Category: ऐतिहासिक राजकारण

  • जेव्हा बाळासाहेबांना पवारांनी मातोश्री सोडायला सांगितल…

    मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये बहुधा आपण बघत असतो की, राजकीय नेते राजकारणात जरी एकमेकांविरोधात टीकाटिप्पणी करत असले, तरी ते दैनंदिन जीवनात एकमेकांचे चांगले मित्र असतात. मग ते गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख असो की इतर राजकीय नेते असो.

    शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामधलीही मित्रता अशीच काही होती. जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला धोका असल्याचं शरद पवार यांना कळलं होतं. तेव्हा पवारांनी आपली मित्रता बाळासाहेबांप्रती दाखवली होती.

    आणि त्या घटनेनंतर दादा कोंडके शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक झाले…

    बाळासाहेबांच्या जीवाला अज्ञातांकडून धोका आहे हे कळताच शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांना फोन करून संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि मातोश्री सोडण्याची विनंती केली होती. हा किस्सा नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितला होता.

    ते म्हणाले की,

    ” ज्या वेळेला साहेबांना धोका होता. शरद पवारांनी त्यांना फोन करून सांगितलं तुम्ही लगेच मातोश्री सोडा. मग साहेब अज्ञात स्थळी जाणार होते. त्यांनी मला बोलावलं, तू तुझी जीप घेऊन ये. बाकी कुणाला सांगू नको. मी घरातून निघालो की तू पाठी यायला पाहिजे. तेव्हा मी माझी जीप घेऊन लगेच निघालो. बाळासाहेब अज्ञात स्थळी गेल्यानंतर मी स्वतः त्यांच्यासोबत होतो. त्यांना टेरीरिस्टपासून तेव्हा धोका होता. मुंबईतील बांदऱ्यातल्या एका अज्ञात स्थळी बाळासाहेब ठाकरे हे काही दिवस थांबले होते.”

    अस नारायण यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितलं होतं. 

    आनंद दिघे च्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेब ठाकरे झाले होते अस्वस्थ…

    बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीने संपूर्ण राजकीय नेत्यांपुढे एका उत्तम राजकारणाचा आदर्श ठेवला होता. तोच आदर्श घेऊन आजच्या राजकीय नेत्यांनी राजकारण कस करावं आणि राजकीय मित्रता पाठीत खंजीर खुपसणारी नसावी हे समजून घेणं महत्वाचं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जेव्हा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला…

    मंडळी सध्याच्या परिस्थितीमध्ये जे वर्तमानपत्र आपण वाचतो किंवा इतर समाज माध्यमांवर ज्या बातम्या आपण वाचतो त्या खरच समाजपयोगी असतात का? सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या असतात   का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील.

    मात्र काहीच वर्तमानपत्रे असे आहेत जी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निडरपणे मांडत असतात. सध्याच्या काही वृत्तपत्रांमध्ये जो निडरपणा आला आहे तो डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यामुळेच आला आहे असं म्हणायला हरकत नाही.

    कोलंबिया विद्यापीठातून परतलेल्या डॉ. आंबेडकरांना आपल्या समाजातील अस्पृश्यांचे प्रश्न मांडणार एकही वृत्तपत्र दिसत नव्हतं. परिवर्तन चळवळींसाठी त्यांना व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या वृत्तपत्राची गरज होती.

    सार्वकालिक आंबेडकर

    त्यांनी एकदा समाजहीताची बातमी टिळकांच्या केसरी या वृत्तपत्रामध्ये छापण्यासाठी पाठवली. त्यासोबत ३ रुपयेसुद्धा पाठवले होते. मात्र पैसे देऊनसुद्धा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला होता.

    म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणार स्वतःच ‘मूकनायक ‘ नावाच स्वतंत्र वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वृत्तपत्र काढण्यासाठी भरमसाठ पैशांची गरज होती.

    अशा परिस्थितीमध्ये तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘मूकनायक’ वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहले. 

    प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

    मूकनायकात तुकोबांचा अभंग 

    क्वचीतच लोकांना माहिती आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संत साहित्याचे गाढे अभ्यासकसुद्धा होते. संत तुकाराम महाराजांच्या साहित्याचा डॉ. आंबेडकरांवर चांगलाच प्रभाव होता.

    त्यांनी संत तुकारामांच्या

    ” काय करू आता धरुनीया भिड। निःशंक हे तोंड वाजविले।। नाही जगी कुणी मुकीयांचा जाण। सार्थक लाजून नव्हे हित।।”

    या अभंगाने मूकनायक वृत्तपत्राची सुरवात केली होती.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • शंभु बंध्यो बजरंग……!!

    परकीय सत्ताधीशांच्या अत्याचाराने ग्रस्त झालेल्या भारत भुमीला रायगडावर राज्यभिषेक करून प्रतिइंद्र छत्रपती होत थोरले स्वामी शिवाजी महाराजांनी मुक्त केले आणि मराठ्यांच्या प्रचंड इतिहास ची उद्दंड लिखाणाला नव्याने सुरुवात झाली . 

    महाराष्ट्र ते कर्नाटक, आंध्रप्रदेश पासून श्रीलंका पर्यंत स्वराज्याची सिमा वाढली..

    पण हनुमान जन्मोत्सवाला   ( ३ एप्रिल १६८०) ला दख्खनपतींनी स्वराज्याचा निरोप घेतला आणि महाराष्ट्रावर आपल्या आशिर्वादाचे वर्षाव करून छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी झाले…

    परकीय रक्तपिपासुंच्या डोक्यात स्वराज्य संपवण्यासाठी डाव आखायला सुरुवात झाली.. सोबतच स्वकीय सुद्धा स्वराज्य पोखरून काढण्यासाठी वारूळ उभे करायला लागली आणि स्वराज्य संपवण्यासाठी स्वप्न बघणार्या डोक्यावर वज्रघात करत खास्या महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती शिवछत्रपतींचा वारसा सामर्थ्याने पुढे चालवण्यासाठी बत्तीस मण सुवर्णसिहासनपती पुढे आले ,

    दिल्लीपतीच्या छातीवर रौद्रभीषण तांडव करण्यासाठी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज दख्खन तख्तावर बसले…

    बुरहाणपुर वर जाऊन खासा मोघल बादशहा शहेनशहा औरंगजेब चीच दाढी ओढली आणि खासा औरंगजेब या तेवीस वर्षाच्या छत्रपतींना संपवण्यासाठी महाराष्ट्रात उतरला..

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    आणि सुरू झाली इतिहासाने कधीच न बघितलेली झुंज हसनअलिखान , शहाबुद्दीन, फत्तेखान, मुअज्जम ,आज्जम , रणमस्तखान , पोर्तुगीज, सिद्दी सर्वांच्याच तोंडचे पाणी या तेवीस वर्षाच्या  पोराने पळवले .

    खासा आलमगीर म्हणवणाऱ्या औरंगजेब ला आपल्या डोक्यावरचा ताज ए हिंद किमांश फेकून द्यावा लागला..

    एक एक गड सहा सहा वर्षे झुंझायला लागला , खवळलेल्या समुद्राला आणि फुटलेल्या बांधाला सुद्धा या रौद्रशंभुच्या घोड्याच्या टापाखाली यावं लागलं ,

    आंध्रप्रदेश, बिहार, बंगाल च्या मातीलाही मराठ्यांच्या शौर्याची धडकी भरली , जिवन म्हणजे पेटतं रणांगण

    आणि

    जिवन तर जिवन मृत्यू ला सुद्धा आमचा राजा असा पुढे गेला की शत्रू ला सुद्धा थरकाप उडाला..

    चाळीस दिवस मरणयातना सहन करत असतांना सुद्धा आपली मान खाली घालण्यासाठी तयार न होता धीरोदात्तपणे मरण स्विकारलं आणि मराठा साम्राज्याच्या रक्तात शौर्याचं धग पेटवून हिंदुस्थान वर राज्य करण्याचं स्वप्न जिवंत केलं.

    सत्तापिपासु औरंगजेब

    पण कलमकसायांनी ज्याच्या शौर्याला आपसूकच पुसण्यासाठी हळुवारपणे शाईचे पाणी फेकले…

    ज्याच्या बुद्धिमत्तेवर ते शौर्यावर प्रश्न उपस्थित केले , ज्याला नादात नादान असलेला सांगितले…

    गेली शतके पार होऊन सुद्धा ज्यांच्या इतिहास ला लोकसमक्ष  आणण्यासाठी  वा.सी बेंद्रे, कमल गोखले, विजयराव देशमुख सारख्या  इतिहास कारांना झगडावं लागलं…

    ज्याचा इतिहास हाच एक जाज्वल्य अग्नी प्रमाणे आहे…ज्याचं चरित्र हे गंगेच्या निर्मळ पाण्याप्रमाणे आहे आणि ज्याचं योद्धापण रूद्रशिवाचा तांडव आहे..

    अश्या छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास आता पुढे येऊन सुद्धा आम्ही आमच्या राजाला काय दिले नेमके?

    छत्रपती संभाजी महाराज यांना अजूनही महाराष्ट्राध्ये शासकीय महापुरुषांच्या यादीत स्थान नाही , त्यांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय नाही.

    सरकार वर सरकार पालटले पण ती यादी जैसे थेच आहे.

    आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर करु शकत नाही.

    महाराष्ट्र शासनाच्या महापुरुषांच्या दिनविशेष यादी मध्ये शंभुराजेंचं नाव नाही.

    फडणवीस काळात माननीय दिनदयाल उपाध्याय यांचे नाव शासकीय दिनविशेष यादीमध्ये आले ,

    या वर्षी नव्याने आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचे नाही.

    नेमके काय कारण आहे या राज्यकर्त्यांपुढे ? नेमकी समस्या काय आहे की एवढे वर्षे पालटुन सुद्धा शंभुछत्रपतींना शासकीय महापुरुषांच्या यादीत स्थान दिल्या गेले नाही.

    का हा दुजाभाव आमच्याच राजाबद्दल आमच्याच स्वराज्यात.?

    नेमकी शंभुछत्रपतींना खरी मानवंदना कधी?

    ✍️अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • १९९९ ला नारायण राणेंमुळे होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री

    मंडळी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अनेक उलटफेर सम्पूर्ण महाराष्ट्राला दिसून आले. ज्याप्रमाणे २०१९च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमण्यात विलंब झाला होता.

    त्याचप्रमाणे १९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्येसुद्धा मुख्यमंत्री नेमण्यात मोठ्या प्रमाणात वेळ झाला होता. तर मंडळी झालं असं की, १९९९ ला शरद पवार यांनी आपल्या स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढली होती.

    १९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?

    या निवडणुकीमध्ये शिवसेनेला ६९, भाजपा ६५, काँग्रेस ७५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ जागा मिळाल्या होत्या. भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करणार होते. मात्र शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या एकूण आमदारांची संख्या ही १३४ भरली आणि सरकार स्थापन करण्यासाठी आणखी ११ जागांची म्हणजे एकूण १४५ जागांची गरज होती.

    यावेळी शिवसेनेच सरकार स्थापन झाल असत. मात्र जेव्हा उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचा उमेदवारी वाटप केला तर १५ उमेदवारांना डावलण्यात आलं. तेव्हा त्या १५ उमेदवारांनी इतर पक्षांकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवली. ज्यामध्ये ११ उमेदवार निवडून आले.

    गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता

    तेव्हा जर या उमेदवारांना उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेला सरकार स्थापन करण्यात अडचण गेली नसती. 

    गोपीनाथ मुंडेच्या मुख्यमंत्री होण्याला राणेंची नाराजी 

    ज्या प्रमाणे शिवसेनेच सरकार स्थापन न होण्याला उध्दव ठाकरे जबाबदार होते. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे हे मुख्यमंत्री न होण्याला नारायण राणे जबाबदार होते. १९९९ ला शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची सरकार स्थापन करण्याची तयारी झाल्यानंतर  भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री होण्याची ईच्छा व्यक्त केली.

    यावर बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना त्यांचं मत विचारल्यानंतर नारायण राणे यांनी प्रत्यक्षपणे विरोध न करता म्हटलं की ” गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होवो की न होवो मात्र मी त्यांच्या मंत्रिमंडळात काम करणार नाही.” अस सांगून नारायण राणे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मुख्यमंत्री होण्याला अप्रत्यक्षपणे विरोध केला होता. हे नारायण यांनी आपल्या आत्मचरित्रातसुद्धा सांगितलं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • १९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?

    मंडळी भारतीय देशाच्या राजकीय इतिहासामध्ये जर आपण डोकावून बघितलं तर अनेक गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिक वाढेल. महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षाचे सरकार स्थापन झाले.

    मात्र १९७८ मध्ये अशा एका पक्षाच सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल होत. ज्याच्याबद्दल क्वचितच लोकांना माहिती असेल. १९७५ साली अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवली.

    गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता

    जेष्ठ नेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशात आणीबाणीचे आदेश दिले. या आणीबाणीला देशातील जनतेने तीव्र विरोध केला आणि १९७७ मध्ये ही आणीबाणी मागे घेण्यात आली.

    याच काळामध्ये झालेल्या एका निवडणूकीमध्ये विरोधी पक्षांच्या संघटनेतून जन्माला आलेल्या ‘ जनता पक्षाने ‘ काँग्रेसचा दारुण पराभव केला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला नाराज होऊन काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले.

    इंदिरा गांधी यांचा एक गट आणि ब्रह्मनंद रेड्डी व यशवंतराव चव्हाण यांचा दुसरा गट तयार झाला. महाराष्ट्रात वसंतदादा पाटील आणि शरद पवारांसारखे नेते यशवंतरावांसोबत गेले तर तिरपुडेंसारखे नेते गेले इंदिरा गांधींसोबत.

    आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

    मात्र १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या या दोन्ही गटांना जनता पक्षाकडून पराभव स्वीकारावा लागला. पण जनता पक्षाकडे बहुमत नसल्याकारणाने दोन्ही काँग्रेसने पुन्हा एकत्रित येऊन सरकार स्थापन केलं.

    महाराष्ट्रातील हे पहिल आघाडी सरकार होत. मात्र आंतरीक वादामुळे हे सरकार जास्त वेळ टिकू शकलं नाही. शरद पवार हे १९७८च्या जुलै महिन्यात आपले ४० आमदार घेऊन बाहेर पडले. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या समाजवादी पक्षाची स्थापना केली. 

    शरद पवारांनी आपल्या समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर ते जनता पक्षाशी जाऊन मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये ‘पुलोद’ म्हणजेच ‘पुरोगामी लोकशाही दल’ नावाचं सरकार स्थापन केल. शरद पवार हे देशातील सर्वात तरुण असणारे वयाच्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आणि बाबरी पाडल्या गेली…

    मंडळी हा भारतीय देश विविध जाती धर्मांच्या विविधतेने नटलेला देश म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखल्या जातो. मात्र कधी वेळ अशी येते की या देशातील जाती धर्मांमध्ये निर्माण होणाऱ्या अस्थिरतेला पारावार राहत नाही.

    आपल्या राजकीय हितासाठी राजकीय नेतेमंडळी समाजामध्ये भडकाऊ भाषणाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. असच काही घडलं होत प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये.

    प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली?

    सण १५२८ मध्ये मुगल बादशहा सेनापती मीर बाकीने बाबरी मस्जिदच निर्माण केलं होतं. मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही नेत्यांनी ही मस्जिद पाडण्याचा अट्टहास धरला होता. सण १९८४ ला विश्व हिंदू परिषदेने दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये धर्म संसद घेऊन बाबरी मस्जिदीविरोधात आंदोलन उभं केलं होतं.

    सण १९८६ ला फैजाबादच्या जिल्हा जज यांनी बाबरी मस्जिद ही वादामध्ये अडकलेली आहे असा शिक्कामोर्तब केला होता. याच मुद्द्याला जोर देऊन भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी सण १९९०ला संपूर्ण भारतीय देशामध्ये रथयात्रा काढून लोकांची मने भटकवण्याचा प्रयत्न केला होता.

    आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

    लालकृष्ण आडवाणी यांच्या या राजकीय कटाला बळी पडून ३० ऑक्टोबर १९९० ला अनेक हिंदुत्ववादी लोकं बाबरीकडे मोर्चा घेऊन धावून आली. हा सर्व गोंधळ बघून तेव्हाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी पोलीस प्रशासनाला फायरिंगची ऑर्डर दिली. ज्यामध्ये १६ लोकं मारल्या गेली.

    अखेर तारीख आली ६ डिसेंबर १९९२. गोळीबारामध्ये मारल्या गेलेल्या १६ लोकांच्या समर्थकांनी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी बाबरीवर धाबा चढवला आणि बाबरी मस्जिद पाडण्यात आली. मस्जिद पाडून त्याठिकाणी अस्थायी मंदिर बनवण्यात आले.

    ही घटना घडल्यानंतर गुन्हेगार लोकांवर दोन एफआयआर दाखल केल्या गेल्या. त्यामधील पहिल्या एफआयआरमध्ये चोरी करणे, हल्ला करणे, सार्वजनिक प्रार्थनास्थळाला ठेस पोहचवण्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले. तर दुसऱ्या एफआयआरमध्ये भाजप, आरएसएस, बजरंगदल समवेत भारतीय जनता पक्षाच्या ८ नेत्यांवर भडकाऊ भाषण देण्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले.

    ज्यामध्ये लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, अशोक सिंघल, विनय कठिया आणि मुरलीमनोहर जोशीसारखी नावे सामील होती. अशा प्रकारे ६ डिसेंबर १९९२ ला घडलेली ही घटना देशाच्या एकतेला काळिमा फासणारी ठरली.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • कारागृहात असतांना झाले आमदार

    मंडळी आपण या देशामध्ये अनेक निवडणूका बघितल्या. अनेक राजकीय नेते निवडून येतांना किंवा पराभूत होतांनादेखील बघितले. जनतेच्या दारापर्यंत जाऊन जनतेला मतदान करण्याची विनवणी करणारे अनेक राजकीय नेते आपण बघितले आहेत.

    मात्र असा एक नेता जो कारागृहामध्ये असतांना विधानसभा निवडणुकीमध्ये भरगोस मतांनी निवडून येतो. अस राजकीय क्षेत्राच्या इतिहासामध्ये कदाचित कधी घडलं असेल? होय. आपण बोलत आहोत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकप्रिय आमदार रत्नाकरजी गुट्टे यांच्याबद्दल.

    संजय राऊत आणि उध्दव ठाकरेंना १०० कोटी द्यावे लागणारच – किरीट सोमय्या

    रत्नाकर गुट्टे यांनी पहिल्यांदा २०१४ ला भाजप प्रेरित रा.स.प.कडून विधानसभा निवडणुक लढवली होती. नंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि ऐन २०१९ मधल्या निवडणूकीच्या तोंडावर त्यांना पोलीस प्रशासनाकडून अटक करण्यात आली.

    रत्नाकर गुट्टे यांनी विविध बँकांकडून सुमारे ३२८ कोटी रुपयांचा कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर घेतल्याचा आरोप त्यांच्यावर केल्या गेला होता. मात्र कारागृहामध्ये असतांनासुद्धा गंगाखेड मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगून ठेवले होते.

    प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

    रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला असल्याकारणाने मतदारसंघातील सम्पूर्ण जनता त्यांच्याबद्दल भावनिक झाली होती. 

    कारागृहात असतांना रत्नाकर गुट्टे विजयी

    वर्ष होते २०१९. गंगाखेड मतदारसंघामध्ये विधनसभा निवडणूकीची तयारी जोमात सुरू होती. भारतीय जनता पक्ष प्रेरित राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून रत्नाकर गुट्टे हे कारागृहात असतांना उभे होते. कारागृहात गुट्टे साहेब कसे काय निवडून येतील?

    हा प्रश्न सर्व जनतेला पडला असतांना गंगाखेड मतदारसंघातील जनतेने आपला विश्वास गुट्टे साहेबांना मतदान करून व्यक्त केला आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गुट्टे साहेब हे जवळपास १८००० मतांनी विजयी झाले.

    एखादा उमेदवार कारागृहामधून निवडून येऊ शकतो. हे राजकीय इतिहासामध्ये पाहिल्यांदाच घडले होते. अखेर जनतेच्या प्रेमापोटी रत्नाकर गुट्टे गंगाखेड मतदारसंघाचे आमदार झाले.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • सत्तापिपासु औरंगजेब

    30 ऑगस्ट 1659

    _” अपनोके ताबुतो से होकर अपने तख्त पर जाना पडता है  !! 

    ” असाच एक इतिहास आहे तो क्रुकर्माची सिमा लांगलेल्या राज्यरोहणाची , जिथे तख्तावर बसणारा बादशहा आपल्याच बाप , भाऊ आणि मुलांच्या किंकाळ्या  च्या आवाजास मंगलस्वर समजून तख्तावर बसला होता..

    म्हणजेच बादशहा औरंगजेब..

    पण ज्या तख्तावर हा औरंगजेब बसला होता त्या तख्ताचा खरा वारसदार मात्र कोणी और होता , ज्याचं नाव होते दारा शिकोह , बादशहा शहाजहान चा सर्वात मोठा आणि लाडका मुलगा..

    हा शहाजहान चा एवढा लाडाचा आणि जवळचा होता की इतर मुलांना दुरवर पाठवणारा शहाजहान ने दारा ला मात्र कधीच आपल्या पासून दुर जाऊ दिले नाही !!

    आपल्या तख्ताच्या बाजूला एक सोन्याचे आसन खास करून दारा साठी बनवून घेतले..

    मुळात दारा होताही तसाच , सुसंस्कृत, अभ्यासू ,सर्वांचा आदर करणारा आणि आपल्या वडिलांच्या शब्दापुढे न जाणारा !!  इतर धर्माबद्दल आदर ठेवणारा दारा जेवढा बापाचा तेवढाच रयतेच्या ही आवडीचा होता !पण हा दारा त्याच्या भावांच्या नजरेत मात्र खूप खुपायाचा !!

    आणि शहाजहान च्या म्हातारपणी नेमके हाच दाराचा राग घेऊन शाहशुजा , मुराद आणि औरंगजेब हे खासे दाराच्या विरोधात उभे राहिले..!एखाद्या व्यक्ती ची जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा सर्वात अगोदर साथ सोडून जाणारे आपलेच असतात आणि हा प्रत्यय दाराच्या इतिहास मध्ये जवळुन बघायला मिळतो..

    पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये

    मुळातच कपटी आणि महत्वकांक्षी असलेल्या औरंगजेबाने

    ” तुम्हीच खरे बादशहा !! “

    म्हणून मुर्खात काढून आपल्या मधातील एक एक भावांचा काटा काढून आग्र्याला खासा आपल्या बापाला कैदेत टाकले..

    ” खुदा ने मुझे अपने गुनाहो की सजा दी है !! पर या खुदा मेरे दारा की हिपाजत करना !! “

    असे म्हणत शहाजहान च्या नजरा बाहेर चलत असलेल्या रक्तरंजित राजकारणावर टिपलेल्या होत्या !! आपल्या लहान मुलाच्या हातुन आपल्या भावाला निशस्त्र करवून त्याच्या खोज्याचा मुडदा पाडून आपल्या विरोधात उभे असलेल्या प्रत्येक जणाची आणि ज्यांच्या द्वारे कत्तल केली

    त्यांची सुद्धा कत्तल करून सत्तेसाठी रक्तपिपासु झालेल्या औरंगजेबाची नजर ही आता कैदेत येणाऱ्या दारा शिकोह कडे होती..

    आणि हाल हाल सोसत असलेला दारा ज्याने ” आपल्या बापाला कष्ट होऊ नये म्हणून भरलेल्या डोळ्याने स्वतः साठी योद्धा पण मागितले हा रजपूत बुंदेला, मुघल, आदिलशाही आणि किती तरी कपटी मनसुब्यांना रचून कैदेत आला ,त्याची एक जॉर्जीयन बायको आपल्या जनानखाना मध्ये टाकलेल्या औरंगजेब चे आदेश सुटले आणि दारा ची छत्र नसलेल्या हत्ती त धिंड काढली !!

    पण त्या धिंड मध्ये सुद्धा आपल्या उदारतेचे दर्शन देत दाराने आपल्या अंगावरील शेवटची शाल एका भिकारी चे अंग झाकण्यासाठी फेकून दिली !! पण अश्या या सहिष्णू दारा ला कैदेत टाकून औरंगजेब ने आपला शेवटचा आदेश सोडला…

    दाराला शेवटची शिजवलेली दाळही खाऊ न देता बाहेर ओढले…आपल्या मुलाला बिलगून रडलेला दारा खेचून बाहेर काढल्या गेला आणि चर्र चर्र करत

    ” काफर रफ्त ए जहन्नुम..”

    म्हणुन दाराचे मस्तक छाटले कारण दारा  हा काही प्रमाणात हिंदू च्या पुराण वेदा कडे वळला होता ,तो मुर्ती वर श्रद्धा ठेवत म्हणून हा मूर्तिपूजक म्हणजे च काफर आहे असे औरंगजेब म्हणत !! 

    दाराचे मस्तक छाटुन औरंगजेब पुढे आणले आणि प्रकाशाचा उजेडात भावाच्या मस्तक वर तीन वेळा ठोठाऊन त्या वर किमांश चढवून “भावाचेच मुंडके आहे न ? याची सत्यता बघून औरंगजेब ने ते मुंडके दफन करण्यासाठी पाठवून दिले !! आणि अशा प्रकारे या शहजादा आणि मुघल सल्तनत च्या खर्या वारसाचा अंत झाला !!

    रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड

    अश्या रक्ताने माखलेल्या तख्तावर बसलेल्या औरंगजेबला त्याची खरी जागा दाखवली ती मराठ्यांनीच !! आपल्या सत्तेसाठी हपापलेल्या या बादशहा ची रक्तपिपासु तहान तशीच ठेवून त्या औरंगजेब ला शेवटी मराठ्यांनी आपल्या शौर्याचे पाणी पाजले !!

    मराठ्यांच्या शौर्याने आणि औरंगजेब च्या फजिती ने कुठे तरी खुश झालेल्या त्या दाराची रुह सुद्धा हसून बोलली असेल !!

    खुन से सजाया रास्ता खुन से ही लतपत होता है भाईजान !! हम तो एक घाव मे ही मर गये !! पर तुम देखो , तुम्हारी हालत देखो !! की मराठे तुम्हे रोज मारते है !!

    अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही ‘ मिटकरींचा मनसे नेते अमेय खोपकर यांना टोला

    It is not my nature to tear a dog, 'said Ameya Khopkar, MNS leader of Mitkari

    मंडळी छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता तर संपूर्ण जगाच प्रेरणास्थान आहे. त्यांनी केव्हाच तिथी, पंचांग यावर विश्वास केला नाही, तर मनगटाच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं. मात्र काही ब्राम्हणी विचारसरणीचे लोक छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला चमत्कार दाखवून त्यांचं दैविकरण करण्याचं काम वर्षनुवर्षे झाले करत आहे.
     
     
    शिवरायांचा तिथीनुसार शिवजयंतीचा वाद कालसुद्धा नेहमीप्रमाणे उफाळून आला. शिवरायांची जयंती तिथीनुसार साजरी करणाऱ्या मनसे पक्षातील नेते अमेय खोपकर आणि पुरोगामी विचारसरणीचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच वादावादी झाली.
     
     
    यावेळी त्यांनी एकमेकांची अक्कल काढली होती. अमोल मिटकरी यांनी शिवजयंती ही १९ फेब्रुवारीलाच साजरी झाली पाहिजे अशी भूमिका मांडली होती. यामध्ये मतदानाचा राजकारण दिसतय असंही ते म्हणाले होते. यावर अमेय खोपकरांनी
     
     
    “आपण दरवर्षी दिवाळी, गणपती , हिंदू धर्माचे सण साजरे करतो ते तारखेनुसार साजरे करत नाही. महाराष्ट्रातील नाही, देशातील नाही, जगातील सर्व लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा एक सण आहे.”
     
     
    अस ते म्हणाले. मात्र अमोल मिटकरी यांनी अमेय खोपकर यांना चांगलाच चोप दिला. 
     
     
                    वृत्तवाहिन्यांवर सुरू झालेली मिटकरी आणि खोपकर यांच्यामधली ही लढाई ट्विटरवर पाहायला मिळाली. अमेय खोपकर यांनी मिटकरी यांना टोला देत ट्विट केलं की,
     
     
    ” अशा राष्ट्रवादीच्या आमदारांना भर चौकात फटके हाणले पाहिजे.”
     
     
    यावर अमोल मिटकरी यांनीसुद्धा प्रतिउत्तर देऊन ट्विट करतांना खोपकर यांना चांगलाच दम दिला आहे. ते म्हणाले की,
     
     
    ” माझ्यासवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही.”
     
     
    अमोल मिटकरी यांनी खोपकर यांना दिलेला हा टोला चांगलाच चर्चेत आहे. मात्र तिथीनुसार शिवजयंतीचा पेटलेला हा वाद आता कुठल्या थराला जातो. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • अन्यथा राज्यपाल भवनाच भांडारकर करू- संभाजी ब्रिगेड

    अन्यथा राज्यपाल भवनाच भांडारकर करू- संभाजी ब्रिगेड

              मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची टीका होत आहे. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच प्रेरणादायी दैवत आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांची बदनामी करणं हे काही आता नवीन नाही आहे.
     
     
    याआधी बाबासाहेब पुरंदरे याने आपल्या ‘ राजा शिवछत्रपती ‘ या पुस्तकातून शिवरायांची बदनामी केली होती. मात्र त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याने बाबासाहेब पुरंदरेच्या तोंडाला काळ फासून शिवरायांच्या आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा सूड घेतला होता.
     
     
    यानंतर गिरीश कुबेर नावाच्या एका लेखकाने छत्रपती शिवरायांची व छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम आपल्या ‘द रेनेसन्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्रा’ या पुस्तकामध्ये केलं होतं. तेव्हा नाशिकमध्ये पार पडलेल्या ९४ व्या तथाकथित अखिल भारतीय साहित्य संमेलनात गिरीश कुबेराचं तोंड काळ करण्याचं कामसुद्धा संभाजी ब्रिगेडच्याच मावळ्यांनी केलं होतं.
     
     
    आता भगतसिंह कोश्यारी यांनी आपली हुश्यारी दाखवत मूर्खपना करतांना शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून त्यांचं कर्तृत्व कमी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. 
                औरंगाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी आपल्या भाषणादरम्यान बोलतांना म्हटलं की,
     

    ” जर रामदास स्वामी नसते तर शिवाजींना कुणी विचारलं नसत”

     
    अस त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रामदासाचा शिवरायांशी काहीही संबंध नसल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतरसुद्धा संविधानीक पदावर असणाऱ्या कोश्यारी यांनी अस बेताल वक्त्यव्य करणं त्यांच्या मूर्खपणाची प्रचिती देते.
     
     
    मात्र या देशामध्ये ही मुर्ख लोक अशाप्रकारचीच थोर पुरूषांबद्दल मूर्ख वक्तव्य वारंवार करत असतील, तर या महाराष्ट्रातील शिवप्रेमी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असाच काही इशारा संभाजी ब्रिगेडने आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला आहे.
     
     

    ‘भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सम्पूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा राज्यपाल भवनाचसुद्धा भांडारकर करण्यात येईल.”

     
     
    असा इशारा संभाजी ब्रिगेडने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला आहे.