Category: बातमी

  • नाम बडे और दर्शन खोटे – द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम आणि नितीन गडकरी

    नाम बडे और दर्शन खोटे – द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम आणि नितीन गडकरी

    सध्या संपूर्ण भारतात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आणि निवडणूक म्हणजे अनेक राजकीय व्यक्तींचे भवितव्य घडवणारी तर अनेक दिग्गज व्यक्तींचे भविष्य बिघडवणारी वेळ, आणि भारतीय मतदातांनी त्याचा अनुभव वेळोवेळी इतिहासामध्ये धडा दिला आहे. निवडणुकीमध्ये विरोधात बोलणे, भ्रष्टाचारावर बोलणे हे काही नवीन नाही. पण या सर्वांना 70 वर्षात अपवाद ठरले ते माननीय केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी.

    पण खरंच अपवाद ठरले का ?
    कारण स्वच्छ नेते, काम आणि भ्रष्टाचार विरुद्ध सरकार. या ओळखीने सत्तेवर आलेल्या मोदी सरकारमध्ये सर्वात मोठा कोणत्या घोटाळ्याचे आरोप झाले तर तो म्हणजे द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम.

    नक्की काय आहे हा द्वारका एक्सप्रेस वे स्कॅम ?
    माननीय नितीनजी गडकरी यांच्या मंत्रालयाच्याच अंतर्गत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.

    नक्की काय होता CAG सरकारी संस्थेने केलेला आरोप. ?

    CAG म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर ऑफ इंडिया.
    भारतीय संविधानाने कलम 148 अंतर्गत शक्ती दिलेली सर्वात मोठी आणि महत्त्वाची सरकारी संस्था म्हणजे CAG.
    आपल्या संसदेद्वारे तसेच राज्य सरकारद्वारे मंजूर झालेले प्रकल्प निधी. त्या प्रकल्प निधी मधील ठरलेल्या रकमेचा किती वापर झाला ? जास्त झाला अथवा कमी झाला ? कुठे झाला तसेच तो निधी कुठे कुठे वापरलात? ह्यासर्व गोष्टींवर निगराणी ठेवण्याचे काम ही संस्था करते.

    नक्की काय होता मग द्वारका राष्ट्रीय महामार्ग घोटाळा?

    सोप्या भाषेत…. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री यांच्या महत्त्वकांशी प्रकल्पांपैकी एक असणारा प्रकल्प. भारत सरकारने देशांतर्गत रस्ते जोडणीसाठी एक राष्ट्रीय उपक्रम मंजूर केला. त्याचं नाव “भारतमाला”. त्या उपक्रमाला सी सी इ ए (CCEA) म्हणजेच कॅबिनेट कमिटी इकॉनोमिक अफेअर ने मंजुरी दिली. ज्या सीसीईएचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.

    या उपक्रमांतर्गत देशातील दुसऱ्या क्रमांकाचे जवळजवळ 50 हजार किलोमीटरचे रस्ते निर्मिती होणार आहे.

    यातील पहिला टप्पा हा 24800 km चा आहे. आणि हे रस्ते बांधणी 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण सध्या स्थितीत तसे झालेले नाही. आणि भारतमाला उपक्रमा अंतर्गत येतो. पहिला टप्प्यातील दिल्ली येथील शिवमुर्ती महिपालपूर पासून सुरू होणार ते हरियाणातील गुरगाव पर्यंत असणारा महामार्ग ज्याचे नाव द्वारका राष्ट्रीय राजमार्ग.

    खरंतर दिल्ली आणि गुरगाव मधील रस्ते जाम कमी करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेला हा रस्ता आहे. या रस्त्याचे अंतर 29 km आहे यातील 19 Km हे हरियाणामध्ये तर उरलेले 10 Km दिल्लीमध्ये आहे.

    कॅगने ओढलेले ताशेरे हे हरियाणा अंतर्गत येणाऱ्या 19 किलोमीटरच्या अंतराचे आहे.

    या महामार्गाच्या निर्मितीसाठी दर 1 किलोमीटरसाठी 18 करोड रुपये खर्च येणे अपेक्षित असताना प्रत्येकी 1 किलोमीटरसाठी 250 करोड रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजेच जवळजवळ 14 पट जास्त दर प्रति किलोमीटरसाठी खर्च झाला आहे. खरंतर हरियाणा सरकारने आपल्या बाजूने आधीच शेतकऱ्यांकडून जमिनीचे अधिग्रहण करून घेतले होते.

    त्यातही न समजणारी बाजू म्हणजे 70 ते 75 मीटर लेनसाठी लागणारी जमीन गरजेचे असताना, 90 मीटर जमीन का अधिग्रहण करण्यात आली? यावरही न थांबता हरियाणा सरकारने ती जमीन (एन एच ए आय) NHAI (नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया) ला 15 मीटर जमीन मोफत दिली. 90 मीटर अंतरावर 14 लेन मध्ये होऊ शकणारा रस्ता हा मात्र 8 लेन मध्येच उभा करण्यात आला.

    ज्या महामार्गाची मंजुरी 4 लेनसाठी होती. तीच NHAI ( एन एच ए आई )ने 14 लेन साठी मंजूर करून घेतले, आणि म्हणूनच की काय 14 लेनमध्ये होणारा महामार्ग असल्याने प्रत्येकी किलोमीटरसाठी 250 करोड रुपये एवढा अमाप खर्च झाला असे कारण सांगण्यात येत आहे. पण येथे मूळ प्रश्न मग निर्माण होतो जर तुम्ही मंजूर 14 लेन साठी केला तर 8 लेनचा महामार्गच का निर्माण केला असावा ?

    प्रत्येक गोष्टीत प्रश्न उपस्थित होत असताना रस्ते वाहतूक मंत्रालयातून कागदी उत्तर न येणे, 14 पट जास्त एका किलोमीटरसाठी करोडो रुपयांमध्ये खर्च येणे,
    आणि ते सुद्धा मोठे नाव असणाऱ्या वाहतूक मंत्र्यांना न समजणे, (त्यांच्या हातूनच मंजुरी झालेली आहे) हे अनपेक्षितच आहे. असे नाही का वाटत?

    एवढेच नाहीतर कॅगने दिल्ली ते मुंबई होत असलेल्या महामार्ग सुद्धा पुढील 25 वर्ष वापरण्यायोग्य असणार नाही. असे अहवालात म्हटले आहे.

  • मुलाच्या वक्तव्यामुळे गडकरींची अडचण, पक्ष व कार्यकर्ते बॅकफुटवर

    विकास ठाकरेंची प्रचारात सरशी, मुलाच्या वक्तव्यामुळे गडकरींची अडचण, पक्ष व कार्यकर्ते बॅकफुटवर, सोशल मिडियावर ठाकरेंची जादू

    विकास ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे नागपूर लोकसभेची लढत अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली आहे. 10 वर्ष खासदार आणि केंद्रात हेवीवेट मंत्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या नितीन गडकरींना ठाकरेंचे आव्हान थोपवण्यासाठी गल्लोगल्ली प्रचार करावा लागतो आहे. काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी आपण यंदा प्रचार करणार नाही, होर्डींग्ज लावणार नाही, कुणाला चहा पाजणार नाही असा दावा केला होता. मात्र निवडणूकीत ठाकरे यांच्या एंट्रीनंतर गडकरींना गल्ली बोळात प्रचाराला उतरावे लागले आहे.

    एप्रीलच्या सुरुवातीपासूनच नागपुरात उन्हाचा तडाखा जाणवतो आहे. प्रचारावरही याचा प्रभाव दिसून येत आहे. गडकरी यांनी प्रचारासाठी खास रथ तयार केला असून त्या रथात वातानुकुलीत यंत्रणा बसविण्यात आली आहे. या उलट ठाकरे हे खुल्या जीपमधून उन्हातान्हात लोकांचे स्वागत स्विकारत दुपारी उशीरापर्यंत जनसंवाद साधत आहेत. गडकरी रोड शो विधानसभा स्तरावर आखला राबविला जात आहे. तर विकास ठाकरे यांनी एका दिवसात फक्त दोन प्रभागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ठाकरे दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये जीपखाली उतरुन लोकांची भेट घेतात दुसरीकडे गडकरी मात्र रथावरुन खाली उतरत नाहीत. गडकरींच्या रथावर छप्पर आहे तर भाजपचे कार्यकर्ते मात्र रखरखत्या उन्हात प्रचार करण्यासाठी मजबूर आहेत. कुठलाही दिखावा किंवा बडेजाव न करीता मॅन टू मॅन संपर्कावर ठाकरे यांचा भर आहे त्यामुळे त्यांना मिळणारा प्रतिसाद हा सकारात्मक व आश्वस्त करणारा आहे.

    सामाजिक समिकरण विकास ठाकरेंच्या बाजूने
    नागपूर लोकसभेचे सामाजिक समीकरण हे यंदा विकास ठाकरे यांच्या बाजूने असल्याचे दिसते. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचा उमेदवार नसल्याने ही मते काॅंग्रेसकडे वळतील असा अंदाज आहे. बसपाची ताकत कमी झाल्यामुळे याचा फायदा देखील काॅंग्रसला होऊ शकतो. मध्य नागपुरात बहुसंख्येने असलेल्या हलबा मतदारांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. शिवाय कुणबी व इतर ओबीसी मतांचे संभावित कन्साॅलिडेशनही काॅंग्रेसच्या पथ्यावर पडू शकते.

    5 लाखाच्या लीडची हवा गोल
    यंदाच्या निवडणुकीत आपण पाच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येऊ असा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. यापूर्वी 2014 व 2019 च्या निवडणुकीत सुद्धा गडकरी यांनी असा दावा केला होता मात्र या दोन्ही निवडणुकीत त्यांना आपले मताधिक्य 3 लाखांच्या पुढे नेता आले नाही. गडकरी जरु पुन्हा पुन्हा पाच लाखाच्या मताधिक्याच्या बाता करीत असले तरी आता खुद्द भाजप कार्यकर्तेच खासगीत या दाव्याची खिल्ली उडवतांना दिसत आहेत.

    सारंग गडकरींच्या वक्तव्यामुळे भाजप बॅकफूटवर
    गडकरी यांचे धाकटे चिरंजीव सारंग गडकरी यांचे वक्तव्य भाजपच्या कर्मठ कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले आहे.

    2014 मध्ये नागपूर लोकसभा ही भाजपची सीट नव्हती, ही सीट भाजपमुळे निवडून आली नाही यंदाही ही सीट भाजपमुळे नव्हे तर गडकरींच्या ताकतीमुळे निवडून येईल असा दावा सारंग गडकरी यांनी केला होता.

    सारंग गडकरी यांचा हा विडियो समाज माध्यमांवर जोरदार वायरल झाला त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. गडकरींना कार्यकर्त्यांची गरज नाही ते स्वतःच सक्षम आहेत असे म्हणत अनेक कार्यकर्त्यांनी प्रचारापासून स्वतःला अलिप्त ठेवले की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

    प्रचार सभांदरम्यान नितीन गडकरींकडून होणार्‍या अवास्तव दाव्यांमुळे मोठी गोची होत आहे. नागपूर शहरातील 70 टक्के वस्त्यांमध्ये 24 तास पाणीपूरवठा, मिहानमध्ये 1 लाख तरुणांना रोजगार दिला, नागपूरात 1 लाख कोटी रुपयांची विकास कामे केली हे दावे आता मतदारच खोडून काढत आहे. स्थानिक यूट्यूब व सोशल मिडिया चॅनल्सच्या रियालिटी चेकमध्ये मतदारांच्या प्रतिक्रिया बघितल्यास याचा अंदाज येईल. गडकरी साहेबांनी वास्तविकता मांडावी उगाच फेकाफेकी करुन दिशाभूल करु नये असे मत अनेक मतदार व्यक्त करीत आहेत.

    गडकरींच्या “प्यारे” खानमुळे भाजपला नुकसान
    सारंग गडकरी यांचे व्यावसायिक सहकारी व गडकरी यांचे चाहते प्यारे खान हे अल्पसंख्यांक मते मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत आहेत. मोमिनपूरा, ताजबाग, हसनबाग, टेका नाका, जाफरनगर या मुस्लीम बाहुल्य वस्त्यांमध्ये प्यारे यांनी इफ्तार पार्टींचा धडाका लावला आहे. इफ्तारीच्या माध्यमातून गडकरींकडे मुस्लीम मतदारांना आकर्षिक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र या खटाटोपामुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होण्याची शक्यता आहे. मुस्लीम नेता किंवा समाजातील प्रभावी व्यक्ती म्हणून प्यारे खान यांना अजूनही समाज मान्यता नाही. प्यारे हे व्यक्तिगत फायद्यासाठी हे सर्व करीत असल्याचा सूर मुस्लीम समाजातून ऐकायला मिळत आहे.

    गडकरी यांनी गेल्या 10 वर्षात मुस्लीम समाजातील किती युवकांना रोजगार मिळवून दिले असा प्रतिप्रश्न मुस्लीम समाजातील मतदार प्यारे खान यांना विचारत आहेत. सीएए आंदोलन, बिस्किस बानो प्रकरण, एनआरसी, माॅब लिंचींग यांसारख्या संवेदनशील मुद्यांवर गडकरींची भूमिका काय असा सवाल मुस्लीम मतदारांकडून विचारला जात आहे.

    सोशल मिडियावर विकास ठाकरेंची स्थिती मजबूत
    गडकरी यांच्या तुलनेत संसाधनांचा अभाव असला तरी विकास ठाकरे यांनी सोशल मिडियावरील वातावरण ढवळून काढले आहे. नागपूरच्या जनतेचे सवाल, मी दीक्षाभूमी बोलतेय, जवाब दो, रियालिटी चेक या मथळ्याखालील पोस्ट व विडियो मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. एका झटक्यात वायरल होणार्‍या पोस्टमुळे ठाकरे तळागाळात पोहोचले आहेत. या उलट गडकरी यांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावरुन सुरु असलेला प्रचार हा काहीसा कृत्रिम व दिखावटी वाटत आहे. सोशल मिडीया इन्फ्लूएन्सर, आयटी सेल, माजी संपादक मंडळी, पगारी यंत्रणा गडकरींच्या दिमतीला असली तरी ठाकरेंच्या मोजक्या टीमने खासदारांच्या प्रचार यंत्रणेच्या नाकात दम आणला आहे.

  • निहालची निष्ठा सरकारला जड जात आहे ?

    आंदोलन, प्रदर्शन, मोर्चे, सभा म्हंटल की विरोध हा होतोच. कारण अश्या बाबतीत दोन विचार प्रवाह असतात, एक बाजूने तर दुसरा विरोधात. हा विरोध वैचारिक असेल तर फारच उत्तम. पण विरोधाचे रूपांतर दडपशाहीत होत असेल, विरोध दडपण्यासाठी हुकूमशाही मार्गाचा अवलंब होत असेल तर हे आपल्या लोकशाहीसाठी घातकच आहे.

    हे सांगण्याच कारण असं की, 30 डिसेंबर रोजी नीहाल पांडे यांना मुंबईमध्ये मशाल मोर्चा काढायचा आहे. पण एकनाथ शिंदे सरकारने ह्या मशाल मोर्चासाठीचा परवानगी अर्ज फेटाळून लावला.

    आता सरकारचं कृत्य चुकीचं कसं आहे हे बघू?

    निहाल पांडे हा सर्वसामान्य घरातील तरुण, रामटेक नागपूर येथे हातात भगवा ध्वज घेतो. हा भगवा ध्वज महाभारत यात्रेच्या माध्यमातून मुंबईला चालत घेऊन जातो आणि उध्दव ठाकरे यांच्या हाती देतो.

    महाभारत यात्रेद्वारे निहाल पांडे यांनी गावागावात जाऊन, गोरगरीब जनतेचे प्रश्न जाणून घेतले, त्यांच्या समस्यांवर उपाय काय असू शकतात? ते शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून गद्दारी कशी केली? हे सांगत गावातील आणि शहरातील लोकांना शिंदे-फडणवीस यांच्या अनैतिक राजकारणाची जाणीव करून दिली.

    तसेच गावागावातील तरुण शिवसैनिकांच्या हृदयातील अन्यायाच्या विरुद्ध भावना प्रज्वलित करून, त्याविरुद्ध लढण्यासाठी नवसंजीवनी दिली.

    निहाल पांडे यांची युवक, महिला, शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी, काही तर उचित काम करून दाखवण्याची, तळमळ इतकी वाढली की उध्दव ठाकरे आणि अदित्य ठाकरे यांनी सुद्धा निहाल पांडे यांच्या कामाची दखल घेऊन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तुम्हाला आचार्य वाटेल, पण उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असताना, त्यांनी निहाल पांडे रस्त्यावर अभिवादन करण्यासाठी थांबलेले आहेत हे बघून, आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला आणि निहाल पांडे यांचे अभिवादन स्वीकारले. यावरून एक गोष्ट नक्की आहे की, तुमचा हेतू प्रामाणिक असेल आणि हेतू साध्य करण्यासाठी मनापासून कष्ट करण्याची तयारी असेल, तर देव सुद्धा त्याची दखल घेतो.

    थोडक्यात, निहाल पांडे आज शेकडो लोकांसाठी आशेचा किरण आहेत. कोणत्याही प्रश्नावर मार्ग काढण्याची धमक आज त्यांच्यामध्ये आहे.

    सर्वसामान्य जनतेची ईच्छा आणि सरकार काढून त्यांच्यावर होणारा अन्याय बघता. निहाल पांडे यांनी पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी वर्धा ते मुंबई अशी निष्ठा यात्रा सायकलवर काढण्याचा निर्णय घेतला.

    निष्ठा यात्रा 23 डिसेंबर रोजी वर्धा येथून सुरू झाली असून 30 डिसेंबरला मुंबईत पोहचेल.
    महागाई-बेरोजगारी, महाराष्ट्रा बाहेर चाललेले उद्योग, शेतकऱ्यांच्या व्यथा, बेहाल झालेली आरोग्य व्यवस्था, घरकुल योजनेचा उडालेला बोजवारा असे अनेक मुद्दे घेऊन निहाल पांडे यांची निष्ठा यात्रा निघालेली आहे. तसेच यात्रेदरम्यान समाजातील विविध प्रश्न उलगडत चालले आहेत.

    अशा विविध प्रश्नांच्या गांभीर्याची जाणीव, निहाल पांडे यांना मुंबईत मशाल मोर्चाद्वारे सरकारला करून द्यायची आहे. पण सरकार यासाठी परवानगी देत नाही.

    वास्तविक पाहता संविधानाच्या कलम 19 आणि 21 द्वारे लोकांना शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवण्याचा तसेच आपल्या मागण्या सभा,मोर्चे, आंदोलने यांच्या माध्यमातून सरकारसमोर ठेवण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचे पालन करण्यास शिंदे सरकार आडकाठी आणत असेल, तर हे कृत्य नक्कीच हुकूमशाही स्वरूपाचे आहे. त्याहीपलीकडे निहाल पांडे हे हजारो लोकांचे प्रश्न घेऊन सरकारला भेटू इच्छितात, तर सरकारने निहाल पांडे यांना भेटण्याची तसदी घेतलीच पाहिजे. तसेच याचा दुसरा अर्थ म्हणजे निहाल पांडे यांच्या कामाची एकनाथ शिंदे यांना भीती वाटत असावी, त्याशिवाय निहाल पांडेंचा मशाल मोर्चा थांबवण्याचे दुसरे कारण नाही.

    आता शिंदे सरकारच्या हुकूमशाहीला न जुमानता निहाल पांडे सामान्य जनतेच्या मागण्या कशा पद्धतीने सरकार समोर ठेवतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

    अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कार्याला आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. आपण आपली प्रतिक्रिया नोंदवून आपला पाठिंबा दर्शवू शकता.

  • नानांना लागले राजकारणाचे वेध?

    Nana Patekar In Politics

    साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है* हा डायलॉग ऐकला की, चाटदिशी एक चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, अर्थातच तो नाना पाटेकरांचा.

    क्रांतीवीर, तिरंगा, नटसम्राट अश्या अगणित चित्रपटाद्वारे उत्कृष्ठ अभिनयाची एक आदर्श रेषा नानांनी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये घालून दिली.

    मात्र गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर जरा वेगळ्याच कारणामुळे प्रसार माध्यमांचा केंद्रबिंदू बनलेले आहेत.

    मागच्या 10 दिवसात नानांनी दोन राजकीय विधाने केली.
    पहिलं विधान म्हणजे, “आगामी निवडणुकीत भाजपला 350 ते 375 जागा मिळतील आणि पुन्हा भाजप सत्तेत येईल. भाजप देशात उत्तम काम करत आहे, त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील. देशाकडे भाजप शिवाय दुसरा पर्याय नाही”, आणि दुसरं विधान म्हणजे “राजकरणात सातत्य ठेवणारी माणसे कमी आहेत. त्यातही देवेंद्र फडणवीस हे म्हणजे मुद्देसुद बोलणारे व्यक्ती आहेत”.

    पहिलं केंद्रातल्या भाजप नेतृत्वासाठी आणि दुसरं महाराष्ट्रातल्या भाजप नेतृत्वासाठी, नानांनी काढलेले हे कौतुकोद्गार आहे.

    आता ह्यावरून सर्वांनाच प्रश्न पडला असेल, की नानांनी ही वक्तव्य करण्यामागचं कारण नक्की काय?

    आता हा विषय जरा सुरुवाती पासून समजून घेऊ.
    ते असं आहे की, नाना पाटेकर अभिनेते असले तरी नानांची राजकीय जाणीव तशी भक्कम आहे. कारण त्यांची शिवसेना संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या सोबतची असलेली जवळीक आपल्या वडिलांच्या पिढीने बघितलेली आहे. अगदी नाना स्वतः सांगतात त्याप्रमाणे, “अरे गाढवा, कसा आहेस? असं म्हणतं बाळासाहेब नानांच्या गळ्यात हात घालुन जवळ ओढायचे”.

    बाळासाहेब दिवंगत झाल्या नंतर नानांची जवळीक पवार काका – पुतण्यांसोबत अगदीच वाढली. ती इतकी वाढली की, अजित पवारांच्या धरणाच्या वादग्रस्त विधानावरून, नाना जाहीर भाषणात कोपरखिळी मारून, दादांची मस्करी घेतात आणि अजित दादा देखील त्याला मनमोकळा हसून प्रतिसाद देतात. याचे व्हिडिओ आपण सर्वांनी बघितलेले असतीलच.

    अश्यातच नाना पाटेकर आता नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस ह्या जोडीचे कौतुक करता आहेत. ह्या वरून नानांचा राजकीय चाणाक्षपणा लक्षात येतो. तो असा की, बाळासाहेब ठाकरे आणि पवार कुटुंब, यांच्या आजूबाजूला महाराष्ट्रातील राजकारण फिरत असल्याचे आपण बघितले आहे. तर सध्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून पुढे येत आहेत. अश्या ठराविक परिस्थीत, ठराविक नेत्यांच्या जवळ जाऊन आपले वयक्तिक हित साध्य करून घेण्याचा नानांचा कल असू शकतो, असे म्हणता येऊ शकते.

    मग प्रश्न असा निर्माण होतो की, अशा राजकीय चाणाक्षपानातून नाना कोणते हित साध्य करू शकता?

    तर आपण बघतो की, महाराष्ट्रात मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटाला अधिक पसंती मिळत असते. अशा वेळी मराठी चित्रपटांना थिएटर मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. याचा परिणाम त्या चित्रपटाच्या अर्थकारणावर होतो. मग आपले राजकीय संबंध जर भक्कम असतील तर थिएटर मिळण्यासाठी सोईचे होते, हा झाला एक फायदा.
    दुसरा फायदा म्हणजे, नाना पाटेकरांच्या “नाम फाउंडेशनचा”.
    नाम फाउंडेशन ही ग्रामीण भागात कार्य करणारी एक सामाजिक संस्था आहे. कोणतीही सामाजिक संस्था यशस्वीरित्या चालवण्यासाठी राजकीय हितसंबंध फायद्याचे ठरतात. संस्थेला येणाऱ्या आर्थिक अडचणी, स्थानिक कामात लागणारे राजकीय सहकार्य, परदेशातून मागवावी लागणारी मदत अशा अनेक कारणांमुळे राजकीय हितसंबंध उपयोगात येतात.

    तसेच तिसरे आणि सर्वात महत्वाचे हित म्हणजे नानांना लागलेले आमदारकीचे वेध. काही दिवसांपूर्वी भाजपाने सिनेसृष्टीतल्या माधुरी दिक्षित यांना लोकसभा आणि नाना पाटेकर यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढण्यासाठी प्रस्ताव दिला होता. आता ह्या प्रस्तावाचे पुढे काय झाले हे समजू शकलेले नाही.
    पण नानांनी खडकवासला मतदार संघामधून निवडणूक लढविण्याची ईच्छा अनेकदा अजित पवारांकडे खासगीत बोलताना व्यक्त केलेली आहे, असे राजकीय जाणकार सांगतात. तसेच खडकवासला येथील घेरा सिंहगड भागात नाना पाटेकरांची शेती आणि फार्म हाऊस आहे. त्या निमित्ताने नाना आपला बराच फावला वेळ ह्या फार्म हाऊस वर घालवतात.

    आता ह्या दोन राजकीय विधनांमुळे नाना पाटेकर भाजपच्या किती जवळ जातील? आणि नानांचा राजकीय चाणाक्षपणा भाजपासमोर किती कारगर ठरेल? ह्या प्रश्नाचं उत्तर येणारी वेळच देईल. तथापि ह्या मुद्यावर आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

  • उद्धव ठाकरेंच्या समर्थनात नेहाल पांडे यांची लाखोंचा जनसागर घेऊन महाभारत यात्रा

    मंडळी महाराष्ट्राला गेल्या कित्येक वर्षांपासून महापुरुषांचा आणि जनतेसाठी लढणाऱ्या नेत्यांचा तेजोमय असा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा परकीय लोकांनी महाराष्ट्रातील जनतेवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला.

    तेव्हा तेव्हा इथल्या जनतेने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर परराज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी माणसावर जेव्हा अन्याय करत होते.

    तेव्हा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला ‘शिवसेना’ नावाचा पक्ष स्थापन करून मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसाला

    ” मुंबई कुणाच्या बापाची नाही ” अस बेधडकपणे बोलायला शिकवलं.

    “महाराष्ट्र हा फक्त आणि फक्त मराठी माणसाचाच आहे”

    असं निडरपणे सांगितलं. आणि एक एक माणूस जोडून शिवसेना पक्ष उभा केला. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये काही गद्दार लोकांनी कुटील डाव खेळून बाळासाहेबांचा शिवसेना पक्ष पळवून नेला. आणि मा. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं या लोकांनी काम केलं.

    महाभारत यात्रा कुणाची व कशासाठी ?

    मंडळी गेल्या कित्येक वर्षांपासून वर्धा या शहरामध्ये राहणारा नेहाल पांडे नावाचा तरुण हा जनतेच्या प्रश्नांसाठी लढतो आहे. आणि याच नेहाल पांडे यांनी ‘युवा परिवर्तन की आवाज’ या संघटनेची स्थापना केली.

    आणि असंख्य लोकांना अनेक आंदोलनांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारण संविधानाला आणि इथल्या लोकशाहीला घातक आहे असं दिसून येतं आहे.

    म्हणून नेहाल पांडे यांनी अशा गढूळ राजकारणाच्या विरोधात आवाज उठवला आहे. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये कौरवांनी कुटील राजनीती करून पांडवांचे राज्य हस्तगत केले होते.

    त्याचप्रमाणे आतासुद्धा काही लोकांनी अशाचप्रकारचे कृत्य करून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मिळवला आहे. अशा कृत्याने या देशाची लोकशाही धोक्यात आली आहे.

    आणि म्हणून नेहाल पांडे यांनी ‘आपल्या युवा परिवर्तन की आवाज’ या संघटनेसोबत लाखो लोकांना घेऊन मा. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनामध्ये ‘महाभारत यात्रा’ काढली आहे.

    ही यात्रा नागपुर जिल्ह्यातील रामटेक येथून दिनांक २१ मार्चला सुरू झाली असून दिनांक ३० मार्चला मा. उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील ‘मातोश्री’ या निवासस्थानी पोहचून संपन्न होणार आहे. दरम्यान या यात्रेमध्ये लाखो लोकांनी सहभाग नोंदवला आहे.

  • जागतिक पातळीवर ‘आदित्याचं’च नाव !

    हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे हे एक जगजाणता व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.

    त्यांची जगावेगळी कल्पकता आणि व्यंगचित्रकारितेच्या जोरावर एक नवीन ओळख निर्माण करत भारताच्या राजकारणात एक नवी ओळख निर्माण करत स्वतःच अस्तित्व निर्माण केल

    काळानुसार लोकांचा मिळणारा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढतच गेला .आणि काळानुरूप तयार झालेले बाळासाहेबांचे संघटन हे एका पक्षात रूपांतरीत झाले ,आणि सुरुवात झाली ती शिवसेनेच्या सुवर्ण पर्वाची .

    शिवसैनिक कधी फुटतो का ?

    बाळासाहेब म्हणायचे

    मी चाललो तर मोर्चे निघतील आणि थांबलो तर सभा भरतील.

    याचं वाक्याची तथ्यता ही बाळासाहेबांच्या प्रत्येक कामातून दिसून येत त्यांच्याच कार्याला पुढे नेत त्यांचे पुत्र उद्धवजी ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला आणि बाळासाहेबानंतर शिवसेनेची धुरा हातात घेत पक्ष बांधणीचे काम चालू ठेवले

    पण काळानुरूप बदल होत गेला एक काळ असाही आला की पक्षातील लोकांकडूनच बंड पुकारल्या गेले आणि शिवसेना हतबल झाली.

    हे सगळं चालु असताना उद्धव ठाकरे यांच्या सुपुत्राचा राजकारणातील सक्रियता दिसून आली पक्षासाठीच मर्यादित न राहता त्या वेळी आदित्य ठाकरे प्रत्येक माणसापर्यंत पोहचले आणि आदित्य ठाकरे यांच्यातील नेत्यासोबत आपलासा वाटणाऱ्या एका पुढऱ्याचे दर्शन झाले.

    महाविकास आघाडीच्या काळात अनेक काम करत लोकांकडून प्रसिद्धी मिळवण्याच काम हे आदित्य ठाकरे यांनी उत्स्फूर्तपणे पार पाडले आणि शिवसैनिकाच कर्तव्य पार पाडलं.

    तरीसुद्धा सतत विरोधकांकडून होणारी टिका सहन करत या तरुण व्यक्तिमत्वाने खूप काही साध्य करून दाखवले तर हल्लीच त्यांची चर्चा ही होतेय कारणही तसचं आहे कारण त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या नावाचा समावेश या यंदाच्या यंग ग्लोबल लीडर्स यादीत करण्यात आला.

    मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ

    इतक्या कमी वयात आणि विरोधकांकडून होणाऱ्या टिका सर्वांना दुर्लक्षीत त्यांनी हे सगळं घडवून आणलं तर तेच महाविकास आघाडी च्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान एक युवक त्याच्या नवनवीन योजना देत कसा बदल घडून् आणू शकतो

    हे सांगत आपल्या उमेदवारचा प्रचार केला त्यावेळीं ते नेता म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून पाहायला मिळाले .

    कुटुंबाचा वारसा जपत त्यांनी केलेली कामगिरी ही पक्षासाठी महत्वाची तर होतीच पण त्यांनी समाजापुढेही एक नवा आदर्श निर्माण केला.

    आगामी काळ हा शिवसेनेचा असेल अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत….

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • शेतकऱ्याची व्यथा,जुन्या पेंशनच्या खात्यात !

    सगळीकडे सध्या जुन्या पेंशन चा वाद पेटलेला दिसताना मनात अनेक लोक आणि त्यांच्या नोकरी अथवा व्यवसायाशी निगडित प्रश्न उभे राहतात कालच्या लेखात पण हे बोलू शकलो असतो पण शब्दमर्यादा मध्ये येते …..

    जुनी पेंशनचा विषय थोडासा बाजूला सारून विचार कराव म्हणलं तर डोळ्यासमोर फक्त इथला शेतकरी राजाच येत होता हो सध्याच्या काळातील अस्थिर अस निसर्गचक्र आणि त्या त्याला निर्भिडपणे तोंड देणारा बळीराजा

    कदाचित तुम्ही अस ही म्हणत असाल की सारख सारख शेतकऱ्याच नाव घेत सरकारला ला शेतकऱ्यांविरोधात दाखवणं पण तस नाहीये नक्कीच यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना बऱ्यापैकी न्याय दिला

    सर्वकाही असून तुम्हाला पेन्शन, बाकी शेतकरी, बेरोजगार लोकांनी फक्त मरावं का?

    पण जर सरकारी कर्मचारी जुन्या पेंशन साठी संप पुकारू शकतात तर मग शेतकरी इतकी हालअपेष्टा सोसून पण कस हे सगळं सहन करू शकतो.?

    शेतकरी इतका हतबल होतो की त्याला विरोध करण्यापेक्षा जीवन संपवन अधिक सोप वाटत हे इथंच का होत ? 

    इतर राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा आपलाच शेतकरी  मृत्यूला का कवटाळतो याच कारण काय ?

    शेतकरीप्रिय धोरण हे राबवलं जात हे सरकारच म्हणणं आहे पण याची तथ्यता ही फक्त शेतकरीच जाणतो. हल्लीच राज्यसरकर म्हणत आम्ही केंद्रसरकारप्रमाणे शेतकऱ्याला अजून ६००० रु.दिले ज्याणेकरून शेतकरी अजून समृद्ध होईल

    पण खरंच अस होत का पूर्वीच कर्ज शेतकरी परतफेड करू शकला नाही तर शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नाही आणि  त्यांचं बँक खात हे होल्ड केल्या जात आणि याच खात्यावर जर सरकारने अनुदान अथवा पीकविमा आला तरी हे खात बँके मार्फत गोठवलं जात

    न्यायालयाच्या चौकटीत शिंदे-भाजप सरकार टिकेल ?

    जेणेकरून या खात्याचे सगळे व्यवहार हे थांबवले जातात मग त्या खात्यात जरी पैसे आले तरी शेतकरी त्या पैश्यापासून वंचीत राहतोच की …..

    आणि सरकार दुसऱ्या दिवशी विरोधकांची बोलती बंद करत जाहिरात करतात राज्यसरकाचा शेतकऱ्यांना पाठिंबा अहो ते पैसे हे शेतकऱ्याला मिळतच नाही मग याला जबाबदार कोण ?

    निवडनूक काळात तोंडाला येईल तसे आश्वासन देणारे नेते या विषयाला हात का घालत नाही ? 

    का शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य तो बाजारभाव उपलब्ध करून देत नाही आणी जरी भाव हा समाधानकारक असला तरी भाडे आणि मध्यस्थी लोकांना पैसे देत देत शेतकरी हा गरीबच राहतो की,

    अहो जर इथल्या शेतकऱ्याला लावलेला पैशाही वसूल होत नाही इतपत वाईट परिस्थिती ही इथल्या राजावर येते मग तुम्हीच सांगा शेतकरी कसा मजबूत होईल.

    आणि जर शेतकरी पूर्वीच्या थकीत कर्जामुळे नवीन कर्जाला पात्र राहत नाही परिणामी इतर ठिकाणाहून पैसे घेतो आणि  पुन्हा जर तेच घडले तर शेतकरी जाणार कुठ कुटुंबाच्या उदरनिर्वाह हे तर कारण आहे

    पण जुन्या संस्कृतीला हाच राजामाणूस संभाळतो मग या माणसाला चालना देण्यात इतक राज्यसरकार माग का पडतय की शेतकऱ्यांपेक्षा त्यांना जुनी महत्वाची वाटू लागते.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • सर्वकाही असून तुम्हाला पेन्शन, बाकी शेतकरी, बेरोजगार लोकांनी फक्त मरावं का?

    अहो कसलं मिशन आणि कोणती जुनी पेंशन …..?

    नसेल जमत तर द्या ना सोडून नोकऱ्या…

    इथ उच्चशिक्षित आणि पात्र ,पदव्युत्तर युवक आहेत भरपूर काय गरज आहे जुन्या पेंशन ची ?

    २००४ साली विशेष निरीक्षणा अंतर्गतच ही योजना रद्द करण्यात आली मग उगाच जुने पुराणे मुद्दे काढून कशाला ढवळाढवळ करायची .अहो महाराष्ट्र राज्यात असे कितीतरी उमेदवार आहे जे की नोकरी करू इच्छितात

    आणि खास म्हणजे ते इच्छुक बऱ्यापैकी युवक आहेत. मान्य आहे की काही राज्यामध्ये जुनी पेंशन योजना लागू केलेली आहे पण खर पाहता महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी जुन्या पेंशन वर जगतो का या गोष्टींची पण शहानिशा राज्यसरकारणे करायला हवी

    कोणताही माणूस हा सरकारी काम म्हणलं की डोक्यात विचार आणतो तो आपलं काम कस लवकर होईल याचा, मग तुम्हाला तर माहीतच आहे एखाद सरकारी काम लवकर झाल तर ते लवकर कस होत अथवा त्याला काय कारण असतात ते .

    न्यायालयाच्या चौकटीत शिंदे-भाजप सरकार टिकेल ?

    १८ लाख लोक संपावर जाऊन सरकारला जे काही जुन्या पेंशन बाबत सक्ती लादण्याचा प्रयत्न करत आहेत तो कदाचित योग्य ही असावा पण महाराष्ट्राची वाढती लोकसंख्या आणि ऑटोमेशन च्या नावाखाली कमी होणारा रोजगार याचा इथल्या कुटुंबावर फरक पडतोय त्याच काय ?

    जर कुटुंबातील एखादा कर्मचारी सरकारी नोकरीला असेल तर तो त्याच्या नोकरीच्या काळात अनेक सरकारी योजणांचा लाभ सरकारी सेवक म्हणून घेत असतो पण

    जर त्याला नोकरीनंतरसुद्धा सरकारने त्याचा सांभाळ करावा अशी मानसिकता जर इथला सामान्य माणूस बाळगत असेल तर ते चुकीचं ठरेलं या धोरणाचा अवलंब केला तर विकास सोडा पण महाराष्ट्राला कर्जबाजारी होण्यास वेळ लागणार नाही.

    देवेंद्र आणि एकनाथाच ध्येयवेडं “डबल-इंजिन” सरकार !

    हल्लीच आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले होते आपल्याकडे रोजगार आहे पण इथल्या युवकांमध्ये कौशल्ये नाहीत . पण अजून पण कळलं नाही की त्यांना माहित असलेले रोजगार कोणत्या क्षेत्रातील आहेत आणि किती आहेत ते ?

    जर खरंच त्यांच्या बोलण्यात तथ्यता होती तर युवकांमध्ये कौशल्ये प्रस्थापित करणारी मोहीम पण तर ते चालू करू शकले असते …

    असो विषय भरकटंतोय अस आपल्याला वाटतही असेल पण सांगायचा उद्देश हाच की एकाबाजुला इथल्या लोकांना रोजगार प्राप्ती नाहि तर तेच स्वतःच आयुष्य संरक्षित असताना सुद्धा नोकरीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी १८ लाख लोक एकत्र येऊन बंद पुकारताय

    तर यावर सरकारला योग्य ती कार्यवाही करायला हवी .असो यावर सरकारचा निर्णय होईल तो होईल पण मध्यंतरी या मुद्द्यावर जनतेकडून आपआपली मत मांडण्यात येतात बहुतांश लोक हे सरकारी सेवक लाच घेतात

    या मुद्द्यावर जोर देत जुनी पेंशन ला विरोध करताय पण जर एका दुसऱ्या बाजूने बघायचं झाल तर अस दिसत की शासकीय आणि अशासकीय सेवक वर्गात विरोधाचा वाद पेटवला जातोय हे थांबायला हव कारण हा महाराष्ट्र आहे

    आणि इथला प्रत्येक माणूस त्याच्या हक्कासाठी सांविधानिक लढा देऊ शकतो म्हणजेच हा लेख फक्त आणि फक्त माझ्या दृष्टीकोनातुन लिहिण्यात आलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रात नक्कीच नवीन रोजगार निर्मिती करत सरकार जुनी पेंशन संदर्भात जनतेला साजेल असा निर्णय घेईल अशी अपेक्षा ठेवता येईल

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • न्यायालयाच्या चौकटीत शिंदे-भाजप सरकार टिकेल ?

    सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी सध्याच्या स्थापित सरकार वर अनेक प्रश्न उपस्थित केले आणि हे सरकार अयोग्य असल्याचा इशारा त्यांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नातून दिसून येतो.

    उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे कधी काळी एकच पक्षात राहिलेले आणि बाळासाहेबांच्या विचार आणि शब्दावर चालणारे शिवसैनिक म्हणून ओळखले जात पण काय झाल असावं की एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून बाहेर पडत

    भाजप म्हणजेच कधी काळी शिवसेना ही भाजप सोबत युती करून फसली होती आणि पुन्हा त्याच पक्षासोबत जाऊन शिवसेना आणि शिवसेनेतील काही पक्षाधिकारी फोडून एकनाथ शिंदे यांना भाजपा सोबत युती करावी लागली काय असावं कारण ?

    देवेंद्र आणि एकनाथाच ध्येयवेडं “डबल-इंजिन” सरकार !

    ३ वर्षे थाटलेला संसार एका रात्रीत कसा मोडला असावा ?म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे गटाकडून डावलण्यात येत असावं का ?

    शिंदे आणि शिंदे गटातील लोकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती मान्य नसावी का ?

    महाराष्ट्र हे राज्य आधीपासूनच राजकारणाच्या बाबतीत सुसंस्कृत म्हणवलं जाणार राज्य आहे पण खुर्ची पोटी इथ एवढं सगळं घडणं असंभाविक म्हणता येईल.

    आधीच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल प्रत्येक वेळी वादग्रस्त विधान करून वादाच्या भोवऱ्यात सापडणारे भगतसिंग कोश्यारी यांना भाजप आणि शिंदे गटाच्या युतीची एवढी चिंता का असावी की त्यांच्या प्रत्येक पत्राची दखल हे राज्यपाल घेत असत .

    न्यायालयात युक्तिवाद चालू असताना सरन्यायाधीशांच हे ही म्हणणं आहे की जर पूर्वी ३ वर्षात तुम्ही एकही पत्र राज्यपालांना लिहलं नाही मग एका आठवड्यात ६ पत्र कशी लिहली गेलीत,

    माजी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख – पोलिटिकल वजीर

    तर याउलट सध्याच्या राज्यसरकारला जीवाला धोका आहे यासाठी पत्र लिहणं योग्य आहे पण जर तुम्ही बहुमत चाचणीसाठी सुद्धा पत्र लिहीत असाल तर ते योग्य नाही .

    तर दुसरीकडे राज्यपालांकडून तत्कालीन राज्यसरकारचा सत्ताउतार करण्याहेतू भाजप आणि शिंदे गटाकडून आलेल्या बहुमत चाचणीच्या पत्राला जास्त प्रतिसाद देण हे योग्य नाही अस सुप्रीम कोर्टाच म्हणणं आहे.

    तात्कालीन राज्यसरकारला सत्तेतून काढण्यासाठी अधिवेशन तोंडावर असताना बहुमत चाचणी साठी बोलवणे हे देखील योग्य नव्हे तर महाविकास आघाडीच सरकार पडण्याच्या उद्देशाने राज्यपालांचाही हात असल्याचा दिसून येतो.

    या युक्तिवादात भाजप आणि शिंदेगटाकडून ४ मुद्दे मांडण्यात आले त्यापैकी १ च मुद्दा पटतोय तो म्हणजे ३४ आमदारांनी गटनेत्यांची केलेली निवड अस म्हणत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राज्यसरकारवर प्रश्न उपस्थित केलेला आहे.

    तर हे सरकार अयोग्य की योग्य ठरत हे पाहणं देखील महत्वाच राहील पण जर कदाचित हे सरकार अयोग्य राहील तर त्यांनी जो काही कार्यकाल राज्यसरकार म्हणून बजावला त्याच काय होईल ?

    आणि जे सरकार योग्य राहील त्यांचा कार्यकाल हा विरोधी पक्ष म्हणून बजावला गेला त्याची भरणी कशी होईल यातून महाराष्टाचा विकास हा कुठ ना कुठ अडखळतो अस नाही का वाटत आपल्याला ?

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir
  • मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ

    हाच तो दिवस ज्याने महाराष्ट्राला एक मराठी आणी सुसंस्कृत मराठी विचारधारेला भरभक्कम करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात झाली स्वबळावर आणि  वक्तृत्वाच्या आणि  भाषाशैलीच्या

    आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याच व्यंगचित्रकलेचा आधार घेत देशवासियांना विकासाची हमी देणार व्यक्तिमत्व हे फक्त आणि फक्त राज ठाकरेच सद्या करू शकले.

    तोच रुबाबदारपणा आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची नेहमीची वैशिष्ट्ये राहिली आहेत माध्यम कोणताही असो पण मराठी विचारधारेचा विचार करून मराठी संस्कृतीला साजेल अशी निर्णये घेणं यावर ते भर देतात.

    सामान्य मराठी आणि महाराष्ट्रातील माणूस यांना सरकार अथवा प्रशासनाकडून प्राथमिकता देण्यात यावा यासाठी त्यांचा लढा असतो . महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि इथ मराठी माणूसच राज्य करेल अस त्यांच मत आहे

    सगळ्यां नेत्यांमध्ये राज ठाकरे हे असे एकमेव राजकारणी आहेत जे की मत मिळवण्यावर नव्हे तर माणसं जोडण्यात त्यांचा पक्ष आणि संघटन मजबूत होतोय अस समजतात

    म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…

    पूर्वीपासूनच मनसे या पक्षाने कधी मतांसाठी राजकारण केलेलं नाही हा पक्ष एकमेव असा पक्ष आहे जो की पद नसताना सुद्धा सामान्य माणसाचे हित जपत प्रत्येक अडी-अडचणीत माणसाच्या पाठीशी खंबीर उभा राहतो.

    राज ठाकरे हे जरी मताधिक्य मिळवण्यात कमी असले तरी लोकहितार्थ निर्णय घेण्यासाठी मनसे पक्ष नेहमी बांधील असतो राज ठाकरे हे दूरदृष्टी असणारे एक सुशिक्षित आणि पुरोगामी विचारांना घेऊन विकास साधणारे नेते आहे.

    मनसे पक्ष स्थापनेला आज १७ वर्षे पूर्ण होत आहेत ह्या १७ वर्ष्याच्या काळत राज ठाकरे यांनी सामान्य व्यक्तीचे हित जपन्यात कधीही कमतरता भासू दिली नाही राज ठाकरे आणि त्यांचे विश्वासू कार्यकर्ते

    महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली?

    अथवा पक्षाचे पदाधिकारि हे नेहमी राज साहेबांच्या शब्दावर चालणारे आहेत त्यामुळं लोकहित यातच मनसेच सत्तास्थापन झाल्यासारख आहे नक्कीच मनसे एक खूप कर्तृत्वशील नेतृत्व आहे

    महाराष्ट्रातील जनतेन एकदा सत्ता देऊन बघायला हव मनसे सरकार खूप मोठा अमूलाग्र बदल घडवून आणेल आणि मराठी माणसाला अजून विकासाच्या थरावर नेईल यात काही शंका नाही.

    जेव्हा राज ठाकरे भाषणात बोलतात ना येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधु, माता-भगिनींनो तेव्हा कळत राज ठाकरे साहेब आणि त्यांची विचारसरणी त्यांच्या भाषणाला उपस्थित राहणारी हजारोंची गर्दी च सांगते भविष्यात येणार ते मनसेचच सरकार

    आणि मतांची अपेक्षा न ठेवता जनतेसाठी काम करणारे मनसे पदाधिकारी यांचा निस्वार्थीपणा हे एक महाराषष्ट्राला न उलगडणार कोड आहे….

    अश्या १७ वर्ष्याच्या विकासाच्या वाटचालीत सहभागी होऊन आणि कर्तव्य बजावणाऱ्या तमाम मनसे कार्यकर्त्यांना १७ व्या मनसे पक्ष वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir