Category: बातमी

  • १० मार्चला इंधन दरवाढीचा भडका उडेल- ओवेसी

    १० मार्चला इंधन दरवाढीचा भडका उडेल- ओवेसी

    मंडळी रशिया आणि युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्धाची चर्चा सद्ध्या सम्पूर्ण जगभरामध्ये सुरू आहे. मात्र याचा फायदा घेऊन भारतातील केंद्र सरकार भारतीय जनतेची लूट करण्याची शक्यता अनेक राजकीय नेत्यांनी दर्शवली आहे.
     
     
    पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर मागे १५ ते २२ रुपयांची वाढ होणार असल्याचे दिसत आहे. आज उत्तरप्रदेशात मतदानाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ही वाढ जाहीर होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीसुद्धा ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
     
     
    “निवडणुका संपणार, सरकारचे खरे रूप दिसणार, इतके दिवस निपचित पडून असलेले पेट्रोल डिझेलचे दर अचानक उसळी घेणार! उणाचा भडका झालाय, तसाच इंधन दरवाढीचाही होणार!”
     
     
    अस खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्यसरकारमध्ये राजकिय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. 
     
     

    काय म्हणाले ओवेसी? 

     
     
                   उत्तरप्रदेशात निवडणुका संपल्यानंतर इंधन दर वाढीचा भडका उडणार याची शक्यता दर्शवली जात आहे. यावर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीसुद्धा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ओवेसी यांनी इंधन दरवाढीबद्दल भाकीत केलं आहे.
     
     
    ” पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी गगनाला भिडत आहे. एक लक्षात ठेवा की ७ तारखेच्या रात्री किंवा १० तारखेला सकाळी तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसतील. हे भाव वाढतील आणि सांगतील की, युक्रेनमध्ये अस घडलंय, तसं घडलंय…काहीपण बोलतात. कारण तयार करतात की अस घडलं, तसं घडलं आणि भाजपाचे बिचारे भक्त म्हणतात की नाही नाही मोदीजीने योग्यच केलं. तुमच्या गाडीत पेट्रोल मोदी टाकतोय की, गरीब स्वतः पेट्रोल भरतोय.”
     
    अस ओवेसी प्रसार माध्यमांशी बोलत होते. मात्र ओवेसींच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आता काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • सगळ्यांचे मुखवटे उतरवून जेलमध्ये पाठवणार- संजय राऊत

    सगळ्यांचे मुखवटे उतरवून जेलमध्ये पाठवणार- संजय राऊत

                 मंडळी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि संजय राऊत या दोघांमध्ये चांगलाच राजकीय वाद पेटला होता. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली होती.
     
     
    त्यानंतर संजय राऊत यांनीसुद्धा शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्यावर प्रतिहल्ला केला. त्यानंतर आज आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीन क्लीनचिट दिल्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या व भारतीय जनता पक्षावर चांगलीच टीका केली आहे.
     
     
    प्रसार माध्यमांशी बोलत असतांना संजय राऊत म्हणाले की,
     
     
    ” पीएमसी घोटाळा, खंडणी यांसारखी अनेक प्रकरण आजपर्यंत दाबून ठेवण्यात आली होती. आता बरेच लोक समोर येऊ लागले आहेत. हळूहळू सर्वांना समजेल. ते जर निर्दोष आहेत, तर बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करत आहेत? जेव्हापासून मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, हे बाप-बेटे दारोदार या कोर्टामधून त्या कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करत आहेत. त्याची गरज तुम्हाला का पडतेय? यातच सगळं स्पष्ट होतंय. मी जे साडे तीन म्हणालो,  ते तुम्ही मोजत रहा.”
     
     
    अस संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका करत म्हटलं आहे.
     
     
                 पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की,
     
     

    ” त्या साडेतीन लोकांची नाव जाहीर केली, तर ते अटकपूर्व जामिनासाठी जातात. जसजशी त्यांना अटक होईल, तसतस तुम्हाला समजेल. पण माझे शब्द लिहून ठेवा, हे बाप-बेटे आणि इतरही काही लोक, जे मोठंमोठ्या गप्पा करतात, त्या सर्वांचे मुखवटे उतरवून त्यांना मी तुरुंगात टाकणार आहे.”

     
     
     
    अस संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितल. संजय राऊत हे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सर्वात जास्त चर्चेत आलेलं नाव आहे. भारतीय जनता पक्षाशी त्यांची फारशी गटत नाही. मात्र आता केलेल्या विधानांनातर किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्ष संजय राऊत यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
     
  • संजय राऊतांना वाटत की त्यांचं भांडूपंच घर आणि मातोश्री म्हणजे महाराष्ट्र आहे- अतुल भातखळकर

    संजय राऊतांना वाटत की त्यांचं भांडूपंच घर आणि मातोश्री म्हणजे महाराष्ट्र आहे- अतुल भातखळकर

               मंडळी संजय राऊत यांनी दिनांक १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस, मोहित कंबोज, निल सोमय्या अशा अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका केली होती.
     
                  मात्र भाजप नेत्यांकडून राऊत यांच्या आरोपांचा कडाडून विरोध होत आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपच्या साडे तीन नेत्यांचा उल्लेख केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर निशाणा साधला होता.
     
              देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
     

    “गेल्या कित्येक कालावधीपासून सातत्याने पोलिसांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भारतीय जनता पार्टी संघर्षाला कधीच मागे हटलेली नाही. आम्ही नेहमी लढत राहू आणि विरोधात बोलत राहू.”

     
     
           अस ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगत होते. अशाच प्रकारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा विरोध केला आहे.
     

    भातखळकरांचा राऊतांवर हल्लाबोल

                 संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला. मात्र भारतीय जनता पक्षाने संजय राऊत यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. देवेंद्र फडणवीसानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रतिउत्तर दिल आहे.
     
             ते म्हणाले की,
     

    ” संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र आहे का? मुंबई महानगरपालिकेत सोडा, पण नगरपालिकेच्या निवडणूकीतही संजय राऊत कधी निवडून आलेले नाहीत. आमच्यासोबत युती केल्याशिवाय यांना कधी १०० जागा मिळाल्या नाहीत. संजय राऊतांना वाटत की, त्यांचं भांडूपंच घर आणि मातोश्री म्हणजे महाराष्ट्र आहे. गौरसमजात राहू नका. महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाहीत. राऊतांनी महानगरपालिकेची एक तरी निवडणूक लढवावी. आयुष्यभर तुम्ही राज्यसभेत गेला आहात. राऊत-उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाहीत.”

     
            अस भातखळकर म्हणाले. मात्र यावर शिवसेनेकडून किंचा संजय राऊत यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत आलेली नाही. आता हे तापलेल राजकीय वातावरण कुठल्या थरावर जात. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
  • शिवसेना नेत्यांवरील कारवाईचा विरोध करण्यासाठी संजय राऊत यांची पत्रकार परिषद – देवेंद्र फडणवीस

    शिवसेना नेत्यांवरील कारवाईचा विरोध करण्यासाठी संजय राऊत यांची पत्रकार परिषद – देवेंद्र फडणवीस



                 मंडळी सम्पूर्ण महाराष्ट्रभरातील जसजशा महानगरपालिका निवडणूका जवळ येत आहे. तसतस राजकीय वातावरण आणखी पेटत चाललं आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना कारागृहात टाकण्याची भाषा करत आहेत ,तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत भारतीय जनता पक्षामधील नेत्यांना कारागृहात डाम्बण्याची भाषा करत आहे.
     
            संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना  भारतीय जनता पक्षाच्या साडे तीन नेत्यांचा उल्लेख केल्यानंतर भारतीय जनता पक्षामधील नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.
     
              किरीट सोमय्या यांना शिवसैनिकाकडून झालेल्या मारहाणीचा भारतीय जनता पक्षाने जागोजागी कडाडून विरोध केला होता. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. 

    काय म्हणाले फडणवीस? 

                  संजय राऊत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या मुद्द्यावर बोलत असताना फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. गेली दोन वर्षे ही मंडळी सातत्याने अशाच प्रकारच्या धमक्या देत आहेत. भाजपा संघर्षात कधीही मागे हटलेली नाही.
     
              अस देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केलंय. तसेच भाजप संघर्षाला तयार असल्याचं म्हणत त्यांनी राऊत यांना आव्हान दिलंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले गेली दोन वर्षे अशा प्रकारच्या धमक्या ही मंडळी सातत्याने देत आहेत. भाजपा संघर्षाला कधीही मागे हटलेली नाही.
     
                   पोलिसांचा उपयोग करून आमच्या नेत्यांना प्रचंड त्रास देण्यात आलाय. त्याची अनेक उदाहरण समोर आहेत. सातत्याने पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. आजची पत्रकार परिषदे ही शिवसेना नेत्यांवरील कारवाईचा विरोध करण्यासाठी घेण्यात आलेली आहे.
     
                अस देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं. मात्र हे तापलेल राजकीय वातावरण आता कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • नक्कलेवर लढणारे बेअक्कल

    नक्कलेवर लढणारे बेअक्कल

             मंडळी राजकारणामध्ये अनेक नेते एकमेकांची नक्कल करतांना आपण बघत असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मा. अमोल मिटकरी असो. असे अनेक नेते भाषणादरम्यान किंवा संवाद करत असताना एकमेकांची नक्कल करून एकमेकांची खिल्ली उडवताना आपल्याला दिसतात. मात्र दिनांक २२ डिसेंबर २०२१ ला विधानसभेत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केलेल्या नक्कलेवरून चांगलाच गदारोळ झाला. एकीकडे दिल्लीमध्ये विरोध पक्षाच्या खासदारांच्या निलंबनाची मागणी सुरू आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षातील आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली .
    विधानसभेमध्ये राज्यातील वीज कापणी संदर्भात चर्चा सुरू असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही विधानांचा संदर्भ देत म्हणाले की, \” मा. पंतप्रधान मोदी साहेबांनी म्हटलं होतं की परदेशात असलेला काळा पैसा देशात परत आणू. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये टाकू.\” परिणामी यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देतांना कमालच केली. ते म्हणाले की, \” मोदीसाहेब अस म्हणालेच नाहीत.\” यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हस्तक्षेप करतांना मा. पंतप्रधान मोदी साहेबांची नक्कल केली आणि म्हणाले की,\” २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी १०० वेळा म्हणाले आहेत की \’ काला धन लाने का की नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहा रखने का? यू ही रखने का\’ अस ते बोलले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली.
    मोदी साहेबांची नक्कल दिसली पण छत्रपती शिवरायांची विटंबना नाही दिसली फडणवीस साहेब?

                मंडळी छत्रपती शिवरायांच्या अस्मितेचा वापर भारतीय जनता पक्ष नेहमी राजकारणापुरताच करताना दिसतो. कारण त्यांना शिवरायांपेक्षा मोदीसाहेबांची अस्मिता  महत्वाची वाटते. हे काल विधानसभेत फडणवीसांच्या वर्तवणूकीवरून दिसून आलं. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवरायांच्या झालेल्या बदनामीवर देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. मात्र विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांनी मोदी साहेबांची नक्कल केली तर बेंबीच्या देठापासून ओरडून फडणवीस साहेब त्यांचा निषेध करत होते. आपल्या भाषणामधून फक्त शिवरायांच नाव घेणं हा त्यांचा राजकीय जुमला असतो हे लोकांच्या चांगलंच लक्षात आलं आहे.

  • सिरीयल किलर

    सिरीयल किलर

    हा कुणी माणूस नाही कुठलीही स्त्री नाही पण रोज एकाच वेळी लाखो लोकांचे जीव घेऊ शकतो आणि घेतोसुद्धा.रोज लाखो लोकांना तजवतो, मूर्ख बनवतो.आधी मानसिक अत्याचार करतो आणि मग मोठ्या शातीरीने तुमचा खून करतो. कुणाला कानोकान खबरही लागू देत नाही,
    याला कोणताही पोलीस अटक करू शकत नाही, कोणताही वकील ह्याच्याविरुद्ध मुकदमा चालवू शकत नाही,
    ह्याच्याकडे कुठल्याही प्रकारची दया नाही. हा लहान मुलांना मारतो , कुणाची बहीण , कुणाचा भाऊ , कुणाची माय, कुणाचा बाप ह्याला काही घेणं देणं नाही आणि खून करायची ह्याची वेगळीच तरकीब आहे. तुमच्याच घरी येतो ,तुमच्या टीव्हीमध्ये येतो, वर्तमानपत्रामध्येसुद्धा. पण तुम्ही याला ओळखू शकत नाही. अरे तुम्हीच काय ह्याला कुणीच ओळखू शकत नाही, हा रोज लाखो लोकांचे खून करतो आणि स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजलीही देतो. तुम्ही त्याला ओळखूनही त्याच्या अज्ञात आहात. हा अमर आहे. ह्याला तुम्ही जर मारल नाही तर हा कधीच मरणार नाही.
    हा.पण काही कालावधीन तो वेष बदलून दुसऱ्या माणसांच रूप घेतो आणि मग पुन्हा खून करतो तुमचा , तुमच्या स्वप्नांचा, तुमच्या कुटुंबाचा. विदर्भामध्ये आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीनं एसटीच्या पाससाठी बापाकडे पैसे नाही म्हणून जीव दिला ती आत्महत्या नव्हती,
    धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यान मंत्रालयात जाऊन विष घेऊन दिलेला जीव आत्महत्या नव्हती, नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर मधल्या शेतकऱ्याकडे मार्केटमधून घरी जाण्यासाठी पैसे नाही म्हणून दिलेला जीव आत्महत्या नव्हती, सोलापूर जिल्ह्यातील एका खेडेगावच्या मुलांन सांगितलं की \’माझ्या बापान गळफास घेऊ नये म्हणून मी रात्रभर बापाच्या बाजीचा ठाव्वा पकडून बसलो होतो \’ , ही मानसिक आत्महत्या नव्हती, उत्तर प्रदेशमध्ये सायकलच्या दोन दांड्याच्या मध्ये बायकोचा मृतदेह घेऊन जाताना हतबल झालेला माणूस, ज्या देशामध्ये तीन हजार कोटी रुपयांची मूर्ती आहे त्याच देशात बेड आणि ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून नवऱ्याला तोंडातून श्वास देणारी बायको, निवडणूकीच्या वेळेस जातीवादावरून होणारी समाजाची आत्महत्या, कर्जमाफीवरून होणारी शेतकऱ्यांची आत्महत्या ,अंधश्रद्धेविरोधात एल्गार पुकारणाऱ्या दाभोळकर ,पानसरे कलबुर्गीचा गेलेला जीव,
    उत्तर प्रदेशमधल्या नद्यांमध्ये वाहणारे तुमच्याच आप्तीकांच्या प्रेतांचे ढीग, दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा आंदोलनामध्ये जाणारे जीव ,जामिया जेएनयूसारख्या विद्यापीठांवर होणारे हल्ले , नोटबंदीच्या रांगेमध्ये गेलेले निर्दोष लोकांचे जीव, उद्या तुमचाही नंबर लागू शकतो कारण हा सिरीयल किलर दर पाच वर्षांनी वेष बदलतो तोही तुमच्याच हातून ,म्हणून

    सावधान राहा …

  • कर्नाटक वादावरून राजकीय पक्षांना अचानक कसा काय आला शिवरायांच्या अस्मितेचा पुडका?

    कर्नाटक वादावरून राजकीय पक्षांना अचानक कसा काय आला शिवरायांच्या अस्मितेचा पुडका?

    मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्र राज्यालाच नव्हे संपूर्ण देशाला आदर-सन्मान आहे. मात्र राजकीय नेते बहुधा शिवरायांच्या नावाचा वापर त्यांच्या सोयीनुसार करत असतात. शिवरायांची विटंबना झाल्यानंतर जिथे त्यांची बाजू कमी पडते तिथे ही लोक एकही विधान शिवरायांच्या समर्थानात करत नाही. काही काही बहाद्दर तर एवढे आहे, की चक्क आपल्या स्वार्थासाठी, आपली बदनामी वाच्यवण्यासाठी ज्या व्यक्तीने शिवरायांची विटंबना केली त्यालाच सोशल मीडियावरून समर्थन करत असतात. मंडळी शिवरायांची विटंबना करणं \’राजा शिवछत्रपती\’ या पुस्तकातून बाबासाहेब पुरंदरेपासून चालत आलंय. त्याची शिक्षा त्यांना चेहऱ्यावर काळ फासून घेऊन भोगावी लागली होती. मात्र त्यावेळी शिवसेनेचे नेते मा. उद्धवसाहेब ठाकरे, मनसे नेते राजसाहेब ठाकरे , राष्ट्रवादी नेते डॉ. अमोल कोल्हे , भाजप नेते देवेंद्र फडणवीस अशी खूप राजकीय मंडळी शिवरायांच्या विटंबना करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना समर्थन करत होती आणि करत सुद्धा आहे. अलीकडे गिरीश कुबेर नावाच्या व्यक्तीनेसुद्धा जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी राजेंची आणि शिवरायांची विटंबना \’द रेनेसन्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्रा\’ या पुस्तकामध्ये केली होती. त्यावर प्रतिउत्तर म्हणून दोन शिवप्रेमी मावळ्यांनी ९४ व्या तथाकथित अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या तोंडाला काळ फासल होत. मात्र गिरीश कुबेरांच्या या कृत्यावर राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते मा. शरद पवार साहेबांनी , मनसे नेते राज साहेब ठाकरेंनी, शिवसेना नेते मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी कोणीही विरोध किंवा निषेध दर्शवला नाही. उलट ट्विट करून सांगितल की साहित्य संमेलनामध्ये अतिथीच्या तोंडावर शाही फेकन निषेधार्थ आहे. भाजपाने गिरीश कुबेरांचा निषेध केला पण तो फक्त राजकीय स्वार्थासाठी. याच कारण अस की, याआधी शिवरायांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेला समर्थन देणारी भाजपच होती.

    कर्नाटकमध्ये शिवरायांची विटंबना झाल्यावर अचानक शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे,भाजपला अचानक पुडका कसा?

       मंडळी हेच या राजकीय नेत्यांच राजकारण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कर्नाटकमध्ये शिवरायांची बदनामी झाल्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे या सर्वांनी सोशल मीडियाचा माध्यमातून निषेध दर्शवला. निषेध दर्शवन वाईट नाही पण नुसत्या राजकीय स्वार्थासाठी शिवरायांच्या अस्मितेचा वापर करन वाईट आहे. कारण गिरीश कुबेर , बाबासाहेब पुरंदरे यांना शिवरांयांच्या बदनामीवर समर्थन करणारे हेच राजकीय पक्ष होते. म्हणून सम्पूर्ण जनतेने आता पूर्णतः विचार करून या राजकीय पक्षांच समर्थन करायला हवं.