Category: ऐतिहासिक राजकारण

  • जेव्हा पवारांना प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी जबरदस्तीने मुख्यमंत्री करण्यात आलं…

    मंडळी भारतीय देशाचं राजकारण गेल्या ४ ते ५ दशकांपासून एकाच नावाभोवती फिरत आहे. ते म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब.

    वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आमदार आणि अवघ्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणाऱ्या पवारांच्या राजकीय डावपेचांचा अंदाज भल्याभल्यांना लागला नाही.

    मात्र अनेकदा प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत येऊन प्रधानमंत्री पदाची दावेदारी मजबूत करणाऱ्या पवारांना त्यांच्याच पक्षाने म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शर्यतीतून दूर सारण्याचं काम केलं.

    पतीच्या आणि मुलांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती पदाच्या दावेदारीपर्यंत मझल मारणारी रणरागिणी

    त्यातला एक किस्सा आज आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी झालं असं की, अयोध्येमधील राम मंदीर आणि बाबरी मस्जिदीच्या वादावरून ६ डिसेंबर १९९२ साली हिंदू संघटनांनी आणि हिंदुत्ववादी पक्षांद्वारे बाबरी मस्जिद पाडण्यात आली.

    मात्र आयोध्येमध्ये घडलेल्या या प्रकरणाचे पडसाद अवघ्या काहीच दिवसांमध्ये मुंबईत उमटल्या गेले. आणि मुंबईमध्ये हिंदू-मुस्लिम दंगल घडून आली. ही दंगल तब्बल आठ दिवस चालली. पाठोपाठ साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले.

    ज्यामध्ये जवळपास शेकडो लोकांचे जीव गेले. तेव्हा केंद्रात आणि राज्यामध्ये काँग्रेसच सरकार होत. नरसिंह राव प्रधानमंत्री होते तर सुधाकर नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 

    RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा महाराष्ट्राचा मुस्लिम मुख्यमंत्री

    पवारांना अचानक मुख्यमंत्री करण्यामागचा काँग्रेसचा डावपेच

    मंडळी बाबरी मस्जिदीच्या वादावरुन मुंबईत उसळलेली दंगल हे पोलीस प्रशासनालासुद्धा आवरली नाही. या दंगलीला शांत करण्यात सुधाकर नाईक यांच सरकार अपयशी ठरल.

    पण त्यांना या कारणावरुन मुख्यमंत्री पदावरून बरखास्त करणं हे अनेकांच्या लक्षात आलं नाही. मात्र या प्रकरणाच सरळ कनेक्शन होत ते शरद पवार यांच्या प्रधानमंत्री पदाच्या दावेदारीशी.

    केंद्रातील पक्षामध्ये पवारांची लोकप्रियता आणि राजकीय संबंध हे चांगलेच बळकट होते. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा हे प्रधानमंत्री पदासाठी होऊ लागली असतांना अचानक काँग्रेसमधील काही नेत्यांना महाराष्ट्रातील दंगलीमुळे झालेल्या अस्थिरतेचा चांगलच बहाणा मिळाला.

    आणि पवारांना केंद्रातून हटवण्याच्या प्रयत्न झाला. महाराष्ट्रातील नाईक सरकार बरखास्त करण्यात आलं. आणि मुख्यमंत्री पदासाठी पवारांना परत महाराष्ट्रात पाठवण्यात आलं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • २००३च्या महाबळेश्वर अधिवेशनात अस काय घडलं की ठाकरे घराण्यात फूट पडली?

    मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वात चर्चेत असलेलं घरानं म्हणजे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंच घरानं. संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण याच ठाकरे घराण्याच्याभोवती अनेक वर्षांपासून फिरत आहे.

    बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उध्दव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे. यामध्ये राज ठाकरेंची लोकप्रियता सुरवातीपासून अधिक होती. कारण त्यांची वक्तृत्व शैली, आक्रमकता, नेतृत्वक्षमता या सर्व गोष्टी बाळासाहेब ठाकरेंसारख्याच होत्या.

    “इंदिरा गांधींकडे जाऊ नका” पवारांनी यशवंतराव चव्हाणांना दिला होता सल्ला?

    आणि राज ठाकरे हे बाळासाहेबांचा हात धरून राजकारणामध्ये आले ही गोष्ट सर्व लोकांनाच माहिती आहे. मात्र अचानक अस काय घडलं की बाळासाहेब ठाकरे असतांना राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि ठाकरे घराण्यात फूट पडली?

    याबद्दल सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी झालं असं की, २००३ साली महाबळेश्वर येथे शिवसेनेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम पार पडला आणि त्याच अधिवेशनामध्ये उध्दव ठाकरे यांची कार्याध्यक्ष पदी निवड केल्या गेली होती.

    त्यामुळे हे स्पष्ट झालं होतं की बाळासाहेबांनंतर शिवसेनेची धुरा ही उध्दव ठाकरेंच्या हातामध्ये दिली जाणार आहे. यावर राज ठाकरेंनी सांगितलं होतं की

    “बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार मीच उध्दव ठाकरेंच नाव शिवसेना कार्याध्यक्ष पदासाठी सुचवलं होत. त्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.”

    अस राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. आणि तेव्हापासूनच राज ठाकरेंचा ठाकरे घराण्याशी दुरावा वाढू लागला. 

    आणि शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल्या जाऊ लागलं…

    राज ठाकरेंच्या समर्थकांना तिकीट नाकारली…

    मंडळी उध्दव ठाकरेंची शिवसेना कार्याध्यक्ष पदी निवड होण्याने राज ठाकरेंची अगोदरच नाराजी होती. त्यावर मलम चोळण्याच काम केलं ते म्हणजे २००४ साली पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीन.

    अस म्हणतात की, २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या समर्थकांना तिकीट नाकारण्यात आली होती आणि उध्दव ठाकरे समर्थकांना महत्व देण्यात आलं होतं.

    त्यामुळे राज ठाकरेंच्या नाराजीमध्ये आणखी भर पडली होती. अखेर त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकून ९ मार्च २००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • “इंदिरा गांधींकडे जाऊ नका” पवारांनी यशवंतराव चव्हाणांना दिला होता सल्ला?

    मंडळी भारतीय देशामध्ये स्वतःच्या नेतृत्वाची ख्याती निर्माण करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल राजकीय क्षेत्रातील प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता त्यांच्या नेतृत्वाविषयी चांगलाच परिचित आहे.

    पण यशवंतराव चव्हाण यांना वाटलं असत तर ते भारतीय देशाचे प्रधानमंत्री झाले असते हे आपल्याला माहिती आहे काय? याच प्रकरणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

    महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली?

    तर मंडळी झालं असं की, भारतीय देशामध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विरोधी पक्षाच सरकार स्थापन झालं होतं. हे सरकार होत जनता पार्टीच.

    जे समजावादी पक्ष, जनता दल आणि कम्युनिस्ट विचारधारेच्या पक्षांनी मिळून स्थापन केल होत. मात्र या सरकारमध्ये हिंदुत्ववादी, समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारधारेचा वैचारिक संगम झाला नाही.

    आणि काही कालावधीतच जनता पार्टिच सरकार कोलमडून पडलं. तेव्हा यशवंतराव चव्हाण हे विरोधीपक्षनेते होते.

    तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी यशवंतराव चव्हाण यांना सरकार स्थापन करण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबद्दल इंदिरा गांधींशी चर्चा करून कळवण्याचे सांगितले.

    गोळीबाराचे आदेश, १०६ जणांच बलिदान आणि महाराष्ट्राची निर्मिती

    त्यावेळेस नीलम संजीव रेड्डी आणि इंदिरा गांधी यांच्यातील वाद हा संपूर्ण देशाला चांगलाच माहिती होता. आणि तेव्हा काही कारणास्तव इंदिरा गांधींशी चर्चा करण्याबाबत अनुकूल परिस्थितीसुद्धा तेव्हा नव्हती. 

    पवारांचा यशवंतराव चव्हाणांना सल्ला…

    मंडळी यशवंतराव चव्हाण यांना तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी सरकार स्थापन करण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून कळवण्याचे राष्ट्रपतींना सांगितले.

    मात्र चव्हाणांच्या तालमीत तयार झालेले शरद पवार यांनी इंदिरा गांधीकडे न जाता स्वतः सरकार स्थापन करण्याचा सल्ला चव्हाणांना दिला.

    मात्र ज्यांच्यामुळे आपण राजकारणात अग्रेसर झालो त्यांना न सांगता सरकार स्थापन करणे योग्य नाही असा विचार करून शरद पवारांचा सल्ला टाळून ते इंदिरा गांधींशी सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा करायला गेले.

    आणि इंदिरा गांधींनी तेव्हा त्यांना यावर नंतर निर्णय घेऊ असे सांगितले. पण इंदिरा गांधी यांनी काही दिवसातच चौधरी चरण सिंह यांची प्रधानमंत्री म्हणून घोषणा केली व यशवंतराव चव्हाण यांना उपप्रधानमंत्री करण्यात आलं.

    आणि यशवंतराव चव्हाण हे प्रधानमंत्री पदापासून वंचित राहले.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली?

    मंडळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती हे जरी १९६० साली झाली असली तरी १९५७ ला महाराष्ट्र आणि गुजरात हे द्विभाषिक राज्य म्हणून एक होत. तेव्हा या गुजरात आणि महाराष्ट्राच्या द्विभाषिक राज्याची पहिली निवडणूक हे १९५७ ला झाली.

    ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची धुरा ही मुरारजी देसाई यांच्याकडे होती. परंतू स्वतंत्र महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणूकीसंदर्भात बोलायचं झालं तर ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्र स्थापनेनंतर तब्बल दोन वर्षांनी म्हणजे १९६२ साली घेण्यात आली होती.

    गोळीबाराचे आदेश, १०६ जणांच बलिदान आणि महाराष्ट्राची निर्मिती

    या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता आणि त्यांनतर शेतकरी कामगार पक्ष हा काँग्रेसच्या विरोधात होता. काँग्रेसने या निवडणुकीमध्ये एकूण २६४ जागा लढवल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी एकूण २१५ जागांवर विजय मिळवला.

    काँग्रेसपाठोपाठ शेतकरी कामगार पक्षाने एकूण १५ जागेंवर विजय मिळवला होता. तब्बल ११ वेळा म्हणजेच एकूण ५५ वर्षे आमदार राहून राजकारणाच्या इतिहासामध्ये आपलं नाव अजरामर करणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते मा.गणपतराव देशमुख याच निवडणूकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते.

    काँग्रेस पक्षाकडून मा. यशवंतराव चव्हाण यांची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू होती. मात्र चव्हाणांच्या जागेवर विदर्भातील नेते मारोतराव कन्नमवार यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं. 

    भर सभागृहात भाषण करणाऱ्या आमदाराला जेव्हा विलासराव देशमुखांनी सुनावलं…

    विधानसभेत पहिल्यांदाच मराठी आमदार

    मंडळी स्वतंत्र महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच १९६२ मध्ये विधानसभेत सर्व मराठी आमदार एकत्र आले होते. आणि महाराष्ट्राच्या स्वतंत्र राजकारणाची सुरवात झाली होती.

    मात्र मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर नऊ दिवसांसाठी पी. के. सावंत मुख्यमंत्री झाले आणि त्यांनतर वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हातामध्ये घेतली.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • बाबरीवरून महाराष्ट्रात दंगल आणि मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट

    मंडळी भारतीय देशाच्या राजकारणामध्ये प्रत्येक राज्याच्या राजकारणाला राजकीय मुद्दा देणार प्रकरण म्हणजे बाबरी मस्जिदीच्या वादावरून ६ डिसेंबर १९९२ साली घडलेली हिंदू-मुस्लिम दंगल. मंडळी या प्रकरणामुळे सगळ्यात मोठी कलाटणी मिळाली ती म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाला.

    भारतीय देशाच्या स्वातंत्र्यानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या वादावर हिंदु संघटनांनी चांगलाच जोर धरला होता. ८० च्या दशकामध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली राम मंदिरासंदर्भात रथयात्रा देशभरात चांगलीच गाजली होती.

    अयोध्येमधील बाबरी मस्जिदीला बजरंग दल, आरएसएस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने इतर छोट्या पक्षांना आणि हिंदू संघटनांना सोबत घेऊन चांगलाच विरोध केला होता.

    गोळीबाराचे आदेश, १०६ जणांच बलिदान आणि महाराष्ट्राची निर्मिती

    ज्या अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला त्याच ठिकाणी जवळपास ४०० वर्षांपूर्वी मुघल बादशाह बाबरने बाबरी मस्जिद बांधली असा हिंदू संघटनांचा आणि हिंदुत्ववादी पक्षांचा दावा होता.

    याच वादावरून अखेर ६ डिसेंबर १९९२ साली हिंदू संघटनांनी आणि हिंदुत्ववादी पक्षांद्वारे बाबरी मस्जिद पाडल्या गेली. मात्र आयोध्येमध्ये घडलेल्या या प्रकारणाचे पडसाद अवघ्या काहीच दिवसांमध्ये मुंबईत उमटल्या गेले.

    मुंबईमध्ये हिंदू-मुस्लिम दंगल घडून आली. ही दंगल तब्बल आठ दिवस चालली. पाठोपाठ साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. ज्यामध्ये जवळपास शेकडो लोकांचे जीव गेले. या प्रकरणासंदर्भात उमा भारती, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

    भर सभागृहात भाषण करणाऱ्या आमदाराला जेव्हा विलासराव देशमुखांनी सुनावलं… 

    बाबरी आम्हीच पाडली – बाळासाहेब ठाकरे

    मंडळी आयोध्येतील बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुंबईमध्ये हिंदू-मुस्लिम दंगल उसळली. आणि या प्रकरणासंदर्भात बाळासाहेब ठाकरेंवरसुद्धा आरोप करण्यात आले होते. ‘आप की अदालत’ नावाच्या एका शोमध्ये जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना विचारण्यात आलं की, बाबरी पाडण्यामागे शिवसेना सामील आहे असे आरोप होत आहे.

    तेव्हा त्यांनी उत्तर देतांना म्हटलं होतं की,

    ” जर बाबरी पाडण्यात शिवसैनिक सामील असतील तर मला त्याचा अभिमान आहे.”

    अस उत्तर बाळासाहेब ठाकरे यांनी समाज माध्यमांवर दिल होत.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • गोळीबाराचे आदेश, १०६ जणांच बलिदान आणि महाराष्ट्राची निर्मिती

    मंडळी अस म्हणतात की महाराष्ट्र ही संतांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यदायी इतिहासाची भूमी, फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय क्रांतीने जागृत झालेली भूमी.

    मात्र याच महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी महाराष्ट्रातील जनतेला प्रंचड संघर्ष करावा लागला. ज्यामध्ये अनेक लोकांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागले. भारतीय देशाच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १ मे १९६० साली महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली.

    आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात झाली…

    आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या हातामध्ये मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याची धुरा देण्यात आली. स्वातंत्र्यानंतर सुरवातीच्या काळात देशाची एकात्मता धोक्यात येईल म्हणून भाषेनुसार राज्य विभाजनाला काही जेष्ठ नेत्यांनी विरोध केला होता.

    परंतू १९५३ साली केंद्र सरकारन देशातील भाषिक राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. मात्र यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांना वगळण्यात आलं. त्यावेळी महाराष्ट्राला वेगळ्या राज्याचा दर्जा न मिळण्याच एक खास कारण होत. ते म्हणजे मुंबई.

    मुंबई हे भांडवलदारांसाठी व्यवसायाच विद्यापीठच होत अस म्हणणं वावग ठरणार नाही. कारण त्यावेळी मुंबईचा विकास हा झपाट्याने झाला होता. याच कारणामुळे भांडवलदार मुंबई सोडायला तयार नव्हते. आणि मुंबईला महाराष्ट्राच्या स्वाधीन करणं हे केंद्रसरकारलाही मान्य नव्हतं.

    आणि शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल्या जाऊ लागलं… 

    गोळीबाराचे आदेश आणि बलिदान

    मंडळी त्यानंतर १९५५ साली काँग्रेस वर्किंग कमिटीने मुंबई, महाराष्ट्र, गुजरात अशा त्रीराज्याचा प्रस्ताव मांडला. सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रातील जनतेन रस्त्यावर उतरून निदर्शने केली.

    जनतेचा हा आक्रोश बघता केंद्रसरकारने विदर्भ महाराष्ट्रात व कच्छ गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. आणि मुंबईला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. मात्र महाराष्ट्रातील जनतेला मुंबई हे महाराष्ट्रात हवी होती.

    याच लढ्यासाठी महाराष्ट्रातील कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष व असे अनेक पक्ष एकवटले आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी अनेक आंदोलने-मोर्चे काढले. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मुरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले.

    ज्यामध्ये १०६ लोकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र अखेर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १ मे १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. ज्याची धुरा मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या हातामध्ये देण्यात आली.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आणि शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल्या जाऊ लागलं…

    मंडळी ६०च्या दशकामध्ये महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ करणारा पक्ष म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. अस म्हणतात की मराठी माणसाचा सावभिमान जागृत करण्यासाठी शिवसेनाच उभी राहली होती.

    मात्र १९६६ला बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर या पक्षाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. ज्यामध्ये भर पडली होती ती म्हणजे शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल जात होतं.

    काय आहे सद्ध्या विवादामध्ये असलेल्या भारतीय राजमुद्रेचा इतिहास?

    याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी झालं असं की, काँग्रेसचे जेष्ठ नेते वसंतराव नाईक हे १९६३ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केली.

    पण आपल्याला जाणून आश्चर्य होईल की वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीचा महत्वाचा भाग होता तो म्हणजे शिवसेनेची स्थापना. तुम्ही म्हणाल की मुख्यमंत्री काँग्रेसचा आणि त्यांचा शिवसेनेशी काय संबंध?

    तर मंडळी १९६० च्या दशकामध्ये आंदोलने, कामगार चळवळी अत्यंत जोर धरायला लागल्या होत्या. कामगार चवळींमधून अनेक नवीन चेहरे उगम पावत होते. त्यानंतर मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी आणि भूमीपुत्रांच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली.

    राजमुद्रेवरील सिंह रागीट का?अनावरण हिंदू धर्म पध्दतीने का? प्रधानमंत्र्यांवर नेटकऱ्यांची टीका…

    तेव्हा डाव्या पक्षांचा प्रभावसुद्धा जनतेमध्ये जोर धरायला लागला होता. म्हणून अस म्हणतात की डाव्या पक्षांचा हाच प्रभाव कमी करण्यासाठी वसंतराव नाईक आणि काँग्रेसने शिवसेनेला अप्रत्यक्षपणे पाठिंबा द्यायला सुरवात केली होती.

    आणि शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल्या जाऊ लागलं…

    मंडळी डाव्या पक्षांचा वाढता प्रभाव ही शिवसेनाच कमी करू शकते असा विश्वास वसंतराव नाईक आणि काँग्रेसला झाला होता. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे पाठींबा द्यायला सुरुवात केली. याच कारणामुळे वसंतराव नाईक आणि शिवसेनेच्या जवळीकतेवरून शिवसेनेला वसंतसेना म्हणून हीनवल्या जाऊ लागलं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • काय आहे सद्ध्या विवादामध्ये असलेल्या भारतीय राजमुद्रेचा इतिहास?

    मंडळी उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी सारणात येथील अशोक सतंभावरील राजमुद्रेच उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक ११ जुलै २०२२ रोजी करण्यात आलं. मात्र राजमुद्रेवरील जे सिंहांच प्रतीक आहे ते बदलवून रागीट आणि उग्र स्वरूपाचं करण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून मोदींवर केल्या जात आहे.

    मात्र या राजमुद्रेचा नेमका इतिहास काय आहे? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मंडळी राजमुद्रा हे सरकारी कागदपत्रांवर आवर्जून वापरल्या जाते. याव्यतिरिक्त राजभवन, संसद, राष्ट्रपती भवन, विधानभवन यांसारख्या शासकीय कार्यालयाच्या इमारतींवरसुद्धा राजमुद्रा वापरल्या जाते.

    या राजमुद्रेसाठी सारणातच्या अशोक स्तंभाची निवड करण्यात आली होती. या स्तंभावर चार दिशेला चार सिंह आहे. त्याच्या खालच्या बाजूला चक्र दिल्या गेले आहे. चक्राच्या उजव्या बाजूला बैल आणि डाव्या बाजूला घोड्याच चिन्ह लावण्यात आलं आहे.

    स्तंभ हा गोलाकार असल्याने त्याची मागील बाजू दिसत नाही. मात्र त्यावर सिंह आणि हत्तीच चिन्ह सुद्धा कोरल्या गेलं आहे. अशोक स्तंभाची उभारणी मौर्य वंशातील राजे अशोक सम्राट यांनी इसवी सण तिसऱ्या शतकात केली होती.

    सम्राट अशोकांनी कलिंगच्या युद्धानंतर हृदयपरिवर्तन होऊन शांती आणि धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते. राजमुद्रेमध्ये पाठीला पाठ लावून उभे असलेले चारही सिंह हे चारही दिशांना विस्तारलेल्या सम्राटांच्या राजसत्तेचे प्रतीक आहे. तर माथ्यावर असणारे चक्र हे सत्याच्या नितीमत्तेचे प्रतीक आहे.

    २६ जानेवारी १९४९ ला मान्यता

    मंडळी भारतीय देश हा दिनांक २६ जानेवारी १९४९ रोजी प्रजासत्ताक झाला व त्याच दिवशी या राजमुद्रेला राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता देण्यात आली. या राजमुद्रेखाली देवनागरी लिपीमध्ये ‘सत्यमेव जयते’ असे लिहिण्यात आले आहे. सत्यमेव जयते हे भारतीय देशाचे राष्ट्रीय बोध वाक्य आहे.

  • आणि त्या क्रांतिकारकाने भारताचा तिरंगा तयार केला

    मंडळी आज प्रत्येक देशाला आपापला स्वतंत्र झेंडा आहे. आणि प्रत्येक झेंड्याचा एक वेगळा इतिहास आहे. त्याचप्रमाणे भारतीय देशाचा तिरंगा झेंडा याचा सुद्धा हे स्वतंत्र इतिहास आहे.

    जे आपण आज जाणून घेणार आहोत. मंडळी १८५७ च्या उठावा आधी भारत हे एक खंडित राष्ट्र होत. ज्यामध्ये अनेक राजा महाराजांच साम्राज्य होत.

    आणि प्रत्येक राज्याच्या साम्राज्याला एक स्वतंत्र झेंडा होता. अनेक राज्यांचे वेगवेगळे झेंडे असल्याकारणाने भारतीय देशाचा विशिष्ट एक झेंडा नव्हता. अर्थात भारत हा देशच नव्हता अस म्हणणं वावग ठरणार नाही.

    त्यामुळे अनेक राजे आपला स्वतंत्र झेंडा फडकवत होते. मात्र १८५७ च्या उठावानंतर इंग्रजांनी संपूर्ण भारत काबीज केला आणि त्यावेळी त्यांनी एक स्वतःचा झेंडा तयार केला.

    नंतर १९०६ ते १९०७ दरम्यान कलकत्त्यात भारतीय लोकांनी आपला पहिला स्वतंत्र ध्वज फडकवला. ज्यामध्ये वरती हिरवा, मध्ये पिवळा आणि खाली लाल रंगाचा समावेश होता.

    हिरव्या रंगामध्ये आठ प्रांताचे प्रतिनिधित्व करणारे आठ कमळ होते. पिवळ्या रंगामध्ये वंदे मातरम असे लिहिले होते आणि लाल रंगामध्ये उजव्या बाजूला सूर्याच चिन्ह आणि डाव्या बाजूला अर्ध्या चंद्राचं चिन्ह होत.

    त्यानंतर भारतीय देशाचा दुसरा ध्वज मॅडम कामा आणि इतर क्रांतिकारकांनी मिळून पॅरिसमधील बर्लिन येथे तयार केला. हा ध्वज आधीच्या ध्वजासारखाच होता.

    फक्त यामध्ये सर्वात वर असलेल्या लाल रंगाऐवजी भगवा रंग वापरल्या गेला होता व आठ कमळांच्या जागेवर सात ताऱ्यांचा समावेश केल्या गेला होता. आणि बाकी ध्वज आधीच्या ध्वजासारखाच ठेवण्यात आला होता.

    पिंगली व्यंकय्या ध्वज तयार करणार क्रांतिकारक

    मंडळी १९०६ आणि १९०७ च्या तयार झालेल्या ध्वजानंतर राष्ट्रपीता महात्मा गांधीजींनी १९२१ ला मध्य प्रदेशमधील पिंगली व्यंकय्या नावाच्या व्यक्तीला भारताचा ध्वज तयार करण्यास सांगितले.

    पिंगली व्यंकय्या हे एक क्रांतिकारक होते. त्यांनी अनेक देशांच्या ध्वजाचा अभ्यास करून भारतीय देशाचा ध्वज तयार केला. ज्यामध्ये सर्वात वर पांढरा रंग, मध्ये हिरवा रंग आणि त्यामध्येच चरख्याच चित्र व सर्वात खाली लाल रंगाचा समावेश करण्यात आला होता.

    या ध्वजातील लाल रंग हा हिंदू धर्माच प्रतिनिधीत्व करीत होता. हिरवा रंग हा मुस्लिम धर्माच प्रतिनिधित्व करत होता तर पांढरा रंग हा इतर सर्व धर्मांच प्रतिनिधित्व करत होता.

    आणि चरख्यावर वापरल्या गेलेला निळा रंग हे प्रगतीच प्रतीक होत. त्यांनंतर १९३१ साली हा ध्वज पुन्हा बदलवण्यात आला ज्यामध्ये सर्वात वर भगवा रंग मध्ये पांढरा रंग ज्यामध्ये निळ्या रंगाचा चरखा होता आणि सर्वात खाली हिरव्या रंगाचा सामावेश होता.

    शेवटीं२२ जुलै १९४७ साली डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय देशाचा ध्वज तयार करण्यात आला. जो १९३१ ला तयार करण्यात आलेल्या ध्वजाप्रमाणेच होता. फक्त यामध्ये सम्राट अशोकांच चक्र वापरण्यात आलं होतं. तर मंडळी अशा प्रकारे भारतीय देशाचा तिरंगा म्हणून ओळखल्या जाणार ध्वज तयार झाला.

  • काय आहे भाजपाचा इतिहास?

    मंडळी सद्ध्याच्या परिस्थितीमध्ये राजकीय क्षेत्रात देशपातळीवर सर्वात मजबूत पक्ष म्हणून ओळखला  जाणारा पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे.

    मात्र भारतीय जनता पार्टीचा उगम म्हणजेच स्थापना कशी झाली? व ती कुणी केली? अशा विविध गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी हिंदुत्वाच्या विचारधारेवर चालणारा भाजपा हा पक्ष ८० च्या दशकामध्ये एका सेक्युलर विचारधारेवर चालत होता.

    जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबेंच्या हत्येनंतर आरोपी काय म्हणाला?

    कारण ८० च्या दशकामध्ये हिंदुत्व हा सामाजिक मुद्दा होता. स्वातंत्र्यानंतर सतत काँग्रेसच सरकार भारतीय देशामध्ये प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसलं होत.

    मात्र १९७७ मध्ये पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणूका झाल्यानंतर गैर काँग्रेसी सरकार भारतामध्ये स्थापन झालं. ज्याला जनता पार्टी अस नाव दिल्या गेलं होतं.

    जनता पार्टी ही वेगवेगळ्या पक्षांच्या एकोप्यातून निर्माण झालेली पार्टी होती. ज्यामध्ये हिंदुत्व, समाजवादी आणि कॉम्रेड विचारधारेचा समावेश होता.

    म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…

    मात्र अवघ्या काही कालावधीमध्येच जनता पार्टीच्या सरकारमध्ये अस्थिरता निर्माण व्हायला सुरुवात झाली. समाजवादी पार्टीच्या काही नेत्यांचं म्हणणं होतं की, जनता पार्टीमधल्या नेत्यांनी इतर संघटनांची सदस्यता सोडून द्यावी.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जुडलेल्या लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी या दोन्ही नेत्यांवर समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी लगावलेला हा अप्रत्यक्ष टोला होता.  

    भाजपची स्थापना

    जनता पार्टीच्या सरकारमध्ये असलेल्या समाजवादी पक्षाच्या निर्णयानुसार लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यापुढे एक तर आरएसएस सोडणे किंवा जनता पार्टीच सरकार सोडणे असे दोनच पर्याय होते.

    म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समर्थन देत अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी हे दोघेही जनता पार्टीच्या सरकारमधून बाहेर पडले. आणि ६ एप्रिल १९८० ला दोघांनी मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir