तव्यामधून संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण तापवणारे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य आता आपलं वैर दूर करून लडाख दौऱ्यावर गेले आहेत. अलीकडे राणा दाम्पत्य आणि शिवसेनध्ये चांगलीच राजकीय लढाई होताना संपूर्ण जगाने बघितली.

    राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना चॅलेंज केलं होतं की, ते मुंबईत येऊन मातोश्रीपुढे हनुमान चालीसा पठण करूनच परत घरी जाणार. यावर शिवसेनेने आपल्या सत्तेचा वापर करत राणा दाम्पत्याला जवळपास १४ दिवस तुरुंगामध्ये ठेवण्या काम केलं होतं.

    परब आणि राऊतांसारखे माझे मुंबईत १० फ्लॅट नाहीत – रवी राणा

    तेव्हा राणा दाम्पत्य आणि संजय राऊत एकमेकांवर जोरदार टीका करतांना आपल्याला दिसत होते. तुरुंगामधून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची तक्रार दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करते अस आव्हान केलं होतं.

    मात्र आता अचानक राणा दाम्पत्य आणि संजय राऊत यांच्यामधला वाद मिटल्याकारणाने संपूर्ण महाराष्ट्र आश्चर्यचकीत झाला आहे. एकीकडे कार्यकर्ते आपल्या नेत्यांपायी एकमेकांशी आतुष्यभराच वैर करून घेत असतात. मात्र नेते दिवसभर एकमेकांवर टीका करून संध्याकाळी एकाच ताटामध्ये जेवण करत असतात. 

    उध्दव ठाकरेंची तक्रार दिल्लीला जाऊन करणार- नवनीत राणा

    राणा दाम्पत्य आणि खासदार  शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यात असच काही घडलंय. एकमेकांवर काही दिवसांपूर्वी जोरदार टीका करणारे राणा दाम्पत्य आणि संजय राऊत हे लडाखमध्ये एकमेकांजवळ बसून जेवण करतांनाचा विडिओ सद्ध्या व्हायरल झाला आहे. संसदीय संरक्षण समितीचे सदस्य म्हणून संजय राऊत आणि राणा दाम्पत्य सद्ध्या लडाखच्या सीमेवर आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • ब्रुजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंविरोधात “आण रे तो पीडित” ट्रेंड

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येला जाण्यासाठी निघणार असून आतापासूनच त्यांच्या आगमनाची उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत अजाण आणि हनुमान चाळीसाचा मुद्दा उचलून धरला आहे.

    ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर राज ठाकरेंच्याच नावाची चर्चा सुरू आहे. नेहमी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपली भूमिका मांडणारे राज ठाकरे अचानक भाजपची बाजू घ्यायला लागल्याने भाजप आणि मनसे अशी युती भविष्यात होणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.

    राज ठाकरे भाऊ असतील तर आम्ही भैय्या लोक आहोत – मुंबई उत्तर भारतीय विकास सेना

    मात्र राज ठाकरे यांनी कितीही भाजपचे गुणगान गायले तरी उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मगितल्याशिवाय अयोध्येत पाय टाकू देणार नाही अशी धमकी दिली आहे.

    ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हणाले की,

    ” गेल्या ६ महिन्यांपूर्वी राज ठाकरे हे मोदीजींवर आणि योगीजींवर टीका करत होते. त्यांचं अचानक ह्रदयपरिवर्तन झालं. मात्र राज ठाकरे यांची ही धार्मिक यात्रा नाही तर राजकीय यात्रा आहे. म्हणून त्यांना उत्तर भारतीय लोकांची माफी मागवीच लागेल.”

    असा इशारा ब्रुजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. आपल्या घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या पीडितांना प्रसार माध्यमांसमोर आणलं होतं. 

    भाजप खासदाराच राज ठाकरेंविरोधात अयोध्येत रॅली काढून शक्ती प्रदर्शन

     मी मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे संदर्भात पत्र लिहिलं आहे – ब्रुजभूषण सिंह

    प्रसार माध्यमांशी बोलत असतांना ब्रुजभूषण सिंह पुढे म्हणाले की,

    ” मी मा. मुख्यमंत्री योगीजींना पत्र लिहून सांगितल आहे की, राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मगितल्याशिवाय आपल्याला भेटू देऊ नका.”

    अस ब्रुजभूषण सिंह यांनी यावेळी म्हटलं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • महिलांवर हात उचलाल तर हात तोडून हातात देऊ, सुप्रिया सुळे चा भाजपाला दम

    मंडळी सद्ध्या महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रामध्ये चांगलाच गदारोळ माजत आहे. एकीकडे राज ठाकरे यांचा भोंग्याचा मुद्दा असो, राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसा मुद्दा असो, अकबर उद्दीन ओवेसी यांचा औरंगजेबाच्या कबरीवर हार चढवणे असो की मग केतकी चितळेचा शरद पवार यांची खिल्ली उडवण्याचा मुद्दा असो.

    सगळीकडे या सर्व मुद्द्यांचीच चर्चा होतांना आपल्याला दिसते आहे. मात्र आता आणखी एक नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांना झालेली मारहाण.

    १० मिनिटं पोलीस हटवा अकबर उद्दीन ओवेसी ला औरंगजेबाकडे पाठवू – नितेश राणे

    पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान हा प्रसंग घडला. भाजपाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या स्मृती इराणी यांना महागाई विरोधात पत्र देण्यासाठी गेल्या असता त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली.

    यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना भाजपाला चांगलाच दम दिला आहे. त्या म्हणाल्या की,

    ” पुण्यामध्ये भाजप आयोजित स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमामध्ये आमच्या पक्षाच्या महिला ह्या फक्त महागाईच्या विरोधात स्मृती इराणी यांना निवेदन देण्याकरिता गेल्या होत्या. मात्र त्यांना उपस्थित पोलिसांनी तिथे बसू दिल नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. मात्र महिलांवर हात उचलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जर यापुढे कुणी पण महिलांवर हात उचलताना मला आढळला तर मी त्याचे हात तोडून हातामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही.”

    अस सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं. 

    सत्तापिपासु औरंगजेब

    नवनवीन राणांवर झालेल्या अन्यायावर सुप्रिया सुळे का बोलल्या नाही ? – देवेंद्र फडणवीस 

    सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केलेल्या टिकेनंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रतिउत्तर दिल आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना फडणवीस म्हणाले की,

    ” जेव्हा नवनीत राणा यांच्यावर अन्याय करण्यात आला त्यावेळेस त्या काही बोलल्या नाही. आमच्याही पक्षाच्या महिलांना जेव्हा मारहाण झाली तेव्हापण त्या काहीच बोलल्या नाही. म्हणून सुप्रिया ताईंनी जरा विचार करून बोलावं.”

    असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir