Author: admin

  • जेव्हा बाळासाहेबांना पवारांनी मातोश्री सोडायला सांगितल…

    मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये बहुधा आपण बघत असतो की, राजकीय नेते राजकारणात जरी एकमेकांविरोधात टीकाटिप्पणी करत असले, तरी ते दैनंदिन जीवनात एकमेकांचे चांगले मित्र असतात. मग ते गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख असो की इतर राजकीय नेते असो.

    शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामधलीही मित्रता अशीच काही होती. जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला धोका असल्याचं शरद पवार यांना कळलं होतं. तेव्हा पवारांनी आपली मित्रता बाळासाहेबांप्रती दाखवली होती.

    आणि त्या घटनेनंतर दादा कोंडके शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक झाले…

    बाळासाहेबांच्या जीवाला अज्ञातांकडून धोका आहे हे कळताच शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांना फोन करून संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि मातोश्री सोडण्याची विनंती केली होती. हा किस्सा नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितला होता.

    ते म्हणाले की,

    ” ज्या वेळेला साहेबांना धोका होता. शरद पवारांनी त्यांना फोन करून सांगितलं तुम्ही लगेच मातोश्री सोडा. मग साहेब अज्ञात स्थळी जाणार होते. त्यांनी मला बोलावलं, तू तुझी जीप घेऊन ये. बाकी कुणाला सांगू नको. मी घरातून निघालो की तू पाठी यायला पाहिजे. तेव्हा मी माझी जीप घेऊन लगेच निघालो. बाळासाहेब अज्ञात स्थळी गेल्यानंतर मी स्वतः त्यांच्यासोबत होतो. त्यांना टेरीरिस्टपासून तेव्हा धोका होता. मुंबईतील बांदऱ्यातल्या एका अज्ञात स्थळी बाळासाहेब ठाकरे हे काही दिवस थांबले होते.”

    अस नारायण यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितलं होतं. 

    आनंद दिघे च्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेब ठाकरे झाले होते अस्वस्थ…

    बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीने संपूर्ण राजकीय नेत्यांपुढे एका उत्तम राजकारणाचा आदर्श ठेवला होता. तोच आदर्श घेऊन आजच्या राजकीय नेत्यांनी राजकारण कस करावं आणि राजकीय मित्रता पाठीत खंजीर खुपसणारी नसावी हे समजून घेणं महत्वाचं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आणि त्या घटनेनंतर दादा कोंडके शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक झाले…

    मंडळी अनेक चित्रपट अभिनेत्यांनी अभिनयासोबतच राजकीय कारकीर्दसुद्धा गाजवली आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर नाव येत ते म्हणजे प्रसिध्द अभिनेते दादा कोंडके यांचं. दादा कोंडके यांचे चित्रपट महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राबाहेरसुद्धा अतिशय उत्साहात बघितल्या जायचे.

    वाढत्या लोकप्रियतेमुळे अभिनयाचा बादशहा असणारे दादा यांना राजकीय नेत्यांनी आपल्या अनेक चवळींमध्ये स्टार प्रचारक म्हणून उभं केलं. खरतर त्यांच्या कलेला वाव पहिल्यांदा राजकीय मंचावरच मिळाला.

    आनंद दिघे च्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेब ठाकरे झाले होते अस्वस्थ…

    एस.एम. जोशी, मधू दंडवते अशा समाजवादी नेत्यांच्या सेवादलातील कलपथकातून राम नगरकर, नेळू फुले, दादा कोंडके यांनी लोकनाट्यात अभिनय करायला सुरुवात केली. कलपथकातील कामासोबतच कधी कधी काही राजकीय कामसुद्धा दादा करत होते.

    समाजवादी पक्षाची चळवळ असो की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो अशा अनेक चळवळींमध्ये दादा यांनी शाहीर अमर शेख यांच्यासोबत अनेक कार्यक्रम केले. दादांचा अभिनयात शिक्कामोर्तब झाल्याने त्यांना अनेक चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दवर लक्ष द्यायला सुरुवात केली.

    स्वतःच पॅनल आणि ग्रामपंचायतवर तरुणांचा विजय

    दादा कोंडके यांचा ‘सोंगाड्या’ नावाचा पहिला चित्रपट जेव्हा मुंबईत रिलीज होणार होता. तेव्हा ‘कोहिनूर’ नावाच्या थिएटरन करार करूनही ऐनवेळी सोंगाड्याऐवजी दुसरा हिंदी सिनेमा रिलीज केला. नंतर त्यांनी जेष्ठ नेते वसंतदादा पाटील आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे धाव घेतली.

    मात्र या प्रकरणावर दोन्ही नेत्यांनी लक्ष दिलं नाही. दादा कोंडके चिंताग्रस्त असताना त्यांच्या एका मित्राने त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदत मागायचे सुचवले.

    आणि दादांनी संपूर्ण प्रकरण बाळासाहेब ठाकरे यांना सांगितल्यानंतर बाळासाहेब स्वतः शिवसेना कार्यकर्त्यांना घेऊन त्या टॉकीज च्या पंजाबी मालकाकडे गेले आणि त्याला दादांचा चित्रपट प्रदर्शित करायचे सांगितले. त्याच क्षणापासून दादा बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक झाले.

    या घटनेनंतर दादा कोंडके यांचे सर्व चित्रपट सेन्सॉर बोर्डकडे जाण्याआधी बाळासाहेब ठाकरे यांना दाखवल्या जायचे. दादा शिवसेनेचे कायमस्वरूपी स्टार प्रचारक होते. बाळासाहेब ठाकरे दादांना नेहमी गमतीने म्हणायचे की,

    शिवसेनेची सत्ता आल्यानंतर तुला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करू.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आनंद दिघे च्या वाढत्या प्रभावामुळे बाळासाहेब ठाकरे झाले होते अस्वस्थ…

    मंडळी राजकीय क्षेत्रात नेतेमंडळींचे चाहते किंवा त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते आपण बघितले असतील. मात्र एखाद्या कार्यकर्त्याच्या प्रभावाने त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारा कार्यकर्तावर्ग हे धर्मवीर आनंद दिघे यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडलं अस म्हणणं वावग ठरणार नाही.

    आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ ला ठाणे येथे झाला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि भाषण शैलीचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव झाला. आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला.

    डॅडी डॉन ते आमदार

    आनंद दिघे यांचा ठाणे येथे मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग होता. त्यामुळे त्यांना ठाणे येथील शिवसेना जिल्ह्याध्यक्षपद देण्यात आलं. ठाण्यातील जनतेसाठी दिघे अहोरात्र झटत होते. जनतेसाठी स्वतःला त्यांनी एवढं झोकून दिल होत की, त्यांनी विवाहसुदधा केला नाही.

    ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘आनंदआश्रमाची’ स्थापना केली होती. ज्यामध्ये जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचे ते काम करत होते. प्रत्येक काम ते ताबडतोब करायचे. ठाण्यातील अनेक लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला.

    पाहता पाहता आनंद दिघे यांचा चाहता वर्ग एवढा वाढत गेला की त्यांची तुलना हे बाळासाहेब ठाकरेंशी होऊ लागली होती. या तुलनेमुळे तेव्हा शिवसेनेमध्ये अस्वस्थता होती अस तेव्हा म्हटल्या जात होतं. याबद्दल जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई असे म्हणतात की,

    ” दिवसेंदिवस आनंद दिघे यांचं प्रस्थ वाढत चाललं होतं. त्यांना वलय, प्रसिद्धी लाभत होती. त्यातून नाकापेक्षा मोती जड होतो की काय, अशी भावना मातोश्रीवर असल्याचं त्यावेळी ऐकण्यात येत होतं. कारण दिघेंमुळे शिवसेनेत एक स्वतंत्र संप्रदाय सुरू झाला होता. पण शिवसेनेत अस चालत नाही. हे राजा आणि बाकी प्रजा, अस धोरण आहे शिवसेनेत. यामुळे बाळासाहेब अस्वस्थ झाले होते. अशी चर्चा त्यावेळी ठाण्यात होती.”

    दिघेंविषयी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी असही म्हटल्याची चर्चा होती की ,

    ” आनंद दिघे यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका नाही. पण ज्याप्रमाणे ते काम करतात त्याविषयी प्रश्न आहे.”

    यावर आनंद दिघे यांनी म्हटलं होत की,

    ” बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीशिवाय मी कुठलंही काम करत नाही.” 

    या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद

    मंडळी आनंद दिघे यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ठाण्यातील लोकांनी धर्मवीर म्हणून संबोधल होत. म्हणून धर्मवीर आनंद दिघें आजही जनतेच्या मनात अजरामर आहेत.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • ज्याला वॉचमनची नोकरीसुद्धा नाकारल्या गेली तो झाला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री

    मंडळी बरेच लोक म्हणतात राजकारण हे वाईट असत कारण राजकीय नेते कधी स्वतःच्या बापाचेसुद्धा झाले नाहीत,तर जनतेचे काय होणार? मात्र काही नेते असे असतात जे निस्वार्थीपणाने जनतेसाठी अविरत झटत असतात.

    याच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आरआर आबा उर्फ रावसाहेब रामराम पाटील. त्यांना सगळे प्रेमाने आबाच म्हणायचे. आबा यांचा जन्म १ ऑगस्ट १९५७ रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्क्यामधल्या अंजनी या गावी अत्यंत गरीब कुटुंबामध्ये झाला.

    आबा लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होते. इयत्ता ४ थी आणि ८ वीमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. तर इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ते केंद्रात पहिले आले होते. बऱ्याच लोकांनी त्यांना पुढे सायन्स फिल्डमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला.

    डॅडी डॉन ते आमदार

    कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याकारणाने त्यांनी आर्टला प्रवेश घेतला. मात्र शिक्षण पूर्ण करता करता पैशांची गरज पडेल आणि त्यासाठी नोकरी केली पाहिजे म्हणून त्यांनी शेजारच्या एका कारखान्यामध्ये नोकरीसाठी धाव घेतली.

    आबांची उंची लहान असल्याकारणाने त्यांची टिंगल उडवून त्यांना कारखान्यातील वॉचमनची नोकरी नाकारण्यात आली. नंतर आबांना ‘कमवा आणि शिका’ या योजनेबद्दल माहिती मिळाली आणि त्यामधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

    आबांना जनतेची मदत करण्यात त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्यात लहानपणापासूनच गोडी होती. नंतर ते वसंतदादा पाटील यांच्या सहवासात राहले. सोबतच यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शनसुद्धा त्यांना लाभले.

    तासगाव तालुक्यामध्ये आबांची लोकप्रियता पाहून काँग्रेस पक्षाने त्यांना १९९० ला विधानसभा लढवण्याचे सुचवले. आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये आबा आमदार झाले. 

    गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता

    आबांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. १९९० ते २०१५ पर्यंत ते तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. दोन वेळा महाराष्ट्राचे गृहमंत्री, एकदा ग्रामविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राला चालना देण्याचं काम केलं.

    मात्र २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई येथील ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असतांना वादग्रस्त विधान केल्याने त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

    अखेर कर्करोगाने लीलावती रुग्णालयात आबा यांचे १ फेब्रुवारी २०१५ ला निधन झाले. मात्र आबा आजही आपल्या कर्तबगार व्यक्तिमत्वाने अजरामर आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • केजरीवाल यांनी २०१४ ला मुख्यमंत्री पदाचा का दिला होता राजीनामा?

    मंडळी संघर्ष केला आणि अविरतपणे मेहनत केली तर यश मिळणं हे तेवढंच सत्य आहे. याच जिवंत उदाहरण म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल.

    एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा जीवनपट हा प्रत्येक माणसाला प्रेरणा देणारा आहे. केजरीवाल यांचा जन्म हरियाणातील हिसार या शहरामध्ये १९६८ साली झाला. त्यांनी १९८९ साली खडगपूर विद्यापीठातून आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.

    जेव्हा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला…

    त्यानंतर TCS या कंपनीमध्ये त्यांनी काही वर्षे नोकरी केली. मात्र जनतेच्या प्रश्नांविषयी कळवळा असणाऱ्या केजरीवाल यांना समाजकार्यापासून दूर ठेवण कठीणच. त्यांनी नंतर नोकरीचा राजीनामा देऊन मदर तेरेसा यांच्याबरोबर सामाजिक काम केलं.

    मात्र काही काम हे व्यवस्थेचा भाग असल्यावरच करता येतात. हे केजरीवाल यांना चांगलच पटलं होत.म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आणि देशामधून यूपीएससीच्या परीक्षेमध्ये ५७३ वी रँक मिळवली.

    २००६ पर्यंत त्यांनी आयआरएस या पदावर प्रशासकीय नोकरी केली. इन्कम टॅक्स रेविन्यू अधिकारी या पदावर कार्यरत असतांना त्यांना कुठल्या भागामध्ये किती घोटाळा केला जातो याची चांगलीच माहिती प्राप्त झाली होती.

    शंभु बंध्यो बजरंग……!!

    अखेर २००६ साली त्यांनी आपल्या आयआरएस पदाचा राजीनामा दिला आणि आपल्या मित्रमंडळींसोबत ‘परिवर्तन नावाची’ संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून केजरीवाल यांनी दिल्लीमधील जनतेचे प्रश्न सोडवण्याच काम केलं. 

    लोकपाल बिल आंदोलनात सहभाग

    आता वेळ होती केजरीवाल यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या २०११ साली दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेल्या लोकपाल आंदोलनाची. अण्णा हजारे आणि किरण बेदी यांच्यासोबत केजरीवाल यांनी २०११ ला लोकपाल आंदोलनात सहभाग घेतला आणि संपूर्ण दिल्लीवासीयांच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या ते नजरेमध्ये एक दमदार नेता म्हणून भरले होते.

    अखेर अरविंद केजरीवाल यांनी ‘ आम आदमी पार्टीची’ स्थापना केली आणि २०१४ साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी ७० जागांपैकी ३१ जागांवर विजय मिळवला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.

    मात्र केंद्र सरकार दिल्ली सरकराच्या कामाला मदत करत नाही. या वादावरून केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा दिल्लीमध्ये निवडणूक घेण्यात आली. मात्र यावेळी केजरीवाल यांनी ७० पैकी ६७ जागेवर दणदणीत विजय मिळवत मुख्यमंत्री पद काबीज केल.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    1. डॅडी डॉन ते आमदार
    2. या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद
    3. १९९९ ला नारायण राणेंमुळे होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री
    4. १९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जेव्हा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला…

    मंडळी सध्याच्या परिस्थितीमध्ये जे वर्तमानपत्र आपण वाचतो किंवा इतर समाज माध्यमांवर ज्या बातम्या आपण वाचतो त्या खरच समाजपयोगी असतात का? सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या असतात   का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील.

    मात्र काहीच वर्तमानपत्रे असे आहेत जी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निडरपणे मांडत असतात. सध्याच्या काही वृत्तपत्रांमध्ये जो निडरपणा आला आहे तो डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यामुळेच आला आहे असं म्हणायला हरकत नाही.

    कोलंबिया विद्यापीठातून परतलेल्या डॉ. आंबेडकरांना आपल्या समाजातील अस्पृश्यांचे प्रश्न मांडणार एकही वृत्तपत्र दिसत नव्हतं. परिवर्तन चळवळींसाठी त्यांना व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या वृत्तपत्राची गरज होती.

    सार्वकालिक आंबेडकर

    त्यांनी एकदा समाजहीताची बातमी टिळकांच्या केसरी या वृत्तपत्रामध्ये छापण्यासाठी पाठवली. त्यासोबत ३ रुपयेसुद्धा पाठवले होते. मात्र पैसे देऊनसुद्धा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला होता.

    म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणार स्वतःच ‘मूकनायक ‘ नावाच स्वतंत्र वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वृत्तपत्र काढण्यासाठी भरमसाठ पैशांची गरज होती.

    अशा परिस्थितीमध्ये तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘मूकनायक’ वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहले. 

    प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

    मूकनायकात तुकोबांचा अभंग 

    क्वचीतच लोकांना माहिती आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संत साहित्याचे गाढे अभ्यासकसुद्धा होते. संत तुकाराम महाराजांच्या साहित्याचा डॉ. आंबेडकरांवर चांगलाच प्रभाव होता.

    त्यांनी संत तुकारामांच्या

    ” काय करू आता धरुनीया भिड। निःशंक हे तोंड वाजविले।। नाही जगी कुणी मुकीयांचा जाण। सार्थक लाजून नव्हे हित।।”

    या अभंगाने मूकनायक वृत्तपत्राची सुरवात केली होती.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • शंभु बंध्यो बजरंग……!!

    परकीय सत्ताधीशांच्या अत्याचाराने ग्रस्त झालेल्या भारत भुमीला रायगडावर राज्यभिषेक करून प्रतिइंद्र छत्रपती होत थोरले स्वामी शिवाजी महाराजांनी मुक्त केले आणि मराठ्यांच्या प्रचंड इतिहास ची उद्दंड लिखाणाला नव्याने सुरुवात झाली . 

    महाराष्ट्र ते कर्नाटक, आंध्रप्रदेश पासून श्रीलंका पर्यंत स्वराज्याची सिमा वाढली..

    पण हनुमान जन्मोत्सवाला   ( ३ एप्रिल १६८०) ला दख्खनपतींनी स्वराज्याचा निरोप घेतला आणि महाराष्ट्रावर आपल्या आशिर्वादाचे वर्षाव करून छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी झाले…

    परकीय रक्तपिपासुंच्या डोक्यात स्वराज्य संपवण्यासाठी डाव आखायला सुरुवात झाली.. सोबतच स्वकीय सुद्धा स्वराज्य पोखरून काढण्यासाठी वारूळ उभे करायला लागली आणि स्वराज्य संपवण्यासाठी स्वप्न बघणार्या डोक्यावर वज्रघात करत खास्या महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती शिवछत्रपतींचा वारसा सामर्थ्याने पुढे चालवण्यासाठी बत्तीस मण सुवर्णसिहासनपती पुढे आले ,

    दिल्लीपतीच्या छातीवर रौद्रभीषण तांडव करण्यासाठी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज दख्खन तख्तावर बसले…

    बुरहाणपुर वर जाऊन खासा मोघल बादशहा शहेनशहा औरंगजेब चीच दाढी ओढली आणि खासा औरंगजेब या तेवीस वर्षाच्या छत्रपतींना संपवण्यासाठी महाराष्ट्रात उतरला..

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    आणि सुरू झाली इतिहासाने कधीच न बघितलेली झुंज हसनअलिखान , शहाबुद्दीन, फत्तेखान, मुअज्जम ,आज्जम , रणमस्तखान , पोर्तुगीज, सिद्दी सर्वांच्याच तोंडचे पाणी या तेवीस वर्षाच्या  पोराने पळवले .

    खासा आलमगीर म्हणवणाऱ्या औरंगजेब ला आपल्या डोक्यावरचा ताज ए हिंद किमांश फेकून द्यावा लागला..

    एक एक गड सहा सहा वर्षे झुंझायला लागला , खवळलेल्या समुद्राला आणि फुटलेल्या बांधाला सुद्धा या रौद्रशंभुच्या घोड्याच्या टापाखाली यावं लागलं ,

    आंध्रप्रदेश, बिहार, बंगाल च्या मातीलाही मराठ्यांच्या शौर्याची धडकी भरली , जिवन म्हणजे पेटतं रणांगण

    आणि

    जिवन तर जिवन मृत्यू ला सुद्धा आमचा राजा असा पुढे गेला की शत्रू ला सुद्धा थरकाप उडाला..

    चाळीस दिवस मरणयातना सहन करत असतांना सुद्धा आपली मान खाली घालण्यासाठी तयार न होता धीरोदात्तपणे मरण स्विकारलं आणि मराठा साम्राज्याच्या रक्तात शौर्याचं धग पेटवून हिंदुस्थान वर राज्य करण्याचं स्वप्न जिवंत केलं.

    सत्तापिपासु औरंगजेब

    पण कलमकसायांनी ज्याच्या शौर्याला आपसूकच पुसण्यासाठी हळुवारपणे शाईचे पाणी फेकले…

    ज्याच्या बुद्धिमत्तेवर ते शौर्यावर प्रश्न उपस्थित केले , ज्याला नादात नादान असलेला सांगितले…

    गेली शतके पार होऊन सुद्धा ज्यांच्या इतिहास ला लोकसमक्ष  आणण्यासाठी  वा.सी बेंद्रे, कमल गोखले, विजयराव देशमुख सारख्या  इतिहास कारांना झगडावं लागलं…

    ज्याचा इतिहास हाच एक जाज्वल्य अग्नी प्रमाणे आहे…ज्याचं चरित्र हे गंगेच्या निर्मळ पाण्याप्रमाणे आहे आणि ज्याचं योद्धापण रूद्रशिवाचा तांडव आहे..

    अश्या छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास आता पुढे येऊन सुद्धा आम्ही आमच्या राजाला काय दिले नेमके?

    छत्रपती संभाजी महाराज यांना अजूनही महाराष्ट्राध्ये शासकीय महापुरुषांच्या यादीत स्थान नाही , त्यांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय नाही.

    सरकार वर सरकार पालटले पण ती यादी जैसे थेच आहे.

    आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर करु शकत नाही.

    महाराष्ट्र शासनाच्या महापुरुषांच्या दिनविशेष यादी मध्ये शंभुराजेंचं नाव नाही.

    फडणवीस काळात माननीय दिनदयाल उपाध्याय यांचे नाव शासकीय दिनविशेष यादीमध्ये आले ,

    या वर्षी नव्याने आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचे नाही.

    नेमके काय कारण आहे या राज्यकर्त्यांपुढे ? नेमकी समस्या काय आहे की एवढे वर्षे पालटुन सुद्धा शंभुछत्रपतींना शासकीय महापुरुषांच्या यादीत स्थान दिल्या गेले नाही.

    का हा दुजाभाव आमच्याच राजाबद्दल आमच्याच स्वराज्यात.?

    नेमकी शंभुछत्रपतींना खरी मानवंदना कधी?

    ✍️अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • डॅडी डॉन ते आमदार

    मंडळी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणं आजही त्यांच्या थरारक इतिहासाने ओळखली जातात. यांपैकीच एक म्हणजे मुंबईतील दगडी चाळ. मंडळी दगडी चाळ म्हणजे अरुण गवळी नावाच्या व्यक्तीची दहशत असणारा एरिया.

    १९७० ते १९८० या काळामध्ये अरुण गवळी नावाच्या डॅडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉनने ही दगडी चाळ चांगलीच गाजवली होती. या चाळीमध्ये आसपासच्या कारखान्यातील आणि गिरणीतील कामगार राहत होते.

    या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद

    १९७० च्या दशकात अरुण गवळी आणि त्याचा भाऊ किशोर यांनी रमा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या भायखळा अंडरवर्ल्ड कम्पनीत प्रवेश घेतला. १९८८ मध्ये झालेल्या पोलिसांच्या एका चकमकीत रमा नाईक ठार झाला. आणि त्यानंतर भायखळा कम्पणीची धुरा अरुण गवळीने हातामध्ये घेतली.

    अरुण गवळी आणि त्याचा भाऊ नेहमीच पोलिसांच्या निशाण्यावर असायचे. १९८८ ते १९९२ पर्यंत अरुण गवळीचा दाऊदच्या गँगशी संघर्ष चालू राहिला. या सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी अरुण गवळीने दगडी चाळीचा आश्रय घेतला.

    सेटलमेंट असो की पैशांचा व्यवहार याच चाळीमधून करून अरुण गवळी आपलं प्रत्येक पाऊल अपराधाच्या दिशेने टाकत होता. चाळीमध्ये त्याचा दरबारसुद्धा भरायचा. दगडी चाळीमध्ये असलेल्या १०पैकी दोन इमारतींमध्ये गवळीच गीताई नावाचं घर आहे.

    कारागृहात असतांना झाले आमदार

    या दहाही इमारती गवळीने एका मुस्लिम व्यवसायीकाकडून २ कोटींना विकत घेतल्या होत्या. या इमारतींपैको एका इमारतीमध्ये त्याने ३ रूम्स बनविल्या होत्या. ज्यापैकी पहिली रूम ही चौकशी करण्यासाठी वापरण्यात येत होती.

    दुसऱ्या रूममध्ये मोठे गुंड किंवा बिल्डर्स यांच्यात तह करून पैसे घेतले जायचे. अर्थात सेटलमेंट केली जायची. आणि तिसरी जी रूम होती त्यामध्ये अरुण गवळी व त्याचे साथीदार पोलिसांपासून वाचण्यासाठी आश्रय घेत होते.

    याच रूममध्ये अरुण गवळीने जिथे सिलिंडर गॅस ठेवतात तिथून तळ घरात जाण्याचा मार्ग तयार केला होता. मात्र एकदा अरुण गवळी अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडला. होणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी गवळीने ‘अखिल भारतीय सेना’ नावाचा पक्ष स्थापन केला आणि निवडून येऊन आमदारपण झाला.

    गवळीच्या पक्षाचे तीन नगरसेवकसुदधा होते. मात्र गुन्हेगारी क्षेत्र अरुण गवळीचा पाठलाग करणं काही सोडत नव्हतं. आणि पुन्हा अरुण गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद

    मंडळी राजकिय क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द पुढे नेत असतांना प्रत्येक नेत्याचं हे स्वप्न असत की आपण या देशाचा एक दिवस प्रधानमंत्री झालो पाहिजे.या पदासाठी नेहमी महाराष्ट्राबाहेरील नेतेच पोहचू शकले.

    मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नाव आणि एक मराठी माणूस म्हणून शरद पवार हे नेहमीच प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत राहले. पण त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने या पदापासून वंचित राहावं लागलं.

    शरद पवार यांना पहिल्यांदा १९६७ साली काँग्रेसचे जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी विधानसभेच्या निवडणूकीमध्ये उतरवलं आणि ते निवडूनही आले. चारवेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा झाले.

    १९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?

    शरद पवार यांनी आपल्या राजकीय शैलीने आपले नाव देशपातळीवर चांगलेच गाजवले होते. १९९१ साली झालेल्या राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व नव्हतं. सोनिया गांधी राजकारणात यायला तयार नव्हत्या.

    राजीव गांधीनंतर काँग्रेसचा युवा तळफदार नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे बघितलं जात होतं. मात्र काँग्रेसच अध्यक्षपद तेव्हा जेष्ठ नेते नरसिंह राव यांना देण्यात आलं. त्यानंतर त्यांना प्रधानमंत्रीपदसुद्धा देण्यात आलं.

    १९९९ ला नारायण राणेंमुळे होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री

    अशाप्रकारे पवार यांची पहिली प्रधानमंत्री व्हायची संधी हुकली. मात्र शरद पवार आणि त्यांच्या गटाने नरसिंह राव यांच्या प्रधानमंत्री पदाला विरोध करत सांगितलं होतं की,

    ” एकाच व्यक्तीकडे पक्षाच अध्यक्षपद आणि देशाच प्रधानमंत्री असणं हे गरजेचं नाही.”

    मात्र शरद पवार यांना नाईलाजाने नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात सरंक्षण मंत्री राहावं लागलं. १९९६ दुसऱ्यांदा शरद पवार यांना प्रधानमंत्री पदाची संधी होती. काँग्रेसचे १४५ खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आले होते.

    यावेळी लालू यादव, मुलायम यादव आणि डावे पक्ष शरद पवार यांना पाठींबा देत होते. मात्र याला नरसिंह राव इच्छुक नव्हते. काँग्रेस सरकारन देवे गौडा यांना बाहेरून पाठिंबा देत प्रधानमंत्री पद दिल आणि शरद पवार यांची दुसरी संधी हुकली. 

    यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी आपलं मत व्यक्त करतांना म्हटलं आहे की,

    ” शरद पवारांनी काँग्रेस पक्षात आघाडीच्या फडीतील नेता म्हणून अल्पावधीतच नाव कमावलं. १९९१ आणि १९९६ मध्ये ते प्रधानमंत्री पदाचे नक्कीच दावेदार होते. पण काँग्रेस पक्षातील ‘ दरबार पॉलिटिक्स ‘ मुळे त्यांना प्रधानमंत्री होता आलं नाही. आणि हे देशाचं झालेलं नुकसान आहे”.

  • १९९९ ला नारायण राणेंमुळे होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री

    मंडळी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अनेक उलटफेर सम्पूर्ण महाराष्ट्राला दिसून आले. ज्याप्रमाणे २०१९च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमण्यात विलंब झाला होता.

    त्याचप्रमाणे १९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्येसुद्धा मुख्यमंत्री नेमण्यात मोठ्या प्रमाणात वेळ झाला होता. तर मंडळी झालं असं की, १९९९ ला शरद पवार यांनी आपल्या स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढली होती.

    १९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?

    या निवडणुकीमध्ये शिवसेनेला ६९, भाजपा ६५, काँग्रेस ७५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ जागा मिळाल्या होत्या. भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करणार होते. मात्र शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या एकूण आमदारांची संख्या ही १३४ भरली आणि सरकार स्थापन करण्यासाठी आणखी ११ जागांची म्हणजे एकूण १४५ जागांची गरज होती.

    यावेळी शिवसेनेच सरकार स्थापन झाल असत. मात्र जेव्हा उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचा उमेदवारी वाटप केला तर १५ उमेदवारांना डावलण्यात आलं. तेव्हा त्या १५ उमेदवारांनी इतर पक्षांकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवली. ज्यामध्ये ११ उमेदवार निवडून आले.

    गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता

    तेव्हा जर या उमेदवारांना उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेला सरकार स्थापन करण्यात अडचण गेली नसती. 

    गोपीनाथ मुंडेच्या मुख्यमंत्री होण्याला राणेंची नाराजी 

    ज्या प्रमाणे शिवसेनेच सरकार स्थापन न होण्याला उध्दव ठाकरे जबाबदार होते. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे हे मुख्यमंत्री न होण्याला नारायण राणे जबाबदार होते. १९९९ ला शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची सरकार स्थापन करण्याची तयारी झाल्यानंतर  भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री होण्याची ईच्छा व्यक्त केली.

    यावर बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना त्यांचं मत विचारल्यानंतर नारायण राणे यांनी प्रत्यक्षपणे विरोध न करता म्हटलं की ” गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होवो की न होवो मात्र मी त्यांच्या मंत्रिमंडळात काम करणार नाही.” अस सांगून नारायण राणे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मुख्यमंत्री होण्याला अप्रत्यक्षपणे विरोध केला होता. हे नारायण यांनी आपल्या आत्मचरित्रातसुद्धा सांगितलं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir