Author: admin

  • बैलगाडा शर्यत आणि लॉकडाऊन काळातील सर्व गुन्हे मागे घेणार- राज्य सरकार

    मंडळी हल्ली कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी झाला असला तरी गेल्या ३ वर्षांपासून जगभरात कोरोना प्रादुर्भावाने सर्व नागरिक त्रस्त झाले होते. कित्येक लोकांना आपला जीव या कठीण काळामध्ये गमवावा लागला. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित करून जे नियम लागू केले होते.

    त्या नियमांचे उल्लंघन ज्या विद्यार्थ्यांनी किंवा नागरिकांनी केले. त्यांच्यावर लॉकडाऊन काळामध्ये शासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र या सर्व गुन्हा दाखल असलेल्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना आता सरकारने फार मोठा दिलासा दिला आहे. गृह विभागाने या विद्यार्थी तसच नागरिकांवर कलम १८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    मंत्रीमंडळाकडून या निर्णयाला मान्यता मिळल्यानंतर प्रक्रियेला सुरवात होईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले की,

    ” कोविडच्या काळात ज्या विद्यार्थ्यांवर किंवा नागरिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही तत्वतः कलम १८८ नुसार विद्यार्थ्यांवर व नागरिकांवर  दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेत आहोत. मंत्रिमंडळात हा विषय मांडला जाईल.”

    अस वळसे पाटील म्हणाले. 

    बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हे दाखल झालेल्यांनासुद्धा दिलासा 

    महाविकास आघाडी सरकारने ज्या प्रमाणे कोविड काळात गुन्हा दाखल झालेल्या विद्यार्थी व नागरिकांना गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हे दाखल असणाऱ्यांनासुद्धा सरकारने दिलासा दिला आहे.

    ” राजकीय किंवा बैलगाडा संबंधी जे गुन्हे असतील तर ते मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. प्रक्रियेप्रमाणे सर्व जिल्हाप्रमुखांकडून शासनाकडे निर्णय येईल. त्यानंतर सरकार निर्णय होईल आणि नंतर कोर्टात जाऊन गुन्हे मागे घेतले जातील.”

    अस दिलीप वळसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं.

  • महाराष्ट्रामध्ये फक्त सूडाच राजकारण, जनता गेली वाऱ्यावर

    मंडळी १९५१ साली जेव्हा स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक झाली होती. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या निवडणूकीमध्ये पराभव झाला होता. नंतर त्यांना एका पत्रकाराने जेव्हा प्रश्न विचारला की, मिस्टर आंबेडकर आपला या नुकत्याच झालेल्या निवडणूकीमध्ये झालेला जो पराभव आहे, त्यावर आपलं काय म्हणणं आहे?

    पत्रकाराच्या या प्रश्नाच उत्तर देताना डॉ. आंबेडकर तेव्हा म्हणाले की,

    ” आज माझ्या भारतीय देशातील जनतेने या देशाच्या लोकशाहीची ताकद संपूर्ण देशाला दाखवून दिली आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे.”

    मात्र मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण आणि आताच्या राजकीय नेत्यांचं राजकारण पाहता फार मोठी तफावत दिसून येते. महाविकास आघाडी सरकार आणि विरोधीपक्ष सर्वे एकमेकांचे पाय ओढण्याच्या मागे लागलेले आहेत. सतत एकमेकांची टीका करणे, टिंगल टवाळी करणे, विचारपीठावर बोलत असतांना विरोधी पक्षाच्या नेत्यांची नक्कल करणे. या सर्व गोष्टी सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये चालू आहे. 

     

    एकीकडे महाविकास आघाडी सरकार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर ईडीची चौकशी पाठवतात. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल केंद्र सरकार महाराष्ट्रातील महाविकास  आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडीची चौकशी पाठवतात. नंतर हाच विषय सतत चर्चेत चालू असतो.

     

    महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रतिदिवस दोन शेतकरी आत्महत्या करतात. याकडे सरकारच लक्ष नाही. एसटी कामरच्याऱ्यांचं त्यांच्या हक्कासाठी गेली कित्येक महिने आंदोलन चालू आहे.  ज्यामध्ये अनेक एसटी कर्मच्याऱ्यांनी स्वतःचा जीव गमावला, तरी या सरकारला जाग आली नाही. विरोधी पक्षाने किरीट सोमय्याला फक्त महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची अवैध संपत्ती शोधण्यासाठी कामाला लावलं आहे.

     

    पण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांच्या प्रश्नांसाठी कधीच विरोधीपक्षाला बोलायचं नसत. जिकडे तिकडे फक्त ‘याला आडव त्याची जिरव’ नुसता हाच प्रकार चालू आहे. म्हणून आता जनतेने सतर्क होण्याची वेळ आली आहे. जनतेच्या जीवाची निलामी करणाऱ्या या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवून देणं हे जनतेच्या हातामध्ये आहे. म्हणून सावधान रहा.

  • १९९२ च्या दंगळीच्यावेळी मुंबईला वाचविणाऱ्या शिवसैनिकांना छळू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    मंडळी महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात गदारोळ चाललाय. एकीकडे सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी मोफत घर देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून संपूर्ण महाराष्ट्रातून सरकारची टीका होत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लादण्यात व्यस्त झालं आहे.
     
     
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. विरोधी पक्षीय नेत्यांच्या मालमत्तांवर छापे टाकणारी ‘ ईडी ‘ आहे की तुमचा घरगडी, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये केला.
     
     
    सक्तवसुली संचालनायलाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीवर मंगळवारी कारवाई केली. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बोलत होते. मुखमंत्र्यांनी वाटल्यास मला तुरुंगात टाका पण १९९२ च्या दंगलीच्या वेळी मुंबईला वाचविणाऱ्या शिवसैनिकांना त्रास देऊ नका, असे आवाहनही भाजपला दिले आहे. 
     
     
    मंडळी ईडीची छाप फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मालमत्तेवरच पडत असते का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण जनतेचे प्रश्न सोडून केंद्र सरकार हे भारतीय देशातील तमाम जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. या देशामध्ये अनेक प्रश्न केंद्र सरकारला सोडवण्यासाठी आहे. मात्र त्या सर्व बाबींवर त्यांचं केव्हाच लक्ष जात नाही.
     
     
    एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि एल.पी.जी. सिलेंडरचे भाव वाढवून केंद्र सरकार निवांत बसल आहे. तर दुसरीकडे अशा मुद्द्यांवर भारतातील जनतेच लक्ष जाऊ नये. यासाठी ते हिंदू मुस्लिम, ईडी लावणे या सर्व गोष्टी करत असत. म्हणून भारतीय देशातील प्रत्येक व्यक्तीन आता सतर्क रहायची वेळ आली आहे 
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का? – माजी आमदार हर्षवर्धन पाटील

    मंडळी महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील राजकीय घडामोडींनी सम्पूर्ण राज्यात सध्या धुमाकूळ घातला आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी मोफत घर देण्याच्या निर्णयाने त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभरातून टीका केली जात आहे.
     
     
    आमदारांना मुंबईत मोफत घरे देण्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घोषणेवरून ही घरे मोफत दिली जाणार नाही तर त्यासाठी ७० लाख रुपये मोजावे लागतील, अशी सारवासारव गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील आमदारांना तसेच मुंबईत मालकीचे घर असणाऱ्यांना घरे दिली जाणार नाहीत.
     
     
    असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र अस असलं तरी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली जात असतानाच यासंदर्भात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत का नाहीत? असा प्रश्न माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे. आणखी बऱ्याच मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस गप्प असतात. अस सुद्धा ते म्हणाले. 
     
     
     काय म्हणाले हर्षवर्धन पाटील ?
     
     
    मंडळी महाराष्ट्र सरकारच्या विविध निर्णयामुळे जेव्हा सम्पूर्ण महाराष्ट्रभरातून टीका होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीवर कमालीची टीका करताना दिसत असतात. मात्र सर्वपक्षीय आमदारांना घरे वाटपाचा निर्णय असो की, एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा असो या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस का बोलत नाही?
     
     
    असा प्रश्न माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की,
     
     
    ” एसटीच्या कर्मचारी संपापासून तर आतपर्यंत चाललेल्या वेगवेगळ्या योजनांमध्ये ३० ते ४० टक्के कट लावण्यापर्यंत दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये या आमदार लोकांना घर देणं सरकारला कस काय परवडल? राज्यात प्रचंड आर्थिक संकट असतांना सरकार उधळपट्टी करतंय आणि आता देवेंद्र फडणवीस तोंडात बोळा घालून बसले आहेत.”
     
     
    असा प्रश्न माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे.
  • आमदारांना घर मोफत नाही – जितेंद्र आव्हाड

    मंडळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घर उपलब्ध करून देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारमार्फत केली होती. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरून संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
     
     
    जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय जाहिर केल्यानंतर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य वर्षानुवर्षे घर मिळावं यासाठी म्हाडाकडे अर्ज करत असताना आधीच इतके श्रीमंत असणाऱ्या आमदारांना मोफत घर कशासाठी? अशी विचारणा केली जात आहे.
     
     
    भाजपाच्या काही नेत्यांनीही या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या विषयावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना ते म्हणाले की,
     
     
    ” आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच हा वर्षाव केला जात आहे. दोन कोटींचा आमदार निधी कोरोना असतांनाही चार कोटी केला. ड्रायव्हरचे साहाय्यकाचे पगार वाढवले. त्यात आता घर दिली जाणार आहेत. कशासाठी घर पाहिजेत? माझं मुंबईत घर नाही. तरीही हे पैसे तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांना , शेतकऱ्यांना द्या. यासाठी मी आग्रही असेल.”
     
     
    अस ते म्हणाले. 
     
     

    जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण

     
     
    मंडळी जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घर वाटपाच्या निर्णयामुळे सम्पूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय वातावरण हे चांगलच तापलं आहे. मात्र या सर्व प्रकरणावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता ट्विट करून स्पष्टीकरण दिल आहे.
     
     
           ते म्हणाले की,
     
     
    ‘आमदारांना घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत + बांधकाम खर्च ( अपेक्षित खर्च ७० लाख ) याची किंमत आकारण्यात येणार आहे.”
     
     
    अस त्यांनी ट्विट करून म्हटलंय. आता यावर विरोधी पक्षनेते काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • आमदार पळून जातील व सरकार पडेल या भितीनेच हा वर्षाव केला जात आहे- चंद्रकांत पाटील

    मंडळी जी जनता इथल्या आमदारांना विकासाच्या अपेक्षेपोटी निवडून देते, ज्या गरीब जनतेच्या भरवश्यावर हे नेते मंडळी आमदार झालीत त्या जनतेतील काही कुटुंबांना घरं नसतांना राज्यसरकारचा सर्वपक्षीय आमदार मंडळींना कायमस्वरूपी घर देण्याचा निर्णय अत्यंत निंदनीय आणि न समजणांरा आहे.
     
     
    मुंबईत आमदारांना कायम स्वरूपी घरे देण्यात येतील, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मुंबईत स्वस्तात घर मिळावे अशी सर्वपक्षीय आमदारांची मागणी होती. गेल्याच आठवड्यात आमदार निधीत एक कोटी रुपयांची वाढ करून तो पाच कोटी रुपये करण्यात आल्यावर,
     
     
    आमदारांना आता कायमस्वरूपी घरे देण्याची घोषणा झाल्याने आमदार मंडळी खुश झाली आहेत. मात्र या निर्णयाची सम्पूर्ण महाराष्ट्रभरातून टीका केली जात आहे. ठाकरे सरकारचा हा जाणीवपूर्वक केलेला निर्णय अत्यंत मूर्खपणाचा कळस गाठाणारा निर्णय आहे. 
     
     

    काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

     
     
    मंडळी एकीकडे केंद्रसरकार पेट्रोल डिझेलचे भाव वाढवून जनतेचा आर्थिक बळी घेत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातल ठाकरे सरकार जनतेच्या आशा अपेक्षांवर लात ठेवून स्वतःच पोट भरण्याच्या मागे लागलं आहे. या महाराष्ट्रातील असंख्य प्रमाणात जनता बेघर असतांनाही ठाकरे सरकारचा सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घर देण्याचा निर्णय अत्यंत निंदनीय आहे.
     
     
    यावर भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर चांगलीच टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना ते म्हणाले की,
     
     
    ” आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच हा वर्षाव केला जात आहे. दोन कोटींचा आमदार निधी कोरोना असतांनाही चार कोटी केला. ड्रायव्हरचे साहाय्यकाचे पगार वाढवले. त्यात आता घर दिली जाणार आहेत. कशासाठी घर पाहिजेत? माझं मुंबईत घर नाही. तरीही हे पैसे तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांना , शेतकऱ्यांना द्या. यासाठी मी आग्रही असेल.”
     
     
    अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. मात्र आता यावर महाविकास आघाडी सरकारमधील कुठला नेता प्रतिक्रिया देईल. यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.
  • संजय राऊत यांच्या भावाची भाजपला शिवीगाळ

    मंडळी महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचा घटक आणि शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे नेहमी राजकिय घडामोडींमध्ये सतत चर्चेत असतात. राजकिय नेत्यांची वादावादी असो की इतर काही कार्यक्रम असो. ते एक राजकारणाचा महत्वाचा घटक आहे.
     
     
    पण आता त्यांचे बंधू व शिवसेना आमदार सुनील राऊत हे सुद्धा एका विधानामुळे चर्चेत आले आहे. मात्र हे विधान राजकीय जरी असलं, तरी यामध्ये ते चक्क भाजपला शिवीगाळ करताना दिसत आहेत. त्यांच्या या विधानाचा विडिओ सद्ध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
     
     
    सुनील राऊत यांनी भाजपबद्दल केलेल्या या विधानामुळे संपूर्ण राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या डोकेदुखीमध्ये आणखी वाढ झाल्याचं सुनील राऊत यांच्या विधनावरून दिसून येत आहे. 
     
     

     नेमकं काय आहे प्रकरण? 

     
     
    मंडळी राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा केंद्रबिंदू असलेले संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर केलेल्या विधानाने संपूर्ण राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ३० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये सुनील राऊत भाजपाला शिवीगाळ करताना दिसत आहे.
     
     
    ” ये * भाजपावाले ढुंढ रहे है पैसा किधर है…ओ पागल*लोग…उनको मालूम नहीं मेरे पास पैसा नहीं है…मेरे पास ये प्यार है…क्या उखाडेंगे हमारा? जो करना है करो”
     
     
    अस सुनील राऊत या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. मात्र आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. 
  • कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही ‘ मिटकरींचा मनसे नेते अमेय खोपकर यांना टोला

    It is not my nature to tear a dog, 'said Ameya Khopkar, MNS leader of Mitkari

    मंडळी छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता तर संपूर्ण जगाच प्रेरणास्थान आहे. त्यांनी केव्हाच तिथी, पंचांग यावर विश्वास केला नाही, तर मनगटाच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं. मात्र काही ब्राम्हणी विचारसरणीचे लोक छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला चमत्कार दाखवून त्यांचं दैविकरण करण्याचं काम वर्षनुवर्षे झाले करत आहे.
     
     
    शिवरायांचा तिथीनुसार शिवजयंतीचा वाद कालसुद्धा नेहमीप्रमाणे उफाळून आला. शिवरायांची जयंती तिथीनुसार साजरी करणाऱ्या मनसे पक्षातील नेते अमेय खोपकर आणि पुरोगामी विचारसरणीचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच वादावादी झाली.
     
     
    यावेळी त्यांनी एकमेकांची अक्कल काढली होती. अमोल मिटकरी यांनी शिवजयंती ही १९ फेब्रुवारीलाच साजरी झाली पाहिजे अशी भूमिका मांडली होती. यामध्ये मतदानाचा राजकारण दिसतय असंही ते म्हणाले होते. यावर अमेय खोपकरांनी
     
     
    “आपण दरवर्षी दिवाळी, गणपती , हिंदू धर्माचे सण साजरे करतो ते तारखेनुसार साजरे करत नाही. महाराष्ट्रातील नाही, देशातील नाही, जगातील सर्व लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा एक सण आहे.”
     
     
    अस ते म्हणाले. मात्र अमोल मिटकरी यांनी अमेय खोपकर यांना चांगलाच चोप दिला. 
     
     
                    वृत्तवाहिन्यांवर सुरू झालेली मिटकरी आणि खोपकर यांच्यामधली ही लढाई ट्विटरवर पाहायला मिळाली. अमेय खोपकर यांनी मिटकरी यांना टोला देत ट्विट केलं की,
     
     
    ” अशा राष्ट्रवादीच्या आमदारांना भर चौकात फटके हाणले पाहिजे.”
     
     
    यावर अमोल मिटकरी यांनीसुद्धा प्रतिउत्तर देऊन ट्विट करतांना खोपकर यांना चांगलाच दम दिला आहे. ते म्हणाले की,
     
     
    ” माझ्यासवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही.”
     
     
    अमोल मिटकरी यांनी खोपकर यांना दिलेला हा टोला चांगलाच चर्चेत आहे. मात्र तिथीनुसार शिवजयंतीचा पेटलेला हा वाद आता कुठल्या थराला जातो. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • तिथीनुसार शिवजयंतीची कारण नसताना चर्चा नको- अजित पवार

    मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार शिवजयंतीचा वाद काही नवीन नाही. ब्राम्हणी विचारधारेचे लोक शिवरायांची जयंती हे तिथीनुसार साजरी करत असतात. तर १९ फेब्रुवारीला शिवरायांची खरी शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरू केली होती. मात्र शिवरायांच्या जयंतीचा वाद हा आता विधिमंडळात पण उफाळून आला आहे.
     
     
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन केल्याने सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. सरकारची नेमकी भूमिका काय आहे. अशी विचारणा करत त्यांनी मुख्यमंत्री साजरी करत असतील तर सरकार म्हणूनही आज शिवजयंती साजरी करण्याचा आदेश द्या अशी मागणी त्यांनी केली.
     
     
    मुनगंटीवार म्हणाले की,
     
     
    ” आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती असून मुख्यमंत्री स्वतः एका कार्यक्रमात गेले आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहेत. राज्य सरकारची नेमकी भूमिका काय?”
     
     
    अशी विचारणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यावर विधिमंडळातील वातावरण चांगलच तापलं होत. 
     
     
    मुनगंटीवारांना अजित पवारांचं उत्तर 
     
     
            महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद थेट विधिमंडळात पोहचल्यानंतर अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना चांगलच प्रतिउत्तर दिल आहे. अजित पवार यांनी जवाब देतांना म्हटलं की,
     
     
     
    ” सरकारच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तिथे गेले आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आली आहे. आम्हीदेखील सरकारमध्ये असताना तारखेप्रमाणे साजरे करायचो. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, सपा, भाजपा कोणत्याही पक्षाच्या सदस्याला तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायची असेल तर महाराजांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन करू शकतात. कारण नसतांना वेगळी चर्चा नको. सरकारी अधिकाऱ्याला १९ फेब्रुवारीला सरकारी सुट्टी देतो त्याप्रमाणे ते साजरी करतात. आज सुट्टी नसून काम सुरू आहे. अशी अजित पवारांनी विधिमंडळात प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांना दिली. आता हा शिवजयंतीचा चिघळलेला वाद कुठल्या वळणावर जाईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • मंगळवारी लोकसभेत अस काय घडलं की उपस्थित सर्व सदस्यांना हसू आवरले नाही ?

                मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकारण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये जरी तापलं असलं तरी मंगळवारी अधिवेशनादरम्यान घडलेल्या एका किस्स्याने लोकसभेतील संपूर्ण वातावरण तणावमुक्त करण्याचं काम केलं. मंडळी आपण बघतो की राजकारणामध्ये राजकीय मंडळी आक्रोशाने एकमेकांवर टीका टिप्पणी करतांना दिसतात.
     
     
    एकमेकांची खिल्ली उडवताना दिसतात. मात्र काही वेळेस असे किस्से घडून येत असतात की, त्यामुळे त्यांना पण सामाजिक सळोख्याची थोडी जाणीव होत असते. असाच काही किस्सा मंगळवारी लोकसभेत घडला आणि सत्ताधारी व विरोधी बाकांवरच्या सदस्यांमध्ये एकच हास्य निर्माण झाले. हा संपूर्ण किस्सा घडवून आणला तो म्हणजे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी.
     
     
    त्यांच्या एका टिपणीवर विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी हसून दाद दिली आणि थोडा काळ सभागृहातल वातावरणसुद्धा तणावमुक्त झालं. संसदीय अधिवेशनात मंगळवारी लोकसभेत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधील लोकल फेऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला.
     
     
    तसेच, एसी लोकलऐवजी नॉनएसी लोकलच्या पर्यायाविषयीदेखील त्यांनी भूमिका मांडली. जवळपास १० मिनिटाच्या आपल्या भाषणाच्या अगदी सुरवातीलाच श्रीकांत शिंदे यांनी लगावलेला टोला सदस्यांमधला तणाव शांत करून गेला. 
     
     
                लोकसभेच्या तालिका अध्यक्ष यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला आणि त्यांना बोलण्याची संधी दिली. श्रीकांत शिंदे भाषणासाठी उभे राहल्यानंतर त्यांच्या मागे बसलेल्या खासदारांनी श्रीकांत शिंदे कॅमेऱ्यामध्ये दिसत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी यासंदर्भात म्हटलं की,
     
     
    ” अरे कॅमेरा दाखवा, कॅमेऱ्याला मी सापडत नाही आहे बहुतेक.”
     
     
     
    हे विधान करताच संपूर्ण सभागृह खळखळून हसू लागलं. आणि संपूर्ण वातावरण हे तणावमुक्त झालं.