Author: admin

  • १९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?

    मंडळी भारतीय देशाच्या राजकीय इतिहासामध्ये जर आपण डोकावून बघितलं तर अनेक गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिक वाढेल. महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षाचे सरकार स्थापन झाले.

    मात्र १९७८ मध्ये अशा एका पक्षाच सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल होत. ज्याच्याबद्दल क्वचितच लोकांना माहिती असेल. १९७५ साली अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवली.

    गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता

    जेष्ठ नेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशात आणीबाणीचे आदेश दिले. या आणीबाणीला देशातील जनतेने तीव्र विरोध केला आणि १९७७ मध्ये ही आणीबाणी मागे घेण्यात आली.

    याच काळामध्ये झालेल्या एका निवडणूकीमध्ये विरोधी पक्षांच्या संघटनेतून जन्माला आलेल्या ‘ जनता पक्षाने ‘ काँग्रेसचा दारुण पराभव केला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला नाराज होऊन काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले.

    इंदिरा गांधी यांचा एक गट आणि ब्रह्मनंद रेड्डी व यशवंतराव चव्हाण यांचा दुसरा गट तयार झाला. महाराष्ट्रात वसंतदादा पाटील आणि शरद पवारांसारखे नेते यशवंतरावांसोबत गेले तर तिरपुडेंसारखे नेते गेले इंदिरा गांधींसोबत.

    आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

    मात्र १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या या दोन्ही गटांना जनता पक्षाकडून पराभव स्वीकारावा लागला. पण जनता पक्षाकडे बहुमत नसल्याकारणाने दोन्ही काँग्रेसने पुन्हा एकत्रित येऊन सरकार स्थापन केलं.

    महाराष्ट्रातील हे पहिल आघाडी सरकार होत. मात्र आंतरीक वादामुळे हे सरकार जास्त वेळ टिकू शकलं नाही. शरद पवार हे १९७८च्या जुलै महिन्यात आपले ४० आमदार घेऊन बाहेर पडले. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या समाजवादी पक्षाची स्थापना केली. 

    शरद पवारांनी आपल्या समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर ते जनता पक्षाशी जाऊन मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये ‘पुलोद’ म्हणजेच ‘पुरोगामी लोकशाही दल’ नावाचं सरकार स्थापन केल. शरद पवार हे देशातील सर्वात तरुण असणारे वयाच्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता

    मंडळी राजकीय क्षेत्र म्हटलं की काही मोजकेच नेते आपल्याला असे बघायला मिळतात ज्यांना सर्वसामान्य जनतेचा आदर आहे. त्यांच्याबद्दल कळवळा आहे. असाच एक नेता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला. ज्यांच नाव होतं गोपीनाथ मुंडे.

    स्वभावात निर्मळपणा, कामात कर्तव्यदक्षपणा आणि अन्यायावर रोखठोकपणा घेऊन गोपीनाथ मुंडेंनी आपलं समाजकारण जनतेच्या हितासाठी केलं. गोपीनाथ मुंडे यांचा जन्म १२ डिसेंबर १९४९ ला महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला.

    १५ हजार कार्यकर्त्यांसह हार्दिक पटेल आज करणार भाजपात प्रवेश

    भारतीय जनता पक्ष त्यांनी जवळपास ४० ते ४५ वर्ष प्रचंड मेहनत करून महाराष्ट्रामध्ये पराकोटीला आणला होता. गोपीनाथ मुंडे यांना ओबीसींचा नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जायचं. आपल्या प्रचंड मेहनतीने आणि जनतेच्या प्रेमापोटी ते १९९५ साली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले.

    त्यांनी १९८० ते २००९ या कालावधीमध्ये विधानसभेमध्ये एक उत्तम राजकीय प्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न मांडले. गोपीनाथ मुंडे यांचा लोकांमध्ये प्रभाव एवढा होता की, महाराष्ट्रातील जनताच नाही, तर विरोधी पक्षातील नेतेसुद्धा त्यांचं कौतुक करायचे.

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    गोपीनाथ मुंडे हे आपल्या मनमोकळ्या आणि दिलखुलास स्वभावामुळे जनतेच्या मनात घर करून बसले होते. 

    मृत्यूच गूढ अजूनही कायम

    भारतीय जनता पक्षाला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यात गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा होता. २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश आलं होतं.

    नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकांवर आपलं शिक्कामोर्तब केलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळामध्ये गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्री म्हणून स्थान देण्यात आलं होतं.

    मात्र केंद्रीय मंत्री झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांमध्ये आपल्याच सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला जात असताना त्यांचा अपघातामध्ये दिल्ली येथे दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र गोपीनाथ मुंडे यांचा नेमका अपघात झाला की हत्या या मुद्द्यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपापली मते मांडली होती.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • १५ हजार कार्यकर्त्यांसह हार्दिक पटेल आज करणार भाजपात प्रवेश

    मंडळी राजकारण म्हटलं नेता केव्हा पलटून जाईल याचा कुणी अंदाजच लावू शकत नाही. मात्र यामध्ये भरडली जाते ती फक्त सर्वसामान्य जनता. गेल्या काही कालावधींमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला विधानसभा, लोकसभा आणि इतर निवडणुकांमध्ये चांगलच अपयश आलं.

    काँग्रेस पक्षाची ही पडती बाजू बघून पक्षातील काही नेत्यांनीसुद्धा काँग्रेस पक्षाला कायमचा रामराम ठोकला आणि दुसऱ्या पक्षात सामील झाले. मात्र आता काँग्रेसला सगळ्यात मोठा फटका बसला आहे तो म्हणजे हार्दिक पटेल यांच्या भाजपा प्रवेशाच्या निर्णयामुळे.

    जेव्हा गडकरींनी चढवला त्यांच्याच सासरेबुवांच्या घरावर बुलडोझर…

    हार्दिक पटेल यांनी गुजरातच्या प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश करण्याचं जाहीर रित्या सांगितलं आहे. हार्दिक पटेल हे स्वतः पाटीदार समाजातून असल्याकारणाने त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात पाटीदार समाज उभा आहे.

    गुजरातमधल्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला याचा चांगलाच फायदा होणार आहे. हार्दिक पटेल हे आज गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये आपल्या जवळपास १५ हजार कार्यकर्त्यांसोबत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. हार्दिक पटेल यांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेसला चांगलाच झटका बसला आहे. 

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    काय म्हणाले हार्दिक पटेल ?

    युवानेते हार्दीक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची माहिती  ट्विटरवरून दिली आहे.

    ते म्हणाले की,

    ” राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि समाजहित या भावनेतून मी आज नवा अध्याय सुरू करतो आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली देशसेवेच्या उदात्त कार्यात हे छोटा सैनिक म्हणून काम करेल.”

    अस हार्दिक पटेल यांनी ट्विट करून सांगितलं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जेव्हा गडकरींनी चढवला त्यांच्याच सासरेबुवांच्या घरावर बुलडोझर…

    मंडळी राजकरण म्हटलं की बहुधा आपण बघतो राजकीय नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेची फसवणूक करण्याचं काम करत असतात. एखाद्या कारवाईचा सर्वसामान्य गोरगरीब व्यक्ती शिकार होतो. मात्र तशाच प्रकारचा गुन्हा एखाद्या नेत्याच्या आप्तिकाने केला तर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही.

    याहीव्यतिरिक्त एखाद्या चांगल्या ठिकाणी पात्र गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना डावलून आपल्या परिचयातील व्यक्तीला नोकरीची संधी उपलब्ध करून देणे हे तर राजकीय नेत्यांचे नित्याचेच झाले आहे.

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    मात्र या सर्व कृतींना अपवाद सोडला तर राजकीय नेता कसा असावा याच उत्तम उदाहरण संपूर्ण जगासमोर ठेवणारा नेता म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कर्तव्यदक्ष नेते व केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीनजी गडकरी साहेब.

    जनतेकडून मतं लुटण्याच्या इर्षेने अनेक नेते धार्मिक मुद्दे उचलून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र नितीन गडकरी यांचा  समाजातील कुठलाच वर्ग टीकाकार नाही.

    आणि बाबरी पाडल्या गेली…

    याच कारण म्हणजे त्यांचा कर्तव्यदक्षपणा. मा. नितीन गडकरी नेहमी प्रसार माध्यमांशी किंवा भाषणामध्ये बोलत असताना विकास कामांचेच मुद्दे मांडत असतात. ‘आज तक ‘ या न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी असाच एक किस्सा सांगितला होता.

    नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यामध्ये एका रस्त्याच्या बांधणीच काम सुरू होत आणि रस्त्याशेजारील काही घरे ही अतिक्रमणमध्ये येत होती. ज्यामध्ये गडकरी साहेबांच्या सासरेबुवांचसुद्धा घर होत. तेव्हा त्यांनी अतिक्रमणमध्ये असलेल्या सासरेबुवांच्या घरासमवेत सर्व घरांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले होते.

    हे सर्व घडल्यानंतर गडकरी साहेबांच्या पत्नी आणि त्यांच्या परिवारातील सगळी लोकं त्यांच्यावर नाराज झाली होती. तेव्हा मा. गडकरी साहेबांनी “कायदा हा सर्वांसाठी समान असतो.” अस सांगत संपूर्ण देशासमोर उत्तम राजकीय नेत्याचं उदाहरण ठेवलं होतं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली?

    आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

    तो एकमेव आमदार ज्याला विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं

    कारागृहात असतांना झाले आमदार

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    स्त्रि अबला नसून जगाने दखल घ्यावी असा राज्यकारभार चालवून स्त्रि सक्षमीकरणासाठी एक उत्तम उदाहरण आणि सर्व वाईट रुढी परंपरांना जातिप्रथांना विरोध करणाऱ्या, सर्वधर्मसमभाव माननाऱ्या, मानवतावादी, समाजहितैषी,  व्यापक दूरदृष्टिकोन असणाऱ्या तत्त्वज्ञानी बहुजनहितकारिणी प्रजाहितदक्ष आदर्श महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – मनोज गावनेर

    अहिल्यामाई स्त्रि सक्षमीकरणाच्या सर्वात मोठ्या प्रतिक आहेत कारण त्यांनी सत्ता हाती घेऊन सर्वसमावेशक पणे राज्यकारभार चालवला. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज घडविले आणि या राजांनी आपल्या स्वराज्यात स्त्रि सक्षमीकरणाचा पाया घातला.

    पुढे मल्हारराव होळकर या मराठा सुभेदारांनी अहिल्यामाईंना आपली सुन म्हणून पराक्रमी खंडेरावांशी विवाह लावून दिला. मल्हाररावांनी आपल्या निरिक्षक नजरेने अहिल्याबाई होळकर यांच्या मधील गुण पारखले होते.

    खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांनी अहिल्यामाईंना सति न जाऊ देता प्रशासनात सामिल केले आणि मल्हाररावांच्या मृत्यूनंतर स्वतः अहिल्यामाईंनी संपूर्ण राज्यकारभार आपल्या हाती घेऊन शिवबांनी स्थापिलेल्या स्वराज्य रक्षणाच्या कार्यात मोलाचा हातभार लावला.

    त्या स्वतः विधवा असुन त्याकाळी राज्यकारभार चालविला आणि वाईट रुढी परंपरांना न जुमानता स्त्रियांसाठी न्याय्य भुमिका घेतली. पण आजही कुठे कुठे पुरूषी मानसिकतेमुळे स्त्रियांना गुलामासारखी वागणूक दिली जाते आणि स्त्रियांनी फक्त घरापुरते मर्यादित समजल्या जाते किंवा फक्त त्यांनी सांगितले तेवढे करावे, प्रश्न विचारू नये असे संकुचित जगणे करतात.

    पण स्त्रियांमध्ये नवनिर्मिती करणे, मुलांवर संस्कार करणे इत्यादी क्षमता असते आणि मनात आणले तर एकटीच खंबीरपणे घरदारही चालवू शकते तेवढेच नाहि, तर उत्तम शासनकर्ती सुद्धा होऊ शकते.

    सत्तापिपासु औरंगजेब

    अहिल्यामाईंनी अनेक तलाव, विहिरी, पाणपोई, घाट, पांथशाळा, आश्रयशाळा, अन्नछत्रे बांधली, तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा बांधून अनेक समाजोपयोगी कामे केली आणि वास्तुशिल्प व कलाकुसरीचा उत्तम नमुना म्हणून मंदिर, दर्गा ई. बांधून ते सर्व जातिंसाठी खुले केले आणि त्यामाध्यमातून कारागिरांच्या, कलाकारांच्या कार्याला वाव मिळवून दिला त्याचबरोबर गोरगरिब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले.

    त्यांनी काव्य, संगित, कला, उद्योग ई. कारागिरांना, कलाकारांना, मूर्तिकारांना आश्रय देऊन त्यांना सन्मान व वेतन देऊन ते जपण्याचे, वाढवण्याचे काम केले.

    अहिल्यामाईंनी राजकारणातील बारकावे व तत्त्व व्यावहारिक निती नियम व सूत्रे आपल्या राज्याची राजकीय, सामाजिक, भौगोलिक स्थिती, रणांगणावरील आखाडे व अडचणी आणि बारकावे आधीच समजून घेतले होते.

    त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व प्रजेची चोर, दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत, अशा लुटारू लोकांना गायी, म्हशी आणि जमीनी दिल्या व त्यांचे मत परिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला.

    भिल्लांना भिलकवाडी कर घेण्याची परवानगी दिली. अहिल्यामाई सामाजिक वास्तव नाकारत नसे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जात असे.

    त्यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्वपरिचित होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता आणि न्यायदानात विलंब करणे म्हणजे न्याय नाकारणे हे तत्त्व त्यांना माहित होते.

    अहिल्यामाईंनी स्वतःच्या कवायतीत ५ हजार स्त्रियांची तुकडी उभी केली होती. ज्यावेळी राघोबा पेशवाने आक्रमण केले होते त्यावेळी ही तुकडी लढण्यासाठी सज्ज केली होती.

    तेव्हा राघोबा पेशवाला काय करावे कळेना कारण हरलो तर स्त्रियांकडून हरू आणि जिंकलो तरि स्त्रियांकडून जिंकण्यात कसला पराक्रम असे पेशवाला वाटले म्हणून त्याने माघार घेत तह केला. येथे अहिल्यामाईंच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे दर्शन जाणवते.

    आणि बाबरी पाडल्या गेली…

    पण सद्या देशातील प्रस्थापित जातिय तेढ निर्माण करण्यासाठी हिंदू – मुस्लिम, मराठा – धनगर, आदिवासी – धनगर, मराठा – OBC अशा प्रकारची भांडणे लावण्यासाठी कारस्थाने रचत असतात आणि यासाठी आपल्यातीलच बहुजनांमधील काहींचा हस्तक म्हणून वापर करत असतात आपण त्यांना वेळीच ओळखून सर्वसमावेशक वैचारिक भुमिका घेतली पाहिजे.

    कारण आपल्या देशात देशाचे संविधान जाळल्या जाते तरि जाळणाऱ्यांना काहीच होत नाही पण एखादा धर्मग्रंथ जाळला असता तर रक्तपात केल्या गेला असता. संविधानावर विश्वास ठेवणारे हिंसेचे समर्थन कधीच करत नाही म्हणून लोकशाहीमध्ये हिंसा हि कुठल्याही गोष्टिसाठी होत असेल तरि ती घातकच असते.

    म्हणून अशावेळी आपण आपल्या महामानवांच्या विचारांचा जागर करणे गरजेचे आहे. त्यांना समजून घेऊन त्यांनी सांगितलेला मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारणे अतिशय गरजेचे, महत्त्वाचे असते. अहिल्यामाईंनी केवळ एका जातिपुरते राज्यकारभार चालविला नाही किंवा एका जातिपुरते कार्य केले नाही.

    अहिल्यामाईंनी आपल्या मुलीचा विवाह गुणी, शुर, पराक्रमी यशवंतराव फणसे या तरुणाशी लावून दिला होता. त्यांच्या राज्यात जातिप्रथेला थारा नव्हती कारण त्या शिवबांच्या स्वराज्याचे सुराज्य करण्याच्या हेतुने राज्यकारभार सांभाळत होत्या. म्हणून त्यांना केवळ एका जातिच्या चौकटित बंदिस्त करणे हा त्यांचा सर्वात मोठा अपमानच ठरेल. 

    सावित्रीबाई फुले यांनी अहिल्याबाई होळकर यांचे नाव देऊन वृद्धाश्रमाला अहिल्याश्रम नाव दिले, शाहु महाराजांनी पहिला दवाखाना अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ काढला. आपल्या बहुजनांच्या महामानवांचा इतिहास पाठ्यपुस्तकात सामिल करणे गरजेचे आहे.

    सद्या कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रतिनिधित्व मिळणे महत्त्वाचे असते म्हणून प्रशासनात सामिल होणे तर महत्त्वाचे असतेच पण आरक्षणाला फोल ठरवून विनापरिक्षा काही भांडवलदारी पिलावळांना क्लास वन सारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केल्या जाते, आपल्या हक्काच्या जागा इतरांना दिल्या जाते हे एकप्रकारे आपले शोषणच असते म्हणून या गोष्टिला प्रखर विरोध करावा लागतो.

    परिवर्तनासाठी प्रशासनासोबतच स्वार्थरहित पणे राजकारणात सक्रिय होऊन बहुजनांनी प्रतिनिधित्व करणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. स्वार्थ त्यागासाठी आपल्या महामानवांचे उच्च उदात्त खरे विचार समजून घेऊन आत्मसात करणेही सर्वात महत्त्वाचे आहेच.

    अहिल्यामाईंनी आपल्या शासनव्यवस्थेत टपाल सेवा, पाणी व्यवस्थापणाची आताही अनुकरणीय असे जलव्यवस्थापन, गावातील तंटा गावातच मिटावे यासाठी तशी व्यवस्था गावागावात करणे, आता कौशल्य भारताची हवेत होणारे काम आहे पण अहिल्यामाईंनी त्यावेळी कौशल्य निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली होती.

    आताच्या अनेक शासकिय प्रकल्पामध्ये अनेक भांडवलदारांचे हितसंबंध गुंतलेले आहे पण त्यावेळी अहिल्यामाईंनी फक्त गोरगरिबांना रोजगारासाठी, कारागिर, कलाकार यांच्या उत्कर्षासाठी आणि सामान्यजनांच्या उपयोगासाठी कामे केली.

    अहिल्यामाईंच्या जीवनात अनेक दुःखद प्रसंग आले. त्यांचा पति, सासरा, मुलगा, जावाई, मुलगी, नातू असे एक एक मृत्यूमुखी पडत गेले पण तरिही त्यांनी संयम ढळू न देता धैर्य बाळगून आलेल्या संकटाला खंबीरपणे तोंड दिले आणि आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत गेल्या.

    अहिल्यामाईंच्या कार्यकर्तृत्वापासून व विचारांपासून संयम सुद्धा बाळगुया आणि स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत कोरोनारूपी आलेल्या संकटाला खंबिरपणे तोंड देऊया. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.. शत् शत् नमन् .. जय मल्हार..

    ✍🏻 – मनोज गावनेर

       मंगरूळ चवाळा (अमरावती)

       9730408891

    (सदर लेखातील तथ्यांव्यतिरिक्त मांडलेले विचार माझ्या अल्प अनुभवातून मांडले आहे तरि त्यात काही चुकीचे असल्यास किंवा काही त्रुटी जाणवल्यास लक्षात आणुन द्यावी ही नम्र विनंती)

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आणि बाबरी पाडल्या गेली…

    मंडळी हा भारतीय देश विविध जाती धर्मांच्या विविधतेने नटलेला देश म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखल्या जातो. मात्र कधी वेळ अशी येते की या देशातील जाती धर्मांमध्ये निर्माण होणाऱ्या अस्थिरतेला पारावार राहत नाही.

    आपल्या राजकीय हितासाठी राजकीय नेतेमंडळी समाजामध्ये भडकाऊ भाषणाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. असच काही घडलं होत प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये.

    प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली?

    सण १५२८ मध्ये मुगल बादशहा सेनापती मीर बाकीने बाबरी मस्जिदच निर्माण केलं होतं. मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही नेत्यांनी ही मस्जिद पाडण्याचा अट्टहास धरला होता. सण १९८४ ला विश्व हिंदू परिषदेने दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये धर्म संसद घेऊन बाबरी मस्जिदीविरोधात आंदोलन उभं केलं होतं.

    सण १९८६ ला फैजाबादच्या जिल्हा जज यांनी बाबरी मस्जिद ही वादामध्ये अडकलेली आहे असा शिक्कामोर्तब केला होता. याच मुद्द्याला जोर देऊन भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी सण १९९०ला संपूर्ण भारतीय देशामध्ये रथयात्रा काढून लोकांची मने भटकवण्याचा प्रयत्न केला होता.

    आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

    लालकृष्ण आडवाणी यांच्या या राजकीय कटाला बळी पडून ३० ऑक्टोबर १९९० ला अनेक हिंदुत्ववादी लोकं बाबरीकडे मोर्चा घेऊन धावून आली. हा सर्व गोंधळ बघून तेव्हाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी पोलीस प्रशासनाला फायरिंगची ऑर्डर दिली. ज्यामध्ये १६ लोकं मारल्या गेली.

    अखेर तारीख आली ६ डिसेंबर १९९२. गोळीबारामध्ये मारल्या गेलेल्या १६ लोकांच्या समर्थकांनी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी बाबरीवर धाबा चढवला आणि बाबरी मस्जिद पाडण्यात आली. मस्जिद पाडून त्याठिकाणी अस्थायी मंदिर बनवण्यात आले.

    ही घटना घडल्यानंतर गुन्हेगार लोकांवर दोन एफआयआर दाखल केल्या गेल्या. त्यामधील पहिल्या एफआयआरमध्ये चोरी करणे, हल्ला करणे, सार्वजनिक प्रार्थनास्थळाला ठेस पोहचवण्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले. तर दुसऱ्या एफआयआरमध्ये भाजप, आरएसएस, बजरंगदल समवेत भारतीय जनता पक्षाच्या ८ नेत्यांवर भडकाऊ भाषण देण्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले.

    ज्यामध्ये लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, अशोक सिंघल, विनय कठिया आणि मुरलीमनोहर जोशीसारखी नावे सामील होती. अशा प्रकारे ६ डिसेंबर १९९२ ला घडलेली ही घटना देशाच्या एकतेला काळिमा फासणारी ठरली.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली?

    मंडळी राजकारण म्हटलं की एकमेकांवर टीका टिप्पणी करणं हा राजकीय क्षेत्राचा एक अंग आहे. मात्र कुणाचा जीव घेणे किंवा त्याची हत्या करणे ही गोष्ट अतिशय क्रूरतेची ओळख करून देते. होय मंडळी. आज आपण बोलणार आहोत भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येबद्दल.

    तारिख होती २२ एप्रिल २००६, वार शनिवार, सकाळचे जवळपास साडे सात वाजलेले होते. प्रमोद महाजन हे मुंबईमधील परळीतल्या आपल्या पूर्णा निवासस्थानी पेपर वाचताना चहा पीत होते. अचानक दाराची बेल वाजली.

    आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

    प्रमोद महाजन यांनी दार उघडले आणि दारासमोर जीन्स आणि टीशर्ट घालून त्यांचे भाऊ प्रवीण महाजन उभे होते. प्रमोद महाजनांनी प्रवीण महाजनांना आत बोलावले. दोघांमध्ये फारसे पटत नव्हते.

    दोघेही बैठकीमध्ये चर्चा करत असताना प्रमोद महाजन यांच्या पत्नीला अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आला. प्रमोद महाजनांवर त्या गोळ्या अक्षरशः त्यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी झाडल्या होत्या.

    तेव्हा प्रमोद महाजन यांच्या पत्नी हा सगळा प्रकार बघून ठप्प झाल्या. त्यांनी प्रवीण महाजनांना म्हटलं की,

    ” प्रवीण हे काय केलंस तू?”

    यावर प्रवीण महाजन

    ” भोगा आता.”

    अस उत्तर देऊन बिल्डींगच्या खाली उतरले आणि आपली गाडी पार्कींगलाच ठेवून टॅक्सीने पोलीस स्टेशनकडे रवाना झाले. प्रमोद महाजन यांच्या बिल्डिंगमध्ये जेष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडेसुद्धा राहत होते.

    तेव्हा प्रमोद महाजन यांच्या पत्नीने गोपीनाथ मुंडे यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना मुंबईमधल्या हिंदुज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    तो एकमेव आमदार ज्याला विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं 

    १३ दिवस मृत्यूशी लढून झुंज अपयशी

    हिंदुज्या रुग्णालयात चालू असलेली प्रमोद महाजन यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आणि ३ मे २००६ रोजी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. दुसरीकडे प्रवीण महाजन यांनी आपला गुन्हा कबूल केला होता.

    प्रवीण महाजन यांनी आपल्या MY ALBUM या पुस्तकामध्ये सांगितलं आहे की,

    ” हे सगळं कोणी केलं ? कस घडलं ? हे कुणाला कधीच कळणार नाही. मात्र हत्येच्या दिवशी काय काय घडलं? हे आपल्याला कळू शकेल.”

    अस प्रमोद महाजन यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. मात्र प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली? हे आजपर्यंत कळू शकलं नाही.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

    मंडळी भारतीय देशाच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय नेते झाले ज्यांनी स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी जनतेचा वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. निवडणूक आली तेव्हा मतं घेण्यासाठी जनतेच्या दारोदारी गेले पण निवडणूक झाल्यानंतर त्याच जनतेच्या कठीण काळात निष्ठुरपणाने पाठ फिरवली.

     

     

    मात्र राजकारण वाईट नाही ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. याच संकल्पनेचा वसा घेऊन अनेक राजकीय नेते समाजामध्ये अहोरात्र जनतेच्या हितासाठी झटत असतात. याच उत्तम उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्यातील पारनेर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निलेश ज्ञानदेव लंके.

     

    तो एकमेव आमदार ज्याला विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं

     

    कोरोना काळामध्ये अतिशय वाईट परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळाली होती. तेव्हा खरतर आपलं कोण आणि परक कोण? हे दिसून आलं होतं. आपलेच आप्तिक आपल्याजवळ यायला तयार नव्हते. लोकांना आक्सिजन असो की बेडची उपलब्धता असो या सर्व गोष्टींच्या अभावामुळे लोक मुंग्यांसारखी मरण पावत होती.

     

    अशा काळामध्ये निलेश लंके नावाचा एक आमदार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कोरोना रुग्णांची जबाबदारी घेऊन ११०० बेड असलेलं कोविड सेंटर उभारतो. स्वतः तिथल्या कोरोना रुग्णांची सेवा करतो. तिथेच जेवणसुद्धा करतो. असा आमदाराच्या रूपाने एक आयुष्य वाचवणारा ईश्वर कोरोना रुग्णांनी कोरोना काळात बघितला होता.

     

    कारागृहात असतांना झाले आमदार

     

    आपल्या जीवाची कुठल्याही प्रकारची हमी न बाळगता निलेश लंके कोरोना बाधितांची सेवा करतानाचे विडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. 

     

    कोण आहे निलेश लंके ?

     

    मंडळी निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघाचे आमदार २०१९ चया विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहे. त्यांनी आपल्या राजकीय क्षेत्राची सुरवात हे शिवसेनेतून केली होती. अवघ्या वयाच्या १५ व्या वर्षी ते शिवसेनेचे शाखा प्रमुख झाले होते. तिथून त्यांनी आपल्या राजकीय क्षेत्राला सामाजिक कामांचा आकार दिला.

     

    निलेश लंके यांचे वडील हे शिक्षक आणि आई या गृहिणी होत्या. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने त्यांनी काही वेळ नोकरीसुद्धा केली. मध्यमवर्गीय कुटुंबामधून आलेले निलेश लंके हे जनतेच्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यांच्यासारख्या नेत्यांकडून राजकीय नेत्यांनी आदर्श घेण्यासारखं निलेश लंके यांचं व्यक्तिमत्त्व आहे.

     

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • तो एकमेव आमदार ज्याला विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं

    मंडळी या जगाच्या राजकीय इतिहासामध्ये राजकारणात यशस्वी होण्यासाठी जनतेची फसवणूक करणारे, आपल्याच नातेवाईकांना अक्षरशः कुटुंबातून वेगळं करणारे, दारूचा वाटप करून गोरगरिबांची मत घेणारे असे अनेक राजकीय नेते आपण बघितले आहेत आणि अनुभवलेसुद्धा आहे.

    मात्र असा एक नेता ज्याची प्रकृती बिघडल्याची वार्ता कळल्यानंतर लोकांच्या डोळ्यातील आसवांना पारावर राहला नाही. अक्षरशः लोकांनी अभिषेक करायला सुरुवात केली. इतका जनतेच्या काळजात घर करून बसलेला नेता म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ नेते मा.श्री गणपतरावजी देशमुख उर्फ आपल्या सर्वांचे लाडके आबा.

    कारागृहात असतांना झाले आमदार

    गणपतराव देशमुख यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या गावी १० ऑगस्ट १९२६ रोजी झाला. ते व्यवसायाने वकील होते. मात्र आपल्या सांगोला मतदारसंघातील परिस्थिती बघता त्यांनी प्रत्येक माणसाचा आवाज बनून १९६२ साली पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि ते निवडूनसुद्धा आले.

    सांगोला मतदारसंघातील जनतेच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी आबांनी अनेक आंदोलनेसुदधा केली. सतत ११ वेळा आमदार म्हणून निवडून येणारे आबा हे देशातील सर्वात पहिले आमदार होते.

    प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

    आपल्या साध्या राहणीमानामुळे आबा नेहमीच चर्चेत असायचे. १९९०, २००४ व २००९ साली त्यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांना वोधनमंडळाचा जीवनगौरव पुरस्कार, वस्त्रोद्योग महर्षी पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब पाटील समाजभूषण पुरस्कार, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 

    सलग ११ वेळ निवडून आलेले आमदार असूनसुद्धा आबांनी नेहमी एसटीमधून प्रवास केला. अत्यंत साधी राहणी ठेवली. सांगोला मतदारसंघातील जनतेच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी अनेक आंदोलने केली. स्वतःच्या पक्षाशी एकनिष्ठ राहून कधीही दुसऱ्या पक्षाचा विचार केला नाही.

    त्यांनी आपल्या वयाच्या ९५ व्या वर्षी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात ३० जुलै २०२१ ला अखेरचा श्वास घेतला. आबांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर पसरला होता. मा. गणपतराव देशमुख हे एकमेव राजकीय व्यक्तिमत्त्व अस होत की, ज्यांना विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • कारागृहात असतांना झाले आमदार

    मंडळी आपण या देशामध्ये अनेक निवडणूका बघितल्या. अनेक राजकीय नेते निवडून येतांना किंवा पराभूत होतांनादेखील बघितले. जनतेच्या दारापर्यंत जाऊन जनतेला मतदान करण्याची विनवणी करणारे अनेक राजकीय नेते आपण बघितले आहेत.

    मात्र असा एक नेता जो कारागृहामध्ये असतांना विधानसभा निवडणुकीमध्ये भरगोस मतांनी निवडून येतो. अस राजकीय क्षेत्राच्या इतिहासामध्ये कदाचित कधी घडलं असेल? होय. आपण बोलत आहोत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकप्रिय आमदार रत्नाकरजी गुट्टे यांच्याबद्दल.

    संजय राऊत आणि उध्दव ठाकरेंना १०० कोटी द्यावे लागणारच – किरीट सोमय्या

    रत्नाकर गुट्टे यांनी पहिल्यांदा २०१४ ला भाजप प्रेरित रा.स.प.कडून विधानसभा निवडणुक लढवली होती. नंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि ऐन २०१९ मधल्या निवडणूकीच्या तोंडावर त्यांना पोलीस प्रशासनाकडून अटक करण्यात आली.

    रत्नाकर गुट्टे यांनी विविध बँकांकडून सुमारे ३२८ कोटी रुपयांचा कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर घेतल्याचा आरोप त्यांच्यावर केल्या गेला होता. मात्र कारागृहामध्ये असतांनासुद्धा गंगाखेड मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगून ठेवले होते.

    प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

    रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला असल्याकारणाने मतदारसंघातील सम्पूर्ण जनता त्यांच्याबद्दल भावनिक झाली होती. 

    कारागृहात असतांना रत्नाकर गुट्टे विजयी

    वर्ष होते २०१९. गंगाखेड मतदारसंघामध्ये विधनसभा निवडणूकीची तयारी जोमात सुरू होती. भारतीय जनता पक्ष प्रेरित राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून रत्नाकर गुट्टे हे कारागृहात असतांना उभे होते. कारागृहात गुट्टे साहेब कसे काय निवडून येतील?

    हा प्रश्न सर्व जनतेला पडला असतांना गंगाखेड मतदारसंघातील जनतेने आपला विश्वास गुट्टे साहेबांना मतदान करून व्यक्त केला आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गुट्टे साहेब हे जवळपास १८००० मतांनी विजयी झाले.

    एखादा उमेदवार कारागृहामधून निवडून येऊ शकतो. हे राजकीय इतिहासामध्ये पाहिल्यांदाच घडले होते. अखेर जनतेच्या प्रेमापोटी रत्नाकर गुट्टे गंगाखेड मतदारसंघाचे आमदार झाले.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir