Category: बातमी

  • अमोल मिटकरी नी वापरलेल्या मंत्रावरून ब्राम्हण महासंघाच आंदोलन

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरेंच्या भोंग्यानंतर आता नवीन वाद निर्माण झाला आहे. दिनांक १९ एप्रिल २०२२ ला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अमोल मिटकरींनी मांडलेल्या भूमिकेबद्दल राजकीय वातावरण चिघळल आहे.

    अमोल मिटकरींनी या सभेमध्ये बोलत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलच धारेवर धरलं. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेचा उल्लेख करत त्यांनी राजकीय चर्चा आणखी रंगात आणली.

    पुरंदरेची हाड मोजायला लावू नका – जितेंद्र आव्हाड

    राज ठाकरे हे भोंग्याच्या वादावरून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करत आहे. अशी ठाम भूमिका अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणातून मांडली. मात्र पुढे बोलत असतांना त्यांनी केलेल्या वक्त्यव्यावर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अमोल मिटकरी यांनी बोलत असतांना,

    ‘ मम भार्या समर्पयामि ‘

    हा लग्न समारंभामध्ये वापरण्यात येणारा मंत्र सांगून त्याचा अर्थ

    ‘ माझी बायको घेऊन जा ‘

    असा सांगितला. ही गोष्ट ब्राम्हण महासंघाला चांगलीच खटकली आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापुढे त्यांनी अमोल मिटकरींविरोधात आंदोलन सुरू केलं. 

    राज ठाकरे अंगाने मोठा भोंगा – अमोल मिटकरी

    आंदोलनकर्त्यांची मिटकरींसमोर ततबब 

    अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथे वापरलेल्या मंत्रावरून आंदोलन करणाऱ्या ब्राह्मण महासंघासाची प्रसार माध्यमांवर चर्चा झाली तेव्हा अमोल मिटकरींनी चुकीचा मंत्र वापरून हिंदू धर्माचा अपमान केला अस आंदोलकांच म्हणन होत. मात्र जेव्हा मिटकरींनी या मंत्राचा अर्थ ब्राह्मण महासंघाला विचारला, तेव्हा मात्र खुल्या प्रसार माध्यमांवर ब्राम्हण महासंघाची ततबब झाली.

    या पार्श्वभूमीवर

    ” पुण्यामध्ये चालू असलेलं ब्राम्हण महासंघाच आंदोलन निरर्थक आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी बाबासाहेब पुरंदरेंनी केली होती, तेव्हा ब्राम्हण महासंघाने का आंदोलन केलं नाही ?”

    असा प्रश्न मिटकरी यांनी आंदोलकांना विचारला. मात्र आता हे चालू असलेलं आंदोलन कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • शरद पवारांना आम आदमी पक्षाच पत्र

    मंडळी गेल्या सात वर्षांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीन अगदी कमी कालावधीमध्ये दिल्ली आणि पंजाब राज्यांसारखे गड काबीज केले. याहीव्यतिरिक्त गोव्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्येसुद्धा आम आदमी पार्टीचे दोन आमदार निवडून आले.

    कुठल्याही जाती धर्माच राजकारण सोडून विकासाच राजकारण करणारा हा पक्ष आता महाराष्ट्रामध्ये उदयास यायला सुरुवात झालेली आहे. याच उदाहरण नुकतंच बघायला मिळालं आहे.दिनांक २३ व २४ एप्रिल २०२२ ला उदगीर येथे ९५ वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन पार पडणार आहे.

    या पार्श्वभूमीवर अन्यायाविरुद्ध, अनिष्ट प्रथा परंपरेविरुद्ध बंड पुकारणार विचारपीठ या साहित्य संमेलनात सर्वांना आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देत असत. या साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित असणार आहेत.

    शरद पवार यांनी विचारपीठावर बोलत असतांना राज ठाकरेंच्या समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भोंग्याचा उल्लेख करावा. अस पत्र आम आदमी पार्टीच्या वतीने शरद पवार यांना देण्यात आल आहे. 

    शरद पवारांसोबत नागराज मंजुळे आणि रविषकुमार यांची असणार उपस्थिती 

    दिनांक २३ व २४ एप्रिलला होऊ घातलेल्या ९५ व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाला शरद पवार यांच्यासोबत बहुजनांचे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न चित्रपटाच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेपुढे मांडणारे  विख्यात सिने दिग्दर्शक सैराट फेम नागराज मंजुळे आणि निर्भीडपणे आपली ठाम भूमिका मांडणारे विख्यात पत्रकार रविषकुमार यांची उपस्थिती असणार आहे.मात्र या साहित्य संमेलनामध्ये आपल्या भाषणात शरद पवार काय भूमिका मांडतील? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • पुरंदरेची हाड मोजायला लावू नका – जितेंद्र आव्हाड

    मंडळी काल सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अमोल मिटकरी, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांची चांगलीच कानउघाडणी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे आणि मुंबईमध्ये झालेल्या सभेत धार्मिक राजकारणाचा डावपेच आखून आपल्या भाषणामधून धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली होती.

    त्याचबरोबर त्यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन यांचा मुद्दा पुन्हा उकरून जनतेच्या सामाजिक प्रश्नांना तळा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडला टार्गेटवर धरलं होत. मात्र यानंतर संभाजी ब्रिगेडचे जेष्ठ नेते मनोज आखरे यांनी राज ठाकरेंना सोशल मिडियाद्वारे चर्चेसाठी ओपन चॅलेंज केलं होतं.

    मात्र राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे संभाजी ब्रिगेडच्या आव्हानापासून नजर चोरली होती. त्यामुळे त्यांना संपूर्ण सोशल मीडियावर चांगलच ट्रोल करण्यात आलं होतं. राज ठाकरे हे आपल्या भाषणाच्या माध्यमातून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

    अस मत बऱ्याच नेत्यांनी व्यक्त केलं होतं. या पार्श्वभूमीवर काल झालेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत जेष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन यांच्या केलेल्या उल्लेखावरून जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तरात म्हटलं की,

    “पुरंदरेला आणि जेम्स लेनला उकरून तुम्ही बाहेर काढलं आहे. त्यांची हाड मोजायला लावू नका. मला इतिहासाबद्दल बोलायचं नाही. मी जर शिवचरित्रातल पान अन पान वाचून दाखवलं ना, तर यशवंतराव चव्हाणांनी सांगितल ते सत्य होईल. त्यांनी काय सांगितल ते ही मी सांगत नाही.”

    अस जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. 

    पुरंदरेंनी प्रशासनाला माफीपत्र लिहिलं होतं- जितेंद्र आव्हाड 

    राज ठाकरे यांनी पुरंदरे आणि जेम्स लेनच्या उकरून काढलेल्या वादाला जोरदार प्रतिउत्तर जीतेंद्र आव्हाड यांनी काल इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये दिल. ते बोलताना पुढे म्हणाले की,

    ” माझ्याकडे पुरावा आहे. जेव्हा पुरंदरे यांनी कालनिर्णय या कॅलेंडरमध्ये स्वतःच्या मनाने छत्रपती शिवरायांची जन्मतारीख हे तिथीप्रमाणे मांडली होती. नंतर ते पंढरपुरला एका कार्यक्रमात गेले असतांना अमरजीत पाटील या शिवमावळ्याने पुरंदरेला जाब विचारल्यानंतर त्याने माफीपत्र प्रशासनाला लिहिलं होतं.”

    अस बोलतांना त्यांनी राज ठाकरे यांना पुराव्यानिशी चांगलच धारेवर धरलं. मात्र आता यावर राज ठाकरे आव्हाडांना काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • राज ठाकरे अंगाने मोठा भोंगा – अमोल मिटकरी

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणात सध्या राजकीय नेत्यांनी एकमेकांची टिंगल उडवण्याचा चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई आणि ठाणे येथे घेतलेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा हा नागसारखा दिसतो असे सांगून त्यांची नक्कल करून चेष्टा केली होती.

    प्रतिउत्तरात प्रसार माध्यमांशी बोलतांना आव्हाड यांनीसुद्धा राज ठाकरेंवर टीका करत म्हटलं होतं की,

    ” राज ठाकरेंनी एकदा आरशात बघून पहावं , की त्यांचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा दिसतोय ते.”

    यावरून संपूर्ण राजकीय क्षेत्रात चांगलीच राजकीय रंगत लोकांना बघायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर सांगलीमधल्या इस्लामपूरमध्ये काल घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना चांगलच धारेवर धरलं.

    राज ठाकरे यांनी मस्जिदींवरील भोंगे खाली न उतरवल्यास प्रत्येक मस्जिदीपुढे दुप्पट आवाजात भोंग्यावर हनुमान चालीसा लावा असे आदेश आपल्या मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले होते. याच मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत म्हटलं की,

    ” राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाला मिळालेला नवीन भोंगा आहे. जो अंगानेसुद्धा भोंगा आहे. राज ठाकरे यांनी भाजपकडे आपला मेंदू गुलाम म्हणून ठेवला आहे. मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याची अक्कल राज ठाकरेंना देवाने दिली नाही.”

    अस बोलताना राज ठाकरेंच्या राजकीय गुलामीची खिल्ली मिटकरी यांनी उडवली.

    राज ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी सुरक्षा कशाला हवी?  – मिटकरी 

    राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये राज ठाकरेंवर जोरदार टीका करतांना म्हटलं की,

    ” रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. एक राम दशरथ का बेटा एक राम घटघटमे बैठा अस म्हटल्या जाणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांनी अयोध्येला जातांना आपली गादीही भरताला दिली होती. ते Z+ सुरक्षा घेऊन गेलेलं नव्हते. तोच खरा राम भक्त जो केंद्राची Z+ सुरक्षा नाकारणार. “

    अस बोलतांना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंची चांगलीच कानउघाडणी केली. मात्र १ मे ला होणाऱ्या औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे मिटकरींना काय प्रतिउत्तर देतील? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • राज ठाकरे ही भाजपची C टीम – अब्दुल सत्तार

    मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरे यांच्या भाषणांनी धुमाकूळ घातलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेहमी विरोधात बोलणारे राज ठाकरे यांनी अचानक भाजपाच्या बाजूने भूमिका मांडल्याने त्यांनी सर्वांना अचंबित करून सोडलं आहे.

    भारतीय जनता पक्षाच राजकारण हे नेहमी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून मत मिळवायचं असत आणि आता तोच डावपेच राज ठाकरे यांनी वापरायला सुरवात केली आहे. १ मे २०२२ ला राज ठाकरेंची सभा औरंगाबादमध्ये होणार असून समाजामध्ये धार्मिक अस्थिरतेच वातावरण पसरण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे.

    या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील मुस्लिम समाजाचे नेते अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधुन शिवसेनेची भूमिका मांडली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की,

    ” अलीकडे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना आपण भाजपाची B टीम समजत होतो. मात्र आता राज ठाकरे यांच्या भाजपप्रेरीत भूमिकेवरून त्यांना भाजपाची C टीम म्हटलं तर वावग ठरणार नाही.”

    अस अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. 

    राज ठाकरेंच्या सभेचा शिवसेनेला फरक पडत नाही – अब्दुल सत्तार 

    दिनांक १ मे २०२२ ला औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलत असताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटलं की,

    ” शिवसेना हा खरा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि तो इतर धर्मांनासुद्धा सोबत घेऊन चालतो. शिवसेना हा प्रत्येक माणसाच्या, गोरगरीब जनतेच्या काळजात बसलेला पक्ष आहे. म्हणून राज ठाकरे यांच्या सभेचा शिवसेनेच्या कुठल्याच कार्यकर्त्यावर काही प्रभाव होणार नाही किंवा इतर लोकांना त्याचा फरक पडणार नाही.”

    अस अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

  • देवेंद्र फडणवीस बहुजनांचे खरे नेते – सदाभाऊ खोत

    मंडळी मराठा आरक्षणाचा वाद महाराष्ट्रातील राजकारणात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरलेला असतो. सरकार बदललं तरी मराठा आरक्षणाची परिस्थिती तीच असते आणि जो विरोधीपक्ष असतो तो फक्त आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी विरोध करायचा म्हणजे करायचा या उद्देशाने आपली भूमिका नेहमी मांडत असतो.

    जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच सरकार होत, तेव्हासुद्धा मराठा आरक्षणाचा वाद हा चालूच होता आणि आता महाविकास आघाडीच सरकार आहे, तरी मराठा आरक्षणाचा वाद चालूच आहे. फक्त भूमिका घेणारे आणि विरोध करणारे बदलत असतात.

    आता हीच विरोधीपक्षाची भूमिका घेऊन सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका करत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची माल जपली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना फडणवीसांची महती गायतांना सदाभाऊ खोत म्हणाले की,

    ” देवेंद्र फडणवीस हे बहुनजनांचे खरे नेते आहेत. कारण ते बहुजनांसाठी नेहमी आवाज उठवत आले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी आपली भूमिका ताकदीने मांडली आहे.”

    अस सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. 

    शरद पवार जातीयवादी नेते – सदाभाऊ खोत

    रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणाच्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की,

    ” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी समाजामध्ये जातीयवाद पसरवण्याच काम केलं आहे. मात्र त्या सर्वांना पुरून उरलेला माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस. शरद पवार हे जातीयवादी नेते आहेत. म्हणून त्यांनी गेल्या पन्नास वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल नाही. एकेकाळी मराठा समजाला आरक्षण मिळावं म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना केल्या गेली. अनेक सुनावण्या केल्या गेल्या. मोर्चे काढले गेले. रॅल्या काढल्या गेल्या. मात्र आता तेच लोक सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणापणापासून आपली पाठ फिरवत आहे. कारण त्यांना विस्थापित मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायच नाही. “

    असा टोला सदाभाऊ खोत यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना शरद पवार यांच्यावर लगावला आहे.

  • राज ठाकरेंचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा आहे हे त्यांनी तपासून पहावं – जितेंद्र आव्हाड

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये घेतलेल्या सभेत अप्रत्यक्षपणे सांगितल की, ते आगामी निवडणूका भारतीय जनता पक्षासोबत लढणार आहेत. मात्र काल बोलत असताना बऱ्याचदा राज ठाकरेंची जीभ घसरली.

    ठाकरे साहेबांच्या बोलण्यात मोदींसाहेबांप्रमाणे काही तथ्य दिसलं नाही. सर्व तिर काल ते हवेमध्ये उडवायचा प्रयत्न करत होते. गुडीपाडव्यानिमित्त आधी घेतलेल्या सभेमध्ये भोंग्याच्या वादावरुन त्यांनी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच काम केलं.

    त्यावेळी एकही मुद्दा त्यांनी सामान्य जनतेच्या समस्सेचा घेतला नाही. मात्र काल झालेल्या सभेत बऱ्याच लोकांची अपेक्षा होती की, राज ठाकरे यावेळी तरी रोजगार, शिक्षण, शेती याविषयी बोलतील .

    मात्र राजसाहेब यांनी ते नेहमीचच हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि इतर पक्षावर टीका केली. यासोबतच राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरसुद्धा बोचरी टीका केल्याने आव्हाड यांनी राज ठाकरेंना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

    आव्हाड यांचं राज ठाकरेंना प्रतिउत्तर

    मंडळी काल ठाण्यात झालेल्या मनसेच्या सभेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोचरी टीका केल्याने आव्हाड आणि राज ठाकरे या दोघांमध्ये चांगलच राजकीय युद्ध रंगल आहे. राज ठाकरे यांनी आव्हाड यांच्यावर टीका करताना म्हटलं की,

    ” जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा नागसारखा आहे. ये इकडे शेपूट धरून गरगर फिरवतो आणि फेकून देतो.”

    अशी राज ठाकरे यांनी केलेली अपमानजनक टीका ऐकल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा राज ठाकरे यांची प्रतिउत्तर देताना चांगलीच कानउघाडणी केली. आव्हाड म्हणाले की,

    ” राज ठाकरे यांनी आपला चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा हे आरशात तपासून पाहावे. तशा स्टँड अप कॉमेडीयनच्या भरपूर जागा खाली आहेत. त्यांनी त्यामध्ये जावं.”

    अस आव्हाड यांनी म्हटलं आहे. मात्र आता हे रंगलेल राजकीय युद्ध कुठल्या वळणावर जाईल. याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

  • राज ठाकरेंना संभाजी ब्रिगेडच ओपन चॅलेंज

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये घेतलेल्या सभेत अप्रत्यक्षपणे सांगितल की, ते आगामी निवडणूका भारतीय जनता पक्षासोबत लढणार आहेत. मात्र काल बोलत असताना बऱ्याचदा राज ठाकरेंची जीभ घसरली.

    ठाकरे साहेबांच्या बोलण्यात मोदींसाहेबांप्रमाणे काही तथ्य दिसलं नाही. सर्व तिर काल ते हवेमध्ये उडवायचा प्रयत्न करत होते. गुडीपाडव्यानिमित्त आधी घेतलेल्या सभेमध्ये भोंग्याच्या वादावरुन त्यांनी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच काम केलं.

    त्यावेळी एकही मुद्दा त्यांनी सामान्य जनतेच्या समस्सेचा घेतला नाही. मात्र काल झालेल्या सभेत बऱ्याच लोकांची अपेक्षा होती की, राज ठाकरे यावेळी तरी रोजगार, शिक्षण, शेती याविषयी बोलतील .

    मात्र राजसाहेब यांनी ते नेहमीचच हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि इतर पक्षावर टीका केली. बोलत असताना राज ठाकरे यांनी शिवरायांच्या इतिहास बदनाम करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे याचा उदोउदो करत संभाजी ब्रिगेड वर टीका केली.

    मंडळी राज ठाकरेंच्या बोलण्याची लोकांना कीव यावी अशी लहान मुलांसारखी त्यांनी काल वक्तव्य केली. ज्यामुळे राज ठाकरे यांना सोशल मीडियावर चांगलच ट्रोल करण्यात येत आहे. ते म्हणाले की शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडची स्थापना १९९९ नंतर केली.

    ज्यामुळे महाराष्ट्रात दंगली वाढल्या. मात्र संभाजी ब्रिगेडची स्थापना मराठा सेवा संघाचे संस्थापक मा. पुरुषोत्तम खेडेकर यांनी १९९० मध्ये केली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडचा उल्लेख बी- ग्रेड असा केल्याने संभाजी ब्रिगेडला ते न पटण्यासारख आहे.

    राज ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले की,

    “संभाजी ब्रिगेडमधील लोकांच वाचन नाही. बाबासाहेब पुरंदरेमुळे शिवराय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले.”

    यावर संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांना सडेतोड उत्तर देत जाहीर चर्चेच आव्हान केलं आहे. मात्र राज ठाकरे हे कधीच संभाजी ब्रिगेडच्या अभ्यासकांसोबत चर्चेला येत नाही. हे सुद्धा लोकांना माहिती आहे.

  • एसटी कर्मचाऱ्यांची सदावर्तेकडून फसवणूक

    मंडळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दगडफेक करून हल्ला केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाच महाराष्ट्र शासनामध्ये विलीनकरणं व्हावं यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे.

    या आंदोलनामध्ये जवळपास १२० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी महाराष्ट्र सरकारला जाग आलेली नाही. महाराष्ट्र सरकारचा हा नाकर्तेपणा एसटी कर्मचाऱ्यांच्या सहन करण्याच्या आवाक्याबाहेर गेल्या कारणाने कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली. या प्रकरणी न्यायालयाने १०९ कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

    मात्र सगळ्यात मोठा ट्विस्ट एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर आला आहे. ही दंगल पेटवण्यामागे मास्टर माईंड सदावर्तेच होते. अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल एका एसटी कर्मचाऱ्याने मोठा खुलासा केला आहे. 

    सदावर्ते आणि गुजर यांनी फसवणूक केली

    मंडळी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते आणि अजयकुमार गुजर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे लुटून फसवणूक केल्याचं स्वारगेट आगारातील एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी सांगितलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना त्यांनी सांगितलं की,

    ‘ गुणरत्न सदावर्ते आणि अजयकुमार गुजर यांनी निलंबित कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५४० रुपये आणि इतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३०० रुपये अशी १ लाख १० हजार रुपयांची रक्कम २५० डेपोमधून गोळा केली.”

    अस एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं.सदावर्ते यांची पोलीस प्रशासन चौकशी करत आहे. या प्रकरणाचे धागे दोरे कुठपर्यंत आहे याचीसुद्धा चौकशी पोलीस प्रशासन करत आहे.

  • अकोल्यात अमोल मिटकरींच आंदोलन

    मंडळी महाराष्ट्रातल्या राजकारण तापण्याचा वेग आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे राज ठाकरे यांनी भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिल्याचा वाद मिटलाच नाही, तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक नावाच्या ठिकाणी हल्ला केल्याने राजकीय वातावरण आणखीच चिघळल आहे.

    गेल्या कित्येक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीयकरणासाठी आंदोलन चालू आहे. जवळपास १२० एसटी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये आत्महत्या केल्या. मात्र राज्यसरकारला अध्यपही जाग आलेली नाही. या सर्व गोष्टींचा राग मनात धरून काल एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक नावाच्या घरावर दगड फेक करत आंदोलन केल.

    मात्र या हल्ल्यामागचा मास्टर माईंड कोण आहे. याचा पोलीस प्रशासन शोध घेत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेचा निषेध करत अकोल्यामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केल आहे. 

    काय म्हणाले अमोल मिटकरी ?

    एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर केलेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड भाजप आहे. असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भाजपने भडकवण्याचं काम केलं आहे. असा पण त्यांनी आरोप केला आहे.

    याप्रकरणी १०७ आंदोलकांवर गावदेवी पोलीस ठाण्यात दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणवंत सदावर्ते यांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी अटक केलेली आहे. मात्र या सर्व घटनेमागचा मास्टर माईंड कोण? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.