Category: राजकीय व्यक्ती

  • आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात?

    मंडळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक नेते झाले ज्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कारकिर्दीच्या बळावर स्वतःच नाव इतिहासामध्ये अजरामर केलं. मात्र एक असा नेता ज्याने लोकांच्या मनात आणि त्यांच्या काळजामध्ये आजन्म घर केलं.

    म्हणूनच कदाचित त्या व्यक्तीला स्वतःच्या घरात रहायची गरज पडली नसावी. होय मंडळी. आपण बोलत आहोत बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले ठाण्याचे बाळ ठाकरे म्हणून ओळखले जाणारे धर्मवीर आनंद दिघें यांच्याबद्दल.

    रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

    अस म्हणतात की, ९० च्या दशकामध्ये आनंद दिघे हे नाव ठाण्यातील प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसल होत. जन्माला येणार प्रत्येक मुल आनंद दिघेंसारख व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असायची.

    एक शिवसैनिक म्हणून काम करताना आंनद दिघे यांचा जनसामान्यांमध्ये प्रभाव एवढा वाढला होता की, त्यांना ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हटल्या जाऊ लागलं होतं. ज्यामुळे बाळासाहेब ठाकरे अस्वस्थ झाल्याच्या चर्चाही तेव्हा गदारोळ करायला लागल्या होत्या.

    आनंद दिघे च्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेब ठाकरे झाले होते अस्वस्थ…

    ठाण्यातील जनतेसाठी दिघे अहोरात्र झटत होते. जनतेसाठी स्वतःला त्यांनी एवढं झोकून दिल होत की, त्यांनी विवाहसुदधा केला नाही. ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘आनंदआश्रमाची’ स्थापना केली होती. ज्यामध्ये जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचे ते काम करत होते. प्रत्येक काम ते ताबडतोब करायचे. ठाण्यातील अनेक लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला.

    शाखा आणि आश्रमच माझे घर- आनंद दिघे

    प्रसार माध्यमांच्या एका मुलाखतीमध्ये बोलत असतांना आंनद दिघे यांचे शिष्य आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की,

    ” दिघे साहेब कधीही स्वतःच्या घरामध्ये राहले नाही. ते नेहमी भाड्याच्या घरात राहत होते. शाखा आणि आनंद आश्रमच माझं घर आहे.”

    अस शिंदे यांनी सांगितलं होतं. यावरून समजून येत की, आनंद दिघे म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

    मंडळी राजकीय क्षेत्रात काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडून प्रेरणा घेऊन नेतृत्व करण्यासाठी सक्षम होत असतात आणि आपल्या आदर्श नेत्यांचा वैचारिक वारसा निस्वार्थपणे पुढे नेत असतात.

    महाराष्ट्रातील राजकारणात असंच एक गाजलेलं नाव म्हणजे शिवसेना पक्षाचे आणि बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघें यांचे कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे. त्यांचं पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे.

    आणि शरद पवार वयाच्या २६ व्या वर्षी आमदार झाले

    ते मूळ साताऱ्याचे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे त्यांचं मूळ गाव. शिक्षण पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे हे ठाण्यात आले. परंतू घरची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आपले शिक्षण सोडावे लागले.

    ठाण्यात आल्यानंतर त्यांनी सुरवातीला एका मच्छी कम्पनीत सुपरवायझर म्हणून काम केलं. मात्र आपल्या नोकरीतूनसुद्धा ते आपल्या कुटुंबाला पुरेसे पैसे देऊ शकते नव्हते. म्हणून पुढे त्यांनी स्वतःचा रिक्षा घेऊन रिक्षा चालकाचा व्यवसाय सुरू केला.

    आणि त्या घटनेनंतर दादा कोंडके शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक झाले…

    काही काळानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघें यांच्या प्रभावाने शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ते ठाण्यातील किसन नगरचे शाखा प्रमुख बनले.आनंद दिघेंना साथ देत त्यांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला.

    वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांनी शिवसेनेच्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. तुरुंगवासदेखील भोगला. कर्नाटक सीमेवरील बेळगाव येथील शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनात कानडी पोलिसांचा लाठीमारही त्यांनी झेलला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठीसुद्धा त्यांनी कारावास सहन केला. 

    एकनाथ शिंदे यांच्यामधले नेतृत्वकौशल्य बघून आनंद दिघे यांनी १९९७ सालच्या ठाणे येथील महानगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये त्यांना उमेदवारी दिले आणि ते नगरसेवक झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजकीय क्षेत्रात कधीही मागे वळून पाहिलं नाही. नंतर आमदार ते महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आणि शरद पवार वयाच्या २६ व्या वर्षी आमदार झाले

    मंडळी राजकीय क्षेत्रातील काही राजकीय नेत्यांचा जीवनपट जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा त्यांचा संघर्ष आणि जिद्द पाहून अक्षरशः अचंबित होत. राजकीय क्षेत्रात सध्याच्या स्थितीमध्ये स्वतःच्या नेतृत्वाने अनेक राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणार व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार.

    राजकीय क्षेत्रात कुणीही गॉडफादर नसतांना स्वतःच्या कार्यकर्तुत्वार शरद पवार हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आमदार झाले होते. वर्ष होत १९६६-६७ दरम्यानच. पवार हे २६ वर्षाचे होते.

    जेव्हा बाळासाहेबांना पवारांनी मातोश्री सोडायला सांगितल…

    त्यावेळी त्यांच्यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार होता. शरद पवार यांची इच्छा जरी निवडणूक लढवण्याची असली तरी त्यावेळच्या जेष्ठ अनुभवी नेत्यांच्या तुलनेत ते लहानच होते.

    एवढ्या लहान वयात त्यांना विधानसभेच तिकीट मिळेल अशी अपेक्षाही कुणी केली नव्हती. एक दिवस तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी पवारांना प्रश्न विचारला की,

    ” शरद तू बारामतीच्या तिकीटवरून निवडणूक का लढवत नाही?”

    त्यावेळी शरद पवार विनायकराव पाटील यांच्या प्रश्नाला जरी नकार देऊ शकले नाही, तरी पक्षातील जेष्ठ नेत्यांनी पवार यांचा कडाडून विरोध केला.

    “शरद पवार फक्त २६ वर्षांचे आहेत. त्यांना तिकीट देणे म्हणजे जागा हारणे होय. त्या जागेसाठी पक्षाकडे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे अनुभवी नेत्यांना आधी प्राधान्य द्यायला हवे. शरद पवार यांना तिकीट देणे म्हणजे लढण्याआधी जागा हारणे. असा त्याचा अर्थ होईल.”

    अस त्यावेळच्या नेत्यांच म्हणणं होतं. पवार यांच्या उमेदवारीच पत्र जवळ जवळ फेटाळण्याची तयारी झाली होती. पण यशवंतराव चव्हाण यांनी उपस्थित नेत्यांना एक प्रश्न विचारला.

    या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद

    “आम्ही महाराष्ट्रातून किती जागा मिळवण्याची अपेक्षा करतो?”

    प्रत्येक जणांनी उत्तर दिलं. १९० ते २००. त्यावर यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या उत्तराने संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. चव्हाण म्हणाले की,

    “आपल्याकडे विधानसभेच्या २७० जागा आहेत, तुम्ही उत्तर दिल्याप्रमाणे आपण १९० ते २०० जागा जिंकू. म्हणजे ७० ते ८० जागांवर आपला पराभव होईल. यामध्ये जर शरद पवार यांचा पराभव झाला तर अजून एक जागा आपल्याकडून गेली अस आपण समजू.”

    अस उत्तर चव्हाण यांनी उपस्थित नेत्यांना दिल आणि शरद पवार यांना तिकीट देण्यात आलं. 

    वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी शरद पवार यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक भरघोस मतांनी जिंकली आणि ते आमदार झाले.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आणि त्या घटनेनंतर दादा कोंडके शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक झाले…

    मंडळी अनेक चित्रपट अभिनेत्यांनी अभिनयासोबतच राजकीय कारकीर्दसुद्धा गाजवली आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर नाव येत ते म्हणजे प्रसिध्द अभिनेते दादा कोंडके यांचं. दादा कोंडके यांचे चित्रपट महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राबाहेरसुद्धा अतिशय उत्साहात बघितल्या जायचे.

    वाढत्या लोकप्रियतेमुळे अभिनयाचा बादशहा असणारे दादा यांना राजकीय नेत्यांनी आपल्या अनेक चवळींमध्ये स्टार प्रचारक म्हणून उभं केलं. खरतर त्यांच्या कलेला वाव पहिल्यांदा राजकीय मंचावरच मिळाला.

    आनंद दिघे च्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेब ठाकरे झाले होते अस्वस्थ…

    एस.एम. जोशी, मधू दंडवते अशा समाजवादी नेत्यांच्या सेवादलातील कलपथकातून राम नगरकर, नेळू फुले, दादा कोंडके यांनी लोकनाट्यात अभिनय करायला सुरुवात केली. कलपथकातील कामासोबतच कधी कधी काही राजकीय कामसुद्धा दादा करत होते.

    समाजवादी पक्षाची चळवळ असो की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो अशा अनेक चळवळींमध्ये दादा यांनी शाहीर अमर शेख यांच्यासोबत अनेक कार्यक्रम केले. दादांचा अभिनयात शिक्कामोर्तब झाल्याने त्यांना अनेक चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दवर लक्ष द्यायला सुरुवात केली.

    स्वतःच पॅनल आणि ग्रामपंचायतवर तरुणांचा विजय

    दादा कोंडके यांचा ‘सोंगाड्या’ नावाचा पहिला चित्रपट जेव्हा मुंबईत रिलीज होणार होता. तेव्हा ‘कोहिनूर’ नावाच्या थिएटरन करार करूनही ऐनवेळी सोंगाड्याऐवजी दुसरा हिंदी सिनेमा रिलीज केला. नंतर त्यांनी जेष्ठ नेते वसंतदादा पाटील आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे धाव घेतली.

    मात्र या प्रकरणावर दोन्ही नेत्यांनी लक्ष दिलं नाही. दादा कोंडके चिंताग्रस्त असताना त्यांच्या एका मित्राने त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदत मागायचे सुचवले.

    आणि दादांनी संपूर्ण प्रकरण बाळासाहेब ठाकरे यांना सांगितल्यानंतर बाळासाहेब स्वतः शिवसेना कार्यकर्त्यांना घेऊन त्या टॉकीज च्या पंजाबी मालकाकडे गेले आणि त्याला दादांचा चित्रपट प्रदर्शित करायचे सांगितले. त्याच क्षणापासून दादा बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक झाले.

    या घटनेनंतर दादा कोंडके यांचे सर्व चित्रपट सेन्सॉर बोर्डकडे जाण्याआधी बाळासाहेब ठाकरे यांना दाखवल्या जायचे. दादा शिवसेनेचे कायमस्वरूपी स्टार प्रचारक होते. बाळासाहेब ठाकरे दादांना नेहमी गमतीने म्हणायचे की,

    शिवसेनेची सत्ता आल्यानंतर तुला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करू.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आनंद दिघे च्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेब ठाकरे झाले होते अस्वस्थ…

    मंडळी राजकीय क्षेत्रात नेतेमंडळींचे चाहते किंवा त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते आपण बघितले असतील. मात्र एखाद्या कार्यकर्त्याच्या प्रभावाने त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारा कार्यकर्तावर्ग हे धर्मवीर आनंद दिघे यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडलं अस म्हणणं वावग ठरणार नाही.

    आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ ला ठाणे येथे झाला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि भाषण शैलीचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव झाला. आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला.

    डॅडी डॉन ते आमदार

    आनंद दिघे यांचा ठाणे येथे मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग होता. त्यामुळे त्यांना ठाणे येथील शिवसेना जिल्ह्याध्यक्षपद देण्यात आलं. ठाण्यातील जनतेसाठी दिघे अहोरात्र झटत होते. जनतेसाठी स्वतःला त्यांनी एवढं झोकून दिल होत की, त्यांनी विवाहसुदधा केला नाही.

    ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘आनंदआश्रमाची’ स्थापना केली होती. ज्यामध्ये जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचे ते काम करत होते. प्रत्येक काम ते ताबडतोब करायचे. ठाण्यातील अनेक लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला.

    पाहता पाहता आनंद दिघे यांचा चाहता वर्ग एवढा वाढत गेला की त्यांची तुलना हे बाळासाहेब ठाकरेंशी होऊ लागली होती. या तुलनेमुळे तेव्हा शिवसेनेमध्ये अस्वस्थता होती अस तेव्हा म्हटल्या जात होतं. याबद्दल जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई असे म्हणतात की,

    ” दिवसेंदिवस आनंद दिघे यांचं प्रस्थ वाढत चाललं होतं. त्यांना वलय, प्रसिद्धी लाभत होती. त्यातून नाकापेक्षा मोती जड होतो की काय, अशी भावना मातोश्रीवर असल्याचं त्यावेळी ऐकण्यात येत होतं. कारण दिघेंमुळे शिवसेनेत एक स्वतंत्र संप्रदाय सुरू झाला होता. पण शिवसेनेत अस चालत नाही. हे राजा आणि बाकी प्रजा, अस धोरण आहे शिवसेनेत. यामुळे बाळासाहेब अस्वस्थ झाले होते. अशी चर्चा त्यावेळी ठाण्यात होती.”

    दिघेंविषयी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी असही म्हटल्याची चर्चा होती की ,

    ” आनंद दिघे यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका नाही. पण ज्याप्रमाणे ते काम करतात त्याविषयी प्रश्न आहे.”

    यावर आनंद दिघे यांनी म्हटलं होत की,

    ” बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीशिवाय मी कुठलंही काम करत नाही.” 

    या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद

    मंडळी आनंद दिघे यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ठाण्यातील लोकांनी धर्मवीर म्हणून संबोधल होत. म्हणून धर्मवीर आनंद दिघें आजही जनतेच्या मनात अजरामर आहेत.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • ज्याला वॉचमनची नोकरीसुद्धा नाकारल्या गेली तो झाला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री

    मंडळी बरेच लोक म्हणतात राजकारण हे वाईट असत कारण राजकीय नेते कधी स्वतःच्या बापाचेसुद्धा झाले नाहीत,तर जनतेचे काय होणार? मात्र काही नेते असे असतात जे निस्वार्थीपणाने जनतेसाठी अविरत झटत असतात.

    याच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आरआर आबा उर्फ रावसाहेब रामराम पाटील. त्यांना सगळे प्रेमाने आबाच म्हणायचे. आबा यांचा जन्म १ ऑगस्ट १९५७ रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्क्यामधल्या अंजनी या गावी अत्यंत गरीब कुटुंबामध्ये झाला.

    आबा लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होते. इयत्ता ४ थी आणि ८ वीमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. तर इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ते केंद्रात पहिले आले होते. बऱ्याच लोकांनी त्यांना पुढे सायन्स फिल्डमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला.

    डॅडी डॉन ते आमदार

    कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याकारणाने त्यांनी आर्टला प्रवेश घेतला. मात्र शिक्षण पूर्ण करता करता पैशांची गरज पडेल आणि त्यासाठी नोकरी केली पाहिजे म्हणून त्यांनी शेजारच्या एका कारखान्यामध्ये नोकरीसाठी धाव घेतली.

    आबांची उंची लहान असल्याकारणाने त्यांची टिंगल उडवून त्यांना कारखान्यातील वॉचमनची नोकरी नाकारण्यात आली. नंतर आबांना ‘कमवा आणि शिका’ या योजनेबद्दल माहिती मिळाली आणि त्यामधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

    आबांना जनतेची मदत करण्यात त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्यात लहानपणापासूनच गोडी होती. नंतर ते वसंतदादा पाटील यांच्या सहवासात राहले. सोबतच यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शनसुद्धा त्यांना लाभले.

    तासगाव तालुक्यामध्ये आबांची लोकप्रियता पाहून काँग्रेस पक्षाने त्यांना १९९० ला विधानसभा लढवण्याचे सुचवले. आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये आबा आमदार झाले. 

    गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता

    आबांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. १९९० ते २०१५ पर्यंत ते तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. दोन वेळा महाराष्ट्राचे गृहमंत्री, एकदा ग्रामविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राला चालना देण्याचं काम केलं.

    मात्र २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई येथील ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असतांना वादग्रस्त विधान केल्याने त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

    अखेर कर्करोगाने लीलावती रुग्णालयात आबा यांचे १ फेब्रुवारी २०१५ ला निधन झाले. मात्र आबा आजही आपल्या कर्तबगार व्यक्तिमत्वाने अजरामर आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • केजरीवाल यांनी २०१४ ला मुख्यमंत्री पदाचा का दिला होता राजीनामा?

    मंडळी संघर्ष केला आणि अविरतपणे मेहनत केली तर यश मिळणं हे तेवढंच सत्य आहे. याच जिवंत उदाहरण म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल.

    एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा जीवनपट हा प्रत्येक माणसाला प्रेरणा देणारा आहे. केजरीवाल यांचा जन्म हरियाणातील हिसार या शहरामध्ये १९६८ साली झाला. त्यांनी १९८९ साली खडगपूर विद्यापीठातून आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.

    जेव्हा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला…

    त्यानंतर TCS या कंपनीमध्ये त्यांनी काही वर्षे नोकरी केली. मात्र जनतेच्या प्रश्नांविषयी कळवळा असणाऱ्या केजरीवाल यांना समाजकार्यापासून दूर ठेवण कठीणच. त्यांनी नंतर नोकरीचा राजीनामा देऊन मदर तेरेसा यांच्याबरोबर सामाजिक काम केलं.

    मात्र काही काम हे व्यवस्थेचा भाग असल्यावरच करता येतात. हे केजरीवाल यांना चांगलच पटलं होत.म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आणि देशामधून यूपीएससीच्या परीक्षेमध्ये ५७३ वी रँक मिळवली.

    २००६ पर्यंत त्यांनी आयआरएस या पदावर प्रशासकीय नोकरी केली. इन्कम टॅक्स रेविन्यू अधिकारी या पदावर कार्यरत असतांना त्यांना कुठल्या भागामध्ये किती घोटाळा केला जातो याची चांगलीच माहिती प्राप्त झाली होती.

    शंभु बंध्यो बजरंग……!!

    अखेर २००६ साली त्यांनी आपल्या आयआरएस पदाचा राजीनामा दिला आणि आपल्या मित्रमंडळींसोबत ‘परिवर्तन नावाची’ संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून केजरीवाल यांनी दिल्लीमधील जनतेचे प्रश्न सोडवण्याच काम केलं. 

    लोकपाल बिल आंदोलनात सहभाग

    आता वेळ होती केजरीवाल यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या २०११ साली दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेल्या लोकपाल आंदोलनाची. अण्णा हजारे आणि किरण बेदी यांच्यासोबत केजरीवाल यांनी २०११ ला लोकपाल आंदोलनात सहभाग घेतला आणि संपूर्ण दिल्लीवासीयांच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या ते नजरेमध्ये एक दमदार नेता म्हणून भरले होते.

    अखेर अरविंद केजरीवाल यांनी ‘ आम आदमी पार्टीची’ स्थापना केली आणि २०१४ साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी ७० जागांपैकी ३१ जागांवर विजय मिळवला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.

    मात्र केंद्र सरकार दिल्ली सरकराच्या कामाला मदत करत नाही. या वादावरून केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा दिल्लीमध्ये निवडणूक घेण्यात आली. मात्र यावेळी केजरीवाल यांनी ७० पैकी ६७ जागेवर दणदणीत विजय मिळवत मुख्यमंत्री पद काबीज केल.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    1. डॅडी डॉन ते आमदार
    2. या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद
    3. १९९९ ला नारायण राणेंमुळे होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री
    4. १९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • डॅडी डॉन ते आमदार

    मंडळी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणं आजही त्यांच्या थरारक इतिहासाने ओळखली जातात. यांपैकीच एक म्हणजे मुंबईतील दगडी चाळ. मंडळी दगडी चाळ म्हणजे अरुण गवळी नावाच्या व्यक्तीची दहशत असणारा एरिया.

    १९७० ते १९८० या काळामध्ये अरुण गवळी नावाच्या डॅडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉनने ही दगडी चाळ चांगलीच गाजवली होती. या चाळीमध्ये आसपासच्या कारखान्यातील आणि गिरणीतील कामगार राहत होते.

    या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद

    १९७० च्या दशकात अरुण गवळी आणि त्याचा भाऊ किशोर यांनी रमा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या भायखळा अंडरवर्ल्ड कम्पनीत प्रवेश घेतला. १९८८ मध्ये झालेल्या पोलिसांच्या एका चकमकीत रमा नाईक ठार झाला. आणि त्यानंतर भायखळा कम्पणीची धुरा अरुण गवळीने हातामध्ये घेतली.

    अरुण गवळी आणि त्याचा भाऊ नेहमीच पोलिसांच्या निशाण्यावर असायचे. १९८८ ते १९९२ पर्यंत अरुण गवळीचा दाऊदच्या गँगशी संघर्ष चालू राहिला. या सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी अरुण गवळीने दगडी चाळीचा आश्रय घेतला.

    सेटलमेंट असो की पैशांचा व्यवहार याच चाळीमधून करून अरुण गवळी आपलं प्रत्येक पाऊल अपराधाच्या दिशेने टाकत होता. चाळीमध्ये त्याचा दरबारसुद्धा भरायचा. दगडी चाळीमध्ये असलेल्या १०पैकी दोन इमारतींमध्ये गवळीच गीताई नावाचं घर आहे.

    कारागृहात असतांना झाले आमदार

    या दहाही इमारती गवळीने एका मुस्लिम व्यवसायीकाकडून २ कोटींना विकत घेतल्या होत्या. या इमारतींपैको एका इमारतीमध्ये त्याने ३ रूम्स बनविल्या होत्या. ज्यापैकी पहिली रूम ही चौकशी करण्यासाठी वापरण्यात येत होती.

    दुसऱ्या रूममध्ये मोठे गुंड किंवा बिल्डर्स यांच्यात तह करून पैसे घेतले जायचे. अर्थात सेटलमेंट केली जायची. आणि तिसरी जी रूम होती त्यामध्ये अरुण गवळी व त्याचे साथीदार पोलिसांपासून वाचण्यासाठी आश्रय घेत होते.

    याच रूममध्ये अरुण गवळीने जिथे सिलिंडर गॅस ठेवतात तिथून तळ घरात जाण्याचा मार्ग तयार केला होता. मात्र एकदा अरुण गवळी अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडला. होणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी गवळीने ‘अखिल भारतीय सेना’ नावाचा पक्ष स्थापन केला आणि निवडून येऊन आमदारपण झाला.

    गवळीच्या पक्षाचे तीन नगरसेवकसुदधा होते. मात्र गुन्हेगारी क्षेत्र अरुण गवळीचा पाठलाग करणं काही सोडत नव्हतं. आणि पुन्हा अरुण गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद

    मंडळी राजकिय क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द पुढे नेत असतांना प्रत्येक नेत्याचं हे स्वप्न असत की आपण या देशाचा एक दिवस प्रधानमंत्री झालो पाहिजे.या पदासाठी नेहमी महाराष्ट्राबाहेरील नेतेच पोहचू शकले.

    मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नाव आणि एक मराठी माणूस म्हणून शरद पवार हे नेहमीच प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत राहले. पण त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने या पदापासून वंचित राहावं लागलं.

    शरद पवार यांना पहिल्यांदा १९६७ साली काँग्रेसचे जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी विधानसभेच्या निवडणूकीमध्ये उतरवलं आणि ते निवडूनही आले. चारवेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा झाले.

    १९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?

    शरद पवार यांनी आपल्या राजकीय शैलीने आपले नाव देशपातळीवर चांगलेच गाजवले होते. १९९१ साली झालेल्या राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व नव्हतं. सोनिया गांधी राजकारणात यायला तयार नव्हत्या.

    राजीव गांधीनंतर काँग्रेसचा युवा तळफदार नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे बघितलं जात होतं. मात्र काँग्रेसच अध्यक्षपद तेव्हा जेष्ठ नेते नरसिंह राव यांना देण्यात आलं. त्यानंतर त्यांना प्रधानमंत्रीपदसुद्धा देण्यात आलं.

    १९९९ ला नारायण राणेंमुळे होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री

    अशाप्रकारे पवार यांची पहिली प्रधानमंत्री व्हायची संधी हुकली. मात्र शरद पवार आणि त्यांच्या गटाने नरसिंह राव यांच्या प्रधानमंत्री पदाला विरोध करत सांगितलं होतं की,

    ” एकाच व्यक्तीकडे पक्षाच अध्यक्षपद आणि देशाच प्रधानमंत्री असणं हे गरजेचं नाही.”

    मात्र शरद पवार यांना नाईलाजाने नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात सरंक्षण मंत्री राहावं लागलं. १९९६ दुसऱ्यांदा शरद पवार यांना प्रधानमंत्री पदाची संधी होती. काँग्रेसचे १४५ खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आले होते.

    यावेळी लालू यादव, मुलायम यादव आणि डावे पक्ष शरद पवार यांना पाठींबा देत होते. मात्र याला नरसिंह राव इच्छुक नव्हते. काँग्रेस सरकारन देवे गौडा यांना बाहेरून पाठिंबा देत प्रधानमंत्री पद दिल आणि शरद पवार यांची दुसरी संधी हुकली. 

    यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी आपलं मत व्यक्त करतांना म्हटलं आहे की,

    ” शरद पवारांनी काँग्रेस पक्षात आघाडीच्या फडीतील नेता म्हणून अल्पावधीतच नाव कमावलं. १९९१ आणि १९९६ मध्ये ते प्रधानमंत्री पदाचे नक्कीच दावेदार होते. पण काँग्रेस पक्षातील ‘ दरबार पॉलिटिक्स ‘ मुळे त्यांना प्रधानमंत्री होता आलं नाही. आणि हे देशाचं झालेलं नुकसान आहे”.

  • गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता

    मंडळी राजकीय क्षेत्र म्हटलं की काही मोजकेच नेते आपल्याला असे बघायला मिळतात ज्यांना सर्वसामान्य जनतेचा आदर आहे. त्यांच्याबद्दल कळवळा आहे. असाच एक नेता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला. ज्यांच नाव होतं गोपीनाथ मुंडे.

    स्वभावात निर्मळपणा, कामात कर्तव्यदक्षपणा आणि अन्यायावर रोखठोकपणा घेऊन गोपीनाथ मुंडेंनी आपलं समाजकारण जनतेच्या हितासाठी केलं. गोपीनाथ मुंडे यांचा जन्म १२ डिसेंबर १९४९ ला महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला.

    १५ हजार कार्यकर्त्यांसह हार्दिक पटेल आज करणार भाजपात प्रवेश

    भारतीय जनता पक्ष त्यांनी जवळपास ४० ते ४५ वर्ष प्रचंड मेहनत करून महाराष्ट्रामध्ये पराकोटीला आणला होता. गोपीनाथ मुंडे यांना ओबीसींचा नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जायचं. आपल्या प्रचंड मेहनतीने आणि जनतेच्या प्रेमापोटी ते १९९५ साली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले.

    त्यांनी १९८० ते २००९ या कालावधीमध्ये विधानसभेमध्ये एक उत्तम राजकीय प्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न मांडले. गोपीनाथ मुंडे यांचा लोकांमध्ये प्रभाव एवढा होता की, महाराष्ट्रातील जनताच नाही, तर विरोधी पक्षातील नेतेसुद्धा त्यांचं कौतुक करायचे.

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    गोपीनाथ मुंडे हे आपल्या मनमोकळ्या आणि दिलखुलास स्वभावामुळे जनतेच्या मनात घर करून बसले होते. 

    मृत्यूच गूढ अजूनही कायम

    भारतीय जनता पक्षाला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यात गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा होता. २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश आलं होतं.

    नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकांवर आपलं शिक्कामोर्तब केलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळामध्ये गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्री म्हणून स्थान देण्यात आलं होतं.

    मात्र केंद्रीय मंत्री झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांमध्ये आपल्याच सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला जात असताना त्यांचा अपघातामध्ये दिल्ली येथे दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र गोपीनाथ मुंडे यांचा नेमका अपघात झाला की हत्या या मुद्द्यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपापली मते मांडली होती.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir